नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले ब्लॉग वर हार्दिक स्वागत 💐💐..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत ... सुस्वागतम.... ����������������

सोमवार, ३० मार्च, २०२०

मराठी वर्तमानपत्रे (ई पेपर)

महाराष्ट्रात विविध मराठी वर्तमानपत्रे (ई पेपर)
लोकमत मराठी पेपर
लोकमत मराठी लेटेस्ट न्यूज

 सकाळ मराठी पेपर
 सकाळ मराठी लेटेस्ट न्यूज

 पुढारी मराठी पेपर
 पुढारी मराठी लेटेस्ट न्यूज

 लोकसत्ता मराठी पेपर
 लोकसत्ता मराठी लेटेस्ट न्यूज

 नवाकाळ मराठी पेपर
 नवाकाळ मराठी लेटेस्ट न्यूज

मटा ई पेपर.
मटा मराठी लेटेस्ट न्यूज

  सामना मराठी पेपर
 सामना मराठी लेटेस्ट न्यूज

 तरुण भारत मराठी पेपर
तरुण भारत मराठी लेटेस्ट न्यूज

 प्रहार मराठी पेपर
 प्रहार मराठी लेटेस्ट न्यूज

रविवार, २९ मार्च, २०२०

बाबूराव थोरात Baburao Thorath

 बाबूराव थोरात (स्वतन्त्रता सेनानी)    Baburao Thorath                                                जन्म- 1925                                            💁‍♂️ परिचय
बाबुराव थोरात यांचा जन्म 1925. मध्ये महाराष्ट्रातील चंदा जिल्ह्यातील चंद्रपूर गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्री केशव थोरात होते. ते सुतार होते. 3 ऑगस्ट, 1955 रोजी गोवा सीमेवर प्रवेश करणार असलेल्या सत्याग्रह्यांच्या गटाचे नेतृत्व बाबुराव थोरात यांनी केले. सत्याग्रह्यांचा गट गोवा सीमेवर प्रवेश करण्यात यशस्वी झाला, परंतु पोलिसांच्या नजरेतून त्यांना सुटू शकले नाही.
        गोवा पोलिस खूप कठोर होते आणि त्यांनी गोळ्यापेक्षा कमी बोलले नाही. त्यांनी सत्याग्रहांवर गोळीबार केला आणि बाबुराव थोरात यांना गोळ्या घालून ठार केले.                                                                                                
🇮🇳 जयहिंद 🇮🇳  
          🙏 विनम्र अभिवादन🙏

शनिवार, २८ मार्च, २०२०

अर्थ अवर Earth Hour

आज अर्थ अवर


पृथ्वीसाठी एक तास..
पर्यावरण संवर्धनासाठी एक तास..
वीज वाचवण्यासाठी आज रात्री एक तास सर्वत्र अंधार होईल. याचे कारण म्हणजे आज ‘अर्थ आवर’ दिवस साजरा केला जात आहे. वीज आणि पर्यावरण जतन करण्याच्या हेतूने ‘अर्थ आवर’ दिवस सुरु करण्यात आला आहे. वीज वाचवण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेचा एक भाग म्हणजे ‘अर्थ आवर’ दिवस होय. या मोहिमेचे संपूर्ण नाव ‘अर्थ आवर वर्ल्ड वाइड फंड’ असे आहे. जे वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर ऑर्गनायझेशनने सुरू केले असून, या मोहिमेशी संबंधित कार्यालय सिंगापूरमध्ये आहे.
वर्ल्ड वाइल्डलाइफ फंड (डब्ल्यूडब्ल्यूएफ) या स्वयंसेवी संघटनेने ‘अर्थ अवर’ची संकल्पना मांडली. वर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला "अर्थ अवर" साजरा केला. सिडनी मधील २.२ दशलक्ष जनता यात सामील झाली. सामान्य जनतेबरोबर अनेक उद्योगधंदे, संस्था, विद्यापीठे देखील यात सहभागी झाले होते. एक तास दिवे बंद ठेवण्याची ही कल्पना होती. याला मिळालेला अभुतपूर्व प्रतिसाद पाहून २००८ मधे जगभर हा प्रयोग राबवला गेला. त्यावर आधारित मोहीम दरवर्षी जगभर राबवली जाते. या मोहिमेअंतर्गत आपण आपल्या परिसरात, रहिवासी संकुलात, वस्तीत, गाव किंवा शहरात, व्यवसायाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी वर्षांतून एक दिवस हा तास पाळायचा आहे. या तासाभरात आपल्याला शक्य तेवढे विजेवर चालणारे दिवे बंद करायचे आहेत. ही मोहीम दर वर्षी मार्च महिन्याचा शेवटच्या आठवडय़ातील शनिवारी राबवली जाते. त्यानुसार यंदाचा ‘अर्थ अवर’ हा आज-  रोजी पाळायचा आहे. या दिवशी सायंकाळी ८.३० ते ९.३० आपण सर्वानी या जागतिक मोहिमेत सहभागी व्हायला हवे.
आजच्या अतिव्यवधानांच्या काळात आपण अनेक गोष्टी स्वत: करायचे विसरू लागलो आहोत. व्यायाम म्हणून काही करू, पण जिने चढून आपण घरात जात नाही. उठून टीव्ही बंद करीत नाही. थोडय़ा अंतरासाठी वाहन शोधतो. उद्वाहन किंवा सरकता जिना शोधतो आणि वापरत राहतो. रात्री घरातले सर्व कोपरे प्रकाशमान करण्याचा प्रयत्न करतो. घरातील टीव्ही समोर प्रेक्षक नसताना चालू असतो. सर्व रस्त्यांवरील दिवे, रेल्वे स्थानक आणि सार्वजनिक ठिकाणचे दिवे, मोठमोठय़ा जाहिरातींचे विजेवर प्रकाशणारे किंवा संगणक संचालित फलक या साऱ्यातून अखंडित वीजप्रवाह वाहत असतो. एकुणात, आपले सर्व जीवन हे वाहणाऱ्या विजेबरोबरच वाहत असते.
मात्र यासाठी सतत आपण नैसर्गिक स्रोतांचा अनिर्बंध वापर करतो. म्हणूनच जागतिक तापमानवाढ, ऊर्जेचा अनिर्बंध वापर यांबद्दल जागरूकता निर्माण करणारा हा ‘अर्थ अवर’ गरजेचा आहे. परंतु तो या समस्यांवरील उपाय नाही. तर हा तास म्हणजे या समस्यांकडे पाहण्याची, त्याविषयीचे चिंतन करण्याची सवड आहे. पृथ्वीबद्दलची कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची संधी आहे. २००७ साली सर्वप्रथम सिडनी या ऑस्ट्रेलियामधील शहरात हा दिवस ‘दिवे बंद करा दिवस’ म्हणून पाळला गेला. शहरात ६० मिनिटांसाठी सर्व दिवे बंद करून हा उत्सव साजरा करण्यात आला होता. ‘अर्थ आवर’ दिवसांच्या दिवशी, अनिवार्य विद्युतीय उपकरणे बंद ठेवण्याची तात्काळ आवश्यकता असते. यासाठी अनेक लोक सामाजिक साइटवर देखील अपील करतात. वीज वाचवणे आणि पर्यावरण संरक्षणाबद्दल लोकांना जागरूक करणे हे या संस्थेचे मूळ उद्दीष्ट आहे. आता तो पृथ्वीवरील तब्बल सात हजार शहरांत आणि १८७ देशांत पाळला जातो. त्यातून विजेच्या वापराबद्दल आणि एकूणच पर्यावरणाबद्दल जनजागृती होते.

नुसत्या तासाभराच्या ‘अर्थ अवर’मधून कार्बन उत्सर्जन किती कमी झाले किंवा किती वीज वाचली, असा विचार यात अध्याहृत नाही. मात्र, स्वत:च्या कार्बन पदचिन्हांचा (कार्बन फूटप्रिंट्स) विचार करून आपण व्यक्तिगत किंवा समूहाने तसेच उद्योजक किंवा सरकार म्हणून विजेच्या उपयोगाबाबत विवेकी विचार करावा ही अपेक्षा आहे. उद्या सायंकाळी ८.३० ते ९.३० हा एक तासभर नको असलेले विजेचे दिवे आणि इतर विजेची उपकरणे बंद ठेवून आपण पर्यावरण संवर्धनाच्या मोठय़ा प्रवाहात सामील होऊ शकतो.
#दुर्मिळ_झाडे_व_प्रजाती_वाचवूया_निसर्गाला🌳

दहा देशांमध्ये सामील झाला आहे.
💡अर्थ अवर म्हणजे काय
ऊर्जेचा प्रचंड वापर आणि हाेणारे जलवायू परिवर्तन राेखण्याचे पाऊल म्हणून २००४ पासून अर्थ अवर साजरा केला जाताे.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,भारतात लागणाऱ्या एकूण ऊर्जेपैकी ५७ टक्के उर्जा कोळाशाच्या ज्वलनातून तयार होते. अंदाजे १ किलो वॅट ऊर्जा निर्मितीसाठी लागणाऱ्या कोळशाच्या ज्वलनापासून ८६५ ग्रॅम एवढा कार्बन डाय ऑक्साइड उत्सर्जित होतो. साधारणपे ६० वॅटचा एक घरगुती बल्ब एक तास वापरला तर ६० ग्रॅम कार्बनची निर्मिती होते. कार्बन डाय ऑक्साइड हा ग्रीन हाउस गॅसेसमधील एक वायू असून ग्लोबल वॉर्मिंगासाठी जबाबदार घटक आहे. याद्वारे उर्जेची बचत करून पृथ्वी वाचवण्यासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला जाईल.अर्थ अवर दिवशी जगभरातील बर्‍याच ऐतिहासिक इमारतींचे दिवे बंद ठेवले जातात. यामध्ये न्यूयॉर्कमधील एम्पायर वर्ल्ड बिल्डिंग, दुबईतील बुर्ज खलिफा, पॅरिसमधील आयफेल टॉवर आणि अथेन्समधील अ‍ॅक्रोपोलि अशा 24 जगप्रसिद्ध ठिकाणांचा समावेश आहे. भारतामध्येही या दिवशी राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि इंडिया गेटसह अनेक ऐतिहासिक इमारतींमध्ये दिवे बंद करतात.
'पृथ्वी बचावासाठी हवामान बदल (Climate Change to Save Earth)' ही अर्थ अवर २०२१ ची थीम आहे.
अर्थ अवर 2022 ची थीम 'तुमचे भविष्य वाचवा" वर केंद्रित असेल.
• सदर दिवस म्हणजे WWE द्वारा आयोजित जागतिक स्तरावरील एक चळवळ आहे WWF बाबत महत्वपूर्ण माहिती अर्थ: WWF म्हणजेच World Wide Fund for Nature अर्थात निसर्गासाठी जगातिक निधी होय.
मुख्यालयाचे ठिकाण: ग्लॅन्ड, स्वित्झर्लंड हे WWE च्या मुख्यालयाचे ठिकाण आहे.
स्थापना वर्ष: २९ एप्रिल १९६१ रोजी मॉर्गेस, स्वित्झर्लंड येथे WWE ची स्थापना करण्यात आली होती.
इस बार अर्थ आवर की थीम 'शेप अवर फ्यूचर' है। यह विषय इस बात का प्रतीक है कि हमारा ग्रह आज जिन महत्वपूर्ण मुद्दों का सामना कर रहा है, उन पर ध्यान देकर अपने भविष्य को आकार देना हमारे ऊपर है। अर्थ आवर 2021 की थीम क्लाइमेट चेंज टू सेव अर्थ थी और संदेश था कि जलवायु परिवर्तन को रोकना ही पृथ्वी को बचाने का एकमात्र तरीका है। 2020 में, थीम ‘ क्लाइमेट एक्शन एंड सस्टेनेबल डेवलपमेंट' थी और फोकस फिर से जलवायु परिवर्तन और सतत विकास पर था। 2019 में रिड्यूस, रीयूज, चेंज द वे वी लिव थीम थी, और मुख्य फोकस रीसाइक्लिंग और पुन: उपयोग को बढ़ावा देना था। अर्थ आवर का पहला वर्ष थीम हमने लाइट्स आउट कर दिया है पर केंद्रित है । अब आपकी बारी है, और यह लोगों को एक सरल कार्य के लिए प्रोत्साहित किया - लाइट बंद कर दें।

गुरुवार, २६ मार्च, २०२०

कोरोना जनजागृती

खालील उतारा वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
        मुंबईत कोरोनाची साथ पसरली होती.आकाशची शाळा बंद होती.रस्त्यावर जिकडेतिकडे शुकशुकाट होता.सगळी माणसे घरीच थांबून होती.काही जण तोंडाला मास्क लावून फिरत होते.आकाशही घरीच थांबला होता.तो घरातच बसून आपला अभ्यास पूर्ण करत होता.त्याला वाटे मुलांशी खेळायला जावे.परंतु तो टी व्ही वरील बातम्या पाहून फक्त सरकार ने दिलेल्या सूचनांचे पालन करत होता.अफवांवर विश्वास ठेवत नव्हता.आपल्या आईबाबांनाही काळजी घेण्याबाबत सांगत होता.

उतारा प्रश्न-1.आकाशला सुट्टी का मिळाली होती?

अ ) मजा करण्यासाठी

ब ) कोरोनापासून काळजी घेण्यासाठी

क ) 10 वी ची परीक्षा सुरू होती म्हणून

ड ) गावी जाण्यासाठी

उतारा प्रश्न 2-लोकांनी तोंडाला मास्क वास येतो म्हणून लावले होते. चूक की बरोबर ते लिहा

अ ) चूक

ब ) बरोबर

उतारा प्रश्न 3-आकाश घराबाहेर का पडत नव्हता?

अ) आई ओरडेल  म्हणून

ब) कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी

क) त्याचा अभ्यास अपूर्ण होता

ड) त्याचा दरवाजा बंद होता म्हणून

उतारा प्रश्न 4-आकाशने कोणाच्या सूचनांचे पालन केले पाहिजे ?

अ) आईच्या

ब) सरकारच्या

क) मित्रांच्या

ड) बाबांच्या

उतारा प्रश्न 5- कोरोना व्हायरस पासून बचाव करण्यासाठी घरात थांबू नये. रोज बाहेर मुलांबरोबर खेळावे.चूक की बरोबर ते लिहा.

अ) बरोबर

ब) चूक

उतारा प्रश्न 6 - 'आकाशला कोरोनाची लागण झाली आहे'.या वाक्यात ठेवलेले नाव कोणते आहे?

अ) लागण

ब) आकाश

क) झाली

ड) आहे

कोव्हिड-१९चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हातभार लावा!

सध्या भारत व जगभर पसरत असलेल्या कोव्हिड-१९ (कोरोना व्हायरस)चा संसर्ग एकमेकांना होऊ न देण्यासाठी काळजी घ्या. यासाठी
१. दोन व्यक्तीमध्ये १ मीटर अंतर राखून व्यवहार करा.
२. आपली थुंकी हवेत उडू देऊ नका.
३. रस्त्यात किंवा इतर ठिकाणी थुंकू नका.
४. स्थानिक सरकारकडून घालून दिलेल्या सगळ्या नियम व कायद्यांचे काटेकोर पालन करा.

उषा मेहता (भारतीय क्रांतिकारक) Usha Mehta (Indian revolutionary)

🔥⛓👩🏻⛓️📻 उषा मेहता (भारतीय क्रांतिकारक)  Usha Mehta (Indian revolutionary)                                   
जन्म : २५ मार्च १९२०
मृत्यू : ११ ऑगस्ट २०००                                                      
छोडो भारत आंदोलनातील सक्रिय स्वातंत्र्यसेनानी व प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्त्या. त्यांचा जन्म गुजरातमधील सुरतजवळील सारस या गावी झाला. वयाच्या पाचव्या वर्षी साबरमती आश्रमात त्यांनी पहिल्यांदा गांधीजींचे दर्शन घेतले. यानंतर त्यांच्या गावानजीक गांधीजींनी घेतलेल्या शिबिरात त्या सहभागी झाल्याने महात्मा गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांनी लहानपणीच स्वातंत्र्यआंदोलनात सहभागी होण्याचा व खादीची वस्त्रे परिधान करण्याचा संकल्प केला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत सायमन कमिशनच्या विरोधी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला (१९२८).

त्यांचे प्राथमिक शिक्षण खेडा, भडोच येथे झाले. चांदरामजी हायस्कूल, मुंबई येथे माध्यमिक शिक्षण झाले. १९३५ मध्ये त्या मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यानंतर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात त्यांनी पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. उषा मेहतांचे वडील सरकारी सेवेत न्यायाधीश असल्याने ते त्यांना स्वातंत्र्यआंदोलनात सहभागी होण्यास प्रत्यक्षपणे प्रोत्साहन देऊ शकत नव्हते. पुढे वडिलांच्या निवृत्तीनंतर (१९३०) त्यांचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले (१९३२) व त्या स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होऊ लागल्या. स्वातंत्र्यचळवळीतील इतर मुलामुलींसोबत त्या गुप्तपत्रके वाटत व इतर कार्यांतही भाग घेत. १९३९ साली त्यांनी तत्त्वज्ञान विषयात प्रथमश्रेणीत पदवी प्राप्त केली. पुढे कायदेविषयक पदवीकरीता प्रवेश घेतला, तथापि १९४२ च्या छोडो भारत आंदोलनात सहभागी झाल्याने त्यांचे शिक्षण थांबले. गांधीवादी जीवनशैलीचे अनुकरण करून त्यांनी अत्यंत साधे राहणीमान स्वीकारले.

दुसऱ्या महायुद्धापासून भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली होती. भारतीय जनतेला न विचारता व्हाइसरायने परस्पर भारताला युद्धात खेचल्याच्या निषेधार्थ सर्वत्र ब्रिटिशांविरुद्ध संताप व्यक्त होत होता. महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेस मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. त्यातच १९४० मध्ये मुस्लीम लीगने लाहोर येथील आपल्या अधिवेशनात द्विराष्ट्रवादाच्या आधारावर देशाच्या फाळणीची मागणी केली. यावेळी जागतिक युद्धपरिस्थिती ब्रिटनच्या दृष्टीने फारच बिकट झाली होती. १९४१ च्या अखेरीस अमेरिका आणि चीन या राष्ट्रांनी हिंदी जनतेचे युद्धात सहकार्य मिळविण्यासाठी हिंदुस्थानला भरीव राजकीय सुधारणा देण्याबाबत आग्रह धरला होता. तेव्हा चर्चिल मंत्रिमंडळाने सर स्टॅफर्ड क्रिप्स यांना वाटाघाटीसाठी भारतात धाडले. क्रिप्स योजनेमुळे देशातील कोणत्याही प्रांताला किंवा देशी संस्थानिकाला फुटून निघण्याचा अधिकार मिळणार असल्याने देशाचे विघटन होण्याचे संकट उभे राहिले. यामुळे भारताच्या अखंडतेला धोका निर्माण होणार असल्याने गांधीजींनी ही योजना फेटाळली व ब्रिटिशांनी या देशातून ताबडतोब चालते व्हावे, अशी मागणी केली. ७ आणि ८ ऑगस्ट १९४२ मध्ये मुंबईस भरलेल्या काँग्रेस समितीसमोर स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन सुरू झाले.

९ ऑगस्ट १९४२ रोजी ‘छोडो भारत’ आंदोलनाची सुरुवात झाली. महात्मा गांधी व इतर सर्व महत्त्वाच्या नेत्यांना अटक करण्यात आली. त्यावेळी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर ज्या स्वातंत्र्यसेनानींनी तिरंगा फडकाविला त्यांत उषा मेहता आघाडीवर होत्या. १४ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे उषा मेहतांनी बाबुभाई खक्कर, विठ्ठलदास जव्हेरी व शिकागो रेडिओचे संचालक नानक मोटवानी यांच्या सहयोगाने स्वतंत्र भारताचे गुप्त काँग्रेस नभोवाणी केंद्र (काँग्रेस रेडिओ स्टेशन) सुरू केले. यासाठी त्यांना अच्युतराव पटवर्धन, पुरुषोत्तम त्रिकमदास, सुचेता कृपलानी, राम मनोहर लोहिया यांचे सहकार्य मिळाले. या नभोवाणी केंद्रावरून त्या स्वातंत्र्यचळवळीविषयक महत्त्वाच्या बातम्या व इतर माहितीचे निवेदन करत असत. गांधीजी व इतर नेत्यांचे संदेश या केंद्रावरून प्रसारित केले जात. अत्यंत धाडसाने त्यांनी या नभोवाणी केंद्राच्या माध्यमातून स्वातंत्र्यआंदोलनात योगदान दिले. ब्रिटिश पोलिसांना या केंद्राच्या इमारतीची माहिती मिळाली आणि १२ नोव्हेंबर १९४२ रोजी इमारतीला घेराव घालून उषा मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. पोलिसांनी सहा महिने त्यांची कसून चौकशी केली. त्या एकमेव महिला कैदी होत्या. या काळात त्यांना एकांतवासाच्या कैदेत ठेवण्यात आले. यानंतर न्यायालयाने त्यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली (१९४२) व त्यांना येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले. पुढे  मुंबई प्रांताचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांच्या आदेशानुसार त्यांची सुटका करण्यात आली (१९४६). सुटका करण्यात आलेल्या त्या पहिल्या राजकीय कैदी होत्या. मात्र तुरुंगवासात झालेल्या प्रकृतिअस्वास्थ्याचा त्रास त्यांना आयुष्यभर सोसावा लागला.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी महात्मा गांधींच्या विचारांचा प्रसार करण्याचे कार्य सुरू ठेवले. त्यांनी ‘महात्मा गांधींचे राजकीय व सामाजिक विचार’ या विषयावर मुंबई विद्यापीठातून पीएच.डी पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठात नुकत्याच सुरू झालेल्या नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र विभागात त्या अधिव्याख्याता, प्राध्यापक, विभागप्रमुख या पदांवर काम करून सेवानिवृत्त झाल्या (१९८०). या दरम्यान आणीबाणीनंतर राजकारणात येण्याची संधी त्यांना मिळाली होती, परंतु त्यांनी शिक्षणक्षेत्रातच राहणे पसंत केले. अध्यापनाबरोबरच व्याख्याने, संशोधन, कार्यशाळा व परिषदा यांमधूनही त्या सक्रिय राहिल्या. नगरपालिका, विद्यापीठे, विद्यापीठ अनुदान आयोग येथील विविध समित्यांवर सदस्य म्हणून त्यांनी काम केले. केंद्रीय लोकसेवा आयोग व गुजरात राज्याच्या कार्यालयीन सुधारणा आयोगाच्याही त्या सदस्य होत्या. विमेन अँड मेन व्होटर्स द 1977-80 इक्सपेरिमंट (१९८१), गांधीज कॉन्ट्रिब्यूशन टू द इमॅन्स्पिेशन ऑफ विमेन (१९९१), महात्मा गांधी अँड ह्यूमनिझम (२०००) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ.

गांधी स्मारक निधीसमितीवर अध्यक्ष, गांधीजींचे वास्तव्य राहिलेल्या मुंबईतील मणिभवन या वास्तूत गांधी जीवनदर्शन संग्रहालयाची उभारणी, नवी दिल्ली येथील गांधी पीस फाउंडेशनच्या सदस्या आदी जबाबदारी त्यांनी सांभाळली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, मुंबई; मुंबई विद्यापीठ आणि गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद या विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डी. लिट्. पदवीने गौरविले. भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला (१९९८).

🏠मुंबई येथे त्यांचे निधन झाले.
                🇮🇳 जयहिंद 🇮🇳  
      🙏 विनम्र अभिवादन🙏
 स्त्रोतपर माहिती 

मंगळवार, २४ मार्च, २०२०

विश्व् क्षयरोग दिवस - 24 मार्च World Tuberculosis Day - March 24




World Tuberculosis Day - March 24 क्षयरोग : हा रोग प्राचीन काळापासून जगातील अनेक देशांमध्ये अस्तित्वात आहे. भारतीय वैद्यकात त्याचा उल्लेख राजयक्ष्मा किंवा क्षय असा आढळतो. क्षय हा शब्द झीज या अर्थाने वापरला जात असल्यानेव इतर दीर्घकालिक आजारांमध्येही शरीराची झीज होत असल्यानेत्याची व्याप्ती आजच्यापेक्षा अधिक असावी. तरीही फुप्फुसाच्या क्षय-रोगास कफक्षय या नावाने ओळखले जात असावे. ग्रीक वैद्यकातही ॲरिस्टॉटलच्या काळापासून हा रोग एका व्यक्तीपासून दुसऱ्यास होत असल्याचे माहीत होते. इंग्रजीत कन्झम्पशन हा शब्द क्षय या अर्थाने वापरला जातो.क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. क्षयरोग हा आजकाल बहुधा पूर्ण बरा होणारा आजार आहे. एके काळी हा रोग दुर्धर समजला जाई. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. त्यातील मुख्यत्वे 'मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस' या प्रकारामुळे माणसाला क्षयरोग होतो. यात मुख्यतः ७५% रुग्णांमध्ये फुफ्फुसांना बाधा होत असते. काही रुग्णांमध्ये फुफ्फुसेतर अवयवांना ही बाधा होत असते. साधारण ३५ टक्के वा जास्त लोकांच्या शरीरात क्षयरोगाचे जंतू वास्तव्य करून असतात. पण या सर्वानाच क्षय रोग होत नाही कारण हे जंतू निद्रिस्त अवस्थेत असतात. पण शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास हे झोपी गेलेले जंतू जागे होतात. क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसीस नावाच्या जंतूमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे. इ.स.१८८२ साली डॉ.रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला.त्यांचा प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत मांडला व त्यास दिनांक २४ मार्च रोजी मान्यता मिळाली.म्हणून दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो.ज्या व्यक्तीला क्षयरोग (टि.बी.) असेल तो माणूस बोलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात आणि हवेद्वारे जवळ असलेल्या निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात व त्या निरोगी व्यक्तीला क्षय जंतूचा संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी झाल्यास अशा व्यक्तींना क्षयरोगाची लागण होते.एखाद्या व्यक्तीला सतत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ खोकला असणे, वजन कमी होणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु संध्याकाळी वाढणारा ताप, छातीत दुखणे, रात्री घाम येणे इत्यादी पाठवून देऊन त्याची दोन बेडक्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.फुफ्फुसांशिवाय इतर अवयवांमध्ये क्षयरोग होतो. उदा. हाडे सांध्याचा क्षयरोग,लसिकाग्रंथीचा क्षयरोग, मज्जासंस्थेचा क्षयरोग,आतड्यांचा क्षयरोग इत्यादी. हा रोग पूर्णपणे बरा होण्यासाठी ६ महिने अथवा अधिक काळ उपचार घेणे गरजेचे असून जर उपचार मधेच बंद केले तर क्षयरोग परत उलटण्याची शक्यता असते. रुग्णांचा compliance (औषधांना चिकटून रहाणे) ही गोष्ट क्षयरोगाच्या उपचारांत अतिशय आवश्यक आहे.
आधुनिक पाश्चात्त्य वैद्यक (ॲलोपॅथी)
एकोणिसाव्या शतकात लूई (ल्वी) पाश्चर यांचा सूक्ष्मजंतुवाद रोगनिर्मितीच्या कारणांमध्ये अंतर्भूत होऊ लागला. त्याच सुमारास १८६२ मध्ये ए. जे. विलेमिन या फ्रेंच लष्करी वैद्यांनी कफक्षयामुळे मेलेल्या एका माणसाचे शवविच्छेदन केले. त्यात आढळलेल्या ऊतकाचे (समान रचना व कार्य असणाऱ्या कोशिका समूहाचे) अंतःक्षेपण (इंजेक्शन) एका सशाला दिल्यानंतर साडेतीन महिन्यांनी त्याच्या फुप्फुसात कफक्षय झाल्याचे विलेमिन यांना आढळले. लवकरच १८८२ मध्ये ⇨ रॉबर्ट (रोबेर्ट) कॉख या जर्मन शास्त्रज्ञांनी क्षयरोगाचे सूक्ष्मजंतू शोधून काढले. त्या शोधामुळे क्षयरोगाचे कारण निश्चित झाले. अनेक वर्षे हा विकार ‘कॉख विकार’ या नावाने ओळखला जात असे.
क्षयरोगाच्या निर्मितीस मायकोबॅक्टिरियम ट्युबरक्युलॉसिस हे सूक्ष्मजंतू कारणीभूत असतात. त्यांचा प्रसार रुग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या द्रवाच्या सूक्ष्म थेंबांमुळे होतो. एका शिंकेमध्ये सु. ४०,००० सूक्ष्मथेंब बाहेर पडतात व प्रत्येक सूक्ष्म थेंब क्षयरोग पसरवू शकतो. हवेत पसरलेल्या या थेंबात हे सूक्ष्मजंतू अनेक तास जिवंत राहू शकतात. निरोगी व्यक्तीचा अशा सूक्ष्मजंतूंशी श्वसन मार्गे वारंवार संपर्क आल्यामुळेरोगसंसर्ग होतो. संसर्ग झालेल्या जवळपास ९०% रुग्णांमध्ये लक्षणेदिसत नाहीत. क्षयग्रस्त मातेकडून तिच्या भ्रूणास किंवा जन्म झाल्यानंतर अर्भकास संसर्ग होण्याची शक्यता असते. या सूक्ष्मजंतूंची दुसरी एक प्रजातीमा. बोव्हीस या नावाने ओळखली जाते. तिचा संसर्ग दुभत्या जनावरांकडून पाश्चरीकरण न केलेल्या दुधामुळे माणसास होऊ शकतो.
क्षयरोगाच्या सूक्ष्मजंतूंचा श्वसन मार्गावाटे फुप्फुसांत शिरकाव झाल्यावर शरीराची प्रतिकार यंत्रणा त्यांचा नाश करते परंतु तसे न झाल्यास, म्हणजे प्रतिकार कमी पडल्यास किंवा संसर्ग मोठा असल्यास, संसर्गाच्या ठिकाणी म्हणजे फुप्फुसाच्या एखाद्या भागात श्वेत कोशिका आणि तंतुमय ऊतक यांच्या मदतीने तो बंदिस्त केला जातो. अशा बंदिस्त स्थितीत हे सूक्ष्मजंतू दीर्घ काळ सुप्तावस्थेत राहू शकतात. शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्यास [उदा., उतारवय, रोगप्रतिकारक्षमतान्यूनताजन्य रोग (एड्स), कुपोषण, दीर्घ काळ स्टेरॉइड औषधांचा मोठ्या प्रमाणात वापर] ते परत सक्रिय होतात व आसपासच्या ऊतकांचा नाश करू लागतात किंवा रक्तातून शरीरभर पसरून अनेक ठिकाणी वाढू लागतात.
लक्षणे : फुप्फुसाच्या क्षयरोगात अशक्तपणा, वजन घटणे व खोकला या लक्षणांपासून प्रारंभ होतो. तसेच रात्रीच्या वेळी अतिशय घामयेतो. रोगाची तीव्रता वाढू लागल्यावर प्रामुख्याने सकाळी उठल्यावर खोकल्याबरोबर कफ पडू लागतो. कधीकधी त्यात रक्ताचा अंश आढळू लागतो. बारीक ताप येतो. फुप्फुसावरणाचा शोथ होऊन वक्षपोकळीमध्ये पाणी साठल्यास [→ परिफुप्फुसशोथ] किंवा हवेचा शिरकाव झाल्यास फुप्फुसावर दडपण येऊन धाप लागते. लहान मुलांत नवीनच रोग संसर्ग झाला असल्यास मानेतील लसीका ग्रंथींना सूज येते आणि एक विशिष्ट प्रकारचा आवाज करणारा खोकला येऊ लागतो [→ गंडमाळा].
क्षय रोगाची लक्षणे
कमी होणारे वजन
थकवा
श्वास घॆण्यास त्रास होणॆ
ताप
रात्री येणारा घाम
भूक न लागणे
आजार टाळण्याचे उपाय "
क्षय रोगासाठी बी.सी.जी नावाची लस वापरली जाते.हि लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते.पण मोठ्यांना लस टोचून घेतल्यावरहि हा रोग होण्याची शक्यता आहे.
क्षय रोगासाठी एक लस उपलब्ध आहे .ती म्हणजे बी. सी.जी. ही लस लहान मुलांना या रोगापासून वाचवते, पण मोठ्या माणसांना मात्र लस टोचल्यावरही हा रोग होऊ शकतो.
क्षय रोग टाळण्यासाठीच्या चांगल्या पद्धती म्हणजे
पौष्टिक आहार घेऊन रोगप्रतिकारकशक्ती वाढवणे.
क्षय रोग तपासण्या करून घेणे
क्षय रोग झाला असेल तर इतरांपासून दूर राहणे
तोंड झाकणे.

बसंती देवी Basanti Devi

 
बसंती देवी Basanti Devi
२३ मार्च, इ.स. १८८० - इ.स. १९७४
भारतात ब्रिटिश काळात एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्त्या होत्या. त्या देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी होत्या. १९२१ साली दासाना अटक केल्यानंतर व १९२५ साली त्यांच्या मृत्यूनंतर, बसंती देवींनी विविध हालचालीं मधे सक्रिय भाग घेतला तसेच स्वातंत्र्योत्तर सामाजिक कार्य चालू ठेवले. १९७३ मध्ये त्यांना पद्मविभूषण प्रदान केले गेले.
बसंती देवींचा जन्म २३ मार्च १८८० रोजी झाला. त्यांचे वडील बद्रीनाथ हलदर ब्रिटिश राजवटीच्या अंतर्गत आसाम राज्याचे दिवाण (आर्थिक मंत्री) होते. त्यानी लॉरेटो हाऊस, कोलकाता येथे अभ्यास केला व सतरा वयाच्या असताना चित्तरंजन दास यांच्याशी विवाह केला.१८९८ ते १९०१ दरम्यान दामपत्याना तीन मुले झाली.
जन्मतारीख: २३ मार्च, १८८०
जन्मस्थळ: आसाम
मृत्यूची तारीख: ७ मे, १९७४
शिक्षण: लोरेटो हाउस
पती/पत्नी: चित्तरंजन दास
पुरस्कार: पद्म विभूषण (१९७३)
१९१७ मध्ये चितरंजन दास जेव्हा राजकारणात उतरले तेव्हा बसंती देवीनेही त्यांचे पूर्ण समर्थन केले.गांधीजींनी सुरू केलेल्या 'असहयोग चळवळी'मध्ये ती सामील झाल्या. लोकांमध्ये खादीचा प्रचार केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली होती आणि फक्त १९२१ मध्ये त्यांचे पती व मुले अटक केली गेली होती.खादी प्रचाराच्या प्रसिद्धीप्रकरणी लोकांनी बसंती देवीच्या अटकेचा निषेध केला.देशातील अनेक नामांकित बॅरिस्टर्सनीही यास विरोध दर्शविला आणि हे प्रकरण व्हायसरॉयकडे नेले. यानंतर सरकारने त्यांना सोडले.तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही, बसंती देवीने परकीय सत्तेला विरोध केला.तिने देशातील विविध ठिकाणी जाऊन चित्तरंजन दास यांच्या राजकीय दृष्टिकोनाची ओळख लोकांना दिली. १९२२ मध्ये चितरंजन दास, मौलाना अबुल कलाम आझाद, सुभाषचंद्र बोस इ. यांना अटक करण्यात आली.
चितरंजन दास हे चटगांव राजकीय परिषदेचे अध्यक्ष होते. परंतु त्यांच्या अटकेनंतर स्वत: बसंती देवी या परिषदेचे अध्यक्ष होते.

सोमवार, २३ मार्च, २०२०

राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग 23 March Rajguru, Sukhdev and Bhagat Singh


भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे जगातील सर्वोत्तम क्रांतिपर्वांपैकी एक होय. कित्येक क्रांतिकारकांनी जीवाची पर्वा न करता या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली आणि बलिदान स्वीकारले. त्या क्रांतिकारांकांची आठवण होताच तीन चेहरे आपसूकच डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे –भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव!
भगतसिंगांबद्दल तर सगळेच जाणतात. त्यांचे जीवनचरित्र म्हणजे तरुणांसाठी नवचैतन्याचे प्रतिक आहे. सुखदेव यांचा जीवनप्रवास देखील लोकांना माहित आहे. पण राजगुरू नावाचे क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व मात्र अजूनही लोकांपर्यंत म्हणावे तितके पोचलेले नाही. एक क्रांतिकारक म्हणून ते कसे घडले? त्यांची पार्श्वभूमी काय? याबद्दल आजही सामान्यजण अनभिज्ञ आहेत.

शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म १९०९ मध्ये पुणे जिल्ह्यातील खेड गावात झाला. काशीत संस्कृत व धर्मशास्त्राचे शिक्षण घेत असताना ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले व 'हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन पार्टी'चे सदस्य झाले. चंद्रशेखर आझाद, भगतसिंह़, यतीनदास यांच्यासोबत त्यांनी पंजाब, कानपूर, आग्रा व लाहोरामध्ये ब्रिटिशाविरुद्ध असंतोष पेटवून जहाल विचारसरणीचा प्रसार केला.
सायमन कमिशनविरुद्ध 30 ऑक्टोबर, 1928 रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान ब्रिटिशांनी केलेल्या लाठीहल्ल्यात लाला लजपतराय गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमेमुळे 17 नोव्हेंबर, 1928 ला त्यांचे निधन झाले. क्रांतिकारकांनी लजपतरायांच्या मृत्यूचा बदला घेण्याचे निश्चित केले. त्याप्रमाणे क्रांतिकारकांनी मोहीम आखली. भगतसिंह, सुखदेव व राजगुरू यांच्यावर या मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली.
लालजींवर लाठीमार करणारा उपपोलीस अधीक्षक सॅन्डर्स लाहोरामधील आपल्या कार्यालयाच्या बाहेर निघाला असता राजगुरूने त्यांच्यावर गोळी झाडली. तो दिवस होता 17 डिसेंबर, 1928. यानंतर 20 डिसेंबराला लाहोर सोडून तिघेही भूमिगत झाले. राजगुरू 30 डिसेंबर, 1929 मध्ये पुण्यात पकडले गेले. लाहोर कटातील सहभागाबद्दल पुष्कळ क्रांतिकारकांवर खटला चालला. त्यापैकी भगतसिंह, राजगुरू व सुखदेव यांनी लाहोर तुरुंगात 23 मार्च, 1931 रोजी फासावर चढून वीरमरण पत्करले.
शिवराम हरी राजगुरू यांच्या जन्मगावाचे खेड हे नाव बदलून राजगुरुनगर असे करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यप्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता केवळ आणि केवळ देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतिपार्वात अढळ करणाऱ्या राजगुरु नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा!!
⇰⇰ राजगुरू याची सहनशीलता दाखवणारे प्रसंग
प्रसंग १ : एकदा राजगुरू भट्टीतल्या निखाऱ्यांवर आपल्या क्रांतीकारी मित्रांसाठी पोळया भाजण्याचे काम करत होते. तेव्हा एका सहक्रांतीकारकाने निखाऱ्यांची धग लागत असतांनाही शांतपणे पोळया भाजत असल्यामुळे त्यांची प्रशंसा केली. तेव्हा दुसऱ्या मित्राने त्याला जाणूनबुजून डिवचले आणि `त्याने कारागृहात गेल्यावर तेथे होणारा भयंकर छळ सहन केला, तरच मला कौतुक वाटेल', असे म्हटले. आपल्या सहनशीलतेविषयी घेतलेल्या शंका न आवडून राजगुरूंने पोळया उलथण्याची लोखंडी सळई उन करून आपल्या उघड्या छातीला लावली. छातीवर टरटरून फोड आला. पुन्हा एकदा त्यांनी तसेच केले आणि हसत-हसत त्या मित्राला म्हणाले,“आता तरी मी कारागृहातील छळ सहन करू शकेन याची निश्चिती पटली ना ?'' राजगुरूच्या सहनशीलतेविषयी शंका घेतल्याने त्या मित्राला स्वत:चीच लाज वाटली. `राजगुरू, तुझी खरी ओळख मला आता झाली', असे सांगत त्याने राजगुरूची क्षमाही मागितली.
प्रसंग २ : कारागृहात अनन्वित छळ होऊनही राजगुरूंनी सहकाऱ्यांची नावे न सांगणे : `एका फितुरामुळे राजगुरु पकडले गेले. लाहोरमध्ये त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. लाहोरच्या तीका उन्हाळयात चहूबाजूंनी भट्ट्या लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. मारहाण झाली. बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आले. इंद्रीय पिरगळण्यात आले. कशानेही ते बधत नाहीत, हे पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरून विष्ठेच्या टोपल्या ओतण्यात आल्या. कणखर मनाच्या राजगुरूंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकाऱ्यांची नावे सांगितली नाहीत.
प्रसंग ३ : स्वत:च्या दु:खातही इतरांचा विचार करणारे राजगुरू : फाशी जाण्याआधी कारागृहातील एका सहकाऱ्याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना राजगुरु म्हणाले, “बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळया शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दु:ख वाटते.''

सुखदेव रामलाल थापर
( १५ मे १९०७ –२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सशस्त्र क्रांतिकारक. मूळ नाव सुखदेव रामलाल थापर. जन्म लुधियानातील चौरा बाजार येथे. या ठिकाणाला नऊ घर असेही संबोधतात. आईचे नाव शल्ली देवी असे होते. त्यांनी पंजाबमध्ये क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली. किंग जॉर्जच्या विरोधात गुप्त मसलतीच्या योजनेमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना धमकावले. यामुळे ब्रिटिश सरकारविरुद्ध सुखदेव अशी स्थिती निर्माण झाली.
सुखदेवांनी ल्यालपूर (पंजाब) येथे १९२६ पासून तरुणांना एकत्र जमविण्यास सुरुवात केली. त्यांनी ‘ हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन ‘च्या वाङ्‌मयाचा तरुणांत प्रचार केला. दिल्ली येथे १९२८ मध्ये सर्व क्रांतिनेत्यांची गुप्त परिषद भरली. तीत ‘ हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ’ नावाची नवीन देशव्यापी संघटना उभारण्याचे ठरले. केंद्रीय समितीत सुखदेव व भगतसिंग हे पंजाबतर्फे होते. यात शिववमी, चंद्रशेखर आझाद आणि कुंदनलाल हे विद्यार्थीही होते. संघटनेच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार बाँबची कवचे बनविण्यासाठी सुखदेव लाहोरला गेले. नंतर तयार बाँबची चाचणी झांशी येथे घेतली. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमधील अभ्यासिकेत सुखदेव यांनी हिंदुस्थानचा इतिहास, रशियन राज्यक्रांती या विषयांचा चिकित्सकपणे अभ्यास केला. जागतिक पातळीवरील क्रांतिकारक साहित्याचे विविध दृष्टिकोण त्यांनी अभ्यासले. कॉम्रेड रामचंद्र,भगतसिंग आणि भगवतीचरण व्होरा यांच्या मदतीने त्यांनी ‘नौजवान भारत सभा’ ही संघटना लाहोर येथे स्थापन केली. या संघटनेचे कार्यक्रम पुढीलप्रमाणे ठरविण्यात आले :
(१) स्वातंत्र्यलढ्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करणे.
(२) तर्कसंगत वैज्ञानिक दृष्टीचा अवलंब करणे.
(३) जातियतेविरुद्घ लढणे
(४) अस्पृश्यतेची प्रथा बंद करणे.
या कार्यक्रमांत त्यांनी सक्रिय भाग घेतला. १९२९ मध्ये लाहोर खटल्याबद्दल तुरुंगात असताना त्यांनी कैद्यांना मिळणाऱ्या अमानुष वागणुकीबद्दल उपोषण केले.
नोव्हेंबर १९२८ मध्ये लाला लजपतराय यांनी सायमन कमिशन लाहोरला आले असता निदर्शनाचे नेतृत्व केले होते. निदर्शनाच्या वेळी झालेल्या लाठीमारामध्ये ते घायाळ झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा सूड म्हणून ब्रिटिश अधिकारी साँडर्स याचा गोळ्या झाडून वध करण्यात आला. या कटामध्ये सुखदेव यांचाही सहभाग असल्याने भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत त्यांना लाहोरच्या तुरुंगात ठेवण्यात आले. पक्षपाती, वसाहतवादी दृष्टीने ग्रासलेल्या न्यायाधीशांनी त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. सुखदेव आणि त्यांचे साथीदार भगतसिंग, राजगुरु यांना खटल्यातून सोडविण्याचे प्रयत्न म. गांधीजींनी केले; मात्र त्यांना त्यात यश आले नाही. लाहोरच्या तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरु यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढविण्यात आले. ब्रिटिश सरकारच्या या अन्यायी, पक्षपाती वृत्तीमुळे भारतीय जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. फासावर चढविण्याअगोदर काही वेळापूर्वी सुखदेव यांनी म. गांधीजींना पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये त्यांनी क्रांतीकारकांबद्दल घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील दोन प्रमुख विचारधारांवर प्रकाश टाकला आहे. सुखदेव यांना हंसराज व्होरा यांच्या प्रयत्नांमुळे लाहोर खटल्यात माफीचा साक्षीदार होण्याची संधी आली; मात्र त्यांनी ती बाणेदारपणे अव्हेरली. या आणि अशा अनेक प्रसंगांतून सुखदेव यांचे अतुलनीय धैर्य, प्रखर देशभक्ती आणि त्यागी वृत्ती यांचा प्रत्यय येतो.
क्रांतिकारक सुखदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ लुधियाना येथील शाळेला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च, इ. स. १९३१ ला संध्याकाळी ७.३३ ला फासावर चढवण्यात आले. त्यानंतर त्यांचे मृतदेह कारागृहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोरपासून अंदाजे ५० मैल दूर हुसैनीवाला या ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला. ते मृतदेह त्वरित गाडता यावेत म्हणून त्याचे कापून लहान लहान तुकडे करण्यात आले.

भगतसिंग
(२८ सप्टेंबर १९०७-२३ मार्च १९३१). भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतीकारक. प. पंजाबमधील (विद्यमान पाकिस्तान) वंग (जिल्हा ल्यालपूर) या गावी एका शेतकरी-देशभक्त शीख कुटुंबात जन्म. आई विद्यावती व वडील किशनसिंग. किशनसिंग लाला लजपतराय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांना क्रांतीकारी वाङमयाचा प्रसार केल्याबद्दल १० महिन्यांची शिक्षा झाली (१९०९). प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या डी ए व्ही व पुढे नॅशनल कॉलेजमधून बी ए झाले (१९२३). विद्यार्थिदशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. डी.ए.व्ही. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढयात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेस मध्येही प्रवेश केला होता; परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते कर्तारसिंग सरवा यांना दिलेली फाशी (१९१५), रोलट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड (१९१९) यांसारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. भगतसिंगनी १९२३ पासून १९३१ मध्ये फाशी देईपर्यंत आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित केले. १९२३ मध्ये हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपल्बिकन ॲसोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांची लौकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती झाली. संघटित रीत्या कार्य करणाऱ्या सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्रनाथ दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले व नवजवान भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना स्थापन केली (१९२५). त्याच वेळी उत्तर प्रदेशात सचिंद्रनाथ संन्याल यांच्या नेतृत्वाखाली गुप्तसंघटनेचे जाळे पसरले होते. तिचे वाड्मय लाहोरला आणून प्रसृत करण्याचे कार्य त्यांनी अंगीकारले. तसेच पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश हे भाग स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने संघटित करण्यास घेतले. नवजवान भारत सभेची शाखा लाहोरला स्थापून तिचे नेतृत्वही त्यांनी केले. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास इत्यादींच्या मदतीने त्यांनी विविध क्रांतिकारक योजना आखल्या : काकोरी खटल्यात दोषी ठरलेल्या सचिंद्रनाथ संन्याल, जोगेश्वर चतर्जी इत्यादींना जन्मठेपीच्या किंवा दीर्घमुदतीच्या शिक्षा झाल्या होत्या. यांतील रामप्रसाद बिस्मिल, रोशनसिंग, राजेंद्रनाथ लाहिडी, अशफाकुल्ला हे चौघे फासावर गेले होते. फक्त चंद्रशेखर आझाद फरारी राहून त्यांनी उरलेल्यांची जुळवाजुळव केली व क्रांतिकार्यास आरंभ केला. काकोरी खटल्यातील बंदींची तुरंगातून सुटका करणे, सायमन आयोग व त्याच्या शिफारशी यांविरुद्ध तीव्र निपेध नोंदविणे, शस्त्रे जमा करणे, महत्त्वाच्या केंद्रांत बाँब कारखाने चालू करणे, लाला लजपतराय यांच्यावर ज्याने लाठी हल्ला करणे (या हल्ल्यामुळे लालाजी आजारी पडून पुढे मरण पावले) त्या जे.ए.स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास ठार मारुन त्याचा सूड घेणे इ. कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. याप्रमाणे कुंदनलाल व चंद्रशेखर आझाद या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी कानपूरच्या तुरंगातून संन्याल व जागेश्वर चतर्जी यांची सुटका करण्यासाठी कट रचला; पण तत्पूर्वीच १९२६ च्या दसऱ्याला लाहोरमध्ये झालेल्या बाँबस्फोट प्रकरणी भगतसिंगांना पकडले. परंतु सबळ पुराव्या अभावी त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर विविध प्रांतांत क्रांतिसंघटनांचे कार्य करणाऱ्यांची एक बैठक १९२८ च्या ऑगस्टमध्ये दिल्लीच्या फिरोझशाह किल्ल्यात भरली. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखालील हिंदुस्थानात सोशॅलिस्ट रिपब्लिकन ॲसोसिएशन या संस्थेने पंजाबातील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंगाकडे दिले. तिचे जाळे सर्वत्र पसरले होते. पुढे या संस्थेचे रुपांतर नवजवान सैनिकसंघ (हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी) या संस्थेत करण्यात आले. सर्व शाखांशी संपर्क ठेवून एकसूत्रता आणायचे कार्य भगतसिंगांवर सोपविण्यात आले होते. त्यानंतर सायमन आयोगाचे मुंबईत आगमन झाले (३ फेब्रुवारी १९२८). आयोगाच्या सदस्यांना नेणाऱ्या आगगाडीवर तसेच मनमाड स्थानकाच्या आवारात बाँब्मस्फोट करण्यात आले; तथापि आयोग लाहोरला सुखरुप पोहोचला. तिथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने झाली. त्या वेळी झालेल्या लाठीहल्ल्यात लालाजी घायाळ झाले आणि त्यातच नंतर त्यांचे निधन झाले (१७ नोव्हेंबर १९२८ रोजी). या घटनेमुळे देशभर असंतोषाची तीव्र लाट पसरली. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या हल्ल्याचा मुख्य सुत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याचा खून करण्याचा निर्धार भगतसिंग व त्यांचे साथीदार चंद्रशेखर आझाद व शिवराम राजगुरु यांनी केला; परंतु ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी आलेल्या स्कॉटऐवजी दुसरा पोलीस अधिकारी जे.पी.साँडर्स हा स्कॉट समजून मारला गेला (१७ डिसेंबर १९२८). तेव्हा भगतसिंगांच्या हस्ताक्षरांतील 'साँडर्स मरण पावला', लालाजींच्या खुनाचा सूड घेतला गेला', अशी पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली. भगतसिंग तेथून फरारी होऊन कलकत्त्याला गेले आणि त्यांनी जतींद्रनाथ दास यांना आणवून आग्रा व लाहोर येथे बाँब कारखाने सुरु केले. पुढे त्यांच्या क्रांतिकारक पक्षाने दोन अन्यायकारक विधेयकांचा (ट्रेड डिस्प्युट बिल व पब्लिक सेफ्टी बिल) निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकूमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बाँब टाकण्याचे काम विश्वासपूर्वक सोपविले. सभागृहात ८ एप्रिल १९२९ रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षकसज्जांतून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी बिलाचा निर्णय देण्यासाठी विठ्ठलभाई पटेल उभे राहताक्षणीच सज्जातून सभागृहात बाँब फेकले, हवेत गोळ्या झाडल्या व निषेधपत्रके फेकली. पुढे दोघेही 'इन्किलाब जिंदाबाद' अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. निषेधपत्रात "जाणूनबुजून बहिऱ्या झालेल्यांसाठी 'हा मोठा आवाज केला आहे' आणि 'मानवाचे मानवाकडून शोषण बंद होईल' अशा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान चालू आहे", असे नमूद केले होते. हा व इतर अनेक आरोप लादून त्यांना व त्यांच्या सहकार्यांना शिक्षा ठोठवण्यात आल्या. भगतसिंगाना प्रथम काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली (१२ जून १९३०); पण पुढे खास न्यायाधिकरणाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली (७ आँक्टोबर १९३०). या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरु व सुखदेव ऊर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबरोबर लाहोरमधील मध्यवर्ती तुरंगात २३ मार्च १९३१ रोजी करण्यात आली. या क्रांतिकारकांची शिक्षा कमी करण्यासाठी म.गांधी व काँग्रेस यांनी प्रयत्न केले; परंतु त्यांस यश आले नाही. भगतसिंगांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी रशियन क्रांतीच्या धर्तीवर उठाव करावयाचा होता, असे म्हटले जाते. त्यांनी कम्युनिस्टांचे वाड्मय विशेषतः कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट जाहीरनामा यांचा अभ्यास केला होता. भगतसिंग एक तडफदार वृत्तपत्रकार होते. अर्जुंन (दिल्ली), प्रताप (कानपूर) इ. नियतकालिकांतुन बसवंतसिंग या टोपणनावाने त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध होत असे. अमृतसरमधून प्रकाशित होणाऱ्या अकाली व कीर्ति या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात असंख्य हुतात्मे झाले, सशस्त्र क्रांतीचेही अनेक प्रयत्न झाले; पण आपल्या कर्तव्यनिष्ठेने, त्यागाने, नेतृत्वाने, धाडसाने आणि अत्युच्च आहुतीने ऐन तारुण्यात सबंध देशात चैतन्य निर्माण करणारे भगतसिंग अद्वितीय होते. त्यांची प्रेरणा फक्त स्वातंत्र्यप्राप्तीची नव्हती, तर समाजवादी क्रांतीची, शोषणरहित मानव समाजनिर्मितीची होती, हे त्यांच्या जबान्या, निषेधपत्रक व एकूण कार्यावरुन स्पष्ट होते. भारत - पाकिस्तान फाळणी नंतर त्यांची दफनभूमी हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता; पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळविला. तेथे १९६८ मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्या वेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या.

शनिवार, २१ मार्च, २०२०

जागतिक कविता दिन world poetry day


जगभरच्या लाखो प्रसिद्ध व अप्रसिद्ध कवींसाठी 'युनेस्को' ने २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कविता दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. ह्याची सुरूवात १९९९ पासून झाली.
कविता... कविता म्हणजे नक्की काय...? कविता का लिहितात ...? ती लिहितात कशी..? काय मिळते कविता लिहून...? एखाद्या कागदावर शब्द मांडून काय समाधान मिळते...? अश्या असंख्य प्रश्नांचे उत्तर कविताप्रेमी आपल्यापरीने शोधत असतो...
खरे तर, कविता म्हणजे कोणासाठी प्रेम, तर कोणासाठी अहंकार... कोणासाठी भाव, तर कोणासाठी विचार...तर कोणासाठी आपला आक्रोश मांडण्याचं उत्तम साधन... सोपं नसतं एखाद्या कोऱ्या कागदावर असं काही मांडणं ज्यात सर्व भाव उमटून दिसावेत... जेव्हा सर्व भाव एकत्र येऊन खोळंबा तयार होतो तेव्हा सुरू होते शब्द शोधण्याची प्रतिक्रिया मग त्या शब्दांच चिंतन करून तयार होतात ओळी आणि त्या ओळींमधून बनते एक कविता...
प्रत्येकासाठी कवितेचे वेगवेगळे अर्थ असतात... काहींसाठी ती मज्जा तर काहींसाठी ते आपलं दुःख व्यक्त करण्याचं साधन... कोणी लिहून हसतात, तर कोणी रडून लिहितात... काहींसाठी ते मन मोकळं हास्य तर काहींच्या अश्रुंचे ते विकार...
कविता हा साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. कविता (मुख्यतः) छंदोबद्ध व रसबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, समजते व उमगते. कविता, ओव्या, अभंग किंवा श्लोक हे साहित्याचे माध्यम आहे. त्यामध्ये मनाच्या भावना, वस्तुस्थिती किंवा मनःस्थिती व्यक्त करता येते. भारतात कवितांचा इतिहास आणि कवितांचे तत्त्वज्ञान फार जुने आहे.कविता शब्दांनी खूप समृद्ध असतात.

कविता हा अभिव्यक्तीचा सुंदर प्रकार आहे. कवितेच्या अमूर्ततेइतकी संवेदना आणि भावनांची विपुलता इतर कोणत्याही प्रकारच्या साहित्यात निर्माण होत नाही. इ.स.पूर्व 2000 मध्ये काही काळ "गिलगामेश महाकाव्य" सह सर्वात जुनी काव्ये प्रकट झाली असे मानले जाते, परंतु साक्षरतेचा प्रसार होण्यापूर्वीच कविता अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या प्रकारच्या कवितेचा कल प्रचलित झाला आहे आणि त्यात परिवर्तन झाले आहे. सॉनेटपासून रॅप गीतांपर्यंत, कवितेचा मूळ उद्देश एकच राहतो मानवी स्थितीचा शोध घेणे आणि शब्दांद्वारे भावनांना आमंत्रण देणे. कविता मानवजातीच्या अस्तित्त्वात असलेल्या दुविधांशी प्रतिध्वनित होते, आतून कल्पनांना उजाळा देते.
 सर्व संस्कृतीतील लोक ओळखू शकतील अशा भाषिक अभिव्यक्तीचा उत्सव साजरा करतात. प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात कविता आढळू शकते आणि ती आपल्याला सामायिक मूल्ये आणि समान मानवतेच्या अंतर्गत एकत्र आणते. सर्वात मूलभूत कवितांमध्ये संवाद ढवळण्याची ताकद असते. UNESCO ने 1999 मध्ये पॅरिस येथे आयोजित केलेल्या 30 व्या सर्वसाधारण परिषदेच्या निमित्ताने "राष्ट्रीय, प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय काव्य चळवळींना नवीन मान्यता आणि प्रेरणा देण्यासाठी" हा दिवस प्रस्तावित आणि स्वीकारण्यात आला होता. या दिवसाच्या माध्यमातून जगभरातील कवितेचा उत्सव, लुप्त होत चाललेल्या भाषांचे जतन आणि काव्यात्मक अभिव्यक्तीला चालना मिळावी, अशी संस्थेची अपेक्षा आहे. भूतकाळातील आणि वर्तमानातील कवींना सन्मानित केले जाते आणि कविता पाठ करण्याच्या मौखिक परंपरांचे पुनरुज्जीवन केले जाते. कविता वाचणे, लिहिणे आणि शिकवणे याला प्रोत्साहन दिले जाते आणि संगीत, नृत्य, चित्रकला आणि बरेच काही यासारख्या अभिव्यक्तीच्या इतर माध्यमांसह एकत्रित केले जाते.
जागतिक कविता दिन विशेष
२१ मार्च
-------------------------------------------
शब्दरुपी अश्वावर आरूढ होते मी
काव्य प्रतिभेच्या पंखांनी भरारी घेते मी
कल्पनेच्या विश्वात संचार करिते मी
भावनांच्या तरंगांवर झुलते मी
यमकाचे बोट धरुनी
रचिले जाते मला
छंद-वृत्त आणि अलंकारांनी
सजविले जाते मला
कधी संगीताच्या तालावर
ठेका मी धरते
गीत रुपामध्ये
रसिकांसमोर अवतरते
कधी प्रेमाच्या तर कधी विरहाच्या
कधी राजकीय तर कधी सामाजिक
अशा विविध वस्त्रांनी नटत असते मी
भाषेच्या आणि प्रांताच्या
जातीच्या आणि धर्माच्या
पल्याड जाऊन वावरत असते मी
कलेच्या अथांग सागरात
नौकाविहार करत असते मी
कलावंत आणि दर्दी रसिकांच्या
शोधात असते मी
आजच्या जागतिक काव्यदीनी
कवितेच्या या रुपामध्ये
आपल्यासमोर प्रकट झाले मी

कविता कशी आली?
प्राचीन ग्रीसमध्ये, संपूर्णपणे मानवी भाषण, त्याच्या सर्व अभिव्यक्तींमध्ये (गद्य, नाट्य सादरीकरण, राजकारणी आणि वक्ते यांची भाषणे, कोणतेही तात्विक विवाद, कविता इत्यादी) कविता असे म्हणतात. तथापि, नंतर हे स्पष्ट झाले की जो माणूस सर्वात सामान्य आणि सामान्य गोष्टींमध्ये काहीतरी नवीन आणि उदात्त पाहू शकतो तोच कविता लिहिण्यास सक्षम आहे. कवींना त्यांच्या स्वतःच्या काल्पनिक जगात कसे बुडवून घ्यावे आणि इतरांपेक्षा कोणत्याही घटनांचा अनुभव कसा घ्यावा हे माहित आहे. याबद्दल धन्यवाद, श्लोकांमध्ये रचलेले विचार हजारो लोकांचे लक्ष वेधून घेतात, त्यांना सोबत घेऊन जातात, कवीने आपल्या निर्मितीमध्ये कोणती शक्ती ठेवली आहे हे त्यांना जाणवते.
*स्रोतपर माहिती *

जागतिक वन दिन world forest day

 
दृष्टीआड’ असलेल्या ‘सृष्टी’ चे महत्त्व मानवाला न समजण्याचे हे अगदी उघड उदाहरण म्हणता येईल. शुध्द हवा, पिण्याचे पाणी ( आणि इतरही अनेक बाबी) आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणा-या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले. त्यातून जंगले वाचवण्याची संकल्पना पुढे आली.या दिनानिमित्त वनिकी (Forestry) संदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता (recreation) या तीन महत्त्वाच्या घटकांबाबत जनजागृती करण्यात येते.
शुध्द हवा, पिण्याचे पाणी आणि इतरही अनेक बाबी आपल्याला मिळतात त्या जंगलांमुळेच. मात्र चंगळवादी जीवनशैलीसाठी केल्या जाणा-या बेसुमार जंगलतोडीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत असल्याचे १९७० च्या दशकात जाणवू लागले. १९७१ मध्ये 'युरोपियन कॉनफीडरेशन ऑफ अॅग्रीकल्चर' च्या २३ व्या  बैठकीत हा दिन साजरा करण्याची संकल्पना पुढे आली. आणि त्यातूनच 'वनांचे महत्व व त्यांचे संवर्धन' याविषयी जनजागृती करण्यासाठी २१ मार्चला दरवर्षी जागतिक वन दिन साजरा केला जाऊ लागला. या दिनानिमित्त या दिवशी जंगलांसंदर्भातील उत्पादन, संरक्षण व रंजकता या तीन महत्वाच्या घटकांबाबत जनजागृती केली जाते.
"निसर्गाचे व सजीवांचे अस्तित्व
अबाधित ठेवण्यासाठी झाडांचे
संरक्षण व संगोपन करण्यासाठी
कटिबध्द होऊया...!!!"
👉 वनिकी (Forestry) हे वनव्यवस्थापन, वृक्षलागवड आणि संबंधित नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन करणारे शास्त्र आहे. वनांद्वारे पुरविल्या जाणार्या नैसर्गिक सुविधांचा शाश्वत पुरवठा करण्याच्या दृष्टीने वनांचे व्यवस्थापन करणे हा वनिकीचा मुख्य उद्देश आहे.
जंगल / वन म्हणजे केवळ झाडे नाहीत तर ती अनेक सजीव-निर्जीव घटकांनी बनलेली गुतांगुतीची परिसंस्था आहे. जंगल निरनिराळ्या प्रकारचे पक्षी, सस्तन प्राणी, वनस्पती, कीटक, सरपटणारे प्राणी यांनी समृद्ध असून हे सर्व घटक एकमेकांशी जोडलेले असतात. त्याचबरोबर अन्नघटकांचे पुनर्चक्रीकरण करण्याचे मह्त्त्वाचे कार्य करणारे स्मूक्षजीव व बुरशीवर्गीय जीव देखील वन-परिसंस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.
👉 मूळ संकल्पना व सुरुवात
संयुक्त संघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा ‘वर्ल्ड फॉरेस्ट डे’ साजरा करण्यास सुरुवात केली.
पुढील मुद्यांची सर्वांनाच माहिती होण्यासाठी सरकार आणि विविध संस्था कार्यक्रम राबवतात.
अनावश्यक जंगलतोड टाळणे.
अधिक झाडे लावणे.
जंगलांपासून मिळणारी उत्पादने आणि होणारे फायदे
जंगलांना सतत भेट दिल्याने मिळणारी माहिती,
माणूस हा निसर्गाचा वैरी नसून त्याच्याच मदतीने निसर्गाचे जतन व संवर्धन होऊ शकते. जंगलांतून मिळणाऱ्या संसाधनांचा मानवाच्या उपजीविकेशी थेट संबंध आहे. २००२ साली जंगल संवर्धनासाठी जैवविविधता कायदा मंजूर झाला. सामुहिक वनहक्क कायदा आला. आदिवासींचे व इतर परंपरेने राहणाऱ्या आणि जंगलांचे संवर्धन करणाऱ्या वननिवासी यांचे जंगलावरील हक्क याला मंजूरी देण्यात आली. आणि याच कायद्यांचा व इतर शासकीय योजनांचा आधार घेत गावांमध्ये बदल घडू लागले. यातले काही उदाहरणे सांगता येतील. धुळे जिल्ह्यातील बारीपाडा हे गाव. काही वर्षांपूर्वी गावात वनव्यवस्थापन समिती स्थापन झाली. आणि उजाड झालेल्या जंगलाचे संवर्धन झाले. जंगलात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी करण्याचे लोकांनीच ठरविले. जंगलांतील सर्व झाडांची मोजणी झाली. मोह या उत्पन्न मिळवून देणाऱ्या झाडांचा लिलाव होऊ लागला, जो गावातील लोकच घेऊ लागले. त्यातून जमा झालेल्या रकमेतून गावात विकासकामे झाली. जंगल वाढले. भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. उत्तम शेती होऊ लागली. गाव समृद्ध बनले.
दुसरे उदाहरण धुळे जिल्ह्यातीलच लामकानी गावाचे. शहरात राहणाऱ्या डॉक्टर धनंजय नेवाडकर ह्यांना झालेल्या अपघातामुळे ते काही महिने सक्तीची विश्रांती घेण्यासाठी गावी आले. त्यावेळी लोकांपुढे चार आणि विहिरीचे पाणी आटण्याची मोठी समस्या आहे असे त्यांच्या लक्षात आले. गावाच्या  बाजूलाच सातपुड्याची पर्वतरांग आहे. साधारण एक हजार एकरांचा हा डोंगर सुजलाम, सुफलाम करण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी रोजगार हमी योजनेचा आधार घेतला. पाणी अडवा, पाणी जिरवा ही कामे तेथे सुरु केली. गावातील लोकांना रोजगार हमी योजनेचा फायदा मिळाला, रोजगार मिळाला. त्यातून गावातील पाण्याची समस्या मिटली आणि डोंगर पुन्हा समृद्ध बनला.
आदिवासी भागात सामुहिक वनहक्क मिळालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील १०२५ गावांनी जैवविविधता समित्या स्थापन करून मोठ्या प्रमाणात जंगलसंवर्धनाला सुरवात केली आहे. यातूनच लोकांच्या उपजीविकेचा प्रश्नही सुटला आहे. २००५ ला आलेल्या या कायद्यानुसार जंगलांतील बांबू, तेंदूपत्ता या सर्वांचे मालकी हक्क ग्रामसभेला मिळाले. बांबूसारख्या वनोपजाची व्यवस्था लोकांनी केली. यातून बांबूकटाई साठीची मजुरी आधीपेक्षा तिप्पट प्रमाणात लोकांना मिळाली शिवाय या बांबूविक्रीतून गावासाठी आवश्यक विकासकामांसाठी लोकांना पैसे मिळाले. कोरची तालुक्यात तर सालेम, झेंडेपार, अरवीटोला, अंधेरी, टेंभली, काळेगाव या गावातील लोकांनी सात एकर नवीन बांबूची लागवड केली आहे. जे जंगल त्यांना जगवते त्या जंगलाला ते जगवत आहे, वाढवत आहे.
जसे वनांवरील हक्क लोकांना मिळत आहे तसेच जंगल संवर्धन आणि जतन करण्याची जबाबदारीही लोकांकडे आहे. ज्या भागांत वनव्यवस्थापन समिती नाही किंवा नुसतीच कागदोपत्री आहे अशा काही गावांतून लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे, पण, बेजबाबदारपणामुळे त्यावर नियंत्रण नाही. यातून जंगलांचा नाशच जास्त होत आहे व नको त्या वाईट प्रवृत्ती बोकाळत आहे. यासाठी संतुलित, शाश्वत, जबाबदार लोकसहभागातून होणाऱ्या वनव्यवस्थापनातूनच शाश्वत उपजीविका निर्माण होईल व सर्वांनाच ‘शुद्ध हवा आणि शुद्ध आरोग्य’ अनुभवता येईल

शुक्रवार, २० मार्च, २०२०

सुंदरा शास्त्री सत्यमूर्ती

सुंदरा शास्त्री सत्यमूर्ती (क्रांतिकारक नेते)                           जन्म : 19 ऑगस्ट 1887
(तिरुमायम , पुडुकोट्टाय राज्य , ब्रिटीश भारत)
मृत्यू  : 28 मार्च 1943  (वय 55)
(मद्रास , मद्रास प्रेसिडेन्सी , ब्रिटिश भारत)                          💁‍♂️ *परिचय*
एस. सत्यमूर्तीचा जन्म तमिलनाडुचा तिरुचिराप्पल्ली मध्ये 19 ऑगस्ट, 1887 मध्ये एक मध्यवर्ती ब्राह्मण कुटुंबात झाला. इग्नॉमेडॉई गाँममध्ये हे प्रारंभिक शिक्षण आणि मद्रास मध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले. त्यांनी वकीलीचा अभ्यास केला आणि मद्रासमधून आपली वकिली सुरु केली.
एस. सत्यमूर्ती यांचा सन 1919 मध्ये कॉंग्रेसमध्ये सक्रिय सहभाग होता आणि सन 1923 मध्ये स्वराज पक्षाच्या उमेदवार म्हणून मद्रास विधानभेत निवडून आले होते. सत्यमूर्तींनी 1930 च्या सविनय कायदाभंग चळवळीत भाग घेतला, त्या कारणास्तव सन 1931 आणि  1932 मध्ये तुरुंगात रवानगी झाली. दिल्ली इंडियन भारतीय कौन्सिलचे आणि त्यानंतर कॉंग्रेस पार्टीचे उपनेता म्हणून निवड झाली.
निधन* एस. सत्यमूर्ती यांचे निधन 20 मार्च, 1943 मध्ये झाले. हे
सुंदर शास्त्री सत्यमूर्ती  एक भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि राजकारणी होते. ते त्यांच्या वक्तृत्वकारणासाठी प्रशंसनीय होते आणि एस.श्रीनिवास अय्यंगार, सी. राजगोपालाचारी आणि टी. प्रसारसमवेत मद्रास राष्ट्रपती पदाच्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या प्रमुख राजकारणींपैकी एक होते. सत्यमूर्ती यांना 1954 ते 1962 या काळात मद्रास राज्याचे मुख्यमंत्री के. कामराज यांचे मार्गदर्शक मानले जाते.
पुडुकोट्टाई संस्थानच्या तिरुमायम मध्ये 1887 मध्ये जन्मलेल्या सत्यमूर्ती यांनी महाराजा कॉलेज, मद्रास ख्रिश्चन कॉलेज आणि मद्रास लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. काही काळ वकील म्हणून सराव केल्यानंतर सत्यमूर्ती यांनी अग्रणी वकील आणि राजकारणी एस. श्रीनिवास अय्यंगार यांच्या सूचनेवरून राजकारणात प्रवेश केला, जे नंतर त्यांचे गुरू बनले.
सत्यमूर्ती यांनी बंगालचे विभाजन, राऊलॅट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड आणि सायमन कमिशनविरोधात निषेध नोंदविला. सत्यमूर्ती यांना 1942 मध्ये भारत छोडो चळवळीतील कारवायांमुळे तुरूंगात टाकले गेले होते. नंतर त्याला सोडण्यात आले, परंतु 20 मार्च 1943 रोजी हृदय अपयशामुळे त्यांचे निधन झाले.
सत्यमूर्ती हे 1930 ते 1934  पर्यंत स्वराज पक्षाच्या प्रांतीय शाखेचे अध्यक्ष आणि 1939 ते 1943 पर्यंत तामिळनाडू कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष होते. त्यांनी मद्रास ख्रिश्चन कॉलेजमधून पदवी संपादन केली आणि नंतर राष्ट्रवादीच्या चळवळीत प्रवेश करण्यापूर्वी वकिली म्हणून कायद्याचा अभ्यास केला. त्यांनी अगदी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला, महाविद्यालयीन निवडणुका जिंकल्या आणि अखेरीस ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रमुख नेते आणि स्वातंत्र्य चळवळीचे डोईन म्हणून उदयास आले. 1919 मध्ये, जेव्हा कॉन्ट्रेसने मॉन्टॅगू-चेल्म्सफोर्ड सुधारणांचा आणि राऊलट कायद्याचा निषेध करण्यासाठी संयुक्त संसदीय समितीकडे (यूकेचा) प्रतिनिधी पाठविण्याचा निर्णय घेतला तेव्हा, 32 वर्षीय सत्यमूर्ती यांना प्रतिनिधी म्हणून निवडले गेले. जेव्हा ब्रिटनमध्ये होते, तेव्हा ते द हिंदूचे लंडन प्रतिनिधी म्हणून काम करीत होते, प्रत्यक्ष प्रतिनिधीच्या जागी ज्याने 10 दिवसांची अनुपस्थिती रजा घेतली होती. तो प्रामाणिकपणा, सचोटी, वांशिक, जातीय आणि धार्मिक सौहार्द आणि समानतेवरचा विश्वास आणि घटनात्मक सरकारवरील त्यांचा ठाम विश्वास यासाठी ओळखला जात होता. आणि भारतातील संसदीय लोकशाही, ज्यामुळे 1920 च्या दशकात गांधींच्या वसाहतीच्या विधिमंडळात भाग घेण्यास नकार देणा-या गांधींच्या विरोधात विचार केला गेला. हिंदू धर्मातील जातीव्यवस्थेचा त्याला तीव्र विरोध असल्याचेही प्रख्यात आहे. 1920  च्या दशकात ते वसाहती विधिमंडळात भाग घेण्यासाठी नव्हते.
सत्यमूर्ती तरूण असताना भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. त्यावेळी पक्षाने युरोपियन आणि सर्व जाती व जातीतील भारतीय यांच्यात वांशिक समानतेची वकी केली. त्यांनी ब्रिटीश राज्यकारभारात वर्चस्व मिळविण्याची मागणी केली, ज्याला ब्रिटिश राज्यकर्त्यांनी अनुमती नाकारली होती.
सत्यमूर्ती हे स्वराज्यवाद्यांनी अग्रणी म्हणून काम केले ज्यांनी भारतात संसदीय लोकशाहीची पाया घातली, इतर चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. 1920 च्या दशकात विधानसभेच्या राजकारणामध्ये भाग घेण्यासाठी गांधींनी संपूर्ण देशाला भुरळ घालणारे गांधी यांच्या विरुध्द असलेला दृष्टिकोन बाळगण्यासाठी दृढनिश्चय करण्याचे विलक्षण धैर्य आवश्यक होते. पण, सत्यमूर्ती, दास आणि मोतीलाल नेहरू यांच्यासारख्या लोकांनी विधिमंडळातील अनुभव संपादन करण्याची गरज मांडली. म्हणूनच, गांधींनी स्वराज्यवाद्यांचे उद्दीष्ट मान्य केले नसले, तरी त्यांनी त्यांना स्वतःच्या मार्गावर येण्यापासून रोखले नाही.
इतर अनेक प्रख्यात भारतीय देशभक्तांप्रमाणेच ब्रिटिशांनी सत्यमूर्ती यांना अटक केली आणि अनेकदा तुरुंगात टाकले. 1930 मध्ये मद्रास येथील पार्थसारथी मंदिरात भारतीय ध्वज फडकावण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना अटक करण्यात आली. स्वदेशी चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता आणि 1942 मध्ये भारत छोडो चळवळीच्या उंचीवर 'वैयक्तिक सत्याग्रह' केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली.  28 मार्च 1943 रोजी, डब्ल्यू डब्ल्यू आय आय (15 ऑगस्ट 1945) च्या समाप्तीच्या दोन वर्षांपूर्वी आणि भारताच्या स्वातंत्र्य (15ऑगस्ट 1947) च्या चार वर्षांपूर्वी, 28 मार्च 1943 रोजी मद्रासच्या जनरल हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. ते दुर्मिळ क्षमतांचे एक अत्यंत प्रतिष्ठित राजकारणी होते, त्यांचे सहकारी आणि मद्रास प्रेसिडेंसीच्या लोकांबद्दल मनापासून शोक व्यक्त करतात, ज्याला त्याने आपले जीवन स्वातंत्र्य आणि न्याय मिळवून देण्यासाठी समर्पित केले होते. प्रख्यात मद्रास पेपर द हिंदूंनी "लोकांचे लोक" या शीर्षकाखाली सत्यमूर्तीला एक स्तंभ समर्पित केला. त्यात म्हटले होते की, "तो जन्मजात स्वातंत्र्यसैनिक होता, स्कॉट्स म्हणतो त्याप्रमाणे लीडमाईन सेनानी होता."
सत्यमूर्ती हे प्रोफेसर बाला व्ही. बालाचंद्रन यांचे काका आहेत, चेन्नई येथे असलेल्या बिझिनेस स्कूल, ग्रेट लेक्स इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संस्थापक आणि डीन. सत्यमूर्ती यांची मुलगी लक्ष्मी कृष्णमूर्ती (1925-2009) ही लोकप्रिय राजकारणी आणि लेखक होती ज्यांनी मद्रास विधान परिषदेत काम केले.                                                                              
             🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳  
      🙏 *विनम्र अभिवादन*🙏

जागतिक चिमणी दिन world sparrow day


🎯 जागतिक चिमणी दिन World Sparrow Day 

मुंबईसारख्या महानगरांत चिमण्यांच्या चिवचिवाटाने सुरू होणारा दिवस अलीकडे फारसा अनुभवता येत नाही. चिमणी – आपल्या सगळ्यांच्या परिचयाची.. कदाचित अतिपरिचयाची. आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही, झाडं नाहीत, वळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरटय़ासाठी छोटीशी जागाही नाही. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते, परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंतर अनेक वर्षांनी जगभरच, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून  साजरा केला जातो.
भारतात नाशिक येथील ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’चे संस्थापक आणि निसर्गरक्षक मोहम्मद दिलावर आणि फ्रान्समधील ‘इकोसिस अ‍ॅक्शन फाऊंडेशन’ या संस्थांनी, इतर स्वयंसेवी संस्थांसह – चिमण्या कमी होण्याची कारणे शोधण्यासाठी अभ्यास केला. चिमण्यांना मदत करण्यास सुरुवात केली आणि चिमण्यांची कमी होणारी संख्या हा वातावरणातील वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे काय, हे तपासून पाहण्यासाठी जगभर चळवळ उभारली.
‘जागतिक चिमणी दिन’ या दिवशी लोकांमध्ये चिमणी वाचविण्यासाठीची जागृती करणे, तिचे अन्नसाखळीतील- पर्यायाने पर्यावरणातील महत्त्व समजावणे, चिमणीला जगण्यासाठी योग्य अशी परिस्थिती निर्माण करणे अशा प्रकारचे कार्यक्रम वैयक्तिक अगर संस्था पातळीवर आयोजित केले जातात, परंतु चिमणीसाठीच्या जनजागृतीची गरज कायमस्वरूपी आहे. कमी होणारी झाडे, माणसाच्या बदललेल्या खाण्याच्या सवयी, वाढते आधुनिकीकरण, गगनचुंबी इमारतींत होणारी वाढ, मोबाइल फोन टॉवर्स या सर्व गोष्टींमुळे चिमणी अडचणीत आली आहे. चिमणीला बाभळीसारख्या नैसर्गिक अधिवासाबरोबरच घरटे बांधण्यास अनुकूल गोष्टी उपलब्ध करून देणे, घराभोवती शक्य असल्यास छोटी झाडेझुडुपे लावणे, आपल्या घराजवळ, बाहेर चिऊताईसाठी दाणा-पाणी ठेवणे अशा गोष्टी प्रत्येक जण करू शकतो.
जगभरातील लोककथा आणि ‘चिऊताई चिऊताई दार उघड’ सारख्या बडबडगीतांमध्ये सर्वत्र आढळणारी चिवचिव चिमणी गेली कुठे? असा प्रश्न जगभरातील पर्यावरणप्रेमींना पडू लागला. कारखान्यातल्या चिमणीचे भकभक धूर ओकणे प्रमाणाबाहेर वाढले आणि अंगणातली चिमणी दिशेनाशी होऊ लागली. पुढच्या पिढीला चिमणी फक्त चित्रांमध्येच दिसणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली, परिणाम  हा ‘वर्ल्ड स्पॅरो डे’ साजरा केला जाऊ लागला आहे.
 २०१५ सालाच्या दिवसाची मुख्य संकल्पना होती ‘आय लव्ह स्पॅरो’ दिल्ली महापालिकेने चिमणी हा तेथील राज्य- पक्षी जाहीर केला आहे.
निसर्गाची ओळख मानवाला प्रथम चिमणीपासूनच होते. एक घास चिऊचा... सांगतंच आपली आई आपणास एक-एक घास भरवते. कुठेतरी प्रत्येकाचे बालपणाच्या आठवणींशी चिऊताई जोडली गेलेली आहे. चिमणी काळाच्या ओघात दिसेनाशी झाली. आताच्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट कानी पडणे दुर्मिळ झाले. कविता, बडबडगीते यांतच चिमणी शिल्लक राहते की काय अशी भिती वाटू लागली आहे. शहरात मातीच्या भिंती, कौलारू घरे पहावयास मिळत नाहीत. अंगणात धान्य निवडणारी महिला आता दिसत नाही, अंगणही राहिले नाही तर अंगणात उड्या मारत धान्य टिपणारी, बागडणारी चिमणी कुठे दिसणार? सीमेंटच्या जंगलात वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाली. अपवादाने वृक्ष नजरेस पडतात. कधी काळी चिमण्यांच्या चिवचिवाटाने होणारी घराघरातील सकाळ आता केवळ आठवणीतील एक अनुभूती झाल्याची स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर, चिमण्यांचे संरक्षण आणि शहरीकरणामुळे पर्यावरणाचा होणारा हास चिमण्यांची संख्या कारणीभूत ठरला. एकीकडे मुंबई, पुण्यासारख्या महानगरात सामान्यतः आढळणारी चिमणी म्हणजेच 'इंडियन कॉमन स्पॅरो'चेही दर्शन दुर्मीळ होत असताना पर्यावरण संवर्धनामुळे निमशहरी भागातील काही परिसरात विविध प्रकारच्या चिमण्या सकाळ-सायंकाळ गुंजारव करताना आढळत.

चिमणी चिमणी (हाउस स्पॅरो) आणि पीतकंठ किंवा रान चिमणी (यलो थ्रोटेड चिमणी) अशा दोन प्रकारच्या चिमण्या आढळतात. त्यातील हाउस स्पॅरो अर्थात तुमच्या आमच्या परिसरात दिसणारी चिमणी सध्या कमी होत आहे. ही चिमणी प्रामुख्याने शहरात वास्तव्यास असते. मात्र, शहरी भागापेक्षा आता या चिमण्यांची संख्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर आहे. शहरीकरणाचा वाढलेला वेग, प्रदूषण आणि चिमण्यांना न मिळणारे खाद्य यामुळे हा चिवचिवाट कमी झाला आहे. चिमण्यांचे मुख्य अन्न म्हणजे बिया, भात, गहू, बाजरी हे आहे. मात्र, शहरात चिमणीला हे खाद्य मिळेनासे झाले. तेच गावाकडे घरातील महिला धान्य निवडतानाही चिमणीला ते घालते. त्यामुळे चिमण्यांची मुख्य गरज पूर्ण होते. त्यामुळे ग्रामीण भागात आजही हजारोंच्या संख्येने चिमण्या दिसतात.

रान चिमणी - शहरी भागांत फारशी न आढळणारी चिमणी म्हणजे पीतकंठ चिमणी. याच चिमणीला रान चिमणी म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने नाशिक शहराबाहेरील जंगल परिसरात अढळते. विख्यात पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांना एकदा एक मृत चिमणी आढळली होती. त्यांनी तिला बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीत नेऊन परीक्षण केले असता ती हाउस स्पॅरो • नसल्याचा निष्कर्ष निघाला. या चिमणीच्या मानेजवळ एक पिवळा ठिपका असतो त्यामुळे या चिमणीला पीतकंठ म्हणतात तसेच ती रानात दिसून येते त्यामुळे तिला रान चिमणीही म्हणतात. ही चिमणी प्रामुख्याने हरसूल, पेठ, इगतपुरी या भागात आढळते. रान चिमणीही आता काही अंशी कमी होत चालली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे चिमणीची शिकार. रानावनात गलोरने चिमणीची शिकार केली जाते. रानावनातील नागरिकांमध्ये पक्ष्यांबद्दल असलेले अज्ञान, तसेच काही ठिकाणी अशा पक्ष्यांचा अन्न म्हणूनही वापर केला जातो. त्यामुळे चिमण्यांना पारध केले जात असल्याने अशा चिमण्याही कमी होत चालल्या आहेत. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या ग्रामीण भागात यासंदर्भात जनजागृतीचे गेल्या सात ते आठ वर्षांपासून काम सुरू आहे.

नर चिमणी- या चिमणीचे डोके राखाडी रंगाचे असते. तसेच तिचा गळा व डोळ्याभोवती काळा रंग असतो. ही चिमणी अंगाने भक्कम असते. 
मादी चिमणी - ही चिमणी भुरकट राखाडी रंगाची असते. साधारणतः ताठ आणि सडपातळ बांधा या चिमणीचा बघायला मिळतो. चिमणीचा विणीचा हंगाम हा वर्षभर असतो.

आज जागतिक चिमणी दिवस 
उठा उठा चिऊताई
सारी कडे उजाडले 
डोळे तरी मिटलेले
अजूनही!

सोनेरी हे उन आले
घरट्याच्या दारापाशी
डोळ्यावर झोप कशी
अजूनही!

लगबग पाखरे ही
गात गात गोड गाणे
भीर भीर उडती 
चोहीकाडी!

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायचे मग कोणी
बाळासाठी चारा पाणी
चिमुकल्या!

बाळाचे मी घेता नाव
जागी झाली चिऊताई
उठोनिया दूर जाई 
भूरभूर!

आज जागतिक चिमणी दिवस

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?
कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?
नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी
कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?
नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही
कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?
नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?
आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?
गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला
चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?
काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला
चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?
पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा
जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला
राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना

स्रोतपर माहिती 

बुधवार, १८ मार्च, २०२०

वामन गोपाळ जोशी (भारतीय क्रांतिकारक)

 


वामन गोपाळ जोशी  (भारतीय क्रांतिकारक)
जन्म :  १८ मार्च १८८१   (अमरावती)                                मृत्यू :  ३ जून १९५६ (अमरावती)                                    🙍🏻‍♂️ *जीवन*
वामन नारायण जोशी हे क्रांतिकारक होते. ते मुळचे अमरावतीचे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला व शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.
अनंत कान्हेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. नाशिक येथे २३ डिसेंबर, इ.स. १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. आरोपींत त्यावेळी नगर जिल्ह्यातील समशेरपूर (ता. अकोले) येथील वामनराव जोशी हे एक होते. नावात सारखेपणा असल्याने वीर वामनराव यांचा या घटनेशी संबंध जोडला गेला. पण या खटल्याची कागदपत्रे व नोंदी तपासल्या असता समशेरपूर येथील वामन नारायण जोशी उर्फ दाजीकाका या कटात सहभागी असल्याचे लक्षात आले. त्यांना अंदमानात ८ वर्षे शिक्षा भोगावी लागली.
💁‍♂️ *वीर वामनराव जोशी*
वीर वामनराव जोशी (वामन गोपाळ जोशी)  हेही भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक असून मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते. सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘राष्ट्रमत’ ह्या वृत्तपत्रात देशभक्त गंगाधरराव देशपांडे ह्यांचे प्रमुख सहकारी म्हणून काम केले. लोकजागृतीसाठी त्यांनी ‘स्वतंत्र हिंदुस्थान’ हे साप्ताहिक चालवले होते. त्यांची वाणी आणि लेखणी ओजस्वी होती.
वीर वामनराव जोशी यांनी इ.स. १९२० ते १९४२ या काळात अनेकवेळा तुरुंगवास भोगला. महात्मा गांधींच्या चळवळीतही त्यांचा सहभाग होता. त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती.
📖 *प्रकाशित साहित्य*
    👑🎭  *नाटके*
ढोटुंग पादशाही
धर्मसिंहासन
रणदुंदुभि (पहिला प्रयोग, बलवंत संगीत नाटक मंडळी ने १७-२-१९२७ रोजी केला होता).
राक्षसी महत्त्वाकांक्षा (पहिला प्रयोग, ललित कलादर्श ने २०-९-१९१३रोजी केला होता).
शीलसंन्यास
📚 *अन्य पुस्तके*
चंद्रपूरची महाकाली
राष्ट्रपिता महात्मा गांधी
🎙️ *गाजलेली नाट्यगीते*
आपदा राज-पदा भयदा (संगीत रणदुंदुभि)
जगी हा खास वेड्यांचा पसारा (संगीत रणदुंदुभि)
दिव्य स्वातंत्र्य रवि (संगीत रणदुंदुभि)
परवशता पाश दैवे ज्यांच्या गळा लागला (संगीत रणदुंदुभि)
वितरि प्रखर तेजोबल (संगीत रणदुंदुभि)
⚜️ *वारसा*
वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर नावाचे नाट्यगृह आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. (या व्यायाम मंडळाच्या संकेतस्थळावर, ’मुस्लिम लिबरेशन आर्मी’ने हल्ला केला आहे, अशी माहिती ’पाक सोल्जर डॉट कॉम’ या ठिकाणी दिली आहे.) या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृती हजर होते. सिद्धनाथ काण्यांच्या आग्रहास्तव संघाच्या पथसंचालनाच्या वेळी ’गॉड सेव्ह द किंग’ऐवजी ’वंदे मातरम्’ हे गीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वत: डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांना प्लॅटिनम मेडल व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. संघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनी राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. वीर वामनराव जोशींमुळेच महात्मा गांधी, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती.
१९८९साली ६२वे मराठी साहित्य संमेलन या जागतिक कीर्तिप्राप्त अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात भरले होते. अध्यक्ष कथालेखक प्राचार्य के. ज. पुरोहित (शांताराम) होते, तर स्वागताध्यक्ष केरळचे तत्कालीन राज्यपाल रा. सू. गवई होते.

वामनराव जोशी यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त संस्कार भारतीच्या अमरावती शाखेच्या वतीने रविवार, २१ मार्च, इ.स. २०१० रोजी अमरावतीत बडनेरा मार्गावरील व्यंकटेश लॉनमध्ये मोठा समारंभ झाला होता.      
             🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳  
      🙏 *विनम्र अभिवादन*🙏
स्त्रोतपर माहिती 

मंगळवार, १७ मार्च, २०२०

अनुताई बालकृष्ण वाघ Anutai Balkrishna Wagh


अनुताई बालकृष्ण वाघ (समाजसेविका व शिक्षणतज्ञ ) Anutai Balkrishna Wagh 
जन्म : १७ मार्च १९१० (मोरगाव, पुणे) 
मृत्यू : २७ सप्टेंबर १९९२ (कोसबाड) या आदिवासी समाजासाठी काम करणाऱ्या समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांनी शिक्षणाद्वारे आदिवासींच्या जीवनात जागृती निर्माण करण्याचे काम केले. पालघर जिल्ह्यातील कोसबाड येथे ताराबाई मोडक यांचेसोबत त्यांनी बालशिक्षणाचे कार्य केले.
📖💁‍♀️ शिक्षण व जीवन
अनुताईंचे वडील बालकृष्ण वाघ हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. वयाच्या तेराव्या वर्षी इ.स. १९२३ साली शंकर वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला. परंतु सहा महिन्यांतच त्यांना वयाच्या तेराव्या वर्षी वैधव्य आले. असे असूनसुद्धा तत्कालीन सामाजिक रूढींचे बंधन झुगारून त्यांनी शिक्षण घेतले व शिक्षिका म्हणून काम करीत असताना त्यांना ताराबाई मोडक भेटल्या आणि त्यांनी ताराबाईंच्या बोर्डी (ठाणे) येथे आदिवासींसाठी असलेल्या ग्राम बाल शिक्षण केंद्रात प्रवेश केला व तेथे इ.स. १९४७ ते १९९२ अशी ४७ वर्षे त्यांनी निरपेक्ष वृत्तीने ग्रामशिक्षणाचे कार्य चालवले. पुढे कोसबाडच्या नूतन बाल शिक्षण केंद्राच्या चालक, राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकरिणी सदस्य, अखिल भारतीय पूर्व प्राथमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांचे शिक्षणविषयक ग्रंथ इंग्रजी, हिंदी, गुजराथीतून अनुवादित झाले. प्रबोधनासाठी वाहिलेल्या शिक्षणपत्रिका व स्त्रीजागृतीसाठी असलेल्या ‘सावित्री’ मासिकाच्या त्या संपादिका होत्या.
🏅 🏆💐पुरस्कार आणि सन्मान
भारताच्या केंद्र सरकारतर्फे साक्षरता प्रसारार्थ अनुताईंनी लिहिलेल्या सहजशिक्षण या पुस्तकास इ.स. १९८१ साली राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आदिवासींच्या शिक्षणासाठी अनेक संस्था स्थापन करून आयुष्य वेचणाऱ्या या अनुताईंना आदर्श शिक्षिका, दलितमित्र, आदर्श माता, फाय फाऊंडेशन, सावित्रीबाई फुले, बाल कल्याण राष्ट्रीय पुरस्कार, जमनालाल बजाज पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांबरोबरच पद्मश्रीने सन्मानित केले गेले.
✍️ अनुताईं वाघ यांनी लिहिलेली पुस्तके
कोसबाडच्या टेकडीवरून (आत्मचरित्र)
दाभोणच्या जंगलातून
शिक्षणविषयक ग्रंथ (अनेक)
सईची सोबत (कथासंग्रह)
सहजशिक्षण. बालवाडीतील कृतिगीते, (४) प्रबोधिका इत्यादी पुस्तके आणि शिक्षक-पालक-प्रबोधनासाठी चालविलेल्या शिक्षणपत्रिका, स्त्रीजागृती करणारे सावित्री इत्यादी मासिकांचे त्यांनी संपादनही केले. केसरी, छावा इत्यादी नियकालिकांतून स्फुटलेखन केले.
त्यांच्या विधायक व भरीव कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी महाराष्ट्र शासनाने १९७२ साली ‘आदर्श शिक्षिका’ व १९७५ साली ‘दलित मित्र’ हे किताब देऊन त्यांचा गौरव केला. तसेच त्यांना १९७८ साली इचलकरंजीचा ‘फाय फाउंडेशन पुरस्कार’, १९८० साली ‘आदर्श माता’, ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’ व ‘बालकल्याण राष्ट्रीय पुरस्कार’, १९८५ साली ‘जमनालाल बजाज पुरस्कार’, १९९२ साली दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानचा ‘आशा भोसले पुरस्कार’ तसेच ‘रमाबाई केशव ठाकरे पुरस्कार’ इ. पुरस्कार देऊन विविध संस्थांनी सन्मानित केले. १९८५ साली केंद्र शासनाने ‘पद्मश्री’ किताब देऊन त्यांचा सन्मान केला.
त्यांचे बोर्डी येथे अल्प आजाराने निधन झाले.
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏 विनम्र अभिवादन🙏
स्त्रोतपर माहिती

सोमवार, १६ मार्च, २०२०

अप्रगत विद्यार्थी उपक्रम

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपक्रम शैक्षणिक उपक्रम मराठी
 १)रोज नवीन अक्षराचे शब्दचक्र वाचन घेणे.त्यातील आवडीचा शब्द घेवुन शब्दावरुन वाक्ये बनविणे.
२)शब्दभेंड्या खेळ घेणे.
३)वाचनपट(शब्दडोंगर)बनवणे.
लेखनाचे उपक्रम
१)धुळपाटीवर लेखन 
२)हवेत अक्षर गिरविणे.
३)समान अक्षर जोड्या लावणे.
४)अक्षर आगगाडी बनवणे.
५)पाहुणा अक्षर ओळखणे.
६)चित्रशब्द वाक्यवाचन करणे.
७)बाराखडीवाचन करणे.
८)बाराखडीतक्तेवाचन करणे.
९)स्वरचिन्हयुक्त शब्दांचे बाॅक्समधील ५०० शब्द वाचणे.
१०)थिमनुसार शब्दचक्र बनवणे.
११)कथालेखन करणे.
१२)कवितालेखन करणे.
१३)चिठठीलेखन करणे.
१४)संवादलेखन करणे.
१५)मराठी शब्दकोशात शब्द शोधणे.

मराठी कृतीपुस्तिका 

अप्रगत विद्यार्थी साठी उपक्रम =
गणित
१)खडे मोजुन घेणे,एकमेकांचे मोजणे
२)वर्गातील वस्तु मोजणे
३)अवयव मोजणे
४)कार्डसंख्या पाहुन वस्तु मांडणे
५)कार्ड घेवुन गोलात फिरणे नाव घेणाराने आत जाणे.
६)आगगाडी तयार करणे
७)दोघींनी मिळुन संख्या बोटावर दाखवणे.
८)माळेवर मणी मोजुन संख्या दाखवणे.
९)अंकाची गोष्ट सांगणे.
१०)बेरीज व्यवहार मांडणी शाब्दीक व अंकी करणे.
११)बेरीज उभी आडवी मांडणी करणे
१२)चौकटीची जागा बदलुन उदाहरण सोडवणे.
१३)बेरीजगाडी तयार करणे.
१४)अंकांपुढे वस्तु मांडणे
१५)गठ्ठे सुट्टे सांगणे
१६)मणीमाळेवर १ ते १०० संख्यावाचन रोज ४ वेळा घेणे.
१७)वस्तु निवडणे
१८)पाणी पाटी
१९)अक्षर देवून शब्द तयार करणे
२०)चिठ्ठीतुन शब्द देवून पाच वाक्य सांगणे
२१)शब्दकोडे सोडवणे
२२)अक्षरगाडी उदा.
कप ,पर ,रवा ,वात ई.
२३)श्रुत लेखन सराव
२४) अंकाच्यागाड्या
२५)सम ,विषम संख्याच्या गाड्या
२६)सुलभबालवाचन सराव
२७)स्मरणावर आधारीत खेळ
२८)दुकानातील ,घरातील बाजारातील ई. वस्तुंची यादी तयार करणे
🎋 ज्ञानरचनावाद प्रक्रीया उपक्रम🎋 
♻♻♻♻♻♻♻♻♻♻
🌻🌻🌻प्रश्न तुझा उत्तर माझ🌻🌻🌻🌻

मुलाना नेहमी अनेक प्रश्न पडत असतात त्या प्रश्नाना उत्तरे मिलावित असेमुलाना वाटत राहते यासाठी मुलाना पडणारे वेगवेगले प्रश्न मुलानी कागदावर लिहुन वर्गातील पेटीत टाकावे आणि दर शनिवारी दुसर्या तासाला प्रश्न तुमचे उत्तर माझे या उपक्रमात कुतुहल पेटी तील प्रश्नाची उत्तरे देता येतील काही प्रश्नाची उत्तरे गुगल च्या माध्यमातुनही देता येतील आणि मुलाची जिज्ञासा वाढीस लागेल.
 🌻🌻🌻 वाचणकट्टा🌻🌻🌻🌻
झाडाखाली,मैदानार, एका ओट्यावर ग्रंथालयातील काही पुस्तके दररोज लांब बाकांवर मांडली जातात. मधल्या सुट्टीत किंवा लहान सुट्टीच्या वेळेत विद्यार्थी इतरत्र न भटकता किंवा दंगामस्ती न करता वाचनकट्ट्यावर त्यांच्या आवडीचे पुस्तक घेऊन वाचत बसतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अवांतर वाचन होते आणि वेळेचा, जागेचा सदुपयोग होतो. वाचनकट्ट्यावर मांडलेली पुस्तके पाहून रस्त्यावरुन येणारे जाणारे ग्रामस्थही थबकतात आणि काही वेळ ती पुस्तके चाळतात. दर शनिवारी दप्तराविना शाळा भरवली जाते. त्यादिवशी तासिकेप्रमाणे प्रत्येक इयत्तेच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाचण्यास दिली जातात. वाचलेल्या पुस्तकातील मजकुरावरुन विद्यार्थ्यांना प्रश्न तयार करण्यास सांगितले जाते. एका दिवशी एकच प्रश्नवाचक शब्द दिला जातो. उदा. का, कधी, कसे, काय, कोण, कोठे इ... त्या एकाच प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांनी तयार करायचे. तयार केलेल्या प्रश्नांचे संकलन करुन प्रश्नपेढी तयार केली जाते. पुढील आठवड्यासाठी तोच प्रश्नवाचक शब्द देऊन आणखी प्रश्नांची भर घातली जाते.
🌻🌻 स्मरण खेळ 😇😇
विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतो.
हा खेळ घेताना टेबलावर ३५४० लहान लहान वस्तू ठेवाव्यात.उदा.रूमाल,कंगवा ,खडू मोबाईल , पेन , रबर, पेन्सील ई. आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यात.
मुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात.
नंतरत्या वस्तूकापडाने झाकून ठेवाव्यात.
नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्या.
त्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल.
जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.
🌻🌻ओंजळीने ग्लास भरणे 🌻🌻
मुलांना या खेळात फार आनंद मिळतो.
प्रथम आपण ६ ८ मुलांचे गट करावेत.
नंतर समान आकाराचे गटातील संख्ये नुसार ग्लास घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावे.
त्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या.
मुलांना त्या बादलीतील पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेल.
ओंजळीने पाणी नेउन त्यांना आपला ग्लास भरावा लागेल.
या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईल.
यामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण मदत होईल.
🌻🌻ठराविक वेळेत गणिते सोडवणे 🌻🌻
मुलांना आपण १५२० बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची १५-२०लहान लहान कोणत्याही प्रकारची गणिते देऊ शकतोआणि ६७मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतो.
 त्या वेळेत गणिते उत्तरासह सोडवणे अपेक्षितआहे.
सुरुवातीला १ अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावे.
 अश्याप्रकारे खेळातून गणिताचा सराव घ्यावा.
या खेळत १००% मुलांना सहभागी करावे.
🌻🌻एकमेकांना हसवणे 😝🌻🌻
मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावा.
काही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणि बसलेल्या मुलांपैकीएकानेयेउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावा.
मात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाही.
वेगवेगळे हावभाव , वेगवेगळे आवाज काढून, विनोदसांगून त्यांना हसवावे.
जे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेता घोषित करावे.
🌻🌻आवाज ओळखणे 🌻🌻
एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलाला नावघेऊन बोलवावे.
त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे .
जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एक गुण द्यावा .
असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा .
ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा.
🌻🌻मुलांची हाती त्यांच्या नामपटट्या द्या व दुसर्या संचातील पट्टी तशीच शोधणेस सांगा.
मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकेल
🌻वर्गातील वस्तुवर नावाच्या चिठ्या लावा. दुसरा संचातील चिठ्ठी मुलास द्या तुझ्या चिठ्ठीवर कोणते नाव लिहिले आहे शोधुन काढणेस सांगणे.सांगीतलेल्या नावाची चिठ्ठी दाखवणेस
🌻 परिचयाच्या चित्रांचा वापर करु खेळ घेणे.🌻
सलग तीन दिवस मुलांना चित्रशब्दकार्ड वाचन घ्या नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा.चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.
🌻दहा शब्द झाले की वाक्यवाचन सुरु करावे.हा आंबा(चित्र)आहे वाचन करणे.नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.
दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली.इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे.प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.
🌻अक्षरपरिचय 'क' घ्यावा  🌻
अक्षरे ध्वनींची चिन्हे आहेत समजा "क" शिकवायचा आहे तर क ऐकवा म्हणुन घ्या व क आवाजाचे शब्द विचारा ते फळ्यावर लिहा.आता ठसठशीत मोठा क दाखवुन हा क असा लिहीतात दाखवा.आता क त्यांनी सांगीतलेल्या शब्दांत कुठे आहे शोधण्यास सांगा.
गृहपाठ=वर्तमानपत्रातील क कापुन आणणे.
    अक्षरदृढीकरणासाठी हवेत अक्षर गिरवणे घ्या,जमीनीवर अक्षरे लिहुन त्यावर खडे चिंचोके मणी ठेवण्यास सांगा.कधी नुसत्याच वस्तु देवुन अक्षर बनवणेस सांगा.परिचित शब्द बनवता येतील असे अक्षरगट प्राधान्याने शिकवा ६ अक्षरे शिकुन झाली की त्यापासुन शब्द बनवणेचा खेळ घ्या.दृश्यवाचनाने परिचित शब्दांपासुन अक्षरे वेगळी करुन ती उलटसुलट क्रमाने ठेवुन शब्द बनवणे खेळ घेण
काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना कालमापन हा घटक शिकवला.उपक्रम म्हणून विद्यार्थांना घड्याळाची प्रतिकृति बनवून आणायला सांगितली होती.बऱ्याच मुलांनी बनवून ही आणली.वर्गातील घडयाळाच्या मदतीने किती वाजले? याचा सराव घेतला .त्यानंतर काही कामानिमित्त ऑफिस मधे गेलो आणि परत आल्यावर पाहतो तर काय प्रत्येक विद्यार्थी आपापल्या घड्याळातील काटे फिरवुन किती वाजले ? याचा सराव करत होती.ज्ञानरचनावादानुसार करत असलेल्या अध्ययनाचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.काही वेळा काटे तूटायचे कागदाचे नवीन काटे बनवून त्यांचा सराव (सराव म्हणण्यापेक्षा खेळच )बराच वेळ चालू होता.त्यादिवसापासून मात्र दररोज विद्यार्थी विचारायला लागली की सर घड्याळ घड्याळ खेळावं का.
🏈🏈स्वरचिन्हपरिचय🏈🏈
पाच सहा अक्षरे शिकवुन झाली की एका स्वरचिन्हाचा परिचय करुन देणे.
स्वरचिन्हे खुणा आहेत काना मात्रा वेलांटी न शिकवता आ ए ई उच्चार लक्षात रहाणे महत्वाचे आहे.कान्याला आ व मात्रेला ए म्हणावे.मुलांना येणार्या अक्षरास स्वरचिन्ह जोडुन होणारा उच्चार करणेचा सराव घेणे.अक्षरपरिचय चालु असताना टप्प्याने सर्व स्वरचिन्ह परिचय करुन द्यावा.
🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵🏵
  ⚽⚽वाक्यवाचन⚽⚽
मुले शब्द तयार करु लागली की छैट्या वाक्याची पुस्तके वाचण्यास द्यावीत.प्रत्येक पानावर चित्र व एक वाक्य सहा वाक्याचे पुस्तक बनवणे.जमतील तशी चित्रे काढावीत.मुलांचा वाचनाचा आत्मविश्वास वाढत जाईल.
♻♻जोडाक्षराचे वाचन♻♻
एकच प्रकारचे जोडाक्षर शब्द मोठ्याने वाचुन मुलांसमोर ठेवावा.कात्रीने अक्षर जोडणी कापुन दोन्हीचे उच्चार करुन दाखवावेत.जोडाक्षर बनविणे नंतर सारख्या जोडाक्षरी शब्दवाचनाचा सराव घेणे.
र चे चार प्रकार शिकवणे.
परिच्छेद आकलन
दैनंदिन कामावरील परिच्छेद वाचणे.त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहिणे.
📝📝प्रकटवाचन📝📝
योग्य ठिकाणी विराम घेणे व योग्य स्वराघातासह वाचन करणे महत्वाचे.शिक्षकांनी उतारा वाचुन दाखवावा.शिक्षकांमागोमाग एकएक वाक्य विद्यार्थी वाचतील.पुन्हा पुर्ण उतारा विद्यार्थी योग्य विराम व स्वराघातासह वाचतील.
वाचनसाहित्य भरपुर हवे.
परिच्छेदवाचन शब्दडोंगर वाचन घेणे.अधिक शब्दांचे वाक्य वाचुन आकलन होणे महत्वाचे आहे.
  रचनावादी अध्ययन व अध्यापनासाठी सध्या संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट पँटर्न गाजताेय सन २०१५ १६ प्रयाेगीक तत्वावर काही शाळा मध्ये हा प्रकल्प राबवत आहेत
               मुलांना शिक्षकांनी शिकवण्याची गरज नसुन मुल निसर्गता शिकते फक्त शिकण्यासाठी याेग्य वातावरण निर्माण करून देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असे रचनावाद सांगताे.



आगामी झालेले