नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

सुनीता विल्यम्स

सुनीता विल्यम्स

        *नासा अंतराळयात्री*

*जन्म - सप्टेंबर १९, इ.स. १९६५*

सुनीता विल्यम्स (जन्म: सप्टेंबर १९, इ.स. १९६५) ही भारतीय वंशाची अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहे. तिला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम तिच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे. २०१२ मध्ये तिने ३२ व्या मोहिमेची फ्लाईट इंजिनिअर तसेच ३३ व्या मोहिमेची कमांडर म्हणून काम केले.

सुरुवातीचे आयुष्य

*सुनीताचा जन्म* युक्लिड, ओहिओ येथे झाला. तिचे वडील भारतीय-अमेरिकन न्यूरोअँटोमिस्ट दीपक पंड्या तर आई स्लोव्हिन-अमेरिकन उर्सुलिन बोनी पंड्या ही होती. सुनीता तीन भावंडांमध्ये सगळ्यात धाकटी होती; तिचा भाऊ जय ४ वर्ष मोठा तर बहीण डीना अँना हि ३ वर्ष मोठी होती


सुनीता नीडहॅम, मॅसाच्युसेट्स येथील नीडहॅम हायस्कुल मधून पदवीधर झाली. तिला १९८७ साली युनायटेड स्टेट्स नेव्हल अकादमी कडून भौतिक विज्ञान ह्या विषयात बॅचलर ऑफ सायन्सची पदवी मिळाली आणि १९९५ मध्ये फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून अभियांत्रिकी प्रबंधन ह्या विषयात मास्टर ऑफ सायन्सची पदवी मिळाली.


,📜*शिक्षण*

• नीडहॅम हायस्कूलˌ नीडहॅम, १९८३.

• बी.एस., पदार्थ विज्ञान, यू.एस. नेव्हल अकॅडेमी, १९८७.

• एम.एस., अभियांत्रिकी व्यवस्थापनˌ फ्लोरिडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीˌ १९९५.

*मिलिटरी कारकीर्द*⛵

सुनीता विल्यम्स मे १९८७ ला अमेरिकन नौदलात मध्ये रुजू झाल्या. नेव्हल कोस्टल सिस्टिम कमांडमध्ये सहा महिन्यांच्या तात्पुरत्या नियुक्तीनंतर त्यांची बेसिक डायविंग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे त्यांची जुलै १९८९ मध्ये नेव्हल एव्हिएटर म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी सप्टेंबर १९९२ मध्ये अँड्रयू चक्रीवादळाच्या वेळी मियामी, फ्लोरिडा येथे झालेल्या रिलीफ ऑपेरेशनमध्ये महत्वाची कामगिरी बजावली. पुढे त्यांनी पायलट पद भूषविले. जून १९९८ मध्ये त्या सैपान येथे नियुक्त असतांना त्यांची अवकाश मोहिमेकरिता नासा मध्ये निवड झाली.

*नासा कारकिर्द*🛸🛸

सुनीताचे अंतराळवीर उमेदवारीचे प्रशिक्षण ऑगस्ट १९९८ मध्ये जॉन्सन स्पेस सेंटर येथे सुरु झाले. मार्च २०१६ पर्यंत सुनीताने एकूण ७ वेळा मिळून ५० तास ४० मिनिटे स्पेसवाक पूर्ण केले. जास्त स्पेसवाक केल्यामुळे ती सर्वाधिक अनुभवी अंतराळवीरांच्या यादीत ७ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले