गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी
जन्म : १८ फेब्रुवारी १८२३
मृत्यू : ९ ऑक्टोबर १८९२
अव्वल इंग्रजीतील थोर समाजचिंतक. लोकहितवादी
लोकहितवादी मूळ नाव गोपाळ हरी देशमुख. जुने आडनाव सिद्धये. यांचे घराणे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे. गोपाळरांवांचे निपणजे विश्वनाथ ह्यांच्याकडे बारा गावांची देशमुखी असल्यामुळे ‘देशमुख’ हे नवे आडनाव ह्या घराण्याला मिळाले.
हे एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहास लेखक होते. प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तूत: संख्येने १०८) लिहिली. भाऊ महाजन ऊर्फ गोविंद विठ्ठल कुर्टे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका शतपत्रांचा इत्यर्थ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी संस्कृतविद्या, पुनर्विवाह, पंडितांची योग्यता, खरा धर्म करण्याची आवश्यकता, पुनर्विवाह आदी सुधारणा ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात इंग्रजी शिक्षणामुळे घडलेल्या पहिल्या काही नवशिक्षितांपैकी एक म्हणजे, गोपाळ हरी होत. त्यांनी मराठी शाळेत शिक्षण घेत असतानाच इंग्रजीचा अभ्यास केला. त्यांनी ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ज्ञ. ‘लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी 'अॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी "हिंदुस्थानचा इतिहास" हे पुस्तक लिहिले. *अध्यक्ष :* आर्य समाज, थिऑसॉफिकल सोसायटी ऑफ बॉंबे, गुजराती बुद्धिवर्धक सभा. १८७८मध्ये ते मुंबई विद्यापीठाचे फेलो झाले. 🙏
पुरस्कार- ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि १८७७मध्ये‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.
१८८१मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार‘ म्हणून मान्यता दिली.
समाज कार्य-
अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
हितेच्छू ह्या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन
गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग
लोकहितवादींचे अन्य काही ग्रंथ असे : महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४९), यंत्रज्ञान (१८५०), खोटी शपथ वाहू नये आणि खोटी साक्ष देऊ नये याविषयी लोकांशी संभाषण (१८५१), निगमप्रकाश (गुजराती, १८७४), जातिभेद (१८७७), गीतातत्त्व (१८७८). सार्थ आश्वलायन गृह्यसूत्र (१८८०), ग्रामरचना, त्यांतील व्यवस्था आणि त्यांची हल्लींची स्थिती (१८८३), स्थानिक स्वराज्य संस्था (१८८३), पंडितस्वामी श्रीमद्द्यानंद सरस्वती (१८८३), ऐतिहासिक गोष्टी (२ भाग, १८८४, १८८५), गुजराथचा इतिहास (१८८५).
संकलित माहिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा