नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२०

ताराबाई मोडक Tarabai Modak


पद्मभूषण ताराबाई मोडक
Tarabai Modak बालशिक्षणाच्या अध्वर्यू

जन्म: १९ एप्रिल १८९२ (इंदूर, भारत)
मृत्यू: ३१ ऑगस्ट १९७३

धर्म : हिंदू
वडील : सदाशिव पांडुरंग केळकर
आई : उमाबाई सदाशिव केळकर
पती : के. व्ही. मोडक

ह्या एक मराठीभाषक आणि 'भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’ म्हणतात.

🤱🏻 जन्म आणि बालपण
ताराबाईंचा जन्म इंदूरचा आणि बालपणही तिथेच गेले. त्यांचे आई आणि वडील प्रार्थना समाजाचे अनुयायी होते.. त्यामुळे घरात प्रगत वातावरण होते. त्यांचे वडील सदाशिव पांडुरंग केळकर यांनी १९ व्या शतकात ठरवून विधवेशी पुनर्विवाह केला होता. प्रार्थना समाजाचे बळ त्यांच्या पाठीशी होते. अशा या आधुनिक वातावरणात ताराबाई वाढल्या.

💁 चरित्र
केळकर कुटुंब कालांतराने इंदूर सोडून मुंबईला स्थायिक झाले. पण ताराबाई आणि त्यांच्या बहिणीची रवानगी पुण्याच्या हुजूरपागेत झाली (इ.स. १९०२). पुनर्विवाहित आईची मुलगी म्हणून समाजाकडून त्यांना प्रसंगी हेटाळणीही सहन करावी लागली. शाळेच्या वसतिगृहात त्यांना प्रवेश नाकारला गेला. पण ताराबाईंना आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा कायमच अभिमान वाटत राहिला. शाळेत असताना त्यांनी वाचनालयाच्या ग्रंथपालांकडे भास्कराचार्यांचे ’लीलावती’ आहे का अशी विचारणा केली होती. ग्रंथालयात ते पुस्तक नव्हते, पण ग्रंथपालबाईंना त्यावेळी या मुलीचे खूप कौतुक वाटले होते.

याच दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१९०६) आणि ताराबाई पुणे सोडून मुंबईला आल्या. इथे त्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत (अलेक्झांड्रा गर्ल्स हायस्कूलमध्ये) जाऊ लागल्या. सुरुवातीला त्या शाळेत जायला ताराबाई नाराज होत्या. बूट घालण्यासारखे रिवाज त्यांना पसंत नव्हते. पण लवकरच त्या शाळेत रुळल्या आणि पाश्चात्य समाजाच्या संपर्कात आल्या. वातावरणातला हा बदल ताराबाईंना खूप शिकवून गेला. पण लवकरच त्यांच्या आईदेखील वारल्या (१९०८). आई आणि वडील या दोघांचाही आधार आता तुटला होता. आर्थिक चणचण दिवसेंदिवस वाढत होती. १९०९ साली ताराबाई मॅट्रिक झाल्या.
ताराबाई मोडक या प्रथम मुंबईच्या एल्फिम्स्टन कॉलेजात आणि नंतर विल्सन कॉलेजात शिकू लागल्या. १९१४साली फिलॉसॉफी घेऊन बी.ए. झाल्या. १९१६ साली त्या एम.ए.च्या परीक्षेला बसल्या, पण तीत पास होऊ शकल्या नाहीत.
प्रार्थना समाजामुळे प्रगत विचार आणि जीवनमान ताराबाईंच्या अंगवळणी पडले होते. त्यांच्या या अभिरुचिसंपन्न जीवनशैलीनेच त्यांना प्रतिकूल परिस्थितीत जगण्याचे बळ दिले. एकीकडे शिस्तबद्ध अध्ययन चालू असतानाच त्यांनी विविध छंद जोपासले. टेनिस, बॅडमिंटन तर त्या उत्तम खेळतच पण विविध विषयांवर वैचारिक देवाणघेवाण करण्यात त्यांना विशेष रस होता.
कॉलेजमध्ये असतानाच त्यांचा परिचय के.व्ही. मोडक यांच्याशी झाला. के.व्ही. हे एल्‍फिन्स्टन कॉलेजचे माजी प्राचार्य वामन मोडक यांचे चिरंजीव. मोडक कुटुंबही प्रार्थना समाजाशी बांधिलकी ठेवून होते. ताराबाई आणि के.व्ही. यांच्या ओळखीचे रूपांतर लवकरच प्रेमात झाले आणि पदवीधर झाल्यावर एका वर्षातच त्या के. व्ही. मोडकांशी विवाहबद्ध झाल्या. के.व्ही. त्या वेळी अमरावती मुक्कामी होते आणि तिथे एक निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध होते. इ.स. १९१५ साली ताराबाई लग्न करून अमरावतीला आल्या, तेव्हा त्या तिथल्या पहिल्या स्त्री पदवीधर होत्या. के.व्ही. आणि ताराबाई यांचा संसार हा दोन आधुनिक, बुद्धिमान आणि प्रतिभावंतांचा संसार होता. अमरावतीच्या सामाजिक क्षेत्रात दोघांचाही दबदबा होता. सभा, संमेलनांतून उठबस होती. साहित्य, संगीत, नाटके, पाहुण्यांची सरबराई यात दिवस जात होते. याच दरम्यान त्यांच्या आयुष्याने एक वेगळीच कलाटणी घेतली.
१९१५ साली अमरावतीला मुलींसाठी सरकारी हायस्कूल सुरू झाले. तेथे १९१८ पर्यंत ताराबाईंनी नोकरी केली. १९२० मध्ये त्यांना मुलगी झाली.
पुढे काही कारणांनी त्यांचा संसार अपयशी ठरला, त्यांनी विभक्त होण्याचा आणि अमरावती सोडण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना मनाचा आत्यंतिक खंबीरपणा त्यांनी दाखवला. ज्या काळात नवऱ्याचे घर सोडणाऱ्या स्त्रीला फक्त परित्यक्ता असेच संबोधले जायचे, त्या काळात ताराबईंनी स्वतंत्र संसार थाटला. सोबत एक वर्षाची कन्या-प्रभा-होती आणि पुढचे भविष्य अंधकारमय होते.
पण ताराबाईंना स्वावलंबी होण्यासाठीची संधी लवकरच चालून आली (१९२१). राजकोटच्या बार्टन फीमेल ट्रेनिंग कॉलेजमध्ये त्यांना प्राचार्यपदासाठी बोलावणे आले. राजकोटची ही नोकरी उत्तम होती आणि त्यांच्यासाठी एक आव्हान होती. एकतर मुलुख गुजराती होता. त्यामुळे आधी शिकवणी लावून गुजराती शिकावी लागली. प्राचार्यपदाच्या कामात व्यवस्थापनाचा मोठा वाटा होता. त्यासाठी त्यांनी बडोदा, अहमदाबाद येथील ट्रेनिंग कॉलेजना भेट देऊन व्यवस्थापनाचे तंत्रही आत्मसात केले. ताराबाईंनी ही नोकरी जेमतेम दोन वर्षे केली. या वेळी त्यांची नोकरी सोडायला कारण होती त्यांची मुलगी प्रभा! तिच्या त्यांच्या मुलीच्या, प्रभाच्या भविष्याच्या चिंतेखातर, तिची कुचंबणा लक्षात घेऊन ताराबाईंनी राजकोटची नोकरी सोडली. कॉलेजात नोकरीत असताना ताराबाईंनी मानसशास्‍त्रावरील खूप पुस्तके वाचली.
याच काळात त्यांनी गिजुभाई बधेका यांच्या भावनगर येथील शिक्षणप्रयोगांविषयी वाचले आणि त्या सौराष्ट्रातील भावनगरला येऊन दाखल झाल्या. गिजुभाई भावनगरमधील ‘दक्षिणामूर्ती’ या संस्थेत मॉन्टेसरी शिक्षणपद्धती नुसार बालशिक्षणात प्रयोग करत होते. त्यांनाही त्यांच्या या कार्यात सहकारी हवाच होता आणि ताराबाईंच्या रूपाने तो मिळाला. ताराबाई स्वत: उच्चशिक्षित, शिकवण्याची कला आणि आवड असलेल्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे एखादी गोष्ट स्वीकारली की, तडीस नेण्यासाठी झोकून देणाऱ्या होत्या.
गिजुभाई आणि ताराबाईंची भेट ऐतिहासिक होती. भारतातल्या बालशिक्षणाची ती नांदी होती. दोघांनी मिळून बालशिक्षणाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. ज्या काळात खुद्द शिक्षणालाच फारसे महत्त्व नव्हते आणि प्राथमिक शिक्षण ६ व्या वर्षापासून सुरू होत होते, त्या काळात बालशिक्षणाचे महत्त्व लोकांना पटवून देणे हा ‘वेडेपणा’ होता. समाजाची ही मानसिकता ताराबाई ओळखून होत्या. त्यामुळे लोकांपर्यंत जायचे तर आपल्या म्हणण्याला शास्त्रीय बैठक असायला हवी हे त्या जाणून होत्या. म्हणूनच ताराबाई आणि गिजुभाईंनी शास्त्राचा आधार असणाऱ्या मॉन्टेसरी शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून त्यांना भारतीय रूप देण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांच्या या प्रयत्नाकडे निव्वळ ‘फॅड’ म्हणून बघणाऱ्यांची संख्या कमी नव्हती. आज बालशिक्षण एक शास्त्र म्हणून उदयाला आले आहे. पण त्याचे बीजारोपण करण्याचे काम गिजुभाईंबरोबर ताराबाईंनी केले. गिजुभाईंना त्यामुळेच ताराबाई गुरुस्थानी मानत आल्या. त्यांच्याकडूनच त्यांनी बालशिक्षणाची संथा घेतली. त्यांच्या प्रत्येक प्रयोगात मनापासून सामील झाल्या.
भावनगरमधील वास्तव्याने त्यांच्यातील लेखिकेलाही आकार दिला. १९२६ साली नूतन बालशिक्षण संघाची (मॉन्टेसरी संघाची) स्थापना झाली आणि त्याच्यातर्फे ‘शिक्षणपत्रिका’ हे मासिक प्रकाशित होऊ लागले. या नियतकालिकाचे संपादन ताराबाईंनी केले. या मासिकाची हिंदी आणि मराठी आवृत्ती ताराबाईंच्या बळावरच उभी राहिली. इथे असतानाच ताराबाईंनी शंभरच्यावर पुस्तकांचे संपादन केले, काहींचे लेखन केले, बालशिक्षणाच्या प्रसारासाठी मॉन्टेसरी संमेलने भरवली आणि बालशिक्षण हे त्यांचे कार्यक्षेत्रच बनून गेले. ताराबाई भावनगर विषयी म्हणतात, ‘तेथेच मला माझे गुरू, जीवनदिशा आणि जीवनकार्य गवसले’.
ताराबाई भावनगरला ९ वर्षे होत्या. या काळात त्यांनी फक्त मॉन्टेसोरींच्या तत्त्वांचा अभ्यासच केवळ केला असे नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय संदर्भानुसार त्यांत बरेच बदल केले. आपल्याकडे शिक्षणाला पावित्र्याची किनार आहे. याचा विचार करून बालघरांचे रूपांतर बालमंदिरांत केले. बालशिक्षणात भारतीय नृत्यप्रकार, कलाप्रकार, लोकगीते आणि अभिजात संगीत यांचाही समावेश केला. माँटेसोरी तत्त्व बालकांच्या विकासाबरोबरच त्यांच्या स्वातंत्र्याला प्राधान्य देते. ताराबाई प्रयोग करत असलेला काळ गांधीयुगाचा म्हणजे पर्यायाने स्वातंत्र्ययुद्धाचा होता. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याला, बालस्वातंत्र्याला विशेष अर्थ होता. ताराबाईंनी या सर्व विचारांचा, संकल्पनांचा मेळ आपल्या बालशिक्षणात साधला.
बालशिक्षणात प्रयोग आणि त्याचा प्रसार करत असतानाच ताराबाईंनी शिक्षकांचे प्रशिक्षण हाती घेतले. त्यापाठोपाठ बालशिक्षण तळागाळापर्यंत जाण्यासाठी पालक आणि शासन यांच्या प्रबोधनाचे कामही केले. इतके सगळे करूनही त्यांना आता ध्यास लागला होता तो खेड्यातील बालशिक्षणाचा!
खेड्यांमध्ये बालशिक्षणाचा प्रसार करायचा असेल, तर त्यासाठी स्वस्त साधने हवीत, शिवाय स्थानिक पातळीवरही सहज उपलब्ध होतील किंवा बनवून घेता येतील अशीही हवीत. गिजुभाईंनी जेव्हा बालशिक्षण आजूबाजूच्या खेड्यातून नेण्याचा विचार केला, तेव्हा अशी साधने बनवण्याची जबाबदारी ताराबाईंवर सोपवली. हेच खेड्यातील बालशिक्षणाचे धडे ताराबाईंना पुढे कोसबाडला उपयोगी पडले.

🏢 शाळा
पुढील काळात मुंबईला आल्यावर त्यांनी दादरला आपल्या कल्पनांवर आधारित असे शिशुविहार सुरू केले. इथे येऊन त्यांना आपल्या बालशिक्षणाचा पुन्हा श्रीगणेशा करावा लागला. कारण तोपर्यंत बालशिक्षण आणि ताराबाई दोन्हीही महाराष्ट्राला नवखे होते. शिशुविहारची स्थापना त्यांनी इ.स. १९३६ मध्ये केली आणि जसजशा या बालशाळा वाढत जातील, तसतसा त्यांना आवश्यक असणारा प्रशिक्षित शिक्षकवर्गही लागणार या विचाराने शिशुविहारमध्येच त्यांनी बाल अध्यापक विद्यालयाची मंदिराची स्थापना केली. शिशुविहार आणि बालअध्यापक विद्यालय यांचे पुढच्या दहा वर्षांचे नियोजनही त्यांनी व्यवस्थित करून ठेवले. पुढे पुन्हा खेड्यात जाऊन पूर्णवेळ बालशिक्षणाला वाहून घेण्याची भावना मूळ धरू लागली. त्यासाठी त्या ठाणे जिल्ह्यातील बोर्डीला वास्तव्यास आल्या. या वेळी त्यांच्याबरोबर त्यांच्या शिष्या अनुताई वाघ होत्या. बोर्डीला आल्या तेव्हा ताराबाईंच्या आयुष्याची मध्यान्ह केव्हाच उलटून गेली होती आणि बालशिक्षणातही त्या मुरल्या होत्या. अनुताईंची मात्र ही सुरुवात होती.
इ.स. १९४५ मध्ये बोर्डीला आल्यावर ताराबाईंनी आपले पूर्ण लक्ष बालशिक्षणावर एकवटले. आता त्यांना त्यांच्या प्रयोगांना ग्रामीण संदर्भांचे परिमाणही द्यायचे होते. कालांतराने कोसबाडला आल्यावर त्यांच्या प्रयोगांना आदिवासींच्या संदर्भांचे परिमाणही मिळाले आणि साऱ्या देशात एकमेव ठरावी अशी सर्वव्यापी बालशिक्षणाची पद्धत अस्तित्वात आली. बोर्डी आणि कोसबाड इथल्या आपल्या अठ्ठावीस वर्षांच्या वास्तव्यात ताराबाईंच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या शिक्षणाचा डोलारा कसा उभा राहिला हा इतिहास ग्रंथबद्ध आहे. गिजुभाईंना जशा त्यांच्या आदर्श सहकारी म्हणून ताराबाई मिळाल्या तशाच ताराबाईंना गुरुस्थानी मानून त्यांच्या प्रत्येक प्रयोगात सर्वस्व ओतून काम करणाऱ्या अनुताई मिळाल्या. या दोघींनी हरिजन वाड्यापासून सुरू केलेला प्रवास कुरणशाळा, घंटाशाळा, अंगणवाडी असा होत शेवटी आदिवासी समाजात शिक्षण प्रसार आणि रोजगारनिर्मिती करण्यापर्यंत झाला.

🏅 पुरस्कार
ताराबाईंचे हे योगदान केंद्र सरकारच्या नजरेतूनही सुटले नाही आणि त्यांनी ताराबाईंना इ.स. १९६२ साली ‘पद्मभूषण’ हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल केला
शिक्षणतज्ज्ञ या नात्याने ताराबाईंनी अनेक पदे भूषवली. त्यांना अनेक मान-सन्मान मिळाले. गिजुभाईंच्या निधनानंतर इ.स. १९३९ पासून नूतन बालशिक्षण संघाची धुरा त्यांच्याचकडे होती. इ.स. १९४६ ते इ.स. १९५१ अशी पाच वर्षे त्या तत्कालीन मुंबई राज्याच्या विधानसभा सदस्या होत्या. याच राज्यात प्राथमिक शाळा पाठ्यपुस्तक समितीवर त्यांनी अनेक वर्षं काम केले. अखिल भारतीय बालशिक्षण विभागाच्या त्या दोन वेळा अध्यक्षा होत्या. इतर अनेक राज्ये आणि केंद्र सरकारच्या शिक्षण समितीवर त्यांची नेमणूक झाली होती. महात्मा गांधींनी आपल्या बुनियादी शिक्षण पद्धतीचा आराखडा तयार करण्याचे काम त्यांच्याकडे सोपवले होते. १९४९ मध्ये इटलीतील आंतरराष्ट्रीय दादरला परिषदेत भाषण करण्याची संधी त्यांना मिळाली होती.

⏳ निधन
ताराबाईंच्या आयुष्याची चित्तरकथा जितकी विलक्षण आहे, तितकीच ती त्यांच्याविषयीचा आदर दुणावणारी आहे. पावलोपावली भिडणारी प्रतिकूल परिस्थिती त्यांनी संकट म्हणून न स्वीकारता संधी म्हणून स्वीकारली आणि निव्वळ मार्गच काढला नाही, तर त्यातून सुंदर संकल्पना घडवल्या. वैयक्तिक होरपळीचे प्रतिबिंब ना कधी त्यांच्या स्वभावावर, ना व्यक्तिमत्त्वावर आणि ना कधी त्यांच्या कार्यावर पडले.
ताराबाईंची कर्मभूमी ठाणे जिल्ह्यातली असली, तरी त्यांच्या कार्याने फक्त तेवढ्याच भागाला फायदा झाला नाही, तर त्यांचे कार्य खेड्यातील आणि आदिवासी भागातील बालशिक्षण तंत्राचे एक देशव्यापी ‘मॉडेल’ बनले. पद्मभूषण ताराबाई मोडक यांचे ऑगस्ट ३१ इ.स. १९७३ ला मुंबईत निधन झाले.

🏩 दादरचे शिशुविहार
इ.स. १९३६ मध्ये पद्मभूषण ताराबाई मोडक यांनी मुंबईत दादरला शिशुविहार ही संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातील हे पहिले आदर्श बालमंदिर! आज या संस्थेत मराठी व गुजराती या दोन माध्यमांमधून अध्यापक विद्यालय, अभिनव प्राथमिक (विभाग) शाळा, माध्यमिक विद्यामंदिर, सरलाताई देवधर पूर्व प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण केंद्र असे विभाग चालतात.
' बालदेवो भव ' हे शाळेच ब्रीदवाक्यच आहे. प्रवेशाच्या वेळेस मुलांची मुलाखत घेतली जात नाही. मुले शाळेत रुळेपर्यंत, शाळेचा व शिक्षकांचा परिचय होईपर्यंत पालकांना आठवडाभर मुलांबरोबर बसण्यास मुभा देण्यात येते. मुलांना डबा, पाटीदप्तर, वॉटर बॅग यांचे ओझे आणावे लागत नाही.
शाळेच्या इमारतीची रचनाही मुलांचा विचार करूनच केली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला मोकळेपणाने फिरता येईल असे मोठे वर्ग आहेत. प्रत्येक वर्गात ३० मुलांसाठी एक प्रशिक्षित, प्रेमळ व मुलांचे मन जाणणारी शिक्षिका आहे. त्यामुळे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देता येते. आनंदायी वातावरणात खेळाद्वारे मुले येथे हसत खेळत शिक्षण घेत असतात. त्यांना शाळेचीही गोडी वाटू लागते. ती चटकन् रमतात.
शरीर तंदुरुस्त तर मन तंदुरस्त हे लक्षात घेऊन मुलांची शारीरिक वाढ योग्य संतुलित होण्यासाठी वातावरणात मुलांच्या वयानुसार योग्य उंचीची झोपाळा, घसरगुंडी, जंगलजीम, डबलबार, सीसॉ इत्यादी साधने आहेत. मुलांना रोज निराळा सकस पौष्टिक आहार दिला जातो.
लहान मुलांचा आवडीचा खेळ म्हणजे भातुकली. मुलांच्या भावनिक विकासात त्याचे असलेले महत्त्व लक्षात घेऊन बाहुलीघराची योजना आहे. त्यासाठी मुलांच्या उंचीचेच खास कपाट बनवले आहे. वाळूच्या हौदात खेळताना लाडू, डोंगर, बोगदा, किल्ला करतात. येथे वाळू स्वच्छ राहील याची काळजी घेतली जाते.
मुले अनुकरणप्रिय असतात. त्यांना भाजी चिरणे, किसणे, निवडणे, कुटणे, पीठ चाळणे, दळणे अशी कामे करायला हवी असतात. त्यांच्या वयाचा व शारीरिक कुवतीचा विचार करून लहानसे जाते, खलबत्ता, चाळणी, कमी धारेची सुरी असे देऊन ती कामे करायला देता येतात. आजपर्यंत एकाही मुलाला अशी कामे करताना इजा झालेली नाही. या साधनांवर खेळत असताना स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप शिकवता येते. मुले स्वावलंबी व्हावी म्हणून नाडी घालणे, बटणे लावणे, वेणीघालणे, पावडर लावणे इ. व्यवसाय दिले जातात.
कोणतेही ज्ञान ग्रहण करायचे तर त्यासाठी ज्ञानेंदियांचा विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी रंग, वास, चव, आकार, स्पर्श, आवाज या संवेदनांसाठी निरनिराळी साधने आहेत. कै. ताराबाई मोडक व शिक्षणतज्ज्ञ कै. शेष नामले यांनी मॅडम मॉन्टेसरीच्या साधनांवर आधारित भारतातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीला अनुसरून साधनांची निर्मिती केली. प्रत्यक्ष फळे, फुले, धान्य, कागद, कापड, विविध रंगांच्या बाटल्या, खोकी इत्यादींचा उपयोग करून रंग, आकार, वास, चव यासाठी वेळोवेळी नावीन्यपूर्ण साधने बनवून आजचे शिक्षकही त्यात भर घालीत आहेत. बालमंदिरातल्या विविध साधनांवरील खेळांमधून बालकांचा बौद्धिक विकास योजनापूर्वक विकसित केला जातो.
आजच्या आधुनिक काळाशी सुसंगत अशी साधने देऊन मुलांच्या जिज्ञासावृत्तीला खतपाणी घातले जाते. भिंगातून किड्याचे निरीक्षण करणे, लोहचुंबक विविध वस्तूंना लावून पहाणे, साबणाचे फुगे उडवणे इ. खेळून प्रत्यक्ष अनुभव घेतात. वर्गात कोणत्या साधनांवर खेळायचे याचे मुलांना स्वातंत्र्य असते. जोडीदाराबरोबर सहकाराने खेळणे, इतर मुले खेळत असताना पहाणे इ. क्रिया करताना मुलांमध्ये स्वयंशिस्त येते, संयमाची जाणीव येते व सामाजिकतेची जबाबदारी समजते.
मुलांना श्रवण, भाषण-संभाषण ही कौशल्ये येण्यासाठी आमच्या शिशू विहारमध्ये रोजच बडबडगीते, बालगीते, समरगीते, भजन इ. गाण्याचे प्रकार ऐकवले जातात. मनोरंजन व भावनिक विकासाबरोबरच मानसिक आरोग्य तंदुरुस्त रहाण्यासाठी याची नितांत आवश्यकता आहे. अनौपचारिक गप्पा, सण व भोवती घडणार्‍या घटनांवर गप्पागोष्टी करणे, सहल, नाट्य, बाहुलीनाट्य असे अपक्रम घेतले जातात. गप्पा मारणे हे तर मुलांच्या आवडीचेच. त्यातूनच आपले विचार योग्य शब्दात मांडणे , सुसंगत बोलणे मुले शिकतात.
मुलांबरोबर गप्पागोष्टी करणे ही बालशिक्षणाने प्राथमिक शिक्षणाला दिलेली देणगी आहे. प्राथमिक शिक्षणातील परिपाठात याचा उपयोग करून घेतला जातो. प्राणी, पक्षी, वाहने, फळे, फुले, भाज्या, वनस्पतींचे अवयव, फळांचे भाग, ब्रश, पूजेचे सामान, वाद्ये इ.चा परिचय-पाठ देताना प्रत्येक वस्तु दाखवून ओळख दिल्यामुळे ते ज्ञान कायम टिकते. तसेच शब्दांचे अर्थ समजतात, शब्दसंग्रह वाढतो. वर्णन करून गोष्ट सांगणे, चित्रांच्या मदतीने गोष्ट सांगणे, चित्रावरून गोष्ट तयार करणे असे विविध उपक्रम घेतले जातात. पाच वर्षांची मुले चित्रावरून गोष्ट तयार करू शकतात. मुलांना व्याकरणशुद्ध बोलता यावे म्हणून व्याकरणावरील मौखिक खेळ घेतले जातात. एकवचन-अनेकवचन, विशेषण, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय वगैरे मौखिक खेळ खेळाच्या स्वरूपात घेतले जातात. या खेळांसाठी मुलांच्या दैनंदिन परिचयाच्या वस्तूंचा उपयोग केला जातो.
अक्षरओळख देण्यापूर्वी चित्र किंवा वस्तूमधील साम्य ओळखणे, भेद ओळखणे, काय कमी आहे, काय चूक आहे यासारखे खेळ दिले जातात. त्यामुळे अक्षरे शिकताना अक्षरांमधील सूक्ष्म फरक मुले ओळखतात. अक्षरे शिकता शिकता ती केव्हा वाचायला लागतात हे कळतही नाही. लेखनासाठी बोटाच्या स्नायूंचा विकास व्हावा म्हणून मातीकाम, चित्र रंगवणे, ठसेकाम, चित्रे काढणे इ. खेळ दिले जातात. वाचनासाठी, लेखनासाठी आवश्यक पूर्वतयारी झाली, तर लिहायला वाचायला फारसा वेळ लागत नाही. त्यासाठीची पूर्वतयारीच तर बालमंदिरात या प्रत्येक खेळातून, व्यवहारातून व उपक्रमातून केली जाते.
भारतीय संस्कृती जपण्यासाठी सर्वधर्मसमभावाने मुलांच्या सहभागाने निरनिराळे सण साजरे केले जातात. मुलांमध्ये राष्ट्रीय भावना जोपासणे फार महत्त्वाचे! त्यासाठी राष्ट्रीय सण, उत्सव, पुढाऱ्यांचे स्मृतिदिन, राष्ट्रध्वजाचे महत्त्व इत्यादी उपक्रम घेतले जातात.
दिवाळीपूर्वी मुलांकडून भेटकार्ड तयार करून घेऊन पोस्टऑफिस हे ठिकाण प्रसारासाठी निवडले जाते. प्रत्येकाला आपले कार्ड पोस्टात टाकण्यास मिळते. त्याच वेळेस पोस्टाचाही परिचय दिला जातो. तिथे चाललेली कामे दाखवली जातात. तसेच पेट्रोल पंप, भाजी बाजार, धोबी, इस्त्रीवाला वगैरे ठिकाणी प्रत्यक्ष मुलांना नेऊन ती कामे दाखवली जातात. वर्षअखेरीस साडेचार वर्षांवरील मुलांचे एक दिवसीय निवासी शिबीर घेतले जाते. आकाशदर्शन, शेकोटी, शेकोटीची प्रतिज्ञा, त्याच्याभोवती फेर धरून गाणी म्हणणे, दुसऱ्या दिवशी सकाळी सहल अशी कार्यक्रमांची आखणी केली जाते.
या शिबिरात संघवृत्ती, खिलाडूवृत्ती, स्वयंशिस्त, स्वावलंबन, जबाबदारीची जाणीव आदि गुणांचा विकास होतो. शारीरिक स्वच्छता, परिसर स्वच्छता यासंबंधीचे प्रात्यक्षिक मुलांना पहायला मिळते. एका वर्षीच्या सहलीत मुलांना गवतावर पडलेले दव पहायला मिळाले. दवाचा आकार, ओलावा, त्याची चमचम असा चित्तथरारक अनुभव मुलांनी घेतला. मित्रांच्या सहवासात अधिक काळ राहायला मिळाल्यामुळे मुले खुश असतात.
शिशुविहार म्हणजे एक घर आहे. येथे शिक्षक, शिपाई व मुले यांच्यात प्रेमाचे, आपुलकीचे नाते निर्माण झालेले असते. एकदा एक मुलगा रडत असताना त्याने शांत राहावे म्हणून 'तू सारखा रडत असल्याने माझा कान दुखतो,' असे ताईंनी सांगितले. त्यांच्या अवतीभोवती असणाऱ्या एका विद्याथिर्नीने ते ऐकले. दुसऱ्या दिवशी शाळेला निघताना तिने आईजवळ तेलाची बाटली दे, असा हट्ट धरला. आईलाही काही कळेना. मुलीच्या आग्रहाखातर त्या तेलाची बाटली घेऊन आल्या.
शिशुविहारामध्ये दोन नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. मुलांना लहानपणापासून बचतीची सवय लागावी , यासाठी शिशु-बँकेची योजना आहे. ही ऐच्छिक असते. मुलांचे बचत खाते असते. त्यांना पासबुक दिले जाते. मुले आपल्याला मिळणारे बक्षिसाचे पैसे, खाऊचे पैसे त्यात जमा करतात. मुलांनी जमा केलेल्या पैशांवर रीतसर व्याज दिले जाते. हे खाते केव्हाही बंद करण्याची मुभा मुलांना असते. पण जी मुले १० वीपर्यंत यात पैसे साठवतात, त्यांना शाळा सोडून जाताना कॉलेजला जाण्यासाठी आवश्यक असलेल्या फीसाठी एकरकमी हे पैसे मिळू शकतात. कित्येक मुलांनी आजपर्यंत या आमच्या सोयीचा फायदा करून घेतला आहे.
दुसरा उपक्रम म्हणजे पालकांसाठी. या बालमंदिरात तळागाळातील मुलेही प्रवेश घेतात. त्यातल्या कित्येक मुलांचे पालक निरक्षर असतात. त्यांच्यासाठी बालमंदिरातील शिक्षकांनी साक्षरतेचा वर्ग सुरू करून आपली पालकांची आणि समाजाची असलेली बांधिलकी सिद्ध केली आहे.

📝 लेखन

नदीची गोष्ट
बालकांचा हट्ट
बालविकास व शिस्त
बिचारी बालके
सवाई विक्रम

🎯 चरित्र

सौ. ललितकला शुक्ल यांनी ताराबाई मोडक यांचे चरित्र लिहिले आहे; ते ललितकला प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे.

🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🙏🌷

स्त्रोतपर माहिती

शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

मेजर ध्यानचंद (राष्ट्रीय क्रीडा दिन)


29 ऑगस्ट रोजी हॉकी महान खेळाडू मेजर ध्यानचंद येथे राष्ट्रीय क्रीडा दिन वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जातो. कोण मेजर ध्यानचंद 'जागतिक स्तरावर' प्रसिद्ध भारतीय महान आणि कल्पित हॉकी खेळाडू हॉकी विझार्ड नाव ' भारत येथे ऑलिम्पिक सुवर्ण पदक प्राप्त केले, त्यांचा जन्मदिवस 29 ऑगस्ट प्रत्येक त्यांना गुलाम म्हणून काम करायला वर्षी भारतात हा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

ध्यानचंद यांचा जन्म अलहाबाद येथे २९ ऑगस्ट १९०५ साली राजपुत घराण्यात झाला. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूप सिंग यानेही आपल्या ध्यानचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली.

मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यान सिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता. ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती.

त्याच दिवशी, थकबाकी काम त्यांच्या विशेष योगदान राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार गौरविण्यात अध्यक्ष च्या भारत खेळ येथे राष्ट्रपती भवन , यासह राजीव गांधी खेलरत्न , ध्यानचंद पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार, याशिवाय अर्जुन पुरस्कार प्रमुख आहेत. याप्रसंगी, खेळाडूंनी कौशल्य विकसित केलेल्या प्रशिक्षकांनाही गौरविण्यात आले. या व्यतिरिक्त जवळपास सर्व भारतीय शाळा आणि शैक्षणिक संस्था त्यांच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त त्यांचा वार्षिक क्रीडा महोत्सव आयोजित करतात. हा दिवस पंजाब आणि चंदीगडमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

ध्यानचंद पुरस्कार, अधिकृतपणे क्रीडा व खेळांमधील ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार हा खेळ जगतातील आजीवन कर्तृत्वासाठीचा भारतीय सरकार तर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. १९२६ ते १९४८ या काळातील २० वर्षांपेक्षा जास्त कारकीर्दीत १००० पेक्षा अधिक गोल नोंदविणार्‍या भारतीय हॉकीपटू ध्यानचंद (१९०५-७९) यांच्या नावावर हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा दरवर्षी क्रीडा व युवा मंत्रालयाद्वारे सादर केला जातो.

पहिला पुरस्कार हा २००२ साली देण्यात आला होता. ह्या पहिल्या पुरस्काराचे मानकरी होते शाहूराज बिराजदार (बॉक्सिंग), अशोक दिवाण (हॉकी) आणि अपर्णा घोष (बास्केटबॉल). दरवर्षी हा पुरस्कार ३ ते ५ खेळाडूंना देण्यात आला आहे.

जर्मनीचा हुकमशहा हिलटरलाही ध्यानचंद यांच्या खेळाची भुरळ पडली होती. हिटलरने ध्यानचंद यांच्यासमोर जर्मनीचे नागरिकत्व आणि सैन्यातील सर्वोच्च पदवी देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, ध्यानचंद यांनी तो फेटाळून लावला होता.
हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.


29 August ऑगस्ट/वाढदिवस/क्रीडा दिवस
16 व्या वर्षी ध्यानचंद यांना सैन्यात भरती केले.
तेथे तो कुस्तीमध्ये खूप रस घेत असे;
पण सुभेदार मेजर बढे तिवारी यांनी त्यांना हॉकीसाठी प्रेरित केले.
यानंतर तो आणि हॉकी एकमेकांचे समानार्थी बनले.
 काही दिवसांनीच त्याच्या रेजिमेंटच्या संघात त्याची निवड झाली.
ध्यानचंद त्यांच्या रेजिमेंटच्या संघात चार वर्षे राहिले.
 1926 मध्ये त्यांची लष्कर इलेव्हन आणि नंतर राष्ट्रीय संघात निवड झाली.
त्याच वर्षी भारतीय संघाने न्यूझीलंडचा दौरा केला.
 या दौऱ्यात संपूर्ण जगाने त्याची अद्भुत प्रतिभा पाहिली.
चेंडू त्याच्याकडे आल्यानंतर तो पुन्हा इतर कोणत्याही खेळाडूकडे जाऊ शकला नाही.
अनेक वेळा त्याची हॉकी तपासली गेली, की त्यात गोंद नाही.
अनेक वेळा त्याच्या हॉकी खेळाच्या मध्यभागी बदलली गेली;
पण तो व्यवहारात श्रीमंत होता.
तो त्याच कौशल्याने रिव्हर्स हॉकीने खेळायचा.
म्हणूनच लोक त्याला 'हॉकीचा जादूगार' म्हणत असत.
 भारताने 1928 च्या ॲम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये प्रथम भाग घेतला.
ध्यानचंद देखील या संघात होता.
पूर्वी फक्त इंग्लंड हॉकीचे सुवर्ण जिंकत असे;
 पण यावेळी त्याने भारताकडून हरण्याच्या भीतीमुळे हॉकी स्पर्धेत भाग घेतला नाही. भारताने यात सुवर्णपदक जिंकले.
1936 च्या बर्लिन ऑलिम्पिक दरम्यान त्याला भारतीय संघाचे कर्णधार बनवण्यात आले. यातही भारताने सुवर्ण जिंकले.
यानंतर, भारतीय संघाने 1948 च्या ऑलिम्पिकमध्ये एकूण 29 गोल केले. यातील 15 फक्त ध्यानचंदचे होते.
या तीन ऑलिम्पिकमध्ये त्याने 12 सामन्यांमध्ये 38 गोल केले.

 बर्लिन ऑलिम्पिकच्या तयारीच्या सामन्यांमध्ये जर्मनीने भारताचा ४-१ असा पराभव केला.
अंतिम फेरीच्या वेळी दोन्ही संघ पुन्हा भिडले.
पहिल्या भागात दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत होते.
मध्यंतरी तिरंगा ध्वज दाखवून ध्यानचंदने सर्व खेळाडूंना प्रेरणा दिली.
 यामुळे सर्वांचा उत्साह भरला आणि त्याने घाईघाईत सात गोल केले.
अशा प्रकारे भारत 8-1 ने जिंकला.
तो दिवस होता 15 ऑगस्ट.
* * कोणाला माहित होते की या दिवशी 11 वर्षानंतर भारतीय तिरंगा संपूर्ण अभिमानाने देशभरात फडकवला जाईल.
1926 ते 1948 पर्यंत, ध्यानचंद जगात कुठेही हॉकी खेळायला गेले होते, प्रेक्षक त्याच्या मनगटांचा चमत्कार पाहण्यासाठी गर्दी करत असत.
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना येथील स्टेडियममध्ये त्यांचा पुतळा बसवण्यात आला.
ते वयाच्या 42 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्त झाले.
काही काळ ते राष्ट्रीय क्रीडा संस्थेत हॉकी प्रशिक्षकही होते.

भारताच्या या महान सुपुत्राला सरकारने 1956 मध्ये 'पद्मभूषण' देऊन सन्मानित केले.
3 डिसेंबर 1979 रोजी त्यांचे निधन झाले. 
 त्यांचा वाढदिवस  29 August ऑगस्ट हा भारतात 'क्रीडा दिवस' म्हणून साजरा केला जातो.

गुरुवार, २७ ऑगस्ट, २०२०

दत्तात्रय (दादासाहेब) शंकर पोतनीस


दत्तात्रय (दादासाहेब) शंकर पोतनीस

*जन्म : 22 नोव्हेंबर 1909*  (वाई, सातारा)

     *मृत्यू : 27 आॕगष्ट 1998*

केवळ नाशिकच नव्हे, तर महाराष्ट्रातही दादासाहेब पोतनीस एक अत्यंत आदरणीय आणि नामांकित व्यक्ती होते. त्यांच्या बायोडाटावरून स्पष्ट होते की त्यांनी मानवी जीवनातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात ठसा उमटविला होता. महात्मा गांधीजी आणि तत्त्वज्ञानावर कट्टर विश्वास असलेले त्यांनी आपले जीवन समाजाच्या उन्नतीसाठी वाहिले आहे. जर्नलिझममधील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि आर्थिक आणि सामाजिक जीवनाच्या सर्वांगीण विकासामध्येही असेच आहे. शाळा, बँक, सहकारी बँक, सहकारी साखर कारखाना आणि ग्राहक समाज यांना प्रोत्साहन देण्यासाठी ते अग्रेसर आहेत. त्याला क्वचितच आढळले पुण्य म्हणजे अलिप्तता. एकदा जेव्हा त्यांना कळले की आस्थापने स्वतःची काळजी घेण्यास सक्षम आहेत, तेव्हा त्याने स्वत: ला त्यांच्यापासून दूर ठेवले आणि त्याने मोठे आव्हान स्वीकारले. 22 नोव्हेंबर 1909 रोजी वाई (जि. सातारा) येथे जन्म, त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात आणि पुण्याच्या एसपी महाविद्यालयात मॅट्रिक नंतर झाले. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात त्यांचा सामाजिक कार्याकडे कल होता. ते दिवस ब्रिटीशांच्या राजवटी विरुद्ध राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीचे दिवस होते. बीए वर्गात शिकत असताना त्यांनी महाविद्यालय सोडले व कॉंग्रेस पक्षासाठी काम करण्यास सुरवात केली. त्याला पाच वेगवेगळ्या वेळेस तुरूंगवास भोगावा लागला.

♻ *राजकीय काम*

                त्यांची राजकीय कारकीर्द 1930 मध्ये सुरू झाली. ते रविवार कारंजा येथे नाशिक कारागृहात  45 दिवस तुरुंगात होते. 1931 मध्ये त्यांनी नाशिक जिल्ह्यातील बागलाण येथे सत्याग्रह आश्रम स्थापन केले. 1932 मध्ये ते नाशिक जिल्ह्यात भूमिगत कामगार म्हणून कार्यरत होते. ते अनेक वर्षे नाशिक जिल्हा कॉंग्रेस सेक्रेटरी होते. 1934 मध्ये ते विनोबा भावे या सामाजिक कार्यकर्त्याशी संबंधित होते. त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे आयोजक आणि निवडणूक प्रचारक म्हणून काम केले. ते बर्‍याच वर्षांपासून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सदस्य होते. 1950 मध्ये नाशिक येथे झालेल्या अखिल भारतीय कॉंग्रेस परिषदेसाठी त्यांनी प्रसिद्धी प्रमुख आणि स्वागत समितीच्या सदस्य म्हणून काम केले.

📰 *पत्रकारिता*

                   1938 मध्ये त्यांनी “गडकरी” दैनिक वृत्तपत्र सुरू केले. तेव्हापासून ते गडकरीचे मुख्य संपादक होते.

संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात गडकरींचे प्रसारण 90000 पेक्षा जास्त आहे. “गावकरी” आता 60 वर्षांचे आहेत. 1952 मध्ये त्यांनी “अमृत मराठी डायजेस्ट” हा मासिक उपक्रम सुरू केला. तरुण पिढीसाठी साप्ताहिक “रस रंग” प्रकाशित होण्यास सुरुवात झाली आणि आजही विविध खेळ व चित्रपटगृहातील माहितीसाठी ते प्रसिद्ध आहेत. 1975 मध्ये कृषी साधनाचे साप्ताहिक प्रथम प्रकाशित झाले. गावकरीची बहीण असलेली दैनिक “अजिंठा” वृत्तपत्र 1960 मध्ये मराठवाडा प्रांतासाठी औरंगाबाद येथे सुरू झाले. ते मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष होते. गोव्याच्या पंजिम येथे आयोजित पत्रकार परिषदेचे ते अध्यक्ष होते. ते शोलापुरात आयोजित “महाराष्ट्र मुद्रा परशहाद” चे अध्यक्ष होते. ते भारतीय भाषा वृत्तपत्र संघटनेचे सचिव आणि उपाध्यक्ष देखील होते.

💎 *समाजकार्य*

                     1936 मध्ये ते सेवा दलाच्या कामात सामील झाले. 1942 पर्यंत ते जिल्हा सेवादल प्रमुख होते. खरं तर ते नाशिक शहर आणि नाशिक जिल्ह्यात सेवा दल चळवळीचे प्रवर्तक होते. महात्मा गांधींच्या आमंत्रणामुळे प्रभावित होऊन त्यांनी महाविद्यालय सोडले आणि स्वतःला राष्ट्रीय हितासाठी वाहिले. बागलाण तालुक्यात त्यांनी ग्रामसेवा समितीची स्थापना केली. 1932 मध्ये ग्रामसेवा समितीवर ब्रिटीश सरकारने बंदी घातली आणि समितीच्या सर्व कामगारांना अटक करून तुरूंगात टाकले गेले. ते महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या गांधी सेवा संघाचे सदस्यही होते.

🏢 *शैक्षणिक कार्य*

                      त्यांनी मालेगाव व बागलाण तालुक्यात 30 प्राथमिक शाळा सुरू करण्यास पुढाकार घेतला आहे आणि 1942 मध्ये तुरूंगात टाकण्यापर्यंत कार्यरत असलेल्या मालेगाव तालुका प्राथमिक शिक्षण शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यांच्या पत्नीही 1940 मध्ये  सहा महीने धारापूरमधील दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी त्यांच्यात सामील झाले.  नाशिकमधील बिडी कामगार संघटना त्यांच्यामार्फत तयार केली गेली.

🔱 *सांस्कृतिक कार्य*

              त्यांचा नाशिकच्या अनेक सांस्कृतिक संघटनांशी जवळचा संबंध आहे. ते ११ वर्षे लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष होते. नाशिक शहराच्या सुशोभिकरणासाठी त्यांनी “वनराई मित्र मंडळ” स्थापन केले ज्याचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

🌀 *उद्योग, अर्थशास्त्र आणि वाणिज्य*

              आर्थिक क्षेत्रातही त्यांचे काम भरीव आहे. त्यांनी ग्रामीण उद्योग संघटनांची स्थापना केली आणि बरेच वर्षे ते मुख्य प्रवर्तक आणि फेडरेशनचे अध्यक्ष होते. त्यांनी जिल्हा दूध सहकारी संस्था स्थापन केली. शासकीय दूध योजना नाशिक हा त्यांच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. नाशिक येथे वाणिज्य आणि उद्योगांना चालना देण्यासाठी त्यांनी अनेक परिषदा आयोजित केल्या.  1958 मध्ये त्यांनी नाशिक व्यापारी सहकारी बँकेची स्थापना केली आणि या बँकेचे मुख्य प्रवर्तक, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून काम केले.

1960-62 मध्ये त्यांनी नाशिक औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या नेतृत्वात नाशिक शहरातील सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर सोसायटीची स्थापना 1965 मध्ये झाली. तेथे त्यांनी 2 वर्षे अध्यक्ष म्हणून काम केले. ते नाशिक येथे नाशिक सहकारी साखर कारखान्याचे मुख्य प्रवर्तक होते, जिथे त्यांनी बरीच वर्षे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांनी खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले. 

*धार्मिक क्षेत्रात कार्य*

                  त्यांनी टाकळी येथील रामदास मंदिराच्या नूतनीकरणाला पाठिंबा दर्शविला आणि ते टाकळी देवस्थानचे अध्यक्ष होते. त्यांनी अंजनेरी येथे हनुमान जन्म स्थानाच्या विकासासाठी काम केले आणि हनुमान जन्म स्थान विकास समितीची स्थापना केली. ते नाशिक येथे “संत विचार भारती” संस्थेचे अध्यक्ष होते. धर्मनिरपेक्षतेचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सर्व संस्थानांची स्थापना केली. 

        🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏

        स्त्रोतपर माहिती

सोमवार, २४ ऑगस्ट, २०२०

शिवराम हरी राजगुरू

शिवराम हरी राजगुरू
(ऑगस्ट २४, इ.स. १९०८; खेड, महाराष्ट्र - मार्च २३, १९३१; लाहोर, पंजाब) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करलेले क्रांतिकारक होते. ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी या संघटनेच्या क्रांतिकार्यात सहभागी झाले होते.

जीवन
राजगुरूंचा जन्म पुण्याजवळील खेड येथे ऑगस्ट २४, इ.स. १९०८ रोजी एका मराठीभाषक, देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांना ‘रघुनाथ’ या नावानेही ओळखले जात असे.

स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग
लहानपणी १४ व्या वर्षी इंग्रजी विषयातील अपयशामुळे वडील भावाने आपल्या नवविवाहित वधूसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचायची शिक्षा केली. हा अपमान राजगुरूंना सहन झाला नाही. अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणण्यासाठी दिलेले ९ पैसे व बहिणीने अंजिरासाठी दिलेल्या २ पैशांसह त्यांनी आपले घर सोडले. आधी नाशिक आणि त्यानंतर थेट काशीलाच (शिक्षणासाठी) ते पोहचले. काशीतील त्यांचा बराचसा वेळ हा लोकमान्य टिळक ग्रंथालयात, महाराष्ट्र विद्या मंडळातील व्याख्याने - वादविवाद ऐकण्यात आणि भारतसेवा मंडळाच्या व्यायामशाळेत लाठी-काठी, दांडपट्टा यांच्या शिक्षणात जात होता. त्या काळी कलकत्ता, पाटणा, कानपूर, लखनौ, झाशी, मीरत, दिल्ली, लाहोर ही गावे क्रांतिकारकांची माहेरघरे होती, आणि काशी येथील पं. मदनमोहन मालवीयांचे हिंदू विद्यापीठ हेच सार्‍यांचे आश्रयस्थान व गुप्त केंद्र होते.
मध्यंतरीच्या काळात राजगुरूंनी अमरावतीच्या श्री हनुमान आखाड्यात व्यायामविशारदाची पदवी मिळवली व हुबळीला डॉ. हर्डीकरांकडे सेवादलाचे शिक्षणही घेतले. त्यानंतर ते पुन्हा काशीत परतले. दरम्यान चंद्रशेखर आझाद यांचा राजगुरूंशी परिचय झाला आणि आझादांनी राजगुरूंना क्रांतिकारकांच्या गटात घेतले. ‘आपणासारिखे करिती तात्काळ असे आझाद, अन्‌ दुजांसारखे होती तात्काळ असे राजगुरू, एकत्र आले आणि त्यांचे ३६ गुण जुळाले. इंग्रज सरकारशी ३६ चा आकडा हेच या गुणांचे फलित होते आणि या ध्येयासाठी व हौतात्म्यासाठी राजगुरू कायमच उतावळे असायचे. या संदर्भातील त्यांच्या भावना, त्यांचे वागणेच विलक्षण होते, त्यागासाठी ते कायम तयार; आसुसलेले होते. ही भावना इतकी पराकोटीची होती की, आपल्या आधी भगतसिंह किंवा इतर कोणीही फासावर चढू नये ही त्यांची इच्छा होती.
आझाद आणि राजगुरू काशीत एकत्र आले, पण थेट कार्यवाही करायची वेळ आली आणि तुझ्याजोगे काम निघाले, तर तुला पार्टीचे आमंत्रण मिळेल, असे सांगून आझाद निघून गेले. काही दिवसांनंतर राजगुरूंजोगे काम निघाले. पार्टीतील एका फितुराचा वध करण्याच्या कामगिरीवर शिव वर्मा यांच्यासोबत त्यांची निवड झाली. दोघेही दिल्लीत आले. पण पिस्तूल एकच असल्याने व गद्दार जिवाला घाबरून घराबाहेर क्वचितच पडत असल्याने त्यांची पंचाईत झाली. रात्री ७ ते ८ या वेळेत तो इसम ज्या ठिकाणी फिरायला जात असे, त्या ठिकाणी राजगुरूंनी त्याच्या मागावर राहावे, असे ठरवून दुसऱ्या पिस्तुलाची सोय करण्यासाठी शर्मा लाहोरला गेले आणि तीन दिवसांनंतर परतले ते पिस्तूल न घेताच. सायंकाळ असल्याने शर्मा प्रत्यक्ष मोक्याच्या जागीच पोहोचले, आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या, सर्चलाइट, गोळ्यांचे आवाज पाहून त्यांनी ओळखले की राजगुरूंनी मोहीम फत्ते केली होती...
इकडे राजगुरूंनी एकाच गोळीत काम तमाम करून मथुरेकडील रेल्वेरूळांतून पळ काढला. पोलीस गोळ्या झाडू लागले, त्या वेळी त्यांनी रेल्वेरूळांखाली उडी टाकली आणि ते सरपटत एका शेतात घुसले. ते शेत पाण्याने तुडुंब भरलेले होते. एव्हाना पोलीस त्या ठिकाणी येऊन पोहोचले आणि चारी बाजूंनी प्रकाश टाकून गोळीबारही सुरू झाला. ही शोधमोहीम जवळजवळ २-३ तास सुरू होती. तोपर्यंत राजगुरू चिखल-पाण्यात, काट्याकुट्यात लपून राहू शकतील ही कल्पनादेखील पोलिसांना नव्हती. पोलिसांनी नाद सोडून दिला. पोलीस गेल्यावर मथुरेच्या दिशेने राजगुरू पळत सुटले. पुढील २ स्थानके त्यांनी पळतच पार केली. नंतर मथुरेच्या गाडीत बसून मथुरेत आले. येथे यमुनेकाठी कपडे धुऊन वाळूतच झोपले. तिसऱ्या दिवशी कानपूरला येऊन त्यांनी हा किस्सा ऐकवल्यानंतर वर्मांना धक्काच बसला! राजगुरूंची भारताला खरी ओळख झाली ती साँडर्स वधाच्या वेळी!
त्या काळी सायमन कमिशन एकाही भारतीय सदस्याला न घेता लाहोरला आले. लाहोरला पंजाबकेसरी लाला लजपतराय यांनी कमिशनची वाट अडवली. पोलीस अधिकारी स्कॉट याने साँडर्स याच्यासमवेत लालाजींवर जबरदस्त लाठीमार केला आणि यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवशीच सायंकाळी लाहोरच्या प्रचंड सभेत देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी गरजल्या, ‘‘लालाजीकी चिता की आग ठंडी होने के पहलेही किसी भारतीय नौजवान ने इस क्रूरता का बदला लेना चाहिये!’’ त्यांच्या या शब्दांनी सरदार भगतसिंह व्याकूळ झाले. त्यांनी स्कॉटला मारण्याचा प्रस्ताव पार्टीत मांडला. स्कॉटला मारल्यानंतर न्यायालयासमोर तर्कसंगत भाषण करणे आवश्यक होतं, की स्कॉटला का मारावे लागले? आणि हे काम भगतसिंह करू शकत होते. पण राजगुरूंना हे मान्य नव्हते. राजगुरू हट्टाने पेटून उठले. त्यांना मोहिमेत सामील केले गेले.
योजना अशी आखण्यात आली की, मालरोड पोलीस स्टेशनवर जय गोपाळ पहारा ठेवून स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेवेल आणि भगतसिंग व राजगुरू त्याच्या इशार्‍यावर गोळीबार करतील. पण ४ दिवस स्कॉट त्या भागात फिरकलाच नाही. शेवटी पाचव्या दिवशी कार्यालयातून एक गोरा अधिकारी बाहेर आला. जय गोपाळने भगतसिंहांना खूण केली की हाच स्कॉट असावा, यावर भगतसिंहांनी खुणेनेच सांगितले की हा नसावा, पण ही ‘नसावा’ ची खूण राजगुरूंच्या लक्षातच आली नाही. राजगुरूंनी साहेबाच्या दिशेने गोळी झाडली. लगेचच भगतसिहांनी आपल्या पिस्तुलातून ८ गोळ्या झाडून साहेबाला पूर्ण आडवे केले. एव्हाना गोळ्यांचा आवाज ऐकून चौकीतील लोक बाहेर जमले. त्यातला एक अधिकारी राजगुरूंच्या अंगावर चालून गेला. राजगुरूंचे पिस्तूल नेमके या वेळी चालत नव्हते. त्यामुळे राजगुरूंनी झटकन पिस्तूल खिशात ठेवून त्या अधिकाऱ्याला कमरेला धरून इतक्या जोरात आपटले, की तो सर्व गोंधळ संपेपर्यंत तो उठलाच नाही. या सर्व गडबडीत भगतसिंह यांच्या पिस्तुलातील ‘मॅगझिन’ खाली पडले. राजगुरूंच्या हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी प्रसंगावधान राखत, स्वतःचा जीव धोक्यात घालून, ते मॅगझिन शिताफीने उचलले. या राजगुरूंच्या कृतीमुळे चंद्रशेखर आझादांसह त्यांचे सर्व सहकारी राजगुरूंवर खूष झाले. मेला तो स्कॉट नसून साँडर्स होता हे कळल्यावर त्या दोहोंना अर्थातच विशेष दु:ख झाले नाही.
साँडर्स हत्येनंतर लाहोरहून भगतसिंग एका मिलिटरी ऑफिसरच्या वेषात राजकोटला निसटले. (या वेळी भगवतीचरण व्होरा यांच्या पत्नी दुर्गाभाभी यांनी भगतसिंहांच्या पत्‍नी असल्याचे नाटक तान्ह्या लेकरासह केले होते.) राजगुरू त्यांचे नोकर आणि आझाद हे मथुरेतील पंड्याच्या रूपात भगतसिंहाबरोबर होते. तिघेही दिवसाढवळ्या, `जागृत' पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून, एकाच गाडीतून लाहोरहून राजकोटला निसटले.
त्यानंतरच्या काळात राजगुरूंनी लाठीकाठीचा वर्ग अगदी काशीच्या मुख्य पोलीस स्टेशनसमोर कंपनीबागेत सुरू ठेवला. राजगुरूंच्या या धारिष्ट्यास काही सीमाच नव्हती. बरेच महिने राजगुरू काशीत उघडपणे, निर्भयतेने वावरत होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या धनुष्यबाणाचे कौशल्यही लोकांनी गणेशोत्सवात पाहिले. पण कोणासही कल्पना नव्हती की इतका साधा दिसणारा मनुष्य मोठा क्रांतिकारक असेल! अनेक महिने ते पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरले. पण अखेर सप्टेंबर, १९२९ मध्ये ते पुणे येथे पोलिसांच्या ताब्यात सापडले.
पुढे जेलमध्ये आमरण उपोषण, न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार ह्या घटना घडल्या. भगतसिंग, सुखदेव व अन्य काही क्रांतिकारक त्यांच्या समवेत होतेच. सर्व क्रांतिकारकांना आपले भविष्य माहीत होतेच, पण शिवराम राजगुरूंना मित्र भेटल्याचा आनंद झाला, तसेच राजगुरू भेटल्यामुळे इतरांमध्येही एक चैतन्य निर्माण झाले.
सर्वांना राजकीय कैदी म्हणून वागणूक मिळावी यासाठी क्रांतिकारकांनी उपोषण सुरू केले. राजगुरू अर्थातच पुढाकार घेत होते. डॉक्टर रोज सकाळी १०-१२ सहकार्‍यांना घेऊन रबरी नळीने, जबरदस्तीने दूध पाजण्याचा प्रयत्‍न करीत. या पोलिसांच्या प्रयत्‍नांमुळे राजगुरूंसह सर्वांनाच प्रचंड त्रास सहन करावा लागला, शारीरिक हाल-अपेष्टांचा सामना करावा लागला. पण याही स्थितीत सर्वच जण उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते.
लाहोर खटल्याचा निकाल लावण्यात आला व शिवराम राजगुरू यांच्यासह भगतसिंग व सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत फाशी देण्यात आले. २३ मार्च, १९३१ च्या सायंकाळी राजगुरू, भगतसिंग व सुखदेव हसत हसत फाशीला सामोरे गेले. या तिघांच्या बलिदानाचा २३ मार्च हा दिवस, भारतात शहीद दिन म्हणून पाळण्यात येतो.

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२०

राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिवस


🎯 *राष्ट्रीय अक्षय ऊर्जा दिवस*

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या नवीन व पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा मंत्रालयाच्या पुढाकाराने २००४ सालापासून दरवर्षी २० ऑगस्ट रोजी भारतात ‘अक्षय ऊर्जा दिवस’ साजरा होऊ लागला. २० ऑगस्ट २००४ रोजी झालेल्या पहिल्या ऊर्जा दिनाच्या निमित्ताने भारतीय टपाल खात्याने एक विशेष तिकीटही प्रसिद्ध केले. यानिमित्ताने पहिल्या वर्षी देशाची राजधानी दिल्ली येथे या ऊर्जावान आणि प्रभावशाली मोहिमेला चालना देण्यासाठी सुमारे १२ हजार शालेय विद्यार्थ्यांची एक विशाल मानवी साखळी तयार केली गेली. अक्षय ऊर्जा दिनाचे मुख्य उद्दिष्ट- पारंपरिक ऊर्जास्रोतांसह अपारंपरिक किंवा अक्षय ऊर्जास्रोतांचाही वापर व्हावा यासाठी प्रभावी जनजागृती मोहिमा राबवणे, हे आहे. कारण अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून ऊर्जा मिळवण्याच्या प्रक्रियेत नैसर्गिक संसाधनांची हानी व ऱ्हास होत नाही. तसेच हे ऊर्जेचे स्रोत ऊर्जेचा अखंड पुरवठा करण्यास सक्षम असतात.

सद्य:स्थितीत वीजनिर्मिती करण्यासाठी आवश्यक असलेले कोळसा, तेल, नैसर्गिक वायू आदी पारंपरिक इंधनसाठे दिवसेंदिवस कमी होत चालले आहेत. तसेच यामुळे प्रदूषणासारख्या पर्यावरणीय समस्या वाढून जीवसृष्टीला त्रास होत आहे. यासाठीच अपारंपरिक आणि पुनर्वापर करण्यायोग्य ऊर्जेवर भर द्यायला हवा. आपल्याकडे अजूनही ग्रामीण भागात स्वयंपाक आणि इतर कामांसाठी लाकूडफाटा मोठय़ा प्रमाणात जाळला जातो. यामुळे जंगलतोड तर होतेच; शिवाय धूर, अनारोग्य यांसारखे इतर प्रश्न निर्माण होतात.

अपारंपरिक ऊर्जेच्या वापराने अनेक समस्यांवर उत्तरे मिळतील. यात सौर, पवन, कृषी कचरा, जल, सेंद्रिय कचरा, जैव अवशेष आदींपासून मिळणाऱ्या विजेचा समावेश होतो. अशा ऊर्जास्रोतांचा सुयोग्य वापर म्हणजे एक प्रकारचा मानव-निसर्ग सुसंवादच आहे. कृष्णाने द्रौपदीला अक्षय थाळी दिली होती, तसेच निसर्गाने आपल्याला कधीही न संपणारे ऊर्जास्रोत- म्हणजेच अक्षय ऊर्जा दिली आहे. तिचा जपून उपयोगच मानवाला तारणार आहे. दैनंदिन जीवनातील ऊर्जावापर तपासून त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जावापरावर भर देणे, अशा ऊर्जेविषयी माहिती देणारे प्रकल्प बनवणे, सौरतापक, सौरदिवा यांसारख्या उपकरणांच्या वापरावर भर देणे. या सगळ्या प्रयत्नांमुळेच सक्षम भारताची निर्मिती होणार आहे.

आपण हे करु शकतो-

दैनंदिन जीवनातील ऊर्जा वापर तपासून त्यामध्ये अपारंपरिक ऊर्जावापररावर भर देणे. अशा ऊर्जेची माहिती देणारे प्रकल्प- नमुने इ. बनवणे. सोलर हिटर, सौरदिवा यांसारख्या उपकरणांच्या वापरावर भर देणे. बाग रस्ते या ठिकाणी सुध्दा सौर ऊर्जेचे दिवे वापरता येतील.

सोमवार, १७ ऑगस्ट, २०२०

मदनलाल धिंग्रा Madanlal Dhingra




मदनलाल धिंग्रा
जन्म : १८ सप्टेंबर १८८३ (अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत)
फाशी : १७ ऑगस्ट १९०९ (पेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन, इंग्लंड)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत, होमरूल लीग

धर्म : हिंदू

प्रभाव : विनायक दामोदर सावरकर

मदनलाल धिंग्रा हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २०व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.

🕺 सुरुवातीचे जीवन

त्यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.

👬 सावरकरांशी संबंध

मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.

🔫 कर्झन वायलीचा खून

ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता. या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.




🕯 शेवटचे वक्तव्य

फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात धिंग्रानी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे.ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वत:चे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे.याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."

💎 नाटक

मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पाहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे.

🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🌹🙏 विनम्र अभिवादन 🙏🌷

स्त्रोतपर माहितीनुसार

शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

डॉ.मुरलीधर गोविंद ताकवले

डॉ.मुरलीधर गोविंद ताकवले

भौतिकशास्त्रज्ञ*

*जन्मदिन - १५ ऑगस्ट १९४२*

डॉ.मुरलीधर गोविंद ताकवले यांचे बालपण अतिशय लहान अशा हरगूड गावामध्ये व्यतीत झाले. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते आणि त्या गावाला शिक्षणाची एक परंपरा होती. त्यामुळे बालवयातच त्यांच्यावर शिक्षणविषयक चांगले संस्कार झाले. त्यानंतरचे त्यांचे शिक्षण पुण्यामध्ये फर्गसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे झाले. त्यांनी भौतिकशास्त्रात ‘एक्स-रे क्रिस्टलोग्रफी’ या विषयात पीएच.डी. मिळविली. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात व्याख्याता, प्रपाठक आणि प्राध्यापक या पदांवर काम केले. सतत कार्यरत राहण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे.

इ.स. १९७० ते २००० अशी ३० वर्षे त्यांनी विद्यापीठात पदव्युत्तर स्तरावर सॉलिड स्टेट फिजिक्स, मटेरियल सायन्स, सरफेस सायन्स, ऊर्जा अभ्यास, संगणक प्रणाली, पर्यावरण विज्ञान असे विषय शिकवले. त्यांनी संशोधन व विकासाचे पंचवीस प्रकल्प पूर्ण केले. मटेरियल सायन्स, प्रकाश संवेदक पदार्थ (फोटोव्होल्टाईक मटेरियल), सूर्यउष्णता पद्धती, बायोगॅस, बायोमास गॅसिफीकेशन, पवनऊर्जा हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस विद्यार्थ्यांनी पीएच.डी. आणि तीस विद्यार्थ्यांनी एम.फिल. ही पदवी मिळविली. एक्स-रे क्रिस्टलोग्राफी या विषयात केलेल्या संशोधनानंतर त्यांनी ऊर्जाविषयक संशोधनाला सुरुवात केली. डॉ. वि.ग. भिडे यांच्यासोबत त्यांनी अनेक वर्षे काम केले. पुणे विद्यापीठाच्या ऊर्जा प्रणालीचा विकास घडविण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. विशेषत: या विषयातील औष्णिक गुणधर्मावर आधारित सोलर कुकर, ड्रायर, त्याचप्रमाणे विद्युतनिर्मिती या विषयात त्यांनी प्रावीण्य प्राप्त केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सौरऊर्जेचा वापर करणारी उपकरणे बसविण्यात आली. या विषयाच्या संशोधनामध्ये त्यांनी नवीन प्रकारची सौरऊर्जेवर चालणारी उपकरणे विकसित केली. त्यामध्ये पॅराबोलिक रिफ्लेक्टरचा विकास हे एक महत्त्वाचे योगदान आहे.

डॉ. मुरलीधर ताकवले यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. त्यांमध्ये कुलसचिव, अधिष्ठाता- विज्ञान विद्याशाखा- पुणे विद्यापीठ, कुलगुरू-शिवाजी विद्यापीठ, आणि कुलगुरू-प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस यांचा उल्लेख करता येईल.

ग्रमीण भागातून आल्यामुळे डॉ. मुरलीधर ताकवले यांचा ग्रमीण विद्यार्थ्यांकडे नैसर्गिक ओढा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ग्रमीण भागांतील विद्यार्थ्यांनी संशोधन करून एम.फिल. आणि पीएच.डी. पदवी मिळविली.

डॉ. मुरलीधर ताकवले यांचा स्वभाव शांत, राहणी साधी आणि विचारांत स्पष्टपणा असल्यामुळे त्यांच्याविषयी अनेकांना जिव्हाळा वाटतो. समाजवादी विचारांचा प्रभाव त्यांच्यावर असल्यामुळे समाजाच्या विकासाची कामे करण्याकडे आणि त्याला पूरक असे संशोधन करण्याकडे त्यांचा सतत ओढा राहिला आहे. त्यांनी केलेल्या योगदानाची दखल अनेक संस्थांनी घेतली असून त्यांना ‘गुरुवर्य बाबुराव जगताप पुरस्कार’ त्याचप्रमाणे ‘सूर्या पुरस्कार’ यांसारखे पुरस्कार मिळाले आहेत. शिक्षण, संशोधन आणि ज्ञानविस्तार या तिन्ही क्षेत्रांमध्ये तेवढ्याच हिरिरीने काम केलेल्या डॉ. मुरलीधर ताकवले यांनी आपल्या कार्याचा ठसा विज्ञान क्षेत्रामध्ये निश्चितपणे उमटविलेला आहे.

— डॉ. पंडित विद्यासागर *========================*

संकलित माहिती 

बुधवार, १२ ऑगस्ट, २०२०

डॉ. विक्रम साराभाई

 


अंतराळ संशोधनात बजावलेल्या मोलाच्या कामगिरीसाठी इंटरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियनतर्फे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार ठरलेल्या अश्या डॉ. विक्रम साराभाई यांची आज जयंती १२ ऑगस्ट १९१९

डॉ. विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमानंतरच १९६९ साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्त्रो) स्थापना झाली.आईआईएम अहमदाबाद च्या स्थापनेतही डॉ. विक्रम साराभाई यांची मुख्य भूमिका होती.होमी भाभा यांच्या मृत्यु नंतर ते १९६६ मध्ये परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष बनाले.अनेक आंतर्राष्ट्रीय संस्थांची अध्यशपदे त्यांच्याकडे होती.अवकाश संशोधन बरोबरच त्यांनी टेक्स्टटाईल,फार्मासिटिकल,अणुऊर्जा,कला या क्षेत्रात ही विशेष कामगिरी केली आहे .त्यांनी स्थापन केलेल्या ATIRA (Ahmedabad Textile Industry’s Research Association) ने आधुनिक वस्त्रोद्योगाचा पाया रचला.फार्मासिटिकल उद्योगात सर्वप्रथम इलेक्ट्रोनिक डाटा प्रोसेसिंग आणी रिसर्च टेक्निकचा वापर त्यांनीच केला.Electronics Corporation of India Limited (ECIL),Uranium Corporation of India Limited (UCIL)अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली.

१९७५ डॉ. विक्रम साराभाई यांनी इंग्लंडच्या प्रयोगशाळेत संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ .वसंत गोवारीकर यांना भारताच्या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन करून भारतात आणलं होतं .” ब्रिटनप्रमाणे वातानुकुलित लॅब्ज आणि ऑफिससारख्या सोयी आम्ही देऊ शकणार नाही , पण बसायला एक टेबल, खुर्ची आणि एक कपाट नक्कीच देऊ शकतो “, असं म्हणून डॉ . साराभाईंनी देशापुढील आव्हानही स्पष्ट केलं होतं .कारण त्यावेळी संशोधनासाठी विशेष बजेट वैगेरे नव्हते. डॉ. विक्रम साराभाई यांनी शास्त्रज्ञांना स्वप्न दाखवलं, नवी दिशा दिली.खंबीर नेतृत्व हाही त्यांचा एक व्यक्तिविशेष.

डॉ. अब्दुल कलाम यानीही आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात साराभाई यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले आहे.ते स्वप्न पाहायचे आणी ते प्रत्यक्षात उतरवण्या साठी हवी ती मेहनतही घ्यायचे.त्यांचे व्यक्तिमत्व आणी कार्य त्यांच्या सह्कार्यासाठी नेहमीच एक प्रेरणा स्रोत म्हणून राहिल होत.त्यांनी त्यांच्या सहकार्यांना एक वेगळी दृष्टी दिली होती.मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केलि गेली होती. आर्यभट्ट च्या सफल संक्षेपणा नंतर अनेक उपग्रह यशस्वीरीत्या प्रक्षेपित केले गेले ज्यासाठी साराभाई यांची नेहमीच आठवण केली जाते.कारण या सगळ्या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम ,दूरदृष्टि आणी खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली भारत सरकारचा पद्म भूषण आणी १९७२ साली मरणोत्तर पद्मा विभूषण हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आला.(संकलित माहिती)

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

९ ऑगस्ट क्रांती दिन


चले जाव चळवळ १९४२
भारत छोडो आंदोलन ऑगस्ट क्रांती
हे ऑगस्ट १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.

⚱ भारत छोडो आंदोलन
या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.

सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पेटविण्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह काँगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वत:ला अटक करवून घेतली.

💎 चळवळीची कारणे
क्रिपस योजनेला अपयश

राज्यकर्त्यांची कृत्ये

जपानी आक्रमणे

इंग्रजांचा विरोधाभास

महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण

⚖ छोडो भारत चळवळीची अपयशाची कारणे

नियोजनाचा अभाव

सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले

दडपशाही

राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद

🏮 इतर कारणे

⏰ त्रिमंत्री योजना
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर अ‍ॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरूवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अ‍ॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अ‍ॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.

🙋‍♂ चलेजाव आंदोलन (१९४२)
क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.
मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड. गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान. कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात, ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
▶ प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ. बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.
▶ या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.
▶ सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.
▶ या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.
▶ काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.
▶ व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.
▶ मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.
▶ भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.
▶ निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.
▶ स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.




🇮🇳 भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले
क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादी गटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.

👮 नेताजी सुभाष चंद्र बोस
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.

🔫 आझाद हिंद सेना
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.

🚣 भारतीय नौदलाचा उठाव
आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

🕵 माउंटबॅटन योजना
२४ मार्च १९४७ रोजी माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिध्द करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.

🇮🇳 जयहिंद🇮🇳
🙏 स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*

स्त्रोतपर माहिती

शनिवार, ८ ऑगस्ट, २०२०

रामलिंगस्वामि, वुलमिरी

रमलिंगस्वामि, वुलमिरी
भारतीय वैद्यकिय शास्त्रज्ञ

जन्मदिन - ८ ऑगस्ट १९२६

रामलिंगस्वामि, वुलमिरी : (८ ऑगस्ट १९२६) भारतीय वैद्यकीय शास्त्रज्ञ. पोषणासंबंधीच्या विकृतिविज्ञानाविषयी त्यांनी विशेष संशोधन केलेले आहे.

रामलिंगस्वामी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम् येथे झाला. त्यांनी भारतात एम्. डी. व नंतर ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेऊन डी. एस्‌सी. या पदव्या संपादन केल्या. त्यानंतर ते इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेच्या तमिळनाडू राज्यातील कुन्नूर येथील पोषण संशोधन प्रयोगशाळेत विकृतिवैज्ञानिक होते (१९४७ – ५४). याच संस्थेचे ते १९५४ – ५७ या काळात साहाय्यक सचिव व उपसंचालक होते. त्यानंतर नवी दिल्ली येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेत विकृतिविज्ञान विभागात प्राध्यापक व प्रमुख (१९५७ – ६९) आणि प्राध्यापक व संचालक (१९६९ – ७९) म्हणून काम केले. १९७९ पासून ते इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च या संस्थेचे महासंचालक झाले. यांखेरीज त्यांनी न्यूकॅसल आपॉन टाईन विद्यापीठात जॅकोबसन व्याख्याते (१९७१); झाक पारीझो व्याख्याते, जागतिक आरोग्य संघटना (१९७५); जवाहरलाल नेहरू स्मृती व्याख्याते (१९७५); निवासी-विद्वान, फोगार्टी इंटरनॅशनल सेंटर, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, बेथेस्डा (अमेरिका) (१९७६) इ. पदांवर काम केले आहे.

रामलिंगस्वामी यांनी प्रथिन-ऊर्जा अपपोषणासंबंधीच्या रोगांच्या विकृतिविज्ञानाविषयी महत्त्वाचे संशोधन केलेले आहे. मानवी अपपोषणाच्या प्रतिबंधाविषयी आणि विकसनशील राष्ट्रांतील वैद्यकीय संशोधनाबाबत त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. या कार्याकरिता लंडनच्या रॉयल सोसायटीने त्यांची सदस्य म्हणून १९८६ मध्ये निवड केली. याखेरीज त्यांना त्यांच्या कार्याबद्दल भारत सरकारचा पद्मभूषण हा किताब (१९७१), मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचा रौप्य जयंती संशोधन पुरस्कार (१९७४), आंध्र विद्यापीठाची सन्माननीय डी. एस्सी. (१९६७), कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटची सन्माननीय डॉक्टर इन मेडिसीन पदवी (१९७४), जागतिक आरोग्य संघटनेचा लीआँ बर्नार्ड पुरस्कार (१९७६), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे जगदीशचंद्र बोस पदक (१९७७), बिर्ला पुरस्कार (१९८०) वगैरे बहुमान मिळालेले आहेत. यांखेरीज इंडियन ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन या संस्थेचे अध्यक्ष (१९७४ पासून), इंडियन ॲकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सचे सदस्य (१९६१), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमीचे सदस्य (१९७१, अध्यक्ष १९७९ पासून), रॉयल कॉलेज ऑफ पॅथॉलॉजीस्ट्स (ब्रिटन) व अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्स या संस्थांचे सदस्य (१९७०), अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्य (१९७३) इ. सन्माननीय पदांवर त्यांची निवड झालेली आहे. त्यांचे अनेक संशोधन निबंध, व्याप्तिलेख व ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत.

* संकलित माहिती

सोमवार, ३ ऑगस्ट, २०२०

क्रांतिसिंह नाना पाटील

क्रांतिसिंह नाना पाटील
नाना पाटील यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ. नानांचे वडील रामचंद्र हे गावचे पाटील होते.
(स्वातंत्र्य सैनिक, समाजसुधारक, प्रती सरकारचे संस्थापक)
     जन्म: ३ ऑगस्ट १९०० (येडे मच्छिंद्र, वाळवा,  जि.सांगली, महाराष्ट्र, भारत)
      मृत्यू : ६ डिसेंबर १९७६   (वाळवा)
चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा,  संयुक्त महाराष्ट्र चळवळ
धर्म : हिंदू

💁‍♂ जीवन
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच पत्री सरकार किंवा प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
            नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते. 

🧭 स्वातंत्र्य लढा
             १९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्‍न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.
            ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी 
ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्या माध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
              नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना झाली. त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड होते. ह्या दलाची कुंडल येथे युद्धशाळा होती. या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांवर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करीत. तलवारी, जांबिया या परंपरांगत हत्याराबरोबरच पिस्तूल बाँबगोळे फेकण्याचे प्रशिक्षण या जवानांना होते. प्रतिसरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली.
      या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणार्‍या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
  नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकार्‍याच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.
         १९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कर्‍हाड तालुक्यात प्रकट झाले.
            यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
       स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणार्‍या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले. मला वाळव्यामधेच दहन करण्यात यावे ही त्याची इच्छा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करण्यात आले.

⌛ स्वातंत्र्योत्तर काळ
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये ते उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते.

📚 संबंधित साहित्य
क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन)
सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादकः रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन)
क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन)
क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन)
पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ

     🇮🇳 जयहिंद 🇮🇳
संकलित माहिती 

शनिवार, १ ऑगस्ट, २०२०

लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर : (२३ जुलै १८५६–१ ऑगस्ट १९२०). थोर भारतीय नेते,भगवद्‌गीतेचे आधुनिक भाष्यकार व प्राच्यविद्या पंडित. त्यांचा जन्म रत्नागिरीस झाला. त्यांचे जन्मनाव केशव; परंतु बाळ हेच नाव पुढे रूढ झाले. टिळक कुटुंबाचे मूळ गाव चिखलगाव (ता. दापोली, जि . रत्नागिरी ).

चिखलगावची खोतीदारी त्यांच्याकडे होती. पणजोबा केशवराव यांनी पेशव्यांच्या काळात मानाची जागा मिळवली होती. आजोबा रामचंद्रपंत यांनी उत्तर आयुष्यात संन्यास घेतला. टिळकांचे वडील गंगाधरपंत व आई पार्वतीबाई. गंगाधरपंतांना कौटुंबिक अडचणीमुळे इंग्रजी शिक्षण सोडून पुण्याहून गावी जावे लागले. पुढे त्यांनी मराठी शाळेत शिक्षकाची नोकरी केली. बाळ गंगाधऱ टिळकांचे पारंपरिक संस्कृत अध्ययन घरातच झाले. १८६६ मध्ये गंगाधरपंतांची बदली पुण्यास झाल्यामुळे टिळक आपल्या मातापित्यांबरोबर पुण्यास आले. पुण्यास आल्यावर थोड्याच दिवसांत टिळकांची आई मरण पावली आणि गंगाधरपंतांची बदलीही ठाण्यास झाली. तथापि पुण्यात राहूनच ते १८७२ मध्ये मॅट्रिक झाले.
भारतीय जनतेत ‘स्व’राज्याची व राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे; तसेच ते स्वराज्य मिळवण्याची सिंहगर्जना करून समाजाला प्रेरित करणारे राष्ट्रीय नेतृत्व !
स्वातंत्र्यपूर्व काळातील महाराष्ट्रातील विलक्षण तेजस्वी आणि तर्डेंदार व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. १८५६ चा रत्नागिरीतल्या चिखलगावचा त्यांचा जन्म आणि १९२० चा मृत्यू. या कालावधीतील बाळ ते लोकमान्य असा त्यांचा प्रवास भारताला नवचैतन्य देऊन गेला.
टिळकांचे मूळ नाव केशव असले, तरी लोकव्यवहारात त्यांचे बाळ हे टोपणनावच रूढ झाले. त्यांच्या शालेय जीवनातली शेंगांच्या टर्रेंलाची घटना, गणित फळ्यावर लिहून हात खराब करून घेण्यापेक्षा गणिते तोंडी सोडवण्याचा उपाय, संत हा शब्द सन्त, संत किंव सन्‌त अशा तीन पद्धतीनं लिहिला तर बिघडते कुठे असा शिक्षकांना केलेला खडा सवाल-या सगळ्या घटनांमुळे टिळक हुशार, बुद्धिमान पण काहीसे हट्टी विद्यार्थी अशा सदरात मोडले जात.
’स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी प्रतिज्ञा प्रचंड आत्मविश्र्वासानं करणारी टिळकांसारखी व्यक्ती एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणूनच घडत गेली. कॉलेजमध्ये विद्येबरोबरच शरीरसंपत्ती मिळवण्यात त्यांना जास्त रस होता. यामुळेच कदाचित पुढचे शारीरिक, मानसिक कष्ट ते सोसू शकले. १८७६ ला बी.ए., पुढे गणितात एम. ए., व नंतर एल. एल. बी. अशी उत्तम शैक्षणिक कारकीर्द असलेले टिळक.
लोकमान्यांनी १८८० साली विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांसमवेत सुरू केलेले न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण नावाने सुरू केलेला छापखाना, ‘केसरी आणि मराठा’ सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना- या सगळ्याच घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला.
’पारतंत्र्यामुळं आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय बाबतीत सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही,’ अशी ठाम भूमिका लोकमान्यांची पर्यायानं केसरीची होती. नेमकी याविरुद्ध भूमिका आगरकरांची होती. त्यांच्या मते आधी सामाजिक सुधारणाच होणे गरजेचे होते. यामुळे केसरीतच नव्हे तर अवघ्या देशात वैचारिक संघर्ष सुरू झाला. याची परिणीती आगरकरांनी केसरी सोडण्यात झाली.
केसरीतून (मराठी) आणि मराठातून (इंग्रजी) होणारे लोकमान्य टिळकांचे लेखन स्‍फूर्तिदायी आणि दिशादर्शक होते. केसरीतून वेळोवेळी प्रसिद्ध होणारे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक, राजकीय परिस्थितीबाबत सजग करत राहिले. ’मराठा’सारखे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्यामागे-जो विचार केसरीतून पोहोचवला जातो, तोच इंग्रजांपर्यंत आणि परप्रांतीय हिंदी लोकांपर्यंत जावा-ही भूमिका होती. रँडच्या खुनानंतर ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या केसरीतल्या अग्रलेखामुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला. स्वदेशी चळवळीबाबतचा ’गूळ का साखर’ हा लेख, ‘राष्ट्रीय मनोवृत्ती ज्यातून निर्माण होईल, ते राष्ट्रीय शिक्षण’ अशी केलेली व्यापक व्याख्या, त्यावर लिहिलेले लेख- या सगळ्यांतून समाज प्रगल्भ होत गेला. त्यांच्या जहाल लेखनाचा प्रभाव क्रांतिकारकांवरही पडला. टिळकांच्या विचारांच्या प्रभावातून स्वातंत्र्यवीर सावरकर, न. चि. केळकर, कॉम्रेड डांगे यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडली.
लोकमान्यांच्या लेखनात बनावट, सजावट, अलंकाराची वेलबुट्टी नसायची, तर ते लेखन रोख-ठोक आणि अभ्यासपूर्ण असायचे. १९०० मध्ये प्रो. मॅक्सम्यूलर यांच्यावरचा त्यांचा अग्रलेख प्रसिद्ध झाला. जर विद्वान मनुष्य असेल, मग तो विलायती असला, तरी त्याचे गुण घ्यावेत ही त्यामागची भावना होती. लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचे वक्तृत्वही धारदार होते. सामाजिक सहभागाचे महत्त्व जाणणारे ते विलक्षण प्रभावी संघटक होते. समाज एकजूट होण्यासाठी त्यांनी सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा श्रीगणेशा महाराष्ट्रात केला. या उत्सवांची सुरुवात हे खरे तर त्यांच्या असंख्य ‘संघटनात्मक’ कामांपैकी एक काम. पण या एकाच कार्यातून त्यांच्यामधल्या अतिकुशल संघटकाची व द्रष्ट्याची जाणीव आपल्याला होते.
१९०६ साली सुरू झालेल्या वंगभंग चळवळीत लोकमान्य टिळकांचा मोठा सहभाग होता. मराठी व बंगाली लोकांनी एकत्र येऊन राष्ट्रीय एकात्मतेची ज्योत पेटवावी हा विचार घेऊन त्यांनी राष्ट्रवादाचा पुरस्कार केला. कर्झनशाही विरुद्धची टीका, राष्ट्रीय सभेच्या कामासाठी लाल-बाल-पाल अशी एकत्र आलेली त्रयी, खामगाव-वर्धा-नागपूर-सोलापूर-मुंबई-मद्रास-कोलंबो असा टिळकांचा मोठा दौरा, कॉंग्रेस अधिवेशनातील अध्यक्षस्थान, होमरूल लीगची स्थापना, जहाल लेखांमुळे देशद्रोहाचे झालेले आरोप, तुरुंगवासाची शिक्षा या सगळ्यांमुळे लोकमान्यांची प्रतिमा उजळत गेली आणि त्यांची लोकप्रियता संपूर्ण भारतात वाढत गेली.स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चतु:सूत्रीच्या साहाय्याने त्यांनी ब्रिटिशविरोधी वातावरण निर्माण केले व भारतीय जनतेत संघर्षाची भावना निर्माण केली. ब्रह्मदेशातील मंडाले येथील तुरुंगात, अतिशय प्रतिकूल अशा हवामानात तब्बल ६ वर्षांची (१९०८-१९१४) शिक्षा भोगून परत आल्यानंतरही त्यांनी तेवढ्याच तडफेने कार्याला सुरुवात केली. राष्ट्रीय भावनेच्या विस्तारासह कॉंग्रेसच्या संघटनात्मक विस्तारातही त्यांचा शब्दश: ‘सिंहाचा’ वाटा होता. म्हणूनच त्यांचे कार्य म्हणजे केवळ ‘टिळक यांची कारकीर्द’ नसून, ते भारताला स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या जवळ नेणारे ‘लोकमान्य टिळक युग’ होते.
अशा या लोकप्रिय व्यक्तीची सर्वात प्रिय जागा कुठली असेल, तर ती म्हणजे पुण्याजवळचा सिंहगड. एकांताची व चिंतनाची भूक लागली असता खराखुरा एकांतवास ते सिंहगडावरच अनुभवायचे. तेथेच मनन, चिंतन आणि लेखनही करायचे. लोकमान्यांनी जे ग्रंथ लिहिले, त्या प्रत्येकात एकेक गुणविशेष आहे. ’ओरायन’ मध्ये गणिती आणि ज्योतिषविषयक ज्ञान आहे. ’आर्यांचे वसतिस्थान’ मधून संशोधन व विश्र्लेषण दिसते, आणि मंडालेच्या तुरुंगवासात लिहिलेल्या ‘गीतारहस्यात’सखोल तात्त्विक विचार वाचायला मिळतो.
लोकमान्यांच्या व्यक्तिमत्त्वाची, लेखणीची व वक्तृत्वाची धार हिंदुस्थानभर पोहोचली. केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहिलेली त्यांची प्रतिमा प्रत्येक देशभक्ताला ताकद देत राहिली. जनतेने त्यांना ’लोकमान्य’ केले. त्याचबरोबर ते हिंदुस्थानातील (ब्रिटिशविरोधी) अस्वस्थतेचे जनक मानले गेले. खरे तर राष्ट्राचा अभ्युदय व्हायचा, तर ते राष्ट्र नेहमी अस्वस्थच असायला हवेहे लोकमान्य टिळकांनी केव्हाच जाणले होते. याच सकारात्मक अस्वस्थतेचा साक्षात्कार आपल्याला त्यांच्या जीवनकार्यातून होतो.

