नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले ब्लॉग वर हार्दिक स्वागत 💐💐..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत ... सुस्वागतम.... ����������������

रविवार, ३१ मे, २०२०

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर

पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर

 🚩जन्म : ३१ मे  १७२५ (चौंडीगाव , जामखेडतालुका, अहमदनगर , महाराष्ट्र, भारत)
🚩मृत्यू : १३ ऑगस्ट १७९५ ( महेश्वर )
पूर्ण नाव : अहिल्याबाई खंडेराव होळकर
पदव्या : पुण्यश्लोक
अधिकारकाळ : ११ डिसेंबर १७६७ - १३ ऑगस्ट  १७९५
राज्याभिषेक : ११ डिसेंबर १७६७
राज्यव्याप्ती : माळवा
राजधानी : इंदोर
पूर्वाधिकारी : खंडेराव होळकर
दत्तकपुत्र : तुकोजीराव होळकर
उत्तराधिकारी : तुकोजीराव होळकर
वडील : माणकोजी शिंदे
राजघराणे : होळकर
🎠 *जीवन*
अहिल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते. अहिल्यादेवी यांचे आजोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखळी हे गांव होते. त्यांच्या मामांचे आडनाव मैंदाड होते. स्त्रीशिक्षण फारसे प्रचलित नसतानाही तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या वाचण्यास शिकवले होते.
               बाजीराव पेशव्यांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास जाताना चौंडीस थांबले होते. आख्यायिकेनुसार, ८ वर्षाच्या अहिल्यादेवींना, मल्हाररावांनी एका देवळात बघितले. मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला, स्वतःचा मुलगा खंडेराव याची वधू म्हणून आणले.
              मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत. अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इ.स. १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत धारातीर्थी पडले. त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही. १२ वर्षांनंतर, मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले. त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या. त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.
              एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" म्हटले आहे. इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन , इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केली आहे.
          ह्या भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदातीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले.
             अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या.
          राणी अहिल्यादेवी यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट बांधले, किंवा त्यांचा जीर्णोद्धार केला; महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या. त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले. त्यांत द्वारका, काशी, उज्जैन, नाशिक व परळी वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महंमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून अहिल्यादेवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट देतात बाईंंना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती.

👸🏻 *शासक*
               इ.स. १७६५ मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते.
          "चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ दिवस मुकाम करू शकता.तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करतांना,मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा."
              पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता, पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात.
                 पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने तिला विरोध केला होती त्यास चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही नर्मदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे, हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते. त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले, अनेक उत्सव भरवले, हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने दिली. माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे, घाट, विहिरी, तलाव व धर्मशाळा बांधल्या.
           भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे- काशी, गया, सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हरिद्वार, कांची, अवंती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी वगैरे. अहिल्यादेवींस, सावकार, व्यापारी, शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे. परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणवू दिले नाही. त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासून चालविला होता, असे दिसते.
          अहिल्यादेवींनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्या पाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इंदुरातील नागरिकांनी त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवर्षी, जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो. भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला.
         अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ, इंदूर येथील विश्व विद्यालयास त्यांचे नाव दिले आहे. तसेच त्यांचे नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे.
               भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहिल्यादेवी सोडवू शकल्या नाहीत. तरीही, त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमीन दिली आणि त्यांना, त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अधिकार दिला. याही बाबतीत, (आंग्ल लेखक) 'माल्कम' यांच्यानुसार, अहिल्यादेवींनी 'त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.
                 महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, संगीत, कला व उद्योग यांची संस्थाच होती. महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंतफंदी यांना व संस्कृत विद्वान खुशालीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला. कारागरांना, मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे. त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणीपण सुरू केली.
          एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील भारतीय, इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की, अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात, त्या काळी व आताही, संताचा सन्मान दिला जातो. इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.

🔮  *अहिल्यादेवी यांच्याबद्दलची मते*

        "अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या. मध्य भारताच्या इंदूरमधील त्याचा राज्यकाळ सुमारे तीस वर्षे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे त्या काळात जनतेची भरभराट झाली. अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतरही लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला."
             "ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते, तसेच अहिल्यादेवी ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती. तिच्या चांगल्या बुद्धीचे, चांगुलपणाचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते. अशी अहिल्यादेवी ही एक महान स्त्री होती."        
                "आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले. नाना फडणवीसांसकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वांत शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.
           अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्यादेवींना 'तत्त्वज्ञानी राणी' असे संबोधतात. याचा संदर्भ बहुतेक 'तत्त्वज्ञानी राजा' भोज याच्याशी असावा.
           अहिल्यादेवी होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकर्त्या होत्या. सन १७७२ मध्ये पेशव्यांना लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांबरोबर हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती. त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे त्यांनी नोंदले आहे. " वाघासारखे इतर प्राणी हे शक्ती वा युक्तीने मारले जाऊ शकतात, परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते. सरळ त्याच्या चेहर्‍यावर वार केल्यासच ते मरते. एकदा त्याच्या मजबूत पकडीत सापडल्यावर ते त्याच्या शिकारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इंग्रजांचा मार्ग आहे. हे बघता, त्यांच्यावर मात करणे कठीण आहे.
          "या इंदूरमधील शासकांनी, त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वांस चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले. व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले, व्यापार वाढला, शेतकरी हे शांततेत व दबावरहित होते. कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहिल्यादेवीना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हिसकावून घेईल म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपर्यंत, रस्त्यांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते, विहिरी केल्या होत्या, पथिकांसाठी विश्रांतीगृहे. गरीब ,घर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार, सर्व मिळत होते. बहुत काळापासून, भिल्ल लोक पहाडांतून सामानाची ने-आण करत असतांना लूटमार करीत असत. अहिल्याबाईंनी त्यांना त्यातून मुक्ती मिळवून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधी त्यांना देऊ केली. सर्व समाजाला अहिल्यादेवी आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी. त्यांच्या कन्येने तिचा पती, यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्यादेवींच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते.
          वयाच्या ७०व्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांची प्राणज्योत निमाली.
             भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाळ, जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले. याच्या मागे अहिल्यादेवीची दूरदृष्टी होती.
             अहिल्यादेवीच्या सन्मान व स्मृतिप्रीत्यर्थ भारत सरकारने २५ ऑगस्ट १९९६ या दिवशी एक डाक तिकिट जारी केले.
             या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव   "देवी अहिल्याबाई विमानतळ" असे ठेवण्यात आले आहे, आणि इंदूर विद्यापीठास "देवी अहिल्या विश्वविद्यालय" असे नाव देण्यात आले आहे".
                   तसेच महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ असे करण्यात आले आहे.

🏤 *होळकर यांची देशभरातील कामे*

अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
अंबा गाव – दिवे.
अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ,गोपाल,चिटणीस,बालाजी,अंकपाल,शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट,विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व कुंड.
इंदूर – अनेक मंदिरे व घाट
ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
कर्मनाशिनी नदी – पूल
काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
कोल्हापूर(महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
गया (बिहार) – विष्णुपद मंदिर.
गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
चांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) – विष्णु व रेणुकेचे मंदिर.
चिखलदा – अन्नछत्र
चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
जगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
जळगांव(महाराष्ट्र) - राम मंदिर
जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
जामघाट – भूमिद्वार
जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हार गौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
तराना – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
द्वारका(गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजार्‍यांना काही गावे दान.
श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
नैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
नैम्बार (मप्र) – मंदिर
पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
पंढरपूर(महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप ,धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली.
पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
पुणतांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
पुणे (महाराष्ट्र) – घाट
पुष्कर – गणपती मंदिर, मंदिरे, धर्मशाळा व बगीचा.
प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णु मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
बिठ्ठूर – ब्रह्मघाट
बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
भरतपूर – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
भीमाशंकर (महाराष्ट्र) - गरीबखाना
भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर
मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
मनसा – सात मंदिरे.
महेश्वर - शंभरावर मंदिरे,घाट व धर्मशाळा व घरे.
मामलेश्वर महादेव – दिवे.
मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान, श्री राधाकृष्णमंदिरे, धर्मशाळा ,विहिर, बगीचा इत्यादी.
रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
वाफेगाव (नाशिक)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
श्री विघ्नेश्वर – दिवे
वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
वेरूळ(महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
श्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर (महाराष्ट्र) – विहीर.
श्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल, आंध्रप्रदेश) – शिवाचे मंदिर
संगमनेर (महाराष्ट्र)– राम मंदिर.
सप्‍तशृंगी – धर्मशाळा.
संभल (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
सरढाणा मीरत – चंडी देवीचे मंदिर.
साखरगाव (महाराष्ट्र)– विहीर.
सिंहपूर – शिव मंदिर व घाट
सुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)– मंदिर
सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र
सोमनाथ मंदिर, धर्मशाळा, विहिरी.
सौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
हरिद्वार (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
हांडिया – सिद्धनाथ मंदिरे,घाट व धर्मशाळा
हृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर

📚  *प्रकाशित पुस्तके*

▪'अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा
▪'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम
▪'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे
▪अहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी. खेर)
▪अहिल्याबाई होळकर : लेखक - म.श्री. दीक्षित
▪अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
▪कर्मयोगिनी : लेखिका - विजया जहागीरदार
▪पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (जनार्दन ओक)
▪महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी
▪अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
▪शिवयोगिनी (कादंबरी, लेखिका - नीलांबरी गानू)
▪'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर

📽 *चित्रपट*

            "देवी अहिल्याबाई" या नावाचा एक चित्रपट सन २००२ मध्ये आला होता. त्यात शबाना आझमी हिने हरकूबाईची-(खांडा? राणी, मल्हारराव होळकरांची एक पत्‍नी) भूमिका केली होती. चित्रपटात सदाशिव अमरापूरकर यांची मल्हारराव होळकर (अहिल्याबाईचे सासरे) म्हणून भूमिका होती.
         अहिल्याबाईच्या जीवनावर इंदूरच्या Educational Multimedia Research Centerने एक २० मिनिटांचा माहितीपट बनवला होता.

          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

   🙏 *विनम्र अभिवादन* 🙏
                 स्त्रोतपर माहिती 

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन World No-Tobacco Day

जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन 
World No-Tobacco Day

31 मे हा जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख.
जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य राष्ट्रांनी १९८७ मध्ये हा दिवस पाळण्यास सुरुवात केली. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट तंबाखूचे दुष्परिणाम, त्यामुळे होऊ शकणारे रोग आणि प्रतिबंधात्मक उपाय याविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. या दिवशी, तंबाखू वापरण्याचे धोके, तंबाखू उत्पादकांच्या व्यवसाय पद्धती आणि तंबाखूच्या साथीचा सामना करण्यासाठी डब्लूएचओने उचललेल्या पावलांकडे जागतिक पातळीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो.

तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धुम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

तंबाखू सेवन व्याप्ती आणि परिणाम
तंबाखू सेवनाने भारतात साधारणत: 10 लाख लोक विविध आजारांनी मृत्यू पावत असल्याचे निदर्शनास आले आहे. महाराष्ट्रात साधारणत: 36 टक्के पुरुष व 5 टक्के महिला तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करतात. तंबाखूमुळे हृदयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफ्फुसाचे आजार, टि.बी. यासारख्या प्राणघातक आजारांना बळी पडतात. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुंसकत्व, कमी वजनाचे व्यंग असलेले-मृत्यू पावलेले बाळ जन्माला येणे यासारख्या व्याधी जडण्याचे प्रमाणही वाढते. यामुळे लोकांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बिडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्या तंबाखूच्या पदार्थांचे व्यसन मोठ्या प्रमाणात केले जाते.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम

केंद्र आणि राज्य सरकारच्या सहयोगाने राज्यात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत असून व्यसन करणारे लोक व मुले व्यसनाला बळी पडून अकाली मृत्यू कमी व्हावेत यासाठी व्यापक प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. जनजागृतीमुळे या व्यसनाचे गंभीर परिणामही जनतेपर्यंत पोहोचवले जात आहेत. या कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखूजन्य पदार्थ विकणे वा विकायला लावण्यास प्रतिबंध, तंबाखूचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्व यावर बंदी, शैक्षणिक संस्थेचा 100 यार्ड परिसरात तंबाखू विक्रीवर बंदी, तंबाखू उत्पादनावर धोक्याच्या सुचना देणे याचा अंतर्भाव होतो. शासकीय कार्यालयात व परिसरात या पदार्थांच्या सेवनावर कडक बंदी असून अशा लोकांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार कायद्याने अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तंबाखू सेवन ही शालेय मुलांमध्ये आज सर्वांत मोठी चिंतेची बाब असून लहान मुलांमधील व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्वत: व्यसन न करता व्यसनापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ज्येष्ठांचेच अनुकरण लहान मुले करतात व परिणामी वाढत्या वयात मुले व्यसनाधीन होतात. त्यामुळे व्यसनापासून मुक्तता ही योग्य वयातच झाली पाहिजे. व्यसनापासून परावृत्त होण्यासाठी व्यायाम, प्राणायाम, योगासने, आवडीचा छंद जोपासून त्यात रममाण होणे, व्यसनी संगतीपासून लांब राहणे, वैद्यकीय मदत घेणे यासारखे उपाय करता येतील. व्यसनमुक्तीकडे सुरु असलेल्या प्रक्रियेमध्ये समाजातील सर्व स्तरावरील घटकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा आहे.

आपली जबाबदारी
व्यसनाधिनतेचे परिणाम आपल्या आजूबाजूला व्यसनामध्ये अडकलेल्या लोकांना सांगुन त्यांना व्यसनापासून रोखणे व त्यांना त्यापासून परावृत्त करणे ही आपल्या सर्वांची सामुहिक जबाबदारी आहे. आपण सर्वजण मिळून जर या व्यसनाधीनतेच्या विरुद्ध एल्गार केला आणि तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाला विरोध केला तर नक्कीच भारतीय नागरिकांचे व भारताचे आरोग्य स्वस्थ आणि बलशाली होण्यास मदत होईल हीच अपेक्षा.

🙏व्यसनमुक्तीची विशाल वाट🚭🌴
तंबाखू,धूम्रपान व्यसनाला सर्वजण दूर सारू
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||धृ||

तंबाखू,धूम्रपानामध्ये रसायन घटक आहे
दर सहा सेकंदाला माणूस मरतो आहे
फसव्या या मृगजळाला तूच बाहेर काढ ना
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||१||

तंबाखु,धूम्रपान व्यसनाने कर्करोग होतो
आपल्याच हातांनी आपण जीवन संपवितो
नुसत्या या चैनीपायी आयुष्य नका संपवू
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||२||

तंबाखू,धूम्रपान व्यसनाने मानव निस्तेज होतो
कुविचारांचे जाळे मनी आपण सतत गुंफतो
स्मर आईवडिलांना तू घडवी तुझ्या जीवना
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||३||

तंबाखू,धूम्रपान हे शरीराला घातक आहे
आपल्याला सर्वांना हे जिद्दीने सोडायचे आहे
घरा-घरातुनी,मानवाला हा विचार सांग ना
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||४||

तंबाखू,धूम्रपानाला आळा आता बसत आहे
सलाम मुंबई फौंडेशनच्या मार्गाने जात आहे
अजय पिंळणकर दादांचे विचार तुम्ही जाण ना
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||५||

तंबाखू,धूम्रपान सोडून निरोगी जीवन जगू
आपल्या कुटुंबासोबत हसत खेळत राहू
व्यसनमुक्तीची विशाल हाक तुम्ही ऐका ना
जीवनातला अंधकार व्यसनमुक्तीने दूर करू ||६|| 

२०२१ सालची थीम Commit to quit.&quot
जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 ची थीम आहे 
“तंबाखू पर्यावरणासाठी धोकादायक आहे."
संकलित पोस्ट

शुक्रवार, २९ मे, २०२०

गणेश प्रभाकर प्रधान

गणेश प्रभाकर प्रधान                                                                     (स्वातंत्र्य सैनिक, विचारवंत)          
  जन्म : २६ ऑगस्ट १९२२                        
 मृत्यू : २९ मे २०१०                                                                                                  हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते. ते १८ वर्षे आमदार होते; यांतील २ वर्षे ते विरोधी पक्षनेता होते. महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सभापती होते.

प्रधानांनी मराठी व इंग्रजीत विपुल प्रमाणात प्रासंगिक लेखन केले आहे. ते साधना साप्ताहिकाचे मानद संपादक होते. साने गुरुजींचे ते वारसदार समजले जातात. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे.

💁‍♂️ *जीवन*
ग.प्र. प्रधानांना एकूण ९ भावंडे होती, त्यापैकी गणेश सर्वांत लहान होते. वडील ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक होते.

पुण्यात विद्यार्थिदशेतच ते ना. ग. गोरे व एस.एम. जोश्यांच्या कार्याने प्रभावित झाले होते. त्यांनी इ.स. १९४२च्या भारत छोडो आंदोलनातही सक्रिय भाग घेतला होता. त्यांना त्यासाठी १३ महिने येरवड्याच्या तुरुंगात जावे लागले. त्यांनी समाजवादी कॉग्रेस पक्ष व राष्ट्र सेवादलासाठी काम केले. पुढे १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात ते पुन्हा वर्षभर येरवड्याच्या तुरुंगात होते.
ग.प्र. प्रधान १९४५ पासून पुढे २० वर्षे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयांत इंग्रजीचे विद्यार्थिप्रिय व व्यासंगी प्राध्यापक होते.

⚜️ *राजकारण*
ते प्रजासमाजवादी पक्षातर्फे १९६६ साली पदवीधर मतदार संघातून निवडून आले. पुढे त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापतिपद भूषविले.

प्रा. प्रधान यांनी "टॉलस्टॉयशी पत्रसंवाद' साधला होता.

🌀 *अखेर*
अखेरच्या काळात प्रधानांचा सदाशिव पेठेतील वडिलोपार्जित सुरेख वाडा त्यांनी एका सामाजिक संस्थेला दान केला, आणि स्वत: सोबत फक्त काही पुस्तके, ग्रंथ, वापरायचे चार कपडे घेऊन पुण्याच्या हडपसर येथील सानेगुरुजी रुग्णालयातल्या एका भाड्याच्या खोलीत राहायला गेले. शनिवार २९ मे २०१० रोजी वयाच्या ८८व्या वर्षी त्यांची त्याच हाॅस्पिटलमध्ये प्राणज्योत मालवली. त्यांनी मरणोत्तर नेत्रदान आणि देहदान केले. ग.प्र. प्रधान अखेरच्या क्षणापर्यंत फक्त आणि फक्त समाजहितासाठीच जगले.

📚✍️ *ग.प्र. प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके (एकूण १४ पुस्तके)*
आगरकर लेखसंग्रह
इंडियाज फ़्रीडम स्ट्रगल : ॲन एपिक ऑफ सॅक्रिफाईस ॲन्ड सफरिंग (इंग्रजी)
परस्यूट ऑफ आयडियल्स (इंग्रजी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत
महाराष्ट्राचे शिल्पकार - ना. ग. गोरे
माझी वाटचाल
लेटर टु टॉलस्टॉय (इंग्रजी)
लोकमान्य टिळक – अ बायोग्राफी (इंग्रजी)
लोकमान्यांची राजकीय दूरदृष्टी आणि ज्ञानाचे उपासक
सत्याग्रही गांधीजी
साता उत्तरांची कहाणी                  
                                                   
          🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏🌹 *विनम्र अभिवादन* 🌹🙏
स्त्रोतपर माहिती 

गुरुवार, २८ मे, २०२०

विनायक दामोदर सावरकर

विनायक दामोदर सावरकर
विज्ञाननिष्ठ, महान क्रांतिकारक
जन्मदिन - २८ मे १८८३
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे एक महान देशभक्त, जहाल क्रांतिकारक, झुंजार स्वातंत्र्यसेनानी, धैर्याचे मेरुमणी, प्रतिभासंपन्न कवी, सिध्दहस्त लेखक, नाटककार, प्रखर बुद्धिवादी, विज्ञानवादी, हिंदुत्ववादी, तत्त्वनिष्ठ राजकारणी, सहस्रावधी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते, चिंतनशील, कर्ते समाजसुधारक, भाषा शुध्दीचे प्रवर्तक आणि यंत्रयुगाचे समर्थक असे विविध पैलू होते.

'मी समुद्रात टाकलेली उडी लोक विसरले तरी चालेल, पण माझा सामाजिक विचार त्यांनी  विसरू नये' या त्यांच्या प्रतिपादनातून ते साजसुधारणांना किती महत्त्व देत होते हे समजून येते. ते हिंदू समाजापुरते बोलत आणि लिहीत होते. तरीपण त्यांना विज्ञाननिष्ठ, पोथीमुक्त आणि ऐहिकतेचे भान असलेला भारतीय समाज घडवायचा होता. सर्व पंथांना एकत्र करून आचार विचार भेद न मानता 'या भूमीला पितृभू आणि पुण्यमू मानणारे ते हिंदू' अशी माझी बौध्दिक व्याख्या आहे, असे ते म्हणत. त्यांच्या सामाजिक विचारांचा हिंदुत्व हा गाभा होता. त्यांनी आधुनिक विश्वसंस्कृतीस हिंदुत्वाला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदू धर्मग्रंथांचा, शास्त्रांचा अनुकूल असा अर्थ लावला नाही. त्यांनी वेदांचे प्रामाण्य मानले नाही. ते मनुस्मृतीला, वेदांना अभ्यासनीय, आदरणीय ग्रंथ मानत. पण ते अनुकरणीय नाहीत हे सुध्दा परखडपणे सांगतात. विज्ञानयुगाची, यंत्रयुगाची कास धरण्याचे आवाहन करतात. आधुनिकीकरण ही एक मानसिक प्रक्रिया असल्यामुळे मानसिक आधुनिकीकरणासाठी सर्वप्रथम धर्मग्रंथाचे दास्य झुगारून दिले पाहिजे, असे त्यांचे मत होते. धर्मग्रंथ हे ईश्वरनिर्मित आहेत, हे त्यांना मान्य नव्हते तर धर्मग्रंथ मानवनिर्मित आहेत, अशी त्यांची धारणा होती. त्यांचे सामाजिक विचार हे इहवादावर आणि भौतिकवादावर आधारित होते. तरीपण ते अध्यात्माचे वैयक्तिक स्तरावर महत्त्व मान्य करीत. विज्ञानाच्या संशोधन ग्रंथांनाच ते धर्मग्रंथ मानतात. बुध्दीची प्रतिष्ठापना केल्यावर जो धर्म समाजात अस्तित्वात राहील त्यालाच ते विज्ञानधर्म मानतात. हिंदुस्थानला धार्मिक अज्ञानाच्या तमोयुगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हे आपले पवित्र कर्तव्य आहे, हाच खरा धर्म आहे, असे ते म्हणतात. धर्मनिष्ठा बाजूला केल्याशिवाय विज्ञाननिष्ठा प्रस्थापित होत नाही, विज्ञानधर्माशिवाय माणसाचा विकासच होऊ शकत नाही, असे त्यांचे ठाम मत होते.

ते विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिनिष्ठ असल्याने प्रत्क्षनिष्ठ आणि प्रयोगसिध्द विज्ञानच आजच्या परिस्थितीत आमच्या राष्ट्राचा वेद झाला पाहिजे, असे त्यांचे ठाम प्रतिपादन होते. पाच हजार वर्षांपूर्वीच्या अज्ञानयुगाकडे पाठ फिरवा आणि विज्ञानुगाचे स्वागत करा, अशी त्यांची भूमिका असल्यामुळे त्यांनी शुध्द इहवाद मांडला. ते गाईला-बैलाला उपयुक्त पशू मानत. त्यांना देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहूनही नीच मानण्यासारखे आणि माणुसकीला कमीपणा आणणारे आहे, असे ते म्हणत. गोमतापूजन, सत्यनारायण, वास्तुशांती या गोष्टी त्यांना वेडेपणाच्या वाटत. गाय ही बैलाची माता आहे, मनुष्याची नव्हे अशा भाषेत ते गाईबद्दल धर्मश्रध्देची चिकित्सा करतात.

2 मे 1921 रोजी सावरकरांची रत्नागिरीमध्ये स्थानबध्दता आणि कोणत्याही राजकीय आंदोलनात भाग न घेण्याच्या मुख्य अटींवर सुटका करण्यात आली. अंदामानातील बंदिवासात आणि रत्नागिरीतील 1924 ते 1937 या तेरा वर्षांच्या स्थानबध्दतेच्या कालखंडात त्यांनी सखोल असे समाजचिंतन केले. या काळात त्यांनी सामाजिक आंदोलनावर, समाज प्रबोधनावर आणि विज्ञानाच्या प्रसारावर लक्ष केंद्रित केले. जातिभेदाचे उन्मूलन, अस्पृश्यता निवारण, भाषाशुध्दी, अंधश्रध्दा निर्मलून, लिपी सुधारणा, हिंदूंचे संघटन आणि शुद्धिकरण हे त्यांनी आपले कार्यक्षेत्र निश्चित केले. त्यासाठी व्याख्याने देणे, लेख लिहिणे, विचार विनिमय, चर्चा, प्रश्नोत्तरे शंकांचे समाधान, वैयक्तिक गाठीभेटी याद्वारे सवर्णांचे प्रबोधन आणि दलितांमध्ये जाणीवजागृतीला त्यांनी सुरुवात केली. सनातन्यांचा, धर्ममार्तंडांचा आपल्या कार्याला विरोध होणार, प्रतिकूल ते घडणार हे त्यांनी गृहीत धरलेले होतेच. परंतु सावरकरांच्या चार वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर रत्नागिरीतील बहुतांशी लोकांची मानसिकता समाजसुधारणांना अनुकूल होऊ लागली.

हिंदूंच्या समाजजीवनावर आघात करणार आणि हिंदूंनी आपल्या हातांनी हौसेने पायात घालून घेतलेल्या वेदोक्त बंदी, व्यवसाय बंदी, स्पर्शबंदी, सिंधुबंदी, शुध्दीबंदी, रोटीबंदी आणि बेटीबंदी या सात बेड्या तोडून घेतल्याशिवाय राष्ट्र त्याग केला पाहिजे. परधर्मात गेलेल्या किवा परधर्मीयांना हिंदू धर्मात घेता आले पाहिजे. त्यांना समतने आणि ममतेने वागवावे, अशी त्यांची शिकवण होती. यज्ञाने पाऊस पडतो हे साफ कोटे असून यज्ञात तुपाचा एक थेंबही वाया गावू नका

असे ते सांगत. यज्ञाने पेटलेल्या भारतात दुष्काळ कसे पडतात? असा सवाल ते विचारतात. रत्नागिरीत अस्पृश्यतेचा पुतळा जाळण्यासाठी त्यांनी तरुणांना संमती दिली.
त्यांनी केलेले कार्य म्हणजे देशभक्तीचे, मानवतवादी, चिरकालीन महत्त्वाचे आहे, असे त्यांनी म्हटले होते. सावरकरांचे हिंदुत्वाबद्दलचे, हिंदू राष्ट्राबद्दलचे विचार हे वादग्रस्त असू शकतील, पण त्यांचे पोथीमुक्तीचे, विज्ञानवादी, सुधारणावादी आणि इहवादी विचार त्यांच्या अनुयायांनाही पेलले नाहीत. पण त्यांचे हे विचार सगळ्यांनीच स्वीकारले, अमलात आणण्याच्या दृष्टीने पावले टाकली तर जातिवादचे, अंधश्रद्धांचे निर्मूलन होऊन जग सर्वांगीण प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करू शकेल. अशा या विज्ञानवादी, समाजसुधारक, उत्कट देशभक्तीचे प्रतीक झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतश: नमन 🙏🏼
========================
संकलित माहिती 

शुक्रवार, २२ मे, २०२०

जागतिक जैवविविधता दिन


जागतिक जैवविविधता दिन
दरवर्षी जगभरात २२ मे हा दिवस जागतिक जैवविविधता दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाकडून २००१ पासून हा दिवस साजरा करण्यात येऊ लागला.
जैवविविधता म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाति, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱ्याच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्णप्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते.
झपाट्याने होणाऱ्या परिसरातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यत पाच वेळा मोठ्या प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे. फेनेरोझोइक महाकल्पामध्ये (५४ कोटी वर्षांपूर्वी) जैवविविधतेचा महाविकास ‘कॅम्ब्रियनकल्पामधील विविधतेचा स्फ़ोट’ या नावाने ओळखला जातो. बहुपेशीय सजीवांमधील सर्व संघांची (फायलम) निर्मिती झालेली होती. त्यांपुढील ४० कोटी वर्षांमध्ये जैवविविधतेचा पुन्हा पुन्हा नाश झालेला होता. ‘कार्बोनिफेरस’ युगामध्ये सदाहरित वनांमधील वनस्पति आणि प्राण्यांचा नाश झाला. ‘पर्मियन ट्रायासिक’ युगामध्ये २५ कोटी वर्षांपूर्वी झालेला जैवविविधतेचा नाश सर्वात मोठा होता. तीन कोटी वर्षांपूर्वी पृष्ठवंशी सजीवांनी पुन्हा एकदा आपला जम बसवला. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झालेला ‘क्रिटेशियस –टर्शरी विनाश’ हा नजीकच्या काळातील जैवविविधतेचा नाश होय. याच काळात डायनोसॉर नष्ट झाले. जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळू हळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा हा ता नाश होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जैव विविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी इसवी सनाचे २०११-२०२० हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.पूर्वी घराच्या आजूबाजूला वेगवेगळी फळांची व फुलांची झाड लावली जायची जेणेकरून त्यावर पक्षी फुलपाखर बाग्डवीत पण आताच्या सध्याच्या स्तिथीत पाहिलं तर सगळीकड कोन्क्रीतीकरण वाढलेलं आहे त्यामुळ आजूबाजूला जास्त परिसरच नाहीये व जेवढा आहे तेवढ्यात वेग्वेगली शो ची झाड लावली जातात अस जर होत राहील तर त्या फुलपाखरांनी बागडायचं कुठ त्यांनी मध कुठ तयार करायचा?
*जैवविविधता विकास (उत्क्रांति)*
आज अस्तित्वात असलेल्या जैवविविधतेमागे ३५० कोटी वर्षांचा इतिहास आहे. सजीवांची नक्की निर्मिती केव्हा झाली हे जरी वैज्ञानिकाना सांगता आले नाही तरी पृथ्वीच्या उत्पत्तीनंतर वीस ते तीस कोटी वर्षानंतर प्राथमिक रचना असलेले सजीव अस्तित्वात आले यावर वैज्ञानिक ठाम आहेत. साठ कोटी वर्षापूर्वी अस्तित्वात असलेले सजीव आदिजीव, जीवाणू, असे एकपेशीय रचनेचे होते. चोपन्न कोटी वर्षापूवी फॅनरोझोइक कल्पामध्ये झालेल्या कँब्रियन युगामध्ये जैवविधतेमध्ये प्रचंड वाढ झाली. या प्रकारास कँब्रियन एक्स्प्लोजन असे म्हणण्याची पद्धत आहे. कँब्रियन युगामध्ये बहुपेशीय सजीवांची निर्मिती झाली. पुढील ४०कोटी वर्षामध्ये विविधतेमध्ये बहुतांशी अपृष्ठवंशी सजीव अधिक संख्येने होते. याच कालखंडात पृष्ठवंशी सजीव घातीय श्रेणीने वाढत गेले. या वाढीबरोबर अनेक पर्यावरणीय कारणाने जैवविविधतेचा नाश होत होता. समूह विलोपन क्रियेमुळे जैवविविधतेमध्ये घट आणि वृद्धी हे प्रकार सजीवांच्या निर्मितीपासून चाललेले आहेत. कार्बनिफेरस युगामध्ये झालेल्या विलोपनामध्ये पर्जन्यवने भूपृष्ठाखाली गाडली गेली. या काळात गाडल्या गेलेल्या जीवाश्मांवर उच्च दाब आणि कार्बन वेगळा होण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेले दगडी कोळसा आणि क्रूड ऑइल आजच्या आपल्या इंधनाची ९०% गरज भागवत आहे. पंचवीस कोटी वर्षापूर्वी पर्मियन-ट्रायसिक युगाच्या संधिकालात झालेल्या विघटनाने जैवविविधतेची सर्वाधिक हानी झाली. (या काळात डायनोसॉर नष्ट झाले). या धक्क्यातून सावरण्यास पृष्ठवंशी सजीवाना तीन कोटी वर्षे लागली. गेल्या दोन तीन कोटी वर्षांच्या जीवाश्मांच्या अभ्यासावरून असे आढळून आले आहे की आजच्या एवढी जैवविविधता कधीही अस्तित्वात नव्हती. सर्व वैज्ञानिकांना हे म्हणणे पूर्णपणे मान्य नाही. जीवाश्मीकरण सर्व सजीवांचे कधीही प्रातिनिधित्व करू शकत नाही हा त्यांचा आक्षेप. काही वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार तीस कोटी वर्षापूर्वी आणि आजच्या जैवविविधतेमध्ये फारसा फरक नसावा. सध्याच्या सजीव जातींची संख्या दोन दशलक्ष ते शंभर दशलक्ष एवढी असावी. सर्व पर्यायाचा विचार करून सजीवांची संख्या १३० ते १४० लाखांपर्यंत पोहोचते. यांमधील संधिपाद प्राण्यांची संख्या सर्वाधिक आहे. ज्या ठिकाणी सजीवामध्ये संघर्ष कमी आहे म्हणजे निसर्ग निवडीच्या “फिटनेस” ला (डार्विंनचा सिद्धान्त) सामोरे जावे लागत नाही अशा ठिकाणी जैवविविधता वृद्धिंगत होते.
जैवविविधता करार (Convention on Biological Diversity – CBD)
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) ने १९८८ मध्ये जैवविविधतेबाबत आंतरराष्ट्रीय कराराच्या आवश्यकतेविषयी एक कार्यगट नेमला. १९९२ मध्ये नैरोबी परिषदेमध्ये जैवविविधता कराराचा मसुदा स्वीकारण्यात आला.
५ जून १९९२ रोजी रियो दि जानेरो या शहरात आयोजित यूएन आयोजित पर्यावरण व विकास या वसुंधरा परिषदेत हा करार हस्ताक्षरासाठी आला. जून १९९३ पर्यंत १६८ देशांनी यावर सह्या केल्या.
२९ डिसेंबर १९९३ रोजी हा करार अंमलात आला.
या कराराची तीन मुख्य ध्येये आहे
१. जैवविविधता संवर्धन
२. जैवविविधतेतील घटकांचा शाश्वत वापर
३. जैविक संसाधन संपत्तीच्या वापरातून होणार्‍या फायद्यांचे समान वाटप 
We're part of the solution ही या दिनासाठीची २०२१ सालासाठीची संकल्पना होती.
 जैवविविधतेचे स्थान लक्षात घेऊन तिच्या संवर्धनासाठी भारत सरकारने २००२ मध्ये कायदा बनवला आहे. तर महाराष्ट्रात २००८ पासून जैवविविधता नियम लागू आहेत. त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात.
त्यामध्ये रहिवाशांनीच आपल्या परिसराची जैवविविधता नोंदवही बनविण्याची संकल्पना आहे. सरकारी तसेच संस्थात्मक पातळीवर या दिवसानिमित्त अनेक उपक्रम राबविले जातात. ‘जैवविविधता मंडळे’ स्थापन करून कामे वाटून घेतली जातात. स्थानिक पातळी वरील जैवविविधता मंडळे आपल्या परिसरातील वृक्ष, फुले, फळे, वेली, झुडपे, नदी, ओढे, नाले, विहिरी, तळी तसेच एकूण वृक्षाच्छादित प्रदेश यांची माहिती असणारी नोंदवही ठेवतात. परिसरात आढळणारे पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, पावसाचे प्रमाण, पिके, स्थानिक वाण, चवी, औषधी वनस्पती यांचीही माहिती संकलित केली जाते. जैवविविधतेला क्षती पोहोचवणाऱ्या बाबी समजून घेऊन वैयक्तिक पातळीवरही त्या टाळल्याने फरक पडू शकतो. अधिवास जपणे, प्रदूषण कमी करणे, शाश्वत शेतीच्या पद्धती, सेंद्रिय शेती अवलंबणे, हरित क्षेत्राची वाढ करणे, पशु पक्षांच्या प्रजाती जपणे इत्यादी पाऊले उचलून आपण जैवविविधता सांभाळू शकतो.
पर्यावरणात होणाऱ्या बदलांमुळे ह्या जीवांना व वनस्पतींना क्षती पोहोचते. तो बदल नियंत्रणात ठेवणे मानवाच्या हातात आहे. आपण संकल्प करुया की तंत्रज्ञानाच्या अधिक आहारी न जाता अधिकाधिक नैसर्गिक जीवन जगू आणि पृथ्वीवरील जैवविविधता जपू. जागतिक जैवविविधता दिनाच्या सर्वांना शुभेच्छा!
संकलित माहिती

मंगळवार, १९ मे, २०२०

अवांतर वाचनीय पुस्तके








संकलित लिंक
👇👇इथे क्लिक करा👇👇
अवांतर वाचनीय पुस्तके भाग1(कथा कादंबरी व इतर)











संकलित लिंक

👇👇इथे क्लिक करा👇👇

some English books & novels

जमशेदजी नसरवानजी टाटा

आधुनिक औद्योगिक भारताचे शिल्पकार व टाटा उद्योग  समुहाचे संस्थापक जमशेदजी नसरवानजी टाटा यांचे निधन*
*जमशेदजी नसरवानजी टाटा (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.*
त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत. त्यांनी नंतर टाटा समूह उद्योगाची स्थापना केली. टाटांना "भारतीय उद्योगाचे जनक" म्हणून ओळखले जाते. आज त्यांच्या योगदानामुळे भारतीय उद्योगास विदेशांत ओळख मिळाली. ज्यावेळी भारत आर्थिक संकटांशी झगडत होता त्या वेळी त्यांनी चपळतेने टाटा ग्रुप आणि कंपनीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांचे असे मत होते की आम्ही सरळ कोणतेच मोठे काम करू शकत नाही, कोणतेही मोठे काम करण्यासाठी आधी छोटी-छोटी कामे करण्याची आवश्यकता असते.
*सुरुवातीचे जीवन*
जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा जन्म ३ मार्च १८३९ रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरात झाला. त्यांचे वडील नसरवानजी व आई जीवनबाई टाटा हे त्यांच्या पारशी कुटुंबातील पहिले व्यापारी होते. कुटुंबाची परंपरा तोडून त्यांनी मुंबईत निर्यात व्यापार संस्था सुरू केली. जमशेदजी टाटा १४ व्या वर्षी मुंबईत आपल्या वडिलांकडे आले. आणि त्यांनी एलफिन्स्टन महाविद्यालयातून आपले ग्रॅज्युएशन पूर्ण केले. तेथे ते कॉलेजातील एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काॅलेजच्या प्रिन्सिपाॅलांनी त्यांची डिग्री समाप्त होईपर्यंतची पूर्ण फी परत केली. जमशेदजीनी १६ वर्षाचे असताना १० वर्षाच्या हीराबाई दबू हिच्याशी विवाह केला.
१८५८ मध्ये जमशेदजींनी महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आणि आपल्या वडिलांच्या व्यवसायामध्ये प्रवेश घेतला. १८५७ सालचे भारतीय बंड ब्रिटिश शासनाने दडपून काढले होते. ब्रिटिश सरकारच्या विरुद्धचा विद्रोह त्यावेळी नवीनच होता. मात्र टाटांनी अशा परिस्थितीतही आपल्या व्यापारास शिखरावर घेऊन जाण्याचा निश्चय केला. आपल्या वडिलांच्या व्यवसायाच्या शाखा स्थापन करण्यासाठी टाटा यांनी इंग्लंड, अमेरिका, युरोप, चीन आणि जपान सारख्या परदेशांत अनेकदा प्रवास केला.
*व्यवसाय*
१८६८ पर्यंत टाटा आपल्या वडिलांच्या कंपनीत काम करत होते. त्यावर्षी त्यांनी एका स्वतंत्र कंपनीची स्थापना केली. १८९६ मध्ये चिंचपोकळी येथील एक दिवाळखोर तेल गिरणी विकत घेतली आणि तिची एका कापडाच्या गिरणीत रूपांतर केले. या गिरणीचे नाव त्यांनी अलेक्झांड्रा मिल असे ठेवले. पुढे दोन वर्षांनंतर नफा मिळवण्यासाठी ती मिल टाटांनी विकली आणि १८७४ मध्ये नागपूरला एका स्पिनिंग मिलची स्थापना केली, १ जानेवारी १८७७ रोजी त्यांनी एम्प्रेस मिलची स्थापना केली.
त्यांच्या जीवनात चार ध्येये होती. एक पोलाद कंपनी, एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था, एक अद्वितीय हॉटेल आणि एक हायड्रो-इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी. ३ डिसेंबर १९०३ रोजी मुंबईतील कुलाबा वॉटरफ्रंट येथील ताजमहल हॉटेलचेया उद्घाटन झाले. त्यावेळी भारतात स्वतःची वीज असणारे ते एकमेव हॉटेल होते.
*टाटा स्टील*
टाटा स्टील (पूर्वी टिस्को - टाटा आयर्न आणि स्टील कंपनी लिमिटेड) ही आशियातील पहिली आणि भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २,८ कोटी टन स्टीलचे उत्पादन केल्यानंतर ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.
*टाटांनी स्थापन केलेल्या अन्य संस्था*
बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : विज्ञान आणि अभियांत्रिकी यांमधील संशोधन आणि शिक्षणासाठी प्रख्यात भारतीय संस्था.
टाटा हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी (नवीन नाव - टाटा पॉवर कंपनी) : ८००० मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज कंपनी.
व्यक्तिगत जीवन-
टाटांनी हिराबाई दाबू यांच्याशी विवाह केला. त्यांची मुले दोराबजी टाटा आणि रतन टाटा यांना सुद्धा टाटा ग्रुपचे अध्यक्ष म्हणून यश मिळाले. टाटाची बहीण जेरबाईने मुंबईतील एका व्यापाऱ्याशी लग्न केले. त्यांचा मुलगा त्यांना शापुरजी सकलातवाला हे बिहार आणि ओरिसामध्ये टाटा ग्रुपचे कोळशाचा व लोखंडाचा व्यापार सांभाळत होते. नंतर ते टाटांचे मॅन्चेस्टर कार्यालय सांभाळण्यासाठी इंग्लंडला निघून गेले आणि नंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य झाले.
*मृत्यू*
१९०० साली व्यवसाया निमित्त जर्मनी ला असताना ते खूप आजारी पडले. १९ मे १९०४ रोजी बॅड नौहैम या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना इंग्लंड मधील पारशी समाजाच्या ब्रूकवूड दफन भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
*वारसा*

झारखंडमधील साचि गावात टाटाचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला गेला. गाव गावात वाढला आणि रेल्वे स्टेशनचे नाव टाटानगर असे ठेवले गेले. आता झारखंडमधील जमशेदपूर या नावाने ओळखले जाणारे हे एक मोठे शहर आहे.
*पुस्तके*
आर. एम. लाला (१ मे २००६). द लव ऑफ इंडिया: द लाइफ ॲंड टाइम्स ऑफ जमशेदजी टाटा पेंग्विन पुस्तकं
दीनशॉ एडुलजी वाका (१९१५). जे. एन. टाटाचे जीवन आणि जीवन कार्य:
टाटायन-गिरीश कुबेर. -टाटा उद्योगसमूहाची समग्र माहिती देणारे मराठीतील पुस्तक
------------------------------------
अन्य 💥🌸दिनविशेष🌸💥*
     *१९ मे १९७१*

*सोवियेत संघाने मार्स २ या अंतराळयानाचे प्रक्षेपण केले.*
========================
संकलित माहिती 

बुधवार, १३ मे, २०२०

शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस

 रोनाल्ड राॅस

जन्मदिन - १३ मे १८५३
मलेरिया हा रोग डासांच्या प्रादुर्भावाने होतो याचा शोध लावला
हिवतापाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचा आज जन्मदिन..
-----------------------------------------------
रोनाल्ड रॉस हे भारतात जन्मलेले ब्रिटीश वंशीय डॉक्टर होते. रोनाल्ड रॉस यांचा जन्म भारतात अलमोडा येथे १८५७ साली झाला. यांचे वडील, सर सी.सी.जी. रॉय हे इंग्रजांच्या सैन्यामध्ये जनरल होते. रोनाल्ड रॉस यांचे शिक्षण इंग्लंडमध्ये झाले आणि वैद्यकाच्या अभ्यासासाठी त्यांनी इ.स. १८७५ मध्ये लंडन येथील सेंट बार्थिलोमोव्ह हॉस्पिटलमध्यें प्रवेश घेतला. इ.स. १८८१ मध्ये डॉक्टर झाल्यावर ते इंडियन मेडिकल सर्व्हिसमध्ये काम करू लागले.वैद्यकीय पदवी मिळवल्यावर रॉस यांनी भारतीय सेनादलात मेडिकल ऑफिसर म्हणून प्रवेश घेतला. मॅन्सन यांच्या डासांवरील संशोधनाने प्रेरित होऊन ते हिंदुस्थानात परतले. येथील सिकंदराबाद, हैदराबाद व कलकत्ता येथे प्रयोग करायला सुरुवात केली.
मलेरिया हा रोग ‘प्लाझ्‌मोडियम्’ या सूक्ष्म जंतूपासून होतो, हे लव्हेरान यांनी सिद्ध केलं होतंच. पण, याची प्रसारयंत्रणा कशी आहे, याची सुतराम कल्पना नव्हती. इ.स. १८९४ मध्ये मॅनसन यांनी असे गृहीतक मांडले की मलेरिया हा रोग डासांमुळे होत असून, तो या जंतूंनी युक्त डास चावा घेऊन नव्हे तर पाण्यावाटे पसरवीत असावेत. यातून प्रभावित होऊन त्यांनी त्यांचे संशोधन चालू ठेवले. इ.स. १८९४ साली रॉस यांनी या संदर्भात पुढील संशोधन करण्याचे ठरविले. त्यांनी, ज्या रोग्यांना मलेरिया झाला आहे. त्यांना चावा घेण्यास डासांना उद्युक्त केले. या मलेरिया ग्रस्त रोग्यांना डास चावल्यावर, त्या डासांच्या शरीरात मलेरियाच्या जंतूंचे काय होते, कोणकोणते आणि कसे बदल होतात याचा अभ्यास सुरू केला; परंतु पहिली दोन वर्षे त्यांत फारशी प्रगती झाली नाही, तरीही नाउमेद न होता त्यांनी अभ्यास चालूच ठेवला होता. इ.स. १८९७ मध्ये त्यांच्या प्रयत्‍नांना यश आले. त्यांना दिसून आले की, डासांच्या जठरामध्ये बटणाच्या आकाराच्या जंतूंची अनेक अंडी तयार होतात. ही अंडी त्या डासांच्या लाळेत येतात आणि असे डास जेव्हा माणसांना चावतात तेव्हा त्या माणसांमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ति नसेल त्यांना मलेरिया होतो. २० ऑगस्ट १८९७ रोजी रॉस यांनी या जंतूंचा प्रसार ‘ऍनोफेलिस’ जातीच्या डासांची मादी रुग्णाचे रक्त शोषून घेत इतर माणसांच्या शरीरात सोडते व रोग पसरतो, हे प्रतिपादित केले. हे त्यांचे संशोधन बहुमोलाचेच होते. त्याच वर्षी ग्रासी, बिगनमी आणि बास्टिनेली यांनी अ‍ॅनोफेलिस जातीच्या डांसामध्ये प्लाझमोडियम, फाल्सिपॅरम या जातीच्या मलेरियाच्या जंतूंची कशी वाढ होते आणि पुढे ते संसर्गित डास चावल्यामुळे माणसांमध्ये मलेरिया कसा होतो हे दाखवून दिले. या संशोधनामुळे ब्रिटिश-राज खूपच आनंदित व प्रभावित झाले. रॉस यांचा ठिकठिकाणी सत्कार झाला तसेच १९५७ पासून २० ऑगस्ट हा दिवस ‘मलेरिया दिवस’ म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.  ब्रिटिश गव्हर्नमेंटने त्यांना ‘सर’ हा किताब दिला तसेच १९०२ मध्ये डॉ. रोनाल्ड रॉस यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिकदेखील मिळाले!
या संशोधनामुळे उत्साहित होत इंग्लड व अमेरिका या दोन्ही देशांत डासांविरुद्ध युद्धस्तरावर मोहीम सुरू झाली. दलदलीचे भाग नष्ट करणे, सांडपाण्याच्या नाल्या व साठलेल्या पाण्याची डबकी नाहीशी करणे, प्रतिकारक लोशन्सचा भडिमार करणे इत्यादी प्रयत्नांमुळे या दोन्ही देशांनी मलेरियाचा परिणामकारक पाडाव करण्यात यश मिळवले. या शोधानंतर विविध शास्त्रज्ञांनी प्लासमोडियम मलेरिया, प्लासमोडियम फेल्सीपेरम, प्लासमोडियम वाइवॉक्स आणि प्लासमोडियम ओवेल हे मलेरियाचे चार प्रकार शोधून काढले. प्लासमोडियम फेल्सीपेरम मलेरिया हा सर्वात धोकादायक आहे. जसजसे विविध प्रकारच्या मलेरियाचे शोध लागले तसे क्लोरोक्वीन, मेफ्लोक्वीन, हॅलोफॅट्रीन, क्विनीन, आणि आरटेसुनेट ही औषधे निर्माण करण्यात आली.
मलेरिया हे नाव अठराव्या शतकात पडलं. (मल= वाईट व अरिया= एअर) आपल्याकडे याला हिवताप अथवा शीतज्वरदेखील म्हणतात. ‘क्विनिन’ हे अत्यंत कडू असलेले औषध सतराव्या शतकापासूनच या तापावर वापरले जायचे. हे औषध पेरू देशातील सिंकोना या झाडाच्या सालीचा अर्क आहे. सिंकोना हे नाव झाडाला देण्यात एक मजेशीर योगायोग आहे. ‘चिंचोन’ येथील (स्पेन) राणी आपल्या नवर्‍यासह पेरू येथे आली असता तिचा नवरा हिवतापाने आजारी पडला. तेथील ‘क्विना-क्विना’ झाडाच्या सालीच्या अर्कामुळे नवरा बरा झाला म्हणून त्या झाडाला ‘सिंकोना’ असे नाव पडले! दुसर्‍या महायुद्धाच्या सुमारास सैनिकांना मलेरियाचा त्रास होऊ नये म्हणून जर्मन शास्त्रज्ञांनी ‘मेपाक्रीन’ म्हणून औषध काढले. त्या औषधाचा चांगला परिणाम दिसून आला. पण, कुणीतरी कंडी पिकवली की, या औषधामुळे नपुंसकत्व येते. झाले! सैनिकांनी गोळ्या घेणं थांबवलं! जर्मन सरकारने शेवटी जनानखाने बागळणार्‍या मुस्लिम शेख यांना गोळ्या घेताना दाखवून सैनिकांच्या मनातील भीती घालवली.
'डास’ यासारखा छोटासा कीटकदेखील किती अनर्थ करू शकतो, याची कल्पना आल्यावर अंगावर शहारे येतात. जुन्या काळी ‘मलेरिया’ हा मानवजातीचा एक प्रमुख शत्रू होता. तुम्हाला वाचून आश्‍चर्य वाटेल की, अतिप्राचीन काळी (सी.ए.डी. ५००) भारतातील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य सुश्रूत ऋषी यांनी शंका व्यक्त केली होती की, मलेरिया (हिवताप) हा रोग हवेतून न पसरता उष्ण, दमट वातावरणात घोंगावणार्‍या डासांपासून होतो! यावरूनच सुश्रूत ऋषींच्या सखोल ज्ञानाची व द्रष्टेपणाची कल्पना येते. हीच गोष्ट सिद्ध करायला जगभरातील संशोधकांना हजारो वर्षे लागली! धन्य ते सुश्रूत ऋषी व धन्य आपला भारत!
संकलित माहिती 

मंगळवार, १२ मे, २०२०

जागतिक परिचारिका दिन

जागतिक परिचारिका दिन International Nurses Day 

नर्सेस फोर्स ऑफ चेंज म्हणजे नर्सेस बदल घडवू शकतात. आरोग्य प्रणालीमध्ये लवचिकता आणून, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करू शकतात. हे घोषवाक्य सर्व नर्सेसना प्रेरणे देणारे, वैयक्तिक सामूहिक उपक्रम राबवण्यास उपयोगी पडणारे आहे. मे १२ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून पाळला जातो. इसवी सन १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणारी आद्य परिचारिका(नर्स) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा हा जन्मदिवस आहे. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते. त्या आंतरराष्ट्रीय नर्स परिषदेच्या अध्यक्षा होत्या, तसेच सोबत त्या सामाजिक कार्यकर्त्या सुध्दा होत्या, त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक लोकांची सेवा केली. त्या रात्री जागून तासोंतास रुग्णांची सेवा करत असत, रात्री हातात लॅम्प घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असत, त्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” म्हटल्या जात असे. तसेच त्यांच्या नावाने लंडन मध्ये नर्सिंग स्कुल सुध्दा उघडण्यात आळंदी होते आणि त्या पहिल्या महिला होत्या ज्यांना १९०७ मध्ये ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.दरवर्षी ६ ते १२ मे हा आठवडा संपूर्ण जगभरात आतंरराष्ट्रीय नर्सेस आठवडा म्हणून साजरा केला जातो. रूग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम या परिचारीका करतात. त्यांना तमा नसते वेळेची, त्यांना पर्वा नसते स्वत:च्या सुखदुःखाची.

फ्लोरेन्स नाइटिंगेल ह्यांचा जन्म १२ मे १८२०  मध्ये इटली येथे झाला होता, त्या आंतरराष्ट्रीय नर्स परिषदेच्या अध्यक्षा होत्या.
तसेच त्या सामाजिक कार्यकर्त्यासुध्दा होत्या. त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक लोकांची सेवा केली. त्या रात्री जागून तासंतास रुग्णांची सेवा करत असत. रात्री हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असत. त्यामुळे त्यांना लॅम्प लेडी म्हटले जात असे. तसेच त्यांच्या नावाने लंडनमध्ये नर्सिंग स्कूल सुध्दा उघडण्यात आले आणि त्या पहिल्या महिला होत्या ज्यांना 1907 मध्ये ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कोरोना काळात जगभरातील नर्सेसनी रुग्णांची केलेली सेवा सार्‍या जगाने पाहिली. स्वत:चा जीव धोक्यात घालून मानवजातीवर आलेल्या संकटाला परतवून लावणार्‍या नर्सेसना मानाचा मुजरा.  
नार्सिंग चे मेडिकल क्षेत्रातील योगदान हे अतुलनीय आहे आणि प्रशंसनिय आहे. परिचरिकांमुळे रुग्णांची वेळोवेळी निगा राखली जाते. त्यांची कामगिरी ही कौतुकास्पद आहे, या सेवेसाठी परिचारिकांना नेहमी प्रत्येकाच्या आठवणीत जपून ठेवल्या जाईल आणि त्यांना समाजात प्रत्येकाने चांगल्या प्रकारे सन्मानित वागणूक द्यावी. कारण हॉस्पिटलमध्ये असताना आपल्या आरोग्याची काळजी परिचारिका च घेत असतात, अशा या सर्व परिचारिकांना जागतिक नर्स दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या कार्यास मानाचा मुजरा.

दिवसाच्या निमित्ताने परिचारिका म्हणून सेवा देणार्‍यांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली जाते. दरवर्षी हा नर्स डे एका विशिष्ट थीम वर साजरा करण्याची प्रथा आहे. 

२०१६ चे घोषवाक्य आहे, नर्सेस फोर्स ऑफ चेंज म्हणजे नर्सेस बदल घडवू शकतात. 
इंटरनॅशनल नर्स डे 2022 हा "Nurses: Make a Difference."या थीम वर साजरा केला जाईल. 
 १२ मे ची थिम आहे “ नर्स एक आवाजांचे नेत्तृत्व “ आरोग्यविषयक आव्हानांच्या विस्तृत श्रेणीने निराकरण करण्यासाठी परिचारीका किती महत्वाची आहे ( Nurses-A voice To Lead, Nursing the world to Health ) 
आमच्या परिचारिका. आमचे भविष्य. परिचारिकांची काळजी घेणे अर्थव्यवस्थांना बळकटी देते २०२४ च्या आयएनडी थीम Our Nurses. Our Future. The economic power of care, २०२५ ची थीम परिचारिकांच्या आरोग्य आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करते. focus to the health and wellbeing of nurses.

सर्व लढावू आदर्श भगिनींना परिचारिका यांच्यासाठी.....

स्वर्गाहुनही प्रिय आंम्हाला अमुचा सुंदर भारत देश,
आम्ही सारे एक जरीही नाना जाती नाना वेष,

या भूमीच्या आम्ही कन्या कोमल भाव मनी,
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी,
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष,

श्रीरामाचे श्रीकृष्णाचे अजुन आहे स्मरण मनास,
वीर शिवाजी प्रताप बाजी थोर आमुचा हा इतिहास_
_रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश,
वंदे मातरम्.. वंदे मातरम्.....

हिमालयापरि शीतल आम्ही आग पेटती परि उरात,
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत,
या देशाची गौरवगाथा हाच अम्हांला दे आदेश,
वंदे मातरम्.. वंदे मातरम्..

सर्व लढावू आदर्श भगिनींना परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. !!

रविवार, १० मे, २०२०

BMI व आजचे वय काढणे

BMI व आजचे वय काढणे.
आज आता आपले वय किती वर्षे ,किती महिने , किती दिवस , किती तास , किती सेकंद याची माहिती मिळवा .  
Find how old am I? with this free online age calculator which finds the age of a person or any living things in years, months, days, hours, and minutes. Enter your Date of Birth to compute the age interval between your birth date and current date.
https://www.easycalculation.com/date-day/age-calculator.php

https://www.deliveryrank.com/tools/women-bmi-calculator


शालेय पोषण आहार योजना ... विद्यार्थी बी एम आय काढण्यासाठी खालील लिंक क्लिक करा. 
https://www.calculator.net/bmi-calculator.html



आपले वजन व उंची यानुसार आहे की नाही ते तपासा . बॉडी मास इंडेक्स 


Calculate Your Body Mass Index
Body mass index (BMI) is a measure of body fat based on height and weight that applies to adult men and women.

BMI table for children and teens, age 2-20

The Centers for Disease Control and Prevention (CDC) recommends BMI categorization for children and teens between age 2 and 20.
CategoryPercentile Range
Underweight<5%
Healthy weight5% - 85%
At risk of overweight85% - 95%
Overweight>95%

BMI table for adults
This is the World Health Organization's (WHO) recommended body weight based on BMI values for adults. It is used for both men and women, age 18 or older.
CategoryBMI range - kg/m2
Severe Thinness< 16
Moderate Thinness16 - 17
Mild Thinness17 - 18.5
Normal18.5 - 25
Overweight25 - 30
Obese Class I30 - 35
Obese Class II35 - 40
Obese Class III> 40

स्वास्थ्य आणि आरोग्य कॅल्क्युलेटर
https://www.calculator.net/fitness-and-health-calculator.html


Fitness and Health Calculators
The following is a complete list of our fitness and health related calculators.

अँटिट्यूड टेस्ट

अँटिट्यूड टेस्ट संकलित लिंक
https://www.indiabix.com/online-test/aptitude-test/
https://www.indiabix.com/online-test/aptitude-test/ 


लिंकमध्ये खालील टेस्ट असतील 

General Online Tests

Engineering Online Tests

Programming Online Tests

Technical Online Tests

Medical Science Online Tests

Engineering Online Tests


पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा(१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध)

१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
तारीख: १० मे, १८५७ – १ नोव्हें, १८५८
१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध हे १० मे १८५७ रोजी मीरत येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा १८५७चे स्वातंत्र्यसमर, पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा, शिपाई बंडाळी (इंग्लिश: Sepoy mutiny) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात इंग्रजांचा विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.
१० मे १८५७ रोजी दिल्लीपासून ४० मैलांच्या अंतरावर मेरठ छावणीमध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय सैनिकांनी बंड पुकारले व बघता बघता उत्तर पुर्व व मध्य भारतात पसरले. १० मेला सुरु झालेले बंड २० जुन १८५८ रोजी ग्वाल्हेर कंपनीच्या ताब्यात पडल्यानंतरच थांबले. बंडखोर शिपायांनी मेरठ काबीज केले व लागोलाग दिल्लीवर जबरदस्त हल्ला चढवून दिल्लीत बसलेले कंपनीच्या अधिकाऱ्यांना व ब्रिटिश सैन्याला चिरडले व ८१ वर्षांच्या बहादूरशहा दुसरा यास हिंदुस्थानचा बादशहा घोषित केले. अवधचा मोठा भुभाग देखील शिपायांच्या ताब्याखाली आला व ब्रिटिश सैन्य घाबरले. तरी कंपनीने कुमक मागवून जुलै १८५७ मध्ये कानपूर व दिल्लीवर पुन्हा कंपनी शासन लागू केले. पण झाशी, अवध आणि लखनऊतील विद्रोह दडपण्यासाठी कंपनीला खुप वेळ लागला.
१ नोव्हेंबर १८५८ ला विद्रोह दडपल्यानंतर ब्रिटिश संसदेने संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार राणी व्हिक्टोरियाकडे दिला व देशातील कंपनी राज संपुष्टात आले.
उठावाची कारणे
बंगाल प्रांत काबीज केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीने आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.
कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे. ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.
कंपनी सरकारने भारतीयांना नीळ,अफू अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व चीनमधे जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.
१८५७ च्या सुरुवातीला सरकारने ईनफिल्ड नावाच्या नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत होण्यासाठी गायीच्या वा डुक्कराच्या चरबीत बुडवलेली असत. गाय हिंदूना पवित्र तर डुक्कर मुसलमानांना निषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.
या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.
१८५७चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक)
वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

आचार्य अत्रे यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’
स्रोतपर माहिती 

जलसंधारण दिन


🌌10 मे 💥💦जलसंधारण दिन💥
भारतात येऊन गेलेल्या विदेशी पर्यटकांनी आपल्या देशाचे वर्णन “तळ्यांचा देश” असे केले आहे. यावरुन आपल्या पुर्वजांनी जलसंधारणाचे महत्त्व त्या काळातच जाणले होते, याचा प्रत्यय येतो. पण, एकेकाळी “सुजलाम् सुफलाम्” असणाऱ्या आपल्या देशाला पाणीटंचाईचे ग्रहण लागले आहे. दुष्काळाच्या खुणा पावलोपावली दिसत आहे. या सगळ्यावर मात करण्यासाठी जालीम उपायांपैकी एक असलेला उपाय म्हणजे *“जलसंधारण”*
जलसंधारण व्यवस्थापनाचे तीन प्रमुख भाग आहेत.
पहिला भाग म्हणजे पाण्याची भूपृष्ठावर साठवण करणे, यासाठी लहान मोठी धरणे बांधली जातात. दुसरा भाग अर्थात पाण्याची भूगर्भात साठवण करणे, यासाठी पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणाची कामे केली जातात. तिसरा भाग म्हणजे पावसाच्या पाण्याने शेत जमिनीवरील कसदार सुपीक मातीचा थर वाहून जाऊ नये म्हणून मृद संधारणाची कामे केली जातात. पावसाद्वारे पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरवून भूजल साठे निर्माण करून भूजल पातळी योग्य प्रमाणात राखणे हे जल संधारणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. अशा प्रकारे चांगले भूजल साठे राज्याच्या सर्वदूर क्षेत्रात निर्माण झाले तर विहिरीद्वारे त्या पाण्याचा उपयोग सिंचन व इतर कामासाठी केला जाऊ शकतो. ही कामे सिंचन प्रकल्पांच्या लाभ क्षेत्राबाहेरील जमिनीसाठी अत्यावश्यक आहेत. जे राज्याच्या एकूण लागवड योग्य क्षेत्राच्या अंदाजे सत्तर टक्के आहे. यावरून पाणलोट क्षेत्र विकास आणि जल संधारणाच्या कामाचे महत्व लक्षात येईल. आज महाराष्ट्र शासनाचा भर या जलसंधाणाच्या कामांना गती देण्याचा आहे. म्हणजे अजून यावर मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होणार आणि मूल्यमापन यंत्रणा नसल्यामुळे त्यातून काय लाभ होणार हे कळण्याची सोय नाही. पुढील काळात पाणलोट क्षेत्र विकासाच्या व भूजलच्या कामांसाठी केळकर समितीने ३०६५९ कोटीची तरतुद सुचविली आहे. असे म्हटले जाते की, राज्यात १२६ लाख हेक्टर्स क्षेत्रावर कामे झाली आहेत. त्यापासून ३१ लाख हेक्टर सिंचन समता निर्माण होणे अपेक्षित होते, परंतु ती झाली नाही. ही कामे योग्य पद्धतीने झाली नाहीत, असे समितीने नमुद केले आहे. जलसंधारणाची कामे पाणलोट क्षेत्र निहाय नियोजन पूर्वक तंत्रशुद्ध पद्धतीने होऊन त्या कामांची योग्य ती देखभाल आणि सातत्याने मूल्यमापन होत राहणे आवश्यक आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पाणलोट क्षेत्र विकास आणि जलसंधारणासाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम अशी स्वतंत्र यंत्रणा राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असणे आवश्यक वाटते.
महाराष्ट्रात मा.नाना पाटेकर व मा.मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे सुरू आहेत. तसेच अभिनेता आमीर खान याने स्थापन केलेल्या पाणी फाऊंडेशन अंतर्गत राज्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा आयोजीत केली जाते. या दोन्हीला भरघोस प्रतीसाद मिळतो.
आपण घरच्या घरी सुध्दा जलसंधारण करु शकतो. रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातुन.
रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी जमा करणे. ही संकल्पना भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. बुंदेला चौक, कुंडी, तालाब, कुल, बावडी, कुंड, तलाई अशी अनेक नावे आहेत. जमिनीवर आणि इमारतींच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी अशा दोन ठिकाणांहून शहरात पाणी मिळू शकते.
कसे करावे रेनवॉटर हार्वेस्टिंग
शहरी भागात पावसाचे पाणी दोन ठिकाणांहून मिळू शकते.
जमिनीवर पडलेले पाणी जमिनीवर पडलेला पाऊस आपल्याला शंभर टक्के गोळा करता येत नाही. त्यातील थोडाफार जमिनीत मुरतो. काहीचे बाष्पीभवन होते, तर काही वाहून जाते. त्यामुळे आपल्याला अंदाजे ५० टक्के पाऊस जमा करता येतो. आपण अंदाजे ०.८५ इतका जास्तीत जास्त पाऊस गोळा करू शकतो.
इमारतींच्या छपरावर पडणारे पाणी जर आपल्याकडे ५०० चौरस मीटरचा प्लॉट आहे. त्यावर १०० चौरस मीटरचे बांधकाम आहे. त्यावर पडणारे पाणी किती असेल व ते आपल्याला किती मिळेल, याचा विचार करावा. छतावर पडणारे पाणी तुलनेने खूपच स्वच्छ, शुद्ध असते. पहिल्या पावसाचे पाणी सोडून देऊन पुढील पाऊस अडवून आपण ते एखाद्या हौदात साठवू शकतो. एवढे पाणी साठविणे हे खर्चाचे असल्याने आपल्याला लागेल तेवढेच पाणी साठवून उरलेले पाणी बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी वापरता येईल. पाणी साठविण्यासाठी कॉंक्रीट, वीट, सिंटेक्सर किंवा फेराक्रिट या कोणत्याही प्रकारात हौद बांधता येतो. हे पाणी कुंड्यांना, बागेला, गाड्या धुण्यासाठी व इतर सफाईसाठी वापरता येते. जिथे पाण्याची खूप कमतरता आहे, तिथे त्याची गुणवत्ता बघून ते शुद्ध करून पिण्यासाठीही वापरता येते. पाणी शुद्ध राहण्यासाठी हौदाला झाकण हवे व तेथे सूर्यप्रकाश आत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बोअरवेल किंवा विहीर नसल्यास आपल्या परिसरातील एखाद्या बोअरवेलमध्ये सामूहिक पद्धतीने पुनर्भरण करता येईल अथवा झिरप खड्डा तयार करून, जमिनीत चर खणून, झाडे लावूनही पाणी मुरविता येते.
कूपनलिका
पुनर्भरण कसे करावे?
पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय. कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे. (ओढ्याचे पाणी क्षार व रसायनविरहित हवे) कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा. खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सें. मी. अंतरावर सर्व बाजूंनी विशिष्ट व्यासाची छिद्रे पाडावीत.
या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी. खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगडगोटे, त्यावरील भागात खडी, त्यानंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात बारीक वाळू भरावी. अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.
विहीर पुनर्भरण कसे करावे
पाणलोट विहिरी, विंधन विहिरी, भूजल स्रोतांचे पुनर्भरण करण्याच्या दृष्टीने विहिरीजवळ गाळप उपचार करावेत. प्रारंभीच्या गाळप उपचाराचा विसर्ग, जाड वाळूच्या दुसऱ्या गाळप उपचाराद्वारा विहिरीत सोडण्यात यावा. गाळप उपचारांचे नियोजन विहिरीलगतच्या भूपृष्ठाच्या पातळीपेक्षा खालच्या स्तरात करण्यात यावे. विहिरी क्षेत्राच्या उंच भागात असल्यास क्षेत्राच्या नैसर्गिक खोल भागात गाळप उपचार घेण्यात येऊन सिमेंट वा प्लॅस्टिक पाइप (सहा इंच व्यास) अथवा बंद चराद्वारा विहिरीत योग्य खोलीवर जोडण्यात यावेत.
आज “जलसंधारण दिना निमीत्त आपणही संकल्प करुया पावसाचा थेंब न थेंब वाचवायचा….
======================
स्रोतपर संकलित माहिती





शनिवार, ९ मे, २०२०

जागतिक स्थलांतरित पक्षी दिन World Migratory Bird Day

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेऊनी जाती.......
जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 
World Migratory Bird Day
दरवर्षी हा दिवस १४ मे किंवा दुस-या आठवड्यातील शेवटच्या दिवशी साजरा करतात.
पृथ्वीच्या कलण्यामुळे ऋतू बदलतात आणि उत्तरेकडील गोठवणा-या थंडीपासून सुटण्यासाठी अनेक प्रकारचे पक्षी हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून, आपल्याकडे म्हणजे कटिबंधीय उष्ण प्रदेशात साधारण २ महिन्यांसाठी येतात. जागतिक स्तरावर साजरा केला जातो.  स्थलांतरित पक्ष्यांविषयी जागरूकता आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचे महत्त्व या दिवसाचे उद्दीष्ट आहे. जगातील सर्व पक्षी एकाच दिवशी अर्थातच स्थलांतर करीत नाहीत. हा दिवस, २००६ सालापासून, मे महिन्याच्या दुस-या आठवड्याच्या शेवटचा दिवशी साजरा केला जात असतो. स्थलांतरीत पक्ष्यांना अधिवास आणि संरक्षण पुरवणे या मूळ संकल्पनांचा प्रसार आणि जाणीव होणे ही बाब येथे महत्त्वाची ठरते. पक्ष्यांच्या स्थलांतराचे कुतूहल साऱ्यांनाच असते. पक्ष्यांचा स्थलांतर करण्याचा मार्ग, दिशा कशी ठरत असेल? सकाळी सूर्य, तर रात्री चंद्र-तारे, तसेच नद्या, जंगल असे भौगोलिक घटक या पक्ष्यांना मार्ग आणि दिशा दाखवत असतात. काही पक्ष्यांना आनुवंशिकतेमुळे स्थलांतराचे मार्ग माहिती होतात.
हिवाळ्यात ध्रुवीय प्रदेशातील दिवस लहान असल्यामुळे पक्ष्यांना अन्न शोधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही, तसेच बर्फवृष्टीमुळे अनेक वनस्पती आणि कीटक बर्फाखाली जातात. त्यामुळे हे पक्षी अन्नाच्या शोधात सुरक्षित प्रदेशाकडे स्थलांतर करतात. वातावरणीय बदल आणि अन्नाची उणीव या मुख्य कारणांमुळे पक्षी स्थलांतर करतात. आपल्याकडे थंडी असली तरी ध्रुवीय प्रदेशांपेक्षा कमी असते आणि अन्नाची मुबलकता यामुळे हे पक्षी हजारो मैल अंतर कापून इथे येतात, काही काळ थांबून परत आपापल्या प्रदेशात जातात.
भारतातील अन्य प्रदेशांप्रमाणे जंगल, गवताळ प्रदेश, किनारपट्टी, समुद्र, मिठागरे, धरणे, नद्या, खाडी, भात खाचरे, ओहोटीचे प्रदेश, उथळ दलदलीच्या जागा अशा अनेकविध अधिवासांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रातदेखील अनेक प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून येतात. बहुतेक पक्षी स्थलांतरासाठी प्रजनन-स्थानाशी जवळीक साधणारे भौगोलिक स्थान, हवामान आणि पर्जन्यमान यांवर आधारित भूप्रदेशाची निवड करतात. बर्ड रिंगिंग आणि जीपीएस ट्रान्समीटरच्या विंग टॅगिंग अशा नवीन तंत्रज्ञानामुळे पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास करणे शक्य झाले आहे.
गेल्या काही दशकांमध्ये स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासांवर होत असलेले अतिक्रमण, प्रदूषण आणि जंगलतोड अशा मानवी कृतींमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. शेतीतील कीटकनाशकांचा असुरक्षित वापर, मानवनिर्मित वस्तूंशी होणारी टक्कर आणि हवामान बदल यांसारख्या इतर धोक्यांचा स्थलांतरित पक्ष्यांवर नकारात्मक परिणाम होत आहे. त्यामुळे यासंदर्भात मोठय़ा प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या शनिवारी ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिन’ साजरा करण्यात येतो. या वर्षी हा दिवस उद्या, ९ मे रोजी साजरा होत आहे. ‘द कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसीज्’, ‘द आफ्रिकन-युरेशियन वॉटरबर्ड अ‍ॅग्रीमेंट’ आणि ‘इन्व्हायर्न्मेंट फॉर द अमेरिकाज्’ या संस्थांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून यंदा हा दिवस साजरा करण्याचे संकल्प-सूत्र आहे- ‘बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड’! पक्ष्यांच्या स्थलांतराची प्रक्रिया अविरत आणि अखंड चालू राहण्यासाठी त्यांचे स्थलांतरित होण्याचे अधिवास सुरक्षित राहिले पाहिजेत. त्यासाठी त्या त्या देशाच्या पर्यावरण धोरणात याचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे. मुख्य म्हणजे, एक प्रकारे देशांना जोडण्याचे काम करणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या दिशेने पावले टाकणे गरजेचे झाले आहे.
संकलित माहिती 

आगामी झालेले