🎯 जागतिक वन्यजीव दिन
वन्यजीव म्हणजे वनात, जंगलात राहणारे जीव- प्राणी, वनस्पती, कीटक, पक्षी, वृक्ष आणि एकूणच सर्व जीवमात्र. जगभर ३ मार्च हा दिवस ‘जागतिक वन्यजीव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वन्यजीवांचे रक्षण, संवर्धन, त्यांचे अन्नसाखळीतील महत्त्व, वन्यजीवांच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची आजची स्थिती या विषयावर अनेक गोष्टी बोलल्या आणि लिहिल्या जातात. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या २०१३ च्या अधिवेशनात, ३ मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला गेला. ‘नामशेष होण्याचा धोका असलेल्या वन्यसृष्टीच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर बंधन आणणारा कायदा’ (कन्व्हेन्श ऑन इंटरनॅशल ट्रेड ऑफ एन्डेजर्ड स्पीशीज ऑफ वाइल्ड फॉना अँड फ्लोरा- लघुरूप ‘साइट्स’ ) ३ मार्च १९७३ रोजी १८० देशांनी मान्य केला म्हणून या दिवसाला महत्त्व आहे. या दिवसाच्या निमित्ताने वन्यजीवांचे विविध परीसंस्थातील महत्त्व जाणून त्यांच्या अधिवासाचे आणि त्यांच्या रक्षणाचे, त्यांचे जिणे सुकर करण्याचे, त्यांना असणारे धोके/आव्हाने समजून घेण्याचे आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार/ गुन्हे कमी करण्याचे प्रयत्न केले जातात.
२०१९ च्या जागतिक वन्यजीव दिनाचे सूत्र अथवा केंद्रविषय होता ‘पाणी आणि पाण्यातील विविध प्राणी, वनस्पती, यांचे जग’ अर्थात त्यांचे रक्षण, संवर्धन, आणि निसर्गातील त्यांचे महत्त्व. २०२०च्या वन्यजीव दिनाचा केंद्रविषय आहे ‘पृथ्वीवरील सर्व जीव टिकवून ठेवणे’. यातून वन्यप्राणी आणि वनस्पतींच्या सर्व प्रजातींच्या रक्षण आणि संवर्धनाबरोबरच नैसर्गिक संसाधनांच्या शाश्वत वापराचे महत्त्व लक्षात येते. यातून जैवविविधतेतील जीवांचे – प्राणी आणि वनस्पती यांचे एकमेकांशी असेलेले नैसर्गिक संबंध, अवलंबून राहणे, सहकार्य, त्यांची आनुवांशिकता, त्यांचे व्यवहार, वर्तणूक या सर्व गोष्टी पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक असतात हे अधोरेखित होते.
पर्यावरणशास्त्रज्ञ २०२० साल हे ‘सुपर इयर’ असे संबोधत आहेत. हे वर्ष, पर्यावरणाचे, जैवविविधतेचे एक उत्कृष्ट वर्ष ठरेल, कारण या वर्षी जैवविविधतेवर भर देणाऱ्या विविध आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे निसर्गाचा ढासळणारा समतोल सांभाळणे शक्य होऊ शकेल असे शास्त्रज्ञांना वाटते. या समस्येचे समाधान निसर्गातूनच शोधावे लागेल. या प्रयत्नात प्रत्येकाचा सहभाग असणे ही काळाची गरज आहे; कारण मुळात सर्व जीव जगले तरच मानवाचे अस्तित्व टिकेल.
जागतिक वन्यजीव दिन दरवर्षी एका थीमसह साजरा केला जातो.
2022 मधील जागतिक वन्यजीव दिनाची थीम "परिस्थिती पुनर्संचयित करण्यासाठी प्रमुख प्रजातींचा परिचय" होती.
जागतिक वन्यजीव दिन 2023 ची थीम "वन्यजीव संरक्षणासाठी भागीदारी" आहे.
जागतिक वन्यजीव दिन 2024 ची थीम, “कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट: एक्सप्लोरिंग डिजीटल इनोव्हेशन इन वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन,” संरक्षण प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेवर प्रकाश टाकते. ही थीम आजच्या डिजिटल युगात विशेषत: संबंधित आहे, जिथे तांत्रिक प्रगती दीर्घकालीन संवर्धन आव्हानांसाठी नवीन उपाय देऊ शकते. डिजिटल टूल्स आणि प्लॅटफॉर्ममध्ये देखरेख आणि संरक्षण प्रयत्न वाढवण्याची, शाश्वत वन्यजीव व्यापार पद्धतींना समर्थन आणि सकारात्मक मानव-वन्यजीव संबंध वाढवण्याची शक्ती आहे.
संकलित माहिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा