नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सोमवार, २३ डिसेंबर, २०१९

पदवीधर मतदार नोंदणी

कोल्हापूर, सांगली, सातारा, पूणे,वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, हिंगोली, परभणी, चंद्रपूर, नांदेड, जालना,बीड, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर जिल्ह्यातील सर्व पदवीधर मतदार संघ नाव नोंदवा
Online Submission of Graduate Electoral - Form 18
          अशा लिंकवर क्लिक करा.  https://ceo.maharashtra.gov.in/GOnline/Graduate19.aspx
पुढे फॉर्म येईल
Chief Electoral Officer, Maharashtra
Online Graduate Form 18
-
अशी खालील ही माहिती भरा
१) Select District जिल्हा निवड करा
२) Graduate Applicant Details
     First Name  
    Firat Name Marathi  
   Last Name  
   Last Name Marathi  
   DOB  
    Age        Gender      

३) Graduate Applicant Relative Details
     Note : Relative Name Means Details of       Father / Mother / Husband / Other Details    
Relation Type                
Relation Name  
Relation Name Marathi  
Relation Last Name  
Relation Last Name Marathi  
४) Applicant Qualification Details
Qualification  
Occupation  
Graduation Pass out Year  
५) Applicant Address
House No.  
House No. Marathi  
Full Address English  
Full Address Marathi  
Tahsil  Name  
Tahsil  Name Marathi  
Post Office Name  
Post Office Name Marathi  
Village Name  
Village Name Marathi  
Pincode  
६) Applicant Assembly Details
Assembly No.  
Part No.  
Voter Card No.  
Contact No.  
Mobile No.  
Email ID  
७) Applicant Documents Applicant Photo     फाईल मध्ये फोटो जोडायचे आहे
 ८) Applicant Graduate Certification    
फाईल मध्ये फोटो जोडायचे आहे
 ९) Applicant Address    फाईल मध्ये पुरावा फोटो जोडायचे आहे

पद्मश्री रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार


स्वातंत्र्यसैनिक व राजकारणी, पद्मश्री
रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार
जन्म : १५ सप्टेंबर १९०९ (निमशिरगाव, कोल्हापूर, महाराष्ट्र)
मृत्यू : २३ डिसेंबर १९९८ ( इचलकरंजी )
मतदारसंघ : इचलकरंजी
लोकसभा मतदारसंघ
कार्यकाळ : १९५२ – १९५७
मतदारसंघ : शिरोळ विधानसभा मतदारसंघ
कार्यकाळ : १९६२ – १९६७
मतदारसंघ : शिरोळ विधानसभा मतदारसंघ
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मागील इतर राजकीय पक्ष
संस्थान : प्रजा परिषद
पत्नी : पार्वती
अपत्ये : ३ मुली
निवास : इचलकरंजी
धर्म : हिंदू धर्म (लिंगायत)
डाॅ. रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रेसर असलेले इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक होते. स्वातंत्र्यानंतर डेक्कन स्टेटमधील २१ संस्थाने त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चळवळीमुळेच भारतीय संघराज्यात विलीन झाली. ते भारताच्या घटना मसूदा समितीचे सदस्य व घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. ते पहिल्या लोकसभेचे खासदार, तसेच महाराष्ट्र विधानसभेत ६ वेळा निवडून गेलेले आमदार व महाराष्ट्र सरकारमधील गृहमंत्री,अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते. ते देशभक्त रत्नाप्पा कुंभार नावाने परिचित होते.
१९८५ साली त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १९८५ साली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने त्यांना सन्माननीय डी.लिट् पदवी दिली.
🤷‍♂ *प्रारंभी जीवन*
रत्नाप्पांचा जन्म १५ सप्टेंबर १९०९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव या खेडेगावात कुंभार काम करणाऱ्या शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील भरमाप्पा व आई गंगूबाई होय. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झाले. माध्यमिक शिक्षण हातकणंगले या तालुक्याच्या गावी झाल्यावर १९२८ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले व पुढील शिक्षणासाठी ते कोल्हापुरातील राजाराम महाविद्यालयात गेले. कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरात ज्ञानार्जनासाठी येणाऱ्या विद्यार्थांच्यासाठी स्थापन केलेल्या वीरशैव वसतीगृहात राहून त्यांनी १९३३ साली बी.ए. ची पदवी संपादन केली. कायद्याच्या अभ्यासासाठी त्यांनी एल्.एल्.बी च्या पहिल्या वर्गात प्रवेशही घेतला. मुलगा चांगले शिकत असलेले पाहून त्या काळच्या चालीरीतीप्रमाणे वडिलांनी रत्नाप्पांचे लग्न ठरविले व मिरज तालुक्यातील गुंडेवाडी गावातील पार्वतीबाई यांच्याशी १९३४ साली रत्नाप्पांचा विवाह झाला.
🏇 *भारतीय स्वातंत्र्य चळवळ*
त्या काळात जोमात असलेल्या मिठाच्या सत्याग्रहामुळे भारतातील राजकीय वातावरण तापले होते. रत्नाप्पा एल्.एल्.बी च्या पहिल्या वर्गात असताना १९३४ साली, कोल्हापुरात माधवराव बागल हे शेती व शेतीमालाचे ब्रिटिशांकडुन होणारे शोषण व लूट या विषयांवर सभांमधून बोलत असत. रयतेच्या सत्यस्थितीचे बागल करीत असलेल्या विश्लेषणाने रत्नाप्पा त्यांच्याकडे आकर्षित झाले व कायद्याचा अभ्यासक्रम अर्धवट सोडून ते बागलांचे सहकारी बनले. २५ डिसेंबर १९३८ रोजी कोल्हापुरात शेत-सारा कमी करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरच्या संस्थाना विरुद्ध मोर्चा निघाला. त्याकाळी अस्तित्वात असलेल्या स्थानिक संस्थानांचे राज्यांत विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी करण्यात येणाऱ्या आंदोलनांमध्ये रत्नाप्पा आघाडीवर होते. ६ जून १९३९ रोजी जयसिंगपूर गावातील श्रीराम ऑईल मिल मध्ये प्रजा परिषद स्थापनेसाठी बैठक बोलावण्यात आली. माधवराव बागल, रत्नाप्पा, दिनाकर देसाईंसह अंदाजे दोन हजार लोक उपस्थित होते. बैठकीचे फलस्वरूप संस्थान प्रजा परिषद या नावाचा राजकीय पक्ष स्थापन झाला व ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. हा पक्ष ऑल इंडिया स्टेट पीपल्स कॉग्रेसशी संलग्न होता. ८ जुलै १९३९ रोजी त्यांना अटक झाली व दंडाची आणि कैदेची शिक्षा ठोठावली गेली. कुंभार, बागल, देसाई व इतरांना कोल्हापूरच्या तुरुंगात कैदेत ठेवून शिवाय त्यांना दंड ही करण्यात आला. काही दिवसांनी सुटल्यावर रत्नाप्पा लगेच कॉग्रेसच्या अधिवेशनात सामील होण्याकरता मुंबईला गेले. याच अधिवेशनात चले जाव चा नारा दिला गेला. ब्रिटिश सरकारने कॉग्रेसच्या नेत्यांची धरपकड सुरू केली. रत्नाप्पा रातोरात भूमिगत झाले व त्यांनी इंग्रज सरकारविरोधात लढाई सुरू ठेवली.
सुरूवातीला भूमिगत झाल्यावर त्यांनी त्यांची कचेरी मिरजे जवळ्च्या मालगाव जवळ असलेल्या दंडोबाच्या डोंगरावर असलेल्या बाबंण्णा धुळी यांच्या मळ्यात केली होती. तेथे त्यांना मदत करण्यासाठी कॉग्रेड एस. पी. पाटील सामील झाले. भूमिगत झालेले कार्यकर्ते गावतील चावड्या जाळणे, रेल्वे स्टेशन्स जाळणे, टेलिफोनच्या तारा तोडणे, दारूचे गुत्ते जाळणे आदी घातपाती कारवाया करत, रत्नाप्पांनी या भूमिगत कार्यकर्त्यांमधे एकसूत्रीपणा आणला. या भूमिगत चळवळीची सर्व आखणी आणि कर्यक्रम रत्नाप्पा या दंडोबाच्या डोंगरावरच्या कचेरीत ठरवत असत. त्या नंतर रत्नाप्पांच्या मार्गदर्शनाखाली अनेक घातपाती कार्यवाया झाल्या. पुढे या चळवळीच्या कामासाठी पैशाची चणचण जाणवू लागली. मिरजेजवळील मालगावात काही मोजक्या क्रांतिकारकांची रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली २० डिसेंबर १९४३ च्या सुमारास ३ दिवासांची गुप्त बैठक झाली व यात बार्शी रेल्वेतून जाणारे इंग्रजांचे टपाल लुटण्याचा बेत त्यांनी आखला गेला. चनगोंडा पाटील, काका देसाई, कुंडल देसाई, आय.ए. पाटील, व्यंकटेश देशपांडे, हरिबा बेनाडे, दत्तोबा ताबंट, ईश्वरा गोधडे, शंकरराव माने या क्रांतिकारी युवकांनी रत्नाप्पांच्या नेतृत्वाखाली २९ डिसेंबर १९४३ रोजी बार्शी येथे टपालाच्या डब्यावर हल्ला केला. ड्रायव्हर, फायरमन व गार्ड यांना पकडून त्यांना दोन ते तीन मैल लांब सोडून देण्यात आले. टपालाच्या पिशव्या व थैल्या ताब्यात घेऊन सर्वजण पसार झाले. या लुटीत अनेक मौल्यवान वस्तुंबरोबरच एका शाळेच्या हिंदी परीक्षेच्या सर्टिफिकेट्सचा पुडका होता. तो पुडका कार्यकर्त्यांनी पोष्टाने त्या शाळेला परत पाठवला.
पुढे काही मोजक्या साथीदारांना सोबत घेऊन रत्नाप्पांनी जेजुरी येथील खंडोबाच्या मंदिरातील जामदारखाना लुटण्याचा बेत आखला. २७ जुलै १९४४ रोजीच्या रात्री शंकरराव माने, डॉ.माधवराव कुलकर्णी, दत्तोबा तांबट, शाम पटवर्धन, य. म. कुलकर्णी, शि. पी. पाटील, इब्राहीम नदाफ निवडक सहकारी क्रांतिकारी युवकांच्या साथीने रत्नाप्पांनी जेजुरी देवस्थानावर दरोडा घातला. तेथील सेवेकरी गाढ झोपेत असताना त्यांच्यावर हल्ल्ला करून त्यांना मारहाण केली व पुजाऱ्याकडून मंदिरातील जामदारखान्यातील तिजोरीच्या किल्ल्या घेऊन खजिना उघडला. तिजोरीत इंदूरचे होळकर , ग्वाल्हेरचे शिंदे आणि पुण्याचे पेशवे व इतर धनिकांनी खंडोबाला दिलेल्या सोन्याच्या, रत्नांच्या कुड्या, माणिकाचे खडे, पानड्या, लाकड्या(?), कंठी, मोत्याचे तुरे, कंबरेचे छल्ले, शिरपेच, देवाचे मुखवटे, जडजवाहीर, सोन्याच्या मूर्ती असे कोट्यवधी रुपये किमतीचे दागिने होते ते घेऊन हे सर्वजण पळून गेले. पोलिसांनी या दरोड्याचा तपास लावला व रत्नाप्पा कुंभार सोडून बाकीच्या सर्व आरोपींना पकडण्यात पोलीस यशस्वी झाले. १९४५ सालच्या जानेवारीत पुणे कोर्टात १३ आरोपींवर खटला भरण्यात आला. ब्रिटिश सरकारने रत्नाप्पांबद्दल माहिती देणाऱ्या अथवा त्यांना अटक करण्यात मदत करणाऱ्यांसाठी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले तरीसुद्धा ते काही सापडले नाहीत. पुढील ६ वर्षे ते अज्ञातवासातच होते. त्यांनी सहकारी क्रांतिकारकांच्या सोबतीने लुटलेल्या पैशाचा वापर भूमिगत चळवळीच्या कामासाठी अत्यंत योग्य रितीने केला.
१९४७ साली त्यांचे वडील भरमाप्पा यांचे निधन झाले, ब्रिटिश पोलिसांनी त्यांच्या घरावर त्यांना पकडण्यासाठी पहारा ठेवला होता पर्ंतु रत्नाप्पांनी वेशांतर करून वडिलांचे अंत्यदर्शन घेतले व ते त्याही वेळेस ही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर एके दिवशी अचानक ते कोल्हापुरात अवतरले.
🇮🇳 *संस्थाने विलिनीकरणाची चळवळ*
१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांनी भारत देशातील ५६५ संस्थानातील राजेशाही अबाधित ठेवून भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती. यामुळे सर्वंकष स्वातंत्र्य प्राप्तीचे स्वप्न अपुरे रहाण्याचा धोका निर्माण झाला होता. सरदार वल्लभभाईंसोबत रत्नाप्पा ही या चळवळीत सामील झाले. रत्नाप्पा कुंभारांनी स्थानिक संस्थानांना आपाआपली संस्थाने खालसा करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर अक्कलकोट, सावंतवाडी, जंजिरा, मुधोळ व जतसह अनेक संस्थानांनी विलीनीकरणास नकार दिला होता.
*अक्कलकोट संस्थान*
प्रजा परिषदेने अक्कलकोट संस्थानाचे विजयसिंगराव राजे सरकारांना भारतात सामील होण्यासाठीच्या अनेक वेळा विनंत्या केल्या होत्या. पर्ंतु संस्थानिक त्यास अनुकूल नव्हते. शेवटी रत्नाप्पांनी आरपारच्या लढाईला हात घातला व आपला विश्वासू सहकारी गोपाळ बकरे यांना सत्याग्रहाच्या तयारीसाठी अक्कलकोटला पुढे धाडले. २५ डिसेंबर १९४७ रोजी रत्नाप्पांनी राज्य प्रजा परिषदेची बैठक बोलावून त्यात अक्कलकोटच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. दुसरे दिवशी सत्याग्रहाचा आराखडा तयार करून त्यांनी कामे वाटून दिली. १ जानेवारी १९४८ रोजी अक्कलकोटला सत्याग्रह सुरू करत असल्याची माहिती देण्यासाठी मुंबई व दिल्लीला तारा करून कळवले. १ जानेवारीच्या पहाटे अंदाजे १ हजार लोकांची प्रभात फेरी सुरू झाली व दुपारी १२ वाजता लक्ष्मी मार्केटवर तिरंगा ध्वज लावण्यात आला. त्याच दिवशी रात्री रत्नाप्पांचे भाषण झाले. २ जानेवारीला सत्याग्रहींनी शेंगदाण्याच्या निर्यातीस अक्कलकोट संस्थानाने घातलेली बंदी मोडली व लहान लहान पिशव्यातून शेंगदाणे सोलापूरला निर्यात केले. ३ जानेवारीला आंदोलन चिघळले व अशांतता, मारहाण व जाळपोळ सुरू झाली. सत्याग्रहींनी मामलेदार कचेरीवर तिरंगा फडकवला व राजवाड्यावर दगडफेक केली. संस्थानच्या समर्थकांनी पण रत्नाप्पा कुंभार ज्या ठिकाणी मुक्कामास होते ती कचेरी जाळली व त्यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. त्याच दिवशी दुपारी संचारबंदी जाहीर झाली. अक्कलकोट संस्थानाचे विजयसिंगराव राजे सरकारांनी सोलापूरच्या जिल्हा अधिकाऱ्यांकडे संरक्षण मागितले. भारतात विलिन होण्याच्या शर्तेवर संरक्षण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले. वाटाघाटी झाल्या व ५ जानेवारीला संस्थानिकांनी भारतात खालसा होण्यास थोडी अनुकुलता दाखवली. ८ जानेवारीला सोलापूरच्या लोखंड गल्लीत रत्नाप्पांसह त्यांचे सहकारी गोपाळ बकरे, वकील भाऊसाहेब बिरजे, शांबदे, रहीम अत्तारांसह इतर सत्याग्रहींचा सत्कार झाला. १६ जानेवारीला रत्नाप्पांनी सरदार वल्लभभाई पटेलांना लिहिलेल्या पत्रात अक्कलकोट मधील परिस्थितीचा आढावा कळवला व कायदा व सुव्यवस्था चांगली नसल्याचे सांगून भारतीय यंत्रणेने ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. या सत्याग्रहचा परिणाम अक्कलकोट संस्थान ८ मार्च १९४८ साली भारताच्या मुंबई प्रांतात सामील झाले व अक्कलकोट हे सोलापूर जिल्ह्याचा एक तालुका बनले.
*सावंतवाडी संस्थान*
महात्मा गांधींची ३० जानेवारी १९४८ ला हत्या झाली. देशभरात निषेधाची लाट पसरली होती. कोल्हापूर सह काही संस्थानांत जातीय हिंसाचार वाढला होता त्यातच सावंतवाडीला १४ फेब्रूवारी १९४८ रोजी रत्नाप्पांच्या अध्यक्षतेखाली प्रजापरिषदेचे तिसरे आधिवेशनस सुरवात झाली. सावंतवाडीत त्या आधी प्रजा परिषदेने विलिनिकरणासाठी अनेक अंदोलने केली होती. रत्नाप्पांनी आपल्या भाषणात विलिनीकरणाच्या प्रश्नावर जोर देत लढा अधीक तीव्र करण्याचे संकेत दिले व अधिक विलंब न लावता, भारतात विलीन होण्यास सावंतवाडी संस्थानाच्या राजेसाहेबांना विनंती करण्याचा व तसे न झाल्यास प्रतिसरकार स्थापन करण्या संबंधिचा ठराव करून मंजुर केला. २१ जानेवारी पर्यत वाट पाहुन २२ तारखेला जाहीर पत्रके वाटुन अंदोलन करण्यात आले. २३ जानेवारीला संस्थानाच्या सर्व आधिकाऱ्यांना कुडाळला कैदेत ठेवुन संस्थानात दंगल करण्यात आली. परिस्थीती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शिवराम राजे साहेबांनी विलीनीकरणास तयार असल्याची घोषणा केली.
कोल्हापूर संस्थान
ब्रिटिश राजवटीच्या अंतानंतर झालेला काँग्रेसचा वाढता प्रभाव पहाता कोल्हापूर संस्थानाने सर्व समावेशक सरकार स्थापन करण्याची भूमिका घेतली व रत्नाप्पांना या सरकारात पद देऊ केले. परंतु संस्थाने भारतात पूर्णपणे विलीन करण्याच्या भूमिकेवर रत्न्नाप्पा हे ठाम होते. त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. नंतर त्यांना डेक्कन रीजनल काउन्सिलचे अध्यक्ष करण्यात आले व त्यांच्या मार्गदर्शानाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सगळी संस्थाने भारतात विलीन झाली.
💁‍♂ *राजकीय कारकीर्द*
रत्नाप्पांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. ते कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षही झाले, १९५० साली त्यांची लोकसभा सदस्य पदी नियुक्ती झाली. ते भारतीय राज्यघटनेची रचना करण्यासाठी स्थापन केलेल्या घटनासमितीचे सदस्य बनले. ते भारताच्या घटनेच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तींपैकी एक होते. १९५२ च्या पहिल्या लोकसभेचे ते खासदार म्हणून निवडून आले. कोल्हापूर व सातारा असा हा मतदार संघ होता. रत्नाप्पांना १,६३,५०५ मते मिळाली व त्याचे प्रतिद्वंदी कृष्णाजी लक्ष्मण मोरे यांना १,४५,७४७ मते मिळाली. त्यांनी मोरे यांचा १७७५८ मतांनी पराभव केला. १९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या दरम्यान झालेल्या विधानसभा निवडणुकीत सातगोंड रेवगोंड पाटील ( सा. रे. पाटील) त्यांनी रत्नाप्पांचा पराभव केला. इ.स १९६२ ते १९८० आणि नंतर १९९० ते निधनापर्यंत त्यांनी आमदार म्हणून शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९६३ सालच्या वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात व नंतर वसंतराव दादा पाटीलांच्या मंत्रिमंडळात १९७४ ते १९७८ पर्यंत ते महाराष्ट्राचे गृह आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री होते. कोल्हापूर जिल्हातील शिरोळ व हातकणंगले तालुक्यांत औद्योगिक व शेतीविषयक समृद्धी घडवून आणण्यात रत्नाप्पांचे फार मोठे योगदान होते.
निवडणूक वर्ष लोकसभा/विधानसभा प्रतिद्वंदी रत्नाप्पांचे मताधिक्य निकाल
१९५२ लोकसभा कृष्णाजी लक्ष्मण मोरे १,४५,७४७ विजयी
१९५७ विधानसभा सातगोंड रेवगोंड पाटील पराभूत
१९६२ विधानसभा सातगोंड रेवगोंड पाटील २४,६५१ विजयी
१९६७ विधानसभा सातगोंड रेवगोंड पाटील २,८४० विजयी
१९७२ विधानसभा जाधव ४२,९१८ विजयी
१९७८ विधानसभा दिनकरराव यादव १२,४४९ विजयी
१९८० विधानसभा दिनकरराव यादव ३,१२८ पराभूत
१९९० विधानसभा शामगोंड कलगोंड पाटील १९,६६६ विजयी
१९९५ विधानसभा शामगोंड कलगोंड पाटील २६,१६८ विजयी
🤝 *सहकारी चळवळ*
रत्नाप्पा कुंभारांनी १९५२ साली खासदार झाल्यावर लगेचच भारतातील दुसऱ्या सहकारी सहकारी साखर कारखान्याची उभारणीच्या हालचाली इचलकरंजी येथे सुरू केल्या. त्या काळात खाजगी उद्योग प्रचलित होते, सार्वजानिक अथवा सहकारी क्षेत्रातील उद्योग नव्हते. पिकलेल्या उसाचा गूळ करून गुजराती व्यापाऱ्यांना विकणे एवढेच प्रचलित होते. रत्नाप्पांनी सहकारी साखर कारखाना उभारणीसाठीचा अभ्यास केला व सरकारी परवानगी साठीच्या हालचाली करून प्रस्ताव सादर केला. तात्कालिन मुंबई राज्याचे अर्थमंत्री जीवराज मेहता यांनी साखरेच्या उत्पादनाने गुळाच्या निर्यातीस मार बसतो असे कारण सांगून कारखाना स्थापन करण्यासाठीची परवानगी नाकारली. गुजराती गुळाच्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताचा बळी देणे योग्य नसल्याचे जाणून रत्नाप्पांनी प्रस्तावित कारखाना क्षेत्रातील एकूण बागायती असलेली जमिन, पाणी पुरवठा करून येणारी अतिरिक्त बागायती जमीन, त्यांच प्रमाणे साखर व गूळ उत्पादनाचा तुलनात्मक अभ्यास करून शेतकऱ्यांच्या हिताचा आढावा घेणारा सर्वंकष अहवाल त्यांनी अर्थ तज्ज्ञांना सादर केला. या तज्ञांच्या अभिप्रायासह कारखान्याच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव पुन्हा अर्थमंत्र्यांना सादर केला गेला. ३ वर्षाच्या अथक परिश्रमांनंतर त्यांनी १ ऑक्टोबर १९५५ रोजी सहकारी तत्त्वावरच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीचा परवाना मिळवला. १२,९६,०३७ रुपयांचे भागभांडवल शेतकरी जनतेतून उभे केले व पश्चिम जर्मनीतील बकाऊ वुल्फ या कंपनीकडून रोज १००० टन ऊस गाळण क्षमता असलेली यंत्रसामुग्री आयात केली. प्रत्येक साखर कारखान्याने आपल्या परिसरातील गावांचा आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकास साधून संपूर्णपणे कायापालट घडवून आणला पाहिजे...
साखर कारखाना हा शिक्षणाचे व संस्कृतीचे केंद्र बनला पाहिजे.साखर कारखान्याचे काम समाजाच्या जडणघडणीचे आहे.प्रत्येक साखर कारखाना आदर्श समाजाचा शिल्पकार म्हणून पुढे यावा.
..रत्नाप्पा कुंभार
कारखान्याची उभारणी पूर्ण झाल्यावर १९५७/५८ च्या पहिल्या गळित हंगामात या साखर कारखान्याने ३५३० क्विंटल साखरेचे उत्पादन केले व शेतकऱ्यांना त्यांच्या उसाला ४१ रुपये प्रती टन इतका भाव दिला. १९६३-६४ च्या हंगामात कारखान्याने २,३५,००० पोती साखरेचे उत्पादन केले. रत्नाप्पांनांनी १ कोटी रुपयांच्या खर्चाने नविन २४ पाणी पुरवठा योजना केल्या. १९६४ साली या साखर कारखान्याच्या अनुषंगाने त्यांनी उभारलेल्या एकूण ५९ पाणी पुरवठा योजनांनी अंदाजे ५६,००० एकर शेतीला पाणी पोहचवले. शेतीच्या विकासासाठी पाणी, खत, अवजारे, तांत्रिक ज्ञान, शेतीमालाच्या किमती यांबरोबरच खेड्यातून शेतीवाड्यात जाणाऱ्या पाणंद रस्त्यांची बांधणी आणि दुरुस्ती करण्यावर त्यांनी भर दिला. शेतकऱ्यांना गावातून शेताशिवारात जा-ये करण्यासाठी या पाणंद रस्त्यांची अहोरात्र गरज असते त्या पांदण रस्ते, जोड रस्ते करण्याचा २ लाख रुपये खर्चाचा प्रकल्प साखर कारखान्याच्या वतीने केला. यासाठीच रत्नाप्पा कुंभारांना, शेतकरी राजाचे आर्थिक उन्नयन होण्यात मोलाची कामगिरी बजावणारे देशभक्त म्हणून ओळखले जाते. स्थापनेच्या वेळी रोज १००० टन ऊस गाळण क्षमता असलेला कारखाना ३० सप्टेंबर १९८३ रोजी कर्जमुक्त झाला व तेव्हा तो रोज ५००० टन गाळण क्षमतेचा होता. पुढच्या काळात त्यांनी एक सहकारी बँक व ग्राहक सोसायटीही स्थापन केली, परंतु त्या दोन्ही संस्था नंतर बुडाल्या. रत्नाप्पा कुंभार यांनी स्थापन केलेली सहकारी सूतगिरणी यड्राव येथे सुरू आहे.
१९७२ साली तत्कालीन सहकारमंत्री यशवंतराव मोहिते यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य कापूस एकाधिकार महासंघाची संकल्पना मांडली. रत्नाप्पा कुंभार या महासंघाचे पहिले अध्यक्ष झाले. त्यांनी शेतकऱ्यांंकडून कापूस विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करणाऱ्या जिनिंग फॅक्टऱ्यांचे जाळे उभे केले. विदर्भामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरभराटीचे दिवस आले. पण पुढे काही चुकीच्या धोरणांमुळे ही योजना बुडीत निघाली. १९७५ साली डेक्कन शुगर इन्स्टिट्यूटच्या उभारणीत ते अग्रणी होते.
🏢 *शिक्षण संस्था*
शिक्षण ही एक अखंड जीवनप्रक्रिया आहे.
जीवनातील नव्या अनुभवांचा अर्थ समजावून घेणे व समजावून देणे म्हणजे शिक्षण.
- रत्नाप्पा कुंभार
१९५१ साली कोल्हापूर संस्थान भारतात विलीन झाल्यावर या संस्थानाच्या वतीने चालवले जाणारे शहाजी कायदा महाविद्यालय अनाथ झाले व आर्थिक मदत थांबल्यामुळे अधोगतीस आले होते. रत्नाप्पा कुंभारांनी कॉन्सिल ऑफ एज्युकेशन नामक शिक्षण संस्था १७ फेब्रुवारी १९५१ रोजी स्थापन करून या संस्थेमार्फत शहाजी कायदा महाविद्यालय दत्तक घेतले. ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. १९५७ साली त्यांनी कोल्हापुरात कॉमर्स कॉलेज स्थापन केले. १९८५ साली त्यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कॉमर्स कॉलेजचे नाव देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स असे करण्यात आले. हा कार्यक्रम तेव्हाचे उपराष्ट्रपती रामस्वामी वेंकटरमण यांच्या हस्ते पार पडला. १९६० साली त्यांनी कसबा सांगाव येथे दादासाहेब मगदूम हायस्कूलची स्थापना केली. १९६३ साली त्यांनी कोरोची गावात रत्नदीप हायस्कूल उभारले. दिवसा काम करणाऱ्या मुलांसाठी त्यांनी कोल्हापुरात रात्र महाविद्यालयाची कल्पना मांडून नाइट कॉलेज ऑफ आर्ट्‌स ॲन्ड कॉमर्सची स्थापना १९७१ साली केली.
१९९० साली रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची स्थापना झाली.
📽 *चित्रपट निर्माता*
१९६७ साली निर्माता म्हणुन बाळासाहेब पाटील (सत्त्यवादीकार) यांच्या सह रत्नाप्पा कुंभारांनी सुदर्शन नामक चित्रपट केला. दत्ता माने हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते.
⌛ *निधन*
रत्नाप्पा कुंभार यांचे २३ डिसेंबर १९९८ च्या सकाळी वयाच्या ८६ व्या वर्षी हृदयाघाताने निधन झाले. त्या काळाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात त्यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. रत्नाप्पा कुंभार यांच्या निधनानंतर त्यांनी उभारलेल्या सहकारी साखर कारखान्यास त्यांचे नाव देण्यात आले. आता हा साखर कारखाना देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना मर्यादित या नावाने ओळखला जातो. कोल्हापूरच्या वाणिज्य महाविद्यालयाचेही देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार वाणिज्य महाविद्यालय असे नामांतर झाले.

शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे देशभक्‍त रत्नाप्पा कुंभार यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या निधननंतर त्यांच्या कन्या रजनीताई मगदूम यांनी त्यांच्या राजकीय वारस म्हणून २००४ साली निवडणुक लढविली. पण त्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याकडून पराभूत झाल्यात.

📚 *पुस्तके*

हे कुंभ अमृताचे ( रत्नाप्पा कुंभार यांनी १९६४ ते १९७४ या कालखंडात केलेल्या निवडक ३४ भाषणांचा संग्रह), संपादक: रा. तु. भगत, पाने: २१५, चक्रप्रवर्तन प्रकाशन, (१९७५)
कोल्हापूर संस्थान प्रजा परिषदेतील रत्नाप्पा कुंभार यांचा सहभाग - १९३८ ते १ मार्च १९४९, लेखक: रामलिंग कुंभार, अभिनंदन प्रकाशन.
"कथा एका महा मानवाची"- लोकनेते डॉ. रत्नाप्पा कुंभार यांचे जीवन चरित्र, मूळ कन्नड लेखक- के.बी. होन्नायक, मराठी अनुवाद - सी. एस. कुलकर्णी.

🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *पदमश्री रत्नाप्पा कुंभार यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन*🙏

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९

डाॅक्टर भिमराव आंबेडकर


 🎓📓 भारतरत्न, विश्वरत्न डॉ. भिमराव रामजी आंबेडकर
जन्म : 14 एप्रील 1891  (महू, इंदौर मध्यप्रदेश)
महापरिनिर्वाण : 6 डिसेंबर 1956 ( दिल्ली )
वडिल : रामजी मालोजी सकपाळ
आई  : भीमाबाई मुबारदकर
पहिली पत्नी: रमाबाई आंबेडकर  (1906 - 1935)
दुसरी पत्नी: सविता आंबेडकर   (1948 - 1956)
शिक्षण : एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय
1915 एम.ए. (अर्थशास्त्र)
1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD
1921 मधे मास्टर ऑफ सायन्स
1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स
संघ : समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी,अनुसुचित जाति संघ
राजनितीक विचारधारा: समानता
प्रकाशन: अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन आॅफ कास्ट)
विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं.
“देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला
माणसाला स्वाभिमान शिकवला
ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले
असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.”
डॉ.  भीमराव आंबेडकर  यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले.
भारतीय समाजात जातिपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली. जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्याला पाहाता आंबेडकरांनी दलितांच्या हक्काची लढाई लढली आणि देशातील सामाजिक स्थितीत ब.याच प्रमाणात बदल केला.
💁‍♂ प्रारंभिक जीवन
डाॅक्टर भिमराव आंबेडकर  यांचा जन्म भारतातील मध्यप्रांतात झाला होता. बाबासाहेब 14 एप्रील 1891 ला मध्यप्रदेशातील इंदौर जवळ महु येथे रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई या दाम्पत्यांच्या पोटी जन्माला आले. जेव्हां आंबेडकरांचा जन्म झाला त्यांचे वडिल इंडियन आर्मीत सुभेदार होते आणि त्यांची नेमणुक इंदौर येथे होती.
3 वर्षानंतर 1894 ला त्यांचे वडिल रामजी मालोजी सकपाळ निवृत्त झाले आणि संपुर्ण कुटूंब महाराष्ट्रातील साता-यात स्थानांतरीत झाले. भिमराव आंबेडकर आपल्या आई वडिलांचे 14 वे आणि शेवटचे अपत्य होते. ते आपल्या कुटुंबांतील सर्वात छोटे सदस्य असल्याने सगळयांचे लाडके होते.
डॉ.  भिमराव आंबेडकर महाराष्ट्रातील मराठी परिवाराशी संबधीत होते आणि त्यांचे मुळगांव रत्नागिरी जिल्हयातील अंबवडे हे आहे, महार जातीतील असल्याने त्यांच्या सोबत सामाजिक आणि आर्थिक स्वरूपात मोठा भेदभाव केला जात असे.
इतकेच नाही तर दलित असल्याने उच्च शिक्षण घेण्याकरता देखील त्यांना फार संघर्ष करावा लागला तरीही त्यांनी सगळया कठीण परिस्थीतीवर मात करत उच्च शिक्षण प्राप्त केले आणि जगासमोर स्वतःला सिध्द करून दाखवले.
📖  शिक्षण
बाबासाहेबांचे वडिल आर्मीत असल्याने त्यांना आपल्या मुलांकरता शिक्षणात मिळणा.या विशेषाधिकाराचा फायदा झाला परंतु दलित असल्याने शाळेत देखील जातीगत भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागले त्यांच्या जातीच्या विदयाथ्र्यांना वर्गात बसण्याची, शाळेतील पाणी पिण्याची परवानगी नव्हती. शाळेचा चपराशी त्यांना वरतुन हातावर पाणी टाकुन पिण्यास देत असे, जर चपराशी सुट्टीवर असला तर त्या दिवशी या मुलांना पाणी पिण्यास देखील मिळत नसे. या सर्व अन्यायांना सहन करत देखील बाबासाहेब उच्चविद्याविभुषीत झाले.
बाबासाहेबांनी आपले प्राथमिक शिक्षण दापोलीत घेतले त्यानंतर मुंबईत एलफ्निस्टन हायस्कुल ला प्रवेश घेतला अश्या पध्दतीने शिक्षण घेणारे ते पहिले दलित ठरले. 1907 ला त्यांनी मॅट्रिक ची डिग्री मिळवली.
या वेळी एक दिक्षांत समारोह देखील आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात भीमराव आंबेडकरांच्या प्रतिभेने प्रभावित होउन श्री कृष्णाजी अर्जुन केळुस्कर या शिक्षकांनी त्यांना स्वतः लिहीलेले ’बुध्द चरित्र’ हे पुस्तक भेट स्वरूपात दिले. पुढे बडौदा नरेश सयाजी राव गायकवाड यांची फेलोशिप मिळाल्याने बाबासाहेबांनी आपले पुढचे शिक्षण सुरू ठेवले.
बाबासाहेबांना लहानपणापासुनच अभ्यासाची रूची होती आणि ते एक हुशार आणि कुशाग्र बुध्दीचे विद्यार्थी होते म्हणुन ते आपल्या प्रत्येक परिक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी होत गेले. 1908 ला डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी एलफ्न्सिटन काॅलेज ला प्रवेश घेउन पुन्हा ईतिहास घडवला. उच्च शिक्षणाकरता काॅलेज ला प्रवेश घेणारे ते पहिले दलित होते.
त्यांनी 1912 ला मुंबई विश्वविद्यालयातुन पदवी परिक्षा उत्तिर्ण केली. संस्कृत शिकण्यास विरोध झाल्याने ते फारसी भाषेतुन उत्तीर्ण झाले. या महाविद्यालयातुन त्यांनी अर्थशास्त्र आणि राजनिती विज्ञान या विषयातुन पदवी प्राप्त केली.
*फेलोशिप घेउन अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयात प्रवेश घेतला*
भिमराव आंबेडकरांना बडौदा राज्य सरकारने आपल्या राज्यात रक्षामंत्री बनविले पण येथे देखील जातीभेदाने त्यांची पाठ सोडली नाही आणि त्यांना ब.याचदा अपमानाला सामोरे जावे लागले. त्यांनी बराच काळ या ठिकाणी काम केले नाही कारण त्यांना त्यांच्या अंगभुत प्रतिभेकरता बडौदा राज्य शिष्यवृत्तीने सन्मानित करण्यात आले होते, त्यामुळे त्यांना न्युयाॅर्क येथे कोलंबिया विश्वविद्यालयात उच्चपदवी प्राप्त करण्याची संधी मिळाली. आपल्या शिक्षणाला पुढे सुरू ठेवण्यासाठी 1913 ला ते अमेरिकेत निघुन गेले.
1915 साली आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातुन समाजशास्त्र, इतिहास, दर्शनशास्त्र, मानव विज्ञान या सोबत अर्थशास्त्रातुन एम.ए ची मास्टर डिग्री प्राप्त केली. या नंतर त्यांनी ’प्राचीन भारताचे वाणिज्य’ यावर संशोधन केले. 1916 साली अमेरिकेतील कोलंबिया विश्वविद्यालयातुन आंबेडकर यांनी पीएच.डी प्राप्त केली. त्यांच्या शोध प्रबंधाचा विषय होता ’ब्रिटिश भारतात प्रांतिय वित्त याचे विकेन्द्रीकरण’.
*लंडन स्कुल आॅफ इकोनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटिकल सायन्स – University of London*
फेलोशिप संपल्यानंतर त्यांना भारतात परतावे लागले. ब्रिटन मार्गे ते भारतात परत येत असता स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स यात एम.एस.सी आणि डी.एस.सी व विधि संस्थानात बार.एट.लाॅ करीता त्यांनी आपले रजिस्ट्रेशन केले आणि मग भारतात परतले.
भारतात परतल्यानंतर त्यांनी प्रथम शिष्यवृत्ती च्या नियमानुसार बडौदा येथील राजांच्या दरबारात सैनिक अधिकारी आणि वित्तीय सल्लागाराची जवाबदारी स्विकारली. राज्याचे रक्षा सचिव या रूपात देखील त्यांनी काम केले.
हे काम करणे त्यांच्याकरता मुळीच सोपे नव्हते कारण जातिपातीच्या भेदभावामुळे त्यांना फार त्रास सहन करावा लागत होता इतकेच नव्हें तर संपुर्ण शहरात त्यांना भाडयाने घर देण्यास देखील कुणी तयार नव्हते.
या नंतर भिमराव आंबेडकरांनी  सैन्य मंत्री ही नौकरी सोडली आणि एक खाजगी शिक्षक आणि अकाउंटंट म्हणुन त्यांनी नोकरी पत्करली. येथे ते सल्लागार व्यवसाय देखील करू लागले परंतु इथे देखील अस्पृश्यतेच्या मनोवृत्तीने त्यांचा पिच्छा पुरवला आणि सामाजिक स्थितीमुळे त्यांचा हा व्यवसाय देखील ठप्प पडला.
अखेरीस ते मुंबईला परतले येथे त्यांची मदत मुंबई गव्र्हनमेंट ने केली आणि ते मुंबईतील सिडेनहम काॅलेज आॅफ काॅमर्स अॅण्ड इकाॅनाॅमिक ला राजनैतिक अर्थशास्त्राचे प्रोफेसर बनले. या दरम्यान त्यांनी आपल्या पुढच्या शिक्षणाकरता पैसे जमविले आणि शिक्षण सुरू ठेवण्याकरता 1920 ला पुन्हा एकदा ते भारता बाहेर इंग्लंड ला गेले.
1921 ला त्यांनी लंडन स्कुल आॅफ इकाॅनाॅमिक्स अॅण्ड पाॅलिटीकल सायन्स मधुन मास्टर डिग्री प्राप्त केली आणि दोन वर्षानंतर डी.एस.सी पदवी देखील मिळवली.
डॉ.भिमराव आंबेडकरांनी बाॅन, जर्मनी विश्वविद्यालयात देखील अध्ययनाकरता काही काळ घालवला. 1927 ला त्यांनी अर्थशास्त्रातुन डी.एस.सी केले. न्यायशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी ब्रिटिश बार मध्ये बॅरिस्टर म्हणुन काम केले. 8 जुन 1927 ला त्यांना कोलंबिया विश्वविद्यालयाव्दारे डाॅक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले.
🔮 *अस्पृश्यता आणि जातीगत भेदभाव संपवण्याची लढाई (दलित मुवमेंट)*
भारतात परतल्यानंतर बाबासाहेबांनी जातीपातीच्या भेदभावा विरोधात लढण्याचा निर्णय घेतला ज्यामुळे त्यांना कित्येकदा अपमानाचा, अनादराचा, सामना करावा लागला होता आपल्या जीवनात अतोनात कष्टाला सामोरे जावे लागले होते. आंबेडकरांनी बघीतले की कश्या त-हेने अस्पृश्यता आणि जातीगत भेदभाव सर्वत्र पसरलाय, या मानसिकतेने अधिक उग्र रूप धारण केले होते. आंबेडकरांनी या सर्व गोष्टींना देशाच्या बाहेर घालवण्याला आपले कर्तव्य समजले आणि या विरोधात त्यांनी मोर्चा उघडला.
1919 साली भारत सरकार अधिनियमाच्या तयारी करता दक्षिणबोरो समितीपुढे आंबेडकर म्हणाले की अस्पृश्य आणि अन्य समुदायांकरता वेगळी निवडणुक प्रणाली असायला हवी त्यांनी दलितांकरता व खालच्या जातींकरता आरक्षणाचा हक्क देण्याचा प्रस्ताव देखील ठेवला.
