12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 मध्ये कोलकता येथे झाला होता. त्यांचे नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते. वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त आणि आईचे नाव भुवनेश्वरी देवी होते. स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील विविध प्रसंगातून आपल्याला सुखी आणि यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. येथे जणूं घ्या, असाच एक प्रसंग ज्यामध्ये कर्माचे महत्त्व सांगण्यात आले आहे...
> एका महिला स्वामी विवेकानंद यांना म्हणाली, स्वामीजी काही दिवसांपासून माझा एक डोळा सारखा फडफडत आहे, काहीतरी अशुभ घडणार असे मला वाटते. कृपया एखादा उपाय सांगावा ज्यामुळे हा अपशकुन टळेल.
महिलेचे शब्द ऐकून स्वामीजी म्हणाले, देवी माझ्या दृष्टीने काहीच शुभ आणि अशुभ नाही. जीवनात चांगल्या आणि वाईट दोन्ही घटना घडत असतात. लोक आपल्या विचारानुसार त्या घटनांना शुभ-अशुभ मानतात.
त्यानंतर महिला म्हणाली, स्वामीजी माझ्या शेजारचे कुटुंब नेहमी आनंदात असते आणि माझ्या घरात काही न काही अशुभ घडतच राहते.
स्वामी विवेकानंद म्हणाले शुभ आणि अशुभ विचारांचेच फळ आहे. कोणतीही अशी गोष्ट नाही, जी फक्त शुभ किंवा फक्त अशुभ म्हटली जाऊ शकते.
जी गोष्ट आज शुभ आहे तीच उद्या अशुभ होऊ शकते. जी गोष्ट एखाद्यासाठी शुभ असते तीच दुसऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी अशुभ असते. हे सर्वकाही परिस्थितीवर निर्भर करते.
महिलेने पुन्हा विचारले, असे कसे होऊ शकते की एक गोष्ट एकासाठी शुभ आणि दुसऱ्यासाठी अशुभ.

स्वामीजींनी उत्तर दिले, एक कुंभार मडके तयार करून वाळवण्यासाठी ठेवतो आणि कडक उन्हाची इच्छा व्यक्त करतो. त्याचवेळी दुसरीकडे एखादा शेतकरी पाऊस पडावा अशी इच्छा व्यक्त करतो, ज्यामुळे त्याची शेती चांगली व्हावी.
या स्थितीमध्ये ऊन आणि पाऊस एकासाठी शुभ आणि दुसऱ्यासाठी अशुभ आहे. यामुळे आपण शुभ-अशुभ याचा विचार करू नये. याउलट नेहमी चांगले काम करत राहावे.
स्वामी विवेकानंद यांचे उत्तर ऐकून महिला म्हणाली आता मी फक्त माझ्या कामाकडे जास्त लक्ष देईल.तत्वज्ञ योगीराज !

उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत ।
क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया ।।
हा कठोपनिषधामधील मंत्र भारतवसीयांना देऊन त्यांना कार्यप्रवण करणाऱ्या थोर भारतीय तत्ववेत्ते स्वामी विवेकानंद !
स्वामीजींचे जीवन व विचार हा एक चमत्कार होता. नरेंद्र दत्त म्हणून जन्माला आल्यानंतर त्यांनी स्वामी रामकृष्ण परमहंस यांची दीक्षा घेतली. हिंदु तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करत ते देशभर फिरत राहिले.
११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो आर्ट इन्स्टिट्युट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. सुरुवातीस थोडे नर्व्हस असूनदेखील त्यांनी "अमेरिकेतील माझ्या भावा-बहिणींनो', अशी भाषणास सुरुवात केली आणि सात हजार विद्वतजनांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला जो दोन मिनिटे अखंड चालू होता.
"जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण जिने दिली, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले.
या परिषदेत स्वामीजींनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी आपल्या सुंदर वक्तृत्वाने अमेरिकन नागरिकांची मने जिंकली.
आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले.
वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.
असे स्वामीजी!
४जुलै १९०२ रोजी कोलकात्याजवळच्या बेलूर मठात त्यांनी इच्छा मरणाची समाधी घेतली.
वेद, उपनिषदे, गीता या आणि अशा भारतीय तत्वज्ञानाच्या विविध विषयांवरील स्वामीजींची प्रवचने ग्रंथरुपात उपलब्ध आहेत.
भारतीय तत्वज्ञानाला जगाचे दरवाजे उघडून देण्याचे महान कार्य करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा