नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

शुक्रवार, १२ जून, २०२०

बालकामगार विरोधी दिन

बालकामगार विरोधी दिन
हातावर रेषा माझ्याही होत्या...
पण नकळत्या वयातच,
हातात पेन-पेन्सिल नाही
तर छिन्नी हतोडा आला...
कष्टाला ना नाही
पण कष्टाचेही वय असते
इथे वयाआधीच माझे
वय संपून गेले

बालकामगारांची ही व्यथा.

Child Labour Slogans (बाल कामगार घोषवाक्य)

1) वय आमचे शिकायचे कामाची नाही सवयी,
आमच्यानी होत नाही कसरत आणि कमाई.
2) नाही हातात ताकद, तरी गाळतोय घाम !
मुखी जाण्या दोन घास, करी चिमुकले हात काम !
3) बाळ मजूरी हटवूया, बाळ मजूरी मिटवुया.
4) बाल मजूरी टाळण्यासाठी, सर्वजण राहू बालकांच्या पाठी .
5) त्यांचे पालकच शत्रू होतात,
जेव्हा छोट्या हातानी काम करवतात.


बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... असे आपण नेहमी म्हणतो. कारण बालपणीचा काळ सुखाचा आणि आनंदाचा असतो. ना कसली चिंता ना कसली काळजी, मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा... पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो. कारण जेव्हा आपण घराबाहेर पडून समाजात वावरतो तेव्हा पोटाची खळगी भरण्यासाठी सिग्नलजवळ काही वस्तू विकणारी मुले, हॉटेल, बसस्थानक, रेल्वे स्टेशनवर पाणी वाटणारी, टेबल साफ करणारी मुले पाहतो. अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते... कायदा असूनही त्यांचे बालपण हरवत चालले आहे. हेच ते बालकामगार... 12 जून बालकामगार विरोधी दिन त्याविषयी थोडंसं.
14 वर्षांखालील जी मुले स्वत:च्या आणि आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी, रोजगार कमवितात त्यांना बालकामगार म्हणतात. ज्या वयात शाळेत जावून शिकायचे, खेळायचे, बागडायचे त्या वयात हातात झाडू घेऊन साफ-सफाई करायची, भांडी, कपडे धुवायचे, विटा उचलायच्या, दगड फोडायचे अशी अनेक कामे करावी लागतात. एकीकडे बोट ठेवलं ती वस्तू विकत घेऊन देणारी हौशी मॉम-डॅड तर दुसरीकडे कामावर पाठविणारी नाईलाज मायबाप... समाजातील हे चित्र कसे बदलेल आणि कोण बदलणार...? हा समाजापुढे गहण प्रश्नच आहे.
12 जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. बालकामगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने जिल्हास्तरावर राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविण्यात येत आहे. अमरावती जिल्ह्यात 2004 पासून जिल्हधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प राबविल्या जात आहे. या प्रकल्पांतर्गत 9 ते 14 वयोगटातील धोकादायक, व्यवसायामध्ये काम करणाऱ्या बालकामगारांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यात येते. प्रकल्पाचा मुख्य उद्देश बालकामगारांचा त्यांच्या कामापासून परावृत्त करून शैक्षणिकदृष्ट्या सक्षम बनविणे व त्यांच्या पालकांचा आर्थिक स्तर उंचावणे, त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे.
कायदा काय सांगतो?
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2000 : "बाल' किंवा "मूल' याचा अर्थ ज्यास वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीत, अशी व्यक्ती.
बालकामगार प्रतिबंध आणि नियमन कायदा 1986 : वय वर्ष 14 खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे, असे या अधिनियमाचे उद्दिष्ट आहे. नियमभंग करणाऱ्यांना 3 महिन्यांपासून 1 वर्षापर्यंत तुरुंगवास व त्यासोबत 10 ते 20 हजार दंड होऊ शकतो.
बालमजूरीमागील कारणे...
अंतराष्ट्रीय संस्था युनिसेफ (UNICEF) च्या मते, लहान मुलांचे शोषण करणे सोपे असते म्‍हणून त्‍यांना कामावर ठेवण्‍यात येते. लहान मुले त्यांच्या वयाला अयोग्य अशा ठिकाणी व अशा प्रकारची कामे का करत असतात. यासाठी सामान्यतः त्यांची गरीबी हे पहिले कारण दिले जाते. परंतु यामागे लोकसंख्येचा भडका, स्वस्त मजूर, उपलब्‍ध असणार्‍या कायद्यांची अंमलबजावणी न होणे, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविणे व मीण क्षेत्रांतील प्रचंड गरीबी अशी काही कारणे आहेत.
लहान वयोगटातील बालकांचे कामगार म्हणून मोठ्या प्रमाणात शोषण होते. त्यांना काही समजत नसते, ना मानसिक ताकद असते ना शारीरिक ताकद. त्यामुळे या बालकांचे शोषण करणे, त्यांना फसवून त्यांच्या कष्टावर एैश करणे समाजातील काही विकृतांना सोपे जाते. पण हे इतकेच नसते, तर मानवतेला काळीमा फासत बालकांना वेश्याव्यवसाय, अमली पदार्थांची तस्करी यामध्येही अत्यंत भयानक पद्धतीने वापरले जाते. दहशतवादी, अतिरेकीही बालकांना आपले हस्तक बनवू पाहत आहेत. त्यांनी बालकांनाच दहशतवादी प्रशिक्षण कारवायांमध्ये वापरायला सुरुवात केली. हे खूप भयंकर आहे. वैचारिक बालमजुरी. दुसरीकडे बालकांचा टीव्ही, सिनेमा आणि इतर रिअ‍ॅलिटी शोमध्येही श्रमिक म्हणूनच वापर केला जातो. पण, त्यांच्या श्रमांना ‘श्रम’ न म्हणता प्रसिद्धीची चमक असते. आज जगभरात आफ्रिका खंडातील देश हे बालमजुरीच्या क्षेत्रात कुख्यात आहेत. ऑस्कर वाईल्ड या लेखकाने म्हटले आहे की, “मुलांसाठी काही चांगले करायचे असेल तर त्यांना आनंद द्या.” ऑस्कर यांनी जे सांगितले, त्याही पुढे जाऊन आपण म्हणू शकतो की, तो आनंद बालसुलभ निर्मळ निर्व्याज आणि त्यांच्या भवितव्यातील प्रगतीसाठी पूरक असावा. आज ‘आंतरराष्ट्रीय बालश्रम कामगार निषेध’ दिनी एक आशा बाळगू की, कुणाही बालकाचे बालपण अकालीच संपणार नाही, त्या बालकाला त्याचे सगळे हक्क मिळतील. देशाचा नागरिक म्हणून त्याला व्यवस्थित संस्कार आणि माणूसपणाचे जगणे मिळो!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले