विझवून आज रात्री
कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा
तो चंद्रमा पहा रे
असतो नभात रोज
तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला
त्याच्या सवे रहा रे
चषकातुनी दुधाच्या
प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही
कोजागरी करा रे
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा...*
आज कोजागरी पौर्णिमा…. आज उत्सव चांदण्या रात्रीचा…. पण याच कोजागरीच्या रात्रीच्या साक्षीनं एक ऐतिहासिक घटना घडली होती….. . कोजागरीच्या रात्रीच हिरकणी रायगडाची अवघड वाट उतरुन खाली आली…. घरी रडणा-या तान्हुल्या बाळाचा चेहरा डोळ्यासमोर येताच हिरकणीमध्ये हजारो सिंव्हांचं बळ एकवटलं….. आणि त्या दिवशीची हिरकणीची कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरानं लिहिली गेली…..
ती रात्र कोजागिरी पौर्णिमेची….. गोष्ट चार-पाचशे वर्षांपूर्वीची….
*"कोजागिरी" नव्हे; "कोजागरी" हा योग्य मराठी शब्द आहे!*
या शब्दाचे मूळ *को जागर्ति? (कोण जागा आहे?)* या प्रश्नात आहे. त्या पौर्णिमेच्या रात्री सर्वांना देवी लक्ष्मी हा प्रश्न विचारते, अशी समजूत आहे. जो जागा असतो, त्याला देवी संपत्ती देते, असे म्हणतात. कोजागरी हा शब्द लिहिताना 'ग' ऎवजी 'गि' लिहिला जाण्याची (कोजागिरी) चूक होऊ शकते. ती टाळण्यासाठी को जागर्ति? हा प्रश्न लक्षात ठेवावा. उच्चाराच्या सोयीने सर्रास "कोजागिरी" असा वापर सध्या सुरू झालाय; पण तो योग्य मराठी शब्द नव्हे. आश्विन महिन्यातील पौर्णिमेला *कोजागरी* म्हणतात.
कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा, ही आश्विन पौर्णिमेला एक हिंदू सण म्हणून साजरी करतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा सप्टेंबर ते ऑक्टोबरमध्ये असते. कृषी संस्कृतीत ह्या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या पौर्णिमेला माणिकेथारी असेही संबोधिले जाते.
शरद ऋतूतील आश्विन महिना. आश्विन महिन्यातील आश्विन पौर्णिमा म्हणजेच "कोजागरी पौर्णिमा" किंवा "शरद पौर्णिमा". ह्या पौर्णिमेला अजूनही बरीच नावे आहेत. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात तर कुणी कौमुदी पौर्णिमा देखील म्हणतात.
कोजागिरी पोर्णिमा ! कोऽजार्गति? कोऽजार्गति? म्हणजे कोण जागे आहे ?, कोण जागृत त आहे? असे विचारीत दुर्गा देवी सर्वत्र फिरते असे म्हणतात. नवरात्राचे नऊ दिवस शक्ति बुध्दिच्या दैवताचे आराधान करावे. विजया दशमीला विजय संपादनासाठी सीमोल्लंघन करावे. त्यानंतर येणारी ही पोर्णिमा ! शेतीची कामे अर्ध्यावर झालेली, शेतातील पिके वाऱ्यावर डोलू लागलेली, चार महिन्यांचा पावसाळा संपत आलेला. काही भागात नवीन पिके हाताशी आलेली आहेत. अनेक भागातील ही नवात्र पोर्णिमा!
या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची आश्विनी साजरी करतात. रात्री उशिरापर्यंत गप्पा-गोष्ठी करत, रास व गरबा खेळत, आठवणीतील गाणी गात सर्वजण जागरण करतात. दूध आटवून बदाम, केशर, पिस्ता वगैरे सुकामेवा घालून लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो आणि ते मसाला दूध मग प्राशन केले जाते. चंद्र आपल्या सौम्य प्रकाशात सबंध पृथ्वीला न्हाऊ घालत असतो.
कोजागरी पौर्णिमेच्या अनेक कथा आहेत, त्यापैकी एक अशी सांगितली जाते की, एकदा एक राजा आपले सगळे वैभव्य आणि संपत्ती गमावून बसतो.त्याची राणी महालक्ष्मीचे व्रत करते आणि लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तिला आशीर्वाद देते आणि त्या राजाचे वैभव त्याला परत मिळते. असं म्हणतात की महालक्ष्मी मध्यरात्री या चंद्रमंडलातून उतरून खाली पृथ्वीवर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात "अमृतकलश' घेऊन प्रत्येकालाच विचारते, की "को जागर्ति...? को... जागर्ति...?' म्हणजे आपल्या कर्तव्याला कोण जागृत आहे का? कुणी जागं आहे का? अन् तिच्या हाकेला साद देण्यासाठी सगळेच जागे राहतात. मग तिची वाट पाहणाऱ्या, साद देणाऱ्या सगळ्यांना ती "अमृत' म्हणजे लक्ष्मीचं वरदान देते, धनधान्य, सुखसमृद्धी देते.
शरद ऋतूमध्ये हवामानात बरेच बदल घडून येत असतात..एकीकडे उन्हाळा संपत असतो आणि दुसरीकडे हिवाळा सुरु होत असतो.दिवसा गरम आणि रात्री थंडी पडते.दूध पिल्यामुळे पित्त प्रकोप कमी होतो. याच कारणामुळे बहुतेक पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची प्रधा आहे. कोजागरीचं शीतल चांदणं अंगावर घेतलं, की मनःशांती, मनःशक्ती, उत्तम आरोग्य लाभतं.चंद्राच्या किरणांमध्ये असे अमृत शरद पौर्णिमेशी संबंधित विविध मान्यता प्रचलित आहेत. धार्मिक मान्यतेनुसार या रात्री चंद्राची किरणं विशेष अमृतमयी गुणांनी युक्त असतात, जे विविध आजारांचा नाश करतात. त्यामुळे जागरण करून चंद्राची किरणे अंगावर घेण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न असतो.
अशा या संपन्नतेमध्ये शरद पोर्णिमेला शबरीचा जन्म झाला. शबरी कोण होती? कोणी म्हणजे ती शबर राजाची कन्या होती. कोणी तिच्या वनवासी भिल्ल समाजाची असण्यावर भर देतात. कोणाला मातंग ऋषींसमोर अध्यात्मिक आस पूर्ण करण्यासाठी गुरू उपदेश घेणारी शबरी भावते. तर कोणाला आपल्ल्या दैवताला जे आहे ते, प्रसंगी उष्टी बोरे देऊनही समर्पित होणारी बशरी आठवते. कोणाला सीतेच्या शोधार्थ निघालेल्या दशरथ नंदन राम लक्ष्मणांना मार्गदर्शन करणारी शबरी आठवते. किती विविध रूपे ! सगळीच अनुकरणीय आणि म्हणूनच आदर्शवत रूपे !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा