नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

रविवार, २३ मार्च, २०२५

इयत्ता २ री - निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती निकष व अध्ययन क्षमता पडताळणी तक्ता

💥 निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती निकष व अध्ययन क्षमता पडताळणी तक्ता

🔰 `अध्ययन स्तर निश्चिती फॉर्म -(इ.2 री ते 5 वी)`

https://www.shaleyshikshan.in/2025/03/Nipun-Bharat-adhyayan-star-nishchiti.html

वाचन व लेखन क्षमता

संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया क्षमता

💥 'निपुण कृती कार्यक्रम अंमलबजावणी बाबत शासन निर्णय`

https://cutt.ly/cryWntJ2

* वर्गातील 100% विद्यार्थ्यांना किमान 75% क्षमता प्राप्त असणे आवश्यक

VSK Chat Bot वर नोंदणी करणे

चावडी वाचन, नियतकालिक अहवाल

💥 निपुण भारत अभियान शासन निर्णय

* `FLN पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अंतर्गत प्राप्त करावयाची कौशल्ये`

https://bit.ly/Nipun-Bharat-Abhiyan

निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण

निपुण भारत : अध्ययन अभ्यास सर्वेक्षण विषयी सर्व सूचना ,साधने,नोंदपत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा👍


निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण २०२२-२३

सर्वसाधारण शिक्षक मार्गदर्शक सूचना
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार प्राथमिक स्तरावर सन २०२६-२७ पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे. त्यासाठी भारत सरकारने निपुण भारत Nipun-bharat अभियानाची अंमलबजावणी सुरु केली आहे. या अभियानाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्ता तिसरीपर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान विषयक क्षमता सन २०२६-२७ पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. सदर लक्ष्य गाठण्यासाठी इयत्ता व अध्ययन निष्पत्तीनिहाय बेंचमार्क निर्धारित करण्यात आलेले आहेत. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने दि. २७ ऑक्टोबर २०२१ रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

निपुण भारत अभियानाच्या लक्ष्यपूर्तीसाठी विद्याथ्यांच्या संपादणूकीच्या सध्य:स्थितीची वेळोवेळी पडताळणी होणे आवश्यक आहे. या करिता राज्यस्तरावरून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इयत्ता दुसरी ते पाचवीसाठी निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करण्यात येत आहे.

अ) निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण उद्दिष्टः- प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय व विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त /संपादित केलेल्या आहेत हे पडताळणे व त्यानुसार शिक्षकांनी उपचारात्मक अध्यापन करणे.

सर्वसाधारण शिक्षक मार्गदर्शक सूचना-

१) इयत्ता दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी विषयनिहाय व माध्यमनिहाय राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे https://www.maa.ac.in संकेतस्थळावर निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन ऑनलाईन pdf स्वरुपात शिक्षकांसाठी उपलब्ध असणार आहेत.
२) सदर सर्वेक्षण हे सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षकांनी करावयाचे आहे.
३) विद्यार्थी शिकत असलेल्या पूर्वीच्या/पाठीमागील इयत्तेच्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधन तयार करण्यात आलेले आहे.
४) इयत्ता दुसरी ते पाचवीला प्रथम भाषा, गणित, परिसर अभ्यास, तृतीय भाषा या विषयांच्या शिक्षकांनी आपण अध्यापन करीत असलेल्या विषयाच्या सर्वेक्षण साधनाची एकच प्रिंट अथवा फोटो कॉपी करण्यात यावी. प्रती विद्यार्थी सर्वेक्षण साधन प्रिंट अथवा फोटो कॉपी करण्याची गरज नाही.
५) सदर सर्वेक्षण प्रत्येक विद्यार्थीनिहाय मौखिक स्वरूपात घ्यावयाचे आहे. मात्र काही प्रश्नांच्या/ कृतींच्या बाबतीत लेखी प्रतिसाद घ्यावयाचा असल्यास तो विद्यार्थ्यांच्या वहीमध्ये किंवा आखीव ताव/ पेपरवर घ्यावा.
६) निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण करताना वर्गात तणावमुक्त वातावरणात राहील, याची काळजी घ्यावी.
७) सर्वेक्षणास सुरवात करण्यापूर्वी इयत्ता व विषयनिहाय आवश्यक असलेले साहित्य शिक्षकांनी उपलब्ध करून ठेवावे.
८) दिव्यांग विद्यार्थ्याच्या बाबतीत सदर चाचणी घेण्याबाबतचा निर्णय संबंधित विद्यार्थ्यांचा दिव्यांग प्रकार लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी घ्यावा. आवश्यकतेनुसार विशेष तज्ज्ञ किंवा विशेष शिक्षक यांची मदत घ्यावी.
९) सर्वेक्षण साधनातील प्रश्न विद्यार्थ्याला क्रमवार विचारावे अथवा सोडवण्यास सांगावे. सर्वेक्षण साधनातील दिलेले प्रश्न/कृती चित्रे, उदाहरणे, परिच्छेद इत्यादी आवश्यतेनुसार विद्यार्थ्यांना दाखवावेत किंवा फलकावर लिहावेत.
१०) विद्यार्थ्याला प्रश्न / कृती सोडवण्यासाठी अथवा उत्तराचा प्रतिसाद देण्यासाठी पुरेसा वेळ द्या. विद्यार्थी काहीच प्रतिसाद देत नसेल तर पुढील प्रश्नाकडे / कृतीकडे जावे.
११) निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधनामध्ये अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नांचे मूल्यांकन करण्यासाठी मूल्यांकन रुबिक देण्यात आलेले आहे.
१२) प्रत्येक विद्यार्थ्यांला विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीवरील प्रत्येक प्रश्नाच्या/कृतीच्या प्रतिसादाची नोंद निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी करावी. ही नोंद अध्ययन निष्पत्तीनिहाय प्रश्न विचारून आलेल्या प्रतिसादानुसार मूल्यांकन रुब्रिक मधील निकषानुसार त्या त्या वेळी करावी. सोबत निपुण भारतः अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रक जोडण्यात आलेले आहे. शिक्षकांनी प्रत्येक विषयासाठी आवश्यकतेनुसार प्रिंट अथवा फोटो कॉपी काढाव्यात अथवा असा नमुना आपण स्वतः तयार करावा.
१३) "मूल्यांकन रुब्रिक" मध्ये प्रामुख्याने चार मूल्यांकन निकष देण्यात आलेले आहेत. सर्वेक्षण साधन मधील अध्ययन निष्पत्तीवर आधारित विचारलेल्या प्रश्नाच्या प्रतिसादावरून विद्यार्थ्यांच्या संपादणूकीचे वर्गीकरण मूल्यांकन रुबिक नुसार श्रेणी ३. श्रेणी २. श्रेणी १. श्रेणी ० - यापैकी एका श्रेणीमध्ये होईल.
१४) प्रत्येक प्रश्नावरील विद्यार्थी प्रतिसादानंतर शिक्षकांनी मूल्यांकन रुब्रिक निकषानुसार श्रेणी निश्चित केल्यानंतर निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद पत्रकामध्ये शिक्षकांनी योग्य त्या ठिकाणी अशी टिक/खूण करावी
१५. उदा. निपुण भारत: अध्ययन अभ्यास सर्वेक्षण श्रेणी नोंद नमुना प्रपत्र

निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती - इयत्ता 2 री ते 5 वी | निपुण कृती कार्यक्रम अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता दुसरी ते पाचवी

निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती - इयत्ता 2 री ते 5वी | निपुण कृती कार्यक्रम अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता दुसरी ते पाचवी

निपुण भारत अभियान शासन निर्णय - Click Here
निपुण कृती कार्यक्रम अंमलबजावणी GR - Click Here
निपुण शपथ PDF - Click Here
माता पालक गट आयडिया व्हिडिओ गट आयडिया व्हिडिओ - Click Here

विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमांतर्गत वर्गातील १०० टक्के विद्यार्थ्यांनी १०० टक्के अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे. परंतु, नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करुन इ. २ री ते ५ वी च्या प्रत्येक वर्गातील किमान ७५ टक्के विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे ध्येय या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आलेले आहे.

सदर कृती कार्यक्रम अंमलबजावणी कालावधी दिनांक ५ मार्च, २०२५ ते ३० जून, २०२५ असा राहील. यासाठी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या कौशल्यांमधील अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असल्याची पडताळणी करण्यात येणार आहे.

निपुण भारत अध्ययन स्तर निश्चिती - इयत्ता 2 री
वाचन अध्ययन क्षमता इ. 2 री -
१. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी (उच्चार) ओळखत नाही.
२. वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्याचे ध्वनी (उच्चार) ओळखतो.
३. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे दोन अक्षरी शब्द वाचतो.
४. सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे तीन ते चार अक्षरी शब्द वाचतो.
५. मजकूरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो.
६. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
७. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.

८. परिचित मजकूरातील २ ते ३ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.
९. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
१०. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.
११. परिचित मजकूरातील ३ ते ५ सोप्या शब्दांनी व तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.
१२. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
१३. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो.
१४. अपरिचित मजकूरातील ४ ते ५ सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे, विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो.

लेखन अध्ययन क्षमता इ. 2 री -
१. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही.
२. वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो.
३. सोपे शब्द पाहून लिहितो.
४. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला (उच्चार) ऐकून अक्षरे लिहितो.
५. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.
६. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो.
७. श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे, स्वरचिन्हेयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो.
८. २-३ शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची एक ते दोन सोपी वाक्ये पाहून लिहितो.
९. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली दोन ते तीन वाक्ये पाहून लिहितो.
१०.२-३ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
११. २-३ शब्द व जोडाक्षरयुक्त एक ते दोन वाक्ये ऐकून विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो.
१२. २-३ सोप्या शब्दांची दोन ते तीन सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
१३.२-३ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह तीन ते चार वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो.
१४. श्रुतलेखनाकरिता ४-५ शब्दांची एक ते दोन सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो.
१५. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो.

१६. ४-५ सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त दोन ते तीन वाक्ये विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो.

संख्याज्ञान (Numeracy) अध्ययन क्षमता इ. 2 री
१. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाहीत.
२. ० ते ९ संख्यानामे क्रमाने म्हणतो.
३. ० ते ९ पर्यंतच्या वस्तू मोजतो.
४. ९ पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.
५. ० ते ९ पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
६. ० ते ९ पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)
७. १० ते २० संख्यानामे क्रमाने म्हणतो.
८. १० ते २० पर्यंतच्या वस्तू मोजतो.
९. २० पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवितो.
१०. १० ते २० पर्यंतच्या संख्या ओळखतो/वाचतो.
११. १० ते २० पर्यंत संख्या लिहितो. (अंकी)

संख्यावरील क्रिया (Number Operations) अध्ययन क्षमता इ. 2 री

१. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही.
२. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो.
३. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
४. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
५. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो.
६.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो.
७. ० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
८. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकीची उदाहरणे सोडवितो.
९. ० ते ४ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१०.० ते ४ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.
११.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो.
१२.० ते ९ पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो.
१३.० ते ९ पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो.

➡️ Share with your friends

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आगामी झालेले