नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत
!doctype>
हार्दिक स्वागत ......WEL COME
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०
जागतिक हरित ग्राहक दिन
हरित ग्राहक दिन
भारतात दरवर्षीप्रमाणे , २८ सप्टेंबर रोजी ‘हरित ग्राहक दिन’ आहे. यानिमित्ताने, आपल्यातील ‘हरित ग्राहक’ कोणाला म्हणावे, या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करू.. आपण बाजारात जाऊन ज्या वस्तू विकत घेतो, त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी किती प्रमाणात पाणी, ऊर्जा व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करावा लागला असेल आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम झाला असेल? उत्पादन प्रक्रियेत किती व कशा प्रकारचा कचरा निर्माण होत असेल? या वस्तू पुन:पुन्हा वापरात येतील का? या वस्तूंचं ‘रिसायकलिंग’ होऊ शकेल का? अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्या मनात येत असतील, तर ते आपण ‘हरित ग्राहक’ असल्याचे लक्षण आहे हे नक्की समजावे. याव्यतिरिक्त दळणवळणासाठी आपण निवडत असलेले परिवहनाचे पर्याय, रोजच्या अन्नाचा स्रोत, पारंपरिक वस्तूंऐवजी पर्यावरणास उपकारक वस्तूंचा वापर, पर्यावरणाच्या संवर्धनाविषयीचा दृष्टिकोन हे गुणही ‘हरित ग्राहक’ म्हणून पात्र ठरण्यास महत्त्वाचे आहेत.
जैवविघटन होणारा (नॉन- बायोडीग्रेडेबल) कचरा हा संपूर्ण पृथ्वीसमोरचा फार मोठा प्रश्न आहे. असा कचरा टाकणा-या व्यक्ती भावी पिढ्यांचे नुकसान करीत आहेत. या कच-यामुळे पृथ्वीवरचे पूर्ण पर्यावरण चक्र बिघडते. आपण निर्माण करतो त्या कच-याचे दोन प्रकार असतात. जैवविघटनयोग्य (बायोडीग्रेडेबल) म्हणजे कालांतराने विघटन होऊन जो कचरा सृष्टीत मिसळून जातो असा आणि नॉन- बायोडीग्रेडेबल म्हणजे जो वर्षानुवर्षे, खराबदेखील न होता फक्त साठून राहतो असा नॉन- बायोडीग्रेडेबल कचरा संपूर्ण जीवसृष्टीला अत्यंत धोकादायक आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे हरित ग्राहक जीवनशैलीव्दारे आपल्या हातात आहे.
२००८ साली विविध देशांतील सर्वसामान्य लोकांची जीवनशैली आणि तिचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने एक सर्वेक्षण केले होते. यासाठी त्यांनी भारत, ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांबरोबर ब्रिटन, अमेरिका अशा अतिप्रगत आणि विकसित असलेल्या एकूण १४ देशांमधील नागरिकांकडून एक प्रश्नावली भरून घेतली. वेगवेगळ्या देशांचे नागरिक उपभोक्त्यांच्या/ग्राहकांच्या रूपात असताना पर्यावरणाबद्दल कितपत जागरूक असतात, याचा आढावा या अभ्यासातून घेण्यात आला. प्रत्येक देशाला मिळालेल्या गुणांना त्यांनी ‘ग्रीनडेक्स’ असे नाव दिले. या सर्वेक्षणाचा निकाल साधारण अपेक्षित असाच होता. भारत आणि ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांतील ग्राहकांना १०० पैकी ६० गुण मिळाले, तर अमेरिकेतील ग्राहकांना सर्वात कमी- म्हणजे ४४.९ गुण मिळाले. यातून- विकसनशील देशांमधील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरूक आहेत आणि पर्यावरणाविषयी स्वत:ला जबाबदार मानतात; तसेच पर्यावरणाविषयी बोलण्यास/ऐकण्यास ते अधिक उत्सुक असतात, पर्यावरणावरील परिणाम टाळण्यासाठी काही तरी करावे अशी त्यांची इच्छा असते, असा निष्कर्ष काढण्यात आला.
भारतात दरवर्षीप्रमाणे आज, २८ सप्टेंबर रोजी ‘हरित ग्राहक दिन’ पाळला जाणार आहे. यानिमित्ताने, आपल्यातील ‘हरित ग्राहक’ कोणाला म्हणावे, या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करू.. आपण बाजारात जाऊन ज्या वस्तू विकत घेतो, त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी किती प्रमाणात पाणी, ऊर्जा व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करावा लागला असेल आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम झाला असेल? उत्पादन प्रक्रियेत किती व कशा प्रकारचा कचरा निर्माण होत असेल? या वस्तू पुन:पुन्हा वापरात येतील का? या वस्तूंचं ‘रिसायकलिंग’ होऊ शकेल का? अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्या मनात येत असतील, तर ते आपण ‘हरित ग्राहक’ असल्याचे लक्षण आहे हे नक्की समजावे. याव्यतिरिक्त दळणवळणासाठी आपण निवडत असलेले परिवहनाचे पर्याय, रोजच्या अन्नाचा स्रोत, पारंपारिक वस्तूंऐवजी पर्यावरणास उपकारक वस्तूंचा वापर, पर्यावरणाच्या संवर्धनाविषयीचा दृष्टिकोन हे गुणही ‘हरित ग्राहक’ म्हणून पात्र ठरण्यास महत्त्वाचे आहेत.
सरकारी व संस्थात्मक पातळीवर ‘हरित ग्राहक दिना’निमित्त निरनिराळे कार्यक्रम केले जातातच; पण वैयक्तिक पातळीवरही छोटे-छोटे उपाय शोधून आपल्या परीने आपापल्या परिसरात जनजागृती मोहिमा राबवता येतील!* भविष्यासाठी आपण काय करू शकतो --
प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरला नकार द्या.
प्राणिज अवयवांपासून बनलेल्या वस्तू विकत घेऊ नका.
लेटरबॉक्सवर ‘नो जंकमेल’ चे चिन्ह लावा.
प्रदूषण वाढवणा-या किंवा करणा-या वस्तूंना, कृतींना पर्याय म्हणून काय करता येईल याचा विचार करा.
पुनर्वापर करण्याजोगी उत्पादने खरेदी करा.
‘वापरा आणि फेका’ प्रकारच्या वस्तूंचा वापर कमी करा.
भरपूर पॅकेज असलेल्या वस्तूंची खरेदी टाळा.
अजूनही वापर करण्यायोग्य वस्तू फेकून देऊ नका.
वस्तू मोडली तर दुसरी नवी वस्तू घेण्याआधी जुन्या वस्तूची दुरुस्ती करता येते का ते पाहा.
कोणत्याही प्रकारच्या कच-याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करून तो योग्य ठिकाणी टाका.
विघटन होऊ न शकणारा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे.
कचऱ्याचे प्रमाण घटवण्याचे महत्त्व सांगणारे लेख,पत्रके इ. वाटणे व मिडियात प्रसिद्ध करणे.
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान🔬
संकलित माहिती
आगामी झालेले
-
जननायक बिरसा मुंडा महान भारतीय क्रांतिकारक जन्म : 15 नोव्हेंबर 1875 (उलिहातू - झारखंड)* वीरमरण : 9 जून 1900 (रांची तुरुंग) (वय - ...
-
शिक्षण सप्ताह अंतर्गत फोटो अपलोड लिंक दिवस नुसार Day-wise Shiksha Saptah media submission https://shikshasaptah.com/shiksha-saptah/media-s...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा