नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत
!doctype>
हार्दिक स्वागत ......WEL COME
रविवार, २९ डिसेंबर, २०१९
सोमवार, २३ डिसेंबर, २०१९
पदवीधर मतदार नोंदणी
कोल्हापूर, सांगली, सातारा, पूणे,वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, परभणी, चंद्रपूर, नांदेड, जालना,बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदार संघ नाव नोंदवा
Online Submission of Graduate Electoral - Form 18
अशा लिंकवर क्लिक करा. https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx
पुढे फॉर्म येईल
Chief Electoral Officer, Maharashtra
Online Graduate Form 18
-
अशी खालील ही माहिती भरा
१) Select District जिल्हा निवड करा
२) Graduate Applicant Details
First Name
Firat Name Marathi
Last Name
Last Name Marathi
DOB
Age Gender
३) Graduate Applicant Relative Details
Note : Relative Name Means Details of Father / Mother / Husband / Other Details
Relation Type
Relation Name
Relation Name Marathi
Relation Last Name
Relation Last Name Marathi
४) Applicant Qualification Details
Qualification
Occupation
Graduation Pass out Year
५) Applicant Address
House No.
House No. Marathi
Full Address English
Full Address Marathi
Tahsil Name
Tahsil Name Marathi
Post Office Name
Post Office Name Marathi
Village Name
Village Name Marathi
Pincode
६) Applicant Assembly Details
Assembly No.
Part No.
Voter Card No.
Contact No.
Mobile No.
Email ID
७) Applicant Documents Applicant Photo फाईल मध्ये फोटो जोडायचे आहे
८) Applicant Graduate Certification
फाईल मध्ये फोटो जोडायचे आहे
९) Applicant Address फाईल मध्ये पुरावा फोटो जोडायचे आहे

पद्मश्री रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार
स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी, पद्मश्री
रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार
जन्म : १५ सप्टेंबर १९०९ (निमशिरगाव, कोल्हापूर, महाराष्ट्र)
मृत्यू : २३ डिसेंबर १९९८ ( इचलकरंजी )
मतदारसंघ : इचलकरंजी
लोकसभा मतदारसंघ
कार्यकाळ : १९५२ – १९५७
मतदारसंघ : शिरोळ विधानसभा मतदारसंघ
कार्यकाळ : १९६२ – १९६७
मतदारसंघ : शिरोळ विधानसभा मतदारसंघ
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मागील इतर राजकीय पक्ष
संस्थान : प्रजा परिषद
पत्नी : पार्वती
अपत्ये : ३ मुली
निवास : इचलकरंजी
धर्म : हिंदू धर्म (लिंगायत)
डाॅ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेले इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री,अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते.
१९८५ साली त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८५ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट् पदवी दिली.
🤷♂ *प्रारंभी जीवन*
रत्नाप्पांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव या खेडेगावात कुंभार काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील भरमाप्पा व आई गंगूबाई होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले. माध्यमिक शिक्षण हातकणंगले या तालुक्याच्या गावी झाल्यावर १९२८ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात गेले. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थांच्यासाठी स्थापन केलेल्या वीरशैव वसतीगृहात राहून त्यांनी १९३३ साली बी.ए. ची पदवी संपादन केली. कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांनी एल्.एल्.बी च्या पहिल्या वर्गात प्रवेशही घेतला. मुलगा चांगले शिकत असलेले पाहून त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे वडिलांनी रत्नाप्पांचे लग्न ठरविले व मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावातील पार्वतीबाई यांच्याशी १९३४ साली रत्नाप्पांचा विवाह झाला.
🏇 *भारतीय स्वातंत्र्य चळवळ*
त्या काळात जोमात असलेल्या मिठाच्या सत्याग्रहामुळे भारतातील राजकीय वातावरण तापले होते. रत्नाप्पा एल्.एल्.बी च्या पहिल्या वर्गात असताना १९३४ साली, कोल्हापुरात माधवराव बागल हे शेती व शेतीमालाचे ब्रिटिशांकडुन होणारे शोषण व लूट या विषयांवर सभांमधून बोलत असत. रयतेच्या सत्यस्थितीचे बागल करीत असलेल्या विश्लेषणाने रत्नाप्पा त्यांच्याकडे आकर्षित झाले व कायद्याचा अभ्यासक्रम अर्धवट सोडून ते बागलांचे सहकारी बनले. २५ डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापुरात शेत-सारा कमी करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरच्या संस्थाना विरुद्ध मोर्चा निघाला. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या स्थानिक संस्थानांचे राज्यांत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांमध्ये रत्नाप्पा आघाडीवर होते. ६ जून १९३९ रोजी जयसिंगपूर गावातील श्रीराम ऑईल मिल मध्ये प्रजा परिषद स्थापनेसाठी बैठक बोलावण्यात आली. माधवराव बागल, रत्नाप्पा, दिनाकर देसाईंसह अंदाजे दोन हजार लोक उपस्थित होते. बैठकीचे फलस्वरूप संस्थान प्रजा परिषद या नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाला व ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. हा पक्ष ऑल इंडिया स्टेट पीपल्स कॉग्रेसशी संलग्न होता. ८ जुलै १९३९ रोजी त्यांना अटक झाली व दंडाची आणि कैदेची शिक्षा ठोठावली गेली. कुंभार, बागल, देसाई व इतरांना कोल्हापूरच्या तुरुंगात कैदेत ठेवून शिवाय त्यांना दंड ही करण्यात आला. काही दिवसांनी सुटल्यावर रत्नाप्पा लगेच कॉग्रेसच्या अधिवेशनात सामील होण्याकरता मुंबईला गेले. याच अधिवेशनात चले जाव चा नारा दिला गेला. ब्रिटिश सरकारने कॉग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू केली. रत्नाप्पा रातोरात भूमिगत झाले व त्यांनी इंग्रज सरकारविरोधात लढाई सुरू ठेवली.
सुरूवातीला भूमिगत झाल्यावर त्यांनी त्यांची कचेरी मिरजे जवळ्च्या मालगाव जवळ असलेल्या दंडोबाच्या डोंगरावर असलेल्या बाबंण्णा धुळी यांच्या मळ्यात केली होती. तेथे त्यांना मदत करण्यासाठी कॉग्रेड एस. पी. पाटील सामील झाले. भूमिगत झालेले कार्यकर्ते गावतील चावड्या जाळणे, रेल्वे स्टेशन्स जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, दारूचे गुत्ते जाळणे आदी घातपाती कारवाया करत, रत्नाप्पांनी या भूमिगत कार्यकर्त्यांमधे एकसूत्रीपणा आणला. या भूमिगत चळवळीची सर्व आखणी आणि कर्यक्रम रत्नाप्पा या दंडोबाच्या डोंगरावरच्या कचेरीत ठरवत असत. त्या नंतर रत्नाप्पांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घातपाती कार्यवाया झाल्या. पुढे या चळवळीच्या कामासाठी पैशाची चणचण जाणवू लागली. मिरजेजवळील मालगावात काही मोजक्या क्रांतिकारकांची रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर १९४३ च्या सुमारास ३ दिवासांची गुप्त बैठक झाली व यात बार्शी रेल्वेतून जाणारे इंग्रजांचे टपाल लुटण्याचा बेत त्यांनी आखला गेला. चनगोंडा पाटील, काका देसाई, कुंडल देसाई, आय.ए. पाटील, व्यंकटेश देशपांडे, हरिबा बेनाडे, दत्तोबा ताबंट, ईश्वरा गोधडे, शंकरराव माने या क्रांतिकारी युवकांनी रत्नाप्पांच्या नेतृत्वाखाली २९ डिसेंबर १९४३ रोजी बार्शी येथे टपालाच्या डब्यावर हल्ला केला. ड्रायव्हर, फायरमन व गार्ड यांना पकडून त्यांना दोन ते तीन मैल लांब सोडून देण्यात आले. टपालाच्या पिशव्या व थैल्या ताब्यात घेऊन सर्वजण पसार झाले. या लुटीत अनेक मौल्यवान वस्तुंबरोबरच एका शाळेच्या हिंदी परीक्षेच्या सर्टिफिकेट्सचा पुडका होता. तो पुडका कार्यकर्त्यांनी पोष्टाने त्या शाळेला परत पाठवला.
पुढे काही मोजक्या साथीदारांना सोबत घेऊन रत्नाप्पांनी जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरातील जामदारखाना लुटण्याचा बेत आखला. २७ जुलै १९४४ रोजीच्या रात्री शंकरराव माने, डॉ.माधवराव कुलकर्णी, दत्तोबा तांबट, शाम पटवर्धन, य. म. कुलकर्णी, शि. पी. पाटील, इब्राहीम नदाफ निवडक सहकारी क्रांतिकारी युवकांच्या साथीने रत्नाप्पांनी जेजुरी देवस्थानावर दरोडा घातला. तेथील सेवेकरी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ल्ला करून त्यांना मारहाण केली व पुजाऱ्याकडून मंदिरातील जामदारखान्यातील तिजोरीच्या किल्ल्या घेऊन खजिना उघडला. तिजोरीत इंदूरचे होळकर , ग्वाल्हेरचे शिंदे आणि पुण्याचे पेशवे व इतर धनिकांनी खंडोबाला दिलेल्या सोन्याच्या, रत्नांच्या कुड्या, माणिकाचे खडे, पानड्या, लाकड्या(?), कंठी, मोत्याचे तुरे, कंबरेचे छल्ले, शिरपेच, देवाचे मुखवटे, जडजवाहीर, सोन्याच्या मूर्ती असे कोट्यवधी रुपये किमतीचे दागिने होते ते घेऊन हे सर्वजण पळून गेले. पोलिसांनी या दरोड्याचा तपास लावला व रत्नाप्पा कुंभार सोडून बाकीच्या सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. १९४५ सालच्या जानेवारीत पुणे कोर्टात १३ आरोपींवर खटला भरण्यात आला. ब्रिटिश सरकारने रत्नाप्पांबद्दल माहिती देणाऱ्या अथवा त्यांना अटक करण्यात मदत करणाऱ्यांसाठी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले तरीसुद्धा ते काही सापडले नाहीत. पुढील ६ वर्षे ते अज्ञातवासातच होते. त्यांनी सहकारी क्रांतिकारकांच्या सोबतीने लुटलेल्या पैशाचा वापर भूमिगत चळवळीच्या कामासाठी अत्यंत योग्य रितीने केला.
१९४७ साली त्यांचे वडील भरमाप्पा यांचे निधन झाले, ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्या घरावर त्यांना पकडण्यासाठी पहारा ठेवला होता पर्ंतु रत्नाप्पांनी वेशांतर करून वडिलांचे अंत्यदर्शन घेतले व ते त्याही वेळेस ही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर एके दिवशी अचानक ते कोल्हापुरात अवतरले.
🇮🇳 *संस्थाने विलिनीकरणाची चळवळ*
१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांनी भारत देशातील ५६५ संस्थानातील राजेशाही अबाधित ठेवून भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. यामुळे सर्वंकष स्वातंत्र्य प्राप्तीचे स्वप्न अपुरे रहाण्याचा धोका निर्माण झाला होता. सरदार वल्लभभाईंसोबत रत्नाप्पा ही या चळवळीत सामील झाले. रत्नाप्पा कुंभारांनी स्थानिक संस्थानांना आपाआपली संस्थाने खालसा करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर अक्कलकोट, सावंतवाडी, जंजिरा, मुधोळ व जतसह अनेक संस्थानांनी विलीनीकरणास नकार दिला होता.
*अक्कलकोट संस्थान*
प्रजा परिषदेने अक्कलकोट संस्थानाचे विजयसिंगराव राजे सरकारांना भारतात सामील होण्यासाठीच्या अनेक वेळा विनंत्या केल्या होत्या. पर्ंतु संस्थानिक त्यास अनुकूल नव्हते. शेवटी रत्नाप्पांनी आरपारच्या लढाईला हात घातला व आपला विश्वासू सहकारी गोपाळ बकरे यांना सत्याग्रहाच्या तयारीसाठी अक्कलकोटला पुढे धाडले. २५ डिसेंबर १९४७ रोजी रत्नाप्पांनी राज्य प्रजा परिषदेची बैठक बोलावून त्यात अक्कलकोटच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. दुसरे दिवशी सत्याग्रहाचा आराखडा तयार करून त्यांनी कामे वाटून दिली. १ जानेवारी १९४८ रोजी अक्कलकोटला सत्याग्रह सुरू करत असल्याची माहिती देण्यासाठी मुंबई व दिल्लीला तारा करून कळवले. १ जानेवारीच्या पहाटे अंदाजे १ हजार लोकांची प्रभात फेरी सुरू झाली व दुपारी १२ वाजता लक्ष्मी मार्केटवर तिरंगा ध्वज लावण्यात आला. त्याच दिवशी रात्री रत्नाप्पांचे भाषण झाले. २ जानेवारीला सत्याग्रहींनी शेंगदाण्याच्या निर्यातीस अक्कलकोट संस्थानाने घातलेली बंदी मोडली व लहान लहान पिशव्यातून शेंगदाणे सोलापूरला निर्यात केले. ३ जानेवारीला आंदोलन चिघळले व अशांतता, मारहाण व जाळपोळ सुरू झाली. सत्याग्रहींनी मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकवला व राजवाड्यावर दगडफेक केली. संस्थानच्या समर्थकांनी पण रत्नाप्पा कुंभार ज्या ठिकाणी मुक्कामास होते ती कचेरी जाळली व त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी दुपारी संचारबंदी जाहीर झाली. अक्कलकोट संस्थानाचे विजयसिंगराव राजे सरकारांनी सोलापूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे संरक्षण मागितले. भारतात विलिन होण्याच्या शर्तेवर संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले. वाटाघाटी झाल्या व ५ जानेवारीला संस्थानिकांनी भारतात खालसा होण्यास थोडी अनुकुलता दाखवली. ८ जानेवारीला सोलापूरच्या लोखंड गल्लीत रत्नाप्पांसह त्यांचे सहकारी गोपाळ बकरे, वकील भाऊसाहेब बिरजे, शांबदे, रहीम अत्तारांसह इतर सत्याग्रहींचा सत्कार झाला. १६ जानेवारीला रत्नाप्पांनी सरदार वल्लभभाई पटेलांना लिहिलेल्या पत्रात अक्कलकोट मधील परिस्थितीचा आढावा कळवला व कायदा व सुव्यवस्था चांगली नसल्याचे सांगून भारतीय यंत्रणेने ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. या सत्याग्रहचा परिणाम अक्कलकोट संस्थान ८ मार्च १९४८ साली भारताच्या मुंबई प्रांतात सामील झाले व अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका बनले.
*सावंतवाडी संस्थान*
महात्मा गांधींची ३० जानेवारी १९४८ ला हत्या झाली. देशभरात निषेधाची लाट पसरली होती. कोल्हापूर सह काही संस्थानांत जातीय हिंसाचार वाढला होता त्यातच सावंतवाडीला १४ फेब्रूवारी १९४८ रोजी रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली प्रजापरिषदेचे तिसरे आधिवेशनस सुरवात झाली. सावंतवाडीत त्या आधी प्रजा परिषदेने विलिनिकरणासाठी अनेक अंदोलने केली होती. रत्नाप्पांनी आपल्या भाषणात विलिनीकरणाच्या प्रश्नावर जोर देत लढा अधीक तीव्र करण्याचे संकेत दिले व अधिक विलंब न लावता, भारतात विलीन होण्यास सावंतवाडी संस्थानाच्या राजेसाहेबांना विनंती करण्याचा व तसे न झाल्यास प्रतिसरकार स्थापन करण्या संबंधिचा ठराव करून मंजुर केला. २१ जानेवारी पर्यत वाट पाहुन २२ तारखेला जाहीर पत्रके वाटुन अंदोलन करण्यात आले. २३ जानेवारीला संस्थानाच्या सर्व आधिकाऱ्यांना कुडाळला कैदेत ठेवुन संस्थानात दंगल करण्यात आली. परिस्थीती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शिवराम राजे साहेबांनी विलीनीकरणास तयार असल्याची घोषणा केली.
कोल्हापूर संस्थान
ब्रिटिश राजवटीच्या अंतानंतर झालेला काँग्रेसचा वाढता प्रभाव पहाता कोल्हापूर संस्थानाने सर्व समावेशक सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली व रत्नाप्पांना या सरकारात पद देऊ केले. परंतु संस्थाने भारतात पूर्णपणे विलीन करण्याच्या भूमिकेवर रत्न्नाप्पा हे ठाम होते. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. नंतर त्यांना डेक्कन रीजनल काउन्सिलचे अध्यक्ष करण्यात आले व त्यांच्या मार्गदर्शानाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सगळी संस्थाने भारतात विलीन झाली.
💁♂ *राजकीय कारकीर्द*
रत्नाप्पांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. ते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षही झाले, १९५० साली त्यांची लोकसभा सदस्य पदी नियुक्ती झाली. ते भारतीय राज्यघटनेची रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या घटनासमितीचे सदस्य बनले. ते भारताच्या घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. १९५२ च्या पहिल्या लोकसभेचे ते खासदार म्हणून निवडून आले. कोल्हापूर व सातारा असा हा मतदार संघ होता. रत्नाप्पांना १,६३,५०५ मते मिळाली व त्याचे प्रतिद्वंदी कृष्णाजी लक्ष्मण मोरे यांना १,४५,७४७ मते मिळाली. त्यांनी मोरे यांचा १७७५८ मतांनी पराभव केला. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातगोंड रेवगोंड पाटील ( सा. रे. पाटील) त्यांनी रत्नाप्पांचा पराभव केला. इ.स १९६२ ते १९८० आणि नंतर १९९० ते निधनापर्यंत त्यांनी आमदार म्हणून शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९६३ सालच्या वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात व नंतर वसंतराव दादा पाटीलांच्या मंत्रिमंडळात १९७४ ते १९७८ पर्यंत ते महाराष्ट्राचे गृह आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री होते. कोल्हापूर जिल्हातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत औद्योगिक व शेतीविषयक समृद्धी घडवून आणण्यात रत्नाप्पांचे फार मोठे योगदान होते.
निवडणूक वर्ष लोकसभा/विधानसभा प्रतिद्वंदी रत्नाप्पांचे मताधिक्य निकाल
१९५२ लोकसभा कृष्णाजी लक्ष्मण मोरे १,४५,७४७ विजयी
१९५७ विधानसभा सातगोंड रेवगोंड पाटील पराभूत
१९६२ विधानसभा सातगोंड रेवगोंड पाटील २४,६५१ विजयी
१९६७ विधानसभा सातगोंड रेवगोंड पाटील २,८४० विजयी
१९७२ विधानसभा जाधव ४२,९१८ विजयी
१९७८ विधानसभा दिनकरराव यादव १२,४४९ विजयी
१९८० विधानसभा दिनकरराव यादव ३,१२८ पराभूत
१९९० विधानसभा शामगोंड कलगोंड पाटील १९,६६६ विजयी
१९९५ विधानसभा शामगोंड कलगोंड पाटील २६,१६८ विजयी
🤝 *सहकारी चळवळ*
रत्नाप्पा कुंभारांनी १९५२ साली खासदार झाल्यावर लगेचच भारतातील दुसऱ्या सहकारी सहकारी साखर कारखान्याची उभारणीच्या हालचाली इचलकरंजी येथे सुरू केल्या. त्या काळात खाजगी उद्योग प्रचलित होते, सार्वजानिक अथवा सहकारी क्षेत्रातील उद्योग नव्हते. पिकलेल्या उसाचा गूळ करून गुजराती व्यापाऱ्यांना विकणे एवढेच प्रचलित होते. रत्नाप्पांनी सहकारी साखर कारखाना उभारणीसाठीचा अभ्यास केला व सरकारी परवानगी साठीच्या हालचाली करून प्रस्ताव सादर केला. तात्कालिन मुंबई राज्याचे अर्थमंत्री जीवराज मेहता यांनी साखरेच्या उत्पादनाने गुळाच्या निर्यातीस मार बसतो असे कारण सांगून कारखाना स्थापन करण्यासाठीची परवानगी नाकारली. गुजराती गुळाच्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देणे योग्य नसल्याचे जाणून रत्नाप्पांनी प्रस्तावित कारखाना क्षेत्रातील एकूण बागायती असलेली जमिन, पाणी पुरवठा करून येणारी अतिरिक्त बागायती जमीन, त्यांच प्रमाणे साखर व गूळ उत्पादनाचा तुलनात्मक अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हिताचा आढावा घेणारा सर्वंकष अहवाल त्यांनी अर्थ तज्ज्ञांना सादर केला. या तज्ञांच्या अभिप्रायासह कारखान्याच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव पुन्हा अर्थमंत्र्यांना सादर केला गेला. ३ वर्षाच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी १ ऑक्टोबर १९५५ रोजी सहकारी तत्त्वावरच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचा परवाना मिळवला. १२,९६,०३७ रुपयांचे भागभांडवल शेतकरी जनतेतून उभे केले व पश्चिम जर्मनीतील बकाऊ वुल्फ या कंपनीकडून रोज १००० टन ऊस गाळण क्षमता असलेली यंत्रसामुग्री आयात केली. प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या परिसरातील गावांचा आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधून संपूर्णपणे कायापालट घडवून आणला पाहिजे...
साखर कारखाना हा शिक्षणाचे व संस्कृतीचे केंद्र बनला पाहिजे.साखर कारखान्याचे काम समाजाच्या जडणघडणीचे आहे.प्रत्येक साखर कारखाना आदर्श समाजाचा शिल्पकार म्हणून पुढे यावा.
..रत्नाप्पा कुंभार
कारखान्याची उभारणी पूर्ण झाल्यावर १९५७/५८ च्या पहिल्या गळित हंगामात या साखर कारखान्याने ३५३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले व शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला ४१ रुपये प्रती टन इतका भाव दिला. १९६३-६४ च्या हंगामात कारखान्याने २,३५,००० पोती साखरेचे उत्पादन केले. रत्नाप्पांनांनी १ कोटी रुपयांच्या खर्चाने नविन २४ पाणी पुरवठा योजना केल्या. १९६४ साली या साखर कारखान्याच्या अनुषंगाने त्यांनी उभारलेल्या एकूण ५९ पाणी पुरवठा योजनांनी अंदाजे ५६,००० एकर शेतीला पाणी पोहचवले. शेतीच्या विकासासाठी पाणी, खत, अवजारे, तांत्रिक ज्ञान, शेतीमालाच्या किमती यांबरोबरच खेड्यातून शेतीवाड्यात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांना गावातून शेताशिवारात जा-ये करण्यासाठी या पाणंद रस्त्यांची अहोरात्र गरज असते त्या पांदण रस्ते, जोड रस्ते करण्याचा २ लाख रुपये खर्चाचा प्रकल्प साखर कारखान्याच्या वतीने केला. यासाठीच रत्नाप्पा कुंभारांना, शेतकरी राजाचे आर्थिक उन्नयन होण्यात मोलाची कामगिरी बजावणारे देशभक्त म्हणून ओळखले जाते. स्थापनेच्या वेळी रोज १००० टन ऊस गाळण क्षमता असलेला कारखाना ३० सप्टेंबर १९८३ रोजी कर्जमुक्त झाला व तेव्हा तो रोज ५००० टन गाळण क्षमतेचा होता. पुढच्या काळात त्यांनी एक सहकारी बँक व ग्राहक सोसायटीही स्थापन केली, परंतु त्या दोन्ही संस्था नंतर बुडाल्या. रत्नाप्पा कुंभार यांनी स्थापन केलेली सहकारी सूतगिरणी यड्राव येथे सुरू आहे.
१९७२ साली तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य कापूस एकाधिकार महासंघाची संकल्पना मांडली. रत्नाप्पा कुंभार या महासंघाचे पहिले अध्यक्ष झाले. त्यांनी शेतकऱ्यांंकडून कापूस विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग फॅक्टऱ्यांचे जाळे उभे केले. विदर्भामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरभराटीचे दिवस आले. पण पुढे काही चुकीच्या धोरणांमुळे ही योजना बुडीत निघाली. १९७५ साली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या उभारणीत ते अग्रणी होते.
🏢 *शिक्षण संस्था*
शिक्षण ही एक अखंड जीवनप्रक्रिया आहे.
जीवनातील नव्या अनुभवांचा अर्थ समजावून घेणे व समजावून देणे म्हणजे शिक्षण.
- रत्नाप्पा कुंभार
१९५१ साली कोल्हापूर संस्थान भारतात विलीन झाल्यावर या संस्थानाच्या वतीने चालवले जाणारे शहाजी कायदा महाविद्यालय अनाथ झाले व आर्थिक मदत थांबल्यामुळे अधोगतीस आले होते. रत्नाप्पा कुंभारांनी कॉन्सिल ऑफ एज्युकेशन नामक शिक्षण संस्था १७ फेब्रुवारी १९५१ रोजी स्थापन करून या संस्थेमार्फत शहाजी कायदा महाविद्यालय दत्तक घेतले. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. १९५७ साली त्यांनी कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज स्थापन केले. १९८५ साली त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कॉमर्स कॉलेजचे नाव देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स असे करण्यात आले. हा कार्यक्रम तेव्हाचे उपराष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते पार पडला. १९६० साली त्यांनी कसबा सांगाव येथे दादासाहेब मगदूम हायस्कूलची स्थापना केली. १९६३ साली त्यांनी कोरोची गावात रत्नदीप हायस्कूल उभारले. दिवसा काम करणाऱ्या मुलांसाठी त्यांनी कोल्हापुरात रात्र महाविद्यालयाची कल्पना मांडून नाइट कॉलेज ऑफ आर्ट्स ॲन्ड कॉमर्सची स्थापना १९७१ साली केली.
१९९० साली रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची स्थापना झाली.
📽 *चित्रपट निर्माता*
१९६७ साली निर्माता म्हणुन बाळासाहेब पाटील (सत्त्यवादीकार) यांच्या सह रत्नाप्पा कुंभारांनी सुदर्शन नामक चित्रपट केला. दत्ता माने हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
⌛ *निधन*
रत्नाप्पा कुंभार यांचे २३ डिसेंबर १९९८ च्या सकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी हृदयाघाताने निधन झाले. त्या काळाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. रत्नाप्पा कुंभार यांच्या निधनानंतर त्यांनी उभारलेल्या सहकारी साखर कारखान्यास त्यांचे नाव देण्यात आले. आता हा साखर कारखाना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित या नावाने ओळखला जातो. कोल्हापूरच्या वाणिज्य महाविद्यालयाचेही देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार वाणिज्य महाविद्यालय असे नामांतर झाले.
शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधननंतर त्यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांनी त्यांच्या राजकीय वारस म्हणून २००४ साली निवडणुक लढविली. पण त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्यात.
📚 *पुस्तके*
हे कुंभ अमृताचे ( रत्नाप्पा कुंभार यांनी १९६४ ते १९७४ या कालखंडात केलेल्या निवडक ३४ भाषणांचा संग्रह), संपादक: रा. तु. भगत, पाने: २१५, चक्रप्रवर्तन प्रकाशन, (१९७५)
कोल्हापूर संस्थान प्रजा परिषदेतील रत्नाप्पा कुंभार यांचा सहभाग - १९३८ ते १ मार्च १९४९, लेखक: रामलिंग कुंभार, अभिनंदन प्रकाशन.
"कथा एका महा मानवाची"- लोकनेते डॉ. रत्नाप्पा कुंभार यांचे जीवन चरित्र, मूळ कन्नड लेखक- के.बी. होन्नायक, मराठी अनुवाद - सी. एस. कुलकर्णी.
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *पदमश्री रत्नाप्पा कुंभार यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन*🙏
शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९
डाॅक्टर भिमराव आंबेडकर
🎓📓 भारतरत्न, विश्वरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
जन्म : 14 एप्रील 1891 (महू, इंदौर मध्यप्रदेश)
महापरिनिर्वाण : 6 डिसेंबर 1956 ( दिल्ली )
वडिल : रामजी मालोजी सकपाळ
आई : भीमाबाई मुबारदकर
पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर (1906 - 1935)
दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948 - 1956)
शिक्षण : एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय
1915 एम.ए. (अर्थशास्त्र)
1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD
1921 मधे मास्टर ऑफ सायन्स
1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स
संघ : समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी,अनुसुचित जाति संघ
राजनितीक विचारधारा: समानता
प्रकाशन: अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन आॅफ कास्ट)
विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.
“देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला
माणसाला स्वाभिमान शिकवला
ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले
असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.”
डॉ. भीमराव आंबेडकर यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले.
भारतीय समाजात जातिपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली. जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्याला पाहाता आंबेडकरांनी दलितांच्या हक्काची लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थितीत ब.याच प्रमाणात बदल केला.
💁♂ प्रारंभिक जीवन
डाॅक्टर भिमराव आंबेडकर यांचा जन्म भारतातील मध्यप्रांतात झाला होता. बाबासाहेब 14 एप्रील 1891 ला मध्यप्रदेशातील इंदौर जवळ महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले. जेव्हां आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचे वडिल इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणुक इंदौर येथे होती.
3 वर्षानंतर 1894 ला त्यांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रातील साता-यात स्थानांतरीत झाले. भिमराव आंबेडकर आपल्या आई वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. ते आपल्या कुटुंबांतील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळयांचे लाडके होते.
डॉ. भिमराव आंबेडकर महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबधीत होते आणि त्यांचे मुळगांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे हे आहे, महार जातीतील असल्याने त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे.
इतकेच नाही तर दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला तरीही त्यांनी सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले.
📖 शिक्षण
बाबासाहेबांचे वडिल आर्मीत असल्याने त्यांना आपल्या मुलांकरता शिक्षणात मिळणा.या विशेषाधिकाराचा फायदा झाला परंतु दलित असल्याने शाळेत देखील जातीगत भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले त्यांच्या जातीच्या विदयाथ्र्यांना वर्गात बसण्याची, शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. शाळेचा चपराशी त्यांना वरतुन हातावर पाणी टाकुन पिण्यास देत असे, जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास देखील मिळत नसे. या सर्व अन्यायांना सहन करत देखील बाबासाहेब उच्चविद्याविभुषीत झाले.
बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले त्यानंतर मुंबईत एलफ्निस्टन हायस्कुल ला प्रवेश घेतला अश्या पध्दतीने शिक्षण घेणारे ते पहिले दलित ठरले. 1907 ला त्यांनी मॅट्रिक ची डिग्री मिळवली.
या वेळी एक दिक्षांत समारोह देखील आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात भीमराव आंबेडकरांच्या प्रतिभेने प्रभावित होउन श्री कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या शिक्षकांनी त्यांना स्वतः लिहीलेले ’बुध्द चरित्र’ हे पुस्तक भेट स्वरूपात दिले. पुढे बडौदा नरेश सयाजी राव गायकवाड यांची फेलोशिप मिळाल्याने बाबासाहेबांनी आपले पुढचे शिक्षण सुरू ठेवले.
बाबासाहेबांना लहानपणापासुनच अभ्यासाची रूची होती आणि ते एक हुशार आणि कुशाग्र बुध्दीचे विद्यार्थी होते म्हणुन ते आपल्या प्रत्येक परिक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होत गेले. 1908 ला डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी एलफ्न्सिटन काॅलेज ला प्रवेश घेउन पुन्हा ईतिहास घडवला. उच्च शिक्षणाकरता काॅलेज ला प्रवेश घेणारे ते पहिले दलित होते.
त्यांनी 1912 ला मुंबई विश्वविद्यालयातुन पदवी परिक्षा उत्तिर्ण केली. संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने ते फारसी भाषेतुन उत्तीर्ण झाले. या महाविद्यालयातुन त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनिती विज्ञान या विषयातुन पदवी प्राप्त केली.
*फेलोशिप घेउन अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयात प्रवेश घेतला*
भिमराव आंबेडकरांना बडौदा राज्य सरकारने आपल्या राज्यात रक्षामंत्री बनविले पण येथे देखील जातीभेदाने त्यांची पाठ सोडली नाही आणि त्यांना ब.याचदा अपमानाला सामोरे जावे लागले. त्यांनी बराच काळ या ठिकाणी काम केले नाही कारण त्यांना त्यांच्या अंगभुत प्रतिभेकरता बडौदा राज्य शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले होते, त्यामुळे त्यांना न्युयाॅर्क येथे कोलंबिया विश्वविद्यालयात उच्चपदवी प्राप्त करण्याची संधी मिळाली. आपल्या शिक्षणाला पुढे सुरू ठेवण्यासाठी 1913 ला ते अमेरिकेत निघुन गेले.
1915 साली आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातुन समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानव विज्ञान या सोबत अर्थशास्त्रातुन एम.ए ची मास्टर डिग्री प्राप्त केली. या नंतर त्यांनी ’प्राचीन भारताचे वाणिज्य’ यावर संशोधन केले. 1916 साली अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातुन आंबेडकर यांनी पीएच.डी प्राप्त केली. त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता ’ब्रिटिश भारतात प्रांतिय वित्त याचे विकेन्द्रीकरण’.
*लंडन स्कुल आॅफ इकोनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटिकल सायन्स – University of London*
फेलोशिप संपल्यानंतर त्यांना भारतात परतावे लागले. ब्रिटन मार्गे ते भारतात परत येत असता स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स यात एम.एस.सी आणि डी.एस.सी व विधि संस्थानात बार.एट.लाॅ करीता त्यांनी आपले रजिस्ट्रेशन केले आणि मग भारतात परतले.
भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रथम शिष्यवृत्ती च्या नियमानुसार बडौदा येथील राजांच्या दरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची जवाबदारी स्विकारली. राज्याचे रक्षा सचिव या रूपात देखील त्यांनी काम केले.
हे काम करणे त्यांच्याकरता मुळीच सोपे नव्हते कारण जातिपातीच्या भेदभावामुळे त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता इतकेच नव्हें तर संपुर्ण शहरात त्यांना भाडयाने घर देण्यास देखील कुणी तयार नव्हते.
या नंतर भिमराव आंबेडकरांनी सैन्य मंत्री ही नौकरी सोडली आणि एक खाजगी शिक्षक आणि अकाउंटंट म्हणुन त्यांनी नोकरी पत्करली. येथे ते सल्लागार व्यवसाय देखील करू लागले परंतु इथे देखील अस्पृश्यतेच्या मनोवृत्तीने त्यांचा पिच्छा पुरवला आणि सामाजिक स्थितीमुळे त्यांचा हा व्यवसाय देखील ठप्प पडला.
अखेरीस ते मुंबईला परतले येथे त्यांची मदत मुंबई गव्र्हनमेंट ने केली आणि ते मुंबईतील सिडेनहम काॅलेज आॅफ काॅमर्स अॅण्ड इकाॅनाॅमिक ला राजनैतिक अर्थशास्त्राचे प्रोफेसर बनले. या दरम्यान त्यांनी आपल्या पुढच्या शिक्षणाकरता पैसे जमविले आणि शिक्षण सुरू ठेवण्याकरता 1920 ला पुन्हा एकदा ते भारता बाहेर इंग्लंड ला गेले.
1921 ला त्यांनी लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स मधुन मास्टर डिग्री प्राप्त केली आणि दोन वर्षानंतर डी.एस.सी पदवी देखील मिळवली.
डॉ.भिमराव आंबेडकरांनी बाॅन, जर्मनी विश्वविद्यालयात देखील अध्ययनाकरता काही काळ घालवला. 1927 ला त्यांनी अर्थशास्त्रातुन डी.एस.सी केले. न्यायशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ब्रिटिश बार मध्ये बॅरिस्टर म्हणुन काम केले. 8 जुन 1927 ला त्यांना कोलंबिया विश्वविद्यालयाव्दारे डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.
🔮 *अस्पृश्यता आणि जातीगत भेदभाव संपवण्याची लढाई (दलित मुवमेंट)*
भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी जातीपातीच्या भेदभावा विरोधात लढण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांना कित्येकदा अपमानाचा, अनादराचा, सामना करावा लागला होता आपल्या जीवनात अतोनात कष्टाला सामोरे जावे लागले होते. आंबेडकरांनी बघीतले की कश्या त-हेने अस्पृश्यता आणि जातीगत भेदभाव सर्वत्र पसरलाय, या मानसिकतेने अधिक उग्र रूप धारण केले होते. आंबेडकरांनी या सर्व गोष्टींना देशाच्या बाहेर घालवण्याला आपले कर्तव्य समजले आणि या विरोधात त्यांनी मोर्चा उघडला.
1919 साली भारत सरकार अधिनियमाच्या तयारी करता दक्षिणबोरो समितीपुढे आंबेडकर म्हणाले की अस्पृश्य आणि अन्य समुदायांकरता वेगळी निवडणुक प्रणाली असायला हवी त्यांनी दलितांकरता व खालच्या जातींकरता आरक्षणाचा हक्क देण्याचा प्रस्ताव देखील ठेवला.
जातीपातीचा भेदभाव संपवण्याकरता, लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याकरता, समाजात पसरलेली किड, मनोवृत्ती समजण्याकरता आंबेडकरांनी शोध सुरू केला. जातीगत भेदभावाला संपविण्याकरीता, अस्पृश्यतेला मिटविण्याकरता डॉ. आंबेडकरांनी ‘बहिष्कृतांच्या हिताकरता सभा’ हा पर्याय शोधला. या संघटनेचा मुख्य उद्देश मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा आणि सामाजिक, आर्थिक सुधारणा करण्याचा होता.
यानंतर 1920 ला त्यांनी कलकापुर चे महाराजा शाहजी व्दितीय यांच्या मदतीने ‘मुकनायक’ या सामाजिक पत्राची स्थापना केली. आंबेडकरांच्या या भुमिकेने सामाजिक आणि राजनितीक क्षेत्रात खळबळ उडवुन दिली. यानंतर लोकांमधे भीमराव आंबेडकरांची ओळख निर्माण होउ लागली.
डाॅक्टर भीमराव आंबेडकर यांनी न्यायालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर वकिलीचे काम सुरू केले. जातीपातीच्या प्रकरणांमधे भेदभाव करण्याचा आरोप ब्राम्हणांवर लावला आणि कित्येक गैरब्राम्हण नेत्यांकरता न्यायालयीन लढा दिला आणि यश मिळविले. या विजयानंतर त्यांना दलितांच्या उत्थानाकरता लढण्यासाठी आधार गवसला.
1927 दरम्यान डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यता मिटवण्याकरता आणि जातिगत भेदभावाला पुर्णतः संपविण्याकरता सक्रीय स्वरूपात काम केले. या करीता हिंसेचा मार्ग न स्विकारता ते महात्मा गांधींच्या पदचिन्हांवर चालले आणि दलितांच्या अधिकाराकरता पुर्णगतिने आंदोलनाला सुरूवात केली.
या दरम्यान दलितांच्या अधिकारांकरता ते लढले. या आंदोलना दरम्यान त्यांनी ही मागणी केली की सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत सर्वांकरता खुले केले जावे आणि सर्व जातींकरता मंदिरातला प्रवेश खुला करण्यात यावा.
इतकेच नव्हें तर महाराष्ट्रातील नाशिक शहरात असलेल्या काळाराम मंदिरात प्रवेश करतांना हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या विरोधाचा त्यांनी कडाडुन समाचार घेतला आणि प्रतिकात्मक प्रदर्शन देखील केले.
1932 साली दलितांच्या अधिकारांकरता धर्मयुध्दातील योध्दयाप्रमाणे डॉ. आंबेडकरांची लोकप्रीयता वाढत गेली. लंडन मधल्या गोलमेज सम्मेलनात सहभागी होण्याचे त्यांना आमंत्रण मिळाले. या सम्मेलनात आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या विचारधारेचा देखील विरोध केला ज्यात त्यांनी वेगळया मतदारांविरोधात आवाज उठविला होता ज्यात दलितांच्या निवडणुकीत सहभागी होण्याची मागणी केली होती.
पण नंतर गांधीजींच्या विचारांची त्यांना उकल झाली त्याला पुना संधि (poona pact) देखील म्हंटल्या जाते. यांच्या मते एका विशेष मतदारा ऐवेजी क्षेत्रीय विधानसभा आणि राज्यातील केंद्रिय परिषदेत दलित वर्गाला आरक्षण देण्यात आले होते.
पुना संधी वर डाॅक्टर भिमराव आंबेडकर आणि ब्राम्हण समाजाचे प्रतिनीधी पंडित मदन मोहन मालवीय यांच्यात सामान्य मतदारांमधे तात्पुरत्या विधानसभांच्या दलित वर्गांकरता जागा आरक्षणासाठी पुना संधी वर स्वाक्षरी देखील करण्यात आली होती.
1935 साली आंबेडकरांना सरकारी लाॅ काॅलेज चे प्रधानाचार्य म्हणुन नियुक्त करण्यात आले. या पदावर त्यांनी 2 वर्ष काम केलं. यामुळे डॉ. आंबेडकर मुंबईत स्थायिक झाले त्यांनी या ठिकाणी मोठे घर बांधले, या घरात त्यांच्या खाजगी पुस्तकालयात 50 हजारांपेक्षा जास्त पुस्तके होती .
🗳 *डाॅक्टर भीमराव आंबेडकर यांचे राजनैतिक करियर*
डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी 1936 ला स्वतंत्र लेबर पार्टी बनवली पुढे 1937 ला केन्द्रिय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पार्टी ने 15 सीटस् जिंकल्या त्याच वर्षी डॉ. आंबेडकरांनी आपले पुस्तक ’द एनीहिलेशन आॅफ कास्ट’ प्रकाशित केले, ज्यात त्यांनी हिंदू रूढिवादी नेत्यांची आणि देशात प्रचलीत जाती व्यवस्थेची कठोर निंदा केली.
त्यानंतर त्यांनी आणखीन एक पुस्तक प्रकाशित केले ‘Who were the Shudras?’ (शुद्र कोण होते?) ज्यात त्यांनी दलित वर्गाच्या एकसंघ असल्याची व्याख्या केली.
15 आॅगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्याबरोबर डॉ. आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र लेबर पार्टी ला अखिल भारतीय अनुसूचीत जाती संघ (आॅल इंडिया शेड्यूल) कास्ट पार्टीत परिवर्तीत केले. डॉ. आंबेडकरांची पार्टी 1946 ला झालेल्या भारताच्या संविधान सभेच्या निवडणुकीत चांगले प्रदर्शन करू शकली नाही.
पुढे काॅंग्रेस आणि महात्मा गांधींनी दलित वर्गाला हरिजन असे नाव दिले ज्यामुळे मागासलेल्या जाती हरिजन या नावाने देखील ओळखल्या जाऊ लागल्या. परंतु आपल्या निश्चयाविषयी दृढ असलेल्या आणि भारतीय समाजातुन अस्पृश्यतेला नेहमीकरता संपव-णाया डॉ. आंबेडकरांना गांधीजींनी दिलेले हरिजन हे नाव अजिबात आवडले नाही आणि या विषयाचा त्यांनी जोरदार विरोध केला.
त्यांचे म्हणणे होते की ’’अस्पृश्य समाजातील लोक देखील आपल्या समाजाचा एक भाग आहेत, आणि ते सुध्दा समाजातील अन्य सदस्यांसारखेच सामान्य माणसं आहेत.
पुढे डाॅक्टर भिमराव आंबेडकरांना व्हाॅइसराय एक्झीकेटीव्ह कौंसिल मधे श्रम मंत्री व रक्षा सल्लागार म्हणुन नियुक्त करण्यात आले. त्याग, संघर्ष, आणि समर्पणाच्या बळावर डॉ. आंबेडकर भारताचे पहिले कायदे मंत्री झाले. दलित असुन देखील डॉ. आंबेडकरांचे मंत्री होणे त्यांच्या जीवनातील मोठया यशापेक्षा कमी नव्हते.
📓 *भीमराव आंबेडकरांनी तयार केले भारतीय संविधान*
डाॅक्टर भिमराव आंबेडकरांचा संविधान निर्मीती मागचा मुख्य उद्देश देशातील जातिपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मीती करून समाजात क्रांती आणणे हा होता सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार देणे हा होता.
29 आॅगस्ट 1947 ला डॉ. भीमराव आंबेडकरांना संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन नियुक्त करण्यात आले. आंबेडकरांनी समाजातील सर्व वर्गांमधे समांतर पुलाच्या निर्माणावर भर दिला त्यांच्या मते देशातील वेगवेगळया वर्गांमधील अंतर कमी केले नाही तर देशाची एकता टिकवणे कठीण होईल. या व्यतिरीक्त त्यांनी धार्मिक, लिंग आणि जाती समानतेवर देखील विशेष भर दिला.
डॉ.भिमराव आंबेडकर शिक्षण, सरकारी नौक.या, नागरी सेवांमधे अनुसुचीत जाती आणि अनुसूचीत जनजातीतील लोकांकरता आरक्षण सुरू करण्यात विधानसभेचे समर्थन मिळवण्यात यशस्वी राहिले.
• Bharat संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला.
• अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट केले.
• महिलांना अधिकार मिळवुन दिले.
• समाजातील वेगवेगळया वर्गांमधे पसरलेल्या अंतराला संपवल.
डॉ.भिमराव आंबेडकरांनी समता, समानता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधानाला जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवसांच्या अथक परिश्रमाने 26 नोव्हेंबर 1949 ला तयार करून तेव्हांचे राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करीत देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकता, अखंडता आणि व्यक्तीची स्वाभिमानी जीवन पध्दती ने भारतीय संस्कृतीला गौरवान्वित केले.
संविधानाच्या निर्मीतीतील आपल्या भुमिके व्यतिरीक्त त्यांनी भारताच्या वित्त आयोगाच्या स्थापनेत देखील मदत केली, आपल्या नितीमुल्यांच्या माध्यमातुन देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत बदलाव करून प्रगती केली शिवाय त्यांनी स्थिर अर्थव्यवस्थेबरोबरच मुक्त अर्थव्यवस्थेवर देखील जोर दिला.
डॉ.बाबासाहेबांनी निरंतर महिलांच्या स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. 1951 मधे महिला सशक्तीकरणाचे हिंदू संहिता विधेयक पारीत करण्याचा देखील प्रयत्न केला, याच्या मंजुर न होण्याने त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर भीमराव आंबेडकरांनी लोकसभेकरता निवडणुक देखील लढली परंतु यात त्यांना अपयश आले पुढे त्यांना राज्यसभेत नियुक्त करण्यात आले, आपल्या मृत्युपर्यंत ते याचे सदस्य होते.1955 साली त्यांनी आपला ग्रंथ अनेक राज्यांतील भाषांचा विचार करून प्रकाशीत केला. आन्ध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र व प्रबंधन योग्या राज्यांमधे पुर्नगठीत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पुढे 45 वर्षांनंतर काही प्रदेशांमधे ते साकार झाले.
डॉ.आंबेडकरांनी निर्वाचन आयोग, योजना आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरूषांकरता समान नागरी हिंदु संहिता, राज्य पुर्नगठन, मोठया आकाराच्या राज्यांना लहान आकारात संघटीत करणे, राज्याचे निती निर्देश तत्व, मौलिक अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक आणि महालेखापरिक्षक, निर्वाचन आयुक्त आणि राजनैतिक सरंचना मजबुत करणारी सशक्त, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व विदेशी धोरणं देखील तयार केलीत.
इतकेच नव्हें तर डॉ.आंबेडकर आपल्या जिवनात सतत प्रयत्न करत राहिले व त्यांनी आपल्या कठिण संघर्षाने व प्रयत्नांच्या माध्यमातुन लोकशाही मजबुत करणे, राज्यातील तिन अंगांना (स्वंतत्र न्यायपालिका, कार्यकारी, विधानमंडळ) यांना वेगवेगळं केलं सोबतच समान नागरिक अधिकारा अनुरूप एक व्यक्ति एक मत व एक मुल्य या तत्वाला प्रस्थापीत केले.
विलक्षण प्रतिभेचे धनी डॉ.आंबेडकरांनी न्यायपालिकेत, कार्यकारी व कार्यपालिकेत अनुसुचित जाती आणि जनजातीच्या लोकांचा सहभाग संविधानव्दारे सुनिश्चित केला आणि भविष्यात कोणत्याही प्रकारच्या निवडीत जसे ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत, पंचायत राज यात सहभागाचा मार्ग प्रशस्त केला.
सहकारी आणि सामुहीक शेती सोबत उपलब्ध जमिनीचे राष्ट्रीयीकरण करून जमिनीवर राज्याचे स्वामित्व स्थापीत करणे व सार्वजनिक प्राथमिक व्यवसाय, बॅकिंग, विमा या उपक्रमांना राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवण्याकरता जोरदार समर्थन दिले शिवाय शेतक.यांच्या लहान पिकांवर अवलंबुन बेरोजगार मजुरांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हाव्यात याकरता त्यांनी औद्योगिकरणा करता सुध्दा बरेच कार्य केले.
⚜ *डाॅ. भिमराव आंबेडकरांचे वैयक्तिक जीवन*
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला विवाह 1906 साली रमाबाई यांच्यासोबत झाला त्यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव यशवंत असे होते.
1935 साली रमाबाईंचे दिर्घ आजाराने निधन झाले.
1940 साली भारतीय संविधानाचा मसुदा पुर्ण केल्यानंतर डॉ. आंबेडकरांना देखील अनेक आजारांनी ग्रासले होते ज्यामुळे त्यांना रात्री झोप येत नसे, नेहमी पाय दुखायचे, मधुमेहाची समस्या फार वाढल्याने त्यांना इन्सुलिन घ्यावे लागायचे.
उपचारांकरता ते मुंबईला गेले तेव्हां पहिल्यांदा त्यांची भेट एक ब्राम्हण समाजाच्या डाॅक्टर शारदा कबीर यांच्याशी झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व 1948 ला दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर डॉ. शारदा यांनी आपले नाव बदलुन सविता आंबेडकर असे ठेवले.
🔯 *डाॅक्टर भीमराव आंबेडकरांनी स्विकारला बौध्द धर्म*
1950 साली भीमराव आंबेडकर एका बौध्द सम्मेलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले तेथे जाऊन ते बौध्द धर्मातील विचारांनी एवढे प्रभावित झाले की त्यांनी बौध्द धर्म स्विकारण्याचा निर्णय घेतला व त्यांनी स्वतःला बौध्द धर्मात रूपांतरीत केले. यानंतर ते भारतात परतले.
भारतात परतल्यानंतर बौध्द धर्माविषयी त्यांनी बरीच पुस्तकं लिहीली. ते हिंदु धर्मातील चाली रितींच्या विरोधात होते व जाती विभाजनाची कठोर शब्दांमधे त्यांनी निंदा देखील केली आहे.
1955 ला डॉ.आंबेडकरांनी भारतीय बौध्द महासभेची स्थापना केली. त्यांचे पुस्तक ’द बुध्या आणि त्यांचे धर्म’ त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले.
14 आॅक्टोबर 1956 ला डॉ.भिमराव आंबेडकर यांनी एका सभेचे आयोजन केले त्यात त्यांनी आपल्या जवळपास 5 लाख अनुयायांना बौध्द धर्माची दिक्षा दिली. नंतर ते काठमांडू मधे आयोजित चैथ्या वल्र्ड बुध्दिस्ट काॅन्फरन्स मधे सहभागी झाले. 2 डिसेंबर 1956 ला त्यांनी आपल्या शेवटच्या पांडुलिपी ’द बुध्या आणि काल्र्स माक्र्स’ या पुस्तकास पुर्ण केले.
⏳ *डॉ.भिमराव आंबेडकरांचा मृत्यु*
डॉ.आंबेडकर 1954 - 1955 या वर्षांमधे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे फार चिंतीत होते. मधुमेह, अस्पष्ट झालेली दृष्टी , यांसारख्या अनेक आजारांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली. दिर्घ आजारामुळे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील आपल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौध्द धर्म स्विकारल्यामुळे त्या धर्माप्रमाणेच त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतीमदर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता.
🎂 *डॉ.भिमराव आंबेडकर जयंती*
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता केलेले कार्य, समाजात दिलेले योगदान, आणि त्यांच्या सन्मानाकरता त्यांच्या स्मारकाची निर्मीती करण्यात आली त्यांच्या जन्मदिनाला 14 एप्रील ला आंबेडकर जयंती च्या रूपात साजरे केले जाते. त्यांच्या जन्मदिनाला नॅशनल हाॅलिडे घोषीत करण्यात आले, या दिवशी सर्व खाजगी, सरकारी शैक्षणिक संस्थांना सुट्ठी असते. 14 एप्रील ला साज.या होणा.या आंबेडकर जयंतीला भिम जयंती देखील म्हणतात. देशाला दिलेल्या अमुल्य योगदानाकरता आज त्यांचे स्मरण केले जाते.
🏵 *डॉ.भिमराव आंबेडकरांचे योगदान*
भारतरत्न डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षांत देशाला सामाजिक , आर्थिक, राजनितीक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासीक, सांस्कृतिक, साहित्यीक, औद्योगिक, संवैधानिक सह वेगवेगळया क्षेत्रात अनेक कामं करून राष्ट्राच्या निर्माणात अमुल्य योगदान दिले.
📚 *डॉ. भिमराव आंबेडकरांची पुस्तके*
पहिला प्रकाशित लेख: भारतातील जाती: त्यांची प्रणाली, उत्पत्ती आणि विकास (Castes in India : Their Mechanism, Genesis and Development)
ईव्होल्युशन आॅफ प्रोव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
जातीचा विनाश (Annihilation of Caste)
हु वर द शुद्राज (Who were the Shudras?)
द अन्टचेबल्स: ए थीसिस आॅन द ओरिजन आॅफ अनटचेबिलिटी (The Untouchables : Who were They and why they became untouchables)
थाॅटस् आॅन पाकिस्तान (Thoughts on Pakistan)
द बुध्द अॅण्ड हिज धम्म (The Buddha and His Dhamma)
बुध्द या कार्ल माक्र्स (Buddha Or Karl Marx)
🗽 *मरणोत्तर सन्मान*
*डॉ. भीमराव आंबेडकरांचे स्मारक दिल्ली स्थित त्यांच्या घरी 26 अलीपुर रोड ला स्थापीत करण्यात आले आहे.*
आंबेडकर जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
1990 ला त्यांना मरणोत्तर भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे.
अनेक सार्वजनिक संस्थानांची नावे त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने ठेवण्यात आली आहे.
जसे आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे डॉ.आंबेडकर मुक्त विश्वविद्यालय, बी.आर. आंबेडकर बिहार विश्वविद्यालय मुजफ्फरपुर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा नागपुर येथे आहे ज्याचे पुर्वीचे नाव सोनेगांव विमानतळ असे होते.
आंबेडकरांचे एक भव्य आधिकारीक चित्र भारतीय संसद भवन मधे लावण्यात आले आहे.
डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत काही विशेष तथ्य, ज्यांच्याबद्दल कदाचितच आपल्याला माहिती असेल – Facts about Ambedkar
भिमराव आंबेडकर आपल्या आईवडिलांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते.
डॉ. आंबेडकरांचे खरे आडनाव अंबावडेकर होते पण त्यांचे शिक्षक महादेव अंबेडकर ज्यांच्या मनात भिमरावांबद्दल एक विशेष स्थान होते त्यांनी शाळेच्या रेकाॅर्डवर त्यांचे नाव अंबावडेकर चे आंबेडकर असे केले.
बाबासाहेब मुंबई येथील गव्र्हमेंट लाॅ काॅलेजला दोन वर्ष प्रिंसीपल म्हणुन कार्यरत होते.
डॉ. भिमराव आंबेडकर यांचा विवाह 1906 ला 9 वर्षांच्या रमाबाईंसोबत लावण्यात आला आणि 1908 ला ते एलफिन्सटन काॅलेज मधे प्रवेश घेणारे पहिले दलित विद्यार्थी ठरले.
डाॅ. भिमराव आंबेडकर यांना एकुण 9 भाषा येत होत्या वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास देखील केला होता.
आंबेडकरांजवळ एकुण 32 पदव्या होत्या , विदेशात जाऊन अर्थशास्त्रात च्भ्क् करणारे ते पहिले भारतीय बनले. नोबेल पारितोषीक विजेते अमत्र्य सेन अर्थशास्त्रात आंबेडकरांना आपले वडिल मानत.
डॉ.आंबेडकर व्यवसायाने वकिल होते. 2 वर्ष मुंबई येथील लाॅ काॅलेजला त्यांनी प्रिंसीपल पद देखील भुषवलं.
डॉ.भिमराव आंबेडकर भारतीय संविधानातील कलम 370 ( ही कलम जम्मु आणि कश्मिर ला विशेष दर्जा देते ) विरोधात होते.
बाबासाहेब विदेशात जाऊन अर्थशास्त्रात ’डाॅक्टरेट’ पदवी मिळवीणारे पहिले भारतीय होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमात्र भारतीय आहेत ज्यांचे चित्र लंडन च्या संग्रहालयात कार्ल माक्र्स यांच्या सोबत लावण्यात आले आहे.
भारतीय तिरंग्यात अशोकचक्राला स्थान देण्याचे श्रेय देखील डॉ. आंबेडकरांना आहे.
बी. आर. आंबेडकर Labor Member of the Viceroy’s Executive Council चे सदस्य होते आणि त्यांच्यामुळेच कारखान्यांमधे कमीत कमी 12.14 तास काम करण्याचा नियम बदलुन फक्त 8 तास करण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मजदुर महिलांकरता सहाय्यक Maternity Benefit for women Labor , Women labor welfare fund , Women and child , Labor Protection Act सारखे कायदे बनविले.
उत्तम विकासाच्या दृष्टीने 50 च्या दशकातच बाबासाहेबांनी मध्यप्रदेश आणि बिहार विभाजनाचा प्रस्ताव ठेवला होता परंतु 2000 साली याचे विभाजन करून छत्तीसगढ व झारखण्ड बांधले गेले.
बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. त्यांची व्यक्तिगत लायब्ररी जगातील सर्वात मोठी खाजगी लायब्ररी होती ज्यात 50 हजार पुस्तके होती.
डॉ. आंबेडकर शेवटच्या काही वर्षांमधे मोठयाप्रमाणात मधुमेहाने ग्रस्त होते.
भीमराव आंबेडकरांनी हिंदु धर्म सोडतांना 22 वचनं दिली होती ज्यात ते म्हणाले होते की, ज्या राम आणि कृष्णाला देवाचा अवतार मानले जाते मी त्यांची कधीही पुजा करणार नाही.
1956 ला आंबेडकरांनी स्वतःचे धर्मपरिवर्तन करून बौध्द धर्म स्विकारला. ते हिंदु धर्मातील रूढी परंपरां व जातिय विभाजनाच्या विरोधात होते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वेळा लोकसभा निवडणुक लढली आणि दोनही वेळा ते हरले होते.
डाॅक्टर भिमराव आंबेडकर यांना समाजाकरता केलेल्या असंख्य आणि अमुल्य अश्या योगदानाकरता कायम स्मरणात ठेवले जाईल. ते दलितांकरता आणि अस्पृश्यांकरता त्या वेळेस लढले ज्यावेळेस दलितांना अस्पृश्य समजुन अपमानीत केल्या जात होते. स्वतः दलित असल्याने देखील त्यांना ब-याचदा अपमानाला आणि अनादरला सामोरे जावे लागले परंतु त्यांनी कधीही हिम्मत हारली नाही, खचुन गेले नाहीत विपरीत परिस्थीतीत त्यांनी स्वतःला आणखीन मजबुत केले आणि सामाजिक व आर्थिक रूपाने देशाच्या प्रगतीत आपले महत्वपुर्ण योगदान दिले. या योगदानाला कधीही विसरता येणार नाही.
*एक दृष्टीक्षेप बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोडक्यात महत्वपुर्ण माहिती*
1920 ला ’मुकनायक’ हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक आणि राजकिय युध्दाला सुरूवात केली.
1920 ला कोल्हापुर संस्थानातील माणगाव येथे झालेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी सहभाग घेतला.
1924 ला त्यांनी ’बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापना केली. दलित समाजात जागृती पसरवण्याचा या
1927 मधे ’बहिष्कृत भारत’नावाचे पाक्षिक सुरू केले.
1927 ला महाड या गावी चवदार पाण्याकरता सत्याग्रह करून येथील चवदार तलाव अस्पृश्यांना पिण्याकरता खुला करून दिला.
1927 साली जातिव्यवस्थेचा पुरस्कार करणा.या ’मनुस्मृती’ चे त्यांनी दहन केले.
1928 ला गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज मधे त्यांनी प्राध्यापक म्हणुन काम केले.
1930 साली नाशिक येथील ’काळाराम मंदिरात ’अस्पृश्यांना प्रवेश देण्याकरता त्यांनी सत्याग्रह केला.
1930 ते 1932 या काळात इंग्लंड येथे झालेल्या गोलमेज परिषदेला ते अस्पृश्यांचे प्रतिनीधी बनुन उपस्थित राहिले त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांकरता स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. 1932 ला इंग्लंड चे पंतप्रधान रॅम्स मॅक्डोनाल्ड यांनी ’जातीय निर्णय’ जाहिर करून आंबेडकरांची मागणी मान्य केली.
जातिय निर्णयाकरता महात्मा गांधीजींचा विरोध होता. स्वतंत्र मतदार संघाच्या निर्मीतीमुळे अस्पृश्य समाज इतर हिंदु समाजापासुन दुर होईल असे त्यांना वाटायचे. म्हणुन जाती निवड तरतुदी विरोधात गांधीजींनी येरवडा (पुणे) जेल मधे प्राणांतिक उपोषणास सुरूवात केली. पुढे त्या अनुषंगाने महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात 25 डिसेंबर 1932 ला एक करार झाला. हा करार ‘पुणे करार’ या नावाने ओळखला जातो. या करारानुसार डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघाचा हट्ट सोडावा आणि अस्पृश्यांकरता कंपनी कायद्यात आरक्षीत सीट्स असावयास हव्यात असे मान्य झाले.
1935 ला डॉ. आंबेडकरांना मुंबई च्या गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज येथे शिक्षक म्हणुन निवडले गेले.
1936 ला सामाजिक सुधारणांकरता राजकिय आधार असावयास हवा म्हणुन त्यांनी ’इंडिपेंडंट लेबर पार्टी’ स्थापना केली.
1942 ला ’शेड्युल्ट कास्ट फेडरेशन’ या नावाच्या पक्षाची स्थापना केली.
1942 ते 1946 या काळात त्यांनी गव्हर्नर जनरल यांच्या कार्यकारी मंडळात ’श्रम मंत्री’ बनुन कार्य केले.
1946 ला ’पिपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन काम केले. त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेत भारतीय राज्य घटनेचा मसुदा तयार केला. भारतीय राज्य घटना बनविण्यात योगदान दिले म्हणुन’भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार’ या शब्दांनी त्यांचा यथोचित गौरव करण्यात येतो.
स्वातंत्र्या नंतर पहिल्या मंत्री मंडळात त्यांनी कायदे मंत्री म्हणुन कार्य केले.
1956 ला नागपुर येथील ऐतिहासीक कार्यक्रमात आपल्या 5 लाख अनुयायांसोबत त्यांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली.
एकंदरीत त्यांचे जीवन पाहाता निश्चितच ही ओळ त्यांच्यावर संपुर्णतः योग्य ठरते . . . . .
“आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावयास हवे”
☸ *जयभिम* ☸
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
♾♾♾स्त्रोत ~संकलन

शनिवार, ३० नोव्हेंबर, २०१९
शाळासिद्धि कार्यक्रम
✒🌹✒शाळासिद्धि कार्यक्रम विशेष*
*सत्र २०१९ - २०२० साठी शाळासिद्धी अंतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन ऑनलाइन करण्याबाबत*✒🌹✒
*_महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या पत्रान्वये सत्र २०१९ - २०२० साठी राज्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकीकरण करणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे गरजेचे आहे . तसेच शैक्षणिक , भौतिक व संस्थात्मक गुणवत्तावाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शालासिद्धी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्ध शाळा नावाने सुरू केलेला आहे . उपरोक्त शासन निर्देशानुसार प्रत्येक शाळेने दरवर्षी शाळांचे स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे ._*
*सत्र २०१९-२०२० साठी शाळा सिद्धि चे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे . त्यासाठी न्यूपा नवी दिल्लीच्या वेबपोर्टलवर आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे .*
*आपल्या जिल्ह्याचे कार्य देशात सर्वोत्तम असावे यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्वरित लॉगिन होऊन उपरोक्त वेबपोर्टलवर आपले स्वयंमूल्यमापन त्वरित करावे व त्याची माहिती पंचायत समिती मध्ये मा. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्यावी .*
🌹 *_स्वयंमूल्यमापन लवकरच करावे_* 🌹
✒🌹✒
*शाळा सिद्धि स्वयंमूल्यमापन करण्याची कार्यपद्धती*
*माहितीचे प्रत्यक्ष खालील चार टप्पे आहेत*
🌹 *शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती.*
🌹 *शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती.*
🌹 *७ क्षेत्र म्हणजे 46 गाभा माणके*
🌹 *प्रत्येक गाभा मानकानुसार त्या त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन.*
*माहिती भरण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्याव्या*
*जातवार पटसंख्या* - _३० सप्टेंबर २०१९ ची अपेक्षित आहे._
*वार्षिक उपस्थिती* _सत्र २०१८ - २०१९ ची अपेक्षित आहे._
*मुख्य विषय संपादणुक* - _इयत्ता आठवी ते बारावीची मागील ( २०१८ - २०१९ )शैक्षणिक वर्षाची लिहावी_
*सत्र २०१८-२०१९ चा निकाल*- _इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या निकाल *टक्केवारीत* लिहावा._
*शिक्षक संख्या* - ३० सप्टेंबर २०१९ नुसार किंवा प्रत्यक्ष वाढलेली असल्यास ती नोंदवावी.
*शिक्षकांच्या रजा* - _१ जानेवारी २०१९ ते माहिती भरलेल्या दिनांकापर्यंत - या कालावधीत रजा घेतलेल्या शिक्षकांची संख्या लिहित असतांना ते सलग एक आठवडा , एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त रजेवर असतील तोच कालावधी गृहीत धरावा._
*स्तर निश्चिती*- _पुस्तिकेमध्ये दिल्याप्रमाणे आपण कुठल्या स्तरांमध्ये आहोत याची खात्री करूनच सुयोग्य स्तर निश्चित करावा_
*सुधारणेचे नियोजन* - _गाभा मानकाचा अध्ययन स्तर तीन पेक्षा कमी असेल तर त्यासाठी आपण काय सुधारणा करणार आहोत याचे नियोजन आपण स्वतःसाठी करणे गरजेचे आहे. ते ॲक्शन प्लॅन मध्ये लिहावे._
🌹 *प्रत्येक शाळेचे आपले घोषवाक्य निश्चित केलेले असावे. ते प्रत्येक वेळी बदलू नये* 🌹
*स्तर एकला १ गुण , स्तर दोनला २ गुण , स्तर तीनला ३ गुण अशाप्रकारे सातही क्षेत्राचे संकलन करून गुण ठरवावे*
_महत्वाचे :- पहिल्या क्षेत्रामध्ये मध्ये दोन भाग असुन पहील्या भागात उपलब्धता व पर्याप्तता हा भाग आहे . दुसरा भाग उपयुक्तता व गुणवत्ता यामध्येच प्राप्त असलेल्या स्तरांना गुणदान केले आहे._
_स्वयंमूल्यमापन ऑनलाईन केल्यानंतर आपल्या लाॉगिनमधुन *रिपोर्ट* या टॅब मधे जावून प्रिंट काढावी._
*श्रेणी आपण खालील प्रमाणे काढावी.*
*श्रेणी "अ" :- ११२ ते १३८ गुण*
*श्रेणी "ब" :- ६९ ते १११ गुण*
*श्रेणी "क" :- _६८ किंवा पेक्षा कमी गुण_*
🌹 *स्वयं मूल्यमापनासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा* 🌹

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१९
लक्ष्मी देवी
लक्ष्मी देवी
राजा रवीवर्मा यांच्या बालकृष्णन नायर यांनी मल्याळी भाषेत लिहिलेल्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे. राजा रविवर्मा एकदा आपल्या स्टुडिओमध्ये बसले होते. याच वेळी त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये एक विद्वान व्यक्तीही होती. बोलणं चालू असताना काही कारणानं त्यांनी बाजूला उभ्या असणाऱ्या एका सामान्य असणाऱ्या माणसाला एका चित्राविषयी अभिप्राय विचारला. विद्वान व्यक्तीला याचं मोठं आश्चर्य वाटलं. त्या काळात एखाद्या मोठ्या चित्रकारानं सामान्य व्यक्तीला अभिप्राय विचारावा ही गोष्ट थोडी आश्चर्याचीच होती. विद्वान व्यक्तीनं आश्चर्य व्यक्त करत ह्या विषयी विचारलं. राजा रवीवर्मा म्हणाले, "खरंय.. (आज ह्या सामान्य व्यक्तीला कलेतलं फारसं काही काळात नसेल.) कदाचित आज सामान्य लोकांपर्यंत कला पोहोचली नसेल. पण कुणी सांगावे, आज राजेमहाराजांसाठी रंगवलेली चित्रं उद्याच्या काळात कला संग्रहालयात जातील आणि पुढच्या पिढीतली सर्वसामान्य माणसं ती पाहू शकतील. मी असं ऐकलंय की पाश्चात्य देशांमध्ये सर्वांसाठी खुली असणारी कलेची सार्वजनिक दालनं असतात." आपली चित्रं, कला सामान्य लोकांपर्यंत पोहोचावीत अशी राजा रवी वर्मा यांची प्रामाणिक तळमळ होती. या प्रसंगानंतर काही वर्षांनी ओलिओग्राफ्सचं तंत्रज्ञान आल्यानंतर राजा रवी वर्मा यांच्या चित्रांच्या प्रती सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवातही झाली.
आज, सव्वाशे वर्षांनंतर राजा रवी वर्मा यांची चित्रं साऱ्या भारताला ओळखीची झालेली आहेत. दिवाळीमध्ये जवळपास सारे भारतीय लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवी लक्ष्मीच्या ज्या प्रतिमेचं पूजन करतात ती प्रतिमा म्हणजे राजा रवी वर्मा यांनी १८९६ च्या दरम्यान काढलेलं लक्ष्मी देवीचं काढलेलं चित्र !! अक्षरश: करोडो भारतीयांना हे चित्र परिचित आहे. खरंतर, यामुळं, एका प्रकारे राजा रवी वर्मा यांना जगातला सर्वात लोकप्रिय कलाकार असं म्हणता येईल !!
लक्ष्मी देवीचा जन्म समुद्रमंथनात झाला होता असं मानण्यात येतं. पारंपारिक पद्धतीनं लक्ष्मी देवीची प्रतिमा बनवताना ज्या गोष्टी दाखवण्यात येतात त्या साऱ्या गोष्टी राजा रवी वर्मा यांनी दाखवल्या आहेत.
सर्वसाधारणपणे लक्ष्मी देवीचा रंग सावळा, पिवळसर सोनेरी, शुभ्र किंवा गुलाबी असा दाखवण्यात येतो. ती विष्णूसोबत असते तेंव्हा तिचा रंग सावळा दाखवण्यात येतो. संपत्तीचा स्रोत म्हणून तिला दाखवायचं असेल तर तिचा रंग पिवळसर सोनेरी दाखवला जातो. निसर्गाचं, प्रकृतीचं शुद्ध असं रूप म्हणून दाखवताना तिला शुभ्र रंगात दाखवतात. तर (माता असल्यानं) सर्व जीवांवर दया असणारी अशी दाखवताना तिला गुलाबी रंग दाखवण्यात येतो. या चित्रात आपल्याला लक्ष्मीची गुलाबी रंगाची छटा पाहायला मिळते.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ पूर्ण होण्यासाठीचं वरदान लक्ष्मी देऊ शकते. तिच्यात असणारी ही शक्ती दाखवण्यासाठी लक्ष्मीच्या प्रतिमेत चार हात दाखवले जातात. राजा रवी वर्मा यांनीही या चित्रात चार हात दाखवले आहेत. (जेंव्हा ती विष्णूसोबत असते तेंव्हा तिला २ हात दाखवले जातात तर जेंव्हा तिचं स्वतंत्र मंदिर असतं तेंव्हा तिला चार हात दाखवले जातात.)
लक्ष्मी देवीच्या दोन हातांमध्ये कमळाची फुलं दाखवली जातात. ह्या चित्रातही आपल्याला देवीच्या हातात दोन कमळाची फुलं दिसतात. देवीचा पाण्याशी असणाऱ्या संबंधामुळं कमळाची फुलं दाखवण्यात येतात असं मानलं जातं. कमळाची मुळं पाण्यात असतात. खरंतर देवीच्या गळ्यात कमळांच्या फुलांचा हारही दाखवला जातो. पण ह्या चित्रात तो दाखवलेला नाही. दक्षिण भारतात १६व्या शतकात लिहिल्या गेलेल्या शिल्पशास्त्र या ग्रंथात लिहिल्याप्रमाणं लक्ष्मी देवीच्या गळ्यात मोत्यांचा हार असतो. ह्या चित्रातही आपल्याला लक्ष्मी देवीच्या गळ्यात मोत्यांचा हार दिसतो.
आपण मागं बघितल्याप्रमाणं कमळ फुलांचं (चिखलात उगवूनही येणाऱ्या सुंदर फुलामुळं) आपल्या इकडं खूप महत्व आहे. लक्ष्मी देवी नेहमी कमळाच्या फुलात दाखवली जाते. ह्या चित्रातही आपल्याला लक्ष्मी देवी कमळाच्या फुलात उभी दिसते.
बहुतेकवेळा लक्ष्मीच्या चित्रात हत्ती सोंडेनं पाण्याचे फवारे मारताना दाखवला जातो. कारण हत्तीचा राजसत्तेशी संबंध असतो. आणि सोंडेनं पाणी सोडणं हे एक प्रकारे राजसत्तेनं केलेला अभिषेक दर्शवतो. या चित्रात मात्र राजसत्तेचं प्रतीक असणाऱ्या हत्तीनं देवीसाठी सोंडेत हार धरलेला दिसतोय.
राजा रविवर्मा यांचं हे चित्र दशकानुदशकं दिवाळी आणि लक्ष्मीपूजन यांचा अविभाज्य भाग बनलं आहे हे मात्र निश्चित !!

संकलित ब्लॉग.....
गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०१९
कॅप्टन लक्ष्मी सहगल
लक्ष्मी एस. स्वामीनाथन ऊर्फ लक्ष्मी सहगल
(जन्म - २४ ऑक्टोबर, इ.स. १९१४- निधन - २३ जुलै, इ.स. २०१२) या पेशाने डॉक्टर होत्या. १९४३ साली त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत राणी लक्ष्मीबाई रेजिमेंटच्या कर्नल म्हणून जबाबदारी सांभाळली. लक्ष्मी सहगल या कॅप्टन लक्ष्मी या नावाने ओळखल्या जातात..
मद्रास उच्च न्यायालयामध्ये फौजदारी कायदा करणारे वकील एस. स्वामिनाथन हे त्यांचे वडील होत. लक्ष्मी यांनी १९३८ साली मद्रास मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतली. एक वर्षानंतर त्यांना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि प्रसूतिशास्त्रात पदविका मिळाली. चेन्नई येथे असलेल्या कस्तुरबा गांधी हॉस्पिटलमध्ये त्यांनी डॉक्टर म्हणून काम केले.
कॅप्टन लक्ष्मी या आझाद हिंद सेनेच्याच्या झाशी राणी पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या. १९४३ ऑक्टोबर मध्ये यांना सुभाषचंद्र बसू यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचे प्रमुख पद देण्यात आले. या पथकात त्या वेळी १८५ स्त्री सैनिक होत्या. हा आकडा नंतर २ हजार वर पोचला. पिस्तूल,बंदूक,मशीनगन्स यासारखी शास्त्रे वापरण्याचे शिक्षण या स्त्रियांना दिले जाई. प्रारंभी या स्त्रियांना शुश्रूषा पथकात काम करण्याची संधी दिली जात असे. पण नंतर लक्ष्मी यांच्या विनंतीवरून सुभाष बाबू यांनी महिलांच्या दोन पथकांना आघाडीवर जाण्यास संधी दिली आणि हिंदुस्थान आणि ब्रह्मदेश यांच्या आघाडीवर झालेल्या युद्धात या स्त्रियांनी विजय मिळविला. नंतर आझाद हिंद सेना माघार घेत असता यांच्या फौजेने निकराचा लढा दिला आणि सुभाषबाबू यांना निसटून जाण्याची संधी दिली व मगच त्या ब्रिटिशांना स्वाधीन झाल्या. युद्धाच्या अखेरीला त्या जखमी सैनिकांची सेवा करीत होत्या त्यामुळे त्यांच्यावर खटला न भरता त्यांना सोडून देण्यात आले.
त्यानंतर बांगला देशात वैद्यकीय सुविधा आणि बचाव कार्यातही त्लक्ष्मी सहगल यांचा सहभाग होता. १९४७ च्या मार्चमध्ये लाहोरच्या प्रेम कुमार यांच्याशी त्यांनी लग्न केले. विवाह झाल्यानंतर ते कानपूर येथे स्थायिक झाले.तिथे त्यांनी आपली वैद्यकीय प्रॅॅक्टिस चालू ठेवली आणि भारताच्या फाळणीनंतर मोठ्या संख्येने आलेल्या शरणार्थींना मदत केली.
सुभाषिनी अली आणि अनिसा पुरी या कॅप्टन लक्ष्मी यांच्या दॊन मुली तर नातू शाद अली हे चित्रपट दिग्दर्शक आहेत. प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई (१९२८—२०१६) ह्या त्यांच्या धाकट्या भगिनी होत.
सेहगल यांनी सन १९७१ मध्ये कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला. त्या भारतीय राज्यसभेच्या सदस्याही होत्या.
आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात केप्टन सेहेगल यांनी भरीव कामगिरी केली.
हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने कॅप्टन लक्ष्मी यांना दि. १९ जुलै २०१२ रोजी कानपूर येथील मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवण्यात आले. सोमवार दिनांक २३ जुलै २०१२ ला सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
भारत सरकारने शासनाने सन १९९८ मधे पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले होते.
संकलित पोस्ट.....

बुधवार, २३ ऑक्टोबर, २०१९
कित्तूरची राणी चेन्नम्मा जन्मदिन
राणी चेन्नम्मा
*जन्म : 23 ऑक्टोबर 1778**(बेळगाव , कर्नाटक)*
*वीरमरण : 21 फेब्रुवारी 1829**(बैलहोंगल)*
कित्तूरची राणी चेन्नम्मा दक्षिण भारतातील झाशीची राणी लक्ष्मीबाईच समजली जाते. राणी लक्ष्मीबाई इतकाच तिचा देशाभिमान जाज्ज्वल्य होता. या अत्यंत सुदंरीचा जन्म काकतीय वंशातील देसाई घराण्यात झाला होता. तिच्या वडिलांचे नाव धुलाप्पा देसाई व आईचे नाव पदमावती होते. ती अपरूप सुंदरी असल्यानेच त्या अर्थाचे तिचे नाव चेन्नम्मा असे ठेवण्यात आले. बालपणापासूनच ती अत्यंत स्वाभिमानी बाणेदार होती. शिक्षणातही तिला अत्यंत रस होता. कन्नड, मराठी, उर्दू व संस्कृत या चार भाषांचे ज्ञान तिने किशोर वयात येण्या आधीच प्राप्त करून घेतले होते. त्याचप्रमाणे घोडेस्वारी व शस्त्रविद्येतही ती प्रवीण झाली होती. कित्तूरचा राजा मल्लराज एकदा शिकारीला गेला असताना त्याने चेन्नम्माला वाघाची शिकार करताना पाहिले. तिचा पराक्रम व रूपलावण्य पाहून त्याने धुलाप्पा देसाई यांच्याकडे चेन्नम्माशी विवाह करण्याची मागणी घातली. मल्लसर्जचा विवाह आधी रुद्रव्वा हिच्याशी झालेला होता. धुल्लाप्पा देसाईना हे स्थळ आवडले व त्यांनी चेन्नम्माचा विवाह मल्लसर्ज राजाशी करून दिला. विवाहानंतर चेन्नम्मा ही बुद्धिमान, विद्वान, चतुर व धोरणी असल्याचे राजा मल्लसर्जांच्या लक्षात आले. तो राज्यकारभाराविषयी चेन्नम्माशी विचारविनिमय करू लागला.
पुणे - बंगलोर मार्गावर बेळगावपासून पाच मैल अंतरावर कित्तूरनगर व कित्तूरचा किल्ला आहे. राजा मल्लसर्च्या कारकीर्दीत कित्तूर राज्य वैभवसंपन्न होते. राज्यात ७२ किल्ले व ३५८ गावे होती. कित्तूर नगरी व्यापाराचे मोठे केंद्र होती. सोने, चांदी, जड-जवाहीरांचा व्यापार तेथे चालायचा. दूर-दूरचे व्यापारी कित्तूरला यायचे. राज्यातील जमीनही अत्यंत सुपीक असल्याने शेतीचे उत्पन्नही फार मोठे होते.
राजा मलसर्ज मोठा वीर, पराक्रमी व मानी होता. प्रजेवर त्याचे अत्यंत प्रेम होते, त्याच्या राज्यात प्रजा सुखासमाधाने व आनंदाने जगत होती. तो विद्याप्रेमी व कलासक्त होता. त्याच्या दरबारी नेहमी मोठमोठे पंडित व कलावंत येत असत. त्यांचा मान तो ठेवीत असे व त्यांना भरघोस बिदागीही देत असे.
राजा मल्लसर्जचे आपल्या दोन्ही राण्यांवर प्रेम होते. तो त्यांचा मान ठेवूनच त्यांच्याशी वागायचा . रूद्रव्वा ही धार्मिक वृत्तीची, शांत स्वभावाची व समंजस होती. राणी चेन्नन्मा तिला आपली मोठी बहीणच मानायची. दोन्ही राण्यांनी एक एक पुत्राला जन्म दिला होता. पण चेन्नम्माचा पुत्र बालपणीच वारला. रुद्रव्वाच्या पुत्राचे नाव शिवालिंग रुद्रसर्ज होते. राणी चेन्नमाचे त्याच्यावर पुत्रवत प्रेम होते.
राजा मल्लसर्जचा प्रधान गुरुसिद्दप्पा हा मोठा विचारी, धोरणी व राजव्यवहारकुशल होता. आपल्या राज्याचा हिताचा विचार करूनच तो राजाला सल्ला द्यायचा. त्याची सत्तरी उलटून गेली होती. तरीही तो आपल्या राज्याचा काराभार चोखपणे बजवायचा पण मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय हे दोन्ही मंत्री कारस्थानी होते. मल्लप्पाशेट्टीचा डोळा राज्याच्या प्रधानपदावर होता. गुरुसिद्दप्पा प्रधानपदावरून निवृत्त कधी होतो व त्याचे प्रधानपद आपल्याला केव्हा मिळते, असा विचार त्याच्या मनात सतत घोळत असायचा पण गुरुसिद्दप्पावर कितूरच्या प्रजेची श्रद्धा होती. त्यामुळे हे दोघे मंत्री काहीही करु शकत नव्हते.
दुसरा बाजीराव पेशवा याने १८०२ साली वसईला इंग्रजांशी तह करून मराठा राज्य इंग्रजांकडे गहाण टाकले व तो इंग्रजांच्या अधीन होऊन कारभार करु लागला. तो अतिशय कामुक व लोभी होता. त्याने जनतेवर अत्याचार करून सरदारांना त्रासवून सोडून संपत्ती गोळा करण्याचे सत्रच सुरु केले होते. आता त्याची नजर कितूरच्या संपन्न राज्याकडे वळली, तो आपले सैन्य घेऊन कृष्णा नदीकाठी यडूर येथे आपली छावणी देऊन राहिला होता. त्याने राजा मल्लसर्ज याला आपल्या भेटीसाठी निरोप पाठविला. त्याप्रमाणे राजा मल्लसर्ज गुरूसिद्दप्पाच्या सल्ल्याने त्याच्या भेटीस गेला. बाजीराव त्याच्यासह पुण्यास गेला व त्याने राजा मल्लसर्ज यालाही पुण्यास नेऊन कैदेत ठेवले.
एक आठवडा होऊन गेला तरीही राजा मल्लसर्ज कित्तूरला परत आला नाही. म्हणून राणी चेन्नम्माने गुरसिद्दप्पाला येडूरला पाठविले. गुरुसिद्दप्पा येडूरला पोचला, तेव्हा तेथे पेशव्यांची छावणी नव्हती. त्याला समजले की, बाजीराव मल्लसर्जला घेऊन पुण्यास निघून गेला आहे. गुरुसिद्दप्पा पुण्याला गेला. त्याने बाजीरावाशी बोलणी केली. पेशव्यांना दरवर्षी १ लाख ७५ हजार रूपये खंडणी देण्याच्या अटीवर बाजीरावने राजा मल्लसर्ज याला कैदेतून सोडून गुरुसिद्दप्पा याच्या हवाली केले. त्यावेळी राजा मल्लसर्ज याची प्रकृती अतिशय खंगलेली होती. तो कैदेत असताना बाजीरावाने त्याचे खूप हाल केले होते व त्याला अन्नातून विषही चारले होते. त्यामुळे राजा मल्लसर्ज अतिशय दुर्बल झाला होता. वास्तविक पाहता मल्लसंर्जाने पेशव्यांविरूद्ध काहीही केलेले नव्हते. पण धनलोभापायी बाजीरावाने हे नीचकर्म केले होते.
कितूरला आल्यावर मल्लसर्जची तब्येत अधिकच खालावली. त्याचे वय त्यावेळी अवघे ३४ वर्षांचे होते. आता त्याला जगण्याची आशा वाटत नव्हती, त्याने गुरुसिद्दप्पाला बोलावून तसे सांगितले व राज्याचा भार त्याच्यावर व राणी चेन्नम्मावर सोपवून त्याने डोळे मिटले. राज्यातील प्रजा दुःखाने 'हाय हाय' करू लागली. दोन्ही राण्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला. गुरुसिद्दप्पाने दोन्ही राण्यांचे सांत्वन केले. राणी चेन्नम्मा हिने रुद्रव्वाचा पुत्र शिवलिंग रूद्रसर्ज याला युवराजपदी बसवून राज्याचा कारभार आपल्या हाती घेतला. गुरुसिद्दप्पाने कठीण प्रसंग ओळखून राणी चेन्नम्माला चांगली साथ दिली. परंतु ११ सप्टेंबर १८२४ साली शिवलिंग रुद्रसर्ज याचे दुर्दैवाने निधन झाले. राजवाड्यावर शोककळा पसरली.
राणी चेन्नमाने राजाच्या संबंधातील मास्त मरडीगोंडा याच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे नाव
'गुरूलिंग मल्लसर्ज ' असे ठेवले. मल्लप्पाशेट्टी याच्या दृष्ट बुध्दीला हे मानवले नाही. त्याने धारवाड येथे जाऊन तेथला इंग्रज कलेक्टर थॕकरे यांची भेट घेतली व राणी चेन्नम्माने दत्तक घेणे बेकायदेशीर आहे, असे त्याला सांगितले. कारण आता त्याचा हेतू कित्तूरचे राज्य बळकावण्याचा होता. वास्तविक पाहता दत्तक समारंभाच्या वेळी कित्तूर येथील इंग्रज प्रतिनिधींनाही राणी चेन्नम्मा व गुरुसिद्दप्पा यांनी उपस्थित ठेवले नव्हते. तेव्हा त्यांनी दत्तक घेण्याबद्दल कसलाही आक्षेप घेतला नव्हता.
आता थॕकरेच्या मनात कित्तूरचे राज्य बळकावण्याचा विचार घर करून बसला. त्याला माहीत होते की, कित्तुरला अलोट संपत्ती आहे. मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे कित्तूरचे मंत्री त्याला साथ देऊ लागले. या दोघांनी थॕकरे याला सर्व सहाय्य करण्याचे वचन दिले आणि त्यांनी थॕकरे याला असेही सांगितले की, " जोपर्यंत राणी चेन्नम्मा जिवंत आहे, तो पर्यंत कित्तूरवर कब्जा करणे शक्य नाही." म्हणजे हे दोघे देशद्रोही राणी चेन्नम्माच्या जिवावरच उठले होते, हे यावरून स्पष्टपणे दिसून येते.
थॕकरे याने एका पत्रान्वये राणीला कळविले की, '"तुम्ही आमच्या परवानगीशिवाय दत्तक का घेतला ? आम्ही तुमच्या या दत्तकाला परवानगी देणार नाही. असे तुमचा मंत्री मल्लप्पाशेट्टी याने तुम्हाला सांगितले असतांनाही तुम्ही दत्तक घेतला. तो आम्हास मंजूर नाही. तुम्ही राज्याचा कारभार मल्लप्पाशेट्टीकडे सोपवावा."
राणीने थॕकरेच्या या पत्राला कवडीइतकीही किंमत दिली नाही, आता युद्ध अटळ आहे, हे तिला व गुरुसिद्दप्पाला कळून चुकले. त्यांनी युद्धाची तयारी सुरु केली. आपल्या राज्यातील जनतेला युद्धासाठी सज्ज राहण्याचे व सैन्यात तरुण वीरांनी सामील होण्याचे आवाहन केले. शेकडो तरूण वीर युद्धासाठी तयार झाले. राणीच्या पाठीशी प्रधान गुरूसिद्दप्पा तसेच रायण्णा, बालण्णा, गजवीर आणि चेन्नबसप्पा असे अनेक वीर उभे राहिले. राणीने गुरूसिद्दप्पाशी विचार-विनिमय करून थॕकरेला एक पत्र देऊन कळविले की, "कित्तूर एक स्वतंत्र राज्य आहे व ते स्वतंत्रच राहील. याची जाणीव ठेवावी. जर तुम्हाला युद्ध करायचे असेल, तर आम्हीही युध्दासाठी तयार आहोत. अशी तुमच्यासारख्यांचे गुलाम होण्यापेक्षा मरण पत्करु, पण शरण जाणार नाही."
राणीचे हे बाणेदार उत्तर वाचताच थॕकरेच्या तळपायाची आग मस्तकात शिरली आणि त्याने युद्धाची तयारी सुरू केली. आपले सैन्य घेऊन तो कित्तूरच्या किल्ल्याबाहेर येऊन ठाकला. २१ ऑक्टोबर १८२४ रोजी त्याने राणीला निरोप पाठविला की, "तुम्ही तुमच्या प्रधानांसह आम्हास येऊन भेटावे,
"राणीने भेटण्यास नकार दिला व किल्ल्याचे सर्व दरवाजे बंद करून प्रत्येक दरवाजावर कडा पहारे बसविले. प्रत्येक बुरुजांवर तोफांची मोर्चेबांधणी केली. राणीची सगळी युद्धाची तयारी व किल्ल्याची सर्व माहिती मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांनी थॕकरेला सांगितली. मल्लप्पा शेट्टीने राणीच्या पाकशाळेच्या प्रमुख बाईला पैशांची लालूच दाखवून आपल्याकडे वळवून घेतले आणि राणीला खिरीतून विष देण्यास सांगितले. राणीला हे आपल्या गुप्तहेरांकरवी आदल्या दिवशीच कळले होते. दुस-या दिवशी राणी जेवायला बसली, तेव्हा तिने त्या बाईचे पानही आपल्यासमोर वाढायला सांगितले व माझ्याबरोबर तू ही जेव, अशी आज्ञा तिला केली. ती बाई लटलटा कापू लागली. तिचा चेहरा पांढराफटक पडला व ती जेवायला नकार देऊ लागली. तेव्हा राणीने आपल्या स्त्री सैनिकांकरवी ती खीर तिला खायला लावली. थोडयाच वेळात तिचे शरीर काळे निळे पडले, तेव्हा तिने स्पष्टपणे सांगितले की, ‘मल्लप्पाशेट्टीने मला हे कृत्य करायला लावले.'
युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजूंनी तोफांचा मारा सुरु झाला. बंदुकीच्या गोळीबारांनी आकाश दुमदुमून गेले. कित्तूरचा प्रत्येक सैनिक प्राणपणाने लढत होता. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. इंग्रजाकडचे अनेक युद्धकैदी पकडले गेले. त्यात मल्लप्पा शेट्टी व वेंकटराय हे सुद्धा होते, त्यांना तुरूंगात डांबण्यात येऊन तुरूंगावर विश्वासू सैनिकांचा कडक पहारा बसविला. दुस-या दिवशी पुन्हा युद्ध अधिक जोमाने सुरू झाले. थॕकरेला आपल्या पराभवाची कल्पना येऊ लागली. राणी स्वतः लढत होती. ती जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत आपला विजय होणं अशक्य आहे, हे त्याने हेरले व अचुक नेम धरून राणीवर बंदुकीने गोळी झाडली. तिच्या अंगरक्षकाने ती गोळी आपल्या छातीवर घेतली व तो धाडकन खाली पडला. हे पाहताच राणीने एकाच गोळीत थॕकरेला त्याच्या घोड्यावरून उडवून लावले. थॕकरे ठार झाल्यावर इंग्रजांच्या सैन्याची दाणादाण उडाली. अनेक इंग्रज सैनिक कित्तूरच्या वीरांनी कापून काढले. अनेक वाट फुटेल तिकडे पळून गेले .
देशद्रोही मल्लप्पाशेट्टी व वेंकटराय यांना बेड्या घालून राणीने दरबारात आणविले. मंत्री मंडळाच्या सल्ल्यावरुन त्यांना हत्तींच्या पायी तुडविण्यात आले. त्यांच्याबरोबरच स्टिव्हनसन व इलियट हे दोन इंग्रज अधिकारी पकडले होते." युद्ध पूर्णपणे बंद कराल, तर या दोन्ही अधिका-यांना सोडून देण्यात येईल, असा निरोप राणीने इंग्रजकडे पाठविला. या दोघांना सोडून दिले, तर युद्ध करणार नाही, असे प्रत्युत्तर छावणीतील इंग्रज अधिका-यांनी राणीकडे पाठविले. त्यावर विश्वास ठेवून राणीने त्या दोन्ही इंग्रज कैद्यांना सोडून दिले. इंग्रज हे विश्वासघातकी व शब्दाला न जागणारी जमात आहे, हे राणीला माहित नव्हते.
कित्तूरच्या पराभवाचे वृत्त समजताच दक्षिण हिंदुस्थानचा कमिशनर चॕपलिन, कॕ.जेम्सन व कॕ. स्पिलर घोडेस्वारांची मोठी सेना घेऊन ३० नोव्हेंबर १८२४ रोजी कित्तूरच्या किल्ल्यावर चालून आले. त्यांनी किल्ल्याला वेढा दिला. त्याच रात्री कित्तूरचा किल्लेदार शिवबसप्पा कमिशनरला भेटला व त्याने या युद्धात मदत करण्याचे आश्वासन चॕपलिनला दिले. तेव्हा "याच्या मोबदल्यात तुला काय हवे आहे ?" असा प्रश्न चॅपलीनने त्याला केला. शिवबसप्पाने उत्तर दिले, "कित्तूरचे राज्य" 'ठिक आहे', असे म्हणून चॅपलीनने त्याला निरोप दिला. शिवबसप्पाने लगेच कित्तूरच्या किल्ल्याचा नकाशा व किल्ल्याची सर्व माहिती चॕपलिनला दिली. व तो परत किल्ल्यात आला.
स्टिव्हनसन व इलियट इंग्रज छावणीत परतले. लगेच २ डिसेंबर १८२४ रोजी चॕपलीनने युद्धाची घोषणा केली. कर्नल वॉकर व कर्नल डिकन्स हे आपल्या फौजा घेऊन कित्तूरच्या राज्यात शिरले. आणि कित्तूरच्या आसपासचा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. कित्तुरवर इंग्रजांनी चहुबाजुनी हल्ला केला. पहिल्या दिवशी इंग्रजांना माघार घ्यावी लागली. ४ डिसेंबरला इंग्रजांनी कित्तूरच्या तटावर तोफगोळयांचा मारा सातत्याने केला. तटाला भगदाड पडले. राणीकडे १८ पौंडी व ६ पौंडी गोळे फेकणा-या उत्तम तोफा होत्या. पण त्या तोफांतून दारुगोळाच उडेना. गुरुसिद्दप्पांनी तपास केला. किल्लेदार शिवबसप्पाने दारुच्या कोठारातील दारुत बाजरी व शेण मिसळून ठेवले होते. तो दारुगोळा त्यामुळे निकामा झाला होता. गुरुसिद्दप्पाने राणीला सल्ला दिला की,
"आता किल्ला सोडून जाणेच श्रेयस्कर आहे ." पण राणी माघार घ्यायला तयार नव्हती. तरीही स्वामिभक्त गुरुसिद्दपाने तिला किल्ल्याबाहेर पडण्यारा राजी केले. तिलाही ते पटले. त्याच रात्री गुप्तमागनि राणी चेनम्मा, राणी रुद्रव्वा, छोटा राजा, वीरव्वा आणि शिवलिंगव्वा किल्ल्याबाहेर पडले. त्यांना तात्काळ इंग्रज सैन्याने गिरप्तार केले. युद्ध बंद झाले. कित्तूरच्या किल्ल्यावर इंग्रजांचे युनियन जॅक फडकू लागले. गुरुसिद्दप्पा, सैदनसाहेब पकडले गेले. इंग्रजांनी त्यांना कित्तूरच्या चौकात फाशी दिली.
राणी चेन्नम्माला व तिच्या राज परिवाराला बैलहोंगलच्या किल्ल्यातील तुरुंगात ठेवण्यात आले. त्या तुरुंगातून कित्तूरवर फडकणारे इंग्रजांचे युनियन जैक पाहून तिच्या अंतःकरणात भयंकर वेदना उठत असत. कित्तूर परतंत्र झाल्याचे भयानक दुःख सहन करीत ती जगायचे म्हणून जगत होती. राज परिवाराचे लोक तिच्या सोबतीला होते. हाच फक्त तिला दिलासा होता. इंग्रजांनी तोही हिरावून घेतला. राणी रुद्रव्वासह सगळया राज परिवाराला कुसुगलच्या तुरुंगात इंग्रजांनी पाठवून दिले. राणी आता बैलहोंगलच्या किल्ल्यात एकटीच कडक पहा-यात होती. एकांतातले जिणे तिला असहय झाले. तेव्हा तिचा वेळ शिवलिंगाची पूजा करण्यातच व्यतीत होऊ लागला. तिने आपला आहारही कमी करुन टाकला.
शेवटच्या युद्धात कित्तूरचे स्वामिभक्त वीर रायण्णा व बालण्णा हे निसटून जंगलात निघून गेले होते. त्यांनी कित्तूर जिंकण्याचा चंग बांधला. कित्तूर राज्यातील गावागावातून तरुण वीर गोळा करुन आपले सैन्य उभारले. सुरपूरच्या व शिवगुत्तीच्या राजांनाही रायण्णाने पटवून दिले की, "कित्तूर इंग्रजांच्या ताब्यात राहिले , तर तुमचे राज्यही इंग्रज बळकावतील. म्हणून तुम्ही आपल्या सैन्यासह या व कित्तूर स्वतंत्र करण्यास मदत करा." त्या राजांनाही ते पटले. आपल्या सैन्यासह ते रायण्णाला येऊन मिळाले. ते सैन्य चार मैलापर्यंत पसरले पाहून इंग्रजच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यांनी काही फितूर मिळविले. त्या फितुरांनी रायण्णा नदीत आंघोळ करीत असतांना त्याला पकडले व इंग्रजांच्या हवाली केले. रायण्णाला धारवाड येथे नेऊन फाशी देण्यात आले. कित्तूरवर चालून आलेल्या सैन्यातही इंग्रजांनी फूट पाडली व तिचा पराभव केला.
कित्तूरचा किल्लेदार इंग्रज कमिशनरला मोठया आशेने भेटला व त्याने ठरल्याप्रमाणे कित्तूरच्या राज्याची मागणी चॕपलीनकडे केली. तेव्हा चॕपलीन त्याला म्हणाला, "ठीक आहे. इंग्लंडमध्ये देशद्रोह करणा-यांना जे बक्षीस देण्यात येते, तेच तुम्हांला देऊ" लगेच शिवबसप्पाच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या. कित्तूरमध्ये गाढवावरुन त्याची धिंड इंग्रजांनी काढली व नंतर त्याला तोफेच्या तोंडी देण्यात आले.
रायण्णाला फाशी दिल्याची बातमी राणी चेन्नमाला समजली. ती ऐकताच ती मुर्च्छित झाली. डॉक्टरला बोलावण्यात आले. आधीच तिने अन्नत्याग केला होता. डाॕक्टर म्हणाला,
"आता हिच्या जगण्याची आशा नाही." थोड्याच वेळात स्वातंत्र्यासाठी तडफणारा राणीचा आत्मा अनंतात निघून गेला. कित्तूरचा प्राणच नाहीसा झाला. ही बातमी राणी रुद्रव्वा, वीरव्वा आणि नवा दत्तकराजा गुरुलिंग मल्लसर्ज यांना कळली. तेव्हा त्यांचा आकांत काय वर्णावा? त्या तिघांनी आपल्या छातीत खंजीर खुपसून घेऊन तुरुंगात प्राणत्याग केला. संपली ! राणी चेन्नम्माच्या स्वातंत्र्य लढण्याची कहाणीची इतिश्री झाली ! त्या थोर क्रांतिकारक राणीला कर्नाटकच काय पण सारा भारत कधीही विसरणार नाही.
त्यांच्या सन्मानार्थ २२ ते २४ ऑक्टोबरला कित्तुर येथे दरवर्षी उत्सव साजरा केला जातो. नवी दिल्ली येथिल पार्लमेंट हाऊस मध्ये राणी चेन्नम्मा यांच्या मुर्तीची स्थापना केलेली आहे.
त्यांचे जीवन नारी शक्तीची प्रतिकच नाही तर प्रेरणास्त्रोत सुध्दा आहे. आपल्या शर्थीनुसार जीवन जगायला कोणतेही मूल्य कमी पडते.
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *स्वातंत्र्य वेदीवर शहीद झालेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*🙏
स्त्रोत ~ महान भारतीय क्रांतिकारक
- श्री. स. ध. झांबरे
संकलित ब्लॉग

रविवार, १३ ऑक्टोबर, २०१९
कोजागरी पौर्णिमा
विझवून आज रात्री
कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा
तो चंद्रमा पहा रे
असतो नभात रोज
तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला
त्याच्या सवे रहा रे
चषकातुनी दुधाच्या
प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही
कोजागरी करा रे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...*
आज कोजागरी पौर्णिमा…. आज उत्सव चांदण्या रात्रीचा…. पण याच कोजागरीच्या रात्रीच्या साक्षीनं एक ऐतिहासिक घटना घडली होती….. . कोजागरीच्या रात्रीच हिरकणी रायगडाची अवघड वाट उतरुन खाली आली…. घरी रडणा-या तान्हुल्या बाळाचा चेहरा डोळ्यासमोर येताच हिरकणीमध्ये हजारो सिंव्हांचं बळ एकवटलं….. आणि त्या दिवशीची हिरकणीची कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरानं लिहिली गेली…..
ती रात्र कोजागिरी पौर्णिमेची….. गोष्ट चार-पाचशे वर्षांपूर्वीची….
*"कोजागिरी" नव्हे; "कोजागरी" हा योग्य मराठी शब्द आहे!*
या शब्दाचे मूळ *को जागर्ति? (कोण जागा आहे?)* या प्रश्नात आहे. त्या पौर्णिमेच्या रात्री सर्वांना देवी लक्ष्मी हा प्रश्न विचारते, अशी समजूत आहे. जो जागा असतो, त्याला देवी संपत्ती देते, असे म्हणतात. कोजागरी हा शब्द लिहिताना 'ग' ऎवजी 'गि' लिहिला जाण्याची (कोजागिरी) चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी को जागर्ति? हा प्रश्न लक्षात ठेवावा. उच्चाराच्या सोयीने सर्रास "कोजागिरी" असा वापर सध्या सुरू झालाय; पण तो योग्य मराठी शब्द नव्हे. आश्विन महिन्यातील पौर्णिमेला *कोजागरी* म्हणतात.
कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला एक हिंदू सण म्हणून साजरी करतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी असेही संबोधिले जाते.
शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच "कोजागरी पौर्णिमा" किंवा "शरद पौर्णिमा". ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर कुणी कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.
कोजागिरी पोर्णिमा ! कोऽजार्गति? कोऽजार्गति? म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत त आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ति बुध्दिच्या दैवताचे आराधान करावे. विजया दशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करावे. त्यानंतर येणारी ही पोर्णिमा ! शेतीची कामे अर्ध्यावर झालेली, शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, चार महिन्यांचा पावसाळा संपत आलेला. काही भागात नवीन पिके हाताशी आलेली आहेत. अनेक भागातील ही नवात्र पोर्णिमा!
या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्ठी करत, रास व गरबा खेळत, आठवणीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो.
कोजागरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत, त्यापैकी एक अशी सांगितली जाते की, एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो.त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन प्रत्येकालाच विचारते, की "को जागर्ति...? को... जागर्ति...?' म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती "अमृत' म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते.
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.चंद्राच्या किरणांमध्ये असे अमृत शरद पौर्णिमेशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, जे विविध आजारांचा नाश करतात. त्यामुळे जागरण करून चंद्राची किरणे अंगावर घेण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न असतो.
अशा या संपन्नतेमध्ये शरद पोर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी कोण होती? कोणी म्हणजे ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर अध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्ल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी बशरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. किती विविध रूपे ! सगळीच अनुकरणीय आणि म्हणूनच आदर्शवत रूपे !!
रविवार, २२ सप्टेंबर, २०१९
कर्मवीर भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील:तत्वनिष्ठ शिक्षणमहर्षीं
जन्म सप्टेंबर २२, इ.स. १८८७; , महाराष्ट्र
मृत्यू मे ९, इ.स. १९५९
पुर्ण नाव : भाऊराव पायगौडा पाटील
पेशा : समाजसुधारणा, शिक्षणप्रसार
प्रसिद्ध कामे : रयत शिक्षण संस्था
पुरस्कार : पद्मभूषण (१९५९)
हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' ही योजना सुरू करुन मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.
"रयत" हा शब्द मराठी संस्कृतीच्या जिव्हाळ्याचा शब्द आहे. पण हा मूळ अरबी भाषेतील शब्द आहे. रयत म्हटले की एक आपुलकीची भावना मराठी भाषिकांच्या मनात निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजी राजांनी जे राज्य निर्माण केले, त्या राज्याला रयतेचे राज्य असे म्हटले जाते. रयत म्हणजे सर्व जनता! त्यामध्ये भेदभाव नाही.
छत्रपती शिवाजीराजांनी समतेचा पाया राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक क्षेत्रांमध्ये घातला. तीच परंपरा शैक्षणिक क्षेत्रामध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून कर्मवीर भाऊराव पाटलांनी घातला.
कर्मवीर भाऊराव पाटील हे शैक्षणिक क्षेत्रातील छत्रपती आहेत. कर्मवीरांचे कार्य हे सर्व जाती-धर्मांसाठी होते. रयतेच्या शिक्षणाची माऊली म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी छत्रपति शाहूजी महाराज यांच्या कार्याचा वारसा शैक्षणिक क्षेत्रामध्ये कर्मवीर अण्णांनी उभारला. ते सत्यशोधकी होते, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक सदस्य होते, म्हणूनच हे मानवतावादी होते.
शिक्षण संस्था उभारून कर्मवीरांनी पैसा कमावला नाही, परंतु स्वतःच्या कमाईचा सर्व पैसा रयतेच्या शिक्षणासाठी खर्च केला, म्हणूनच त्यांना शिक्षणमहर्षी म्हटले जाते.
आणा हे सामान्य शेतकरी कुटुंबातून आले होते,त्यांचा जन्म कुंभोज या आजोळी गावी झाला.त्यांचे गाव वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक होय.वडील सरकारी सेवेत होते पण त्यांच्या बाणेदारपणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली.अण्णांचे शिक्षण कोल्हापुरातील जैन बोर्डिंगमध्ये झाले.बोर्डिंगचे नियम मोडल्यामुळे त्यांना अधीक्षकांनी काढून टाकले तेंव्हा शाहू महाराजानी त्यांना राजवाड्यावर ठेवून घेतले.
आण्णा बालवयापासूनच बंडखोर होते,अस्पृश्याना सार्वजनिक विहिरीवर पाणी भरू दिले नाही म्हणून त्यांनी रहाटच मोडून टाकला.ज्ञानदेव घोलप या मुलाला घेऊन त्यांनी परिवर्तनाचा लढा सुरू केला.सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव होता.
आणा सहावीत नापास झाले,पण डगमगले नाहीत,निराश झाले नाहीत,ते हिम्मतवान होते.त्यांना गरीबाप्रति खूप तळमळ होती.गरिबांना शिकविण्यासाठी त्यांनी पत्नी लक्ष्मीबाईचे दागिने मोडले,पण बहुजन मुलांना उपाशी राहू दिले नाही किंवा त्यांचे शिक्षण बंद पडू दिले नाही.गावोगावी जाऊन त्यांनी मुलं आणून त्यांना मोफत शिक्षण दिले.आणा महाराष्ट्राची मायमाऊली आहे.
आणांनी विचारधारेशी कधीही तडजोड केली नाही,ते शेकापशी एकनिष्ठ होते.बाळासाहेब खेर यांनी ग्रँड बंद केली म्हणून त्यांनी पक्षांतर केले नाही किंवा ते साधे भेटायलाही गेले नाहीत,त्याच्याविरुद्ध लढत राहिले,इतके ते स्वाभिमानी होते,ते अडचणीत असताना एक व्यापारी अण्णांना म्हणाला "मी तुम्हाला पैसे देतो पण तुम्ही कॉलेजला दिलेले शिवाजीराजांचे नाव बदला आणि माझे नाव द्या" तेंव्हा आण्णा म्हणाले "एक वेळेस जन्मदात्या बापाचे नाव बदलेण पण एकदा दिलेले शिवाजीराजांचे नाव मी कधीही बदलणार नाही" आणणा हे महान शिवप्रेमी होते पण त्यांनी शिवाजीराजांचे नाव घेऊन तरुणांच्या हातात दगड धोंडे आणि तलवारी दिल्या नाहीत तर त्यांच्या हातात पाटी-पुस्तक दिले.
त्यांनी सत्यशोधकी विचारांसाठी मरण पत्करले, परंतु सनातनी विचारधारेला ते कधीही शरण गेले नाहीत, बाळासाहेब खेर या सनातनी मुख्यमंत्र्यांनी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेची ग्रँट बंद केली, तरी अण्णा त्या सनातनी विचारधारेला शरण गेले नाहीत. शेवटपर्यंत पुरोगामीवृत्ती आणि तत्त्वनिष्ठा त्यांनी सोडली नाही. अशा नीतिमान, निस्वार्थी, निष्कलंक, निर्भय, निर्व्यसनी, निपक्षपाती, शिक्षणमहर्षीना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
रयतगीत
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||
कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||
गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||
दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||
जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ...
गीतकार - विठ्ठल वाघ

कर्मवीर भाऊराव यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगौडा पाटील असे होते. आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्यातील मूडब्रिदी गावचे. कर्मवीर यांचे पुर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले. पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते. पुढे ते एतवडे जि. सांगली येथे स्थिर झाले. पुढे त्यांच्या घराण्यात पाटीलकी आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले .कोल्हापूर जिल्यात हातकनंगले नावाचा तालुका आहे .या तालुक्यात बाहुबली चा डोंगर आहे. या डोंगरावर पार्श्व्नाथाचे सुंदरभव्य स्मारक आहे. या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेशे गाव आहे या गावी २२ सप्टेंबर १८८७ रोजी (आश्विन शुद्ध पंचमी ,ललिता पंचमी ) कर्मवीरांचा जन्म झाला. त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले. भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे, एवढे हे कर्मठ घराणे होते. असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात , खेळण्यात गेले. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावांत झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. कर्मवीर लहानपणापासून बेडर वृत्तीचे होते. ते पट्टीचे पोहणारे होते.
🏢 *शिक्षण संस्था*
पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.
दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यांनी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -
*शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.*
*मागासलेल्या वर्गांतील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.*
*निरनिराळ्या जातिधर्मांतील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे*
*अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्या विकासाचे वळण लावणे.*
*संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.*
*सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.*
*बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.*
ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.
साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले. बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना सातार्यात हायस्कूल काढण्यासाठी ४००० रुपये दिले, व बडोद्यात महाराजांच्या राज्यारोहणास साठ वर्षे झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले.
त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली, म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती. रयत शिक्षण संस्था हि आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे. महाराष्ट्र व कर्नाटक मिळून ६७५ शाखा आहेत.त्यामध्ये २० पूर्वप्राथमिक ,२७ प्राथमिक,४३८ माध्यमिक, ८ अध्यापक विद्यालय,२ आय.टी.आय व ४१ महाविद्यालयांचा समावेश आहे.
ह.रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवली. कर्मवीरांचे पूर्ण नाव भाऊसाहेब पायगौंडा पाटील. वडिलांचे नाव पायगौंडा तर आई चे नाव गंगाबाई होते. कर्मवीरांचे मूळ घराणे कर्नाटक राज्यातील,दक्षिण कन्नड जिल्यातील मुडबीद्री गावचे. देसाई हे त्यांचे आडनाव. कर्मवीरांचे पूर्वज नशीब अजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले.व एतवडे बुद्रुक. जि. सांगली येथे स्थिरावले.
📚 *पाटीलांची चरित्रे*
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा. प्रभाकर नानकर)
कर्मवीर भाऊराव पाटील (बा.ग. पवार)
कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा.डॉ. रमेश जाधव)
कर्मवीर भाऊराव पाटील (संध्या शिरवाडकर)
कर्मवीर भाऊराव पाटील (सौ. सुधा पेठे)
कर्मवीर भाऊराव पाटील : काल आणि कर्तृत्व (डॉ. रा.अ. कडियाळ)
कुमारांचे कर्मवीर (द.ता भोसले) इंग्रजी अनुवाद Karmaveer Bhauraao Patil)
ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे (रा. ना. चव्हाण)
थोर रयतसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (लीला शांतिकुमार शाह)
समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (तृप्ती अंतरकर)
माणसातील देव, अजित पाटील
🎖 *सन्मान*
सन १९५९ : पद्मभूषण
कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, पंढरपूर
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
💐💐💐
कर्मवीर भाऊराव पाटील
समाजातील तळागाळा पर्यँत शिक्षणाची गंगा पोहोच करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...!!💐💐🙏

आगामी झालेले
-
सावित्रीबाई जोतीराव फुले 🙏 ३ जानेवारी १८३१ 🙏 ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पा...
-
शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य उर्फ भाऊसाहेब देशमुख Panjabrao Deshmukh जन्म : २७ डिसेंबर १८९८ (पापळ, अमरावती, महाराष्ट्र ) मृत...