नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले ब्लॉग वर हार्दिक स्वागत 💐💐..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत ... सुस्वागतम.... ����������������

रविवार, २३ मार्च, २०२५

इयत्ता 3 री ते 5 वी निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती - इयत्ता 3 री ते 5 वी Grade 3 to 5 Nipun Bharat Study Level Determination - Grade 3 to 5

निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती - इयत्ता 3 री ते 5 वी | निपुण कृती कार्यक्रम अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता तिसरी ते पाचवी Grade 3 to 5 Nipun Bharat Study Level Determination - Grade 3 to 5

निपुण भारत अभियान शासन निर्णय - Click Here
निपुण कृती कार्यक्रम अंमलबजावणी GR - Click Here
निपुण शपथ PDF - Click Here
माता पालक गट आयडिया व्हिडिओ गट आयडिया व्हिडिओ - Click Here

विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत वर्गातील १०० टक्के विद्यार्थ्यांनी १०० टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. परंतु, नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करुन इ. २ री ते ५ वी च्या प्रत्येक वर्गातील किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आलेले आहे.

सदर कृती कार्यक्रम अंमलबजावणी कालावधी दिनांक ५ मार्च, २०२५ ते ३० जून, २०२५ असा राहील. यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे.

निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती - इयत्ता 3 री ते 5 वी

वाचन Reading अध्ययन क्षमता इ. 3 री ते 5 वी

१. वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही.

२. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी ओळखतो.

३. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो.

४. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो.

५. मजकूरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो.

६. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

७. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्ये वाचतो.

८. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो.

९. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

१०. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षर युक्त लहान वाक्ये वाचतो.

११. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो.

१२. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

१३. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो.

१४.अपरिचित मजकूरातील ६-८ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.

१५. अपरिचित मजकूरातील ६-८ सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह, योग्य गतीने व आकलनासह वाचतो.

लेखन अध्ययन क्षमता इ. 3 री ते 5 वी

१. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही.

२. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो.

३. सोपे शब्द पाहून लिहितो.

४. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला (उच्चार) ऐकून अक्षरे लिहितो.

५. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.

६. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.

७. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो.

८. २-३ शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्ये पाहून लिहितो.

९. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्ये आकलनासह पाहून लिहितो.

१०. २-३ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

११. २-३ शब्द व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो.

१२. २-३ सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

१३. २-३ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह व आकलनासह तीन ते चार वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.

१४. श्रुतलेखनाकरिता ४-५ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो.

१५. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो.

१६.४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो.
१७. ६-८ शब्दांची चार ते पाच सोपी वाक्ये ऐकून लिहितो.
१८. श्रुतलेखनाकरिता ६-८ शब्द व जोडाक्षरे यांनी युक्त चार ते पाच वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह लिहितो.

संख्याज्ञान (Numeracy) अध्ययन क्षमता इ. 3 री ते 5 वी
१) ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाहीत.
२) ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणतो.
३) ० ते ९ पर्यंतच्या वस्तू मोजतो.
४) ९ पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.
५) ० ते ९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
६) ० ते ९ पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)
७) १० ते २० संख्यानामे क्रमाने म्हणतो.
८) १० ते २० पर्यंतच्या वस्तू मोजतो.
९) २० पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.
१०) १० ते २० पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
११) १० ते २० पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)
१२) २१ ते ५० पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो.
१३) स्थानिक किंमत संकल्पना वापरून २१ ते ५० पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
१४) २१ ते ५० पर्यंतच्या संख्या लिहितो. (अंकी)
१५) ५१ ते ९९ पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो.
१६) स्थानिक किंमत संकल्पना वापरून ५१ ते ९९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
१७) ५१ ते ९९ पर्यंतच्या संख्या लिहितो. (अंकी)
१८) ० ते ९ संख्यानामे लिहितो. (अक्षरी)
१९) ० ते २० संख्यानामे लिहितो. (अक्षरी)
२०) ० ते ५० संख्यानामे लिहितो. (अक्षरी)

संख्यावरील क्रिया (Number Operations) अध्ययन क्षमता इ. 3 री ते 5 वी
१) ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही.
२) ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.
३) ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
४) ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
५) ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
६) ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
७) ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
८) ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो.
९) ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
१०) ० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
११) ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
१२) ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१३) ० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
१४) ० ते २० पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.
१५) ० ते २० पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
१६) ० ते २० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
१७) ० ते २० पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
१८) ० ते २० पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१९) ० ते २० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
२०) ० ते ५० पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
२१) ० ते ५० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
२२) ० ते ५० पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
२३) ० ते ५० पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
२४) स्थानिक किमत संकल्पना वापरून ० ते ९९ पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. (बिनहातच्याची)
२५) स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो. (हातच्याची) (यांचे उत्तर ९९ पर्यंत आहे)
२६) ० ते ९९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. (ज्यांचे उत्तर ९९ पर्यंत आहे)
२७) स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. (बिनहातच्याची)
२८) स्थानिक किमत संकल्पना वापरून ९९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकी करतो. (हातच्याची)
२९) ९९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती - इयत्ता 3 री ते 5 वी PDF डाउनलोड करा. - Click Here

अध्ययन क्षमता पडताळणी नमूना इयत्ता 3 री ते 5 वी PDF डाउनलोड करा. - Click Here

निपुण कृती कार्यक्रम अंतर्गत साध्य करावयाच्या अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता दुसरी (2री) - Click Here


निपुण कृती कार्यक्रम अंतर्गत साध्य करावयाच्या अपेक्षित अध्ययन क्षमता इ. 3 री ते इ. 5 वी - Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले