नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

केशवराव जेधे Keshavrao Jedhe

केशवराव मारूती जेधे Keshavrao Jedhe 
टोपणनाव: तात्यासाहेब
जन्म: २१ एप्रिल, इ.स. १८९६ पुणे
मृत्यू: नोव्हेंबर १२, १९५९ पुणे
चळवळ: हिंदू बहुजन उद्धार
संघटना: ब्राह्मणेतर पक्ष
पत्रकारिता/ लेखन: शिवस्मारक
धर्म: हिंदू
प्रभाव: शाहू महाराज
केशवराव यांनी शेतकरी, कामगार, श्रमकरी वर्गासाठी मोलाचे योगदान दिले. अशा या निःस्वार्थी, सत्यशोधकी, झुंजार, निर्भिड, कर्तृत्ववान, अभ्यासू लोकनेत्याला वंदन.
 केशवराव जेधे हे मराठी राजकारणी, बहुजन समाजोद्धार चळवळीचे नेते होते. जेधे कुटूंब कान्होजी नाईक यांचे वंशज होते.  केशवरावांना तात्यासाहेब या नावाने ओळखले जाते. केशवराव जेधे यांचा संबंध ब्राह्मणेतर चळवळीशी होता. पुणे येथील जेधे मॅन्शन हे या चळवळीचे केंद्र होते. केशवरावांनी शिवाजी मराठा हायस्कूल, पुणे येथे शिक्षकाची नोकरी केली. केशवराव जेधे यांनी छत्रपती मेळावा काढून टिळकांच्या शिवजयंतीला आव्हान दिले होते. त्यांनी "शांतीचा गांधी पुतळा।देशा प्यारा जाहला।" ही कविता लिहली.

 केशवराव जेधे यांना एकूण चार बंधू होते. केशवराव सर्वात धाकटे. त्यामुळे मोठ्या तिघांचेही लाडके. त्यांनी घरातले अर्थकारण पाहायचे व केशवरावांनी लष्कराच्या भाकरी भाजायच्या, असे त्यांच्या शालेय वयातच ठरून गेले होते. बाबूराव जेधे हे बंधू पुण्याच्या समाजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यांच्यापासूनच केशवरावांनी दीक्षा घेतली. फर्ग्युसन महाविद्यालयात इंटरपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर केशवराव खऱ्या अर्थाने कार्यरत झाले.

महात्मा फुले यांच्यापासून त्यांनी प्रेरणा घेतली. समाजातील विषमतेवर त्यांचा पहिल्यापासून रोष होता. ती कशामुळे आली, याचा अभ्यास करतानाच त्यांना तत्कालीन सवर्णांच्या अन्य समाजावर असलेल्या धार्मिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय वर्चस्व जाणवले. ते कमी व्हावे, यासाठी काय करता येईल यादृष्टीने ते विचार करू लागले. महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांनी सुरू केलेल्या विचारांना वेगळे वळण लागून तत्कालीन महाराष्ट्रात एक वेगळाच वाद सुरू झाला. बहूजन व अभिजन असे त्या वादाचे काहीसे स्वरूप होते. दिनकरराव जवळकर यांच्या मार्गदर्शनात केशवरावांची जडणघडण झाली.

केशवराव त्यात हिरीरीने पडले व कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे अल्वावधीतच बहुजनांचे नेते म्हणून पुढे आले. त्यावेळच्या पुण्याच्या काँग्रेसमध्ये उच्चवर्णीयांचाच भरणा होता. काकासाहेब गाडगीळ हे त्यांचे धुरीण. काँग्रेसला तळापर्यंत न्यायचे तर बहुजनांचा त्यात सहभाग झाल्याशिवाय ते शक्य नाही, हे काकासाहेबांनी बरोबर ओळखले. त्यांनीच केशवरावांना आपली, काँग्रेसची, देशाच्या स्वातंत्र्याची भूमिका पटवून दिली. बहुजनांसाठी बराच संघर्ष केला, मात्र सत्तेच्या किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहात गेल्याशिवाय त्यांच्यासाठी काहीच करणे शक्य नाही, हे लक्षात आल्यावर केशवरावांनीही फारसे आढेवेढे न घेता काँग्रेसप्रवेश केला. त्यांच्या या एका निर्णयामुळे तोपर्यंत राज्यात अन्य विचारांच्या तुलनेत बरीचशी पिछाडीवर असलेली काँग्रेस बहुजनांची काँग्रेस म्हणून पुढे आली. केशवराव बरीच वर्षे काँग्रेसमध्ये राहिले. स्वातंत्र्यानंतर त्यांना राज्यसभेची खासदारकीही मिळाली. आपल्या देशाला संविधान असावे, यासाठी घटना समिती स्थापन झाली. त्या घटना समितीवर केशवराव जेधे सदस्य होते, तर डॉ. राजेंद्र प्रसाद अध्यक्ष होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढे काँग्रेस अंतर्गत मतभेदाला कंटाळून केशवराव कॉंग्रेसमधून बाहेर पडले.केशवरावांचे ठामपण खुद्द कॉंग्रेसमध्येही कॉंग्रेसला गांधीवादापासून डावीकडे ओढणाऱ्या शक्ती कार्यरत होत्या. विशेष म्हणजे कॉ. एम.एन. रॉय यांच्यासारख्या आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा नेताही भुरळ पाडून तेच कार्य करीत होता. केशवरावांच्या कणखर नेतृत्वामुळे ही प्रक्रिया फार पुढे जाऊ शकली नाही. कुंडल येथील एक सभेचे अध्यक्ष असलेले रॉयसाहेब गांधीवादी भूमिका मांडू पाहणाऱ्या वि. स. पागे या तरुणाला मनाई करू लागले, तेव्हा केशवरावांनी ‘तुम्ही सभेचे अध्यक्ष असला तरी मी महाराष्ट्र कॉंग्रेसचा अध्यक्ष आहे,’ असे रॉय यांना खडसावत पागे यांना बोलू दिले.

पण मुळातच चळवळ्या असलेल्या केशवरावांचे मन काही सत्तेत रमेना. काँग्रेसमधील राजकीय उलाढालींना कंटाळून त्यांनी आणखी काही सहका-यांना बरोबर घेत शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. जेधे-मोरे, जेधे-जवळकर, जेधे-गाडगीळ अशा ब-याच जोड्या त्यावेळी राज्यात गाजल्या, याचे कारण केशवरावांचा सहृदय स्वभाव हेच होते. मैत्री, प्रेम, आपुलकी यांना त्यांच्या लेखी फार महत्त्व होते. आपल्या विचारांशीही ते कायम प्रामाणिक असत. त्यामुळेच आचार्य अत्रे यांनी ज्यावेळी महात्मा फुले यांच्यावर चित्रपट काढणार असल्याचे जाहीर केले, त्यावेळी काहीही न बोलता केशवरावांनी त्यांना आर्थिक मदत केली. स्वत: अत्रे यांनीच त्याचा उल्लेख केला आहे.

केशवरावांमुळे पुण्याच्या बंदिवान मारुतीजवळच्या त्यांच्या ‘जेधे मॅन्शन’ला त्या काळात अतोनात महत्त्व प्राप्त झाले. महात्मा गांधी यांच्यापासून पंडित नेहरू, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या तत्कालीन अनेक नेत्यांचा या मॅन्शनमध्ये पाहुणचार झाला आहे. साचलेल्या तळ्यासारखे नव्हे, तर वाहत्या गंगेसारखे त्यांचे जीवन होते. त्यामुळे त्यांना प्रसंगी प्रवादही सहन करावे लागले आहेत. समाजाचे कार्य करण्यासाठी जेधे यांनी ‘मजूर,’ ‘कैवारी’ अशी वृत्तपत्रेही चालविली. ‘देशाचे दुष्मन’ हे त्यांनी लिहिलेले पुस्तक आक्षेपार्ह ठरून त्यांना सहा महिन्यांची कारावासाची शिक्षा झाली होती. शिक्षेचा खटला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालविला व जेधेंना दोषमुक्त ठरविले. पुणे येथे छत्रपती मेळा त्यांनी काढला होता. महापालिकेच्या आवारात आता असलेला महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठीही त्यांनी बरेच काही केले. पुण्यात महात्मा फुले यांचा पुतळा उभारण्याचे श्रेय जेधे यांना द्यावे लागेल. त्यांनी देशाचे दुश्मन (१९२५) हे पुस्तक लिहिले. त्याबद्दल त्यांच्यावर फिर्याद करण्यात आली; पण ते अपिलात निर्दोषी ठरले. अस्पृश्यांच्या अनेक चळवळींत त्यांनी भाग घेतला. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्याच्या मोहिमेत ते सहभागी होते (१९२८). पुण्याच्या हरिजन सेवक संघाचे ते अध्यक्ष होते (१९३३). १९३० पासून त्यांनी काँग्रेसच्या विविध सत्याग्रहांत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना शिक्षाही झाल्या. १९३५ मध्ये ते मध्यवर्ती कायदे मंडळात निवडून आले. १९४२ च्या लढ्यात त्यांना वीस महिन्यांचा तुरुंगवासही भोगावा लागला. १९३८ व १९४६–४८ च्या काळात ते प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते. काँग्रेसमधील मतभेदांमुळे ते शेतकारी-कामगार पक्षात गेले (१९४८–५३); पण पुढे पुन्हा काँग्रेसमध्ये आले. १९५७ च्या निवडणुकीत ते काँग्रेसतर्फे निवडून आले. तत्पूर्वी त्यांनी दोन महत्त्वाच्या चळवळींत भाग घेतला : गोव्याचे मुक्ती आंदोलन (१९५५) व संयुक्त महाराष्ट्र चळवळ (१९५६).

राजकारणात असूनही त्यांनी वृत्तपत्रकार या नात्याने विपुल स्फुटलेखन केले. महाराष्ट्राच्या पहिल्या तमाशा परिषदेचे ते अध्यक्ष होते (१९४८). मुंबईच्या सत्याग्रहावर त्यांनी एक पोवाडा रचला (१९३१) व त्या काळी तो फार गाजला होता. त्यांनी १९२१ मध्ये शितोळे घराण्यातील वेणुताई यांच्याशी विवाह केला. हाडाचे कार्यकर्ते व दलितांचे उद्धारक म्हणून त्यांची ख्याती होती. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतून काँग्रेसचा जो प्रचार व प्रसार झाला, त्याचे श्रेय जेध्यांना देण्यात येते. 

 संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५७ च्या मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणुका लढवण्याचे ठरवले. या निवडणुकीत काँग्रेसने केशवराव जेधेंना बारामती मतदारसंघातून तिकीट दिले. आबासाहेब शितोळे यांना संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले. याशिवाय मालतीबाई तेंडुलकर याही रिंगणात होत्या. या तिहेरी लढतीत केशवरावांची सरशी झाली आणि ते बारामती मतदारसंघाचे पहिले खासदार ठरले. 

सार्वजनिक जीवनात त्यांनी पुणे महापालिकेचे सभासद, मध्यवर्ती कायदे मंडळाचे सभासद (१९३५), द्वैभाषिक महाराष्ट्र-गुजराथच्या विधिमंडळाचे सभासद (१९५७), महाराष्ट्र प्रांतिक कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष (१९३८, १९४६-४८), संयुक्‍त महाराष्ट्र परिषदेचे अध्यक्ष (१९५५) आदी पदे भूषवली.

केशवराव जेधे सामाजिक सुधारणेच्या चळवळीत दाखल झाले ते वैयक्तिक स्वार्थ किंवा प्रतिष्ठा यासाठी नाही. त्यांना आपल्या बहुजन समाजाचे खरेखुरे हित व्हावे, असे वाटत होते. त्यांची जी काही राजकीय कृती होत असे त्यात फक्त हाच विचार असे. अखेरपर्यंत ते सामाजिक जीवनात कार्यरत होते. अखेरच्या काळात त्यांचा जयंतराव टिळक यांच्याशी बराच स्नेह जुळला. सर्वपक्षीय गोवा विमोचन समितीचे ते अध्यक्ष होते. संयुक्त महाराष्ट्र समितीचे पहिले अध्यक्ष तेच होते. आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारवाडा येथे १२ नोव्हेंबर १९५९ रोजी झालेल्या सभेत भाषण करताना अचानक त्यांना अर्धांगवायूचा झटका आला व त्यातच त्यांचे निधन झाले. या थोर व्यक्तिमत्त्वाला त्यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा.                                                        

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳   

   🙏 विनम्र अभिवादन 🙏

 स्त्रोतपर माहिती

सोमवार, १९ एप्रिल, २०२१

अनंत लक्ष्मण कान्हेरे Anant Laxman Kanhere

 

अनंत लक्ष्मण कान्हेरे ( भारतीय क्रांतिकारक ) Anant Laxman Kanhere 

 जन्म: इ.स. १८९१

फाशी : १९ एप्रिल १९१० (ठाणे, महाराष्ट्र, भारत)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना : अभिनव भारत

धर्म : हिंदू

प्रभाव : विनायक दामोदर सावरकर (वीर सावरकरांच्या `अभिनव भारत’ संस्थेचा तो सभासद होता.)

वडील : लक्ष्मण कान्हेरे 

१८५७ मध्ये सुरु झालेला स्वातंत्र लढा जवळजवळ शंभर वर्षे चालला. ह्या लढयात अनेकजण मृत्यूमुखी पडले. अनेकांना फासावर जाव लागल. अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला. अनेकांच्या घरादाराची राखरांगोळी झाली. या स्वतंत्र युद्धात ज्यांनी आपल्या जीवनाची आहुती दिली त्यात काही कोवळी तरुण मुलंही होती. त्यातले महत्त्वाचे नाव अनंत लक्ष्मण कान्हेरे

कोकणातील एक युवक माध्यमिक शिक्षणासाठी संभाजीनगरला (औरंगाबादला) जातो काय, तेथे क्रांतीकार्यात भाग घेतो काय, त्याच्या हातात स्वा. सावरकरांनी लंडनहून पाठवलेले पिस्तुल पडते काय आणि तो एका कपटी आणि उच्चपदस्थ इंग्रजाचा वध करतो काय, सारेच अतक्र्य आणि अशक्य ! पण हे अशक्य कृत्य शक्य करून दाखवणार्‍या युवकाचे नाव होते, अनंत लक्ष्मण कान्हेरे !

अनंतरावांचा जन्म १८९१ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील आयनी-मेटे या गावी झाला. इंग्रजी शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे औरंगाबादला गेले. काही वर्षांनी ते गंगाराम मारवाडी यांच्याकडे भाड्याची खोली घेऊन राहू लागले. नाशिकच्या स्वातंत्र्यवादी गुप्त संस्थेच्या काशीनाथ टोणपे यांनी गंगाराम आणि अनंतराव यांना गुप्त संस्थेची शपथ दिली. मदनलाल धिंग्रांनी कर्झन वायलीच्या घेतलेल्या प्रतिशोधानंतर अनंतरावही अशा कृतीला अधीर झाले. मग गंगाराम यांनी एकदा अनंतरावांच्या हातावर तापलेला लोखंडी चिमटा ठेवून आणि एकदा पेटलेल्या चिमणीची तापलेली काच दोन्ही हातांनी धरायला सांगून त्यांची परीक्षा घेतली. दोन्हीही दिव्ये करूनही अनंतरावांची मुद्रा निर्विकार होती !

⚙️ *जॅक्सनला ठार मारण्याचा कट रचणे*

याच सुमारास नाशिकच्या जिल्हाधिकारीपदी जॅक्सन नावाचा क्रूर आणि ढोंगी अधिकारी होता. त्याने खरे वकील, कीर्तनकार तांबेशास्त्री, बाबाराव सावरकर आदी देशभक्तांना कारावासात धाडले होते. अशा अनेक कुकर्मांनीच जॅक्सनने आपला मृत्यूलेख लिहिला. या कामी नियतीनेच अनंतरावांची निवड केली. जॅक्सनला ठार मारण्यासाठी अनंतरावांनी पिस्तुलाच्या नेमबाजीचा सराव केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन त्यांनी जॅक्सनला नीट पाहून घेतले. ‘जॅक्सनला मारल्यावर फाशी जावे लागेल, तेव्हा निदान आई-वडिलांकडे आठवणीसाठी आपले एखादे छायाचित्र असावे’; म्हणून त्यांनी स्वतःचे एक छायाचित्रही काढून घेतले.

🔫 *जॅक्सनवर चार गोळ्या झाडल्या !*

२१ डिसेंबर १९०९ या दिवशी जॅक्सनच्या सन्मानार्थ नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात किर्लोस्कर नाटक मंडळींचा ‘शारदा’ नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. जॅक्सन दरवाजातून नाट्यगृहात प्रवेश करत असतांनाच आधीच येऊन बसलेल्या अनंतरावांनी जॅक्सनवर गोळी झाडली. ती त्याच्या काखेतून निघून गेली. चपळाई करून अनंतरावांनी जॅक्सनवर समोरून चार गोळ्या झाडल्या. जॅक्सन जागीच कोसळला. अनंतराव शांतपणे आरक्षकांच्या स्वाधीन झाले.

⛓️ *फाशीची शिक्षा*

जॅक्सनवधाच्या आरोपाखाली अनंतराव आणि त्यांचे सहकारी अण्णा कर्वे अन् विनायक देशपांडे यांना फाशीची शिक्षा झाली. १९ एप्रिल १९१० या दिवशी ठाण्याच्या तुरुंगात सकाळी ७ वाजता हे तीन क्रांतीकारक धीरोदात्त वृत्तीने फाशी गेले. त्यांच्या नातलगांच्या विनंतीला न जुमानता ब्रिटीश सरकारने ठाण्याच्या खाडीकिनारी या तिघांच्याही मृतदेहांना अग्नी दिला आणि त्यांची राखही कोणाला मिळू नये, म्हणून ती राख खाडीच्या पाण्यात फेकून दिली.

अनंताचे स्मारक ठाणे तुरुंगात आहे. नाशिक मध्ये "अनंत कान्हेरे"नावाचं क्रिकेट मैदान आहे.

नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारा अनंत कान्हेरे हा खुदीराम बोस याच्या नंतरचा सर्वांत तरूण वयाचा भारतीय क्रांतिकारक ठरला.या हौतात्म्य ज्योतीने अनेकांची हृदये प्रकाशमान केली. भारतीय स्वातंत्र्यासाठी या वीरांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण आपणाला भारताचे स्वातंत्र्य टिकवून राष्ट्राला समृद्ध आणि सामर्थ्यशाली करण्यासाठी प्रेरणा देत राहील.

वयाच्या १८ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणांचे बलीदान करणार्‍या हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्यासारख्या अनेकांच्या बलीदानांमुळेच आज आपण स्वतंत्र आहोतच.

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳   

   🙏 *विनम्र अभिवादन*

       स्त्रोतपर माहिती

रविवार, १८ एप्रिल, २०२१

तात्या टोपे Tatya Tope

तात्या टोपे…नाव तर सर्वांच्याच परिचयाचे, मात्र त्यामागची कहाणी फारच कमी जणांना ठावूक आहे. या व्यक्तीच्या जीवनाबद्दल खूप काही जाणून घेण्यासारखं आहे.

🏇 तात्या टोपे 🏇 ( रामचंद्र ऊर्फ रघुनाथ पांडुरंग टोपे)
जन्म : १६ फेब्रुवारी १८१४ येवला (नाशिक)
फाशी : १८ एप्रिल १८५९ शिवपुरी (मध्यप्रदेश)



"१८५७ च्या विद्रोहात जो सर्व नेते होते सामील होते, त्या सर्व नेत्यांमध्ये तात्या टोपे अप्रतिम साहसी, अति धैर्यवान आणि दृढनिश्चयी होते. त्यांची संघठनशक्ती व प्रतिभा प्रशंसनीय होती"- सर हयू रोज.
ह्यू रोज प्रमाणेच जॉर्ज फारेस्ट याने तात्या टोपेला 'सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय नेता ' म्हटले आहे. " तात्या टोपे जगातील सर्वश्रेष्ठ गुरिल्ला सेना नायक होते....... जर त्या विद्रोहात त्याच्यासारखे आणखी दोन तरी नेते असते , तर हिंदुस्थान इंग्रजांना तेव्हाच सोडावा लागला असता. यात शंकाच नाही."
"40 हजार सैनिक खऱ्याखुऱ्या तात्या टोपेंना आणि त्यांच्या 5 हजार सैन्याला पकडायला सज्ज आहेत", हे वाक्य आहे मेजर जनरल जीएसपी लॉरेन्स यांनी भारत सरकारच्या सेक्रेटरींना लिहिलेल्या पत्राचं. तेही 1863 सालचं. म्हणजेच युद्ध संपून आणि तात्या टोपेंचा मृत्यू होऊन 4 वर्षं झाली तरी ब्रिटिशांना तात्या टोपे मेल्याची खात्री पटत नव्हती.
तात्यांच्या मृत्यूबद्दल अशा अनेक वदंता, दंतकथा तयार झाल्या. काही लोकांना तात्या टोपेंना मारलं जाऊ शकत नाही, तसं त्यांना वरदान आहे असं वाटत होतं. काहीही असलं तरी तात्या टोपेंचा मृत्यू ब्रिटिश साम्राज्याची डोकेदुखी नक्कीच झाला असणार असं अनुमान काढता येतं.
दुसरा शिवाजी अशी ओळख निर्माण करणारे १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातील सेनापती तात्या टोपे !
१८५७ च्या युद्धात तात्या टोपे हे एकमेव सेनापती असते आणि ठरलेल्या दिवशी उठाव झाला असता, तर भारताला १५० वर्षांपूर्वीच स्वातंत्र्य मिळाले असते. लंडन टाईम्ससारख्या शत्रूराष्ट्राच्या वृत्तपत्रानेही तात्यांचे चातुर्य आणि कल्पकता यांचे कौतुक केले होते. त्या वेळी ब्रिटिश वृत्तपत्रे दुसरा शिवाजी, असा त्यांचा नामोल्लेख करत होती. – डॉ. सच्चिदानंद शेवडे
' तात्या टोपेबद्दल वर दर्शविल्याप्रमाणे लिहिणारे तिन्ही लोक इंग्रज होते. हे लक्षणीय आहे. शत्रुसुद्धा ज्याची अशी प्रशंसा करतात, तो सेनानायक आधी नानासाहेब पेशव्यांच्या पदरी मुख्य लेखनिक होता. तो नानासाहेबां पेक्षा दहा वर्षांनी वयाने मोठा होता. कानपूरला जेव्हा नानासाहेबांनी उठावाची सूत्रे हातात घेतली. तेव्हा त्यांनी लेखनिक तात्याला आपल्या दरबारात बोलावले व त्यांना सैनिकी वेष व रत्नाजडीत तलवार देऊन आपला सरसेनापती घोषित केले. लेखणी टाकून देऊन तलवार हाती घेणारा व युद्धाचा कसलाही अनुभव नसणारा तो सर्वश्रेष्ठ योद्धा ठरला आणि आपल्या देशाच्या स्वतंत्रतेच्या बलिवेदीवर त्याने धैर्यपूर्वक आपले बलिदान केले. आपल्या आयुष्याच्या उण्यापु-या शेवटच्या दोन वर्षात तात्याने एवढी चिकाटी , निष्ठा , शौर्य व बाणेदारपणा दाखविला की, शत्रुंना ( इंग्रजाना ) सुद्धा त्याच्या गुणांची व कर्तृत्वाची वाखाणणी करावी लागली.
तात्याचे वडील पांडुरंगराव , ते वेदशास्त्र संपन्न होते. त्यांचे मुळगांव बीड़ जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील जोळ हे खेडे. त्या काळात पाटोदा तालुका नगर जिल्ह्यात होता. नंतर ते नाशिक जिल्ह्यातील येवले या गावी स्थायिक झाले . दुस-या बाजीरावाचा विश्वासू सरदार त्र्यंबकजी डेंगळे हा नगर जिल्हयातल्या संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी येथला राहणारा. त्याचा व पांडुरंगरावांचा चांगला परिचय होता. त्र्यंबकजी डेंगळ्यांनीच पांडुरंगरावांना दुस-या बाजीरावाच्या सेवेत आणले. त्यांच्याकडे धर्मदाय खाते सोपविण्यात आले. १८१८ मध्ये इंग्रजांनी पेशवाई बुडविली व
दुस-या बाजीरावाला आठ लाख रुपये पेन्शन देऊन उत्तरेत गंगेच्या काठी ब्रम्हावर्त ( विठूर ) येथे स्थायिक केले. दुस-या बाजीरावाबरोबर जी ब्राम्हण मंडळी विठूरला गेली, त्यांत पांडूरंगरावही होते व तेथेही त्यांच्याकडे धर्मदाय खाते होते. ते आधी अण्णासाहेब विंचूरकरांचे आश्रित होते . पांडुरंगरावांना आठ मुले होती. त्यातला दुसरा रामचंद्र ऊर्फ तात्या.त्याचा जन्म येवले येथे सन १८१४ सुमारास झाला. विचूरकरांच्या ' तीर्थयात्रा प्रबंध ' या तत्कालीन हस्तलिखितात रामचंद्ररावांचा उल्लेख 'अप्पा टोपे' य तात्यांचा उल्लेख 'तात्या टोपे ' असा आहे. यावरून त्यांचे मूळ आडनाव टोपे हेच होते. बाजीरावाने दिलेल्या टोपीवरून त्याचे आडनाव टोपे असे पडले, ही आख्यायिका त्यावरून वाद ठरते. ते येवले येथे स्थायिक झाल्याने त्यांना येवलेकर असेही आडनाव लाभले. ते देशस्थ ब्राह्मण होते.
नानासाहेब पेशव्यांचे संबंध कानपूरच्या वरिष्ठ इंग्रज अधिका-यांशी चांगले होते. ते अधिकारी अधूनमधून विठूरला नानासाहेबांकडे येत असत. नानासाहेब त्यांचे आदरातिथ्य उत्तमप्रकारे करायचे. त्यामुळे त्या अधिका-यांचा नानासाहेबांवर विश्वास होता. १० मे रोजी मेरठच्या पलटणीतील देशी शिपायांनी , ११ मे रोजी दिल्लीच्या देशी पलटणींनी व ३० मे रोजी लखनौच्या पलटणींनी इंग्रजाविरुद्ध उठाव केले. त्याच्या बातम्या कानपूरला येऊन धडकल्या. कानपूरच्या देशी पलटणी तीन होत्या. त्यात ३००० शिपाई होते. ते ही उठाव करण्याच्या बेतात आले. त्याची कुणकुण तेथला इंग्रज सेनापती व्हीलर व कलेक्टर हिलर्डसन यांना लागली. त्यांनी लगेच नानासाहेबांना त्याचे शिपाई व तोफा घेऊन कानपूरला बोलावले. नानासाहेब तीनशे सशस्त्र शिपाई व दोन तोफा घेऊन कानपूरला आले. त्याच्याकडे कानपूरच्या नबाबगंज मधील सरकारी खजिना व दारूगोळ्याचे कोठार आणि शस्त्रागार यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी इंग्रज अधिका-यांनी सोपविली. तात्या टोपेही त्यांच्याबरोबर कानपूरला आले होते.
कानपूरच्या पलटणीचा सुभेदार टीकासिंह नानांना व तात्याना भेटला. नानांचा सल्लागार अजीमुल्लाखाँसुद्धा तेथेच होता. चौघांनी उठावाचा बेत आखला. ४ जून १८५७ रोजी टीकासिंहच्या नेतृत्वाखाली कानपूरच्या ३००० शिपायांनी इंग्रजाविरूद्ध बंड पुकारले. त्या छावणीत बायकामुलांसह फक्त १००० इंग्रज होते. व्हीलरने संरक्षणाची तयारी केलेलीच होती. टीकासिंह व तात्या टोपे यांनी कानपूरच्या रेसिडेन्सिवर हल्ला चढविला. नानासाहेब त्यांचे ८ लाखाचे पेन्शन इंग्रज सरकारने बंद केल्याने मनातून इंग्रजावर चिडलेले होतेच. ते वरवरून मैत्री दाखवित होते. त्यांनीही नबाबगंज मधला इंग्रज सरकारचा खजिना, दारूगोळा - भांडार व शस्त्रागार ताब्यात घेतले. हिलरने १६-१७ दिवस चांगली टक्कर दिली पण रेसिडेन्सीतील अन्नपाणी संपत आले. अनेक इंग्रज मारले गेले. त्यामुळे त्याने शरणागती पत्करली. नानासाहेबांनी उरलेल्या इंग्रजांना अलाहाबादेस पाठवून देण्याचे आश्वासन दिले. कानपूर स्वतंत्र झाले. विठूरला जाऊन नानासाहेबांचा राज्याभिषेक थाटात झाला.
कानपूरची बातमी कळताच हॅवलॉक व नील हे दोघे सेनापती चिडले. नील तर क्रुरकर्माच होता. ते दोघे मोठे सैन्य घेऊन रस्त्यात दिसेल त्याला फासावर चढवित
कानपूरला पोहचले. कानपूरला टीकासिंह व तात्या टोपे शर्थीने लढले. पण त्यांचा पराभव झाला. नानासाहेब आपला खजिना व सारे कुटूंब घेऊन गंगापार निघुन गेले. तात्या उरलेले सैन्य घेऊन ग्वाल्हेरकडे गेला. तात्याने ग्वाल्हेरच्या राजाच्या सैन्याला उठावास प्रवृत केले.
हॕवलॉक व नील लखनौकडे तेथल्या इंग्रजांच्या मदतीला सन्य घेऊन गेले. ही संधी संधी तात्याने साधली व पुन्हा कानपूर जिंकून घेतले. ते कळताच हॕवलाॕक व नील वाटेतून परतले. त्यांनी कानपूरवर हल्ला केला. तात्याने मोठ्या जिद्दीने त्यांचा प्रतिकाराला केला पण त्याचा टिकाव लागला नाही. कानपूर व विठूर हातातून गेले. तात्या पुन्हा पश्चिमेकडे निघाला.
तात्याने जेव्हा कानपूर पुन्हा स्वबळावर जिंकले होते, तेव्हा त्याला युध्दोपयागी अशी प्रचंड लूट मिळाली होती. त्या लुटीत ५ लाख रुपये , ११ हजार काडतुसांच्या पेट्या , ५०० तंबू, बैलाचे पुष्कळ तांडे, भरपूर धान्य व कपडे त्याला मिळाले होते. ते त्यात काल्पीच्या किल्ल्यात ठेवून दिले होते. पश्चिमेकडे जाताना शिवराजपूरची देशी पलटण त्याला येऊन मिळाली होती. आता त्याच्या जवळ २० हजारावर सैन्य होते. त्याची बाजू आता भक्कम होती.
सर ह्यू रोजने २० मार्च १८५८ रोजी झाशीला वेढा घातला. राणी लक्ष्मीबाई जिद्दीने लढत होती. पण तिचे सैन्य बेताचच होते. तिने तात्याला मदतीसाठी बोलावले. तात्या आपले सैन्य घेऊन निघाला पण ह्यु रोजच्या सैन्याने त्याचा पराभव केला. राणी लक्ष्मीबाई झांशीहून मोजक्या सैनिकांसह गुप्त मार्गाने बाहेर पडून काल्पीला आली. तात्याने तिचे सांत्वन केले. नानासाहेब पेशव्यांचे पुतणे रावसाहेब हे सुद्धा तेथे होते. झांशी काबीज केल्यावर ह्यू रोज काल्पीयावर चालून आला. तेव्हा राणी लक्ष्मीबाईने ग्वाल्हेरवर हल्ला करण्याचा सल्ला त्यांना दिला. तिघेही आपल्या सैन्यासह ग्वाल्हेरला आले. थोड्याशा चकमकीत ग्वाल्हेर त्यांच्या हाती आले. राजे जयाजीराव शिंदे व दीवाण दिनकरराव राजवाडे आग्र्याला इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेले.
सर हयू रोजने काल्पी जिकल्यानंतर आपला मोर्चा ग्वाल्हेरकडे वळविला. तेथे तुंबळ युद्ध झाले. त्यात राणी लक्ष्मीबाईचे दुःखद निधन झाले. इंग्रजांनी तात्यासह सर्वांचा तेथे पराभव केला. तात्या आपल्या उरलेल्या सैन्यासह त्या युद्धातून निसटले. जाताना त्यांनी आसपासचे जंगल पेटवन दिले.
तात्याबरोबर रावसाहेब पेशवेही निघाले. तात्याने मार्च १८५९ अखेरीपर्यंत आपल्या दुर्दम्य ध्येयवादाच्या बळावर आपल्या अपु-या सैन्यानिशी गनिमी काव्याने मध्य भारतात इंग्रज सेनाधिका-यांना अगदी बेजार करून सोडले. उत्तर अलवर ते दक्षिणेला सातपुड्यातील बैतुल, पूर्वेला सागर ते पश्चिमेला छोटा उदयपूर एवढ्या मोठ्यामध्य भारताच्या प्रचंड टापूत जवळ जवळ एक डझन मोठे मोठे इंग्रज सेनाधिकारी त्याचा पाठलाग करीत होते. पण तात्याचे दर्शन सुद्धा त्यांना होत नव्हते. म्हणून इंग्रज सरकारने तात्याला पकडण्यासाठी एक लाख रुपयाचे पारितोषिक जाहीर केले. पण एवढ्या मोठ्या रकमेच्या लोभाने कोणीही तात्याचा थांगपत्ता लागू देत नव्हता.
लढायांच्या काळात सैन्य आपल्या गावाकडे येत आहे. असे कळताच प्रत्येक गावातील सगळे लोक आपले सामान - सुमान घेऊन जंगलात पळून जात असत. त्यामुळे सैन्याला धान्य , किराणा इ. जिवनावश्यक पदार्थ मिळणे दुरापास्त होऊन जाई. आपल्या सैन्यावर तशी पाळी येऊ नये, म्हणून तात्याने रावसाहेब पेशव्याच्या नावे सा-या प्रजेसाठी एक जाहीरनामा काढून तो गावोगावी पोहचविण्याची व्यवस्था केली. या जाहीरनाम्यातील महत्त्वाचा भाग असा -
" सर्व शहरे , लहानमोठी गावे खेडीपाडी येथील राहणारे मध्यम प्रतीचे लोक, व्यापारी , दुकानदार , लष्करी लोक व इतर सर्व प्रतीचे लोक यास कळविले जाते की, जयाचा झेंडा बरोबर बाळगून राजाच्या मुख्याबरोबर असणारी ही फौज इकडेस आली आहे. या देशात राहणा-या लोकांची खराबी करण्याकरीता ती ईकडे आलेली नाही. फक्त धर्मबाह्य पिरती लोयाच्या नाशाकरीता इथे आली आहे . या उपर कोणत्याही गावच्या लोकांनी ही फौज गावानजीक आली असता पळून जाऊ नये, या फौजेस ज्या सामानाची गरज लागेल, ते सामान शिरस्त्यापेक्षा काही जास्त किंमत ठरवून ज्या किंमतीने गावकरी लोकांकडून विकत घेतले जाईल. हा जाहीरनामा ज्या गावी जाऊन दाखल होईल, त्या गावच्या मुख्याने तो आपल्या आसपासच्या गावात पाठवून द्यावा म्हणजे जेणेकरून लोकांची सर्व भीती दूर होईल."
तात्याला पकडणे शक्य नाही, म्हणून इंग्रज सेनाधिका-यांनी त्याचे म्हातारे वडिल, त्याची पत्नी, मुलगा व मुलगी यांना अटक करून ग्वाल्हेरच्या भयाण किल्ल्यात नजर कैदेत ठेवून दिले. मध्य भारतात तात्या २० जून १८५८ ते मार्च १८५९ अखेर सुमारे ९-१० महीने अत्यंत वेगाने आपल्या सैन्यासह इंग्रज सैन्याला झुकांड्या देत घुमवित राहीला. त्याचा दरदिवसाचा वेग ५० मैलाच्या वर होता, तर इंग्रज सैन्य ४0 मैलांपेक्षा जास्त अंतर कापू शकत नव्हते. या काळात तात्याने एवढ्या मोठमोठ्या इंग्रज अधिका - यांना ३००० मैलाच्या वर पायपीट करायला लावली. पण तात्या त्याच्या हाती लागला नाही. म्हणून त्यांनी फितुर शोधायला सुरुवात केली.
२१ जानेवारी १८ ५९ रोजी तात्याने रावसाहेब पेशवे व फिरोजशहा यांच्यासह अलवर जवळील शिक्कारा ( सीकर ) या गावाजवळ इंग्रज सेनापती कर्नल मीड याच्याशी शेवटची झुंज दिली. त्यात त्यांचा पराभव झाला. रावसाहेब पेशवे नेपाळात निघून गेले व फिरोजशहा इराणकडे निघाला. आता तात्याकडे फारच थोडे सैन्य राहिले. त्याने त्या सैन्यालाही रजा दिली व तो तीन चांगले घोड़े, एक तट्टू, रामराव व नारायण हे दोन ब्राहाण आचारी आणि गोविंद हा मोतद्दार यांच्या सह परोणच्या जंगलात एका सुरक्षित स्थानी निघून गेला.
त्याचा जुना मित्र मानसिंह हा राजपूत जवळच होता. त्या दोघांची भेट झाली. त्यानंतर मानसिंग जातांना म्हणाला , “ मी थोडेसे शिपाई, काही दारूगोळा व अन्नसामग्री घेऊन दोन - तीन दिवसात तुझ्या मदतीला येतो." मानसिंहाची जहागीर ग्वाल्हेरच्या राजाने काढून घेतली होती. ती कशी मिळवावी या चिंतेत तो होता. हे कर्नल मीडला समजले होते. म्हणून मीडने त्याला बोलावून घेतले व त्याला ग्वाल्हेरच्या शिंद्यांकडून अलवरची जहागीरी मिळवून देण्याचे मधाचे बोट त्याला लावले. त्या बदल्यात तात्या टोपे याला पकडून देण्याचे वचन मीडने त्याच्याकडून घेतले.
तात्याला विश्रांती मिळाल्यामुळे तो आता ठाकठिक झाला होता. सिरोज जवळच्या विद्रोही सैन्याला व शिवपुरच्या एक हजार विद्रोही सैन्याला जाऊन मिळण्याच्या व त्यांच्या साह्याने पुन्हा इंग्रजाविरूद्ध लढण्याचा तात्याचा विचार होता. तशी त्यांच्यात निरोपानिरोपी चालू होती. तो मानसिंहाची वाट पाहात परोणच्या जंगलात थांबला होता. पण मानसिंहाने त्याला दगा दिला ७ एप्रिल १८५९ च्या मध्यरात्री तात्या गाढ झोपेत असताना मानसिंह काही इंग्रज सैनिक घेऊन गुपचूप तात्याच्या मुक्कामी आला व त्याने तात्याला पकडून दिले. त्याआधी त्या सैनिकांनी तात्याची सर्व शस्त्रे हस्तगत केली होती. तात्याची त्यांनी झडती घेतली. तेव्हा तात्याजवळ सोन्याची तीन कडी, एक तांब्याचे कडे, १०८ मोहरांची पिशवी सापडली. तात्यांचे हुजरे मात्र तात्यांचे सर्व कागदपत्र घेऊन निसटून गेले. १०८ मोहरांपैकी ९७ मोहरा मीडने मानसिंहला दिल्या. बाकीच्या २१ मोहरा तात्याला पकडणा-या शिपायाःना वाटून दिल्या.
१० एप्रिल १८५९ रोजी इंग्रजांच्या मुशैरी छावणीत तात्यांचे शेवटचे वक्तव्य लिहून घेण्यात आले. तात्याने त्यात आपली आत्मकहाणी सांगितली आहे. ती फार विस्तृत आहे. तात्याला शिप्री येथल्या मीडच्या छावणीतील सैनिकी न्यायालयापुढे १४ एप्रिल १८५९ रोजीच उभे करण्यात आले. तीन दिवस तात्याची चौकशी चालली. त्या न्यायालयात तात्याने स्पष्टपणे सांगितले, "मी जे जे काही केले ते माझे धनी नानासाहेब पेशवे यांच्या आज्ञेनुसार केले. काल्पीपर्यंत मी त्यांच्या हाताखाली वागलो. तेथून पुढे रावसाहेबांच्या आज्ञा पाळल्या. न्याय्ययुद्धातल्या व्यतिरिक्त किंवा लढाई व्यतिरिक्त मी किंवा नानांनी एकाही युरोपियन माणसाला किंवा स्त्रीला ठार मारले नाही किंवा फाशी दिले नाही. कुठलाही साक्षीपुरावा देण्याची माझी नाही. मी तुमच्या विरूद्ध युद्ध खेळलो आहे म्हणून मला पक्के माहीत आहे की, आता मला मरणाला सिद्ध झाले पाहिजे. कोणतेही न्यायालय नको आहे व त्यामध्ये मला कोणताच भाग घ्यावयाचा नाही."

१७ एप्रिल १८५९ रोजी तात्याला फाशीची शिक्षा सुनविण्यात आली. तेव्हा त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. तेव्हा तात्या म्हणाला, माझ्या वृद्ध आईवडिलांचा माझ्या कृत्याशी कोणताच संबंध नाही. म्हणून त्यांना माझ्याकरीता कोणताही त्रास देऊ नये." नंतर बेड्या घातलेले हात उंचावून तात्या धीरगंभीरपणे म्हणाला, आता मला एकच आशा आहे की, या शृंखलांतून मुक्त होण्यासाठी मला एक तर तोफेच्या तोंडी द्यावे किंवा फासावर लटकविले जावे.
नंतर तात्याला वधस्तंभाकडे नेण्यात आले. त्याने शेजारच्या मांगाकडे एक दृष्टीक्षेप टाकला व तो शांतपणे पाय-या चढून वर आला. सभोवारच्या इंग्रजांकडे तुच्छतेने दृष्टी टाकून त्याने आपल्या हाताने स्वतः ची मान फाशीच्या दोराच्या फासात अडकविली. त्याच्या पायाखालची फळी काढून घेताच एका क्षणापूर्वी तरतरीत व तेजस्वी दिसणारे तात्याचे रुबाबदार व बांधेसुद शरीर क्षणार्धात अचेतन होऊन लोंबकळू लागले. झाले ! स्वातंत्र्य युद्धातले चैतन्यच हरपले .
तात्या मध्यम उंचीचा, निमगोरा, धट्टाकट्टा, भव्य कपाळ असलेला, उंच व सरळ नाक असलेला, काळेभोर डोळे व कमानदार भुवया असलेला, भेदक नजर असलेला तो वीर मातृभूमीच्या कुशीत विलीन झाला. त्याच्या चेह-यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते. त्याचा चेहरा पाहताच हा मोठा कर्तबगार पुरूष आहे, असे सर्वांना वाटायचे. तात्याला उर्दू, हिंदी, मराठी, संस्कृत या भाषांचे चांगले ज्ञान होते. सही करण्याइतके इंग्रजी त्याला येत होते. ताचे बाळबोध व मोडी अक्षर वळणदार होते. त्याचा पोशाख साधा होता. खांद्यावर काश्मिरी शाल व कमरेला तलवार आणि कुकरी असायची.
स्वदेशाच्या स्वातंत्र्यासाठी हालअपेष्टा सोशीत, इंग्रज सेनाधिका-यांना सळो की पळो करीत हा अत्यंत स्वाभिमानी वीर योद्धा अखेर विश्वासघाताने प्राणांना मुकला.


मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे ज्या ठिकाणी तात्यांना फाशी देण्यात आली तेथे तात्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे.
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏 स्वातंत्र्य वेदीवर हौतात्म्य पत्करलेल्या सर्व ज्ञात व अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन🙏

संकलित माहिती



रविवार, ११ एप्रिल, २०२१

10 एप्रिल राष्ट्रीय भूमापन दिन National Geodetic Day

 


10 एप्रिल राष्ट्रीय भूमापन दिन 
National Geodetic Day

भारतातील जमिनींची मोजणी 10 एप्रिल 1802 रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले?

त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने 33 गुणिले 33 अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला 1 गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले तसेच जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली. त्यात त्याला अतोनात परिश्रम झाले व त्यातच त्याचे निधन झाले. त्याचीच आठवण म्हणून जगातील सर्वोच्च उंच शिखराला त्याचे नाव देण्यात आले.राज्यकारभार चालविण्यासाठी जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणुन घेण्याची पध्दत पुरातन काळापासुन आहे. भारतामध्ये इ.स. पुर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित पध्दत होती. भारतात जमिनीचे सर्व्हेक्षण व नकाशे तयार करणेची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रम्हांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधु संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याकाळाची नियोजनबध्द संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषात दिसुन येते. शंखापासुन बनविलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने त्याकाळी केला आहे.मौर्य साम्राज्यामध्ये जमिनीची मोजणी व नोंदणी ठेवणेसाठी “रज्जूक” नावाचा अधिकारी नेमला जाई. जमीन मोजणीसाठी दोरीचा प्रथम वापर केला गेला. मौर्यांच्या काळात संस्कृतमधील “रज्जू” यावरून “रज्जूक” हा शब्द प्रचलित झाला. कौटील्याच्या म्हणजेच आर्य चाणक्याच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनीची मोजणी,प्रतवारी, सर्व्हेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी करून जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व त्यावरील पिकांच्या आधारे तिच्यावरील कराची निश्चिती केली जात असे.जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसुल पध्दत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ.स.1540 ते 1545 दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करणेत आली तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करणेत आली. हा महसुल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीन धारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात असे.मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याचे मदतीने कर पध्दतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळी- चा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करणेत आली. जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी 1/3 हिस्सा कर म्हणुन घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मुल्यांकन करून मागील 19 वर्षाच्या सरासरी इतके पुढील 10 वर्षासाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे.

मंत्री तोरडमलची पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलीक अंबर यानेही सन 1605 ते 1726 या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पध्दती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पध्दत अंमलात आणली.मराठेशाहीमध्ये इनाम, वतन व मिरास हे शब्द जमिनीच्या महसुल आकारणीशी निगडीत होते. याव्दारे जमिनीची मालकी व महसुल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. हे अधिकार वंश परंपरागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सन 1674 पासून जमिन महसुल आकारणीसाठी “खेडे” हे एकक वापरले जात असे. पीक उत्पादन व करणा-यांची क्षमता पाहुन कर आकारणी (शेतसारा) बसविला जाई. या पध्दतीला "*कमालधारा*" म्हटले जाई. प्रत्येक गावात मामलेदार हे देशमुख, देशपांडे यांचे मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करत.दुसर्‍या बाजीरावाच्या काळात ही पध्दत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला.18 व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भिमा नदीपासुन तापी नदीकाठच्या बहरानपुर विस्तृत भुप्रदेश प्रथमत: नकाशात बसविला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा,अजंठा टेकड्या,महत्वाची गावे व नद्या सांकेतिक पध्दतीने दाखविल्या आहेत. याच दरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेला आहे. ब्रिटीशांनी सन 1757 पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविण्याकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातून ब्रिटीशांनी सन 1767 मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली व या पदावर सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून जेम्स रनेल यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स रनेल लिखीत ‘”Bengals Atlas” या पुस्तकात शंकु साखळीने जमिनीची मापे आणि खगोल शास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशे तयार केले असा उल्लेख आहे.सर लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून 10 एप्रिल 1802 मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वताचे पासून केली. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमीतीय भूमापनाचे अधीक्षक होते. 1830 मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. जॉर्ज एव्हरेस्ट यांना ‘सर्व्हेअर जनरल बहादूर’ असे संबोधले जाऊ लागले. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्टन यांचा मृत्यू झाला व पुढे हे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी 33 वर्षात पूर्ण केले. अशा प्रकारे भारतीय भूखंडाचे मोजणी काम एकुण 37 वर्षात पूर्ण झाले.सन 1818 मध्ये जेव्हा ब्रिटीशांनी मराठयांकडून सत्ता काबीज केली त्यावेळी दक्षिण विभागाचे राजकारणी कमिशन माउन्टस्टूअर्ट एन्डफिंस्टन यांनी रयतवारी पध्दतीचा पाया घातला. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत दुसरी महत्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुध्द पध्दतीने गुंटर नांवाच्या अधिका-यांने अंमलात आणलेल्या शंकू साखळीने मोजणी करण्यात आली. म्हणून शंकू साखळीस गुंटर चैन, गुंठा असे म्हणत सदर साखळी 33 फुट लांबीची असून 16 भागात विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हणत व गुंटर साहेबांच्या नावावरुन पुढे गुंठा प्रचलित झाला.

40 गुंठयाच्या जमिनीच्या क्षेत्राला एक एकर म्हणत. जमिन महसूल ठरविण्याचा पहिला ग पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सन 1827 मध्ये मिळविला. सध्या अस्तिवात असलेली जमिन महसूल आकारण्याची पध्दत ब्रिटीश राजवटीत ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार आहे.सध्या महाराष्ट्राच्या महसूल विभागांतर्गत येणारा भूमी अभिलेख विभाग महसूल विभागाचा पाया आहे. जमिनीच्या मालकीचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीची पुनर्मोजणी अत्यंत महत्त्वाची आहे. संगणकीकरणाच्या जमान्यात या विभागांतर्गत नियमित कामाव्यतिरिक्त

ई-मोजणी, ई-फेरफार,

ई-चावडी,ई-अभिलेख,

ई-अभिलेख, ई-नकाशा,

ई-पुनर्मोजणी, ई-नोंदणी, ई-भूलेख इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव योजना राबविण्यात येतात.

संकलित माहिती

शुक्रवार, ९ एप्रिल, २०२१

दुर्गाबाई देशमुख Durgabai Deshmukh

दुर्गाबाई देशमुख Durgabai Deshmukh 



(स्वतंत्रता सेनानी)  जन्म: १५ जुलै, १९०९ 
 मृत्यू: ९ एप्रिल, १९८२ 
पती: सी. डी. देशमुख
नागरिकता: भारतीय
तुरूंग प्रवास: दोन वेळा (पहिल्यांदा एक वर्षानंतर तीन वर्ष)
विद्यालय: मद्रास विद्यापीठ
शिक्षण: एमएए, वकील (वकालत)
पुरस्कार-उपाधि: पद्म विभूषण (१९७५)

आंध्र प्रदेश १५ जुलै रोजी स्वातंत्र्य उन्हाळ्यात पहिल्या उडी स्त्री दुर्गाबाई जन्म १९०९ रजहमुंदर्य जिल्हा च्या काकीनाडाच्या नावाची जागा होता. त्यांची आई श्रीमती कृष्णवेन्मा आणि वडील श्री. रामराव होते. वडील लवकरच मरण पावले; पण मध्ये दुर्गा बाई च्या activeness सह मदर्स 
काँग्रेस , मूल्ये या देशभक्ती आणि सामाजिक सेवा बालपणीच्या तिच्या मनात निरंतर कार्यरत होते .
आंध्र महिला सभा, विद्यापीठ महिला संघ, नारी निकेतन अशा विविध संस्थांच्या माध्यमातून महिलांच्या उन्नतीसाठी दुर्गाबाई देशमुख यांनी अथक परिश्रम घेतले. दुर्गाबाई ब्लाइंड रिलीफ असोसिएशनच्या अध्यक्षा होत्या. त्या क्षमतेमध्ये त्यांनी अंधांसाठी एक शाळा-वसतिगृह आणि हलकी अभियांत्रिकी कार्यशाळा स्थापन केली.
ब्रिटीश राज्यापासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या भारतातील संघर्षात ती महात्मा गांधींची अनुयायी होती. तिने कधीही दागदागिने किंवा सौंदर्यप्रसाधने परिधान केली नव्हती आणि सत्याग्रहही नव्हती ती नागरी अवज्ञा चळवळीच्या वेळी गांधी-नेतृत्व असलेल्या मीठ सत्याग्रह कार्यात भाग घेणारी प्रख्यात समाजसुधारक होती. चळवळीत महिला सत्याग्रह आयोजित करण्यात तिचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. या काळात ब्रिटिश राज अधिकाऱ्यांना  तीन वेळा तुरूंगात टाकले.
तुरुंगातून सुटल्यानंतर दुर्गाबाईंनी अभ्यास सुरू ठेवला.  त्यांनी आंध्र विद्यापीठातून राज्यशास्त्रात बीए केले. आणि स्वतःचे मी. अ. स्वाक्षरी केली. १९४२ मध्ये त्यांनी मद्रास विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि मद्रास उच्च न्यायालयात वकील म्हणून सराव करण्यास सुरुवात केली.
१९४६ मध्ये, दुर्गाबाई मद्रास प्रांतातून भारतीय संविधान सभा सदस्य म्हणून निवडल्या गेल्या. मतदार संघात अध्यक्षांच्या पॅनेलमधील ती एकमेव महिला होती. अनेक समाजकल्याण कायदे लागू करण्यात तिचे मोलाचे योगदान होते. १९४८ मध्ये त्यांनी आंध्र एज्युकेशन सोसायटी (एईएस) ची स्थापना केली, जी तेलुगू मुलांच्या शैक्षणिक गरजा भागवू शकेल.
१९५२ मध्ये तिला संसदेत निवडण्यात अपयशी ठरले आणि नंतर त्यांना नियोजन आयोगाचे सदस्य म्हणून नेमण्यात आले. त्या भूमिकेमध्ये त्यांना सामाजिक कल्याणाच्या राष्ट्रीय धोरणाला पाठिंबा मिळाला पाहिजे. या धोरणामुळे १९५३ मध्ये केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना झाली. मंडळाचे पहिले अध्यक्ष या नात्याने, गरजू महिला आणि मुलांचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन या उद्देशाने त्यांचे कार्यक्रम चालविण्यासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवी संस्था आयोजित केल्या.
१९५३ मध्ये तिने जवाहरलाल नेहरू यांचे निकटवर्ती असलेले तत्कालीन अर्थमंत्री चिंतामण देशमुख यांच्याशी लग्न केले.
१९५८ मध्ये भारत सरकारने स्थापित केलेल्या राष्ट्रीय महिला शैक्षणिक परिषदेच्या त्या पहिल्या अध्यक्षा होत्या. १९५९ मध्ये समितीने आपल्या शिफारसी खालीलप्रमाणे सादर केल्या.
· “मुलींच्या शिक्षणाला केंद्र व राज्य सरकारने प्राधान्य दिले पाहिजे.
· केंद्रीय शिक्षण मंत्रालयात महिला शिक्षण विभाग तयार करावा.
· मुलींच्या योग्य शिक्षणासाठी प्रत्येक राज्यात महिला शिक्षण संचालकांची नेमणूक करावी.
· उच्च-शिक्षणावर सह-शिक्षण योग्यरित्या आयोजित केले जावे.
· विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वतंत्रपणे मुलींच्या शिक्षणासाठी निश्चित रक्कम निश्चित करावी.
· विकासाच्या पहिल्या टप्प्यात आठवीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षणाची तरतूद करण्यात यावी.
· निवडक विषयांच्या निवडीमध्ये मुलींसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात.
· मुलींना उदार आधारावर प्रशिक्षण सुविधा मिळाल्या पाहिजेत.
· मुलींच्या शिक्षणास ग्रामीण भागात योग्य प्रोत्साहन दिले पाहिजे.
· विविध सेवांमध्ये मोठ्या संख्येने जागा त्यांच्यासाठी आरक्षित ठेवल्या पाहिजेत.
· प्रौढ महिला शिक्षणाच्या विकासाचे कार्यक्रम योग्यरित्या सुरु करुन प्रोत्साहित केले जावे. "
तिचा वारसा पुढे नेण्यासाठी विशाखापट्टणम यांनी महिला अभ्यास विभाग डीआरएसला दिला आहे. दुर्गाबाई देशमुख सेंटर फॉर वुमेन्स स्टडीज असे नाव आहे.
१९६२ मध्ये, गरीब लोकांची सेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी एक नर्सिंग होम सुरू केले, जे आता विकसित झाले आहे आणि दुर्गाबाई देशमुख हॉस्पिटल म्हणून ओळखले जाते. १९६३ मध्ये त्यांची वॉशिंग्टन डी.सी. मधील वर्ल्ड फूड कॉंग्रेसमधील भारतीय प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून नेमणूक झाली. पाठविले.
त्यांच्या योगदानाचा सन्मान करत त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आणि ९ मे १९८१ रोजी त्यांचे निधन झाले.

जीवन परिचय
शिक्षण -
दुर्गाबाईंच्या बालपण काळात मुलींना शाळेत पाठवले जात नव्हते. पण दुर्गाबाईत शिकण्याची आवड होती. त्याने आपल्या शेजारच्या एका शिक्षकाबरोबर हिंदीचा अभ्यास सुरू केला. त्या काळात हिंदीचा प्रचार हा राष्ट्रीय चळवळीचा एक भाग होता. दुर्गाबाईंनी लवकरच हिंदीमध्ये अशी योग्यता प्राप्त केली की तिने मुलींसाठी शाळा सुरू केली. या प्रयत्नाचे कौतुक करून गांधीजींनी दुर्गाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरविले.
तुरुंगवास / जेल ट्रिप -
आता दुर्गाबाईंनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रियपणे भाग घ्यायला सुरुवात केली. ती आईबरोबर फिरुन खद्दर विकत असे. प्रख्यात नेते 
टी. प्रकाशसमवेत त्यांनी मीठाच्या सत्याग्रहात भाग घेतला. एमआय 25 , एल 930 त्यांनी ताब्यात घेतले आणि एका वर्षाची शिक्षा सुनावली. बाहेर येताच त्यांना आंदोलनात भाग घेतल्याबद्दल पुन्हा अटक केली गेली आणि तीन वर्षांची तुरुंगवासही भोगावा लागला. तुरुंगाच्या या काळात दुर्गाबाईंनी तिला इंग्रजी भाषेचे ज्ञान वाढवले .
महिला वकील -
बाहेर आल्यावर दुर्गाबाईंनी 
मद्रास विद्यापीठात नियमित अभ्यास सुरू केला. ती इतकी हुशार होती की एम.ए. च्या परीक्षेत त्याला पाच पदके मिळाली. तिथूनच तिला कायद्याची पदवी मिळाली आणि १९४२ मध्ये त्यांनी वकिली करण्यास सुरवात केली. खून प्रकरणात युक्तिवाद करणारी ती पहिली महिला वकील होती.
महत्त्वपूर्ण योगदान -
दुर्गाबाई सदस्य निवडून आले या 
लोकसभा आणि संविधान परिषद मध्ये १९४६ . त्यांनी अनेक समित्यांमध्ये महत्त्वपूर्ण योग दिले. १९५२ मध्ये दुर्गाबाईंनी सीडी देशमुखशी लग्न केले . महिलांच्या उन्नतीशी संबंधित अनेक सामाजिक संस्था आणि संस्थांची ती सदस्य होती. त्यांच्या देखरेखीखाली नियोजन आयोगाचे प्रकाशन 'सोशल इन सर्व्हिसेस इनसायक्लोपीडिया' प्रकाशित झाले. १९५३ मध्ये दुर्गाबाई देशमुख यांनी मध्यवर्ती समाज कल्याण मंडळाची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. ती आयुष्यभर समाजकार्यात गुंतली.
राष्ट्रीय महिला-शिक्षणाच्या दुर्गाबाई देशमुख -
समानता: दुर्गाबाई देशमुख लोक स्मरणात ठेवतात, आजच्या भारत सरकारच्या शिक्षणासंदर्भात घेतलेली योजना राष्ट्रीय महिला-शिक्षणाधिकार दुर्गाबाई देशमुख होती, म्हणूनच ही घटना दुर्गाबाई देशमुखात सांगितली जाते. तो, तो संपूर्ण लोकांचा लहानसा परिचय आहे.
दुर्गाबाई देशमुख ही एक महिला-स्वतंत्रतावादी महिला असून, त्यांनी तात्पुरत्या खासदार म्हणून कोट्यवधी रुपयांच्या कायमस्वरूपी निधीसाठी किमान अर्धा डझन संस्था स्थापन करणार्‍या प्रशासक, संविधान सभामध्ये किमान 50 amend० दुरुस्ती प्रस्तावित केल्या, अशा देशभक्त तुरूंगात गेले. वयाच्या चौदाव्या वर्षी.
ज्यांनी लोकसंख्या धोरण तयार करण्यासाठी सविस्तर अहवाल तयार केले अशा प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नातून सामाजिक बदल घडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी देशाच्या प्रगतीमध्ये महिलांचा सहभाग निश्चित करण्यासाठी मजबूत पाया रचला.
संविधान सभा सदस्य म्हणून वारंवार झालेल्या हस्तक्षेपानंतर आंबेडकर म्हणाले, "ही अशी स्त्री आहे ज्याच्या जोडात मधमाशी आहे."
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या दुर्गाबाईंनी वयाच्या पंधराव्या वर्षीच आठ वर्षांचे लग्न सोडले कारण चार वर्षांनंतर तिला मासिक पाळी आली तेव्हा तिला लग्नाचा खरा अर्थ काय आहे हे समजले. लग्नाचे बंधन तोडत त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
दुर्गाबाई देशमुख यांच्या सामाजिक कार्याची सुरूवात महिलांच्या मोक्षातून झाली -
दुर्गाबाईंचे उपक्रम पतित पतींचा सामाजिक बहिष्कार आणि देवदासी व्यवस्थेला विरोध यापासून सुरू झाले. त्यांनी महिलांसाठी हिंदी शाळा चालविली. तेलगू-हिंदी भाषांतरकार म्हणून दुर्गाबाई देशमुख महात्मा गांधी यांच्या संपर्कात आल्या.
त्यांच्या भाषणाची कला पाहून त्याला जॉन ऑफ आर्क म्हटले गेले. गांधीजींनी प्रभावित होऊन ती कॉंग्रेस सेवक बनली. ती अनेक वेळा तुरूंगातही गेली. मदुराई कारागृहात कोठडीच्या शिक्षेदरम्यान, त्यांच्या मेंदूची नाडीला दुखापत झाली; तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राजकीय चळवळीपासून दूर राहण्याचे ठरविले.

शिक्षण, जीवन आणि सामाजिक कार्यात दुर्गाबाई देशमुख यांचे योगदान -

मदन मोहन मालवीयाच्या मदतीने त्यांनी बनारस येथून वेगवान अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यापीठात प्रवेश केला. मद्रास विद्यापीठातून बी.ए. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि मिळाली.

युद्धाच्या परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी मद्रासमधील कायद्याचा अभ्यास सुरू केला आणि १९४२ मध्ये त्यांनी पदवीची पदवी घेतली. हे असे क्षेत्र होते जे स्त्रियांसाठी योग्य नाही मानले जात असे. उत्तराधिकार-वंचित महिलेचा मालमत्ता त्या महिलेकडून परत मिळवण्यासाठी त्याने पहिला दावा लढा दिला.
ही महिला दक्षिण भारताची राजकन्या होती, ज्यांचे पतीचे कुटुंब संपत्तीपासून वंचित होते. ती एक फौजदारी वकील म्हणून खूप प्रसिद्ध झाली
संसदेच्या पहिल्या निवडणुकीत दुर्गाबाई सहभागी झाल्या आणि त्या पराभूत झाल्या. तिला मद्रासला परत जाण्याची व वकिली सुरू करायची होती. पंडित नेहरूंनी त्याला अडवले आणि विविध जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त ठेवले. त्याच वेळी त्यांनी कौटुंबिक न्यायालये स्थापन करण्याचे काम केले, नियोजन आयोगाचे सदस्य बनले आणि आरोग्य, शिक्षण, कामगार, सार्वजनिक सहकार्य, सामाजिक धोरण आणि समाज कल्याण क्षेत्रात प्रशासनासाठी स्वतंत्र अर्थसंकल्प करण्याची शिफारस केली.
-- स्त्रोतपर माहितीनुसार


आगामी झालेले