नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बुधवार, २९ जुलै, २०२०

जागतिक व्याघ्र दिन



२९ जुलै
🐅 जागतिक व्याघ्र दिन 🐅
२९ जुलै २०१० रोजी रशिया मधील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या व्याघ्र परिषदेत हा दिवस जागतिक व्याघ्र दिन म्हणून घोषित करण्यात आला.
29 जुलै हा दिवस 'जागतिक व्याघ्र दिवस' म्हणून साजरा करताना वाघोबांचे जंगली अस्तित्व सुरक्षित राहते आणि ती गगनभेदी डरकाळी पुन्हा एकदा चालू केली जाते.

वाघ हे नाव उच्चारताच जंगलांत निर्धास्त चळवळ, काळजाचा थरकाप उडविणारे डरकाल अशा अनेक असंख्य गुणधर्म समोर येतात. पण खेळ, मनोरंजन, स्वातंत्र्यंतर वाढत लोकसंख्यामुळे वाघांच्या प्रवासावर आक्रमण होते. म्हणूनच हा डरका लुप्त होणार आहे. 29 जुलै हा दिवस 'जागतिक व्याघ्र दिवस' म्हणून साजरा करताना वाघोबांचे जंगली अस्तित्व सुरक्षित राहते आणि ती गगनभेदी डरका पुन्हा एकदा चालू केली जाते.
पुढील वर्षी ऑक्टोबर मध्ये व्हायगणनेला सुरुवात होईल. ही गणना पूर्ण झाली आहे 2018 च्या डिसेंबर मध्ये आकडेवारीत येण्याची शक्यता आहे. या गणनेत वाघांची संख्या दोन हजार 500 पर्यंत जाण्याचा अंदाज संशोधक व वाइल्डलाईफ कन्झर्व्हेशन ट्रस्टचे अध्यक्ष अनिश अंधेरिया यांनी वर्तविले.
2010 मध्ये वाघांची संख्या एक हजार 700 होती. हा आकडा 2014 च्या आकडेवारीनुसार दोन हजार 226 पर्यंत पोहोचला. हा वाढ आनंददायी असली तरी जंगलाची गुणवत्ता कमी होत आहे. मध्येमध्ये.
महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, आसाम, तामिळनाडू या राज्यांमध्ये वाघांची वाढ झाली आहे. ज्या राज्यांमध्ये वाघांची संख्या वाढत आहे तेथे संस्था, सरकार, स्थानिक यांचे संयुक्त प्रयत्न यशस्वी झाले आहेत. यामध्ये वन्यप्राणींची सुरक्षा अधिक आहे आणि कायद्याची भीती असणे आवश्यक आहे.
बोर अभयारण्य ऑगस्ट 2014 मध्ये टिगार प्रकल्पाची गुणवत्ता दिली गेली. भारतातील एक नवीन आणि सर्वात लहान पण जैवविविधतेने नटलेला असा वाघ प्रकल्प आहे. 2010 मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्य तहगार प्रकल्पाची (सह्याद्री टिगर प्रकल्प) दर्जा देण्यात आला. एकूण क्षेत्र 1165.56 चौ. किमी येथे आहे 5-7 वाघ आढळतात.
भारत हा जगातील सर्वाधिक वाघ देश आहे. त्यातही एकट्या महाराष्ट्रात 69 वाघांची वाढ झाली. वाघांची वाढ म्हणजे वनवृद्धी प्रतीक आहे. नागपूर विभागात वाघ टप्प्याटप्प्याने खासकरून मोठ्या प्रमाणात वाघ वाढल्यामुळे नागपूर हे जागतिक टायगर कॅपिटल म्हणून उदयास येत आहे.
वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. फेलिडी या मार्जार कुळातील सर्वात मोठे प्राणी आहे. आज देशभरात 39 टिगर प्रकल्प आहेत. वाघांचे अधिवास घनदाट जंगलात असतकारणे हे ठिकाण जमिनीची धूप नाही. परिणामी पाण्याचे स्रोत कायम राहतात. या स्रोतामुळेच 39 व्याघ्र प्रकल्पातून छोटया-मोठ्या 350 पेक्षा अधिक नद्यांचा उगम होतो. भूगर्भात पाणी पातळी खूप चांगली राहण्यास मदत करते. त्यातून जैवविविधतेचे संवर्धन होते. यावरून आपण टायगर प्रकल्पाचे महत्त्व लक्षात घेता येईल.

🐯वाघाच्या प्रजाती🐅
🐾बंगाल टायगर: भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि दक्षिण तिबेटमध्ये ही प्रजाती आढळते.
🐾इंडोचायनीज टायगर: कंबोडिया, चीन, म्यानमार, थायलँड आणि व्हिएतनामच्या डोंगराळ भागांमध्ये हा वाघ सापडतो.
🐾मलयन टायगर: मलय बेटावर वाघाची ही प्रजाती सापडते.
🐾सायबेरियन टायगर: सायबेरियामध्ये वाघाची ही प्रजाती आढळते.
🐾साउथ चीन टायगर: वाघाची ही प्रजाती चीनच्या दक्षिण भागात आढळते.
🐾सुमात्रन टायगर: ही प्रजाती सुमात्रा बेटावर आढळते.

गुरुवार, २३ जुलै, २०२०

क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद


क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद 🔫
जन्म : २३ जुलै, १९०६
(भाबरा, झाबुआ, अलिराजपूर, मध्यप्रदेश)
विरमरण : २७फेब्रुवारी,  १९३१
(अल्फ्रेड पार्क, अलाहाबाद)
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना: कीर्ति किसान पार्टी,  
            नवजवान किसान सभा
धर्म: हिंदू
वडील: पंडित सिताराम तिवारी
आई: जगरानी देवी

          चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्या अलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पुर्वज कानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार ते वाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले.
            वाराणसीला संस्कृतचे अध्ययन करीत असताना वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांनी कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. ते इतके लहान होते की, त्यांना पकडण्यात आले तेव्हा त्यांच्या हातांना हातकडीच बसेना. ब्रिटीश न्यायाने या छोट्या मुलाला १२ फटक्यांची आमानुष शिक्षा दिली. फटक्यांनी आझादांच्या मनाचा क्षोभ अधिकच वाढला, व अहिंसेवरील त्यांचा विश्वास पार उडाला. मनाने ते क्रांतिकारक बनले. काशीत श्रीप्रणवेश मुखर्जींनी त्यांना क्रांतिची दीक्षा दिली. सन १९२१ सालापासून १९३२ सालापर्यंत ज्या ज्या क्रांतिकारी चळवळी, प्रयोग, योजना, क्रांतिकारी पक्षाने योजल्या, त्यात चंद्रशेखर आझाद हे आघाडीवर होते.
       साँडर्सचा बळी घेतल्यावर चंद्रशेखर आझाद हे जे निसटले ते निरनिराळे वेष पालटून भूमिगत स्थितीत उदासी महंताचा चेला बनले होते. कारण की, या महंताजवळ पुष्कळ द्रव्य होते. ते द्रव्य आझाद यांनाच मिळणार होते, परंतु आझादांना त्या मठातील मनसोक्त वागणे पसंत पडले नाही म्हणून त्यांनी तो नाद सोडून दिला. पुढे ते झाशी येथे राहू लागले. तेथे मोटार चालवणे व पिस्तूलाने गोळी मारणे, अचूक नेम साधणे याचे शिक्षण त्यांनी घेतले.
         काकोरी कटापासून त्यांच्या डोक्यावर फाशीची तलवार लटकत होती. तरी त्या खटल्यातील क्रांतिकारकांना सोडविण्याच्या योजनेत ते गर्क होते. वर वर पाहणार्‍याला त्यांनी क्रांतिकार्य सोडले आहे असे वाटे.
         गांधी आयर्वीन करार होत असताना त्यांनी गांधीजींना असा संदेश पाठविला की, आपल्या वजनाने भगतसिंग वगैरेंची सुटका आपण करावी, असे झाल्यास हिंदुस्थानच्या राजकारणाला निराळे वळण लागेल, परंतू गांधींनी तो संदेश फेटाळून लावला. तरी आझादांनी क्रांतिकारकांना सोडविण्याचे जोरदार प्रयत्न चालू ठेवले.”मी जीवंतपणी ब्रिटीश सरकारच्या हाती कधीच पडणार नाही’,ही आझादांची प्रतिज्ञा होती. २७ फेब्रुवारी १९३१ ला ते शेवटचे अलाहाबादच्या आल्फ्रेड पार्कमध्ये शिरले. पो. अधिक्षक नॉट बॉबरने तेथे येता क्षणी आझादांवर गोळी झाडली. ती त्यांच्या मांडीस लागली. पण त्याच वेळी आझादांनी नॉट बॉबरवर गोळी झाडून त्याचा हातच निकामी केला. मग ते सरपटत एका जांभळीच्या झाडाआड गेले. हिंदी शिपायांना ओरडून ते म्हणाले,” अरे शिपाई भाईंओ, तुम लोग मेरे ऊपर गोलियाँ क्यों बरस रहे हो ? मै तो तुम्हारी आजादी के लिये लढ रहा हूँ ! कुछ समझो तो सही !” इतर लोकांना ते म्हणाले,” इधर मत आओ ! गोलियाँ चल रही है ! मारे जाओगे ! वंदे मातरम् ! वंदे मातरम् !”
        आपल्या पिस्तुलात शेवटची गोळी राहिली, तेव्हा ते त्यांनी आपल्या मस्तकाला टेकले आणि चाप ओढला ! तत्क्षणी त्यांचे प्राण त्यांचा नश्वर देह सोडून पंचतत्वात विलीन झाले.
       नॉट बॉबर उद्गारला, ” असे सच्चे निशाणबाज मी फार थोडे पाहिले आहेत !”
       पोलिसांनी त्यांच्या निष्प्राण देहात संगिनी खुपसून ते मेल्याची खात्री करून घेतली. त्यांचा मृतदेह आल्फ्रेड पार्कमध्ये एक दरोडेखोर मारला गेला, असा अपप्रचार करीत, तसाच जाळून टाकायचा सरकारने प्रयत्न केला. पण पंडीत मालवीय, सौ. कमला नेहरू यांनी तो उधळून लावून त्यांच्या अर्धवट जळलेल्या देहाची चिता विझवून पुन्हा त्यांचा अंत्यविधी हिंदू परंपरेप्रमाणे केला. २८ फेब्रुवारीला त्यांची प्रचंड अंत्ययात्रा काढून एका विराट सभेत सर्व पुढार्‍यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
     भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.
        🇮🇳 जयहिंद 🇮🇳     
 
🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷

मंगळवार, १४ जुलै, २०२०

लघु कथा

✨ *अति लघु कथा - संकलित 

✨ लघु कथा  - - १

*आईच्या नावे असलेली जागा आपल्या नावावर करून घेण्याची सुप्त इच्छा मनात धरून आईच्या ताब्यासाठी दोन भाऊ भांडत होते. आईला विचारल्यावर ती म्हणाली जो माझ्या तीन औषधाच्या गोळ्यांची नावे एका झटक्यात सांगेल त्याच्याकड़े मी जाईन. दोन्ही भाऊ खजील झाले.*

✨ लघु कथा ..२.

*शिक्षणासाठी दूर देशी गेलेल्या गरीब होतकरु मुलाने आईला पत्र पाठवले त्यात त्याने लिहिले, इथे माझी जेवणाची चंगळ आहे. काळजी करु नकोस. आईने ते पत्र वाचून एक वेळेचे जेवण सोडले कारण पत्राच्या शेवटी मुलाच्या अश्रुने शाई फुटली होती.*

✨ लघु कथा  - -३.

*आजोबाच्या काठीला हाताने ओढत नेणाऱ्या नातीला पाहून लोक म्हणाले, अग हळू हळू आजोबा पडतील ना. आजोबा हसून म्हणाले, पड़ींन बरा, माझ्याजवळ दोन काठया असताना.*

✨ लघु कथा  - - ४.

*आंब्याच्या झाडावर चढून चोरुन आंबे काढणाऱ्या मुलांच्या पाठीत रखवाल दाराने काठी घातली आणि थोडा वेळ धाक म्हणून त्यांना झाडाला बांधून ठेवले. का कुणास ठाऊक पण त्यानंतर त्या झाडाला कधीच मोहर आला नाही.*

✨लघु कथा  - -५.

*ऑफीसातून दमून आल्यावर बाबाने आजीचे पाय चेपून दिल्याचे पाहून नातीने न सांगता बाबाच्या पाठीला तेल लावून दिल्याचे पाहून आजी म्हणाली, ताटातील वाटीत आणि वाटीतलं ताटात.*

✨लघु कथा  - -६.

*वडील गेल्यावर भावांनी सम्पत्तीची वाटणी केल्यावर म्हाता-या आईला आपल्या घरी नेताना बहीण म्हणाली, मी खुप भाग्यवान, माझ्या वाट्याला तर आयुष्य आलय.*

✨लघु कथा  - -७.

*काल माझा लेक मला म्हणाला बाबा मी तुला सोडून कधीच कुठे जाणार नाही कारण तू पण आजी आजोबांना सोडून कधी राहिला नाहीस. मला एकदम वडिलोपार्जित प्रॉपर्टी नावावर झाल्यासारखे फीलिंग आले मला .*
   

✨लघु कथा  - -८.

*खूप दिवसांनी माहेरपणाला आलेली नणंद tv सिरीयल पहाता पहाता वहिनीला म्हणाली वहिनी किती मायेने करता तुम्ही माझे , तर वहिनी म्हणाल्या अहो तुम्ही पण माहेरी समाधानाचे वैभव उपभोगायलाच येता की .* *सिरीयल मधल्या नणंदेसारखी आईचे कान भरून भांडणे कुठे लावता . मग मी तरी काय वेगळे करते.* 
  *रिमोट ने tv केंव्हाच बंद केला होता.*

✨लघु कथा  - -९.

*तिच्या नवऱ्याचा मित्र भेटायला आला आज हॉस्पिटल मध्ये , तो खूपच आजारी होता म्हणून. जाताना बळेबळेच*
*5000 चे पाकीट तिच्या हातात कोंबून गेला , म्हणाला लग्नात आहेर द्यायचाच राहिला होता , माझा दोस्त*  *बरा झाला की छानसी साडी घ्या.*
*त्या पाकिटा पुढे आज सारी प्रेझेंट्स फोल वाटली तिला.*

✨ लघु कथा  - -१०.

*आज भेळ खायची खूप इच्छा झाली तिला ऑफिस सुटल्यावर पण घरी जायला उशीर होईल आणि सासूबाईंना देवळात जायचे असते म्हणून मनातली इच्छा मारून धावतपळत घर गाठले तिने , स्वैपाकखोलीत शिरली तर सासूबाई म्हणाल्या हातपाय धू पटकन, भेळ केलीय आज कैरी घालून. खूप दिवस झाले मला खावीशी वाटत होती.*

✨  लघु कथा  - -११.

 *तिन्हीसांजेला सुमतीबाई देवापाशी जपमाळ घेऊन बसल्या होत्या. तेवढ्यात मुलगा कामावरून आला. पाठोपाठ मोगऱ्याचा सुवास आला. सूनबाईच्या केसात फुलला असेल या विचाराने त्यांनी अजूनच डोळे घट्ट मिटून घेतले. थोड्यावेळाने जप झाल्यावर डोळे उघडून पाहतात तर काय मोगऱ्याची ओंजळभर फुले त्यांच्या बालकृष्णासाठी ओटीत वाट पहात होती . त्यांची कूस अजूनही सुगंधीच होती. देवघरातला खोडकर कान्हा गालात हसत होता.*

शनिवार, ११ जुलै, २०२०

पासपोर्ट साईजचे ८ फोटो 2 मिनिटात तयार करा

पासपोर्ट साईजचे ८ फोटो दोन मिनिटात तयार करा ते कसे ? जाणून घ्या.

प्रथम आपण खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करुन Passport Pics हे App आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा.👇👇👇👇

१)हे App ओपन करा.
२)आपल्यासमोर खाली तळाशी Change Sizes, previous,Next हे ऑप्शन दिसतील त्यापैकी Next या ऑप्शनवर क्लिक करा.
३)आता Choose Picture हा ऑप्शन दिसेल तेथे क्लिक करा.
४)त्यानंतर Gallery ओपन होईल.
ओपन झालेल्या Gallery तुन आपल्याला हवा तो फोटो सिलेक्ट करा.
५)नंतर फोटो दिसेल जर फोटोचि साइज बदलायची असेल तर Size या ऑप्शनवर क्लिक करा. नसेल Size बदलायची तर Next या ऑप्शनवर क्लिक करा.
६)आता आपण निवडलेल्या फोटोला Crop करा तसेच Zoom कमी जास्त करा जर आपणास हवे असेल तर.
७)आणि आता Next वर क्लिक करा झाला आपला पासपोर्ट फोटो 8 प्रतीत तयार झालेला दिसेल.
८)आता Finish वर क्लिक करा आपला फोटो आपल्याला Galleryरीत सेव झालेला दिसेल.
९)आता आपल्याकडे जर कलर प्रिंटर असेल तर मोबाईल आपल्या संगणकाला कनेक्ट करा व या फोटोंची प्रिंट काढ़ा दोन मिनिटांत पासपोर्टचे 8 फोटो आपल्या हातात.

फोटोची साईज कमी कशी करावी ?

फोटोची साईज कमी कशी करावी ?⬜▢💟💟


मित्रांनो फोटो ची साईज 1 mb पेक्षा कमी कशी करावी ? बऱ्याच वेळा आपण high resolution च्या कॅमेऱ्याने फोटो घेतल्याने साईज जास्त असण्याची शक्यता असते.तसेच तुमचे फोटो किंवा सेल्फी सोशल नेटवर्कींग साईटवर शेअर करावयाचे आहेत. पण जर हे फोटो एखादया हाय रिझोल्यूशन कॅमेरा किंवा मोबाईल मधून घेतले असतील तर त्यांचा आकार खुप जास्त असल्याने अपलोड होण्यास बराच वेळ लागतो.पण आता इमेजचा आकार बदलण्यासाठी तुम्हाला फोटोशॉप किंवा इतर सॉफ्टवेअरचे ज्ञान घेण्याची आवश्यक्ता नाही. तुम्ही विंडोज एक्सप्लोरर मध्ये इमेजवर राइट क्लिक करून त्यांचा आकार बदलवू शकता.
अश्या फोटोची साईज कमी कशी करावी? याबाबत बऱ्याच मित्राना माहित नाही.याकारणास्तव  सर्वांकरिता ही माहिती देत आहे.

         image Resizer
 
 हे टूल वापरण्यास अगदी सोपे आणि फ्री टूल आहे, ज्यात तुम्ही सहजपणे आणि जलदगतीने कोणत्याही इमेजची साइज हवी तेवढी बदलवू शकता. येथे इमेजसाठी डीफॉल्ट साइज व तुम्हाला हवी ती कस्टम साइज असे दोन पर्याय आहेत.

जर तुम्हाला हि रिसाइज केलेली इमेज दूस-या फोल्डर मध्ये ठेवायची असेल तर, या इमेजवर राइट क्लिक करून दूस-या फोल्डर मध्ये ड्रॅग करा. येथे इमेज रिसाइजचा मेनू दिसेल, येथून हवा तो पर्याय निवडा. हे टूल bmp, dib, gif, ico, jpe, jpeg, jpg, png, tif, tiff सह विविध फॉर्मेटला सपोर्ट करते.

windows साठी हे सॉफ्टवेयर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.👇👇👇👇
image.png
https://imageresizer.codeplex.com/releases/view/82827

   Photo And Picture Resizer

Androidफोन धारकांसाठी हे app खुप उपयुक्त आहे .या app च्या सहाय्याने आपण हव्या त्या साईज मधे आपला फोटो ची साईज बदलू शकतो.
हे app डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा.
👇👇👇👇
image.png
https://play.google.com/store/apps/details?id=com.simplemobilephotoresizer

आगामी झालेले