नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत
!doctype>
हार्दिक स्वागत ......WEL COME
रविवार, ९ ऑगस्ट, २०२०
९ ऑगस्ट क्रांती दिन
चले जाव चळवळ १९४२
भारत छोडो आंदोलन ऑगस्ट क्रांती
हे ऑगस्ट १९४२मध्ये संपूर्ण स्वराज्यासाठी सूरू झालेले नागरी असहकार आंदोलन (इंग्लिश: Civil Disobedience) होते. गांधीजींच्या करा किंवा मरा हा संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. मुंबई येथे ८ ऑगस्ट १९४२ रोजी महात्मा गांधींनी भारत छोडोचा नारा देऊन ब्रिटीशांविरोधात स्वातंत्र्य प्राप्तीसाठी आंदोलन उभारले.
⚱ भारत छोडो आंदोलन
या आंदोलनाचा गुप्त मसुदा सेवाग्राम येथे ९ जुलै रोजी बापुकुटीतील आदी निवासात तयार करण्यात आला आणि १४ जुलै रोजी काँग्रेस कार्य समितीतर्फे त्याला अंतिम स्वरूप देण्यात आले. त्या मसुद्याला पुढे वर्धा ठराव म्हणून मान्यता देण्यात आली. ९ जुलै २०१८ रोजी चले जाव चळवळीचा ७५ वा वर्धापन संपन्न झाला. १९४२ साली याच तारखेला महात्मा गांधी यांनी ब्रिटीशांना चले जावचा आदेश दिला आणि त्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले.
सेवाग्राम येथे झालेल्या या मसुदा बैठकीत जनआंदोलनाचे नियम, आंदोलन पेटविण्यासाठी सर्व अधिकार महात्मा गांधींकडे देण्यात येत असल्याचे यावेळी ठरविण्यात आले होते. त्यानंतर ८ ऑगस्ट १९४२ ला मुंबई येथे ब्रिटीशांना भारत छोडो असा इशारा देण्यात आला आणि गांधींजीसह काँगेस श्रेष्ठींना अटक करण्यात आली. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वत:ला अटक करवून घेतली.
💎 चळवळीची कारणे
क्रिपस योजनेला अपयश
राज्यकर्त्यांची कृत्ये
जपानी आक्रमणे
इंग्रजांचा विरोधाभास
महात्मा गांधी यांचे वास्तव धोरण
⚖ छोडो भारत चळवळीची अपयशाची कारणे
नियोजनाचा अभाव
सरकारी नोकर इंग्रजी विरुद्ध राहिले
दडपशाही
राष्ट्र सभेच्या नेत्यांना कैद
🏮 इतर कारणे
⏰ त्रिमंत्री योजना
दुसऱ्या महायुद्धानंतर सन १९४५ मध्ये इंग्लंड सत्ता बदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली त्रिमंत्री योजना सुरूवातीपासून भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत अनुकूल होती. मार्च १९४७ मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटलीने भारताविषयी धोरण स्पष्ट केले. इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्यासंबंधी वाटाघाटी करण्याकरिता भारतात त्रिमंत्री कमिशन पाठविण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली. मेजर अॅटली यांच्या घोषणेनुसार २४ मार्च, १९४६ रोजी त्रिमंत्री कमिशन भारतात आले. स्ट्रॅफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व अलेक्झांडर हे तीन सभासद होते. या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी करून एक योजना मांडली, ही योजना म्हणेजच त्रिमंत्री योजना होय.
🙋♂ चलेजाव आंदोलन (१९४२)
क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.
मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड. गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान. कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात, ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
▶ प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ. बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.
▶ या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.
▶ सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.
▶ या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.
▶ काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.
▶ व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.
▶ मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.
▶ भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.
▶ निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.
▶ स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.
🇮🇳 भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले
क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादी गटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.
👮 नेताजी सुभाष चंद्र बोस
भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.
🔫 आझाद हिंद सेना
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
🚣 भारतीय नौदलाचा उठाव
आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.
🕵 माउंटबॅटन योजना
२४ मार्च १९४७ रोजी माऊंट बॅटन भारतात आले. भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांनी फाळणीची योजना तयार केली. ३ जून १९४७ रोजी ही योजना प्रसिध्द करण्यात आली. मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर १८ जुल, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने यांवर ठराव पास केला. ब्रिटिश पार्लमेंटने पास केलेल्या भारताविषयीचा हा ठराव म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होय. अशा रितीने स्वातंत्र्याच्या कायद्यातील तरतुदीनुसार १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत हा स्वतंत्र झाला.
🇮🇳 जयहिंद🇮🇳
🙏 स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन*
स्त्रोतपर माहिती
आगामी झालेले
-
सावित्रीबाई जोतीराव फुले 🙏 ३ जानेवारी १८३१ 🙏 ज्यांनी स्त्रियांबद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पा...
-
महर्षि विठ्ठल रामजी शिंदे Maharshi Vitthal Ramaji Shinde जन्म : २३ एप्रिल १८७३ (जमखिंडी, कर्नाटक) मृत्यू : २ जानेवारी १९४४ (पुणे, महारा...
1 टिप्पणी:
nice info
टिप्पणी पोस्ट करा