जातीपातीचा भेदभाव संपवण्याकरता, लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवण्याकरता, समाजात पसरलेली किड, मनोवृत्ती समजण्याकरता आंबेडकरांनी शोध सुरू केला. जातीगत भेदभावाला संपविण्याकरीता, अस्पृश्यतेला मिटविण्याकरता डॉ. आंबेडकरांनी ‘बहिष्कृतांच्या हिताकरता सभा’ हा पर्याय शोधला. या संघटनेचा मुख्य उद्देश मागासलेल्या वर्गात शिक्षणाचा आणि सामाजिक, आर्थिक सुधारणा करण्याचा होता.
यानंतर 1920 ला त्यांनी कलकापुर चे महाराजा शाहजी व्दितीय यांच्या मदतीने ‘मुकनायक’ या सामाजिक पत्राची स्थापना केली. आंबेडकरांच्या या भुमिकेने सामाजिक आणि राजनितीक क्षेत्रात खळबळ उडवुन दिली. यानंतर लोकांमधे भीमराव आंबेडकरांची ओळख निर्माण होउ लागली.
डाॅक्टर भीमराव आंबेडकर यांनी न्यायालयीन शिक्षण पुर्ण केल्यानंतर वकिलीचे काम सुरू केले. जातीपातीच्या प्रकरणांमधे भेदभाव करण्याचा आरोप ब्राम्हणांवर लावला आणि कित्येक गैरब्राम्हण नेत्यांकरता न्यायालयीन लढा दिला आणि यश मिळविले. या विजयानंतर त्यांना दलितांच्या उत्थानाकरता लढण्यासाठी आधार गवसला.
1927 दरम्यान डॉ.आंबेडकरांनी अस्पृश्यता मिटवण्याकरता आणि जातिगत भेदभावाला पुर्णतः संपविण्याकरता सक्रीय स्वरूपात काम केले. या करीता हिंसेचा मार्ग न स्विकारता ते महात्मा गांधींच्या पदचिन्हांवर चालले आणि दलितांच्या अधिकाराकरता पुर्णगतिने आंदोलनाला सुरूवात केली.
या दरम्यान दलितांच्या अधिकारांकरता ते लढले. या आंदोलना दरम्यान त्यांनी ही मागणी केली की सार्वजनिक पाण्याचे स्त्रोत सर्वांकरता खुले केले जावे आणि सर्व जातींकरता मंदिरातला प्रवेश खुला करण्यात यावा.
इतकेच नव्हें तर महाराष्ट्रातील नाशिक शहरात असलेल्या काळाराम मंदिरात प्रवेश करतांना हिंदुत्ववाद्यांनी केलेल्या विरोधाचा त्यांनी कडाडुन समाचार घेतला आणि प्रतिकात्मक प्रदर्शन देखील केले.
1932 साली दलितांच्या अधिकारांकरता धर्मयुध्दातील योध्दयाप्रमाणे डॉ. आंबेडकरांची लोकप्रीयता वाढत गेली. लंडन मधल्या गोलमेज सम्मेलनात सहभागी होण्याचे त्यांना आमंत्रण मिळाले. या सम्मेलनात आंबेडकरांनी महात्मा गांधींच्या विचारधारेचा देखील विरोध केला ज्यात त्यांनी वेगळया मतदारांविरोधात आवाज उठविला होता ज्यात दलितांच्या निवडणुकीत सहभागी होण्याची मागणी केली होती.
पण नंतर गांधीजींच्या विचारांची त्यांना उकल झाली त्याला पुना संधि (poona pact) देखील म्हंटल्या जाते. यांच्या मते एका विशेष मतदारा ऐवेजी क्षेत्रीय विधानसभा आणि राज्यातील केंद्रिय परिषदेत दलित वर्गाला आरक्षण देण्यात आले होते.
पुना संधी वर डाॅक्टर भिमराव आंबेडकर आणि ब्राम्हण समाजाचे प्रतिनीधी पंडित मदन मोहन मालवीय यांच्यात सामान्य मतदारांमधे तात्पुरत्या विधानसभांच्या दलित वर्गांकरता जागा आरक्षणासाठी पुना संधी वर स्वाक्षरी देखील करण्यात आली होती.
1935 साली आंबेडकरांना सरकारी लाॅ काॅलेज चे प्रधानाचार्य म्हणुन नियुक्त करण्यात आले. या पदावर त्यांनी 2 वर्ष काम केलं. यामुळे डॉ. आंबेडकर मुंबईत स्थायिक झाले त्यांनी या ठिकाणी मोठे घर बांधले, या घरात त्यांच्या खाजगी पुस्तकालयात 50 हजारांपेक्षा जास्त पुस्तके होती .
🗳 *डाॅक्टर भीमराव आंबेडकर यांचे राजनैतिक करियर*
डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी 1936 ला स्वतंत्र लेबर पार्टी बनवली पुढे 1937 ला केन्द्रिय विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पार्टी ने 15 सीटस् जिंकल्या त्याच वर्षी डॉ. आंबेडकरांनी आपले पुस्तक ’द एनीहिलेशन आॅफ कास्ट’ प्रकाशित केले, ज्यात त्यांनी हिंदू रूढिवादी नेत्यांची आणि देशात प्रचलीत जाती व्यवस्थेची कठोर निंदा केली.
त्यानंतर त्यांनी आणखीन एक पुस्तक प्रकाशित केले ‘Who were the Shudras?’ (शुद्र कोण होते?) ज्यात त्यांनी दलित वर्गाच्या एकसंघ असल्याची व्याख्या केली.
15 आॅगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्याबरोबर डॉ. आंबेडकरांनी आपल्या स्वतंत्र लेबर पार्टी ला अखिल भारतीय अनुसूचीत जाती संघ (आॅल इंडिया शेड्यूल) कास्ट पार्टीत परिवर्तीत केले. डॉ. आंबेडकरांची पार्टी 1946 ला झालेल्या भारताच्या संविधान सभेच्या निवडणुकीत चांगले प्रदर्शन करू शकली नाही.
पुढे काॅंग्रेस आणि महात्मा गांधींनी दलित वर्गाला हरिजन असे नाव दिले ज्यामुळे मागासलेल्या जाती हरिजन या नावाने देखील ओळखल्या जाऊ लागल्या. परंतु आपल्या निश्चयाविषयी दृढ असलेल्या आणि भारतीय समाजातुन अस्पृश्यतेला नेहमीकरता संपव-णाया डॉ. आंबेडकरांना गांधीजींनी दिलेले हरिजन हे नाव अजिबात आवडले नाही आणि या विषयाचा त्यांनी जोरदार विरोध केला.
त्यांचे म्हणणे होते की ’’अस्पृश्य समाजातील लोक देखील आपल्या समाजाचा एक भाग आहेत, आणि ते सुध्दा समाजातील अन्य सदस्यांसारखेच सामान्य माणसं आहेत.
पुढे डाॅक्टर भिमराव आंबेडकरांना व्हाॅइसराय एक्झीकेटीव्ह कौंसिल मधे श्रम मंत्री व रक्षा सल्लागार म्हणुन नियुक्त करण्यात आले. त्याग, संघर्ष, आणि समर्पणाच्या बळावर डॉ. आंबेडकर भारताचे पहिले कायदे मंत्री झाले. दलित असुन देखील डॉ. आंबेडकरांचे मंत्री होणे त्यांच्या जीवनातील मोठया यशापेक्षा कमी नव्हते.
📓 *भीमराव आंबेडकरांनी तयार केले भारतीय संविधान*
डाॅक्टर भिमराव आंबेडकरांचा संविधान निर्मीती मागचा मुख्य उद्देश देशातील जातिपातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट करणे व अस्पृश्यता मुक्त समाजाची निर्मीती करून समाजात क्रांती आणणे हा होता सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार देणे हा होता.
29 आॅगस्ट 1947 ला डॉ. भीमराव आंबेडकरांना संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन नियुक्त करण्यात आले. आंबेडकरांनी समाजातील सर्व वर्गांमधे समांतर पुलाच्या निर्माणावर भर दिला त्यांच्या मते देशातील वेगवेगळया वर्गांमधील अंतर कमी केले नाही तर देशाची एकता टिकवणे कठीण होईल. या व्यतिरीक्त त्यांनी धार्मिक, लिंग आणि जाती समानतेवर देखील विशेष भर दिला.
डॉ.भिमराव आंबेडकर शिक्षण, सरकारी नौक.या, नागरी सेवांमधे अनुसुचीत जाती आणि अनुसूचीत जनजातीतील लोकांकरता आरक्षण सुरू करण्यात विधानसभेचे समर्थन मिळवण्यात यशस्वी राहिले.
• Bharat संविधानाने भारतातील सर्व नागरिकांना धर्माच्या स्वतंत्रतेचा अधिकार दिला.
• अस्पृश्यतेला मुळापासुन नष्ट केले.
• महिलांना अधिकार मिळवुन दिले.
• समाजातील वेगवेगळया वर्गांमधे पसरलेल्या अंतराला संपवल.
डॉ.भिमराव आंबेडकरांनी समता, समानता, बंधुता आणि मानवतेवर आधारित भारतीय संविधानाला जवळजवळ 2 वर्ष 11 महिने आणि 7 दिवसांच्या अथक परिश्रमाने 26 नोव्हेंबर 1949 ला तयार करून तेव्हांचे राष्ट्रपती डॉ. राजेन्द्र प्रसाद यांच्याकडे सुपूर्द करीत देशातील सर्व नागरिकांना राष्ट्रीय एकता, अखंडता आणि व्यक्तीची स्वाभिमानी जीवन पध्दती ने भारतीय संस्कृतीला गौरवान्वित केले.
संविधानाच्या निर्मीतीतील आपल्या भुमिके व्यतिरीक्त त्यांनी भारताच्या वित्त आयोगाच्या स्थापनेत देखील मदत केली, आपल्या नितीमुल्यांच्या माध्यमातुन देशाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत बदलाव करून प्रगती केली शिवाय त्यांनी स्थिर अर्थव्यवस्थेबरोबरच मुक्त अर्थव्यवस्थेवर देखील जोर दिला.
डॉ.बाबासाहेबांनी निरंतर महिलांच्या स्थितीत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. 1951 मधे महिला सशक्तीकरणाचे हिंदू संहिता विधेयक पारीत करण्याचा देखील प्रयत्न केला, याच्या मंजुर न होण्याने त्यांनी स्वतंत्र भारताच्या पहिल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर भीमराव आंबेडकरांनी लोकसभेकरता निवडणुक देखील लढली परंतु यात त्यांना अपयश आले पुढे त्यांना राज्यसभेत नियुक्त करण्यात आले, आपल्या मृत्युपर्यंत ते याचे सदस्य होते.1955 साली त्यांनी आपला ग्रंथ अनेक राज्यांतील भाषांचा विचार करून प्रकाशीत केला. आन्ध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र व प्रबंधन योग्या राज्यांमधे पुर्नगठीत करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पुढे 45 वर्षांनंतर काही प्रदेशांमधे ते साकार झाले.
डॉ.आंबेडकरांनी निर्वाचन आयोग, योजना आयोग, वित्त आयोग, महिला आणि पुरूषांकरता समान नागरी हिंदु संहिता, राज्य पुर्नगठन, मोठया आकाराच्या राज्यांना लहान आकारात संघटीत करणे, राज्याचे निती निर्देश तत्व, मौलिक अधिकार, मानवाधिकार, नियंत्रक आणि महालेखापरिक्षक, निर्वाचन आयुक्त आणि राजनैतिक सरंचना मजबुत करणारी सशक्त, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व विदेशी धोरणं देखील तयार केलीत.
इतकेच नव्हें तर डॉ.आंबेडकर आपल्या जिवनात सतत प्रयत्न करत राहिले व त्यांनी आपल्या कठिण संघर्षाने व प्रयत्नांच्या माध्यमातुन लोकशाही मजबुत करणे, राज्यातील तिन अंगांना (स्वंतत्र न्यायपालिका, कार्यकारी, विधानमंडळ) यांना वेगवेगळं केलं सोबतच समान नागरिक अधिकारा अनुरूप एक व्यक्ति एक मत व एक मुल्य या तत्वाला प्रस्थापीत केले.
विलक्षण प्रतिभेचे धनी डॉ.आंबेडकरांनी न्यायपालिकेत, कार्यकारी व कार्यपालिकेत अनुसुचित जाती आणि जनजातीच्या लोकांचा सहभाग संविधानव्दारे सुनिश्चित केला आणि भविष्यात कोणत्याही प्रकारच्या निवडीत जसे ग्राम पंचायत, जिल्हा पंचायत, पंचायत राज यात सहभागाचा मार्ग प्रशस्त केला.
सहकारी आणि सामुहीक शेती सोबत उपलब्ध जमिनीचे राष्ट्रीयीकरण करून जमिनीवर राज्याचे स्वामित्व स्थापीत करणे व सार्वजनिक प्राथमिक व्यवसाय, बॅकिंग, विमा या उपक्रमांना राज्याच्या नियंत्रणाखाली ठेवण्याकरता जोरदार समर्थन दिले शिवाय शेतक.यांच्या लहान पिकांवर अवलंबुन बेरोजगार मजुरांना रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हाव्यात याकरता त्यांनी औद्योगिकरणा करता सुध्दा बरेच कार्य केले.
⚜ *डाॅ. भिमराव आंबेडकरांचे वैयक्तिक  जीवन*
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला विवाह 1906 साली रमाबाई यांच्यासोबत झाला त्यांना एक मुलगा झाला ज्याचे नाव यशवंत असे होते.
1935 साली रमाबाईंचे दिर्घ आजाराने निधन झाले.
1940 साली भारतीय संविधानाचा मसुदा पुर्ण केल्यानंतर डॉ. आंबेडकरांना देखील अनेक आजारांनी ग्रासले होते ज्यामुळे त्यांना रात्री झोप येत नसे, नेहमी पाय दुखायचे, मधुमेहाची समस्या फार वाढल्याने त्यांना इन्सुलिन घ्यावे लागायचे.
उपचारांकरता ते मुंबईला गेले तेव्हां पहिल्यांदा त्यांची भेट एक ब्राम्हण समाजाच्या डाॅक्टर शारदा कबीर यांच्याशी झाली. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला व 1948 ला दोघेही विवाहबंधनात अडकले. लग्नानंतर डॉ. शारदा यांनी आपले नाव बदलुन सविता आंबेडकर असे ठेवले.

🔯 *डाॅक्टर भीमराव आंबेडकरांनी स्विकारला बौध्द धर्म*
1950 साली भीमराव आंबेडकर एका बौध्द सम्मेलनात सहभागी होण्यासाठी श्रीलंकेला गेले तेथे जाऊन ते बौध्द धर्मातील विचारांनी एवढे प्रभावित झाले की त्यांनी बौध्द धर्म स्विकारण्याचा निर्णय घेतला व त्यांनी स्वतःला बौध्द धर्मात रूपांतरीत केले. यानंतर ते भारतात परतले.
भारतात परतल्यानंतर बौध्द धर्माविषयी त्यांनी बरीच पुस्तकं लिहीली. ते हिंदु धर्मातील चाली रितींच्या विरोधात होते व जाती विभाजनाची कठोर शब्दांमधे त्यांनी निंदा देखील केली आहे.
1955 ला डॉ.आंबेडकरांनी भारतीय बौध्द महासभेची स्थापना केली. त्यांचे पुस्तक ’द बुध्या आणि त्यांचे धर्म’ त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले.
14 आॅक्टोबर 1956 ला डॉ.भिमराव आंबेडकर यांनी एका सभेचे आयोजन केले त्यात त्यांनी आपल्या जवळपास 5 लाख अनुयायांना बौध्द धर्माची दिक्षा दिली. नंतर ते काठमांडू मधे आयोजित चैथ्या वल्र्ड बुध्दिस्ट काॅन्फरन्स मधे सहभागी झाले. 2 डिसेंबर 1956 ला त्यांनी आपल्या शेवटच्या पांडुलिपी ’द बुध्या आणि काल्र्स माक्र्स’ या पुस्तकास पुर्ण केले.
⏳ *डॉ.भिमराव आंबेडकरांचा मृत्यु*
डॉ.आंबेडकर 1954 - 1955 या वर्षांमधे आपल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे फार चिंतीत होते. मधुमेह, अस्पष्ट झालेली दृष्टी , यांसारख्या अनेक आजारांमुळे त्यांची तब्येत खालावत गेली. दिर्घ आजारामुळे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील आपल्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौध्द धर्म स्विकारल्यामुळे त्या धर्माप्रमाणेच त्यांच्यावर अंतीम संस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतीमदर्शनाकरता व अंत्ययात्रेत सहभागी होण्याकरता प्रचंड प्रमाणात जनसागर उसळला होता.
🎂 *डॉ.भिमराव आंबेडकर जयंती*
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता केलेले कार्य, समाजात दिलेले योगदान, आणि त्यांच्या सन्मानाकरता त्यांच्या स्मारकाची निर्मीती करण्यात आली त्यांच्या जन्मदिनाला 14 एप्रील ला आंबेडकर जयंती च्या रूपात साजरे केले जाते. त्यांच्या जन्मदिनाला नॅशनल हाॅलिडे घोषीत करण्यात आले, या दिवशी सर्व खाजगी, सरकारी शैक्षणिक संस्थांना सुट्ठी असते. 14 एप्रील ला साज.या होणा.या आंबेडकर जयंतीला भिम जयंती देखील म्हणतात. देशाला दिलेल्या अमुल्य योगदानाकरता आज त्यांचे स्मरण केले जाते.
🏵 *डॉ.भिमराव आंबेडकरांचे योगदान*

भारतरत्न डाॅक्टर भिमराव आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या 65 वर्षांत देशाला सामाजिक , आर्थिक, राजनितीक, शैक्षणिक, धार्मिक, ऐतिहासीक, सांस्कृतिक, साहित्यीक, औद्योगिक, संवैधानिक सह वेगवेगळया क्षेत्रात अनेक कामं करून राष्ट्राच्या निर्माणात अमुल्य योगदान दिले.
📚 *डॉ. भिमराव आंबेडकरांची पुस्तके*
पहिला प्रकाशित लेख: भारतातील जाती: त्यांची प्रणाली, उत्पत्ती आणि विकास (Castes in India : Their Mechanism, Genesis and Development)
ईव्होल्युशन आॅफ प्रोव्हिन्शिअल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया
जातीचा विनाश (Annihilation of Caste)
हु वर द शुद्राज (Who were the Shudras?)
द अन्टचेबल्स: ए थीसिस आॅन द ओरिजन आॅफ अनटचेबिलिटी (The Untouchables : Who were They and why they became untouchables)
थाॅटस् आॅन पाकिस्तान (Thoughts on Pakistan)
द बुध्द अॅण्ड हिज धम्म (The Buddha and His Dhamma)
बुध्द या कार्ल माक्र्स (Buddha Or Karl Marx)
🗽 *मरणोत्तर सन्मान*
*डॉ. भीमराव आंबेडकरांचे स्मारक दिल्ली स्थित त्यांच्या घरी 26 अलीपुर रोड ला स्थापीत करण्यात आले आहे.*
आंबेडकर जयंतीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.
1990 ला त्यांना मरणोत्तर भारतरत्न या भारताच्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलं आहे.
अनेक सार्वजनिक संस्थानांची नावे त्यांच्या सन्मानार्थ त्यांच्या नावाने ठेवण्यात आली आहे.
जसे आंध्रप्रदेशातील हैद्राबाद येथे डॉ.आंबेडकर मुक्त विश्वविद्यालय, बी.आर. आंबेडकर बिहार विश्वविद्यालय मुजफ्फरपुर.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा नागपुर येथे आहे ज्याचे पुर्वीचे नाव सोनेगांव विमानतळ असे होते.
आंबेडकरांचे एक भव्य आधिकारीक चित्र भारतीय संसद भवन मधे लावण्यात आले आहे.
डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी निगडीत काही विशेष तथ्य, ज्यांच्याबद्दल कदाचितच आपल्याला माहिती असेल – Facts about Ambedkar
भिमराव आंबेडकर आपल्या आईवडिलांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते.
डॉ. आंबेडकरांचे खरे आडनाव अंबावडेकर होते पण त्यांचे शिक्षक महादेव अंबेडकर ज्यांच्या मनात भिमरावांबद्दल एक विशेष स्थान होते त्यांनी शाळेच्या रेकाॅर्डवर त्यांचे नाव अंबावडेकर चे आंबेडकर असे केले.
बाबासाहेब मुंबई येथील गव्र्हमेंट लाॅ काॅलेजला दोन वर्ष प्रिंसीपल म्हणुन कार्यरत होते.
डॉ. भिमराव आंबेडकर यांचा विवाह 1906 ला 9 वर्षांच्या रमाबाईंसोबत लावण्यात आला आणि 1908 ला ते एलफिन्सटन काॅलेज मधे प्रवेश घेणारे पहिले दलित विद्यार्थी ठरले.
डाॅ. भिमराव आंबेडकर यांना एकुण 9 भाषा येत होत्या वयाच्या 21 व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व धर्माचा अभ्यास देखील केला होता.
आंबेडकरांजवळ एकुण 32 पदव्या होत्या , विदेशात जाऊन अर्थशास्त्रात च्भ्क् करणारे ते पहिले भारतीय बनले. नोबेल पारितोषीक विजेते अमत्र्य सेन अर्थशास्त्रात आंबेडकरांना आपले वडिल मानत.
डॉ.आंबेडकर व्यवसायाने वकिल होते. 2 वर्ष मुंबई येथील लाॅ काॅलेजला त्यांनी प्रिंसीपल पद देखील भुषवलं.
डॉ.भिमराव आंबेडकर भारतीय संविधानातील कलम 370 ( ही कलम जम्मु आणि कश्मिर ला विशेष दर्जा देते ) विरोधात होते.
बाबासाहेब विदेशात जाऊन अर्थशास्त्रात ’डाॅक्टरेट’ पदवी मिळवीणारे पहिले भारतीय होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमात्र भारतीय आहेत ज्यांचे चित्र लंडन च्या संग्रहालयात कार्ल माक्र्स यांच्या सोबत लावण्यात आले आहे.
भारतीय तिरंग्यात अशोकचक्राला स्थान देण्याचे श्रेय देखील डॉ. आंबेडकरांना आहे.
बी. आर. आंबेडकर Labor Member of the Viceroy’s Executive Council चे सदस्य होते आणि त्यांच्यामुळेच कारखान्यांमधे कमीत कमी 12.14 तास काम करण्याचा नियम बदलुन फक्त 8 तास करण्यात आला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मजदुर महिलांकरता सहाय्यक Maternity Benefit for women Labor , Women labor welfare fund , Women and child , Labor Protection Act सारखे कायदे बनविले.
उत्तम विकासाच्या दृष्टीने 50 च्या दशकातच बाबासाहेबांनी मध्यप्रदेश आणि बिहार विभाजनाचा प्रस्ताव ठेवला होता परंतु 2000 साली याचे विभाजन करून छत्तीसगढ व झारखण्ड बांधले गेले.
बाबासाहेबांना पुस्तके वाचण्याची फार आवड होती. त्यांची व्यक्तिगत लायब्ररी जगातील सर्वात मोठी खाजगी लायब्ररी होती ज्यात 50 हजार पुस्तके होती.
डॉ. आंबेडकर शेवटच्या काही वर्षांमधे मोठयाप्रमाणात मधुमेहाने ग्रस्त होते.
भीमराव आंबेडकरांनी हिंदु धर्म सोडतांना 22 वचनं दिली होती ज्यात ते म्हणाले होते की, ज्या राम आणि कृष्णाला देवाचा अवतार मानले जाते मी त्यांची कधीही पुजा करणार नाही.
1956 ला आंबेडकरांनी स्वतःचे धर्मपरिवर्तन करून बौध्द धर्म स्विकारला. ते हिंदु धर्मातील रूढी परंपरां व जातिय विभाजनाच्या विरोधात होते.
बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वेळा लोकसभा निवडणुक लढली आणि दोनही वेळा ते हरले होते.
डाॅक्टर भिमराव आंबेडकर यांना समाजाकरता केलेल्या असंख्य आणि अमुल्य अश्या योगदानाकरता कायम स्मरणात ठेवले जाईल. ते दलितांकरता आणि अस्पृश्यांकरता त्या वेळेस लढले ज्यावेळेस दलितांना अस्पृश्य समजुन अपमानीत केल्या जात होते. स्वतः दलित असल्याने देखील त्यांना ब-याचदा अपमानाला आणि अनादरला सामोरे जावे लागले परंतु त्यांनी कधीही हिम्मत हारली नाही, खचुन गेले नाहीत विपरीत परिस्थीतीत त्यांनी स्वतःला आणखीन मजबुत केले आणि सामाजिक व आर्थिक रूपाने देशाच्या प्रगतीत आपले महत्वपुर्ण योगदान दिले. या योगदानाला कधीही विसरता येणार नाही.
*एक दृष्टीक्षेप बाबासाहेब आंबेडकर यांच्या थोडक्यात महत्वपुर्ण माहिती*
1920 ला ’मुकनायक’ हे वृत्तपत्र सुरू करून त्यांनी अस्पृश्यांच्या सामाजिक आणि राजकिय युध्दाला सुरूवात केली.
1920 ला कोल्हापुर संस्थानातील माणगाव येथे झालेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेत त्यांनी सहभाग घेतला.
1924 ला त्यांनी ’बहिष्कृत हितकारणी सभे’ची स्थापना केली. दलित समाजात जागृती पसरवण्याचा या
1927 मधे ’बहिष्कृत भारत’नावाचे पाक्षिक सुरू केले.
1927 ला महाड या गावी चवदार पाण्याकरता सत्याग्रह करून येथील चवदार तलाव अस्पृश्यांना पिण्याकरता खुला करून दिला.
1927 साली जातिव्यवस्थेचा पुरस्कार करणा.या ’मनुस्मृती’ चे त्यांनी दहन केले.
1928 ला गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज मधे त्यांनी प्राध्यापक म्हणुन काम केले.
1930 साली नाशिक येथील ’काळाराम मंदिरात ’अस्पृश्यांना प्रवेश देण्याकरता त्यांनी सत्याग्रह केला.
1930 ते 1932 या काळात इंग्लंड येथे झालेल्या गोलमेज परिषदेला ते अस्पृश्यांचे प्रतिनीधी बनुन उपस्थित राहिले त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांकरता स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली. 1932 ला इंग्लंड चे पंतप्रधान रॅम्स मॅक्डोनाल्ड यांनी ’जातीय निर्णय’ जाहिर करून आंबेडकरांची मागणी मान्य केली.
जातिय निर्णयाकरता महात्मा गांधीजींचा विरोध होता. स्वतंत्र मतदार संघाच्या निर्मीतीमुळे अस्पृश्य समाज इतर हिंदु समाजापासुन दुर होईल असे त्यांना वाटायचे. म्हणुन जाती निवड तरतुदी विरोधात गांधीजींनी येरवडा (पुणे) जेल मधे प्राणांतिक उपोषणास सुरूवात केली. पुढे त्या अनुषंगाने महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यात 25 डिसेंबर 1932 ला एक करार झाला. हा करार ‘पुणे करार’ या नावाने ओळखला जातो. या करारानुसार डॉ. आंबेडकरांनी स्वतंत्र मतदार संघाचा हट्ट सोडावा आणि अस्पृश्यांकरता कंपनी कायद्यात आरक्षीत सीट्स असावयास हव्यात असे मान्य झाले.
1935 ला डॉ. आंबेडकरांना मुंबई च्या गव्हर्नमेंट लाॅ काॅलेज येथे शिक्षक म्हणुन निवडले गेले.
1936 ला सामाजिक सुधारणांकरता राजकिय आधार असावयास हवा म्हणुन त्यांनी ’इंडिपेंडंट लेबर पार्टी’ स्थापना केली.
1942 ला ’शेड्युल्ट कास्ट फेडरेशन’ या नावाच्या पक्षाची स्थापना केली.
1942 ते 1946 या काळात त्यांनी गव्हर्नर जनरल यांच्या कार्यकारी मंडळात ’श्रम मंत्री’ बनुन कार्य केले.
1946 ला ’पिपल्स एज्युकेशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणुन काम केले. त्यांनी अत्यंत कठोर परिश्रम घेत भारतीय राज्य घटनेचा मसुदा तयार केला. भारतीय राज्य घटना बनविण्यात योगदान दिले म्हणुन’भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार’ या शब्दांनी त्यांचा यथोचित गौरव करण्यात येतो.
स्वातंत्र्या नंतर पहिल्या मंत्री मंडळात त्यांनी कायदे मंत्री म्हणुन कार्य केले.
1956 ला नागपुर येथील ऐतिहासीक कार्यक्रमात आपल्या 5 लाख अनुयायांसोबत त्यांनी बौध्द धर्माची दिक्षा घेतली.
एकंदरीत त्यांचे जीवन पाहाता निश्चितच ही ओळ त्यांच्यावर संपुर्णतः योग्य ठरते . . . . .
“आयुष्य मोठे असण्यापेक्षा महान असावयास हवे”
        ☸ *जयभिम* ☸
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
   ♾♾♾स्त्रोत ~संकलन 


आगामी झालेले