शाहीर अण्णा भाऊ साठे



शाहीर अण्णा भाऊ साठे


तुकाराम भाऊराव साठे 
जन्म (१ ऑगस्ट १९२० वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा
 निधन - १८ जुलै १९६९
 अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे एका मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादाचा प्रभाव होता पण नंतर ते आंबेडकरवादी झाले.
वैयक्तिक दु:खांचा विचार न करता; आपले विचार, कार्य व प्रतिभा यांच्या साहाय्याने लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे लोकशाहीर! आज १ ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या जन्मशताब्दी वर्ष संपत आहे... त्यांना मानाचा मुजरा...
शाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे जातिभेदांमुळे, जातींच्या उतरंडीमुळे शिक्षणापासून, समग्र विकासापासून वंचित राहिलेल्या मातंग समाजातील एक समृद्ध व्यक्तिमत्त्व. त्या काळातील कुरुंदवाड संस्थानातील वटेगावमध्ये १९२० साली त्यांचा जन्म झाला. आई आणि घरातील मोठे लोक दोर वळण्याच्या कामाला जात. त्यांचे वडील पोटापाण्यासाठीच मुंबईत राहत असत. त्यामुळे लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी तुकारामांवर (अण्णांचे मूळ नाव) म्हणजेच अण्णा भाऊंवर होती. त्यांच्या वडिलांनी उच्चभ्रू आणि उच्चशिक्षित समाज मुंबईत पाहिल्याने आपल्या मुलांनी शिकले पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या आग्रहामुळेच वयाच्या १४ व्या वर्षी अण्णांनी प्राथमिक शिक्षणाला सुरुवात केली. परंतु तत्कालीन मागास जातींतील मुलांसाठी त्या काळी वेगळ्या शाळा होत्या. त्या मुलांशी शिक्षकांचे वर्तनही निर्दयीपणाचे होते. वाढलेले वय, सदोष शिक्षण पद्धती यांमुळे अण्णा फार दिवस शाळेत गेलेच नाहीत.
लहानपणापासूनच त्यांना विविध छंद होते. मैदानी खेळ खेळण्याचा त्यांचा पिढीजात वारसा असल्याने दांडपट्टा चालविण्यात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हते. याशिवाय जंगलात एकटे भटकणे, पोहणे, मासेमारी, शिकार करणे, विविध पक्षांशी मैत्री करणे, जंगलातील पानाफुलांमधील सूक्ष्म फरक शोधणे असे एक ना अनेक छंद त्यांना होते. या छंदांमध्ये निरागसपणे बागडण्यातच त्यांचे बालपण गेले. मोठे होत असताना त्यांच्या आवडींमध्ये वाढच होत होती. लोकगीते पाठ करून ती टिपेच्या आवाजात म्हणणे, पोवाडे, लावण्या पाठ करणे, इतरांना त्या आत्मीयतेने म्हणून दाखवणे या छंदांमुळे त्यांच्याभोवती नेहमीच मित्र मंडळी जमलेली असत. रेठर्‍याच्या जत्रेत त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भाषण ऐकले. त्याचा परिणाम अण्णा भाऊंवर झाला आणि ते स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.
चळवळीत सामील होऊन लोकनाट्यांत छोटी मोठी कामे त्यांनी केली. याच काळात दुष्काळ पडल्याने अण्णांच्या वडिलांनी आपल्या कुटुंबाला मुंबईत न्यायचे ठरविले. त्याच वेळी अण्णा भाऊंचे बालपण संपले. वयाच्या ११ व्या वर्षी अण्णा आपल्या आई-वडिलांबरोबर मुंबईत आले. हे कुटुंब भायखळ्याच्या चांदबीबी चाळीत राहायला गेले. त्या काळी मुंबईत स्वस्ताई असल्याने सुरुवातीचा काळ सुखाचा गेला. मुंबईत फिरताना दोन गोष्टींकडे ते आकर्षिले गेले, एक म्हणजे विविध राजकीय संघटना आणि दुसरे म्हणजे मूक चित्रपट.
विविध राजकीय संघटनांचे ध्येय ब्रिटिशांना हाकलून देणे हेच होते. परंतु प्रत्येकाची विचारसरणी वेगळी होती. यांपैकी कम्युनिस्ट विचारसरणीचे अण्णा अनुयायी बनले. पक्षाच्या सभांचे आयोजन करणे, वॉलपेंटिंग करणे, हॅण्डबिले वाटणे, मोर्चे काढणे, छोट्या-मोठ्या सभेसमोर गोष्टी सांगणे, पोवाडे, लोकगीते म्हणून दाखविणे या सर्व गोष्टींमुळे कम्युनिस्ट वर्तुळात ते सर्वांना एकदम हवेहवेसे झाले. याच वेळी त्यांच्या तुकाराम या नावाचे अण्णा या नावात रूपांतर झालेे.
मुंबईत पोटासाठी वणवण भटकत असताना अण्णांनी हमाल, बूट पॉलीशवाला, घरगडी, हॉटेल बॉय, कोळसे वाहक, डोअरकीपर, कुत्र्याला सांभाळणारा, मुलांना खेळविणारा, उधारी वसूल करणारा, खाण कामगार, ड्रेसिंगबॉय अशी नाना प्रकारची कामे केली. यावरून त्यांच्या कष्टमय जीवनाची आपल्याला कल्पना येते. या काळातच त्यांना सिनेमा पाहण्याचा छंद लागला. या छंदानेच त्यांना साक्षर बनविले. चित्रपटांच्या पाट्या, रस्त्यावरील दुकानांच्या बोर्डवरील अक्षरे जुळवित ते साक्षर झाले. या अक्षर ओळखीनंतरच त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली.
वयाच्या १७-१८ व्या वर्षी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अण्णांवर आली होती. गिरणी कामगार म्हणून त्यांच्या जीवनाला सुरुवात झाली होती. परंतु कोहिनूर मिलमधील नोकरी सुटल्याने त्यांच्यावर मोठेच संकट आले. या वेळी पुन्हा साठे कुटुंब वटेगावला आले. मुंबईतील धकाधकीचे जीवन, मोर्चे, सभा, सत्याग्रह, आंदोलने या सर्व गोष्टी पाहिलेल्या अण्णा भाऊंना वटेगावमध्ये राहणे शक्य होत नव्हते. अत्यंत अस्वस्थतेत त्यांनी घर सोडले आणि ते त्यांच्याच नातेवाईकांच्या तमाशाच्या फडात सामील झाले. अण्णा भाऊंचा धारदार आवाज, त्यांचे पाठांतर, पेटी, तबला, ढोलकी, बुलबुल ही वाद्ये वाजवण्याची कला या गुणांमुळे त्यांचे तमाशात स्वागतच झाले. महाराष्ट्राच्या तमाशा या कलेच्या परंपरेत मातंग समाजाने जी वैशिष्ट्यपूर्ण भर घातली ती शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सहभागानेच. महाराष्ट्रातील लोकांना या वारणेच्या वाघाचे दर्शन पहिल्यांदा तमाशातच झाले. तमाशासारख्या कलेला अधिक प्रसिद्धी, प्रतिष्ठा, व समृद्धी अण्णा भाऊंनीच मिळवून दिली.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीत, तसेच गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळीही त्यांनी जनजागृतीचे प्रचंड काम केले. एक कलाकार म्हणून तसेच एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनही ते प्रत्येक उपक्रमात, आंदोलनात सहभागी होत असत. चलेजाव चळवळीच्या काळात वटेगावातही बर्डे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अनेक घडामोडी सुरू होत्या. अण्णा भाऊ त्यात सामील असल्याने त्यांच्यावर वॉरंट निघाले. परिणामी त्यांनी कायमचे घर सोडले. पुढे त्यांना तत्त्वज्ञानाची, विचारांची एक दिशा मिळत गेली आणि त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे पूर्णवेळ काम करायला सुरुवात केली. पक्ष कार्यासाठी झोकून दिलेले असतानाच १९४४ साली त्यांनी ’लाल बावटा’ या कला पथकाची स्थापना केली. या वेळी शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकर हे देखील त्यांच्या समवेत होतेच. या माध्यमातूनच त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली. लावण्या, पोवाडे, पथनाट्ये म्हणजे त्यांच्या ललित साहित्याची पूर्वतयारी होती. त्यांनी एकूण सुमारे १५ वगनाट्ये लिहिली व त्यातूनच त्यांना प्रसिद्धीही मिळत गेली.
१९४५ च्या दरम्यान मुंबईत अण्णांच्या आयुष्याला काहीशी स्थिरता लाभली. लोकयुद्ध साप्ताहिकात वार्ताहराचे काम करीत असताना त्यांनी अकलेची गोष्ट, खापर्‍या चोर, माझी मुंबई अशी गाजलेली लोकनाट्ये लिहिली. या काळातच संत साहित्यासह अनेक प्रतिभावंतांच्या अभिजात कलाकृती त्यांनी वाचून काढल्या. वैचारिक आणि कलाविषयक वाचनाची समृद्ध लेखक व्हायला त्यांना मदत झाली. अण्णांचे लेखक म्हणून यशाचे रहस्य म्हणजे त्यांनी नेहमी सामान्य वाचकाच्या मनाची व्यथा मांडली.सामान्य वाचकालाच प्रमाण मानल्याने वस्तुनिष्ठ असलेले त्यांचे साहित्य वाचकांच्या गळ्यातील ताईत बनले.
१९५० ते १९६२ हा त्यांचा साहित्य क्षेत्रातील सुवर्णकाळ होता. याच काळात त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्ती निघाल्या. प्रचंड यशस्वी होत असताना त्यांचे स्वत:चे जीवन मात्र धकाधकीचे होत होते. मुंबई सरकारने ’लाल बावटा’ या कला पथकावर बंदी घातली होती. पुढे तमाशावरही बंदी आली. तमाशातील कलाकारांचे संसार देशोधडीला लागले. अण्णांनी तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करून तमाशा कलेचा उद्धार केला. तमाशाला लोकनाट्याचे वैभव मिळवून दिल्याने सरकारची बंदी कुचकामी ठरली.
या सुवर्णकाळातच त्यांनी वैजयंता, माकडीचा माळ, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, फकिरा अशा अनेक कादंबर्‍या लिहिल्या. ३०० च्या वर कथा लिहिल्या. खुळंवाडी, बरबाह्या कंजारी, कृष्णाकाठच्या कथा असे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत. त्यांनी स्टॉलीनग्राडचा पोवडा, महाराष्ट्राची परंपरा, मुंबईचा कामगार असे पोवाडेही लिहिले. निवडणुकीत घोटाळे, दुष्काळात तेरावा, अकलेची गोष्ट ही त्यांची वगनाट्ये प्रसिद्ध आहेत. दोनशे-अडीचशे गाणी, लावण्या त्यांनी लिहिल्या आहेत. कामगारांमध्ये त्यांची गाणी आणि लावण्या लोकप्रिय आहेत.
मराठीतील ग्रामीण, प्रादेशिक, दलित साहित्यावर अण्णा भाऊंचे प्रभुत्व होते. अण्णा भाऊंच्या साहित्याचे हिंदी, गुजराती, उडीया, बंगाली, तामिळ या भारतीय भाषांबरोबरच रशियन, झेक, पोलीश, इंग्रजी, फ्रेंच अशा जगातील २७ भाषांमधे भाषांतर झाले आहे. लेखणीचे हत्यार बनवून त्यांनी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ, स्त्रीवादी, लढाऊ अविष्काराचा दीपस्तंभ मराठी साहित्याच्या क्षेत्रात उभा केला. एवढ्या मोठ्या कर्तृत्वामुळे त्यांना प्रसिद्धी मिळत होती. अण्णांच्या १२ कथांवर चित्रपट निघाले. एवढे साहित्य प्रसिद्ध झाले तरी त्यांचे दारिद्रय संपले नाही. लक्ष्मी त्यांना प्रसन्न नव्हती. ते मितभाषी असल्याने व्यावहारिक बाबतीत लोकांनी त्यांचा गैरफायदा घेतला. परंतु चित्रपट सृष्टीतील भालजी पेंढारकर, सूर्यकांत मांढरे, जयश्री गडकर, सुलोचना यांसारख्या दिग्गज कलाकारांनी अण्णांवर खूप प्रेम केले. हिंदी चित्रपट सृष्टीतीलही राजकपूर, शंकर, शैलेंद्र, बलराज सहानी, गुरुदत्त, उत्पल दत्त या कलाकारांचे अण्णांवर प्रेम होते. ऑलेगसारखे रशियन कलावंतही अण्णा भाऊंचे मित्र होते.
लौकिक अर्थाने कोणतेही शिक्षण न घेता साहित्य क्षेत्रात जगप्रसिद्ध झालेला हा कलाकार काही दुर्दैवी (वैयक्तिक कौटुंबिक) संघर्षांमुळे खचत गेला. त्यांच्या शेवटच्या काळात महाराष्ट्र सरकारने त्यांना बरेच सहकार्य केले. मनाने खचल्यानेच १८ जुलै, १९६९ रोजी अण्णा भाऊंचे निधन झाले. त्यांच्या साहित्याच्या व कार्याच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक अन्यायामुळे जो समाज शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, त्या समाजामध्ये आत्मविश्र्वास व प्रगतीची आस निर्माण केली.

आगामी झालेले