नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मंगळवार, १ जून, २०२१

जागतिक दूध दिवस World Milk Day

जागतिक दूध दिवस World Milk Day 



सर्वांना दूध आणि दुग्ध उत्पादनाचे महत्त्व कळावे म्हणून आज म्हणजेच १ जूनला ' जागतिक दूध दिवस ' साजरा करतात. सर्वसामान्य नागरिकांना दूधाबद्दल माहिती कळावी आणि जगभराती देशांना दुधाचे महत्त्व ध्यानात यावे यासाठी हा दिवस!
  फुड ॲन्‍ड ॲग्रीकल्‍चर ऑर्गनायझेशन, युनायटेड स्‍टेटस् व त्‍यांच्याशी संलग्‍न १९१ सभासद देशांनी माणसाला आवश्‍यक न्‍युट्रीशनल उपलब्‍धता वाढवण्यासाठी दुधाकडे लक्ष केंद्रित केले. 
अनेक देशांमध्ये याच तारखेला दुग्ध दिवस साजरा केला जात असे म्हणून २००१ पासून १ जूनला जागतिक दूध दिवस साजरा करण्यात येतो.

जागतिक दूध दिवस ...

मजबूत दात –

दूध कॅल्शियम चा सर्वात चांगला स्रोत आहे. आणि दातांना फक्त आणि फक्त कॅल्शियमचीच गरज असते. यासोबत दूध दातांना गड्डे पडणे व सडणे यापासून वाचवतो. कॅल्शियम आपल्या शरीरात शोसल्या जाईल जेव्हा आपल्या शरीरात विटामिन – डी असेल यासाठी या गोष्टीचे विशेष ध्यान ठेवा कि दुधात विटामिन – डी चे प्रमाण चांगले असते.

स्वस्थ हाडे –

हे खरेच कि मुलांच्या हाडांना मजबूत करण्यासाठी त्यांना दूध पिणे जरुरी आहे. तेव्हाच त्याचा योग्य विकास होऊ शकणार हे पण सत्य आहे कि तरुण लोक सुद्धा दूध सेवन करून आपल्या हाडांना मजबूत बनवू शकतात. मग दुधातील फायदे त्यातील कॅल्शियम मुळेच असतात आणि यासाठी शरीरात विटामीन – डी ची जरुरत असते.

स्नायूंचा विकास –

स्नायूंच्या विकासात दूध सहाय्यक ठरते. हा फायदा दुधात असलेल्या प्रोटीनमुळे होतो. बरेच धावपटू व्यायाम केल्यावर दूध पिणे पसंत करतात.यामुळे शरीराला आवश्यक पोषके मिळतात आणि त्यांच्या स्नायूंचा विकास अधिक होतो. स्नायुमधील वेदनाही यामुळे दूर करण्यात मदत मिळते.

तुम्ही आता निश्चितपणे जाणला असाल कि दूध पिल्याने काय काय फायदे होतात जरी तुम्ही थोड थोड दूध पीत असाल परंतु ते नक्कीच प्या. हे काही महत्वाचे नाही कि तुम्ही रोज किती दूध पिता मग ते थंड असो व गरम या दोन्ही प्रकारच्या दुधापासून सारखेच फायदे मिळतात.

दूधामध्ये मानवी शरीरास पोषख असे अनेक घटक असतात. ते खालील प्रमाणे

कॅल्शियम, मॅगनिशियम, झिंक, फॉस्फरस,

आयोडीन,आयर्न,पोटॅशियम,फोलेट्स,

व्हिटॅमिन ए ,व्हिटॅमिन डी, राइबोफ्लेविन,

व्हिटॅमिन बी12, प्रोटीन,आरोग्यदाई फॅट,

दूधात कॅल्शियम असते. कॅल्शियम हाडांच्या खनिजांची घनता सुधारण्यासाठी ओळखला जातो. त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि फॉस्फरस देखील असतात, हे सर्व चांगल्या हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. दूध हा अधिक ऊर्जा देणारा पदार्थ आहे. दूध प्यायल्याने मानवी शरीरात कमी वेळात जास्त उर्जा उत्पन्न होऊ शकते. कारण, दुधात अधिक मात्रेत प्रोटीन असते. जगभरातील अनेक देश दूध उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतातही धवलक्रांती म्हणजेच दूध वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात…

दूधामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते त्यामुळे हृदयरोग होण्याची शक्यता कमी असते. रक्तदाब नियंत्रित असल्याने हृदयावर ताण येत नाही त्यामुळे हृदयासंबंधीत कोणत्याही समस्या उद्भवत नाही. हृदयाचे कार्य चांगले राहण्यासाठी झोपताना दूध पिणे कधीही चांगले.

दूध पिण्यामुळे त्वचे संबंधीतील समस्या दूर ठेवण्यास मदत होते. दूध हे त्वचेला कोमल, मुलायम आणि चमकदार बनवतो. दूधामध्ये त्वचेसाठीचे उपयुक्त असे सर्व विटामीन्स आणि पोषकतत्वे असतात. त्यामुळे दिवसातून दोन ग्लास दूधाचे सेवन करणे गरजेचे आहे.

स्नायूंच्या विकासात दूध सहाय्यक ठरते. अनेक धावपटू व्यायाम केल्यानंतर दूध पिणे पसंत करतात त्यामुळे स्नायूंना पोषक तत्वे मिळतात. दूध पिण्याने स्नायुमधील वेदनाही दूर होते.

रात्री दूध प्यायल्यामुळे त्वचेसाठी बरेच फायदे होऊ शकतात. नियमितपणे दुधाचे सेवन केल्याने त्वचेला एक तरुण देखावा मिळू शकतो. दुधात व्हिटॅमिन बी 12 असते जे त्वचेची लवचिकता सुधारण्यास मदत करते. दुधामध्ये असलेले व्हिटॅमिन ए नवीन पेशी रचना तयार करण्यास मदत करते आणि त्वचेच्या विविध आजारांशी लढायला मदत करते.

मधुमेह रूग्णांच्या हाडांमध्ये अशक्तपणा असतो, ज्यामुळे त्यांना अशक्तपणा जाणवतो. त्यांच्यासाठी, रात्री साखर न घालता अर्धा कप दूध पिणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

रात्री थोडी हळद घालून तयार केलेले कोमट दूध पिणे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे दूर करण्यासाठी फायदेशीर नैसर्गिक उपाय ठरू शकतात. हळद-दुधाचे अँटीऑक्सिडेंट आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

वजन कमी करण्याची चिंता न करता फक्त एक कप गरम दूध पिणे फायदेशीर आहे. दूध हे प्रथिनांचे स्रोत आहे जे रक्तातील साखरेचे योग्य स्तर राखण्यात आणि उर्जेची पातळी कमी करण्यास मदत करते. क्रीमपेक्षा कमी फॅट (फॅट) असलेले दूध अधिक प्रभावी आहे

२ टिप्पण्या:

लक्षवेधी म्हणाले...

💐💐💐

Master म्हणाले...

धन्यवाद 🙏 लक्षवेधी कार....

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले