मानवतावादी कार्य करणारी रेडक्रॉस संस्था !
‘रक्ताला कधीच माहिती नसतात जाती-धर्माच्या भिंती, रक्तदानाने निर्माण होतात फक्त माणुसकीची नाती!’
08 मे रोजी जगभरात वर्ल्ड रेड क्रॉस डे साजरा केला जातो. उल्लेखनीय आहे की रेडक्रॉस एक संस्था आहे, जी युद्ध दरम्यान जखमी आणि आकस्मिक अपघात आणि आपत्काल स्थितीत मदत करते. तसेच लोकांना आरोग्याप्रती जागरूक करते.
रेड क्रॉसची स्थापना जीन हेनरी डयूनेन्ट यांनी 1863 साली केली होती. त्यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 8 मे रोजी जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा करण्यात येतो. याचे मुख्यालय जिनेवा येथे आहे. जीन हेनरी डयूनेन्ट यांना मानव सेवेसाठी 1901 मध्ये पहिला नोबेल पुरस्कार (Nobel Prize) देण्यात आला होता.
💁♂ 8 मे हा दिवस दरवर्षी जागतिक रेडक्रॉस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. रेडक्रॉस या आंतरराष्ट्रीय संस्थेचे संस्थापक हेन्री ड्युनान्ट यांच्या वाढदिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.रेडक्रॉस ही एक संस्था असून मानवतावादाची पुरस्कर्ती संघटना म्हणून ती ओळखली जाते. तसेच ही संस्था राष्ट्रीयत्व, वंश, धर्म, वर्ग किंवा राजकीय मते यांच्या आधारे भेदभाव करत नाही._
🧐 *का साजरा केला जातो?*
1859 साली इटली आणि फ्रान्सने ऑस्ट्रियाविरुद्ध युद्ध पुकारले होते. या युद्धात अनेक जण जखमी झाले होते. हि परिस्थिती पाहून ड्युनान्ट यांनी स्थानिक लोकांची मदत घेऊन जखमींवर उपचार केले. त्यांनतर 1863 साली सामाजिक र्कायकर्ते एकत्र येऊन पाचजणांची समिती स्थापन केली. या समितीने आंतरराष्ट्रीय रेडक्रॉसची स्थापना केली.
🎯 *संस्थेची उद्दीष्टे?* : रेडक्रॉस ही आंतरराष्ट्रीय संस्था खालील तत्त्वानुसार काम करते-
मानवता- आंतरराष्ट्रीय आणि आंतरदेशीय क्षेत्रात रेडक्रॉस संघटना मानवी दु:खांना आळा घालण्यात आणि शक्य असेल तेवढा परिहार करण्यात प्रयत्नशील असते.
निष्पक्षपातीपणा- राष्ट्रीयत्व, वंश, धर्म, वर्ग किंवा राजकीय मते यांच्या आधारे भेदभाव करत नाही.
तटस्थपणा- युध्द काळात रेडक्रॉस कोणत्याही एका पक्षाची बाजू घेत नाही.
स्वतंत्र- रेडक्रॉस एक स्वतंत्र संघटना आहे.
ऐच्छिक सेवा- रेडक्रॉस एक ऐच्छिक दु:ख परिहार करणारी संघटना आहे.
एकता- प्रत्येक देशात एकच रेडक्रॉस संघटना असली पाहिजे या संघटनेत सर्वाना प्रवेश असला पाहिजे.
विश्वात्मकता - रेडक्रॉस ही जागतिक संघटना आहे. तिच्यामध्ये सर्व रेडक्रॉस संस्थांना समान मानले जाते आणि संघटनेची कर्तव्ये पार पाडण्याची त्यांच्यावर समान जबाबदारी आहे. 📙 *पुस्तक प्रकाशन* : युद्धामुळे सामान्य जनतेचे कसे हाल होतात? यावर पुस्तकाच्या लिखाणातून त्यांनी प्रकाश टाकला. त्यांनी ‘ सुव्हेनियर ऑफ सॉलफेरिनो ‘ हे पुस्तक फ्रेंच भाषेत लिहून काढले. हे पुस्तक युरोप खंडात प्रचंड गाजले.
👍 *विशेष*
▪ आज जगातील प्रत्येक देश या आंतरराष्ट्रीय संघटनेशी संलग्न आहेत.
▪ सन्मान म्हणून 1917 साली या आंतरराष्ट्रीय संस्थेला नोबेल पारितोषिक दिले गेले.
▪ संघटनेचे बोधचिन्ह मानवी अनुकंपेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.रेडक्रॉसचे बोधचिन्ह म्हणजे रेडक्रॉस चळवळ आणि सैनिकी, वैद्यकीय सेवा यामध्ये मुख्यत्वे सशस्त्र लढाया आणि नैसर्गिक संकटाच्यावेळी मानवतावादी कार्य करण्याच्या लोकांचे प्रतीक हो. वैद्यकीय सेवा करणाऱ्या लोकांचे ते बोधचिन्ह नाही.
💁♀ _*संघटनेचे कार्य काय ?*_
◼हेनरी ड्युनॉट हे रेडक्रॉसचे संस्थापक आहेत. 8 मे 1828 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्मदिवस हा रेडक्रॉस दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.
◼हेनरी यांचा 1910 मध्ये स्विर्त्झलँडमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे कार्य थांबले नाही तर मोठ्या गतीने आजपर्यंत चालू आहे.
◼जगातील बहुतेक सर्व देशांमध्ये मानवतावाद जोपासण्यासाठी सेवाभावी कार्य करणारे कार्य करणारी स्वयंसेवी संघटना म्हणून रेडक्रॉस संघटना परिचित आहे.
◼रेडक्रॉस या संघटनेचा मुळ उद्देश हा युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची आणि परिसरातील नागरिकांची देखभाल आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्थापन करण्यात आले.
◼रेडक्रॉस या संघटनेचे उद्देश आता व्यापक झाले आहे. आता ते मानवी हाल-अपेष्टा, कष्ट, यातना टाळणे अथवा त्यांची तीव्रता कमी करण्याचे काम करते.
◼नैसर्गिक आणि मानवनिर्मीत आपत्तींमध्ये सापडलेल्या पीडितांना मदत करणे, त्यांची सेवा करणे असे कार्य ही संघटना करत असते.
◼1917 साली रेडक्रॉस संघटना या आंतरराष्ट्रीय संस्थेला नोबेल पारितोषिक दिले आहे.
◼जागतिक पातळीसह महाराष्ट्रातही रेडक्रॉस ही संघटना कार्यरत आहे.
+ रेडक्रॉस बोधचिन्हाचा गैरवापर व कायदा --
युद्धकाळात शत्रूपक्षाचा विश्वासघात करणकरिता केलेला बोधचिन्हाचा वापर हा चिन्हाचा गैरवापर ठरू शकतो. म्हणून 1949 च्या जिनिव्हा कराराप्रमाणे सर्व संलग्न राष्ट्रांना रेडक्रॉस चिन्हांचा आदर राहील अशी व्यवस्था करण्याचे अधिकार दिले आहेत. सध्या जगातील 189 राष्ट्रे जिनिव्हा कराराशी संलग्न आहेत. 16 ऑक्टोबर 1950 ला भारताने जिनिव्हा करारास स्वीकृती दिलेली आहे व जिनिव्हा कराराशी भारत देश संलग्न झाला आहे. बोधचिन्हाच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी भारताने संमत केलेल्या कायद्यास ‘जिनिव्हा कन्व्हेक्शन्स कायदा’ असे नाव आहे. भारतीय संसदेने सदर कायदा 1960 साली संमत केला आहे. बोधचिन्हाच्या गैरवापराबद्दल 500 रुपये दंड आणि शिवाय ज्या मालावर व वाहनावर सदर बोधचिन्हाचा अनधिकृत वापर केला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
🔅 संकलनपर माहिती

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा