नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बुधवार, २६ फेब्रुवारी, २०२०

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

*कोटी कोटी प्रणाम !* 🙏🙏
*क्रांतीकारकांचे कुलपुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज दिनांकानुसार स्मृतीदिन !*
*राष्ट्रात केवळ हुतात्मे नकोत, विजयी वीर हवेत !* 🚩🚩
‘ज्या राष्ट्रात प्रसंगी हुतात्मे निपजत नाहीत, ते राष्ट्र आधीच मेलेले असते. जे राष्ट्र केवळ हुतात्म्यांवर समाधान मानून विजयी वीर निर्माण करण्याकडे दुर्लक्ष करते, ते राष्ट्रही मृतप्रायच रहाते. आमच्या पिढीने राष्ट्रास हुतात्म्याच्या पायरीवर आणले. तुमच्या पिढीने आता वीर बनून विजयाच्या पायरीवर चढले पाहिजे.’
*- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (१९३८)*

*महान क्रांतिकारक, उत्कट देशभक्त, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक*
 🚩स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर 🤽🏻‍
जन्म : २८ मे १८८३ ( भगूर,नाशिक )
मृत्यू : २६ फेब्रुवारी १९६६ ( दादर, मुंबई )
वडिल - दामोदर सावरकर
आई - राधा सावरकर
पत्नी - यमुनाबाई विनायक सावरकर

      उत्कट देशभक्त, जहाल क्रांतीकारक, तेजस्वी लेखक, कुसुमकोमल कवी, नाटककार, इतिहासकार, प्रभावी वक्ता, हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कर्ता, जातिभेदाचा तिरस्कार करणारे समाजसुधारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक, क्रियाशील समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजे इंद्रधनुष्या सारखा शोभिवंत चमत्कार होता. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी १८९८ मध्ये त्यांनी मातृभूमीला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी देवीपुढे सशस्त्र क्रांतीची शपथ घेतली.  'जयोस्तुते' हे स्वातंत्र्य देवीचे स्त्रोत वयाच्या विसाव्या वर्षी लिहिले. पुण्याला फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच विदेशी कापडांची होळी करून जनजागृती केली. ९ जून १९०६ मध्ये लोकमान्य टिळकांचा आशीर्वाद घेऊन ते लंडनला गेले. तेथे त्यांनी भारतीयांना एकत्र करून तेथून देश स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले. १८५७  चा स्वातंत्र्य समराचा इतिहास  गुप्तपणे छापून भारतात पाठवला. त्याची अनेक भाषात भाषांतरे होऊन देशभक्त क्रांतीकारकांनी प्रेरणा घेतली. १९०९ मध्ये बॅरिस्टर परीक्षा पास होऊनही पदवी नकार दिला. सावरकरांनी लंडनहून पाठवलेल्या पिस्तुलानेच हुतात्मा अनंत कान्हेरे या क्रांतिकारकाने जॅक्सनचा वध केला. याबाबत सावरकरांना अटक झाली. पॕरिसहून लंडनला येताना मार्सेलिस बंदरात उडी टाकून निसटण्याचा ऐतिहासिक व धाडसी प्रयत्न त्यांनी केला. अखेर दोन जन्मठेप व काळ्यापाण्याची शिक्षा त्यांना झाली. त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर यांनाही काळ्यापाण्याची शिक्षा झाली. अंदमानला त्यांचे अमानुष हाल झाले पण तरीही तेथे लिहिण्याची कोणतेही साधन नसताना काळ कोठडीच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिले.

*यह तीर्थ महातीर्थों का है*
*मत कहो इसे काला पानी |*
 *तुम सुनो यहा के धरतीके,*
*कण कणसे गाथा बलिदानी ||*
काळ्या  पाण्यातून सुटका होऊन रत्नागिरीला आल्यावर त्यांनी समाजसुधारणेसाठी सहभोजन, पतितपावन मंदिर, अस्पृश्यता निवारक परिषद, महार परिषद असे कार्यक्रम करून विरोधाची पर्वा न करता जागृती केली. १९६७ ला विनाअट संपूर्ण मुक्तता झाल्यावर हिंदुमहासभेचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले. १९४९ मध्ये सुभाषचंद्र बोस व सावरकर यांची ऐतिहासिक भेट झाली. क्रांतिकार्यासाठी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंदिराची सांगता स्वातंत्र्य प्राप्तीनंतर १० मे १९५२ ला केली. २२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तर अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा त्यांना मान मिळाला होता.
 *यही पाओगे मेहशरमें जबां मेरी*
*बंदा हिंदवाला हुँ, यह हिंदोस्ता मेरा*
*खुशी के दौर दौर है या रंजो मुहन पहिले |*
 *बहार आती है पिछे और खिजा गिरदे चमन पहिले ||*
आयुष्याचा क्षणन् क्षण आणि शरीराचा कणन् कण त्यांनी केवळ देशासाठी अर्पण केला. महर्षी व्यास-वाल्मिकींच्या कुळातला अमर साहित्यकार व हाडाची काडे करणारा आधुनिक दधिची असलेल्या या महापुरुषाने प्रायोपवेशन करून (अन्नत्याग करून) २६ फेब्रुवारी १९६६ मध्ये देहत्याग केला.
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

*भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला ४५ शब्द दिले आहेत.*
           विनायक दामोदर सावरकर  हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ, आणि भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते होते.
⚜️ *चरित्र*
           सावरकरांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या शहरात झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना बाबाराव हे मोठे आणि नारायणराव सावरकर हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्‍नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इ.स. १८९९ च्या प्लेगला बळी पडले.

सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. वक्तृत्व, काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला स्वदेशीचा फटका, स्वतंत्रतेचे स्तोत्र ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली कुलदेवता भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली. मार्च, इ.स. १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला व इ.स. १९०६ साली उच्च शिक्षणासाठी लंडनला गेले.
                       राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.  इटालियन क्रांतिकारक आणि विचारवंत जोसेफ मॅझिनी ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर लंडनला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः लोकमान्य टिळकांनी केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
                    इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. '१८५७ चे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले. राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना ब्रिटिश शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल धिंग्रा ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली (इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ब्रिटिश सरकारने अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
           अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. अंदमानमध्ये असतांना सावरकरांनी Essentials of Hindutva हा ग्रंथ लिहिला. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्‍नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली. (दिनांक ६ जानेवारी १९२४).
                 अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्‍न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.

♨️ *सावरकरांचे जात्युच्छेदन*
              अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्‍नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६). हिंदू समाज एकजीव आणि संघटित करण्यासाठी सावरकरांनी रत्‍नागिरीत राहून कार्य केले. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य (१९३० नोव्हें ) जबाबदार आहे, हे सावरकरांनी लक्षात घेऊन त्या विरोधात काम केले. हिंदू धर्मात जातिव्यवस्थेचे, विषमतेचे समर्थन आहे. त्यामुळेच हिंदूसंघटन करण्यासाठी सावरकरांनी धर्मचिकित्सेची तलवार उपसली. आपल्या लेखनाने कोणी सनातनी दुखावेल याची चिंता न करता अंधश्रद्धा, जातिभेद यांवर त्यांनी कडाडून टीका केली. स्वकीयांतील जातीयतेवरपण निर्भीड टीका केली. त्यांनी रत्‍नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले. जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. रत्‍नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले. या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ आंतरजातीय विवाहही त्यांनी लावून दिले.

🐄 *गाय हा एक उपयुक्त पशू*
             ‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय व बैल हे पशू आहेत, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.
                  एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, व त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निर्भेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे, इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.(संपादित लेख – ‘गाय- एक उपयुक्त पशू’: वि. दा. सावरकर )

⛓️ *सात बेड्या*
           सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खऱ्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक.
         जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.

🛕 *हिंदू महासभेचे कार्य*
          रत्‍नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
                        एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
                   सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. १ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.

🗽 *सावरकर स्मारके*
                     पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.
सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील स्वातंत्र्यज्योती स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेल्या धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. ही वचने ताम्रपट्ट्यांवर कोरण्याचे काम मुंबईच्या गणेश एन्ग्रेव्हरने केले होते. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६ साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.
पुण्यात कर्वे रोडवर एक, एस.एम जोशी पुलानजीक एक आणि शिवराम म्हात्रे रोडवर एक अशी सावरकरांची तीन स्मारके आहेत.
गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)
स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)
🏤 *संस्था*
          सावरकरांचे कार्य जनेतुपुढे आणणाऱ्या अनेक संस्था भारतात आहेत. त्यांतील काही संस्थांची ही नावे :-

नादब्रह्म (चिंचवड-पुणे) : डॉ.रवींद्र घांगुर्डे,डॉ.वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र - यांनी चालविलेली ही संस्था सावरकरांच्या वाङ्‌मयावर आधारित अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर करते.
वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
वीर सावरकर मित्र मंडळ ()
वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ 
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.
✍️ *मृत्युपत्र*
                       ‘माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये, किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ, किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अश्या पिंडदानासारख्या कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत. त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ वगैरे.

📚 *ग्रंथ आणि पुस्तके*
           वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.'सागरा प्राण तळमळला' या कवितेला २००९ साली १०० वर्षे पूर्ण झालेली आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ४१ पुस्तकांचा संच बाजारात उपलब्ध आहे, त्यातील पुस्तके अशी :

अखंड सावधान असावे
१८५७ चे स्वातंत्र्यसमर
अंदमानच्या अंधेरीतून
अंधश्रद्धा भाग १
अंधश्रद्धा भाग २
संगीत उत्तरक्रिया
संगीत उ:शाप
ऐतिहासिक निवेदने
काळे पाणी
क्रांतिघोष
गरमा गरम चिवडा
गांधी आणि गोंधळ
जात्युच्छेदक निबंध
जोसेफ मॅझिनी
तेजस्वी तारे
नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
प्राचीन अर्वाचीन महिला
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
भाषा शुद्धी
महाकाव्य कमला
महाकाव्य गोमांतक
माझी जन्मठेप
माझ्या आठवणी - नाशिक
माझ्या आठवणी - पूर्वपीठिका
माझ्या आठवणी - भगूर
मोपल्यांचे बंड
रणशिंग
लंडनची बातमीपत्रे
विविध भाषणे
विविध लेख
विज्ञाननिष्ठ निबंध
शत्रूच्या शिबिरात
संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
सावरकरांची पत्रे
सावरकरांच्या कविता
स्फुट लेख
हिंदुत्व
हिंदुत्वाचे पंचप्राण
हिंदुपदपादशाही
हिंदुराष्ट्र दर्शन
क्ष - किरणें

📕 *इतिहासविषयावरील पुस्तके*
            १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा 'पहिले स्वातंत्र्यसमर' असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला)
भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
हिंदुपदपादशाही
📙 *कथा*
सावरकरांच्या गोष्टी भाग - १
सावरकरांच्या गोष्टी भाग - २
📚 *कादंबऱ्या*
काळेपाणी
मोपल्यांचे बंड अर्थात्‌ मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.

सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.

वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

चाफेकरांचा फटका
१८ एप्रिल १८९८ रोजी दामोदर चाफेकर फासावर गेले. त्यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांची टिळकांशी भेट घडवून आणली गेली. टिळकांनी चाफेकरांना भगवद्‌गीतेची एक प्रत दिली, ती हातात धरूनच दामोदर फासावर गेले. त्या रात्री विनायक दामोदर चाफेकर कितीतेरी वेळ रडत होते. त्यांनंतर सावरकरांनी चाफेकरांचा फटका नावाची काव्यकृती रचली. त्यातील दोन ओळी अशा :-

भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥

📜 *पुरस्कार*
स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात. उदा.
                     ’निनाद’ तर्फे दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर ध्येयवादी पुरस्कार
दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार
वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार
टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार
✍️ *सावरकरांवर लिहिलेली पुस्तके*
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक खालीलप्रमाणे:
अत्रे, प्रभाकर १९८५. वसा वादळाचा | स्नेहल प्रकाशन, पुणे
अंदूरकर, व्यं.गो. १९७०. शत्रूच्या गोटात सावरकर । सुरस ग्रंथमाला, सोलापूर
अधिकारी, गोपाळ गोविंद १९३७. बॅ. सावरकर यांचे चरित्र | महाराष्ट्र प्रकाशन संस्था, मुंबई
ओगले, अनंत | पहिला हिंदुहृदयसम्राट
आचार्य अत्रे, मालशे, स.गं.(संपादक) १९८३. क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर | परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
आठवले, रा.म. १९३८. बॅ. विनायक दामोदर सावरकर
आफळे, गोविंदस्वामी (लेखक व प्रकाशक) १९६७. सावरकर गाथा
उत्पात, वा.ना., सावरकर - एक धगधगते यज्ञकुंड
उपाध्ये, संजय २००२. विनायक विजय . चंद्रकला प्रकाशन, पुणे
ओगले, अनंत शंकर : होय ! मी सावरकर बोलतोय (नाटक)
करंदीकर, डॉ. विद्याधर : कवी-नाटककार सावरकर
करंदीकर, शि.ल. १९६६. असे होते वीर सावरकर । सीताबाई करंदीकर, पुणे
करंदीकर, सीताबाई १९४३. सावरकर-चरित्र (कथन) | सीताबाई करंदीकर, पुणे
१९४७. सावरकरांचे सहकारी | गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
करंदीकर, विद्याधर (लेखक, जानेवारी, २०१६) : कवी, नाटककार सावरकर
कऱ्हाडे, शंकर १९८३. गोष्टीरूप सावरकर , विजय प्रकाशन, नागपूर
कानिटकर, सचिन. माझे सावरकर
किर्लोस्कर, मुकुंदराव (संपादक) १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी जीवनावरील अलौकिक विशेषांक | सावरकर दर्शन प्रतिष्ठान, पुणे
कीर, धनंजय १९५०. सावरकर ॲन्ड हिज टाइम्स
कुळकर्णी, श्यामकांत २०००. गाथा थोर क्रांतिभास्कराची, विजय प्रकाशन, नागपूर
केळकर, भा.कृ. १९५२. सावरकर-दर्शन व्यक्ति नि विचार, गं.पा. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई
खाडिलकर, नीळकंठ १९८६. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रॅक्टिकल सोशॅलिझम, दैनिक नवाकाळ प्रकाशन, मुंबई
खांबेटे, द.पां. (अनुवाद), १९७२. स्वातंत्र्यवीर सावरकर, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
गद्रे, अनुराधा अ. २००५. स्वातंत्र्यवीर सावरकर, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, द.न. १९८९. स्वातंत्र्यवीर सावरकर : एक रहस्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई
गोखले, मो.शी. १९४०. वीर सावरकर
गोखले, विद्याधर २००५. झंझावात, मनोरमा प्रकाशन, मुंबई
गोखले, श्री.पु. १९६९. अशी गर्जली वीरवाणी, लोकमान्य प्रकाशन, पुणे
१९८३. सावरकरांशी सुखसंवाद, मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
गोडसे, गोपाळ १९६९. जय मृत्युंजय (स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावरील कविता), केसरी प्रकाशन, पुणे
गोडबोले, अ.मा. १९९७. क्रांतदर्शी सावरकर, साहित्यसेवा प्रकाशन, औरंगाबाद
गोविंदमित्र १९५७. स्वातंत्र्यवीर श्री. विनायक दामोदर सावरकर यांचे काव्यमय चरित्र | गं.वि.परचुरे, कल्याण
घाणेकर, ऋचा २००३. स्वातंत्र्यवीर सावरकर, महाजन ब्रदर्स, पुणे
चौगुले, सरोज : क्रान्तिवीर: सावरकर: अन्यरूपकाणि च : सावरकर, मदनलाल धिंग्रा वगैरे नावांच्या एकूण चार संस्कृत नाटिका
जोगळेकर, ज.द. १९८३. स्वातंत्र्यवीर सावरकर वादळी जीवन | उत्कर्ष प्रकाशन, पुणे
जोगळेकर, ज.द. १९८३. पुनरुत्थान | पंडित बखले, मुंबई
जोशी, विष्णू श्रीधर १९८५. क्रांतिकल्लोळ | मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२. अखेर उजाडलं, पण देश रक्तबंबाळ । मनोरमा प्रकाशन, मुंबई
१९९२, झुंज सावरकरांची । मनोरमा प्रकाशन, मुंबई
ताटके, अरविंद १९७३. युगप्रवर्तक सावरकर । स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
दुगल, न.दि. १९८३. देशप्रेमा... तुझे नाव सावरकर । अजब पुस्तकालय, कोल्हापूर
देशपांडे, बालशंकर १९५८. क्रांतिकारकांचे मुकुटमणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर
देशपांडे, भास्कर गंगाधर १९७४. क्रांतिसूर्य सावरकर, अजय प्रकाशन, औरंगाबाद
देसाई, हरिश्चंद्र त्र्यंबक १९८३. शतपैलू सावरकर । प्रबोधन, मुंबई
नातू, र.वि. १९९७. समग्र सावरकर खंड १० , पृष्ठे ६००० ची संदर्भसूची, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
पळसुले गजानन बाळकृष्ण-वैनायकम-( संस्कृत महाकाव्य)
परांजपे कृ.भा.. शत जन्म शोधिताना
पेठे, मंगला कृ. १९८४. सावरकर गौरव गान
फडके, य.दि. १९८४. शोध सावरकरांचा, श्रीविद्या प्रकाशन, पुणे
बखले पंडित (संपादक) १९६०. मृत्युंजय सावरकर
बर्वे, शंकर नारायण १९४७. स्वातंत्र्यवीर (बॅ.सावरकर यांच्या चरित्रातील काही पद्यमय प्रसंग), विष्णू सि. चितळे, पुणे
बोडस, आनंद ज. २००७. सावरकरांची तिसरी जन्मठेप, मनोरमा प्रकाशन, मुंबई
भट, रा.स. १९७२. सावरकरांचे जीवनदर्शन , वोरा अँड कंपनी पब्लिशर्स प्रा. लि., मुंबई
भागवत, अ.गो. (अनुवाद) १९४७. बॅरिस्टर सावरकर चरित्र अ.गो. भागवत, बडोदा
भालेराव, सुधाकर सोवनी १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंथन , प्रमोद प्रकाशन, नागपूर
भावे, पु.भा. १९८२. सावरकर नावाची ज्योत, सन पब्लिकेशन्स, पुणे
भिडे, ग.र. १९४२. सावरकरांची सूत्रे, कोल्हापूर
भिडे, गोविंद १९७३. सागरा प्राण तळमळलाः स्वातंत्र्यवीर सावरकरांचे शब्दरूप
 (वर्ष?). जीवनदर्शन । जोशी ब्रदर्स बुकसेलर्स अँड पब्लिशर्स, पुणे
भोपे, रघुनाथ गणेश १९३८. स्वातंत्र्यवीर बॅ.विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र । भोपे प्रकाशन, अहमदनगर
मालशे, सखाराम गंगाधर. सावरकरांच्या अप्रसिद्ध कविता
मेहरूणकर, प्रभाकर १९९३. तेजोनिधी सावरकर । मोरया प्रकाशन, डोंबिवली
मोडक, डॉ. अशोक २०१५. वीर सावरकर - विवेकानंदांचे वारसदार
मोने, प्रभाकर २००४. स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट - एक शिवधनुष्य । परचुरे प्रकाशन
मोरे शेषराव. (सावरकरांसंबंधी) सत्य आणि विपर्यास; सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद (राजहंस प्रकाशन); सावरकरांचे समाजकारण; सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग (राजहंस प्रकाशन)
रानडे, सदाशिव राजाराम १९२४. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर ह्यांचे संक्षिप्त चरित्र । लोकमान्य छापखाना, मुंबई
रायकर, गजानन १९६६. महापुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर चरित्र
वर्तक, श्रीधर रघुनाथ १९७०. क्रांतदर्शी सावरकर, संग्राहक काळ, प्रकाशन, पुणे
वऱ्हाडपांडे, व.कृ. (संपादक), १९८३. गरुडझेप (सावरकर गौरवग्रंथ), विजय प्रकाशन, नागपूर
वाळिंबे, वि.स. १९६७. स्वातंत्र्यवीर सावरकर, केसरी प्रकाशन, पुणे
१९८३. सावरकर , मॅजेस्टिक बुक स्टॉल, मुंबई
शिंदे, वि.म. १९९९. आठवणींची बकुळ फुले | नवचैतन्य प्रकाशन, मुंबई
शिदोरे, प्रभाकर गोविंद १९८४. स्वातंत्र्यवीर सावरकर | न.पा. साने, मुंबई
साटम, दौलत मुरारी १९७०. स्वातंत्र्यवीर विनायकराव सावरकर | साटम प्रकाशन, मुंबई
साठे, डॉ. शुभा. त्या तिघी (कादंबरी)
सावरकर, बाळाराव. सावरकरांचे चारखंडी चरित्र, पुनःप्रकाशन - २६ फेब्रुवारी २०२०. खंडांची नावे १. २. हिंदू महासभा पर्व (१९३७ ते १९४०), ३. ४.सावरकर,  बाळाराव (संकलक)                            १९६९. वीर सावरकर आणि गांधीजी | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७२. हिंदुसमाज संरक्षक स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर (रत्‍नागिरी पर्व) | वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७५. स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदु महासभापर्व भाग-१ (जून १९३७ ते डिसेंबर १९४०) । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७६. स्वातंत्र्यवीर सावरकर अखंड हिंदुस्थान लढा पर्व
१९९७. योगी योद्धा वि.दा.सावरकर । वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
(जानेवारी १९४१ ते १५ ऑगस्ट १९४७) वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
सावरकर, विश्वास विनायक १९८६. आठवणी अंगाराच्या (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आठवणी) । स्नेहल प्रकाशन, पुणे
सावरकर, शां.शि. १९९२. अथांग (श्री. वि.दा. सावरकर आत्मचरित्र प्रारंभ) | ?,मुंबई
सावरकरांची तिसरी जन्मठेप (डॉ. आनंद जयराम बोडस)
सोनपाटकी, मुकुंद १९८०. दर्यापार | पुरंदरे प्रकाशन, पुणे
सोवनी, म.वि. १९६७. मृत्युंजय सावरकरः चित्रमय चरित्र | चित्रसाधन प्रकाशन, पुणे
हर्षे, द.स. १९६६. सावरकर-दर्शन | द.स. हर्षे प्रकाशन, सातारा
क्षीरसागर, प्रकाश १९८९. तेजोमय दाहक ते । स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर,
श्रीवास्तव, हरीन्द्र, खोत, अनुराधा (अनुवाद) १९९६. एक झंझावात-शत्रूच्या शिबिरात । सावरकर स्मृती केंद्र, बडोदे
१९५७. आत्मवृत्त । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९५८. सावरकर विविध दर्शन । व्हीनस प्रकाशन, पुणे
१९६२, सावरकर यांच्या आठवणी । अधिकारी प्रकाशन, पुणे
१९६९, महायोगी वीर सावरकर, वीर सावरकर प्रकाशन, मुंबई
१९७३, सावरकर आत्मचरित्र (पूर्वपीठिका) ।, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७२, सावरकर आत्मचरित्र (भगूर) | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची | स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
सावरकरांवरील मृ्त्युलेख (आचार्य अत्रे)
ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि.श्री. जोशी
शोध सावरकरांचा - य.दि. फडके
क्रांतिकारकांचे कुलपुरुष - आचार्य अत्रे
सावरकरांचे समाजकार्य सत्य आणि विपर्यास - शेषराव मोरे
सावरकरांचा बुद्धिवाद एक चिकित्सक अभ्यास - शेषराव मोरे
रत्‍नागिरी पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
हिंदुसभा पर्व (खंड १ व २) - आचार्य बाळाराव सावरकर
सांगता पर्व - आचार्य बाळाराव सावरकर
सावरकर चरित्र - धनंजय कीर
सावरकर नावाची ज्योत - पु.भा. भावे
सावरकर चरित्र - शि.ल. करंदीकर
दर्यापार - मुकुंद सोनपाटकी
गांधीहत्या आणि सावरकरांची बदनामी – शेषराव मोरे
🎭🎞️ *सावरकरांवरील मराठी चित्रपट, नाटके, कार्यक्रम*
अनादि मी अनंत मी (सावरकरांच्या जीवनावर प्रतीकात्मक सांगीतिक नाट्याविष्कार : लेखक-दिग्दर्शक माधव खाडिलकर, संगीत आशा खाडिलकर, कलावंत ओंकार-प्राजक्ता खाडिलकर आणि इतर अनेकजण.)
मी विनायक दामोदर सावरकर (एकपात्री, सादरकर्ते : योगेश सोमण)
यशोयुतां वंदे (संकल्पन/दिग्दर्शन- सारंग कुलकर्णी. संहिता - दीपा सातव सपकाळ)
व्हॉट अबाऊट सावरकर? (चित्रपट, दिग्दर्शक - रूपेश केतकर आणि नितीन गावडे, २०१५)
स्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट, निर्माते सुधीर फडके)
 
            🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

स्त्रोतपर माहिती 

मंगळवार, २५ फेब्रुवारी, २०२०

कै. काशिनाथ नरसिंह केळकर

 कै. काशिनाथ नरसिंह केळकर
*"अल्पपरिचित इतिहास अभ्यासकाची जयंती !!* 👍
सन १९३७!! फिलीप फॉक्स नामक ब्रिटीशाने झाशीच्या राणी लक्ष्मीबाई महाराज साहेबांबद्दल अपमानकारक लेखन केलेलं होतं. ते लिखाण वाचून एका तरूणाचं मन बंड करून उठलं. या विषयावर अभ्यास करुन, त्यावर लेखन करुन, ‘सत्य काय’ ते जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी त्याने असंख्य ऐतिहासिक कागदपत्रं धुंडाळली. दुर्दैवाने त्या वेळच्या ब्रिटीश अंमलाखाली अनेक साधनं आधीच नष्ट झालेली होती. त्याच वर्षी त्याने झाशी, कानपूर, ग्वाल्हेर, ब्रह्मावर्तासारख्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन त्यांचा सूक्ष्म अभ्यास केला. कागदपत्रं शोधून अभ्यासली, तपासली .१८५७च्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्यसमरानंतर कित्येक दशकांचा काळ उलटून गेलेला होता. १८५७चे बंड व त्या काळचा इतिहास समजणं दुरापास्त झालेलं होतं. लॉर्ड जॉर्ज कॉनवेल या ब्रिटीशाने लिहिलं होतं - "१८५७चा खरा इतिहास या पुढे कधी बाहेर येईल किंवा कोणाला समजेल ही आशा व्यर्थ आहे". अशा प्रतिकूल परिस्थितीतही भरपूर अभ्यास करुन झाशीच्या राणी साहेब आणि१८५८ विषयाबद्दलची जास्तीतजास्त योग्य ती माहिती ‘केसरी’मध्ये लेखमाला लिहून जनमानसापर्यंत पोचवायचं काम केलेलं अजोड अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे कै. काशिनाथ नरसिंह तथा बापू केळकर.
धर्मशास्त्र, इतिहास, राजकारण, चित्रकला, ज्योतिषविद्या अशा वैविध्यपूर्ण विषयांचा व्यासंग असलेल्या व नंतर वकील झालेल्या काशिनाथ यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९०० साली तात्यासाहेब म्हणजे श्री. न. चिं. केळकर यांच्या घरी झाला. काशिनाथ हे तात्यासाहेबांचे जेष्ठ चिरंजीव. स्वभावाने थोडे अबोल, मितभाषी पण जुन्या काळात मनस्वी रमणारे काशिनाथ इतिहासाबद्दल रूची बाळगून होते. त्यांचा ‘१८५७’ व ‘नेपोलियन’ या दोन विषयांवरचा अभ्यास थक्क करून टाकणारा होता. बी.ए. व वकिलीसारखा क्लिष्ट अभ्यासक्रम पार पाडतानाही त्यांनी हा इतिहासाचा अभ्यास केला, त्यात संशोधन केलं, हे खरोखर विशेष!! ॲडव्होकेट होत असतानाच त्यांनी ‘ज्योतिर्भूषण' ही पदवीदेखील मिळवलेली होती ज्याचा त्यांना सार्थ अभिमान होता.
अतिशय पितृभक्त असलेल्या काशिनाथ केळकरांनी वडिलांचा लेखनवारसा पुढे चालवत ‘केसरी’ वृत्तपत्रामधून विपुल लिखाण केलं. त्यांनी केलेली वाङ्मय सेवा व साहित्य निर्मिती बहुत दखलपात्र आहे. “आपल्या वडिलांचे लेखणीशिवाय आपण दुसऱ्या कोणासही गुरू मानले नाही" असं त्यांनी आपल्या आत्मचरित्रात, "वाळवंटातील पाऊले"मध्ये नमूद केलेलं आहे. जाज्वल्य पितृभक्तीचा झळाळता अभिमान त्यांनी आयुष्यभर बाळगल्याचे अशा वाक्यांतून सतत दिसत राहते. त्यांच्या जन्मपत्रिकेतला माणसाला प्रसिद्धी बहाल करणारा ग्रह मात्र अयोग्य घरात पडलेला होता. प्रसिद्धी मिळाली नाही तरीही या नादिष्ट लेखकानं केसरी पाठोपाठ ‘सह्याद्री’मध्येही पुष्कळ लेखन केलं.
स्वतःच्या लिखाणकामाखेरीज त्यांनी आपल्या वडिलांच्या हजारो पृष्ठांच्या अप्रकाशित साहित्याचे सहा ग्रंथ प्रकाशित केले. काशिनाथ केळकरांची ही कामगिरी अतिशय बहुमूल्य स्वरूपाची आहे. "केळकर निबंधमाला" या साक्षेपाने संपादित व प्रकाशित केलेला त्यांचा हा ग्रंथ ‘केळकर अभ्यासकांना’ न डावलता येण्याजोगा आहे. श्री. न. चिं. केळकर यांनी आपल्या सर्व प्रकाशित व अप्रकाशित साहित्याचे हक्क काशिनाथांकडे दिलेले होते. पूर्वपरवानगी शिवाय त्या साहित्याचा वापर करणाऱ्यांना ॲडव्होकेट काशिनाथांनी स्वतःच्या वकिली ज्ञानाची चुणूकही चांगलीच दाखवलेली होती.
घरी ते अनेकांच्या जन्म कुंडल्या तयार करून भविष्यकथन करीत. जर्मनीचा हुकुमशहा हिटलरच्या अंताचं त्यांनी वर्तवलेलं भविष्य तंतोतंत खरं ठरलं होतं. लेखन व इतर सर्व जबाबदाऱ्यांसोबत ते उत्तम चित्रही काढायचे. स्वतःच्या वडिलांचं व नेपोलियनचंही त्यांनी चित्र काढलं होतं. हे एक विशेषच म्हणावं लागेल. ऐतिहासिक लेखनामध्येही त्यांनी जुनी चित्रं शोधून आपल्या वाचकांसाठी ती उपलब्ध करुन दिलेली आहेत. नानासाहेब पेशव्यांचं चित्र हे त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.
बापूंच्या आत्मचरित्राखेरीज महत्त्वाच्या इतर वाचनीय पुस्तकांची यादी खाली देत आहे:-
रामायणावरील काही विचार (१९२८)
शेतीवाडीची आर्थिक परीक्षा (१९३५)
हिंदुव्यवहार धर्मशास्त्र (१९३२)
नेपोलियन व हिटलर (१९४६)
नेपोलियन व्यक्तीदर्शन (१९४६)
शमीपूजन (१९४७)
‘दोन घटका मनोरंजन’ हा त्यांचा निवडक लेख संग्रहही खूप मनोरंजक आहे. ‘नेपोलियन’ व ‘१८५७’ या दोन विषयांवर बापू तासन्-तास बोलत. इतर कोणी नेपोलियनवर अभ्यास वा लिखाण केलं तर ते वाचून आवर्जून प्रतिक्रिया देत. थोर इतिहास अभ्यासक कै. म. श्री. दिक्षित यांच्या संग्रहामध्ये बापूंनी पाठवलेलं असंच एक ‘शाबासकी पत्र’ दिसून येतं.
श्री. न. चिं. केळकर यांचे अनेक गुण त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी, काशिनाथ व यशवंत यांनी, अंगी बाणवले. वडिलांनी बांधलेलं घर त्यांनी जिवापाड सांभाळलं. बापू वयाच्या ८२व्या वर्षी १० एप्रिल १९८२ रोजी देवाघरी गेले.अतिशय विपुल काम, संशोधन आणि लेखन केलेले, वडिलांची किर्ती आपल्या कामांमधून वृद्धिंगत करणारे कै. काशिनाथ नरसिंह केळकर हे विस्मृतीत गेलेले इतिहास अभ्यासक आज आपणा सर्वांसमोर आणत आहे.  या निमित्ताने त्यांच्या पवित्र स्मृतींना आदरांजली अर्पण करतो.

मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२०

क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा

 मदनलाल धिंग्रा
जन्म : १८ सप्टेंबर १८८३*(अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत)
फाशी : १७ ऑगस्ट १९०९*(पेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन,इंग्लंड)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत, होमरूल लीग
धर्म : हिंदू
प्रभाव : विनायक दामोदर सावरकर

               
 क्रांतिकारक मदनलाल धिंग्रा  हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २०व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.
🕺 *सुरुवातीचे जीवन*
            त्यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला
👬 *सावरकरांशी संबंध*
           मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.
🔫 *कर्झन वायलीचा खून*🔫
                   ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता. या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले
🕯 *शेवटचे वक्तव्य*
           फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात धिंग्रानी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे.ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वत:चे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे.याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."
🎭💎 *नाटक*
            मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पाहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे.
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *विनम्र अभिवादन* 🙏
    स्त्रोत माहितीपर पोस्ट 

सोमवार, १७ फेब्रुवारी, २०२०

आद्यक्रांतिकारक धर्मवीर लहुजी साळवे वस्ताद

आद्यक्रांतिकारक धर्मवीर लहुजी साळवे वस्ताद

जन्म : १४ नोव्हेंबर १७९४ (पेठ, पुरंदर जिल्हा, महाराष्ट्र)
मृत्यू : १७ फेब्रुवारी १८८१ (पुणे, महाराष्ट्र, भारत)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, नौजवान भारत सभा
प्रभावित : ज्योतिबा फुले, बळवंत फडके, बाळ गंगाधर टिळक, उमाजी नाईक इ.
वडील : राघोजी साळवे
आई : विठाबाई
पत्नी : ब्रम्हचारी
लहु राघोजी साळवे  हे भारतीय क्रांतिकारक होते. ते लहुजी वस्ताद नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ‘पेठ’ या गावातील एका मातंग कुटुंबात झाला. मातंग समाजात जन्माला आलेल्या लहूजींना युद्धकलेचे प्रशिक्षण त्यांच्या घरातील वीर पुरुषांकडून मिळाले होते. लहूजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे व आईचे नाव विठाबाई होते. लहूजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराकर्मी पुरुष होते, युद्ध कलेमध्ये त्यांचा कोणीही हात धरत नसे. त वाघाबरोबर लढाई करण्याच्या पराक्रमामुळे लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे त्याकाळी प्रसिद्ध होते. एखदा राघोजी साळवे यांनी वाघाबरोबर युद्ध करून जिवंत वाघाला खांद्यावर घेऊन पेशव्यांच्या राजदरबारी सादर केले होते व आपल्या प्रचंड शक्तीचे प्रदर्शन केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. साळवे घराने सशस्त्र विद्येमध्ये निपुण व तरबेज होते त्यामुळे, शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात लहूजींच्या पूर्वजांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. शिवाजी महाराजांनी त्यांच्या कार्यकाळात साळवे घराण्याची योग्यता ओळखून पुरंदरकिल्ल्याच्या सरंक्षणाची जबाबदारी लहुजी साळवे यांचे आजोबा यांच्याकडे सोपवली होती. पुरंदर किल्ल्याच्या सरंक्षणासाठी साळवे घराण्यातील अनेक वीर पुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरींमुळे शिवाजी महाराजांनी लहुजींच्या पूर्वजांना 'राऊत ' या पदवीने गौरविले होते.
पुढे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत खडकी येथे तुंबळ युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व २३ वर्षे वयाच्या लहुजी यांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. लहुजीं चे वडील राघोजी साळवे वाऱ्याच्या वेगाप्रमाणे शत्रू वर तुटून पडले होते व सपासप तलवारीचे वार करत शत्रुंना जमिनीवर लोळवत होते. अखेर या संकटातुन बाहेर पडण्यासाठी घाबरलेल्या इंग्रजांनी एकत्र वार करून राघोजींना संपवले.
राघोजी या युद्धात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोरच शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. पुढे इ.स. १८१८मध्ये मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवारवाड्यावरून हटवून तेथे इंग्रजांचा युनियन जॅक फडकला.
या पराभवाने लहुजींच्या हृदयात स्वातंत्र्यप्राप्तीची ज्वाला भडकली. स्वातंत्र्यप्रेम, देशभक्ती, देशप्रेमाने लहुजींना आपल्या वडिलांच्या मृत्यूच्या दुःखातून सावरले. आपल्या वडिलांना आपल्या डोळ्या समोरच शहीद झालेले पाहून लहूजींच्या तळपायाची आग मस्तकात गेली व भारतमातेला इंग्रजांपासून वाचविण्यासाठी राघोजी साळवे शहीद झालेल्या ठिकाणीच लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी उभारली. ही समाधी अजूनही पुणे-शिवाजीनगरजवळच्या ‘वाकडेवाडी’ येथे आहे.
दांड पट्टा चालवणे, तलवारबाजी, घोडेस्वारी, बंदूक चालवणे व निशाणेबाजी या सर्व युद्ध कले मध्ये लहुजी निपुण होते लहुजींचे पिळदार शरीर व त्यांची भरलेली छाती पाहून शत्रूला सुद्धा घाम फुटत असे. जीवघेण्या शस्त्रां बरोबर ते अगदी एखाद्या खेळण्याप्रमाणे खेळत असतं. आपल्या वडिलांचा मृत्यू व इंग्रजांनी केलेला पराभव लहुजींना असह्य झाला. पराक्रमी घराण्यातील लहुजींनी इंग्रजांवर मात करण्यासाठी म्हणजे पर्यायाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी ‘मवाळपंथी नव्हे तर जहाल क्रांतिकारक’ निर्माण करण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी आपल्या अंगी असलेले युद्धकलेचे शिक्षण तरुणांना देण्यासाठी इ.स. १८२२ मध्ये रास्ता पेठ, पुणे येथे देशातील पहिले तालीम युद्ध कलाकौशल्य प्रशिक्षण केंद्र नाना रास्ते सरदार यांच्या हस्ते सुरू केले. या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ लागले. यात प्रामुख्याने बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हे देखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.
२० जुलै १८७९ रोजी इंग्रजांनी वासुदेव बळवंत फडके यांना ‘देवरनावडगा’ मुक्कामी रात्री झोपेत असताना पकडले व त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. ७ नोव्हेंबर १८७९ रोजी वासुदेव फडके यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. लहुजींच्या मनावर खूप मोठा आघात झाला. अवघ्या तेरा महिन्यांनी म्हणजेच १७ फेब्रुवारी १८८१ रोजी पुण्याच्या संगमपुराच्या परिसरात एका झोपडीवजा घरामध्ये लहुजी साळवेंची प्राणज्योत मालवली व एका  समाधी संगमवाडी (पुणे) येथे आहे
इ.स. १८४८ साली लहुजींच्या तालमीत सावित्रीबाई फुले यांची पहिली मुलींची शाळा भरत होती.
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या ११वीच्या पुस्तकामध्ये वीर वस्ताद लहुजी साळवे यांचा जन्म इ.स.१८०० मध्ये झाल्याचे नमुद आहे.
उपमा -धर्मवीर लहुजी वस्ताद, आद्य क्रांतीकारक लहुजी वस्ताद
         

🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏 विनम्र अभिवादन🙏
स्त्रोतपर संकलन माहिती 

गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२०

भारतीय कोकिळा सरोजिनी नायडू

भारतीय कोकिळा सरोजिनी नायडू


जन्म : 13 फेब्रुवारी 1879 (हैद्राबाद, आंध्रप्रदेश)
मृत्यु : 2 मार्च 1949  (अलाहाबाद, उत्तरप्रदेश)
पति : डॉ. एम. गोविंदराजलु नायडू
मुलं : जयसूर्य, पद्मजा नायडू, रणधीर आणि लीलामणि
विद्यालय : मद्रास विश्वविद्यालय, किंग्ज़ कॉलेज लंडन, गर्टन कॉलेज कैम्ब्रिज
नागरिकत्व  : भारतीय
पुरस्कार उपाधी : केसर ए हिंद
रचना : द गोल्डन थ्रेशहोल्ड, बर्ड ऑफ टाईम, ब्रोकन विंग
भारताची कोकिळा सरोजीनी नायडु त्या अमर आत्म्याचे नाव आहे ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य समरात आपले महत्वपुर्ण योगदान दिले. सरोजिनी नायडु त्या क्रांतिकारी महिलांपैकी एक आहेत ज्यांनी गुलामगिरीत अडकलेल्या भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता प्रचंड संघर्ष केला.
सरोजिनी नायडू एक उत्तम राजकारणी आणि महान स्वातंत्र्य सेनानी होत्या या शिवाय त्या एक फेमिनिस्ट, कवयित्री, आणि आपल्या काळातील एक महान वक्त्या देखील होत्या. त्यांचे भाषण ऐकुन मोठ मोठे दिग्गज देखील मंत्रमुग्ध होऊन जात. त्या इंडियन नॅशनल कॉंग्रेस च्या पहिल्या प्रेसिडेंट होत्या. त्या उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल म्हणुन नियुक्त होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या.
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांना भारताची नाइटिंगेल व भारताची कोकिळा देखील म्हंटल्या जात होतं. त्यांच्या कवितांमधे लहान मुलांच्या, निसर्गाच्या, देशभक्तीच्या, प्रेमाच्या आणि मृत्युच्या कविता आहेत विशेषतः लहान मुलांच्या कविता करण्याकरीता त्या प्रसिध्द होत्या. त्यांच्या कविता वाचुन अधिकतर लोक आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये रममाण होत असत त्यांच्या कवितांमधे एक खोडकरपणा आढळुन यायचा त्यांच्या कवितांमध्ये त्यांच्या लहानपणाची झलक सापडायची आणि म्हणुनच त्यांना ’भारताची कोकिळा’ म्हंटले जात होते.
वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षीच सरोजिनीं मधली प्रतिभा दिसायला लागली या लहान बालिकेच्या कविता वाचुन प्रत्येकजण आश्चर्यचकीत व्हायचा. त्यांनी तेव्हांपासुनच वृत्तपत्रांमधे लेख आणि कविता लिहीण्यास सुरूवात केली होती. देशप्रेमाची भावन देखील त्यांच्यात ओतप्रोत भरली होती आणि म्हणुनच राष्ट्रीय आंदोलना दरम्यान त्या महात्मा गांधीच्या सोबत होत्या, त्यांच्या समवेत त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात हिरीरीने सहभाग घेतला.
सरोजिनी नायडुंची कन्या पद्मजा हिने देखील स्वातंत्र्य संग्रामात सहभाग नोंदवला आणि ती भारत छोडो आंदोलनाचा हिस्सा होती. आज जेव्हां ही भारताच्या महान क्रांतिकारी महिलांची चर्चा होते त्यावेळी सरोजिनी नायडुंचे नाव सर्वात आधी घेण्यात येते. सरोजिनी नायडु सगळया भारतीय महिलांकरीता एक आदर्श होत्या.
💁🏻‍♀ *महान क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंचे प्रारंभिक जीवन, कुटूंब आणि शिक्षण*
भारतिय महान क्रांतिकारक सरोजिनी नायडूंचा जन्म 13 फेब्रुवारी 1879 ला एका बंगाली कुटूंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अघोरनाथ चट्टोपाध्याय होते ते वैज्ञानिक, शिक्षाशास्त्री, डॉक्टर आणि शिक्षक होते हैद्राबाद येथील निज़ाम कॉलेजची स्थापना त्यांनी केली होती. पुढे त्यांच्या वडिलांना प्रिंसिपल पदावरून कमी करण्यात आले होते त्यानंतर ते नॅशनल काँग्रेस हैद्राबाद चे पहिले सदस्य बनले. आपली नौकरी सोडुन त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली होती.
स्वातंत्र्य सेनानी सरोजिनी नायडु यांच्या आईचे नाव वरद सुंदरी देवी होते त्या बंगाली भाषेत कविता करीत असत. सरोजिनी नायडुंना एकुण 8 बहिण भाऊ होते त्यांच्यात सरोजिनी या सर्वात मोठया होत्या. त्यांचा एक भाऊ विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय क्रांतिकारी होता त्याने बर्लिन कमेटीत आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती. त्याला 1937 साली एका इंग्रजाने मारून टाकले. सरोजिनींचे दुसरे बंधु हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय एक प्रसिध्द कवि, कथाकार, व कलाकार होते या व्यतिरीक्त ते नाटकं सुध्दा लिहीत असत. त्यांची बहिण सुनालिनी देवी या एक उत्तम नृत्यांगना व अभिनेत्री होत्या.
बालपणापासुन सरोजिनी या एक हुशार विद्यार्थिनी होत्या त्यांना उर्दू, तेलगू, इंग्लिश, बांग्ला आणि फारसी भाषेचे चांगले ज्ञान होते. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी मॅट्रिक परिक्षा त्यांनी उत्तीर्ण केली मद्रास प्रेसीडेंसीत प्रथम स्थान मिळवीले. देशाकरीता स्वतःला समर्पित करणाऱ्या महान क्रांतिकारी सरोजिनीने गणितज्ञ किंवा वैज्ञानिक व्हावं अशी त्यांचे वडिल अघोरनाथ चट्टोपाध्याय यांची ईच्छा होती परंतु सरोजिनी यांना लहानपणापासुन कविता लिहीण्याचा छंद होता. कविता लिहीण्याची आवड त्यांच्यात आईकडुन आली होती.
बालपणी त्यांनी चक्क 1300 ओळींची कविता लिहीली होती. त्यांच्या कविता आणि लिखाण प्रत्येकाला प्रभावित करीत असे त्यांच्या कवितेने हैद्राबाद चे निजाम देखील प्रभावित झाले होते आणि त्यांनी सरोजिनींना विदेशात अध्ययन करण्याकरीता शिष्यवृत्ती देखील दिली होती. वयाच्या 16 व्या वर्षी जेव्हां त्या इंग्लंड येथे गेल्या तेव्हां त्यांनी प्रथम किंग्स काॅलेज लंडन येथे प्रवेश घेतला.
पुढे कैम्ब्रिज च्या ग्रिटन कॉलेज मधुन शिक्षण प्राप्त केले त्याठिकाणी त्यांची भेट त्या काळातील इंग्लिश चे प्रसिध्द कवि आर्थन साइमन आणि इडमंड गोसे यांच्याशी झाली. त्यांनी सरोजिनींना भारतिय विषयांना लक्षात ठेवत लिखाण करण्यास व डेक्कन (दक्षिण पठार) ची भारतिय कवयित्री होण्याचा सल्ला दिला.
त्यानंतर महान कवयित्री सरोजिनी नायडुंना भारतातील पर्वत, नद्या, मंदिरे आणि सामाजिक बाबींना आपल्या कवितांमध्ये समाविष्ट करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे सरोजिनी भारतातील एक महान कवियत्री झाल्या त्यांच्या कवितांमुळे त्यांनी लाखो हृदयांमध्ये स्थान मिळविले.
👫🏻 *सरोजिनी नायडुंचा विवाह*
भारताच्या महान कवियित्री सरोजिनी नायडु ज्यावेळी इंग्लंड येथे शिक्षण घेत होत्या त्या दरम्यान त्यांची भेट गोविंद राजुलू नायडूंशी झाली त्यावेळीच त्या त्यांच्या प्रेमात पडल्या. नायडू हे त्या वेळी इंग्लंड येथे फिजिशियन होण्याकरता गेले होते. शिक्षण पुर्ण केल्यानंतर भारतात परतल्यावर आपल्या परिवाराच्या संमतीने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी त्यांचा गोविंद नायडूंशी विवाह झाला.
1898 साली त्यांचा विवाह हा ब्राम्हो मॅरेज अॅक्ट अंतर्गत मद्रास येथे संपन्न झाला. त्यांचा विवाह हा आंतरजातिय होता त्याकाळी वेगवेगळया जातींमध्ये लग्न होणे हे एखाद्या गुन्हयापेक्षा कमी समजले जात नव्हते कारण त्यावेळी आंतर जातिय विवाहांना भारतिय समाजात मान्यता मिळाली नव्हती.
हे एक क्रांतिकारी पाऊल होते याकरता त्यांना फार संघर्ष करावा लागला होता परंतु त्यांच्या वडिलांनी समाजाची चिंता न करता आपल्या निर्भय आणि सुशिक्षीत अश्या सरोजिनीला तिच्या निर्णयात पुर्ण सहाय्य केले. या सर्व विपरीत परिस्थीती पश्चात त्यांचे वैवाहीक जीवन यशस्वी ठरले विवाहापश्चात त्या चार मुलांच्या आई झाल्या जयसुर्या, पद्मजा, रणधीर आणि लीलामणी अशी चार अपत्ये त्यांना झाली.
सरोजिनींची कन्या पद्मजा त्यांच्यासारखीच कवियित्री झाली शिवाय ती सक्रीय राजकारणात उतरली आणि 1961 ला पश्चिम बंगाल ची गव्हर्नर देखील झाली.
*सरोजिनी नायडुंचे राजनितीक जीवन आणि स्वातंत्र्य संग्रामातील भुमिका*
सामान्य महिलांपेक्षा सरोजिनी अगदी भिन्न होत्या त्यांच्यात कायम काहितरी करण्याची उर्जा आणि उमेद होती त्यामुळे विवाहानंतर देखील त्यांनी लिखाण सुरू ठेवले त्यांच्या कवितांच्या प्रशंसकांमध्ये देखील हळुहळु वाढ होत गेली व लोकप्रियता देखील वाढत गेली.
कविता लिहीण्यात त्यांचे प्रभुत्व होते आणि साहित्याची देखील त्यांना चांगली जाण होती. आपल्या अवती भवतीच्या गोष्टी, भारताचे प्राकृतिक सौंदर्य आणि इतर ही विषयांना त्या आपल्या कवितांच्या माध्यमातुन अतिशय सुरेख पणे मांडत असत. त्यांच्या कवितांवर प्रेम करणारा फार मोठा रसिक वर्ग होता जो त्यांच्या कवितांना गाण्यांसारखे गुणगुणायचा.
1905 साली त्यांची बुल बुले हिंद ही कविता प्रकाशित झाली त्यानंतर त्यांच्या लोकप्रियतेत आणखीन भर पडली त्यानंतर एकामागोमाग सलग त्यांच्या कविता प्रकाशित होत गेल्या ज्यामुळे वाचकांच्या मनात त्यांनी एक जागा निर्माण केली. सरोजिनींच्या प्रशंसकांच्या यादीत जवाहरलाल नेहरू, रविन्द्रनाथ टागौर यांसारखे महान व्यक्तिमत्व देखील होते. सरोजिनी आपल्या कविता इंग्लिश भाषांमधुन देखील लिहीत असत.
त्यांच्या कवितांमधुन भारताच्या संस्कृतीचे अनोखे चित्र पहावयास मिळते. अश्या महान कवियित्री सरोजिनी नायडूची भेट ज्यावेळी भारताचे स्वातंत्र्य सेनानी गोपाळ कृष्ण गोखले यांच्याशी झाली तेव्हां त्यांच्या जीवनात मोठा बदल घडला. गोखलेंनी सरोजीनींना आपल्या लिखाणाची ताकद स्वातंत्र्याच्या लढाईत वापरण्याचा सल्ला दिला.
गोपाळ कृष्ण गोखलेंनी सरोजिनींना आपली बुध्दी आणि शिक्षण पुर्णपणे देशाला समर्पित करण्यास सुचविले. शिवाय ते त्यांना हे देखील म्हणाले की तुम्ही क्रांतीकारी कविता लिहा आणि स्वातंत्र्याच्या या लढाईत लहान लहान गांवामधील लोकांना प्रोत्साहीत करा जेणेकरून वर्षानुवर्ष गुलामगिरीत अडकलेले सामान्यजन मोकळा श्वास घेऊ शकतील आणि या समरात सहभागी होतील. सरोजिनींनी गोपाळकृष्ण गोखलेंच्या या सल्ल्यावर सखोल विचार केला आणि आपले व्यावसायिक लिखाण बंद करून स्वतःला राजकारणात पुर्णपणे समर्पित करून टाकले.
1905 साली बंगालच्या विभाजना वेळी महान क्रांतीकारी महिला सरोजिनी नायडू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधे सहभागी झाल्या होत्या. विभाजनामुळे त्या फार व्यथीत देखील होत्या पुढे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळण्याकरता त्या एक निष्ठावान देशभक्ता प्रमाणे सतत प्रयत्नं करत होत्या सामान्य जनांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत चेतवण्याकरीता संपुर्ण भारत त्यांनी पिंजुन काढला व लोकांमध्ये देशप्रेमाची भावना वाढीस लावण्यात आपले महत्वपुर्ण योगदान दिले.
सरोजिनी नायडुंनी मुख्यतः स्त्रियांच्यात जाऊन देशाला स्वातंत्र्य प्राप्त होण्याकरीता आपले क्रांतिकारी विचार प्रगट केले. ज्या सुमारास सरोजिनी नायडू महिलांमध्ये हे क्रांतीकारी विचार पेरत होत्या त्यावेळेसच्या काळात महिलांनी स्वतःला घराच्या चार भिंतींमध्ये कैद करून घेतले होते. त्या काळात महिलांची स्थिती फार मागासलेली होती. अश्या काळात स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेणे तर दुर स्त्रियांना घराबाहेर पाऊल ठेवण्याची देखील परवानगी नव्हती.
अश्या परिस्थीतीत चुल आणि मुल सांभाळणाऱ्या स्त्रियांची मानसिकता बदलणे हे कार्य अजिबात सोपे नव्हते परंतु या स्त्रियांना स्वातंत्र्य समरात येण्यास प्रोत्साहीत करणे हे अवघड काम सरोजिनी नायडू मोठया निष्ठेने करीत होत्या. सरोजिनी नायडू गावां गावांमध्ये जाऊन स्त्रीयांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून दयायच्या आपल्या विचारांनी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रोत्साहीत करीत असत या शिवाय त्यांनी महिला सशक्तीकरण आणि त्यांच्या अधिकारांकरता सुध्दा आपला आवाज बुलंद केला होता.
1916 ला जेव्हां त्या राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या त्यावेळी त्या गांधीजींच्या विचारांनी अत्यंत प्रभावित झाल्या आणि त्यांची विचारसरणी पुर्णपणे बदलुन गेली. सरोजिनी गांधीजींना आपला आदर्श मानु लागल्या, गांधीजींपासुन प्रेरणा घेत त्यांनी आपली पुर्ण ताकत देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्यात लावली.
1919 साली क्रुर ब्रिटीश शासनकर्त्यांनी  रॉलेट एक्ट समंत केला या अंतर्गत राजद्रोह दस्तऐवजावर कब्जा करणे अवैध मानण्यात आले होते. महात्मा गांधीजींनी या एक्ट विरोधात असहकार आंदोलनाचे नेतृत्व केले होते. या आंदोलनात सरोजिनी नायडूंनी गांधीजींचे पुर्णपणे समर्थन केले. गांधीजींच्या शांततापुर्ण नितीचे आणि अहिंसावादी विचारांचे पालन देखील केले.
या व्यतिरीक्त त्यांनी मोंटगु-चेम्सफोर्ड सुधारणा, खिलाफत आंदोलन, साबरमती संधी सत्याग्रह आणि नागरिक अवज्ञा आंदोलना सारख्या इतर आंदोलनांचे देखील समर्थन केले. एवढेच नव्हें तर सविनय कायदेभंग आंदोलनात त्या गांधीजींसमवेत कारागृहात देखील गेल्या. 1942 च्या भारत छोडो आंदोलनात त्यांना 21 महिने कारागृहात राहावे लागले होते या दरम्यान त्यांना कित्येक यातना देखील सहन कराव्या लागल्या होत्या. अश्या त-हेने स्वातंत्र्य संग्रामा दरम्यान त्यांनी कित्येक दिवस जेल मध्ये काढले आणि एक सच्च्या देशभक्ताचे कर्तव्य पार पाडले.
*राष्ट्रीय कॉंग्रेस अध्यक्ष आणि राज्यपालाच्या रूपात सरोजीनी नायडू*
सरोजिनी नायडूंचे स्वातंत्र्याच्या लढाईतील योगदान आणि स्वातंत्र्य संग्रामातील त्यांच्या सहभागामुळे त्यांच्या क्रांतिकारी विचारांचा प्रभाव सामान्य जनतेवर पडला होता त्या दरम्यान त्यांची लोकप्रियता आणखीन वाढली होती. त्यांच्या विचारांनी स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू अत्यंत प्रभावित झाले होते.
त्यांची प्रतिभा पाहुन 1925 साली त्यांना काँग्रेस अधिवेशनाची अध्यक्षा म्हणुन नियुक्त करण्यात आले पुढे 1932 ला भारताच्या प्रतिनिधी या नात्याने त्या दक्षिण अफ्रिकेत देखील गेल्या होत्या. भारताच्या क्रांतिकारी महिला सरोजिनी नायडूंनी भारताच्या स्वांतत्र्याकरता भारतियांव्दारे केल्या जाणाऱ्या अहिंसात्मक संघर्षाचे बारकावे सादर करण्यात आपली महत्वपुर्ण भुमिका बजावली होती.
एवढेच नव्हें तर त्यांनी गांधीवादी सिध्दांताचा प्रसार करण्याकरता केवळ युरोपातच नव्हे तर संयुक्त राज्य अमेरीकेपर्यंतची यात्रा केली व भारताला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर उत्तरप्रदेशाच्या पहिल्या गव्हर्नर (राज्यपाल) झाल्या. स्वतंत्र भारताच्या त्या पहिल्या गव्हर्नर होत्या भारताच्या सर्वात मोठया राज्याच्या त्या राज्यपाल झाल्या. सरोजिनी नायडूंनी आपल्या महान विचारांनी आणि गौरवपुर्ण व्यवहाराने आपल्या राजनितीक कर्तव्यांना उत्तम रितीने पार पाडले आणि त्यामुळे त्यांचे आजही स्मरण केले जाते.
 *सरोजिनी नायडूंचा मृत्यु*
देशाला स्वातंत्र्य मिळवुन देण्याकरता कठोर संघर्ष करणाऱ्या महान स्वातंत्र्य सेनानी व महात्मा गांधीजींच्या प्रिय शिष्या सरोजिनी नायडूंना 2 मार्च 1949 ला कार्यालयात काम करत असतांना हृदयविकाराचा तिव्र झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यु झाला.
अश्या तऱ्हेने आपलं संपुर्ण आयुष्य सरोजिनींनी देशाला समर्पित केलं. आपल्या जीवनात त्यांनी भरपुर ख्याती आणि सन्मान प्राप्त केला होता शिवाय त्या लोकांकरता प्रेरणास्त्रोत देखील ठरल्या.
13 फेब्रुवारी 1964 ला भारत सरकारनं त्यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांच्या सन्मानार्थ 15 पैश्यांचे डाकतिकीट प्रकाशित केले होते.
✍ *सरोजिनी नायडूंचे साहित्यातील योगदान*
सरोजिनी नायडूंनी केवळ एक महान क्रांतिकारी आणि चांगल्या राजनितीज्ञ म्हणुनच ख्याती प्राप्त केली नाही तर त्या एक चांगल्या कवियित्री म्हणुन देखील प्रसिध्द होत्या. आपल्या कवितांमधुन लोकांमध्ये क्रांतिकारी विचारांचे बीज तर पेरलेच शिवाय भारतिय संस्कृतीची देखील अद्भुत अशी व्याख्या केली. बालकांच्या साहित्याचे त्यांनी विपुल लेखन केले आणि त्याकरता देखील त्या प्रसिध्द झाल्या.

ईतकेच नव्हे तर त्यांच्या सुरेख कविता आणि गीतांमुळे त्यांना भारताची कोकिळा (भारताची नाइटिंगल) म्हणुन सन्मानित करण्यात आले होते. 1905 ला त्यांच्या कवितांचा संग्रह “गोल्डन थ्रेसहोल्ड” नावाने प्रकाशित झाला त्यांनतर त्यांनी आपले अन्य दोन संग्रह “दी बर्ड ऑफ टाईम” आणि “दी ब्रोकन विंग्स” देखील प्रकाशित केले या कवितांना केवळ भारतातील लोकांनीच पसंती दिली असे नव्हें तर या पुस्तकांना इंग्लंड मधे देखील मोठया संख्येने वाचकांनी पसंत केले आणि या मुळेच त्यांना एक शक्तीशाली लेखीका म्हणुन ओळख मिळाली.

प्रख्यात कवियित्री सरोजिनींनी कवितां व्यतिरीक्त काही आर्टिकल आणि निबंधांचे सुध्दा लिखाण केले होते जसे “वर्ड्स ऑफ़ फ्रीडम” हे त्यांच्या राजनितीक विचारांवर आधारीत होते. या शिवाय त्यांनी महिला सशक्तिकरणासारख्या सामाजिक मुद्दयाला देखील आपल्या पुस्तकांच्या माध्यमातुन वाचा फोडली होती. समाजात या लिखाणाचा खोलवर परिणाम झाला.

द फेदर ऑफ द डॉन ला त्यांची कन्या पद्मजाने 1961 ला एडिट करून प्रकाशित केले होते. त्यांचे इतर साहित्य “दी बर्ड ऑफ़ टाइम: साँग ऑफ लाइफ, डेथ अँड दी स्प्रिंग, दी ब्रोकन विंग: साँग ऑफ़ लव्ह, डेथ अँड स्प्रिंग, मुहम्मद जिन्नाःअन एम्बेसिडर ऑफ़ यूनिटी, दी सेप्ट्रेड फ्लूट: साँग्स ऑफ़ इंडिया, अलाहाबाद: किताबिस्तान, दी इंडियन वीवर्स, फीस्ट ऑफ़ यूथ, दी मैजिक ट्री एंड दी विज़ार्ड मास्क देखील फार चर्चित आणि प्रसिध्द आहेत. या व्यतिरीक्त त्यांच्या काही कवितांमधील सुंदर आणि लयबध्द शब्दांमुळे त्या कवितांना गाता येणे सुध्दा शक्य आहे.

🔮 *सरोजिनी नायडूंविषयी थोडक्यात महत्वपुर्ण माहिती*
वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी सरोजिनींनी 1200 ओळींचा ‘ए लेडी ऑफ लेक’ नावाचा खंडकाव्य लिहीला.
1918 ला त्यांनी मद्रास प्रांतिय संमेलनाचे अध्यक्षपद भुषविले.
1919 ला अखिल भारतीय होमरूल लीग प्रतिनीधी मंडळातील सदस्य या नात्याने त्या इंग्लंड दौऱ्यावर जाऊन आल्या.
1930 ला महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग आंदोलन सुरू केले गुजरात येथे धारासना मधील ‘मिठाच्या सत्याग्रहाचे’ नेतृत्व सरोजिनी नायडूंनी मोठया धैर्याने केले.
1942 साली ‘चले जाव’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि जेल मध्ये गेल्या.
1947 ला दिल्लीत झालेल्या आशियाई परिषदेचे त्यांनी अध्यक्षपद भुषविले.
1947 साली स्वतंत्र भारतातील उत्तर प्रदेश राज्याच्या पहिल्या राज्यपाल म्हणुन त्यांची निवड झाली.
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *विनम्र अभिवादन*🙏♾️
स्त्रोतपर माहिती 

बुधवार, १२ फेब्रुवारी, २०२०

महादजी शिंदे

महादजी शिंदे

जन्म : 3 डिसेंबर इ.स. १७३० उज्जैन
मृत्यू : १२ फेब्रुवारी १७९४ पुणे
पिता/माता : सरदार रानोजी राव शिंदे, चीमा बाई
राज्याभिषेक : 18 जानेवारी 1768 ई.
युद्ध : द्वितीय मराठा युद्ध- 1803 ई.-1806 ई.
शासन काल : 18 जानेवारी  1768 ई.-12 फेब्रुवारी 1794 ई.
धर्म : हिन्दू
महादजी शिंदे हे पेशवाईतील एक मुत्सद्दी. होते. पुणे शहरात त्यांचे शिंद्यांची छत्री या नावाचे स्मारक आहे.
शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यास सशक्त ठेवणारे अनेक मराठा नेते होते. महादजी शिंदे हे त्यापैकीच एक प्रसिद्ध मराठी वीर. हा राणेजीचा चिमाबाई नांवाच्या रजपूत बाईंच्या पोटी झालेला मुलगा.
महादजी शिंदे यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात शिवाजी महाराज, संभाजी महाराज, महाराजा रघुजी भोसले यांच्यानंतर महान सेनानी म्हणून घेतले जाते. इंग्रजांकडून मानाने यांना द् ग्रेट मराठा असे म्हटले जाई. पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर यांनी मराठा साम्राज्याला पुन्हा उभारी मिळवून देण्याचे काम केले. पहिल्या इंग्रज मराठा युद्धामध्ये त्यांनी इंग्रजाचा काही लढायांमध्ये निर्णायक पराभव केला व इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. त्यामुळे त्यांच्या निधनापर्यंत मराठा साम्राज्याला स्थैर्य लाभले.
🤺 *सैनिकी कारकीर्द*👮🎠
दक्षिण भारत
महादजी शिंदे वयाच्या दहाव्या वर्षापासूनच रणांगणावर आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होई. १७४० च्या निजामा विरुद्धच्या लढाईत त्यांनी दत्ताजी शिंदे व त्रिंबक किन्नड यांना साथ दिली होती. १७४२ मध्ये बेळूर च्या लढाईत महादजीने भाग घेतला होता या लढाईत मराठ्यांनी निझामच्या सैन्याला परतावून लावले होते.
⚜ *उत्तर भारत
१७४५ ते १७६१ दरम्यान ( जो मराठ्यांचा राज्य विस्तारातील सुवर्णकाळ मानला जातो) त्या काळात महादजी शिंदे यांनी जवळपास ५० लढायांचे नेतृत्व/ सहभाग घेतला, मालव, राजपुताना, बुंदेलखंड,१७४७, मारवाड १७४७ व हिम्मत नगर १७४८. ब्रिज, दोआब, रोहिलखंड, दिल्ली कुंजपूर तसेच पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीचा सहभाग होता. यातील महादजींच्या महत्त्वाच्या लढाया म्हणजे चंद्रावती गंज १७४६, फतेहाबाद १७४६, बडी साद्री.
मल्हाराव होळकरांच्या साथीने शिंदे यांनी अनेक राजपूत संस्थाने मराठा साम्राज्याखाली आणली. रतन गढ, लालगढ, बिकानेर, लासवारी, लाखमगढ, कुंभेर, डीग ही मराठा साम्राज्याला जोडली गेली. तसेच जोधपूर व जयपूर ह्या मोठ्या राजपूत राज्यांनी मराठा वर्चस्व मान्य करून टाकले. मथुरा हे मुघल सत्तेखाली होते ते मराठा अखत्यारीत आणून त्यांनी तेथील काही हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार केला. शिंद्यांचा अधिपत्याखाली मथुरेला संस्कृत शिक्षण केंद्र तयार झाले. जानेवारी १७५८ मध्ये महादजी यांनी ग्वाल्हेर येथे शिंद्यांचे राज्य बनवले.
🔮 *ग्वाल्हेरचे शासक*👑
जयाप्पा शिंदे जे शिंदे घराण्याचे प्रमुख होते ते २५ जुलै १७५५ रोजी राजस्थानमधील नागौर येथील लढाईत मारले गेले, त्यानंतर दत्ताजी शिंदे व जनकोजी शिंदे यांच्याकडे शिंदे घराण्याची सूत्रे आली. मराठ्यांच्या वाढत्या लष्करी वर्चस्वाला इस्लामी जिहादाचे उत्तर म्हणून लवकरच उत्तर भारतात अब्दाली विरुद्ध मराठे असा मोठा सामना झाला. बुरुडी घाटावरील लढाईत दत्ताजी शिंदेची नजीबकडून क्रूरपणे हत्या झाली. शिंद्यांनी अब्दालीविरुद्धच्या पानिपतच्या तिसऱ्या लढाईत हिरिरीने सहभाग घेतला होता. या लढाईत जनकोजी शिंदे मारला गेला, तसेच महादजी देखील लढता लढता घायाळ झाले होते. मराठ्यांनी युद्धात पळ काढल्यानंतर महादजी यांनी यशस्वीपणे माघार घेतली, या लढाईत त्यांचा पाय लुळा पडला तो पुढील जन्मभर तसाच राहिला. पानिपतच्या लढाईनंतर साहजिकच शिंदे घराण्याची सूत्रे महादजींकडे आली. मराठे-अब्दाली युद्धातील पराभवानंतर मराठा साम्राज्याचे विकेंद्रीकरण झाले व शिंदे हे स्वतंत्र मराठा संस्थानिक बनले व ग्वाल्हेर हे त्यांचे संस्थान बनले.
🎠 *पानिपतच्या लढाईनंतरची कारकीर्द*🎠🎠
पानिपतच्या लढाईतील विनाशानंतर महत्त्वाचे होते की मराठ्यांचे उत्तर भारतावरील वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करणे, १७७० मध्ये महादजीने भरतपूरच्या जाट राजा नवल सिंग याचा पराभव केला व मराठ्यांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले. १७७७ मध्ये पेशव्यांचे कोल्हापूर संस्थानाशी खटके उडाले होते यात महादजीने निर्णायक कामगिरी केली.
🤺 🎠🎠*पहिले इंग्रज-मराठा युद्ध*🔫🔫
१७७३ मध्ये नारायणराव पेशवे याचा खून झाला. व रघुनाथराव स्वयंघोषित पेशवा बनला. बाराभाईच्या कारभारानुसार नारायणरावचा मुलगा सवाई माधवराव पेशवा बनला व रघुनाथरावला पेशवे पदावरुन हटवले. या बारभाईंमध्ये महादजी व नाना फडणिसांची भूमिका महत्त्वाची होती. रघुनाथरावांना हा निर्णय पटला नाही व त्यांनी इंग्रजांची मदत घेण्याचे ठरवले.
🏇 *🔫🔫वडगावची लढाई*🎠🎠
१७७७ मध्ये नाना फडणीस यांनी कलकत्ता कौन्सिल बरोबर केलेला कराराचा भंग करत फ्रेंचाना पश्चिम किनारपट्टी वर बंदर उभारायची परवानगी दिली. ब्रिटिशांनी प्रत्युतरादाखल मुंबईवरून सैन्य पाठवले. जानेवारी १७७९ मध्ये ३,९०० ब्रिटिश सैन्य कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली पुण्यावर चालून गेले. वाटेत रघुनाथरावांचे सैन्यही येून मिळाले. मराठ्यांच्या सैन्य महादजी शिंदे व् तुकाजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली होते. ब्रिटीश सैन्याच्या वाटेत असंख्य अडथळे आणून त्यांचा चाल थंडावली व त्यांनी तळेगाव येथे तळ टाकला. महादजींनी वाटेतील सर्व रस्त्यामधील गावातील कुरणे जाळली विहरी विषमय करून टाकल्या, तसेच मुंबईकडून येणारी रसदही पूर्णपणे तोड्न टाकली. ब्रिटीश सैन्याचे अन्नपाण्याहून हाल होउ लागले. ब्रिटीशांनी माघार घेण्याचे ठरवले १२ जानेवारी १७७९ रोजी मध्य रात्री मराठ्यांनी ब्रिटीशांवर आक्रमण केले व सर्व बाबतीत चित करून वडगाव येथे शेवटी ब्रिटीश सैन्य महादजींना शरण आले.
१६ जानेवारी रोजी वडगावचा तह झाला. ईस्ट इंडिया कंपनीने १७७३ पासून मिळवलेला सर्व प्रांत परत करण्यात यावा असे ठरले. यात साष्टी, ठाणे व जवळपास सर्व गुजरात पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. महादजीने ब्रिटिशांकडून युद्धाचा खर्च म्हणून ४१,००० रुपये देखील वसूल केले. रघुनाथरावाला मराठ्यांच्या हाती देण्यात यावे असे ठरले.त्यानुसार १८ जानेवारी १७७९ रोजी रघुनाथराव व त्याचच्या सैनिकांना पकडण्यात आले. तसेच महादजीने सखाराम बापूचा पराभव करून त्यागी सिंहगडाच्या तुरुंगात रवानगी केली
♻ *सिप्री येथील हार📝
ब्रिटीश गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टींन यांनी वडगाव चा तह मुंबईच्या अधिकाऱ्यांना यावर सही करण्याची परवानगी नव्हती असा युक्तीवाद करत नामंजूर केला व शमलेले युद्ध पुन्हा सुरु करण्यास आदेश दिले, कर्नल गोडार्ड यांनी ६००० ची फौज फेब्रुवारी १७७९ मध्ये घेउन अहमदाबाद काबीज केले व १७८० मध्ये भासीं  बंगालमधून निघून कॅप्टन पॉपहॅमनेनी ग्वाल्हेर काबीज केले. वॉरन हेस्टिंग्जने महादजी शिंदेंना अजून नामोहरम करण्यासाठी मेजर केमॅकला पाठवले. त्याने महादजी शिंद्यांच्या फौजेला गाठून हैराण केले. फेब्रुवारी १७८१ मध्ये ब्रिटिशांनी सिप्री येथे महादजी शिंद्यांच्या सेनेचा पराभव केला. सिप्रीच्या पराभवानंतर देखील महादजीने आपल्या आघाड्या शाबूत ठेवत ब्रिटिशांना आव्हान दिले. ब्रिटिशांप्रमाणेच महादजीचे सैन्य संख्येने जास्त व ब्रिटिशांच्या शिस्तबद्ध सैनिकांप्रमाणेच तुल्यबळ असल्याने महादजीवर पूर्णपणे मात करणे अवघड गेले, तसेच महादजीलाही ब्रिटिशांच्या आधुनिक युद्धतंत्रापुढे त्यांना अजून मात देणे अवघड गेले.
⚛📃📃📝 *सालबाईचा तह १७ मे १७८२*
मुख्य पान: सालबाईचा तह
महादजी शिंदे यांचा इंग्रजांकडून पराभव झाल्यानंतर महादजीने इंग्रजाबरोबर मुत्सदेगिरीने तहाची बोलणी केली. हा तह सालाबाईचा तह या नावाने ओळखला जातो. या तहानुसार इंग्रजांनी सवाई माधवरावला पेशवा म्हणून मान्यता दयावी व रघुनाथरावला वेतन द्यावे. या तहानुसार शिंद्यांना यमुनेच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत परत मिळाला पण उज्जैनमध्ये माघार घ्यावी लागली.
इंग्रजाशी झालेल्या तहानंतर इंग्रजांबरोबर असलेल्या शस्त्रसंधीचा उपयोग महादजीने चांगलाच उपयोग करून घेतला.
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *विनम्र अभिवादन*🙏
स्त्रोत ~ माहितीपर ब्लॉग 

शनिवार, ८ फेब्रुवारी, २०२०

कल्पना दत्ता


कल्पना दत्ता  (भारतीय क्रांतिकारक)
जन्म : 27 जुलै, 1913 (सिरपूर, चितगांव (बांग्लादेश), बंगाल)
मृत्यु : 8 फेब्रुवारी 1995  (कलकत्ता, पश्चिम बंगाल)
इतर नाव : कल्पना जोशी
पति : पूरन चंद जोशी
नागरिकता : भारतीय
चळवळ : भारतीय स्वातंत्र्य लढा
जेल यात्रा : फेब्रुवारी 1934 मध्ये 21 वर्षाच्या कल्पना दत्त यांना आजीवन कारावासाची शिक्षा झाली.
अन्य माहिती  : सप्टेंबर  1979  मध्ये कल्पना दत्त यांना पुण्यात 'वीर महिला' या उपाधि ने सम्मानित  केले गेले.
कल्पना दत्ता  (नंतर कल्पना जोशी) ही एक भारतीय स्वातंत्र्य चळवळीतली कार्यकर्ती होती. ती सूर्य सेनच्या सशस्त्र चळवळीत होती. हे सूर्य सेन १९३० च्या चितगांवला झालेल्या शस्त्रागार धाडेच्या मागे होते. नंतर ती भारतीय कम्युनिस्ट पक्षाची सदस्य झाली, व तिने पुरणचंद जोशीशी विवाह केल. ती १९४३ साली भाकपची अध्यक्ष झाली.
💁‍♀️ *सुरुवातीचे जीवन
कल्पनाचा जन्म बंगालमधील चितगांव जिल्ह्यातील सिरपूर गावात झाला. १९२९ साली मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर, ती कलकत्त्याला बे्थ्थ्यून काॅलेज येथे विज्ञानात पदवी करण्यसाठी गेली. तेथे असतानाच ती विद्यार्थी संघ या क्रांतिकारी संस्स्थेची सदस्य झाली. त्या संस्थेत वीणा दास, प्रीतिलता वड्डेदार, ह्या पण सक्रिय होत्या.
🔫 *सशस्त्र चळवळ🔫
चितगांव शस्त्रागार धाड ही १८ एप्रिल १९३० ला पडली. त्यानंतर कल्पना १९३१ सालच्या मे मध्ये सूर्य सेनच्या सशस्त्र गटाच्या 'भारतीय रिपब्लिकन आर्मी’ च्या चितगांव शाखेत भरती झाली. सप्टेंबर १९३१ ला सूर्य सेनने तिला व प्रीतिलता वड्डेदारला चितगांव येथील युरोपियन क्लबवर हल्ला करण्यासाठी नेमले. पण हल्ला करण्याच्या एक आठवडा आधीच तिला हल्ल्याच्या जागेची टेहळणी करताना अटक झाली. जामिनावर सुटका झाल्यावर तिने लपून राहायला सुरुवात केली. १७ फेब्रुवारी १९३३ रोजी पोलिसांनी तिच्या लपण्याच्या जागेला घेरा दिला व सूर्य सेनला पकडले; पण कल्पना तिथून पळून निघाली. पुढे कल्पनाला १९ मे १९३३ रोजी अटक झाली. चितगांव धाडीच्या दुसर्‍या सुनावणीत तिला शिक्षा झाली. १९३९ मध्ये तिची सुटका झाली
🙍🏻‍♀️ *नंतरचे जीवन*
कल्पना १९४० ला कलकत्ता विद्यापीठातून पद्वीधर झाली, व भाकपची सदस्य झाली. १९४३ च्या बंगालमधील दुष्काळात व बंगालच्या फाळणीच्या वेळेस तिने स्वयंसेवक म्हणून काम केले. तिने तिचे आत्मकथात्मक पुस्तक, चितगांव शस्त्रागार धाडीच्या आठवणी हे १९४५ ला इंग्रजीत प्रकाशीत केले. १९४६ मध्ये ती बंगाल विधान सभेत चितगांव येथून भाकप कडून निवडणूक लढली, पण जिंकू शकली नाही.
नंतर तिने भारतीय संख्याशास्त्रीय संस्था (Indian Statistical Institute) येथे निवृत्त होईपर्यंत नोकरी केली. ८ फेब्रुवारी १९९५ रोजी तिचा म्रुत्यू झाला
💁‍♀️ *वैयक्तिक जीवन
कल्पना दत्ताने १९४३ मध्ये भाकपचे अध्यक्ष पुरनचंद जोशी, ह्यांच्याशी विवाह केला.. त्यांना दोन मुले झाली. चंद व सूरज. चंद जोशी हा हिंदुस्तान टाइम्समध्ये पत्रकार होता.
🎞️ 🎬📺*चित्रपट*
चितगांवच्या धाडीवर २०१० मध्ये 'खेले हम जी जान से' हा हिंदी चित्रपट निघाला. त्यात दीपिका पादुकोनने कल्पनाचे काम केले होते. पुन्हा १२ आॅक्टोबर २०१२ ला 'चितगांव' हा आणखी एक चित्रपट निघाला त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन वेदव्रत पॅन, ह्या नासातील माजी वैज्ञानिकाने केले होते.
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *विनम्र अभिवादन*🙏
♾️♾️♾️ स्त्रोत ~ संकलित ब्लॉग 

शनिवार, १ फेब्रुवारी, २०२०

अंतराळवीर कल्पना चावला Kalpana chawla

अंतराळवीर कल्पना चावला


जन्म : 17 मार्च 1962 (कर्नाल, हरियाणा)
अंतराळात मृत्यू : 1 फेब्रुवारी 2003 (टेक्सासवर अंतराळात)
कल्पना चावला ही अमेरिकन अंतराळवीर होती. ती भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.
💁‍♀ *बालपण*
कल्पना चावला यांचा जन्म १७ मार्च १९६२ रोजी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव बनारसीलाल चावला असे होते. त्यांच्या आईचे नाव संयोगीता चावला असे होते. त्यांना एक भाऊ व एक बहिण होती. कल्पना चावला यांना मुलांच्या धांगडधिंगाण्यात आवड होती. नटणे, घरकाम यापेक्षा त्यांना मित्र मैत्रिणींबरोबर सायकलने ट्रीप ला जाण्यात रस वाटे. त्यांना बाहेर च्या जगात फिरण्यास खूप आवडे. त्या भावाबरोबर खूप मस्ती करायच्या. त्या सर्वात लहान व सर्वांच्या लाडक्या होत्या. त्यांना सर्वजण लाडाने ‘मोट’ असे म्हणत. त्यांचा भाऊ संजय हा त्यांचा लहानपणी आदर्श होता. त्याच्याबरोबर दंगामस्ती करण्यात लहान कल्पना पटाईत होत्या
शिक्षण कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण गावातील टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले.कल्पना चावला हुशार असल्याने त्या नेहमी त्या पहिल्या पाच नंबरात असत. शिक्षकांच्या ही त्या लाडक्या झाल्या होत्या. त्यांचा स्वभाव अतिशय साहसी होता. त्या कराटे शिकल्या.भरतनाट्यम या कला प्रकारातही त्यांनी नैपुण्य प्राप्त केले.संजय हा त्यांचा भाऊ कर्नालच्या फ्लाईंग क्लबमध्ये जात होता. तेव्हा कल्पना यांनाही तेथे जावे असे वाटत. पण जेव्हा वडिलांनी नोंदणी अर्ज दिला तेव्हा अधिकाऱ्यांनी कल्पना स्त्री आहे, ती वैमानिक होणे योग्य वाटत नाही असे सांगितले. तसेच त्यांनी कल्पना यांना या वेडापासून परावृत्त करण्यास सांगितले. पंजाब विद्यापीठातून त्यांनी १९८२ साली एरोनॉटिकल अभियांत्रिकी पदवी घेतली. पुढे १९८४मध्ये अर्लिंगटन टेक्सास विद्यापीठातून एरोनॉटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण घेऊन,त्यांनी कॉलोरॅडो विदयापीठांतून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून १९८८मध्ये डॉक्टरेट मिळवली.
👫🏻 *विवाह
शैक्षणिक काळात कल्पना यांची जीन पियरे टॅरिसन (जेपी) या युवकाशी ओळख झाली. जेपी यांचा विमानाचे प्रशिक्षण देण्याचा व्यवसाय होता. त्यांच्याकडून कल्पना यांना विमान शिकता आले. तसेच स्कूबा डायव्हिंग हा रोमांचक खेळ प्रकारही त्यांना जेपी यांच्याकडून शिकता आला. लहानपणापासून विमान शिकण्याचे स्वप्न अमेरिकेत काही दिवसातच पूर्ण झाले. जेपी हे मुळचे फ्रेंच होते. त्यांचे मैत्रीचे नाते प्रेमात बदलले व १९८४ साली जेपी व कल्पना यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्यांना विमान नीट उडवण्यास येऊ लागले. त्यांची संगीतातील आवड वाढू लागली
🚀 *कार्य🚀🚀
डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणून त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला
🔭🌋 *कराडचे कल्पना चावला विज्ञान केंद्र*
कल्पना चावला यांच्या मृत्यूने व्यथित झालेल्या कराडच्या टिळक हायस्कूलमधील संजय पुजारी नावाच्या विज्ञान शिक्षकांनी कल्पना चावलांच्या वडिलांच्या, बनारसीलाल चावला यांच्या परवानगीने कराडमध्ये कल्पना चावला विज्ञान केंद्र सुरू केले आहे. लाला पडणाऱ्या या प्रश्नांची उत्तरे त्याला प्रत्यक्ष कृतीमधून शोधता आली पाहिजेत, विज्ञानाच्या निकषांवर त्याला विचार करता यायला पाहिजे, प्रयोग करता आले पाहिजेत, अशी अनेक उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून उभे केलेले हे ’कल्पना चावला विज्ञान केंद्र’, संजय पुजारी यांनी १ जुलै २००६ या दिवशी स्थापन केले.
कल्पना चावला विज्ञाना केंद्राचे कार्य कसे चालते, हे पाहण्यासाठी कल्पनाचे वडील बनारसीलाल चावला यांनी केंद्राला भेट दिली होती. त्‍यांनी केंद्राचे काम पाहून मोठी देणगीसुद्धा दिली. कल्पना चावला यांच्या भगिनी सुनीतादीदी यांनीही ५० हजार रुपये किमतीची पुस्तके या केंद्रासाठी दिली. भारतात या नावाचे हे एकमेव केंद्र असेल अशी ग्वाही बनारसीलाल यांनी दिली.
या विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालय आहे. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञानाच्या विविध मूलभूत शाखा यांविषयीची अनेक पुस्तके, विश्वकोश, चरित्रे, विज्ञानाशी संबंधित सीडी आणि डीव्हीडी असा मोठा संग्रह मुलांना संदर्भासाठी उपलब्ध करून दिला जातो.
‘शाळेबाहेरची शाळा’ असे या केंद्राच्या कार्याचे स्वरूप आहे. हसतखेळत आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञानाचे शिक्षण देणे हे कल्पना चावला विज्ञान केंद्राचे धोरण आहे. या दृष्टीने केंद्राचे समन्वयक म्हणून काम करणारे पुजारी सर आणि त्यांना मदत करणारे त्यांचे इतर शिक्षक सहकारी सतत प्रयत्नशील असतात
🚀✈ *केंद्राचे कार्यक्रम आणि उपक्रम📺
वर्षांतल्या ५२ रविवारी आणि अन्य सुट्ट्यांच्या दिवशी कल्पना चावला विज्ञान केंद्रामध्ये विविध विज्ञानविषयक कार्यक्रमांचे, उपक्रमांचे आयोजन केले जाते. आकाशनिरीक्षण, विमानांच्या आणि अग्निबाणांच्या प्रतिकृती, पक्षिनिरीक्षण, वनस्पतींची ओळख, औद्योगिक क्षेत्रांना तसेच विज्ञान संशोधन केंद्रांना भेटी, जंगलभ्रमंती, शास्त्रज्ञांची, तज्ज्ञांची व्याख्याने, खेळण्यांमधून विज्ञान समजून घेणे, शालेय पुस्तकातील विज्ञानाची तत्त्वे प्रयोगांच्या आधारे समजून घेणे अशा अनेकविध उपक्रमांच्या माध्यमांतून मुलांना विज्ञानाची गोडी लावण्याचे काम या विज्ञान केंद्रात केले जाते
कल्पना चावला विज्ञान केंद्राचा साचेबद्ध असा कोणताही कार्यक्रम किंवा अभ्यासक्रम नाही, वेळापत्रक नाही, परीक्षा नाहीत आणि म्हणूनच कोणतेही ताणतणाव नाहीत. प्रत्येक रविवार वेगळा असतो. त्यामुळे मुलेसुद्धा प्रत्येक रविवारची आणि सुट्टीच्या दिवसाची वेगळ्या अर्थाने वाट पाहत असतात.
📖📓📒📃🔭 *विज्ञान शिकण्याची वेगळी पद्धत*
कल्पना चावला केंद्रात शिकविण्याची पद्धतसुद्धा वेगळी आहे. केंद्रातली मुले जर एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यातील संकल्पना स्लाइड शो किंवा फिल्म्सच्या माध्यमातून समजून घेतात. काही तज्ज्ञ व्यक्तींना या संदर्भात व्याख्यानासाठी आमंत्रित केले जाते. नंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुले विमानांच्या प्रतिकृती तयार करतात.
थोडक्यात, या उपक्रमामधून केवळ विमानांच्या प्रतिकृती करण्याचे कौशल्य मुले शिकत नाहीत तर त्यामागचे विज्ञानसुद्धा समजून घेतात. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, विज्ञान प्रसारक अरविंद गुप्ता, ज्येष्ठ आकाश अभ्यासक हेमंत मोने, विज्ञानलेखक प्रा. मोहन आपटे अशा अनेक नामवंतांशी संवाद साधण्याची संधी कल्पना चावला विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कराडच्या मुलांना मिळाली आहे.
पुजारी सरांनी कल्पना चावला विज्ञान केंद्रातर्फे २००८ साली नाट्यरूपांतराच्या आणि सिनेमाच्या माध्यमांतूनही विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्‍न केला. ३४ बालकलाकारांना घेऊन ‘धमाल विज्ञानाची’ हा बालचित्रपट केंद्राने तयार केला. गॅलिलिओ गॅलिली, सर आयझॅक न्यूटन आणि थॉमस अल्व्हा एडिसन हे तीन शास्त्रज्ञ मुलांना भेटतात आणि आपण लावलेल्या शोधांबद्दलचे प्रयोग त्यांना दाखवितात, अशी या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ ही कराडची नवी ओळख झाली आहे.
🔮 *कल्पना चावला यांचे मराठी सुविचार*
मी विशिष्ट प्रदेशाचा, देशाचा ही भावना गळून पडण्यासाठी ताऱ्यांकडे बघा; कारण तेव्हा तुम्ही एका अवकाशाचे झालेले असता.
         🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏 *विनम्र अभिवादन* 🙏
     संदर्भसह संकलित माहिती  स्त्रोत -ब्लॉग 

आगामी झालेले