अभ्यास....रजा नियम..... Leave Rules in Maharashtra (EL & CL)
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
प्रश्न-दिवाळी च्या किंवा मे महिन्याच्या दीर्घ सुट्टीनंतर शाळा सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी जर कर्मचाऱ्याने सुटी घेतली तर कर्मचाऱ्याला रजा घेता येते का? किती दिवसांची रजा घेता येते? ती रजा कोणत्या स्वरूपाची होईल?उत्तर-
१) दिवाळीची दीर्घ सुटी/मे महिन्याची दीर्घ सुटी/गणपती ची सुटी या सुटी ला जोडून कर्मचाऱ्याला रजा घेता येते.
२) किती दिवसांची रजा घेता येते व रजा कोणत्या स्वरूपाची होईल?
उत्तर - सार्वजनिक सुटीला जोडून घेतलेल्या किरकोळ रजेचा एकूण कालावधी 7 दिवसापेक्षा जास्त होता कामा नये. म्हणजे....
तुम्ही कोणत्याही सार्वजनिक सुटी / दिर्घ सुटी/ रविवार यांना जोडून किरकोळ रजा घेत असाल तर त्याचा एकूण कालावधी 7 दिवसांपेक्षा जास्त होता कामा नये. जर 7 दिवसांपेक्षा जास्त होत असेल तर सुटीला जोडून किरकोळ रजा मंजूर न होता कमीत कमी 3 दिवसांची अर्जित रजा मंजूर होते.
उदा●
बऱ्याच वेळा गणपती/दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुटीनंतर पहिल्या दिवशी बरेच कर्मचारी कार्यालयात अनेक कारणाने अनुपस्थित राहतात...
मग त्यांची कोणती रजा गणली जाईल? तर याचे साधे सोपे उत्तर की एकूण सार्वजनिक किंवा दीर्घ सुटी यांचा कालावधी 7 दिवसांपेक्षा जास्त आहे. व नियमानुसार रविवार, सार्वजनिक सुटी/ दिर्घ सुटी/ व जोडून घेतलेल्या किरकोळ रजा यांचा एकूण कालावधी सात दिवसांपेक्षा जास्त होत असेल तर त्याला जोडून किरकोळ रजा घेता येत नाही नाही. म्हणजेच एक दिवसांची किरकोळ रजा मंजूर न होता कमीत कमी 3 दिवसांची अर्जित रजा मंजूर होईल त्यामुळे जर कर्मचारी गणपती / दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुटीनंतर 1 दिवसाची किरकोळ रजा घेत असेल तर मुख्याध्यापक किरकोळ रजा मंजूर न करता 3 दिवसाची अर्जित रजाच मंजूर करतील व जरी 1 दिवसांची रजा घेऊन तुम्ही कार्यालयात उपस्थित राहिलात तरी मुख्याध्यापक तुम्हाला साहिसाठी मस्टर 3 दिवसांच्या अर्जित रजेनंतरच 3 दिवसांची अर्जित रजा लावूनच देतील व त्या दिवसात तुम्ही शाळेत उपस्थित जरी राहिलात तरी सही करू शकणार नाहीत व तुमची 3 दिवसांची अर्जित रजा लागेल.
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
शासन निर्णयासाहित स्पष्टीकरण
✍️✍️✍️✍️✍️✍️✍️
सुट्टीला जोडून किरकोळ रजेचा लाभ
शासन निर्णय/परिपत्रक क्रमांक-
क्रमांक अमाशा-४१८२-३७०४८-क
शिक्षण संचालनालय, पुणे ९
दि. १७/१२/१९८२ व
शासन निर्णय/ परिपत्रक क्रमांक
महाराष्ट्र शासन
वित्त विभाग, निर्णय क्रमांक : एलव्हीई १४८२/तीआर-९० एईआर-९, मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक २४ मार्च १९८२
नुसार
प्रति,
सर्व जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दक्षिण, उत्तर व पश्चिम विभाग,
सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक,
विषय - महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवाशती) नियम १९८१ (नियम क्र. १६ (५) व (६) ला दुरूस्ती)
महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी (सेवाशर्ती) नियम १९८१ मधील खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना किरकोळ रजा मंजूर करण्याबाबतच्या नियम क्र. १६ (५) व (६) ला खालीलप्रमाणे दुरुस्त्या करण्यास शासनाने तत्त्वतः मान्यता दिलेली असून सदर नियम - संहितेत या दुरूस्त्या करण्याबाबतची कार्यवाही वेगळी चालू आहे. या दुरुस्त्या ८२-८३ या शैक्षणिक वर्षाच्या दुसऱ्या सत्रापासून अंमलात आणण्याचे शासनाने ठरविले असून त्यानुसार खाजगी शाळांतील कर्मचाऱ्यांना खालील दुरूस्त नियमानुसार किरकोळ रजा १९८२-८३ या शालेय वर्षाच्या दुसऱ्या सत्रापासून मंजूर करण्याबाबत योग्य त्या सूचना आपल्या जिल्ह्यातील, विभागातील सर्व खाजगी शाळांच्या चालकांना व मुख्याध्यापकांना त्वरीत निर्गमित कराव्यात.
16(5): Any number of Sundays and/or holidays can be prefixed and/or suffixed to casual leave. Similarly a holiday or a series of holidays can be interposed between the period of casual leave.
16(6): However the total period of casual leave and holidays enjoyed in continuation at one time should not exceed 7 days, only in exceptional cases, when it may be extended upto ten days.
सदर परिपत्रकाची प्रत आपल्या जिल्ह्यातील नगरपालिका शिक्षण मंडळांनाही त्यांच्या कक्षेतील खाजगी प्राथमिक शाळांतील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत योग्य त्या सूचना निर्गमित करण्याकरिता पाठवावी.
सही
व. वा. वाघचौरे
वरील नियमांचा मराठीत गोषवारा -
(शिक्षण संचालकांकरिता)
१६ (५): कितीही रविवार आणि/किंवा कितीही सुट्ट्या किरकोळ रजेला जोडून घेता येतात. त्याचप्रमाणे किरकोळ रजेमध्ये एक किंवा कितीही सुट्ट्या आल्या तरी चालतील.
१६ (६) : तथापी किरकोळ रजा व त्यात येणाऱ्या सुट्ट्या यांची एकूण संख्या एकावेळी ७ दिवसांचे वर असता कामा नये; परंतु विशेष प्रसंगी ती संख्या १० दिवसांपर्यंत वाढविता येईल.
-–-------------
शासन निर्णय/पतीपत्रक क्र#2
महाराष्ट्र शासन, वित्त विभाग,
निर्णय क्रमांक : एलव्हीई १४८२/तीआर-९०/एईआर-९, मंत्रालय, मुंबई-४०००३२, दिनांक २४ मार्च १९८२
विषय - नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्यासंबंधात
📖शासन निर्णय
शासन निर्णय, वित्त विभाग क्र. स्वष्टीई १४८१/सीआर-२७४/एवईआर-९. दिनांक २० मार्च १९८१ अन्वये, नैमित्तिक रणेच्या मागे आणि/किंवा पुढे कितीही रविवार आणि/किंवा सार्वजनिक सुट्ट्या जोडून घेण्याची तसेष नैमित्तिक रणांच्यामध्ये येणा-या एक किंवा अधिक सुट्ट्या नैमित्तिक रजांना जोडून घेण्याची जी परवानगी दिलेली होती ती आता कायम स्वस्मांत पातु ठेवण्याचा शासन आदेश देत आहे. तथापी, एकावेळेस नैमित्तिक रजा व सुदत्या मिळून होणारा एकूण कालावधी सात दिवसांहून अधिक होता कामा नये व अपवादात्मक परिस्थितीत केवळ ही मर्यादा दहा दिवसांपर्यंत वाढवून देण्याबाबतची पूर्वीधी शर्त तशीच कायम राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
व्य. दे.पानसे,
शासनाचे उप सचिव
या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.
📝RESOLUTION
Government is pleased to direct that the permission to prefix and/or suffix any number of Sundays and/or public holidays casual leave and to interposes holiday or a series of holiday. between the periods of casual leave granted under Government Resolution, Finance Department, No. LVE 1481/CR-274/SER-9, dated the 20th March 1981, should be continued on permanent basis. However, the existing condition that the total period of casual leave and holidays enjoyed in continuation at one time should not exceed seven days, save only in exceptional circumstances when it may be extended up to 10 days, will continue as before.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
V.D.PANSE, Deputy Secretary to Government.
त्यामुळे.कर्मचाऱ्याची.किरकोळ.रजा.मंजूर.होणार.नाही.
कर्मचाऱ्यांची.अर्जित.रजा.मंजूर.होईल.
प्रश्न-अर्जित रजा किती दिवसांची मंजूर होईल?
उत्तर -अर्जित रजा किंवा वैद्यकीय रजा मंजूर करणेबाबत
शासन परिपत्रक क्रमांक - 201601111124148407
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक : समय-१०.०१/प्र.क्र.१६/२००१/१८ (र. व का.),
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : १ जून, २००५,
📝परिपत्रक
कर्मचा-यांमध्ये नैमित्तिक रजा खर्च करुन टाकण्याची व नैमित्तिक रजा शिल्लक नसल्यामुळे अल्पकालावधीसाठी अर्जित रजा मागण्याची प्रवृत्ती वावत चालल्याचे निदर्शनास आल्यामुळे शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक-आस्था-१०९६/प्र.क्र.१२७/९६/१९, दि.२५ ऑक्टोबर, १९९६ अन्वये कमीत कमी पाच दिवसांची परिवर्तित / अर्जित रजेची मागणी असेल तरच रंजा मंजूर करण्याचा विचार करण्यात येईल असे ठरविण्यात आले होते. तथापि, अल्प कालावधीसाठी विशिष्ट कारणांकरिता रजा आवश्यक असताना नाईलाजास्तव अधिकारी / कर्मया-यांन किमान पाच दिवसाची अर्जित रजा / परिवर्तित रजा येणे भाग पडत होते हे विचारात घेऊन तसेच कर्मचा-यांच्या विनंतीचा विचार करुन असा निर्णय घेण्यात आला आहे की, जर अशी रजा संयुक्तिक कारणासाठीच घेतली माहे असे आस्थापना अधिका-यांचे समाधान झाल्यास तीन दिवसांची अर्जित रजा अथवा परिवर्तित रजा मंजूर करण्यायाबा विचार करण्यात यावा.
मंत्रालयातील सर्व विभागांतील आस्थापना शाखांस कळविण्यात येते की, त्यांनी त्यांच्या विभागातर अधिकारी / कर्मचा-यांस तीन दिवसांची अर्जित / परिवर्तित रजा मंजूर करताना सदर परिपत्रकातील सूचनाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच सदर परिपत्रक त्यांच्या अधिपत्याखालील सर्व विभाग प्रमुख य कार्याल मुख यांच्या निदर्शनास आणावे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
संजय उबाळे
*सचिव*
या परिपत्रकानुसार अर्जित रजा कमीत कमी 3 दिवसाची मंजूर होईल
🫂जनहितार्थ जारी🫂
🇮🇳जय हिंद🇮🇳