नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

गुरुवार, २३ मे, २०२४

जागतिक कुस्ती दिन World Wrestling Day


२३ मे जागतिक कुस्ती दिन Jagtik Kusti Din 
World Wrestling Day

२३ मे १९०४ रोजी ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे पहिले जागतिक ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
जगातील १३० पेक्षा जादा देश कुस्ती खेळतात, त्याचबरोबर कुस्ती बघण्यासाठी नेहमीच प्रेक्षक गर्दी करत असतात.

कुस्ती या क्रीडा प्रकाराला महाराष्ट्रानेच सर्वात मोठे महत्त्व दिले आहे. तसा हा पारंपरिक खेळ आहे. छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिला आणि पश्चिम महाराष्ट्रात खास करून कोल्हापूर जिल्ह्यात कुस्तीचे आजही महत्त्व आहे. खासबागच्या मैदानावर आजही हजारो लोक कुस्तीच्या दंगलीला गर्दी करतात.
अजूनही ग्रामीण भागात, खेड्यापाड्यातसुद्धा तालमी आहेतच. लाल आखाड्यात माती आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हय़ांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग कुस्ती खेळण्यासाठी आखाड्यात उतरत आहेत. त्यातूनच महाराष्ट्र केसरी तयार होतात. खाशाबा जाधव यांनी भारताला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले, पण त्यानंतर मात्र महाराष्ट्रातील एकाही मल्लाला त्यांच्याएवढी उंची गाठता आली नाही.

कुस्ती हा मराठी शब्द ‘कुश्ती’ या फार्सी शब्दावरून तयार झाला असून त्याचा अर्थ मलयुध्द, अंगयुध्द किंवा बाहुयुध्द असा आहे. प्राचीन काळी इराण देशात द्वंद्वयुध्द खेळताना कमरेला जो पट्टा किंवा जी दोरी बांधत, त्याला कुश्ती हे नाव होते. त्यांना धरून जे द्वंद्व खेळले जाई, त्यास कुश्ती हे नाव प्राप्त झाले. फार्सी भाषेत कुश्त म्हणजे ठार मारणे किंवा कत्तल करणे. लक्षणेने प्रतिस्पर्धावर शक्तीने वा युक्तीने मात करुन त्याला नामोहरम करणे, हा कुस्ती ह्या शब्दाचा अर्थ आहे. कुस्तीचा प्रधान हेतू तोच असतो.

त्यांची सकाळ रोज ४ वाजता होते. ५ वाजता सुरू झालेला सराव ४ तास चालतो. दुपारचं जेवण झालं की पुन्हा थोड्या वेळात सरावासाठी सज्ज. पुन्हा चार तासांचा व्यायाम. जोर बैठका. सपाट्या. कार्टव्हिल. ब्रिजिंग. मुद्गल व्यायाम. दोराचे व्यायाम. आखाडा उकरणे. लिफिक्ट. यापेक्षाही बरंच काही. सगळं रोजचंच. ताकदवान खुराक रोजचाच. आपल्या चुका हेरून त्यानुसार करायचा आपला सराव ही रोजचाच. चमचमीत, दमदमीत खाणं, मोबाईलवर रेंगाळणं, मित्रांचा फड जमवून फिरायला जाणं यासाठीचा वेळही फक्त आखाड्याचाच. आखाडा आणि कुस्ती. जग त्या भोवतीच फिरत असतं. एकलव्या सारखं फक्त ध्येय दिसत असतं. मनात कलाजंग, दसरंग, सालतु, भारंदाज असे नानाविध डाव मांडलेले असतात. मेंदुवर फक्त त्यांचाच ताबा असतो. जिद्द, चिकाटी, कष्ट, मेहनत हे शब्द ते जिवंतपणे जगत असतात. त्यातही कोणाला खुराकाच्या खर्चाची भ्रांत, कोणाला घर चालवण्याची. जगाचा नकार पत्करून पाठीशी उभ्या असलेल्या बापाला यश दाखवायचं असतं. काहींना कुस्ती खेळते म्हणून रोखल्या गेलेल्या नजरांना उत्तर द्यायचं असतं. दुखापतींनी काहिंना चितपट केलेलं तर काहींना आपल्याचं मागच्या कुस्तीतलं हरणं बोचलेलं. पण याने थांबुन न राहता ते मनात रोज एक प्रकाशमान करणारी ज्योत लावत असतात. अंधार भेदून आखाड्यातल्या मातीत पाय घट्ट रोवून उभे असतात. आपल्याकडून असलेल्या अपेक्षांसाठी, आनंदासाठी, स्वप्नपूर्तीसाठी, कधी कधी तर परिस्थितीला तोंड देण्यासाठी अनिवार्य म्हणूनही जिंकत असतात. सतत लढत असतात. आयुष्यासाठी लढणं की लढण्यासाठी आयुष्य या फंदातही न पडता प्रामाणिकपणे लढत असतात. म्हणूनच दुरदेशी कुठे तरी कधीतरी राष्ट्रगान अभिमानाने घुमतं. चांदीच्या गदेला सोन्याचं महत्त्व मिळतं आणि पदकांच्या खैराताने आयुष्याचं सोनं होतं. खरंच, कुस्तीगीर होणं सोपं नसतं. तमाम कुस्तीगिरांना, त्यांना घडवणाऱ्या वस्तादांना, त्यांना मनात जपणाऱ्या कुस्ती शौकिनांना, लाल मातीसाठी झटणाऱ्या, राबणाऱ्या मंडळींना, आयुष्याची कुस्ती झालेल्या सगळ्या सगळ्यांना. कुस्तीगिरांना आर्थिक मदत करणाऱ्या प्रायोजकाना, संघटनेना मदत करणाऱ्या जाहिरात दारांना; कुस्तीगीर, पालक, कुस्ती शौकिन, कुस्ती प्रेमी, आयोजक, प्रायोजक, संघटक, कोच, वस्ताद, मार्गदर्शक या सर्वांना जागतिक कुस्ती दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही आहात म्हणून कुस्ती जिवंत आहे, या दिवसाला महत्त्व आहे.

आदिमानवापासून आत्मसंरक्षणासाठी मानव ज्या लढया चढया करीत आला, त्यांतूनच कुस्तीच्या द्वंद्वाचा उगम झाला. छोटे प्राणी माठया प्राण्यांवर युक्तीने कशी मात करतात व स्वत:चा बचाव करू शकतात हे पाहून, मानवाने मल्लविद्येची उपासना व जोपासना सुरू केली. पुढे मानवामानवांमधील द्वंद्व स्वत:चे श्रेष्ठत्व सिध्द करण्यासाठी मल्ल विद्या उपयुक्त ठरली. कालांतराने या प्राथमिक द्वंद्वास जागतिक स्वरूप प्राप्त झाले व त्याचे स्वतंत्र असे शास्त्र बनत गेले. देशोदेशी त्यामध्ये विविधता निर्माण झाली असली, तरी त्यातील मुलभूत तत्वे कायमच आहेत.
कुस्तीची वा मल्लयुध्दाची पूर्वपीठिका फार प्राचीन आहे. भरतात वैदिक वाङ्मयात तसेच रामायण, महाभारत आदी ग्रंथातीलमल्लविद्येचा उल्लेख अनेक ठिकाणी येतो. रामायणात राम, लक्ष्मण व सीता वनवासात असताना किशकिंधा नगरीत आले. रामाच्या प्रोत्साहनाने वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये मल्लयुध्द होऊन सुग्रीवने वालीचा पाडाव केला. महाभारतातील वर्णनुसार कृष्ण, बलीराम व भीम हे मल्लविद्येत प्रविण होते, हे त्यांनी केलेल्या महायुध्दांतील पराक्रमावरून दिसून येते. कृष्णाने मुष्टिक व चाणूर ह्या कंसाच्या दरबारातील महामल्लांना मल्लयुध्दात मारून शेवटी कंसालाही मारले. पांडव अज्ञातवासात असताना भीमाने जीमूत नावाच्या मल्लाला मल्लयुध्दात ठार केले आणि पुढे कीचकाला व जरासंधलाही ठार मारले.
इ. स. पू. ३००० वर्षे इजिप्त देशातील नाईल नदीजवळ बेनीहसन येथील मशिदीच्या व दर्ग्याच्या भिंतींवर केलेल्या कोरीव कामात कुस्त्यातील डावपेचांचे शेकडो देखावे पहावयास मिळतात. प्राचीन ग्रीक वाङ्मयातही मल्लयुध्दाचा उल्लेख आढळतो. हामरच्या इलीअड या सुप्रसिध्द महाकाव्यात ऍजेक्स ओडिसियस यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीचा उल्लेख आहे. ग्रीक सांस्कृतीत सुरू झालेल्या ऑलिंपिक क्रीडा सामन्यांत मल्लयुध्दाचा समावेश केलेला होता. पायथॅगोरस या सुप्रसिध्द ग्रीक तत्ववेत्याचा शिष्य मिलो याने मल्लयुध्दात पराक्रम केला होता.

ऑलिंपिक सामन्यांत त्याने सलग सहा वेळा कुस्तीत अजिंक्यपद मिळविले होते. ग्रीक लोकांनी कुस्तीची कला बरीच प्रगत केली होती. त्यांच्या पँक्रॅशियन या कुस्ती पध्दतीत प्रतिस्पर्ध्यास ठोसे मारून, फेकून, जायबंदी करून शरण यावयास लावीत. हा प्रकार ऑलिंपिक सामन्यात रूढ होता. पुढे त्यात बदल होत जाऊन साधी निरूपद्रवी चितपटीची कुस्ती आली.


तसे पाहायला गेले तर प्रांत बदलला की परंपरा बदलतात.काही ठिकाणी कुस्ती मातीत खेळली जाते तर काही ठिकाणी गवतावर खेळली जाते.काही देशात गादीवर तर काही ठिकाणी समुद्र किनाऱ्यावरील वाळूतही कुस्ती खेळली जाते.

व्यवस्थित बघितले तर ज्युडो, कराटे, सॅम्बो, कुराश यासह विविध मार्शल आर्ट प्रकार यांचाही उगम कुस्तीतूनच झालेला दिसून येतो.सुमो,भारतीय कुस्ती,समुद्री तट कुस्ती अशा विविध परंपरा प्रत्येक देशाने त्यांच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक परिस्थितीला स्वीकारून जपली आहे.परंतु हे सर्व देश जेव्हा ऑलिम्पिक,जागतिक अथवा खंडीय स्पर्धा अशा मानाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सहभागी होतात ते जागतिक कुस्ती संघटनेच्या नियमांनी बांधलेल्या कुस्तीतच.जागतिक कुस्ती संघटना कुस्तीतील विविध प्रकारांना संशोधन करून अद्ययावत नियमांनी बांधून त्या प्रकाराला मान्यता देत असते आणि या कुस्ती प्रकारांच्या वाढीसाठी झटत असताना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करत असते.त्याला जगातील जवळपास सर्वच देश सलग्न राहून कुस्तीच्या कार्यवाढीसाठी झटत असतात.

जागतिक कुस्ती संघटना अर्थात UWW ने फ्री स्टाईल रेसलिंग, ग्रीको रोमन रेसलिंग,वुमेन्स रेसलिंग,बेल्ट रेसलिंग,बीच रेसलिंग, पॅनक्रेशन, ग्रॅपलिंग,अल्याश, कजाक कुरेशी, पहलवानी, तुर्कमेन गोरेश या प्रकारांना मान्यता दिली आहे.

आपल्या भारत देशात जागतिक कुस्ती संघटनेला सलग्न असलेल्या चार संघटना आहेत.प्रत्येक संघटनेचे स्वतंत्र अस्तित्व आहे.यामध्ये प्रामुख्याने भारतीय कुस्ती संघ,ऑल इंडिया ट्रॅडिशनल रेसलींग अँड पॅनक्रेशन फेडरेशन,ग्रॅपलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि भारतीय शैली कुस्ती महासंघ भारत यांचा समावेश आहे.काही महिन्यांपूर्वीच भारतीय शैली कुस्तीला समाविष्ट करण्यात आले आहे.

संकलित माहिती

गुरुवार, ९ मे, २०२४

कोडी व उत्तरे Kodi, puzzles

 ✨कोडी व उत्तरे✨

सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात

ना असे काना नावात

ना असे मात्रा नावात

ना असे नी वेलांटी नावात

नांव सांगा त्याचे ?

उत्तर :- अहमदनगर ☑️


नाव एका माणसाचे चार अक्षरी!!

पहिले दुसरे अक्षर मिळून त्याच्या बायकोचे नाव

दुसरे तिसरे अक्षर मिळून त्याच्या मुलीचे नाव

तिसरे चौथे अक्षर मिळून त्याच्या मुलाचे नाव

चारही अक्षर मिळून त्याचे नाव

ओळखा पाहू ते नाव काय..??

उत्तर :- सिताराम ☑️


मुकुट माझ्या डोक्यावर आहे

जांभळा झगा माझ्या अंगावर आहे

आहेत मला काटे जरा सांभाळून

चविष्ट आहे मी खातात मला भाजून

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- वांगे ☑️


चार खंडाचा आहे एक शहर

चार आड विना पाण्याचे

18 चोर आहेत त्या शहरात

एक राणी आणि एक शिपाई

मारून सर्वांना त्या आडात टाकी

ओळख पाहू मी कोण

उत्तर :- कॅरम ☑️


कोकणातून आली माझी सखी

तिच्या मानेवर दिली मी बुक्की

तिच्या घरभर पसरल्या लेकी

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- लसुन ☑️


चार बोटे आणि एक अंगठा

तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही

सर्वजण बेजार म्हणतात मला

तरी नेहमी उपयोगी मी राही

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- हातमोजे ☑️


गोष्ट आहे मी अशी

मला घेता तुम्ही खाण्यासाठी

मात्र मला तुम्ही खात नाही

सांगा पाहू मी कोण ?

उत्तर :- ताट ☑️


जर आपल्याला तहान लागली असेल,

तर ते आपण पिऊ शकतो..

जर आपल्याला भूक लागली असेल,

तर आपण ते खाऊ सुद्धा शकतो..

आणि थंडी वाजत असेल,

तर आपण त्याला जाळू सुद्धा शकतो

सांगा ते काय आहे?

उत्तर :- नारळ ☑️


दिवसा झोप काढुनी मी

फिरतो बाहेर रात्रीला मी

आहे असा प्रवासी मी

पाठीला दिवा बांधून मी

कोण आहे मी ?

उत्तर :- काजवा ☑️


बाबांनी आपल्या मुलाला एक वस्तू दिली आणि म्हंटले

तुला तहान लागली तर ती खा

तुला भूक लागली तर ती खा

तुला थंडी वाजली तर ती जाळ

ओळखा पाहू ती वस्तू कोणती

उत्तर :- नारळ ☑️


पाच अक्षराचा एक पदार्थ

पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव

पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज

पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर

सांगा पाहू मी कोण?

उत्तर :- गुलाबजाम ☑️


एका माणसाला बारा मुले

काही छोटी काही मोठी

काही तापट तर काही थंड

ओळखा पाहू मी कोण?

उत्तर :- वर्ष ☑️


भाऊराया माझा खूप शैतान

बस तू माझ्या नाकावर

पकडून माझे कान

सांगा आहे तरी मी कोण

उत्तर :- चष्मा ☑️


एका काळ्याकुट्ट राजाची

अद्भुत मी राणी

हळूहळू पिणार मी पाणी

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- दिवा ☑️


कोकणातून आली एक नार

आहे तिचा पदर हिरवागार

आहे तिचा कंबरेला पोर

सांगा मी आहे तरी कोण

उत्तर :- काजू ☑️


अशी गोष्ट जी तुम्ही गिळू शकता

किंवा ती तुम्हाला गिळू शकते

सांगा पाहू ती आहे कोणती

उत्तर :- अहंकार ☑️


कोकणातून आलेला एक रंगू कोळी

आणि त्याने एक भिंगु चोळी

शिंपी म्हणतोय मी शिव तरी कशी

धोबी म्हणतोय मी धुवू तरी कशी

राणी म्हणते मी घालू तरी कशी

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- कागद ☑️


एक मुलगा 100 फुटा च्या शिडीवरून पडला

तरीही त्याला काही जखम झाली नाही असे कसे

उत्तर :- तो पहिल्याच पायरीवर होता ☑️


कोकणातून आला एक भट

त्याला धर की आपट

सांगा मी आहे तरी कोण

उत्तर :- नारळ☑️


हिरव्या घरात लपले एक लाल घर

लाल घरात आहेत खूप लहान मुले

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- कलिंगड ☑️


अशी कोणती गोष्ट आहेे,

जिचा रंग काळा आहे?

ती प्रकाशात दिसते…

पण अंधारात दिसू शकत नाही…

उत्तर: छाया (सावली) ☑️


कंबर बांधून घरात राहतो

काय आहे ते? मला सांगा?

उत्तर :- झाडू ☑️


कोणता तो चेहरा…

सकाळपासून संध्याकाळ पर्यंत..

आकाशाकडे पाहत राहतो हसत…

उत्तर :- सूर्यफूल ☑️


काळ्याभोर रानात एक हत्ती मेला

लोकांनी त्याचा पृष्ठभाग उपसून नेला

सांगा मी कोण

उत्तर :- कापूस ☑️


तुम्ही एका माकडा सोबत त्याच्या घरात गेलात

तिथे त्याचा संपूर्ण परिवार केळी खात होता

तर त्या घरातील सगळ्यात हुशार कोण

उत्तर :- तुम्ही ☑️


काट्याकुट्यांचा बांधला मोठा भारा

निघालास कुठे शेंबड्या पोरा

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- फणस ☑️


एक वानर एक खारुताई आणि एक पक्षी

नारळाच्या झाडावर जोराने धावत होते

तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील?

उत्तर :- नारळाच्या झाडावर केळी नसतात ☑️


माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत

तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही

सांगा मी आहे कोण

उत्तर :- कीबोर्ड ☑️


कोणत्या महिन्यात

लोक सर्वात कमी झोपतात

उत्तर :- फेब्रुवारी ☑️


असे फळ कोणते

त्याच्या पोटात दात असतात

उत्तर :- डाळिंब ☑️


येथे एक फूल फुलले आहे,

येथे एक फूल फुलले आहे

आम्ही एक विचित्र आश्चर्य पाहिले,

पानांवर पाने.

उत्तर :- फुलकोबी ☑️


माणसासाठी कोणती गोष्ट हानिकारक आहे?

पण लोक अजूनही ते पितात.

उत्तर :- राग ☑️


दोन बोटांचा रस्ता..

त्यावर चाले रेल्वे..

लोकांसाठी आहे उपयोगाची..

काही सेकंदात आग लावते..

उत्तर :- माचीस काडी (मॅचस्टीक) ☑️


सर्वेशच्या वडिलांना 4 मुले आहेत

सुरेश

रमेश

गणेश

चौथ्याचे नाव सांगा?

उत्तर :- चौथेचे नाव सर्वेश आहे. ☑️


फळ नाही पण फळ म्हणतो,

मीठ आणि मिरपूड सह गोड

खाणार्‍याचे आरोग्य वाढते,

सीता मायेची आठवण करून द्देते.

उत्तर :- सीताफळ ☑️


अशी कोणती गोष्ट आहे,

जी आपण जागी असल्यावर वर जाते

आणि झोपी गेल्यावर खाली येते.

उत्तर :- डोळ्यांच्या पापण्या ☑️


बिना चुलही ची खीर बनवली..

गोड नाही नमकीन नाही..

थोडे थोडे खाल्याचे लोक खूप शौकीन.

उत्तर :- चुना ☑️


हा गौरव आहे मेजवानीत बनारसी

ही तिची ओळख वाढवते.

उत्तर :- पान ☑️


दिसत नाही पण घातलेले आहे हे दागिने..

हे स्त्रीचे रत्न आहे…

उत्तर :- लज्जा ☑️


अशी कोणती गोष्ट आहे

पती आपल्या पत्नीला देऊ शकतो?

परंतु पत्नी आपल्या पतीला देऊ शकत नाही.

उत्तर :- आडनाव (surname) ☑️


कोण आहे जो

आपली सर्व कामे

आपल्या नाकाने करतो

उत्तर :- हत्ती ☑️


दोन अक्षरात सामावले माझे नाव

मस्तक झाकणे आपले माझे काम

ओळखा पाहू मी आहे कोण

उत्तर :- टोपी ☑️


प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती

जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही

उत्तर :- वय ☑️


एक रहस्य बॉक्स पाहिला,

ज्याला नाही कव्हर

किंवा लॉक केलेला नाही..

खाली किंवा कोपरा बंद केलेला नाही,

त्यामध्ये चांदी आणि सोने आहे. कोण पाहू??

उत्तर :- अंडी ☑️


दोन गुहेचे आहेत दोन रक्षक

दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळेभोर

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- मिशा ☑️


थंडीतही वितळणारी गोष्ट मी

सांगा तुम्ही माझे नाव काय

उत्तर :- मेणबत्ती ☑️


पंख नाहीत मला तरीही मी हवेत उडते

हात नसूनही मी तुमच्याशी भांडते

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- पतंग ☑️


मी आहे वस्तू सोन्याची

तरीही मला किंमत नाही सोन्याची

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- Bed ☑️


तीन अक्षरांचे माझे नाव

वाचा उलटे किंवा वाचा सरळ

मी आहे प्रवासाचे साधन

सांगा पाहू माझे नाव

उत्तर :- जहाज ☑️


अशी कोणती गोष्ट आहे

जी फाटल्यावर अजिबात आवाज येत नाही

उत्तर :- दूध ☑️


आपण कोणत्या प्रकारचा

टेबल खाऊ शकतो?

उत्तर :- व्हेजिटेबल ☑️


एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची संधी दिली जाते

परंतु त्यासाठी तीन पैकी एका खोलीतून जायचे असते

पहिल्या खोलीत भयानक आग असते

दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहेत

दुसऱ्या खोलीत एक्स सिंह आहे जो एका वर्षापासून भूकेला आहे

उत्तर :- तिसऱ्या खोलीतून एका वर्षापासून भुकेला सिंह जिवंत असणार नाही. ☑️


अशी कोणती गोष्ट आहे

जी सर्वात हलके असते

परंतु बलवान व्यक्ती तिला रोखू शकत नाही

उत्तर :- श्वास ☑️


भारत देशाबद्दल काही रोचक तथ्य

एकदा एक माणूस रस्त्याने जात होता

अचानक प्रचंड पाऊस पडण्यास सुरवात झाली

व संपूर्ण भिजून गेला

तरीही त्याच्या डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही

असे कसे झाले

उत्तर :- कारण तो माणूस टकला होता ☑️


एका कोंबड्याने एका घराच्या छतावर अंडे दिले

तर ते कोणत्या बाजूला पडेल

उत्तर :- कोंबडी कधी अंडी देत नसतो


अशी कोणती संपत्ती आहे

जी वाटल्याने वाढते

उत्तर :- ज्ञान ☑️


हजार येतात हजार जातात

हजार बसतात पारावर

हाका मारून जोरात

हजार घेतात उरावर

उत्तर :- बस किंवा रेल्वे ☑️


डोळा असून सुद्धा

मी पाहू शकत नाही

उत्तर :- सुई ☑️


लाल मी आहे पण तो रंग नाही

कृष्ण मी आहे पण देव मी नाही

आड आहे पण पाणी त्यात नाही

वाणी आहे पण दुकान माझं नाही

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- लालकृष्ण आडवाणी ☑️


मी आहे तरी कोण

तिच्या डोळ्यात बोटे टाकली की

माझं तोंड उघडते

उत्तर :- कात्री ☑️


तुम्ही जेवढे त्याच्या जवळ जाल,

तेवढा तो मोठा होत राहील..

सांगा पाहू कोण?

उत्तर :- डोंगर ☑️


आठवड्याच्या सात वारांचे व्यतिरिक्त

अजून तीन दिवसांची नावे सांगा

उत्तर :- काल, आज, उद्या ☑️


लई धाकड हा

तीन डोके आणि पाय दहा

उत्तर :- दोन बैल आणि एक शेतकरी ☑️


प्रश्न असा की उत्तर काय

उत्तर :- दिशा ☑️


हिरव्या पेटीत बंद मी

काट्यात मी पडलेली

उघडून पहा मला

मी आहे मोत्याने भरलेली

उत्तर :- भेंडी ☑️


नसते मला कधी इंजीन

नसते मला कसलेही इंधन

आपले पाय चालवा भरभर

तरच धावणार मी पटपट

सांगा मी आहे तरी कोण ?

उत्तर :- सायकल ☑️


नेहमीच असतो मी तुमच्या घरी

तरी काहींनाच मी आवडतो

एकावर एक कपडे मी घालतो

तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- कांदा ☑️


मी नेहमी तिथेच असतो

तुम्ही मला फक्त दिवसाच पाहू शकता

रात्री मी तुम्हाला दिसणारच नाही

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- सूर्य ☑️


उन्हाळ्यात माझ्या पासून दूर तुम्ही पळता

हिवाळ्यात माझ्या जवळ तुम्ही येता

माझ्यामुळेच आकाशात दिसतात तुम्हाला सात रंग

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- ऊन ☑️


अशी कोणती गोष्ट आहे तुमची

जी बाकीचे लोक तुमच्यापेक्षा जास्त वापरतात

उत्तर :- नाव ☑️


छोटेसे कार्टे

संपूर्ण घर राखते

उत्तर :- कुलूप ☑️


आम्ही जुळे भाऊ शेजाशेजारी

तरीही भेटत नाही जन्मोजन्मी

उत्तर :- डोळे ☑️


एक शेतकऱ्याकडे होते दोन बैल

एक मेला एक विकला

आता त्याच्याकडे किती बैल राहिले ?

उत्तर :- एक किंवा शून्य ☑️


प्रत्येकाच्या शरीराचा भाग मी आहे

तुम्ही मला डाव्या हाताने पकडू शकता

परंतु उजव्या हाताने नाही

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- उजवा कोपरा ☑️


बारा जण आहेत जेवायला

एक जण आहे वाढायला

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- घड्याळ ☑️


मी सगळ्यांना उलटे करतो

तरीही स्वःतला काहीच हलवू शकत नाही

उत्तर :- आरसा ☑️


तो वेडा नाही तरीही कागद फाडतो

तो पोलिस नाही तरीही तो खाकी घालतो

मंदिर नाही तरीही घंटा तो वाजवतो

सांगा पाहू मी कोण?

उत्तर :- वाहक {Conductor} ☑️


एक कपिला गाय

आहेत तिला लोंखडी पाय

राजा बोंबलत जातो

पण ती थांबत नाही

उत्तर :- रेल्वे ☑️


मातीविना उगवला कापूस लाख मन

पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकही कन

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- ढग ☑️


बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही

दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही

श्वास घेते मी पण तुम्ही नाही

ओळखा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- बासरी ☑️


संपूर्ण गावभर मी फिरते

तरीही मंदिरात जायला मी घाबरते

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- चप्पल ☑️


दात असून सुद्धा मीच आवडत नाही

काळे शेतात गुंता झाल्यावर ती मी सोडती

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- कंगवा ☑️


एक रूमाल वाढायला एक तास लागतो

तर दहा रुमाल वाढायला किती तास लागतील

उत्तर :- एक ☑️


एक लाल गाई

नुसती लाकूड खाई

जर पाणी पिले

तर मरून ति जाई

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- आग ☑️


पाय नाहीत मला

चाके नाहीत मला

तरी मी खूप चालतो

काही खात नाही मी

फक्त रंगीत पाणी पितो

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- पेन ☑️


आम्ही दोघे जुळे भाऊ

एकाच रंगाचे आणि एकच उंचीचे

सोबत असता खुप कामाचे

एक हरविता नाही काम दुसऱ्याचे

उत्तर :- चप्पल ☑️


मी कधीही आजारी पडत नाही

तरीसुद्धा लोक मला गोळी देतात

उत्तर :- बंदूक ☑️


काळे बीज आणि पांढरी आहे जमीन

लावून ध्यान त्यात वहाल तुम्ही सज्ञान

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- पुस्तक ☑️


सगळीकडे आहे उजेड आणि गाणी

मी तर आहे सणांची राणी

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- दिवाळी ☑️


दगड फोडता चांदी चकाकली

चांदीच्या आडात मिळाले पाणी

सगळे म्हणाले ही परमेश्वराचीच करणी

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- नारळ ☑️


जगाच्या खबरी साठवून ठेवतो

खूप मोठे माझे पोट

म्हणूनच तर प्रत्येक सकाळी

आता सर्वजण माझी वाट

उत्तर :- वर्तमानपत्र ☑️


रस्ता आहे परंतु गाड्या नाहीत

घरे आहेत परंतु माणसे नाहीत

जंगल आहे पण तू प्राणी नाहीत

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- नकाशा ☑️


पांढरे माझे पातेले

त्यात ठेवला पिवळा भात

ओळखेल मला जो कोणी

त्याच्या कमरेत घाला लाथ

उत्तर :- उकडलेले अंडे ☑️


अवतीभोवती आहे लाल रान

32 पिंपळाना फक्त एकच पान

सांग भाऊ मी कोण

उत्तर :- दात आणि जीभ ☑️


लाईट गेली माझी आठवण झाली

असो मी लहान किंवा मोठी

माझ्या डोळ्यातुन नेहमी गळते पाणी

सांग मी आहे तरी कोण

उत्तर :- मेणबत्ती ☑️


मी तिखट मीठ मसाला

मला चार शिंगे कशाला

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- लवंग ☑️


गळा आहे मला पण डोकं नाही मला

खांदा आहे मला पण हात नाहीत मला

सांगा भाऊ मी आहे कोण

उत्तर :- शर्ट ☑️


एक सूप भरून लाह्या

त्यात फक्त एक रुपया

उत्तर :- चंद्र आणि चांदण्या ☑️


तीन पायांची एक तीपाले

बसला त्यावर एक शिपाई

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- चूल आणि तवा ☑️


गावचे पाटील तुम्हाला राम राम

दाढीमिशी तुमची तांबूस खूप लांब लांब

उत्तर :- मक्याचे कणीस ☑️


हिरवा आहे परंतु पाने नाही

नक्कल करतो मी परंतु माकड नाही

ओळखा पाहू मी कोण

उत्तर :- पोपट ☑️


प्रत्येकाकडे असते मी

सगळे सोडून जातील

पण मी कधीच सोडून जाणार नाही

उत्तर :- सावली ☑️


वस्तू आहे मी अशी

छिद्रे असतानाही असतानाही

पाणी भरून मी घेते

उत्तर :- स्पंज ☑️


मी नेहमी तुमच्या पुढे असतो

तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- भविष्य ☑️


एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी स्वारी

एक उतरवली आता दुसर्‍याची पाळी

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- तवा आणि पोळी ☑️


काळी मी आहे परंतु कोकिळा नाही

लांब मी आहे परंतु काठी नाही

थांब मी जाते परंतु दोरी मी नाही

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- वेणी ☑️


ना खातो मी अन्न

ना घेतो मी तुमच्याकडून पगार

तरीही देतो पहारा दिवस रात्र

सांगा पाहू मी आहे तरी कोण

उत्तर :- कुलूप ☑️


सुरेश च्या वडिलांची चार मुले

रमेश निलेश गणेश चौथ्या चे नाव सांगा

उत्तर :- सुरेश ☑️


संपूर्ण पृथ्वीची करतो मि सैर

परंतु कधीही जमिनीवर ठेवत नाही पैर

दिवसा काढून झोपा

रात्रभर मी जागतो

सांगा पाहू मी कोण असतो

उत्तर :- चंद्र ☑️


मी गोष्ट कशी आहे जी

फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा गरमच राहणार

सांगा पाहू मी कोण

उत्तर :- गरम मसाला ☑️


उंचावरून पडली एक घार

तिला केले मारून ठार

आतील मास खाऊ पटापट

गोड रक्त पिऊ गटागट

ओळखा पाहू मी कोण?

उत्तर :- नारळ ☑️


ऊन्हात चालताना मी येतो

सावलीत बसता मी जातो

वाऱ्याचा स्पर्श मला नकोसा वाटतो

सांगा पाहू मी कोण?

उत्तर :- घाम ☑️


एक गोष्ट जी

खायला कुणाला आवडत नाही

पण सर्वांना मिळते

उत्तर :- धोका ☑️


आपण दिवसभर असे काहीतरी करता,

उचलतो आणि ठेवतो..

आपण त्याशिवाय कोठेही जाऊ शकत नाही.

सांगा काय आहे हे??

उत्तर :- पाऊल ☑️


अशी कोणती गोष्ट आहे

जी फक्त जून मध्ये असते

आणि डिसेंबर मध्ये नसते.

उत्तर :- उन्हाळा ☑️


हिरवे असते आणि लाख मोती असते

त्यात आणि असते शाल अंगावर सांगा तर काय.

उत्तर :- मक्याचे कणीस ☑️


मी काळी आहे पण कोकिळ नाही,

लांब आहे पण काठी नाही,

दोरी नाही पण बांधली जाते

माझे नाव सांग.

उत्तर :- वेणी ☑️


अशी कोणती गोष्ट आहे,

जी डोळ्यासमोर येताच डोळे बंद होते.

उत्तर :- प्रकाश ☑️


वाचण्यात आणि लिहिण्यात

दोन्ही ठिकाणी असते माझे काम

मी नाही कागद मी नाही पेन

सांगा काय आहे माझं नाव?🤔

उत्तर :- चश्मा ☑️


उंच वाढतो मी रंग आहे हिरवा

तुम्ही फक्त जमिनीत थोडे पाणी मुरवा

प्रदूषण करतो मी कमी

निरोगी पर्यावरणाची देतो मी हमी

सांगा पाहू मी कोण..??

उत्तर :- झाड ☑️


चार बोटे आणि एक अंगठा

तरीही माझ्या नसांमध्ये रक्त नाही

सर्वजण बेजान म्हणतात मला

तरी नेहमी उपयोगी मी राही

सांगा पाहू मी कोण??

उत्तर :- हातमोजे ☑️


हरी झंडी लाल कमान,

तोबा तोबा करे इंसांन….

उत्तर :- मिर्ची (मिरची तिखट असल्या कारणाने प्रत्येक व्यक्ती खाण्यास नकार देते.)


हातात आल्यावर शंभर वेळेस कापतो..

आणि थकल्यावर दगड चाटतो..

उत्तर :- चाकू (तुम्हाला काही कापायचे असेल, तर चाकूची बाब समोर येते आणि जेव्हा शार्प करायचा असेल तर काठ दगडाने घासली जाते)


एका आईचे 2 मुलगे

दोन्ही महान भिन्न निसर्ग..

भाऊ भाऊ पेक्षा वेगळा..

एक थंड दुसरा आग.

उत्तर :- चंद्र, सूर्य (ते एकाच स्वभावाची मुले आहेत, परंतु दोघांचे स्वरूप एकमेकाच्या विरुद्ध आहेत, एक गरम निसर्ग आणि दुसरे थंड निसर्ग)


अशी कोणती गोष्ट आहे

जी बनवण्यासाठी बराच वेळ लागतो

परंतु तो खंडित होण्यास काही क्षण लागत नाही.

उत्तर :- विश्वास ट्रस्ट (ट्रस्ट ही एक अनमोल वस्तू आहे जी लोकांना साध्य करण्यासाठी वर्षानुवर्षे लागतात परंतु तो खंडित होण्यासाठी फक्त एक क्षण लागतो, म्हणून एखाद्याने कधीही हा विश्वास मोडू नये.


प्रत्येकाकडे असे काहीतरी आहे,

पण काही मध्ये कमी आणि काही मध्ये जास्त आहेत

ज्याच्याकडे जास्त आहे त्याला शहाणे म्हणतात

उत्तर :- टॅलेंट, प्रतिभा, कला (मेंदू, कला, प्रत्येकाकडे असते, वेड्या व्यक्तीपासून ते वैज्ञानिकांपर्यंत, परंतु हा फरक यामुळे दोन्ही भिन्न बनतात, वेड्याला मेंदू असतो, कला कमी प्रमाणात असते आणि वैज्ञानिकांना जास्त प्रमाणात असते.


हिरवा हिरवा दिसावा तो दृढ किंवा कच्चा असेल,

आतून ते रेड क्रीम, कोल्ड स्वीट फ्लेक्ससारखे.

उत्तर :- टरबूज (उन्हाळ्याच्या हंगामात बाजारात टरबूज मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, जे लोक मोठ्या उत्साहाने खातात. तुम्ही पाहिलेच पाहिजे की टरबूजच्या वरच्या भागावर हिरव्या रंगाचा थर आला की तुम्ही तो कापला तर) आपल्याला आढळेल की आतील भाग लाल होईल. फळ मलईच्या रूपात खाल्ले जाते, आणि रस म्हणून खाल्ले जाते)


दोन अक्षरी नाव आहे

नेहमी सर्दी असते नाकावर

कागद माझा रुमाल आहे

माझे नाव काय आहे ते सांगा

उत्तर :- पेन (पेन दोन शब्दांनी बनलेला आहे, त्याची शाई नेहमीच लिहिण्यास तयार असते. कागदावर लिहिल्यामुळे, म्हणजे पुसण्याने त्याची शाई संपते, म्हणजे कागद रुमाल म्हणून काम करते.)

संकलन:-श्री नरहरी मारूती निकाडे सर कुर्ली

प्राथमिक शाळा इंदिरानगर, मौजे सांगाव.

बुधवार, ८ मे, २०२४

जागतिक थॅलेसेमिया दिन 8 मे World Thalassemia Day 8 May

जागतिक थॅलेसेमिया दिन 8 मे
World Thalassemia Day 8 May


प्रत्येक वर्षी 8 मे हा दिवस जगभरात जागतिक थॅलेसेमिया दिन म्हणून पाळला जातो.थॅलेसेमिया हा एक खूप गंभीर असा आजार आहे.शरीरात जनुकीय बिघाड झाल्याने थॅलेसेमिया हा आजार बळावतो. हा आजार तसा आनुवांशिक आजार आहे. म्हणजेच हा आजार आई- वडिलांमुळे मुलांना होत असतो. या आजारामुळे शरिरात रक्त बनणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. शरिरातील लाल रक्तपेशी 120 दिवसांपर्यंत जीवंत असतात पण निरोगी माणसाच्या शरीरातील संख्या आपोआप दूसऱ्या पेशी तयार होऊन ती कमतरता भरून काढतात. पण थॅलेसेमिया आजारात पेशींची संख्या झपाट्याने कमी होत जाते.साधारणत: 120 दिवस पुरली पाहिजे ती जेमतेम 15 दिवस पुरेल इतकीच असते. त्यामुळे अशक्तपणा येतो आणि त्यामुळे इतर आजार ही जडण्याची शक्यता असते. या आजारावर वेळीस उपचार केले नाही तर या आजारांनी त्रस्त रूग्णाचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते.

जागतिक थॅलेसेमिया दिनाचा इतिहास
थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक पॅनोस एंग्लेझोस यांनी 1994 मध्ये त्यांचा मुलगा जॉर्ज आणि इतर थॅलेसेमिया रुग्णांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याचे निश्चित केले. कारण त्या सर्वांनी धैर्याने या आजाराशी सामना केला लढा दिला. तेव्हापासून दरवर्षी 8 मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो.

थॅलेसेमिया रोगाचे प्रकार
प्रामुख्याने थॅलेसेमियाचे दोन प्रकार आहेत.
१) थॅलेसेमिया मायनर आणि २) थॅलेसेमिया मेजर 
थॅलेसेमिया मायनर हा आजार असतो पण तो सहजरित्या लक्षात येत नाही. हे रूग्ण सर्वसामान्यपणे आपले जीवन जगत असतात. तसेच त्यांच्यात कुठल्याही प्रकारची आजाराची लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे आपण थॅलेसेमिया मायनरचे रूग्ण आहोत हे त्यांना कळतही नाही. पण थॅलेसेमिया मायनर हा आजार आहे. थॅलेसेमिया मेजर या आजाराची लक्षणे दिसून येतात. पण लहान बाळामध्ये जन्म झाल्यानंतर 4 ते 6 महिन्यामध्ये थॅलेसेमिया मेजर या आजाराची लक्षणे दिसू लागतात.एकदा या आजाराचे निदान झाल्या नंतर अशा थॅलेसेमियाग्रस्त आजारी मुलांना दर 15 ते 30 दिवसांनी बाहेरून रक्त पुरवठा करावा लागतो.

थॅलेसेमिया आजाराची लक्षणे
सतत सर्दी आणि खोकला
अशक्तपणा कायम राहणे
अनेक प्रकारचे संक्रमण
शारीरिक विकास वयानुसार होत नाही
दात बाहेरच्या बाजूने निघणे.
शरीरात अशक्तपणा व थकवा जाणवतो. 
शरीराचा बाह्यरंग पिवळसर दिसतो व त्वचेचा नैसर्गिक तजलदारपणा कमी होतो.
शारीरिक प्रगती कमकुवत होते.
कधी कधी हाडांमध्ये विकृती निर्माण होते (अस्थी विकृती). हृदयासंबंधी तक्रारी सुरू होतात.वजन कमी होते.

थॅलेसेमिया आजाराची काही तथ्ये
थलेसीमिया आजारामागील काही तथ्य - थॅलेसीमिया या गंभीर आजारात भरपूर प्रमाणात अरक्त आणि औषधे लागतात. त्यासाठी भरपूर पैसा सुद्धा खर्च होतो. सगळेच या आजारांवर खर्च करू शकतात असे नाही. त्यामुळे पैश्याअभावी उपचार मिळत नसल्याने वयोगट 12 ते 15 वर्षाची मुलं मरण पावतात आणि व्यवस्थित औषधोपचार मिळाल्यावर त्यांचे जगण्याचे प्रमाण जास्त अ गरज जास्त भासू लागते. वेळच्या वेळीच योग्य ती काळजी घेऊन आपण या आजाराला ओळखणे कधी ही चांगलेच.

भारतामध्ये थॅलेसेमिया या आजार जडलेल्या रूग्णा मदत करण्यासाठी *द विशिंग फॅक्ट्री* ही संस्था मदत करते. तसेच या संस्थेचे ध्येय हे आहे की या आजारांने पीडित रुग्णांना चांगल्यात चांगली उपचारपद्धती उपलब्ध करू देणे.

थॅलेसेमिया आजारावर उपचार
सध्यातरी यासाठी अस्थी मज्जा प्रत्यरोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन) एक प्रकारची शल्य चिकित्सा असते ती करणे हा एकमेव उपाय आहे ती फायदेशीर आहे पण ते फारच खर्चिक असते. जगभरात थॅलेसीमिया, सिकल सेल, सिकलथेल, हिमोफिलिया, या आजाराचे मुलं पैशाअभावी वयोगट 8 ते 10 वर्षांपेक्षा जास्त जगत नाही. त्याचबरोबर क्रोनिक ब्लड ट्रांसफ्यूजन थेरेपी, आयरन कीलेशन थेरेपी हेसुद्धा इतर उपचार आहेत. या उपचारांनी शरीरातील हिमोग्लोबिन आणि ऑक्सिजन मात्र योग्य प्रमाणात ठेवण्यास मदत होते.

थॅलेसेमियाग्रस्त रूग्णाचा आहार
त्यांच्या आहारात भात,गहू,मका यांचे विविध पदार्थ.
मूगडाळ,मसूरडाळ,चणाडाळ, सोयाबीनचे पदार्थ तसेच पेररू,पपई, सफरचंद, डाळिंब,केळी,अननस आणि सुके खोबरे अशाप्रकारे सर्व जीवनसत्त्वयुक्त आहार घेतल्यास बराच फरक पडतो.

थॅलेसेमिया आजाराची शोकांतिका
आई वडिलांकडून वारसा मिळालेल्या या आजाराची एक विचित्रता आहे की ह्या आजाराचे कारण माहिती असून सुद्धा या पासून बचाव करता येणे अशक्य आहे. खेळण्याचा बागडण्याचा वयामध्ये लहान मुलांना दवाखान्यात रक्त पेढींच्या भोवती सारख्या फेऱ्या माराव्या लागतात. त्यांच्या कुटुंबीयांचा मन:स्थितीचा विचार करा कसे वाटत असणार त्यांना. सततचे आजारपण, कोमजलेला चेहरा, वजन कमी होणे, असे अनेक लक्षण मुलांमध्ये हा आजार झाल्यास दिसून येतात. तर या आजच्या जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त परमेश्वराकडे प्रार्थना करूया की हा आजार कोणालाही होऊ देऊ नकोस.

थॅलेसेमिया आजार धोकादायक :हा रक्ताचा अनुवांशिक रोग आहे, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन तयार करण्याची क्षमता कमी होते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो, ज्यामुळे थकवा आणि इतर विविध लक्षणे शरीरात आढळून येतात. यानंतर शरीर सुदृढ ठेवण्यासाठी दर दोन आठवड्यांनी रक्त चढवावे लागते. थॅलेसेमिया अल्फा आणि बीटा या दोन प्रकारात आढळतो. फक्त काही लोकांना रक्ताशी संबंधित आजारांची लक्षणे आणि उपचार पद्धती माहिती आहेत. जेव्हा शरीरात पुरेसे हिमोग्लोबिन नसते, तेव्हा शरीरातील लाल रक्तपेशी नीट कार्य करत नाहीत आणि कालांतराने त्या नष्ट होतात. त्यामुळे लाल रक्तपेशी शरीरातील सर्व पेशींमध्ये ऑक्सिजन पोहोचवू शकत नाहीत आणि इतर अवयव खराब होतात.

जागतिक थॅलेसेमिया दिन: उद्देश
रोग, त्याची लक्षणे आणि त्यासोबत जगण्याचे मार्ग याबद्दल जागरूकता निर्माण करणे.
जर एखाद्या व्यक्तीला थॅलेसेमियाचा त्रास होत असेल तर लग्नाआधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे याची जाणीव वाढवा.
मुलांच्या आरोग्यासाठी, समाजासाठी आणि संपूर्ण जगासाठी लसीकरणाच्या महत्त्वाविषयी जागरुकता निर्माण करणे.

जागतिक थॅलेसेमिया दिनाच्या वेगवेगळ्या थीमस्

2024-- Empowering Lives, Embracing Progress. Equitable and Accessible Thalassaemia Treatment for all.

2023-- Aware. Share. Care Strengthening Education to Bridge the Thalassaemia Care Gap.

2022-- Aware. Share. Care Working with the global community as one to improve thalassemia knowledge.

2021 – ”Addressing Health Inequalities Across the Global Thalassaemia Community”.

2020 – ”The dawning of a new era for thalassaemia: Time for a global effort to make novel therapies accessible and affordable to patients”

2019 – “Universal access to quality thalassaemia healthcare services: Building bridges with and for patients”

2018 – “Thalassaemia past, present and future: Documenting progress and patients’ needs worldwide” " थॅलेसेमिया भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य: जगभरातील प्रगती आणि रुग्णांच्या गरजा दस्तऐवजीकरण".

2017 – “Get connected: Share knowledge and experience and fight for a better tomorrow in thalassaemia”  “कनेक्ट व्हा! ज्ञान आणि अनुभव सामायिक करा आणि थॅलेसेमियामध्ये चांगल्या उद्यासाठी लढा.”

2016 – “Access to safe and effective drugs in thalassaemia”  "थॅलेसेमियामध्ये सुरक्षित आणि प्रभावी औषधांचा प्रवेश" होती.

2015 – “Enhancing partnership towards patient-centred health systems: good health adds life to years!”  "रुग्ण-केंद्रित आरोग्य प्रणालींसाठी भागीदारी वाढवणे: चांगले आरोग्य वर्षांमध्ये आयुष्य वाढवते!"

2014 – “Economic Recession: Observe – Joint Forces – Safeguard Health”

2013 – “The right for quality health care of every patient with Thalassaemia: major and beyond”

2012 – “Patients’ Rights Revisited

जागतिक थॅलेसेमिया दिन कसा साजरा केला जातो?
शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या सार्वजनिक ठिकाणी लोकांना रोग, त्याची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल जागरूक करण्यासाठी अनेक उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच, रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना या आजाराविषयी ज्ञान मिळवण्यासाठी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. आम्हाला सांगू द्या की थॅलेसेमिया इंटरनॅशनल फेडरेशन (TIF) ही एक ना-नफा आणि गैर-सरकारी रुग्ण-चालित संस्था आहे जी अनेक देशांमध्ये संबंधित सदस्यांसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात सक्रियपणे सामील आहे. इतकेच नाही तर जागतिक आरोग्य संघटना आणि इतर आरोग्य संस्था देखील थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त रुग्णांच्या मूलभूत हक्कांवर लक्ष केंद्रित करतात.

आपली काळजी घ्या.

संकलित माहिती

स्पर्धा परीक्षा गणितीय प्रश्नावली Maths Questions


स्पर्धा परीक्षा गणितीय प्रश्नावली
Competitive Examination Mathematical Questionnaire

(1) एक इंच म्हणजे किती मिलीमीटर ?
उत्तर --- 25 . 4 मि. मि.

(2) एका प्लाॅटची लांबी 40 फूट व रूंदी 50 फूट आहे, तर त्याचे क्षेत्रफळ किती ?
उत्तर --- 2000 चौरस फूट

(3) 200 किलोमीटर प्रवासाला 4 तास लागले तर वाहनाचा सरासरी वेग किती ?
उत्तर --- 50

(4) दोन संख्याचा गुणाकार 200 आहे. त्यापैकी एक संख्या 20 असल्यास दुसरी संख्या कोणती ?
उत्तर --- 10

(5)एक मनुष्य आपल्या उत्पन्नाच्या 75 % खर्च करतो. जर त्याची शिल्लक 5000 असल्यास त्याचे उत्पन्न किती असेल ?
उत्तर --- 20000

(6) 1 हेक्टर म्हणजे किती चौरस मीटर ?
उत्तर --- 10,000

(7) 800 चे 25 टक्के किती ?
उत्तर -- 200

(8) एका संख्येचे 25 % (टक्के ) म्हणजे 125 तर ती संख्या कोणती ?
उत्तर --- 500

(9) 2 तासात एक बस 100 किलोमीटर अंतर जाते तर ती बस 30 मिनिटांत किती किलोमीटर अंतर जाईल ?
उत्तर --- 25

(10) सुमितचा क्रमांक त्यांच्या वर्गात वरून तसेच खालून 25 येतो तर वर्गात किती विद्यार्थी आहेत ?
उत्तर --- 49

(11) 40 किमी प्रति तास वेगाने वाहन चालविल्यास 240 किलोमीटर अंतर जाण्यास किती वेळ लागतो ?
उत्तर --- 6

(12) 200 गुणांच्या परीक्षेस किमान पात्रता गुण 75 % एवढे असल्यास पात्रतेसाठी किती गुण आवश्यक आहेत ?
उत्तर --- 150

(13) 12 माणसे 1 काम 12 दिवसांत करतात तर 6 माणसे तेच काम किती दिवसांत करतील ?
उत्तर --- 24

(14) 10 लीटर = किती पाव लीटर ?
उत्तर --- 40

(15) 5 बगळे 5 मासे 5 मिनिटात खातात तर 1 बगळा 1 मासा किती मिनिटात खाईल ?
उत्तर --- 5 मिनिटात

आगामी झालेले