नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत
हार्दिक स्वागत ......WEL COME
शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०२१
बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१
स्वर्णीम पराक्रम पर्व 24 फेब्रुवारी 1674 Swarnim Parakram Parv
Swarnim Parakram Parv
24 फेब्रुवारी 1674 रोजी प्रचंड स्वामीनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा असलेल्या सप्तवीरांच्या बलिदानातुन एक #स्वर्णीम_पराक्रम_पर्व होऊन गेले या स्वर्णीम पराक्रम पर्वाची शौर्य गाथा सांगण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या दिनविशेषच्या निमित्ताने आपल्या समोर.........[१) विसाजी बल्लाळ २) दिपाजी राउत ३) विठ्ठल पिलाजी अत्रे ४) कृष्णाजी भास्कर ५) सिद्धी हिलाल ६) विठोजी शिंदे
७) आणि खुद्द कडतोजी, उर्फ स्वराज्याचे सरसेनापती म्हणजेच “सरनौबत” प्रतापराव गुजर]
🚩✒🚩📖✒🚩📖✒🚩📖🚩
काळ होता 1674 सालचा महाराजांनी आदिलशहा कडून पन्हाळा मिळवल्यानंतर आदिलशहा पिसळला आणि याचा राग मनामध्ये धरून बहलोल खानास स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी पाठविले. बहलोल खानाच्या रूपाने स्वराज्यात आलेला हा गनीम स्वराज्यावर अन्याय अत्याचार करत स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याने स्वराज्याच्या रयतेवर अनन्वित अत्याचार केले. बहलोल खान रुपी या आसुरी शक्तीला वेळीच रोखण्यासाठी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना बहलोलखानास धुळीस मिळवा असा आदेश दिला. वास्तविक प्रतापरावांचे मूळ नाव कुडतोजी पण त्यांचा पराक्रम पाहून त्यांना महाराजांनी प्रतापराव हे नाव देऊन स्वराज्याचे सरनोबत हा किताब दिला. प्रतापरावांसाठी महाराजांनी दिलेली आज्ञा म्हणजे परमेश्वराने दिलेल्या आशीर्वादापेक्षाही जास्त मोलाची होती. क्षणाचाही विलंब न लावता प्रतापराव बहलोल खानवर तुटून पडले. सह्याद्रीच्या कडे कपारीत महाराजांच्या गमीनी काव्याचा वापर करून त्यास जेरीस आणले. अखेरीस उमरणी जवळ बहलोल खानाच्या छावणीस वेढा घातला गेला आणि बहलोल खान जेरबंद झाला. स्वराज्याच्या सारनोबतसमोर तो शरण आला. त्याच वेळी युद्धनीती नुसार शरण आलेल्याला जीवनदान देण्याच्या विचाराने प्रतापरावांच्या मधील शिपाईधर्म जागा झाला आणि बहलोल खानास अभय दिले गेले... बहलोल खानाने तोंडामध्ये तृण धरून शपथ घेतली पुन्हा स्वराज्याकडे वक्र दृष्टीने पाहणार नाही... पण त्यावेळी भाबड्या प्रतापरावांना याची विस्मृती झाली असेल की लांडग्याच्या बोलण्यावर फार विश्वास ठेवायचा नसतो हे...... प्रतापराव मागे स्वराज्यात परतले पण गनीम दिलेल्या आणाभाका सोयीस्कररित्या बाजूला ठेवून पुन्हा स्वराज्यावर चालून आला. ही खबर महाराजांना समजली आणि महाराजांनी ‘सला काय म्हणोन केला?’ असा प्रश्न करीत ‘बहलोलखानास मारल्याशिवाय रायगडी तोंड दाखवू नये’ असा खलिता पाठविला. महाराजांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या मावळ्यासाठी ही खूप मोठी शिक्षा होती. महाराजांना तोंड दाखवायचं नाही तर मग जगायचं कशासाठी? हा एकच यक्ष प्रश्न प्रतापरावांना दिवसरात्र सतावत होता. जिवाची तगमग होत होती. त्यांच्या दृष्टीने महाराजांशीवाय जगणे म्हणजे आपल्या शरीरातून आपल्या आत्म्याला बाहेर ठेवल्यासारखं होत. त्यामुळे प्रतापराव सैन्य घेऊन बहलोलखानाच्या मागावर निघाले. सर्वत्र आपले हेर पाठवले. माग काढा ! फक्त माग काढा आणि सांगा कुठे आहे तो गनीम . त्याला मारल्याशिवाय महाराजांना तोंड दाखवता येणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना होती. 24 फेब्रुवारी 1674 चा दिवस होता तो महाशिवरात्री चा. एका ठिकाणी सैन्याचा तळ पडला होता. मन रमत नाही म्हणून जवळचे सहा सरदार घेऊन प्रतापराव शिकारीला निघाले. काही मैल गेल्या नंतर त्यांच्या हेरांनी बातमी आणली की बहलोलखान जवळच आहे. जवळ म्हणजे कोठे? तर हा समोरचा डोंगर ओलांडला की छावणी आहे. प्रतापरावांना राग अनावर झाला. त्या हेराला त्यांनी तसाच छावणीत पाठविले सैन्याला स्वारीचे आदेश दिले. पण… पण… सैन्य येई पर्यंत प्रतापरावांना राहवलं नाही. त्यांच्या मूळच्या शिपाई स्वभावाला धीर धरता आला नाही आणि त्यांनी आपल्या सरदारांना चढाईचा आदेश दिला. अवघे सात मराठे सरदार जीवाची पर्वा न करता सुमारे पंधरा हजारच्या सैन्यावर तुटून पडले. शिवरात्रीच्या दिवशी हर हर महादेवाच्या गर्जनेत जणू साक्षात महादेवच या सात सरदारांच्या रूपाने तांडव नृत्य करत होते. तलवारीच्या सपासप वारावर गणिमांची मुंडकी छाटली जात होती. पण पंधरा हजार सैन्यासमोर या सात शूरवीरांचा किती काळ निभाव लागणार होता. शेवटी काळाने घाला घातलाच. घायाळ झालेल्या वाघांचे भेकरही लचके तोडतात. अगदी तशीच अवस्था या सरदारांची झाली आणि हे भागव्याचे सप्तवीर धारातीर्थी पडले. पण या शौर्याला एक नवं परिमाण लाभलं होतं. पराक्रमाला एक नवं कोंदण मिळाले होतं आणि म्हणूनच मरणावर चालून गेलेले ते सात वीर हे मराठी इतिहासातील एक स्वर्णीम पराक्रम पर्व आहे.
आपल्या आठ तासाच्या नोकरीमध्ये पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण वेळ आपल्या कर्तव्याची पूर्तता न करू शकणारे आपण आणि आपल्या कर्तव्यापरी समोर नजरेस पडणाऱ्या मृत्यूशैयेवर हसत मुखाने चढणारे हे सात वीर, त्यांचे हे बलीदान आपण खऱ्या अर्थाने समजून घेऊ शकतो की नाही यात शंका आहेच. पण त्यांची पराकोटीची स्वामिनिष्ठता आणि स्वराज्यवरील प्रेम, त्यांचा त्याग, त्यांचे बलिदान आपणास अंतर्मुख करायला लावते. इतिहास हा केवळ वाचण्यासाठी नसतो तर त्यातून काहीतरी बोध घेण्यासाठी असतो.... प्रतापराव गुजर आणि त्यांचे सहा सहकारी म्हणजे विसाजी बल्लाळ, दिपाजी राउतराव, विठ्ठल पिलाजी अत्रे , कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल आणि सरदार विठोजी शिंदे यांच्या असामान्य बलिदानातून राष्ट्रप्रेम आणि आपल्या कर्तव्याशी प्रामाणिकपणा या दोन गोष्टी जरी अंगी बानवण्याचा प्रयत्न जरी केला तर तर तो प्रयत्न म्हणजे या भगव्याचा सात वीरांसाठी ती खरी श्रद्धांजली ठरेल.
म्हणूनच कुसुमाग्रजांची ही कविता आपल्या मन:पटलावरती सदैव कोरून ठेवलीच पाहिजे.......
म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले सात… ॥धृ.॥
ते फ़िरता बाजुस डोळे…किन्चित ओले…सरदार सहा सरसवुनी उठले शेले रिकबित टाकले पाय…झेलले भाले उसळित धुळिचे मेघ सात निमिषात…॥१॥
आश्चर्यमुग्ध टाकुन मागुती सेना अपमान् बुजविण्या सात अरपुनी माना छावणीत शिरले थेट भेट गनिमांना कोसळल्या उल्का जळत सात दर्यात…॥२॥
खालुन आग, वर आग ,आग बाजूंनी समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी, गर्दीत लोपले सात जीव ते मानी खग सात जळाले अभिमानी वणव्यात…॥३।।
दगडावर दिसतील अजुनि तेथल्या टाचा ओढ्यात तरन्गे अजुनि रंग रक्ताचा क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा अद्याप विराणी कुणी वारयावर गात ॥४
म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले सात…
🚩✒🚩✒📖📖✒🚩✒🚩
संकलित माहिती
गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१
गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी Gopal Hari Deshmukh
गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी
जन्म : १८ फेब्रुवारी १८२३
मृत्यू : ९ ऑक्टोबर १८९२
अव्वल इंग्रजीतील थोर समाजचिंतक. लोकहितवादी
लोकहितवादी मूळ नाव गोपाळ हरी देशमुख. जुने आडनाव सिद्धये. यांचे घराणे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे. गोपाळरांवांचे निपणजे विश्वनाथ ह्यांच्याकडे बारा गावांची देशमुखी असल्यामुळे ‘देशमुख’ हे नवे आडनाव ह्या घराण्याला मिळाले.
हे एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहास लेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तूत: संख्येने १०८) लिहिली. भाऊ महाजन ऊर्फ गोविंद विठ्ठल कुर्टे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका शतपत्रांचा इत्यर्थ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी संस्कृतविद्या, पुनर्विवाह, पंडितांची योग्यता, खरा धर्म करण्याची आवश्यकता, पुनर्विवाह आदी सुधारणा ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे, गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांनी ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी 'अॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "हिंदुस्थानचा इतिहास" हे पुस्तक लिहिले. अध्यक्ष : आर्य समाज, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ बॉंबे, गुजराती बुद्धिवर्धक सभा. १८७८मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले. 🙏
पुरस्कार- ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि १८७७मध्ये‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.
१८८१मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार‘ म्हणून मान्यता दिली.
समाज कार्य-
अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
हितेच्छू ह्या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन
गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग
लोकहितवादींचे अन्य काही ग्रंथ असे : महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४९), यंत्रज्ञान (१८५०), खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी संभाषण (१८५१), निगमप्रकाश (गुजराती, १८७४), जातिभेद (१८७७), गीतातत्त्व (१८७८). सार्थ आश्वलायन गृह्यसूत्र (१८८०), ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था आणि त्यांची हल्लींची स्थिती (१८८३), स्थानिक स्वराज्य संस्था (१८८३), पंडितस्वामी श्रीमद्द्यानंद सरस्वती (१८८३), ऐतिहासिक गोष्टी (२ भाग, १८८४, १८८५), गुजराथचा इतिहास (१८८५).
संकलित माहिती
रविवार, ७ फेब्रुवारी, २०२१
रमाबाई भिमराव आंबेडकर Ramabai Ambedkar
(डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी)
जन्म : ७ फेब्रुवारी १८९८ (वंणदगाव)
मृत्यू:२७ मे, १९३५ (वय ३७) (राजगृह, दादर, मुंबई)
टोपणनाव: रमाई (माता रमाबाई),
रमा, रामू (बाबासाहेब रमाबाईला प्रेमाने 'रामू' म्हणत)
वडील : भिकू धुत्रे (वलंगकर)
आई : रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर)
पती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अपत्ये : यशवंत आंबेडकर
रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.
💁🏻♀️ सुरूवातीचे जीवन
रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळ जवळील वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना ३ बहिणी व एक भाऊ (शंकर) होता. मोठी बहीण दापोलीत दिली होती. भिकू दाभोळ बंदरात माशांनी भरलेल्या टोपल्या बाजारापर्यं पोहचवत असे. त्यांना छातीचा त्रास होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. धाकटी बहीण गौरा व भाऊ शंकर अजाण होते. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.
🤝 विवाह
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाई सुभेदार रामजी आंबेडकर हे आपल्या भीमराव नामक मुलासाठी वधू पाहत होते. सुभेदारांना भायखळा मार्केटजवळ राहणाऱ्या वलंगकरांकडे लग्नाची मुलगी असल्याचे आहे. सुभेदारांना रमा पसंत पडली त्यांनी रमाच्या हाती साखरेची पुडी दिली. रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले. माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले.
🔹 कष्टमय जीवन
इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई. रमाईने अनेक मरणे पाहिली. प्रत्येक मरणाने तीही थोडी थोडी मेली. मरण म्हणजे काय कळत नव्हते त्या वयात आई वडिलांचा मृत्यू. इ.स. १९१३ साली रामजी सुभेदारांचा मृत्यू. इ.स. १९१४ ते १९१७ साली बाबासाहेब अमेरिकेला असताना रमेशचा मृ्त्यू. ऑगस्ट १९१७ मध्ये बाबांची सावत्र आई जिजाबाईचा मृत्यू. पाठोपाठ मुलगी इंदू, बाबांसाहेबांचा मोठा भाऊ आनंदराव व आनंदरावांचा मुलगा गंगाधरचा मृत्यू. इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्नचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही. परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवर्या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवर्या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.
अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्यास करु लागले.
त्याच वेळी रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या.
ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रामूवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रामू तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते.
🔵 बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी
रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.
🌀 रमाबाई ते रमाआई
एकदा बाबासाहेब आणि रमाई दादरच्या राजगृह बंगल्यावर राहत होते. त्यावेळी एकदा अचानक बाबासाहेबांना परदेशी काही कामा निमित्त जायचे होते पण रमाईला एकटी घरामध्ये कसे राहायला ठेवायचे म्हणून बाबासाहेब धारवाडच्या त्यांच्या वराळे मित्राकडे रमाईला पाठवले व काही दिवस तिकडेच राहायला सांगितले.
ते वराळे काका धारवाड मध्ये लहान मुलांचे वसतीगृह चालवत असत. त्या वसतीगृहाच्या आवारात अनेक लहान मुले खेळायला येत असत. एकदा अचानक दोन दिवस ते लहान मुले खेळायलाच आली नाही. म्हणून रमाई वराळे काका यांना विचारते दोन दिवस झाली ही मुले कुठे गेली आहेत खेळायला आवारात का आली नाही. त्यावेळी वराळे म्हणाले ती लहान मुले दोन दिवसा पासून उपाशी आहेत. कारण वसतीगृहाला जे अन्न धान्याचे अनुदान महिन्याला मिळायचे ते अजून मिळालेले नाही ते मिळायला अजून तीन दिवस लागतील. अजून तीन दिवस ही मुले उपाशीच राहणार आहेत.
वराळे अगदी कंठ दाटून ते म्हणाले, त्यावेळी रमाई लगेच आपल्या खोली मध्ये जातात आणि रडत बसतात आणि कपाटातला सोन ठेवलेला डबा आणि आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून वराळे यांच्याकडे देवून म्हणाल्या तुम्ही ह्या बांगड्या आणि डबा ताबडतोब विकून किंवा गहान ठेवून ह्या आणि लहान मुलांसाठी खाण्याच्या वस्तू घेवून या. मी अजून तीन दिवस ही लहान मुले उपाशी नाही पाहू शकत. त्यावेळी वराळे त्या बांगड्या आणि डबा घेवून जातात आणि लहान मुलांसाठी जेवणाच्या वस्तू घेवून येतात आणि लहान मुले त्यावेळी पोटभरून जेवण करतात. खूप आनंदी राहतात. हे पाहून रमाई खूप आनंदी होते.तिचा आनंद गगनात मावत नव्हता.मग त्यावेळी हि सगळी लहान मुले रमाबाई यांना "रमाआई" म्हणून बोलायला लागतात. आणि त्या क्षणा पासून रमाबाई हि माता रमाई झाली. आणि ती सगळ्यांची आई झाली. ( इयत्ता तिसरी मराठी माध्यमाच्या मराठी पाठ्यपुस्तक एक धडा आहे. रमाई मुळे डाँ.भिमराव आंबेडकर बाबासाहेब झाले. इ.३ रीच्या बालभारती पुस्तकात आपण लिहिलेला धाडवाडचा प्रसंग गोष्टीरुपात दिला आहे. तो प्रसंग अभ्यासक्रमात यावा म्हणून श्री इरगोंडा पाटील(कोल्हापूर)व श्रीम नंदा कांबळे(मुंबई) यांनी प्रयत्न केले.धारवाडची शाळा आजही चालू आहे.)
ख्यातनाम गायक "मिलिंद शिंदे" म्हणतात,
"भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, भुकेल्या मुलांची दशा पाहुनी, बांगड्या... सोन्याच्या रमान दिल्या काढुनी. धन्य रमाई | धन्य रमाई |"
🕯️ निर्वाण
रमाईची शरीर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. इ.स. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत. बाबासाहेबांच्या आग्रहामुळे रमाई थोडी कॉफी किंवा मोसंबीचा रस पीत असत. त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही. आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली. पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.
📘 थॉट्स ऑन पाकीस्तान
बाबासाहेब आंबेडकरांचे रमाबाईंवर निस्सीम प्रेम होते. तिचे कष्ट पाहून त्यांचे मन तुटायचे. त्यांनी आपल्या रामूला पाठवलेल्या पत्रात त्यांच्या या भावना प्रतिबिंबित व्हायच्या. ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्य नि माझ्याबरोबर दु:ख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक...’’ आपल्या पत्नीबद्दलच्या भावना बाबासाहेबांच्या या अर्पणपत्रिकेतून व्यक्त झाल्या आहेत.
📚 रमाईंवरील पुस्तके
रमाई – यशवंत मनोहर
त्यागवंती रमामाऊली – नाना ढाकुलकर, विजय प्रकाशन (नागपूर), ४०३ पृष्ठे
प्रिय रामू - योगीराज बागूल, ग्रंथाली प्रकाशन, पृष्ठे- २३०
📯 लोकप्रिय संस्कृतीत
रमाबाई आंबेडकरांच्या सन्मानार्थ अनेक गोष्टींना त्यांचे नाव दिले गेले आहे.
🏢 शैक्षणिक संस्था
मातोश्री रमाबाई आंबेडकर हायस्कूल, औरंगाबाद
रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावली
माता रमाबाई आंबेडकर गर्ल्स हायस्कूल, गारगोटी, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर (स्थापना १९९०)
🎞️📽️ चित्रपट
रमाई : हा इ.स. २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित मराठी चित्रपट असून त्यात रमाबाईंच्या मुख्य भूमिकेत वीणा जामकर आहेत.
रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई)
रमाबाई (चित्रपट)
📺 मालिका संपादन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर: महामानवाची गौरवगाथा – रमाबाई आंबेडकरांच्या भूमिकेत शिवानी रांगोळे
💠 जयभीम 💠
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
स्त्रोतपर माहिती
मंगळवार, २ फेब्रुवारी, २०२१
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर उर्फ ज्ञानकोशकार केतकर Dr. Sridhar Venkatesh Ketkar
डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर उर्फ ज्ञानकोशकार केतकर
(समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत. १९२१ ते १९२९ या काळात केवळ स्वतःच्या मेहनतीने त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. *पुस्तके :* भारतीय जातिसंस्थेचा इतिहास, महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण. *कादंबऱ्या :* आशावादी, गांवसासू, गोंडवनातील प्रियंवदा, परागंदा, ब्राह्मणकन्या, भटक्या, विचक्षणा.
ज्ञानकोशकार केतकर यांच्यावर परदेशी ज्ञानाचा प्रभाव होता. त्यांची दृष्टी आधुनिक होती. ९० वर्षांपूर्वी केतकर यांनी या कादंबरीलेखनाच्या माध्यमातून वेश्या संतती, विवाहबाह्य़ संबंध, अमेरिकेतील स्थलांतर असे काळाच्या पुढचे विषय मांडले आहेत. त्यावेळी बंडखोर असलेले हे विचार आता समकालीन असेच आहेत. त्यामुळे या कादंबऱ्या आजचेच वास्तव मांडणाऱ्या ठरतात.
जन्म - २ फेब्रुवारी, इ.स. १८८४; रायपूर, ब्रिटिश भारत
मृत्यु - १० एप्रिल, इ.स. १९३७; पुणे, ब्रिटिश भारत
हे मराठीतील आद्य महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे जनक-संपादक, समाजशास्त्रज्ञ, कादंबरीकार, इतिहास संशोधक व विचारवंत होते. महाराष्ट्रीय ज्ञानकोशाच्या कार्यामुळे ज्ञानकोशकार केतकर या नावानेही ते ओळखले जातात.
सुरुवातीचे जीवन
त्यांचे शिक्षण अमरावती व विल्सन कॉलेज, मुंबई येथे झाले. इ.स. १९०६ साली ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेस गेले. तेथील कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी पीएच.डी. मिळवली. भारतात परतल्यावर ते कलकत्ता विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले.
इ.स. १९२० साली त्यांचा विवाह इंडिथ व्हिक्टोरिया कोहन या जर्मन ज्यू तरूणीशी पुण्यात झाला. विवाहानंतर तिला शीलवती हे नाव मिळाले.
महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे कार्य
इ.स. १९२१ ते इ.स. १९२९ या काळात केवळ स्वतःच्या मेहनतीने त्यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे २३ खंड प्रकाशित केले. इ.स. १९१५ सालापासून पुढील १४ वर्षे त्यांनी या प्रचंड कामाच्या संशोधन व लिखाणाला वाहिली. एन्सायक्लोपीडिया या इंग्लिश शब्दासाठी केतकरांनी ज्ञानकोश असा मराठी प्रतिशब्द बनवला. समीक्षक श्री.के. क्षीरसागर यांच्या मते, युरोपीय विद्वानांच्या मताला सरसकट प्रमाण न धरता राष्ट्रवादी भूमिकेतून केतकरांनी ज्ञानकोशाचे कार्य केले.
असे म्हणतात की कमीतकमी काळात ज्ञानकोश लिहून व्हावा, म्हणून केतकर यांनी दोन्ही हातांनी लिहायची सवय ठेवली होती.
स्वभाषा, स्वदेश आणि स्वराज्य यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या केतकरांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी अनेक मार्ग सुचवले.
ते दुसऱ्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष होते.
ते इ.स. १९३१ सालातल्या हैदराबाद येथील मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
‘जागतिक’, ‘संप्रदाय’, ‘सदाशिवपेठी’ यांसारखे शब्द त्यांनी निर्माण केले.
ज्या काळात केतकरांनी ज्ञानकोशाच्या २३ खंडांचे काम केले तो काळ १९१६ ते १९२८ हा आहे. ह्या काळात खुद्द लोकमान्य टिळकांनी सुद्धा त्यांना ‘हे काम फार मोठे आहे, एका माणसाचे हे काम नाही’ अशा प्रकारचा सल्ला दिला होता. पण केतकरांचा निर्धार पक्का होता. त्या निर्धाराला चिकटून सर्व संकटांवर मात करीत त्यांनी १२ वर्षांमध्ये हा ऐतिहासिक महत्त्वाचा मराठी प्रकल्प पूर्ण केला. एवढ्या मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी पुरेशी आर्थिक ताकद वा साधनसामग्री आपल्याकडे नाही याची जाणीव डॉ. केतकरांना त्यावेळी नसेल असे संभवत नाही. पण मराठी ज्ञानकोश निर्मितीच्या पराकोटीच्या महत्त्वाकांक्षेने पेटून उठत त्यांनी एकांड्या शिलेदाराप्रमाणे पदरचे सारे पैसे टाकून कामाला सुरूवात केली. शेवटी केतकर वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या ससून रुग्णालयात एखाद्या अतिसामान्य दरिद्री माणसाप्रमाणे मृत्यू पावले. त्यांच्या अंत्यविधीसाठी त्यांच्या पत्नीला १०० रूपये उसने मागण्याची वेळ आली अशी नोंद त्यांच्या चरित्रात आहे. मुद्दा हा की ब्रिटीशांच्या काळात मराठी ज्ञानकोश निर्मितीसाठी त्यांनी केलेला त्याग हा अनन्यसाधारण आहे.”
आगामी झालेले
-
सावित्रीबाई जोतीराव फुले 🙏 ३ जानेवारी १८३१ 🙏 ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पा...
-
शिक्षण महर्षी, कृषीरत्न डॉ. पंजाबराव उपाख्य उर्फ भाऊसाहेब देशमुख Panjabrao Deshmukh जन्म : २७ डिसेंबर १८९८ (पापळ, अमरावती, महाराष्ट्र ) मृत...