नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले ब्लॉग वर हार्दिक स्वागत 💐💐..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत ... सुस्वागतम.... ����������������

रविवार, २ नोव्हेंबर, २०२५

तुळशी विवाह Tulasi Vivah


तुळशी विवाह
तुळशी विवाह हा विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव आहे.
कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे. कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस ही दिवाळी असते. कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधिनी एकादशी होय. अशी श्रद्धा आहे की, या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो. विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एकतंत्राने करण्याची रूढी आहे.
महत्त्व
हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे.तुळस ही भारताच्या सर्व प्रांतांत व सर्व भागांत उगवणारी वनस्पती आहे. बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर किंवा घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असते. विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौणिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात, पण मुख्यत: द्वादशीला करतात. तुलसी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचे फल मिळते असे मानले जाते.
तुळशी विवाह हा भगवान विष्णू आणि तुळशीचे लग्न आहे, जो कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीनंतर साजरा केला जातो. यामागे दोन मुख्य कारणे आहेत: एक पौराणिक कथा आणि दुसरे आध्यात्मिक महत्त्व. पौराणिक कथेनुसार, वृंदा नावाच्या एका स्त्रीने विष्णूंना शाप दिला होता आणि नंतर विष्णूंनी तिला वचन दिले की ते शालिग्राम रूपात तुळशीशी लग्न करतील. आध्यात्मिकदृष्ट्या, हा विवाह चातुर्मासाच्या समाप्तीनंतर होतो, जेव्हा भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात. यामुळे शुभ कार्यांची सुरुवात होते आणि वैवाहिक जीवनात प्रेम वाढते असे मानले जाते.

पौराणिक कथा
वृंदा नावाच्या स्त्रीने विष्णूंना शाप दिला होता, ज्याच्या परिणामामुळे ती एका तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित झाली. वृंदाने विष्णूंना वचन दिले होते की ती दरवर्षी कार्तिक महिन्यातील द्वादशीला लग्न करेल. या वचनाचे पालन करण्यासाठी, विष्णू शालिग्राम रूपात तुळशीसोबत लग्न करतात.

आध्यात्मिक महत्त्व -
शुभ कार्यांची सुरुवात: चातुर्मासाच्या समाप्तीनंतर, भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात आणि शुभ कार्यांची सुरुवात होते.
वैवाहिक जीवनात प्रेम: 
या विवामुळे वैवाहिक जीवनात प्रेम वाढते आणि कुटुंबात सुसंवाद येतो असे मानले जाते.
वैवाहिक दोष निवारण:
 तुळशी विवाह केल्याने कुंडलीतील विवाह संबंधित दोष दूर होतात असे मानले जाते.
धार्मिक महत्त्व:
 तुळस हे लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि तुळशीचे लग्न विष्णूशी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते.
• चतुर्मासाची सांगता: प्रबोधिनी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात आणि चतुर्मास संपतो.
• लग्नसराईची सुरुवात: तुळशी विवाहानंतर हिंदू धर्मातील शुभ कार्यांना व लग्नसराईला सुरुवात होते, अशी मान्यता आहे.
• पौराणिक संदर्भ: वृंदा (तुळस) हिच्या भक्तीचा व पावित्र्याचा सन्मान राखण्यासाठी भगवान विष्णूंनी तिच्याशी विवाह केल्याची आणि शाळिग्राम रूपात तिच्यासोबत राहण्याचे वरदान दिल्याची कथा प्रचलित आहे.
• वृंदावन सजावट: तुळशी वृंदावन किंवा कुंडी सजवून त्यावर गेरू-चुन्याने 'बोर चिंच आवळा, कृष्णदेव सावळा' असे लिहिले जाते.
• मंडप व पूजा: तुळशीला हळद-तेल लावून स्नान घातले जाते, नवीन वस्त्र नेसवले जाते आणि उसाच्या ढ्याची खोपटी (मांडव) उभारली जाते.
• मंगलाष्टके: तुळस आणि शाळिग्राम/बाळकृष्ण यांच्यामध्ये अंतरपाट धरून मंगलाष्टके म्हटली जातात, कन्यादान केले जाते आणि बोर, चिंच, आवळा, ऊस व शेंगदाण्याचा प्रसाद वाटला जातो.
📙आख्यायिका - कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता. त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नांव किशोरी होते. तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षरी विष्णू मंत्र सांगितला त्या मंत्राचा जप करावा, तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली.
एकदा एक गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने स्त्री वेष घेऊन त्या माळिणीबरोबर तो किशोरीकडे आला. ती माळीण म्हणाली, ही माझी मुलगी आहे. फुलांची रचना करण्यात तरबेज आहे. तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल. गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला. कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता. तो सूर्याची खूप उपासना करायचा. सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितले की, तू किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. मुकुंद सूर्याला म्हणाला, तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल. किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईन. सूर्याने किशोरीच्या वडलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कनक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडले. कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली. गंध्याला हे सर्व कळले. तो खूप दुःखी झाला, व त्याने ठरवले की, लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याच वेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरीही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्याच क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला. नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला. तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले.
तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे. तुळसी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो. यानिमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते.
मथुरा , वृंदावन या भागात विवाह सोहळ्यासारखे आयोजन केले जाते . काही ठिकाणी मेंदीची पद्धती पण पूर्ण केली जाते . घरोघरी आणि मंदिरात तुळशीचे रोप आणि कृष्ण यांची विशेष सजावट केली जाते .
उत्तराखंड येथे महिला घरच्या अंगणात गेरूने आणि तांदळाच्या पीठाने तुलसी वृंदावनाची सजावट करतात . तुळशीच्या रोपाला लाल वस्त्र अर्पण केले जाते . गोड पदार्थ आणि भाजी यांचा नैवेद्य दाखविला जातो .पारंपरिक लोकगीते गौण विवाह संपन्न होतो .
पंजाब भागात लाल रांगांचे वस्त्र , बांगड्या , मेंदी असा शृंगार तुळशीला अर्पण केला जातो .विवाहवेदीच्या चार बाजूंनी ऊस बांधून मंडप तयार केला जातो . रताळे , आवळा , शिंगाडा , गूळ यांनी तयार केलेले पदार्थ पूजेनंतर अर्पण केले जातात .
बिहार प्रांतात या औचित्याने छप्पन प्रकारचे नैवेद्य तयार करून ते कृष्णाला आणि तुळशीला अर्पण केले जातात .भगवान कृष्ण यांना जागे करण्यासाठी पारंपरिक लोकगीते गायली जातात तसेच विवाहाची गाणीसुद्धा गायली जातात.
दक्षिण भारतात याला तुलसी कल्याणम् असे म्हटले जाते . तुळशीच्या शेजारी आवळ्याची फांदी लावली जाते,याला विष्णूचे प्रतीक मानतात . मातीच्या पणत्या प्रज्वलित करून सर्वत्र दीपोत्सव केला जातो 

आगामी झालेले