नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत
हार्दिक स्वागत ......WEL COME
सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०
जागतिक हरित ग्राहक दिन
हरित ग्राहक दिन
भारतात दरवर्षीप्रमाणे , २८ सप्टेंबर रोजी ‘हरित ग्राहक दिन’ आहे. यानिमित्ताने, आपल्यातील ‘हरित ग्राहक’ कोणाला म्हणावे, या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करू.. आपण बाजारात जाऊन ज्या वस्तू विकत घेतो, त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी किती प्रमाणात पाणी, ऊर्जा व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करावा लागला असेल आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम झाला असेल? उत्पादन प्रक्रियेत किती व कशा प्रकारचा कचरा निर्माण होत असेल? या वस्तू पुन:पुन्हा वापरात येतील का? या वस्तूंचं ‘रिसायकलिंग’ होऊ शकेल का? अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्या मनात येत असतील, तर ते आपण ‘हरित ग्राहक’ असल्याचे लक्षण आहे हे नक्की समजावे. याव्यतिरिक्त दळणवळणासाठी आपण निवडत असलेले परिवहनाचे पर्याय, रोजच्या अन्नाचा स्रोत, पारंपरिक वस्तूंऐवजी पर्यावरणास उपकारक वस्तूंचा वापर, पर्यावरणाच्या संवर्धनाविषयीचा दृष्टिकोन हे गुणही ‘हरित ग्राहक’ म्हणून पात्र ठरण्यास महत्त्वाचे आहेत.
जैवविघटन होणारा (नॉन- बायोडीग्रेडेबल) कचरा हा संपूर्ण पृथ्वीसमोरचा फार मोठा प्रश्न आहे. असा कचरा टाकणा-या व्यक्ती भावी पिढ्यांचे नुकसान करीत आहेत. या कच-यामुळे पृथ्वीवरचे पूर्ण पर्यावरण चक्र बिघडते. आपण निर्माण करतो त्या कच-याचे दोन प्रकार असतात. जैवविघटनयोग्य (बायोडीग्रेडेबल) म्हणजे कालांतराने विघटन होऊन जो कचरा सृष्टीत मिसळून जातो असा आणि नॉन- बायोडीग्रेडेबल म्हणजे जो वर्षानुवर्षे, खराबदेखील न होता फक्त साठून राहतो असा नॉन- बायोडीग्रेडेबल कचरा संपूर्ण जीवसृष्टीला अत्यंत धोकादायक आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे हे हरित ग्राहक जीवनशैलीव्दारे आपल्या हातात आहे.
२००८ साली विविध देशांतील सर्वसामान्य लोकांची जीवनशैली आणि तिचा पर्यावरणावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक सोसायटीने एक सर्वेक्षण केले होते. यासाठी त्यांनी भारत, ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांबरोबर ब्रिटन, अमेरिका अशा अतिप्रगत आणि विकसित असलेल्या एकूण १४ देशांमधील नागरिकांकडून एक प्रश्नावली भरून घेतली. वेगवेगळ्या देशांचे नागरिक उपभोक्त्यांच्या/ग्राहकांच्या रूपात असताना पर्यावरणाबद्दल कितपत जागरूक असतात, याचा आढावा या अभ्यासातून घेण्यात आला. प्रत्येक देशाला मिळालेल्या गुणांना त्यांनी ‘ग्रीनडेक्स’ असे नाव दिले. या सर्वेक्षणाचा निकाल साधारण अपेक्षित असाच होता. भारत आणि ब्राझील यांसारख्या विकसनशील देशांतील ग्राहकांना १०० पैकी ६० गुण मिळाले, तर अमेरिकेतील ग्राहकांना सर्वात कमी- म्हणजे ४४.९ गुण मिळाले. यातून- विकसनशील देशांमधील ग्राहक पर्यावरणाविषयी अधिक जागरूक आहेत आणि पर्यावरणाविषयी स्वत:ला जबाबदार मानतात; तसेच पर्यावरणाविषयी बोलण्यास/ऐकण्यास ते अधिक उत्सुक असतात, पर्यावरणावरील परिणाम टाळण्यासाठी काही तरी करावे अशी त्यांची इच्छा असते, असा निष्कर्ष काढण्यात आला.
भारतात दरवर्षीप्रमाणे आज, २८ सप्टेंबर रोजी ‘हरित ग्राहक दिन’ पाळला जाणार आहे. यानिमित्ताने, आपल्यातील ‘हरित ग्राहक’ कोणाला म्हणावे, या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न करू.. आपण बाजारात जाऊन ज्या वस्तू विकत घेतो, त्या वस्तूंच्या निर्मितीसाठी किती प्रमाणात पाणी, ऊर्जा व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करावा लागला असेल आणि त्याचा पर्यावरणावर काय परिणाम झाला असेल? उत्पादन प्रक्रियेत किती व कशा प्रकारचा कचरा निर्माण होत असेल? या वस्तू पुन:पुन्हा वापरात येतील का? या वस्तूंचं ‘रिसायकलिंग’ होऊ शकेल का? अशा प्रकारचे प्रश्न जर आपल्या मनात येत असतील, तर ते आपण ‘हरित ग्राहक’ असल्याचे लक्षण आहे हे नक्की समजावे. याव्यतिरिक्त दळणवळणासाठी आपण निवडत असलेले परिवहनाचे पर्याय, रोजच्या अन्नाचा स्रोत, पारंपारिक वस्तूंऐवजी पर्यावरणास उपकारक वस्तूंचा वापर, पर्यावरणाच्या संवर्धनाविषयीचा दृष्टिकोन हे गुणही ‘हरित ग्राहक’ म्हणून पात्र ठरण्यास महत्त्वाचे आहेत.
सरकारी व संस्थात्मक पातळीवर ‘हरित ग्राहक दिना’निमित्त निरनिराळे कार्यक्रम केले जातातच; पण वैयक्तिक पातळीवरही छोटे-छोटे उपाय शोधून आपल्या परीने आपापल्या परिसरात जनजागृती मोहिमा राबवता येतील!* भविष्यासाठी आपण काय करू शकतो --
प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या वापरला नकार द्या.
प्राणिज अवयवांपासून बनलेल्या वस्तू विकत घेऊ नका.
लेटरबॉक्सवर ‘नो जंकमेल’ चे चिन्ह लावा.
प्रदूषण वाढवणा-या किंवा करणा-या वस्तूंना, कृतींना पर्याय म्हणून काय करता येईल याचा विचार करा.
पुनर्वापर करण्याजोगी उत्पादने खरेदी करा.
‘वापरा आणि फेका’ प्रकारच्या वस्तूंचा वापर कमी करा.
भरपूर पॅकेज असलेल्या वस्तूंची खरेदी टाळा.
अजूनही वापर करण्यायोग्य वस्तू फेकून देऊ नका.
वस्तू मोडली तर दुसरी नवी वस्तू घेण्याआधी जुन्या वस्तूची दुरुस्ती करता येते का ते पाहा.
कोणत्याही प्रकारच्या कच-याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण करून तो योग्य ठिकाणी टाका.
विघटन होऊ न शकणारा कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावणे.
कचऱ्याचे प्रमाण घटवण्याचे महत्त्व सांगणारे लेख,पत्रके इ. वाटणे व मिडियात प्रसिद्ध करणे.
कृपया इतर गटात शेअर करुन विज्ञान प्रसार करा ! ! !
📡 जय विज्ञान🔬
संकलित माहिती
जागतिक रेबीज दिन World Rabies Day
💥🐕जागतिक रेबीज दिन🦮28 सप्टेंबर
रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (विशेषतः की कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा रोग आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज हा रोग झाल्यास तो प्राणघातक आहे. मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. रेबीज हा रोग कुत्र्यांनाही होतो. हा कुत्र्यांमुळे माणसात पसरणारा रोग आहे. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे ९० ते १७५ दिवसात दिसू लागतात. जंगलातले लांडगे जंगली कुत्र्यांना चावतात त्यामुळे जंगली कुत्र्यांना रेबीज होतो. ही जंगली कुत्री गावातल्या कुत्र्यांना चावतात त्यामुळे त्यांना हा रोग होतो. आणि अशी रेबीज झालेली कुत्री माणसास चावल्यास माणसाना हा रोग होतो. कुत्र्याच्या लाळेद्वारे या रोगाचा प्रसार होतो.
लक्षणे--
रेबीजचा पेशंट, १९५९
साधारणपणे २ ते १२ आठवडे ताप आणि तापाची लक्षणे दिसून येतात. मानसिक त्रास, निद्रानाश, भास होणे, सामान्य माणसासारखे न वागणे, अतिशयोक्ती करत वागणे अशी रोग्यात लक्षणे दिसून येतात. रेबीज झालेल्या माणसाला पाण्याची खूपच भीती वाटते. रेबीज झालेल्या माणसाचा घसा पूर्णपणे खरवडून निघतो व जेव्हा तो माणूस काही बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्वा घसा खरवडलेला असल्यामुळे कुत्र्याच्या भुंकण्याप्रमाणे आवाज येतो. वास्तविक कुत्रा चावला म्हणून असा आवाज येतो असे काही नाही. पण काही अशिक्षित माणसे असा विचार करून कुत्र्यांना मारतात.
उपचार -
प्राणी चावल्याने जखम झाल्यावर लवकरात लवकर साबण व स्वच्छ पाण्याने धुतल्यास जखमेतील रेबीजचे जंतू कमी होण्यास मदत होते. शक्य असल्यास त्यावर ॲंटिसेप्टिक मलम लावावे व त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. रेबीजवर पीईपी (पोस्ट एक्स्पोजर प्रोफायलॅक्सिस) ही प्रभावी लस उपलब्ध असून कुत्रे चावल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने ती टोचून घेणे योग्य आहे.
पेशंटने मानवी रेबीज इम्युनोग्लोबुलिनचा एक डोस व रेबीज लसीचे चार डोस १४ दिवसात घेतले पाहिजेत. रेबीज लसीचा पहिला डोस जखम झाल्यावर लवकरात लवकर दिला पाहिजे. त्यानंतर तीन, सात व चौदा दिवसांनी लसीचे डोस द्यावेत. ज्या पेशंटने जखम व्हायच्या आधीच लसीकरण घेतले असेल, त्याने इम्युनोग्लोबुलीनचा डोस नाही घेतला तरी चालतो. त्याने जखम झाल्यानंतरचे लसीकरण जखम झाल्यावर व दोन दिवसांनी घ्यावे. आजकाल पोटात घ्यायची इंजेक्शने देण्याची गरज नसून दंडावर देण्याचे इंजेक्शन उपलब्ध आहे.
पाळीव कुत्र्याचे रेबीजपासून संरक्षण -
तीन महिन्यापेक्षा मोठ्या वयाच्या पाळीव कुत्र्याला दर सहा महिन्यांनी रेबीजची लस देणे आवश्यक असते.
पाळीव कुत्र्याला कुठल्याही प्रकारे भटक्या कुत्र्यांच्या संपर्कात येऊ देणे धोक्याचे असते.
कुत्र्यात वेगळे असे काही जाणवल्यास पशुवैद्यांशी संपर्क साधणे गरजेचे असते.
भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास त्यांची संततनियमन शस्त्रक्रिया करतात..
वटवाघळांपासून आपल्या कुत्र्याला दूर ठेवल्यास रेबीजची लागण होण्याची शक्यता दुरावते.
कुत्र्यांमधील लक्षणे-
सतत लाळ गळणे, मलूल पडून राहणे, हालचालींवर ताबा नसणे, ताप येत राहणे, डोकेदुखी, निद्रानाश, पाण्याची भीती वाटणे, आणि नाकातून डोळ्यांतून आणि कानांतून पस तत्सम घाण पाणी बाहेर येणे आणि, उगाचच भुंकणे अथवा भुंकायचा प्रयत्न करणे ही रेबीज ह्या रोगाची लक्षणे आहेत.
प्राण्यातील आक्रमकता वाढणे-
मध्ययुगीन माणसे रेबीज झालेल्या कुत्र्याचा प्रतिकार करत आहेत.
रेबीजमध्ये प्राणी अस्वस्थ आणि बेचैन होतो, आवाज आणि उजेडाचा त्याच्यावर लवकर प्रभाव पडतो, तो तहानभूक सर्व विसरून जातो व कोणतीही वस्तू चावण्याचा प्रयत्न करतो. या रोगात प्राण्याची खूप लाळ गळते, त्याचे डोळे भयानक दिसतात, त्याला पाण्याची भीती वाटते, त्याला ताप येतो व तो कश्याही उड्या मारू लागतो. या प्रकारात प्राण्याला कधी कधी लकवा येतो व मानेचे स्नायू कडक होतात; प्राणी त्याचे शेपूट मागील दोन पायात घालून चालतो.
सुस्त प्रकार-
या प्रकारात प्राण्याला प्रथम मज्जारज्जूला आणि नंतर मेंदूलाही संसर्ग पोहोचतो. नंतर हृदय, फुफ्फुसे यांनापण संसर्ग होतो, अर्धांगवायु होतो, प्राण्याची शुद्ध हरपते व नंतर मृत्यू होतो.
रोग निदान-
प्राण्याच्या मेंदूच्या परीक्षणाद्वारे या रोगाचे निदान करता येते. त्यासाठी प्राण्याचे पाच ते दहा दिवस निरीक्षण करण्याची अत्यंत गरज असते.
रोगाचा प्रसार-
वटवाघळे , माकडे, कोल्हे, गाईगुरे, लांडगे, कुत्री, मुंगूस अशा काही प्राण्यांपासून माणसाला रेबीजचा धोका संभवतो. इतर जंगली प्राण्यांमुळे सुद्धा रेबीज होऊ शकतो.
खारी, hamsters, guinea pigs, उंदीर ह्या प्राण्यांमध्ये अगदी क्वचितच रेबीज आढळतो.
रेबीजचा जीवाणू प्राण्याच्या नसांमध्ये आणि लाळेत आढळतो. हा रोग बहुधा प्राण्याच्या चावण्यामुळे होतो. बऱ्याच वेळा प्राणी चिडून हल्ला करतो आणि चावा घेतो.
माणसांमधून रेबीजचा प्रसार फारच क्वचित होतो.
जागतिक रेबीज दिन-
जागतिक रेबीज दिन ही आंतरराष्ट्रीय जागरूकता मोहीम ग्लोबल अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल या संयुक्त संस्थेने सुरु केली असून त्या संस्थेचे मुख्यालय अमेरिकेमध्ये आहे. हे संयुक्त राष्ट्रांचे निरीक्षण आहे आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ आणि यूएस सेंटर रोग नियंत्रण आणि प्रतिबंध यासारख्या आंतरराष्ट्रीय मानवी आणि पशुवैद्यकीय आरोग्य संस्थांनी त्याचे समर्थन केले आहे. जागतिक रेबीज दिन प्रत्येक वर्षी २८ सप्टेंबर रोजी लुई पाश्चरच्या मृत्यूच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केला जातो, ज्यांनी आपल्या सहकार्यांच्या सहकार्याने रेबीजची पहिली प्रभावी लस विकसित केली. जागतिक रेबीज डेचा उद्देश मानव आणि प्राण्यांवर रेबीजच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता वाढविणे, धोकादायक रोग कसा रोखता येईल याविषयी माहिती आणि सल्ला प्रदान करणे आणि रेबीज नियंत्रणातील वाढीव प्रयत्नांसाठी वकिलीचे समर्थन करणे हे आहे.
पार्श्वभूमी-
जगातील बर्याच देशांमध्ये रेबीज ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या आहे. विकसनशील जगात सर्व मानवी मृत्यूंपैकी ९९% मृत्यू रेबीड कुत्रा चावल्यामुळे होतात, तर आफ्रिका आणि आशियात 95% मृत्यू होतात. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळता प्रत्येक खंडातील लोक आणि प्राणी यांना रेबीजचा धोका संभवतो.
रेबीज प्रतिबंधातील एक मोठी समस्या जोखीम असलेल्या लोकांमध्ये मूलभूत जीवन-रक्षण ज्ञानाचा अभाव ही आहे. या विषयावर काम करणार्या संस्था बर्याचदा वेगळ्या वाटू शकतात आणि दुर्लक्षित रोग म्हणून, रेबीजकडे पुरेसे संसाधने आकर्षित होत नाहीत.
आरोग्य जागरूकता दिवस रोगांवरील धोरण सुधारित करण्यात मदत करतात आणि प्रतिबंधित करण्यासाठी आणि त्यांची संसाधने वाढवू शकतात. या आकलनामुळे 28 सप्टेंबर हा रेबीज विरूद्ध जागरूकता दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
संकलित माहिती
बुधवार, २३ सप्टेंबर, २०२०
राप्पल संगमेश्वर कृष्णन
राप्पल संगमेश्वर कृष्णन
भारतीय भौतिकशास्त्रज्ञ
जन्मदिन - २३ सप्टेंबर १९११
भारतीय भौतिकीविज्ञ. त्यांचा जन्म केरळातील राप्पल येथे झाला. त्यांचे शिक्षण मद्रास विद्यापीठ (डी. एस्सी.), बंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व केंब्रिज येथील ट्रिनिटी कॉलेज (पीएच्. डी.) येथे झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या संस्थेत संशोधन साहाय्यक (१९३५–३८) आणि भौतिकीचे प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर तेथेच त्यांनी १९४८–७२ या काळात भौतिकी विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केले. १९७३ मध्ये केरळ विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर त्यांची नेमणूक झाली. १९३८ मध्ये केंब्रिज येथील कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती मिळाली होती.
त्यांचे प्रमुख संशोधन कार्य प्रकाशाचे प्रकीर्णन (विखुरणे), वर्णपटविज्ञान, स्फटिक भौतिकी व अणुकेंद्रीय भौतिकी या शाखांतील आहे. त्यांनी नवीन प्रकाशकीय परिणामाचा शोध लावला व सैद्धांतिक रीत्या त्याचे व्यापक स्वरूप प्रस्थापित केले. भौतिक-रासायनिक प्रश्नांत उपयुक्त असलेल्या या परिणामाला ‘कृष्णन परिणाम’ असे नाव प्राप्त झाले आहे. स्फटिक भौतिकीसंबंधी १९५१ पासून ते संशोधन करीत असून १९५८ साली ‘प्रोग्रेस इन क्रिस्टल फिजिक्स’ हा व्याप्ति प्रबंध त्यांनी प्रसिद्ध केला. त्यांचे १६० हून अधिक संशोधन पर निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.
इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (लंडन), अमेरिकन फिजिकल सोसायटी, इंडियन अॅकॅडेमी ऑफ सायन्सेस व नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया या संस्थांचे ते फेलो आहेत. १९४९ च्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकी विभागाचे ते अध्यक्ष होते.
शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०
सुनीता विल्यम्स
सुनीता विल्यम्स
*नासा अंतराळयात्री*
*जन्म - सप्टेंबर १९, इ.स. १९६५*
सुनीता विल्यम्स (जन्म: सप्टेंबर १९, इ.स. १९६५) ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहे. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे. २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले.
सुरुवातीचे आयुष्य
*सुनीताचा जन्म* युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती. सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी होती; तिचा भाऊ जय ४ वर्ष मोठा तर बहीण डीना अँना हि ३ वर्ष मोठी होती
सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कुल मधून पदवीधर झाली. तिला १९८७ साली युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमी कडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाली आणि १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन ह्या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाली.
,📜*शिक्षण*
• नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३.
• बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७.
• एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५.
*मिलिटरी कारकीर्द*⛵
सुनीता विल्यम्स मे १९८७ ला अमेरिकन नौदलात मध्ये रुजू झाल्या. नेव्हल कोस्टल सिस्टिम कमांडमध्ये सहा महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर त्यांची बेसिक डायविंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांची जुलै १९८९ मध्ये नेव्हल एव्हिएटर म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सप्टेंबर १९९२ मध्ये अँड्रयू चक्रीवादळाच्या वेळी मियामी, फ्लोरिडा येथे झालेल्या रिलीफ ऑपेरेशनमध्ये महत्वाची कामगिरी बजावली. पुढे त्यांनी पायलट पद भूषविले. जून १९९८ मध्ये त्या सैपान येथे नियुक्त असतांना त्यांची अवकाश मोहिमेकरिता नासा मध्ये निवड झाली.
*नासा कारकिर्द*🛸🛸
सुनीताचे अंतराळवीर उमेदवारीचे प्रशिक्षण ऑगस्ट १९९८ मध्ये जॉन्सन स्पेस सेंटर येथे सुरु झाले. मार्च २०१६ पर्यंत सुनीताने एकूण ७ वेळा मिळून ५० तास ४० मिनिटे स्पेसवाक पूर्ण केले. जास्त स्पेसवाक केल्यामुळे ती सर्वाधिक अनुभवी अंतराळवीरांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचली.
गुरुवार, १० सप्टेंबर, २०२०
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
*जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन*
k̷ ̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷̷*आत्महत्येमुळे समस्या सुटत नाही....*
आजच्या काळात जन्मलेली पिढी सर्वच बाबतीत अग्रेसर असली तरी आयुष्याचे मोल जाणून घेण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे. आज पेपरमध्ये आपल्या वाचनात येत असते. अभ्यासाचा ताण, पेपर अवघड गेला, आई - वडील रागावले किंवा टी.व्ही. पाहू दिला नाही आणि अत्यंत शुल्लक कारणांनी 12-18 वयोगटातील मुले थेट मृत्यूला कवटाळत आहेत. शुल्लक कारणांवरुन आत्महत्या करुन आयुष्य संपवून टाकण्याचा या पिढीचा टोकाचा अविचारी मार्ग चिंतेचा विषय बनला आहे. जगभर 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो.
आपले मन हे एखाद्या हिमनगासारखे असते. आईसबर्ग किंवा हिमनग जेव्हा पाण्यावर दिसतो तेव्हा बर्फ वजनाने पाण्यापेक्षा हलका असल्या कारणाने पाण्यावर तरंगतो. आणि हिमनगाचा एक दशांश आपल्याला पाण्यावर दिसतो. उरलेला नऊ दशांश भाग पाण्याखाली दडलेला असतो. म्हणून तर टायटॅनिक सारखी मोठमोठी जहाजे हिमनगावर आपटून फुटतात व बुडून जातात. धोक्याचा इशारा मिळून देखील आपला वेग कमी करता येत नाही. धोक्याचा नक्की अंदाज येत नाही. पुरेसे अंतर ठेवले जात नाहीत. आपल्या मनाच्या बाबतीतही तसेच होते. आपले मन धोक्याचा इशारा देत असले तरी आत खोलवर किती राग, व्देष, उद्वेग उकळत असतो याचा अंदाज कधी आपल्याला येत नाही. हे थोरांच्या बाबतीत काय किंवा मुलांच्या बाबतीत काय? ज्वालामुखीचा उद्रेक झाला की लाव्हा रस चहुबांजुनी वाहू लागतो कधीकधी आपल्या मुलांमध्ये आपल्याला अशी ज्वालामुखीसारखी चिन्हे दिसतात. वरवर शांत वाटणारे मुल एकदम चिडून बेभान होते. काहीतरी बोलून जाते, करुन बसते.
नवीन पिढीची सहनशिलता कमी झालेली आहे. टी.व्ही. वरील आततायी खेळ, व्हीडिओ गेम आदी आभासी विश्वातील हिंसा, क्रौय यांच्या अनुकरणामुळे मुले आत्महत्या करीत आहेत. आपल्या कृत्याच्या परिणामांची त्यांना माहिती नसते. वैद्यकीय भाषेत त्याला पुअर इम्पल्स कंट्रोल अथवा बिहेव्हिअर मॉडिफिकेशन, असे म्हणतात मुलांच्या वागण्यात आत्मविनाशाची चिन्हे दिसल्यास पालकांनी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. योग्य उपचार समुपदेशाने त्यांना टोकाच्या निर्णयापासून परावृत्त करता येऊ शकेल. 100 पैकी 5 ते 10 टक्केच मुले दुराग्रही असतात. त्यांची काळजी घ्यायला हवी.
वारंवार प्रयत्न आलेल्या अपयशाचे काय? इथे वारंवार या शब्दाचा अर्थ आपण कसा घेणार यावर आपले पुढले वागणे अवलंबून असेल वारंवार याचा अर्थ आत्तापर्यंत असा घेतला तर व्यक्ती प्रयत्नवादी राहू शकेल. आतापर्यंत आलेल्या अपयशाचे पृथकरण करुन पुढील वाट काढू शकेल वारंवार या शब्दाचा अर्थ कायमचा असा घेतला तर मात्र आपण नशिबावर लेबल लावू. स्वत:वरही लेबल लावू आणि निराशेच्या दु:खाच्या गर्तेत प्रवेश करु, दैनिक जीवन संघर्षाचे Learned Helpessness हा Experiential (अनुभवसिध्द) नसून Precived (संवेदनाधिष्ठित) असतो. अपयशाच्या एका किंवा अनुभवानंतर जर व्यक्तीने स्वत:वर कमनशीबी व अपयशी म्हणून शिक्का मारला तर त्यातून डिप्रेशनची निर्मिती होते.
प्रत्येकाच्या आयुष्यात चढाव उतार येत असतात. परंतु डिप्रेशनच्या जाळ्यात अडकून आत्महत्येच्या निर्णय घेण्यापूर्वी एकदा आमच्याकडे येऊन आपले मन मोकळे करन पहा तसेच तुमच्या आजूबाजुच्या लोकांच्या मनातील आत्महत्येच्या निर्णयाबाबत लक्ष ठेवण्यासाठी ही काही लक्षणे जी तुम्हाला नक्कीच मदत करतील.
अनेक दिवसांपासून निस्तेज आणि निरुत्साही राहणे हे एक प्रमुख लक्षण आहे. विनाकरण भूक मंदावणे किंवा जेवण निरस वाटणे हे धोकादायक आहे. दूर रहाणे - अचानक एखादी व्यक्ती एकलकोडी होणे किंवा त्यांच्या प्रियजनांपासून दूर दूर राहणे त्यांना प्रतिसाद न देणे. निराश रहाणे - अचानक ती व्यक्ती आपल्या अपयशाबद्दल किंवा स्वत: निरुपयोगी असल्याचे म्हणत असल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करु नका. कोणत्याच कामात सहभाग न घेणे - अचानक आवडत्या कामातून आणि धंदातून मन काढून घेणे. झोप न लागणे - आवश्यकतेपेक्षा कमी झोप घेणे रात्री झोप न आल्याने अस्वस्थ राहणे. जीवन संपवण्याबद्दल बोलणे - काही वेळेस मस्करीत किंवा काही वेळेस गांर्भीयाने पण आत्महत्येचा विचार मनात येणे ही आत्महत्येच्या कृतीची पहिली पायरी आहे. त्यामुळे याकडे मुळीच दुर्लक्ष करु नका. प्रत्येकाचे आत्महत्येचा पर्याय निवडण्याचे कारण वेगवेगळे असू शकते. परंतु त्यावर बोलून मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमांअंतर्गत औषधोपचार समुपदेश केले जाते.
आत्महत्येमुळे समस्या सुटत नाहीत, पण आपणच आयुष्यातून कायमचे सुटतो. आयुष्य हे खूप सूंदर आहे. यात अडथळ्यांचे काटे आहेत हे बरोबर पण ते दूर केल्यावरच आयुष खऱ्या अर्थाने जगलो, असे म्हणता येईल त्यामुळे समस्येतून मार्ग काढण्यासाठी आत्महत्या करण म्हणजे मौल्यवान आयुष्य भरभरुन जगण अर्धावर सोडून देणेच होय.
***संकलित माहिती
बुधवार, ९ सप्टेंबर, २०२०
बालशहीद शिरीषकुमार
*बालशहीद शिरीषकुमार मेहता*
🙋🏻♂️🔫⚜️*जन्म : 28 डिसेंबर 1926*
(नंदुरबार , महाराष्ट्र , भारत)
*वीरमरण : 9 सप्टेंबर 1942*
*(वय 15)* (नंदुरबार , महाराष्ट्र , भारत)
राष्ट्रीयत्व : भारतीय
साठी प्रसिद्ध : भारतीय स्वातंत्र्य चळवळ
पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. या गावात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला. त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले. नंदुरबार हे आता कुठे अंदाजे एक लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. घराघरांतून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत. प्रसिद्ध प्रवासी ट्वेनियरने १६६० ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे, तर नंद नावाच्या गवळी राजाने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे. ऐन-ए-अकबरी (इ.स. १५९०) मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले आणि सुबक घरांनी सजलेले शहर असा आहे.
नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली. १९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता. शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात "वंदे मातरम्' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.
🇮🇳 *नहीं नमशे, नहीं नमशे !*
महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना "चले जाव'चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता. गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती. मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली. शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्'चा जयघोष सुरूच ठेवला. अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली. तेव्हा त्या अधिकाऱ्याला एका चुणचुणीत मुलाने सुनावले, *"गोळी मारायची तर मला मार!'*. ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला. त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.
🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳
🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌷🙏
संदर्भासह माहिती
आगामी झालेले
-
सावित्रीबाई जोतीराव फुले 🙏 ३ जानेवारी १८३१ 🙏 ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पा...
-
शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य उर्फ भाऊसाहेब देशमुख Panjabrao Deshmukh जन्म : २७ डिसेंबर १८९८ (पापळ, अमरावती, महाराष्ट्र ) मृत...