नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, ७ मे, २०२०

नेहमी असे प्रश्न लहान मुलांना विचारत रहा

लहान मुलांना नेहमी असे प्रश्न विचारत रहा..चालना मिळेल   

✍ज्ञानरचनावाद✍


इयत्ता पहिली ते आठवी साठी उपयोगी पडतील अशी १००  प्रश्न देत आहे.
यात सर्व विषयांची प्रश्न समाविस्ट करण्याचा प्रयत्न करत आहे .
यात प्रश्नांची काठीण्य पातळी वाढवत नेली आहे.
पहिली साठी सोपे प्रश्न आहेत.
०१.) तुमचे पूर्ण नाव सांगा.
०२.) तुमच्या आईचे नाव सांगा.
०३.) तुम्हाला किती भाऊ आहेत ?
०४.) तुम्हाला किती बहिणी आहेत ?
०५.) तुमच्या भावाचे नाव सांगा.
०६. तुमच्या बहिणीचे नाव सांगा.
०७.) मामा कोणाला म्हणतात ?
०८.) तुमच्या मामाचे नाव सांगा.
०९.) मामी कोणाला म्हणतात ?
१०.) तुमच्या मामीचे नाव सांगा.
११.) मावशी कोणाला म्हणतात ?
१२.) तुमच्या मावशीचे नाव सांगा.
१३.) आजी कोणाला म्हणतात ?
१४.) तुमच्या आजीचे नाव सांगा.
१५.) आजोबा कोणाला म्हणतात ?
१६.) तुमच्या आजोबाचे नाव सांगा.
१७.) तुमच्या काकाचे नाव सांगा.
१८.) तुमच्या काकीचे नाव सांगा.
१९.) तुमच्या शाळेचे नाव सांगा.
२०.) तुमच्या वर्ग शिक्षकांचे नाव सांगा.
२१.) तुमच्या मुख्याध्यापकाचे नाव सांगा.
२२.) तुमच्या आवडत्या शिक्षकांचे / मॅडम चे नाव सांगा.
२३.) तुमच्या घरात एकूण किती माणसे आहेत ?
२४.) तुमच्या घरात एकूण किती पुरुष आहेत ?
२५.) तुमच्या घरात एकूण किती स्त्रिया आहेत ?
२६.) तुमच्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत ?
२७.) तुमच्या वर्गात एकूण किती मुले आहेत ?
२८.) तुमच्या वर्गात एकूण किती मुली आहेत ?
२९.) तुमच्या शाळेत एकूण किती विद्यार्थी आहेत ?
३०.) तुमच्या आवडत्या मित्राचे नाव सांगा.
३१.) तुमचा आवडता प्राणी कोणता ? का ?
३२.) तुमचा आवडता पक्षी कोणता ? का ?
३३.) तुमचा आवडता रंग कोणता ? का ?
३४.) तुमचे आवडते झाड कोणते ? का ?
३५.) दुध कोण देते ?
३६.) अंडी कोण देते ?
३७.) मासे कोठे राहतात ?
३८.) मासे काय खातात ?
३९.) पाण्यात राहणारे प्राणी कोणते ?
४०.) आपल्या गावाचे नाव सांगा.
४१.) आपल्या तालुक्याचे नाव सांगा.
४२.) आपल्या जिल्ह्याचे नाव सांगा.
४३.) आपल्या राज्याचे नाव सांगा.
४४.) आपल्या देशाचे नाव सांगा.
४५.) आपल्या देशाची राजधानी कोणती ?
४६.) आपल्या राज्याची राजधानी कोणती ?
४७.) आपल्या राज्याची उपराजधानी कोणती ?
४८.) आपल्या देशात किती राज्य आहेत ?
४९.) आपल्या राज्यात किती जिल्हे आहेत ?
५०.) आपल्या जिल्ह्यात किती तालुके आहेत ?
५१.) आपल्या तालुक्या शेजारील तालुके सांगा.
५२.) आपल्या जिल्ह्या शेजारील जिल्हे सांगा.
५३.) आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?
५४.) आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?
५५.) आपले राष्ट्रीय फुल कोणते ?
५६.) आपले राष्ट्रीय फळ कोणते ?
५७.) आपला राज्य प्राणी कोणता ?
५८.) आपला राज्य पक्षी कोणता ?
५९.) आपला राज्य वृक्ष कोणता ?
६०.) आपले राज्य फुल कोणते ?
६१.) आपली राज्य भाषा कोणती ?
६२.) आपली राष्ट्रीय भाषा कोणती ?
६३.) आपले राष्ट्रीय गीत कोणते ?
६४.) आपले रास्त्र ध्वज चे नाव काय ?
६५.) आपला स्वतंत्र दिन केव्हा असतो ?
६६.) आपला प्रजासत्ताक दिन कधी असतो ?
६७.) महारास्त्र दिन कधी असतो ?
६८.) आपले राष्ट्रगीत कोणते ?
६९.) आपली राष्ट्रीय नदी कोणती ?
७०.) आपला राष्ट्रीय खेळ कोणता ?
७१.) एका दिवसात किती तास असतात ?
७२.) एका तासात किती मिनिट असतात ?
७३.) एका मिनिटात किती सेकंद असतात ?
७४.) एका आठवड्यात किती दिवस असतात ?
७५.) एका महिन्यात किती दिवस असतात ?
७६.) एका वर्षात किती महिने असतात ?
७७.) वर्षाचे इंग्रजी महिने सांगा.
७८.) वर्षाचे मराठी महिने सांगा .
७९.) आठवड्याचे वार सांगा.
८०.) वर्षाचे ऋतू किती आहेत ?
८१.) वर्षातील ऋतूंची नावे सांगा .
८२.) वर्षात एकूण किती आठवडे असतात ?
८३.) भारताच्या राष्ट्र ध्वजावर किती रंग आहेत ?
८४.) अशोक चक्रात किती आरे आहेत ?
८५.) वजन मोजण्याचे एकक कोणते ?
८६.) लांबी मोजण्याचे एकक कोणते ?
८७.) द्रव्य मोजण्याचे एकक कोणते ?
८८.) एक किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
८९.) एक लिटर म्हणजे किती मिली लिटर ?
९०.) एक किलो म्हणजे किती ग्रॅम ?
९१.) एक टन म्हणजे किती किलो ग्रॅम ?
९२.) एक डझन म्हणजे किती वस्तू ?
९३.) एक तोळा म्हणजे किती ग्रॅम ?
९४.) एक दस्ता म्हणजे किती पाने ?
९५.) एक रिम म्हणजे किती दस्ते ?
९६.) नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या शरीरात किती हाडे असतात ?
९७.) पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शरीरात किती हाडे असतात ?
९८.) विमानासाठी कोणते इंधन वापरतात ?
९९.) सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता ?

१००.) माणूस सर्वात बुद्धिमान प्राणी का आहे ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले