नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत

नमस्कार...... आपले हार्दिक स्वागत..... फॉलोअर मध्ये जाऊन माझा ब्लॉग फॉलो करा व अपडेट मिळवा . ही नम्र विनंती"

हार्दिक स्वागत ......WEL COME

सर्व मराठी शाळांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत����������������

मंगळवार, २७ डिसेंबर, २०२२

डॉ. पंजाबराव देशमुख Panjabrao Deshmukh


शिक्षण महर्षी, कृषीरत्न
डॉ. पंजाबराव उपाख्य उर्फ भाऊसाहेब देशमुख Panjabrao Deshmukh 
जन्म : २७ डिसेंबर १८९८ (पापळ, अमरावती, महाराष्ट्र )
मृत्यू : १० एप्रिल १९६५ (दिल्ली)
राष्ट्रीयत्व : भारतीय
टोपणनाव : भाऊसाहेब
नागरिकत्व : भारतीय
प्रशिक्षण संस्था : श्री शिवाजी शिक्षण संस्था
पेशा : समाज सेवक , राजकारण
मूळ गाव : पापळ
राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जोडीदार : विमलाबाई
पंजाबराव देशमुख उच्च शिक्षण घेऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. इ.स. १९३६ च्या निवडणुकी पश्चात ते शिक्षणमंत्री झाले. स्वतंत्र भारतात ते भारताचे कृषी मंत्री होते. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात अंदाजे १,०००च्या वर शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये सुरू करून त्या संस्था शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत.
'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा' हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.
🔴 डॉ.पंजाबराव देशमुख यांचे : चरित्र & कार्य
⚜ बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार आणि कृषिक्रांतीचे अग्रदूत
भाऊसाहेब डॉ.पंजाबराव देशमुख यांचे चरित्र आणि कार्य हिमलयापेक्षा उत्तुंग आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही. देशातील शेतकरी आणि महाराष्ट्रातील शिक्षणाची अवस्था भाऊसाहेबांनी अनुभवली होती.
"चिखलात पाय आणि पायात काटा,अशाच वात् ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वाट्याला असतात" या वास्तवाचे भान असलेल्या भाऊसाहेबांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ रोजी अमरावती जिल्ह्यातील पापड या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मास आलेल्या पंजाबरावांच्या आईचे नाव राधाबाई आणि वडील शामरावबापू असे होते. इयत्ता ३ री पर्यंतचे शिक्षण पापड या गावीच झाले. ४था वर्ग नसल्याने एक वर्ष पुन्हा ३ र्याच वर्गात शिक्षण घ्यावे लागले. पुढे भाऊसाहेबांचे आजोळ सोनेगावच्या जवळच असलेल्या चांदूर रेल्वेच्या प्राथमिक शाळेत चौथा वर्ग पूर्ण केला.
माध्यमिक शिक्षण (कारंजा) लाड येथे तर matric चे शिक्षण अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मधून पूर्ण केले.
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून इंटरमिडीएटचे शिक्षण घेऊन उच्च शिक्षणासाठी भाऊसाहेब इंग्लंड ला गेले. तेथे त्यांनी ‘वेद वाड:मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' (१९२०) मध्ये OXFORD विद्यापीठाच्या डॉक्टरेट (पी.एच.डी.) हि पदवी संपादन केली. प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्रकांड पांडित्य संपादन करणारे भाऊसाहेब कधीच पोथीनिष्ठ नव्हते तर ते होते कृतीनिष्ट.
बहुजनांचे दु:ख दूर करणारे डॉक्टर व अन्याय दूर करण्यासाठी झगडणारे ते Baristar होते.
♻ "भाऊसाहेबांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य"
🔮 महाराष्ट्राच्या शिक्षणाचे शिल्पकार दोन भाऊ-
त्यात भाऊसाहेब पंजाबराव देशमुख व कर्मवीर भाऊराव पाटील हे आहेत.देशातील सर्वात मोठ्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना भाऊसाहेबांनी १९३१ मध्ये अमरावती येथे केली. यानंतर विदर्भाचा ‘शैक्षणिक विकास भारतीय शेती शेतकरी आणि बहुजन उद्धाराची चळवळ' हे भाऊसाहेबांच्या जीवनाचे ध्येय ठरले. बहुजनांच्या शिक्षणातील अडचण हि प्रतीगाम्यांची मनुवादी विचारधारा आहे हि मनुवादी विचारधारा नेस्तनाबूत करण्यासाठी अखंड प्रयत्न केले. शोषितांचे उद्धारकर्ते आणि कृषकांचे कैवारी असलेल्या भाऊसाहेबांनी "जगातील शेतकऱ्यांनो संघटीत व्हा" हा मंत्र दिला. देशाचे कृषिमंत्री असताना १९५९ ला शेतकऱ्यांसाठी ‘जागतिक कृषि प्रदर्शनाचे" आयोजन केले.तसेच जपानी भातशेतीचा त्यांचा प्रयोग उल्लेखनीय आहे. ते कृषि विद्यापीठाच्या कल्पनेचे जनक आहेत.
शिक्षण, शेती, सहकार, अश्पृश्योद्धार, जातीभेद निर्मुलन, धर्म इ. विविध क्षेत्रात त्यांनी अवाढव्य कार्य केले. ग्रामीण समाज पोथीनिष्ठ आणि परंपरानिष्ट असल्याने त्यांच्यात अज्ञान, अंधश्रद्धा, दैववाद, अवैज्ञानिकता, देवभोळेपणा खच्चून भरल्यामुळेच हा समाज शिक्षणापासून वंचित राहिला हे त्यांना ठाऊक होते. तसेच ब्राम्हणी वर्णवर्चस्ववाद हा ग्रामीण बहुजन समाजाला पद्धतशीरपणे शिक्षणापासून दूर ठेवण्यासाठीचा प्रयत्न होता. खऱ्या अर्थाने भारतातील बहुजन समाज हा गुलामगिरीच्या शृंखलांनी जखडलेला होता आणि १०% सेटजी, भटजी, लाटजी हा वर्ग सरकारी नोकऱ्या, उच्चपदे, सोयी सवलतीचा लाभ घेत होता.
जुलै १९२६ नंतर भारतात परत आल्यावर चातुर्वर्णप्रणीत जातीव्यवस्था , अश्पृश्यता, अज्ञान, दारिद्र्य, पारतंत्र्य यासाठी स्वत:ला पूर्णत: वाहून घेतले. १९२७ सालच्या मोशीच्या हिंदुसभेचा अधिवेशनाचा डॉ.पंजाबराव देशमुखांनी ताबा घेतला व आपल्या ओजस्वी भाषणातून सबंध श्रोतावर्ग काबीज केला. चातुर्वर्ण, अश्पृश्यता,जातीभेद याचा निषेध ठराव वामनराव घोरपडे यांनी मांडला व भाऊसाहेब याला अनुमोदन देताना म्हणाले, "आमची गुलामगिरी नष्ट करण्याकरिता अस्पृशता निवारणा सारख्या सुधारणांच्या चिठ्ठ्या हिंदूधर्माला जोडून आम्ही त्याची भोके बुजविण्याचा प्रयत्न करीत आहोत. चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन दुरुस्त झाला नाही तर तो रांजनच फोडून टाकण्यास आम्ही मागे पुढे पाहणार नाही." हे भाऊसाहेबांचे उर्वरित कार्य शिवश्री. पुरुषोत्तम खेडेकर, डॉ.आ.ह.साळुंके, इतिहासाचार्य मा. म. देशमुखांसारख्या कोट्यावधी बहुजन बांधवांनी १२ जानेवारी २००५ रोजी मातृतीर्थ सिंधखेड राजा येथे शिवधर्माचे प्रगटन करून केले आहे. आता चातुर्वर्ण व्यवस्थेचा रांजन फुटल्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेली स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता अशी लोकशाही या देशात अस्तित्वात येईल.
डॉ.पंजाबराव देशमुखांच्या बहुजन उद्धाराच्या कार्यावर चिडलेल्या मनुवाद्यांनी त्यांच्या खुनाचाही प्रयत्न केला. पण भाऊसाहेब डगमगले नाहीत, पुढे त्यांनी २६ नोव्हेम्बर १९२७ रोजी सोनार कुटुंबात जन्मलेल्या कु. विमल वैद्य या युवतीशी आंतरजातीय विवाह करून मराठा-सुवर्णकार नातेसंबंध जुळवून आणले. त्यांनी १९३० मध्ये अस्पृश्य पित्तर केला. तसेच हिंदू देवस्थान संपत्ती बिल १९३२ मध्ये आणले. भाऊसाहेबांनी डॉ. बाबासाहेबांसोबत १९२७ मध्ये अमरावती येथील अंबादेवी मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. मंदिर प्रवेशामागे ईश्वर भक्तीचा त्यांचा उद्देश नव्हता. भाऊसाहेबांचा देवावर विश्वासच नव्हता. ते म्हणत ,"मूर्तीत देव असेल तर मूर्तीत देव घडविणारा कारागीर हा देवाचा बापच ठरेल."
खरोखरच आजही डॉ. भाऊसाहेबांचे कार्य शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षक, संस्थाचालक, शिक्षणतज्ञाना तसेच बहुजन समाजाला प्रेरणादायी आहे.

🌀 संक्षिप्त जीवन
डॉ. पंजाबराव देशमुख ( भाऊसाहेब देशमुख)
मूळ आडनाव - कदम
१९२७- शेतकरी संघाच्या प्रचारासाठी 'महाराष्ट्र केसरी' हे वर्तमानपत्र चालविले.
वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास' या प्रबंधाबद्दल डॉक्टरेट.
१९३३ - शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारiत करण्यात मोठा वाटा. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणतात.
१९२६ - मुष्टिफंड या माध्यमातून गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी श्रद्धानंद छात्रालय काढले.
१९२७ - शेतकरी संघाची स्थापना.
१९३२ - श्री. ए. डब्ल्यू. पाटील यांच्या सहकार्याने श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना.
? - ग्रामोद्धार मंडळाची स्थापना.
१९५० - लोकविद्यापीठाची स्थापना (पुणे), त्याचे नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात रूपांतर झाले.
१९५५ - भारत कृषक समाजाची स्थापना व त्याच्याच विद्यमाने 'राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना.
१९५६ - अखिल भारतीय दलित संघाची स्थापना.
१८ ऑगस्ट १९२८ - अमरावती अंबाबाई मंदिर अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून सत्याग्रह .
१९३० - प्रांतिक कायदे मंडळावर निवड. शिक्षण, कृषी, सहकार खात्याचे मंत्री
लोकसभेवर १९५२, १९५७, १९६२ तीन वेळा निवड.
१९५२ ते ६२ केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री. भारताचे पहिले कृषिमंत्री.
देवस्थानची संपत्ती सरकारने ताब्यात घेऊन विधायक कार्य करावे या उद्देशाने १९३२ मध्ये हिंदू देवस्थान संपत्ती बिल मांडले.
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राथमिक शिक्षक संघाची स्थापना.
१९६० - दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले.
📚 पंजाबराव देशमुखांच्या जीवनावरील पुस्तके
सूर्यावर वादळे उठतात. (नाटक, लेखक बाळकृष्ण द. महात्मे)

🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏

संकलित माहिती

सोमवार, २६ डिसेंबर, २०२२

निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण

 *निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण*

निपुण भारत - अध्ययन अभ्यास सर्वेक्षण २०२२-२३  इयत्ता दुसरी ते पाचवी साठी सुरु करण्यात आले आहे. सदर सर्वेक्षणासाठी आवश्यक*

*📌सर्व माध्यमाचे सर्व वर्गांचे प्रश्नसंच*

*📌सर्व माध्यमाच्या मार्गदर्शक सूचना* 

*📌श्रेणी नोंद तक्ता*

*डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.*

शिक्षक मार्गदर्शक सूचना व अध्ययन अभ्यास सर्वेक्षण साधने

सर्व माध्यमांचे प्रश्नसंच व मार्गदर्शक pdf स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी 👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

येथे क्लिक करा.

श्रेणी नोंद तक्ता डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

श्रेणी नोंद तक्ता 












मंगळवार, १ नोव्हेंबर, २०२२

चुकीच्या पत्त्यावर ईमेल गेलाय?

चुकीच्या पत्त्यावर ईमेल गेलाय? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून परत मिळेल ईमेल

अनेकद चुकीच्या ईमेल आयडीवर ईमेल गेल्याच्या घटना घडतात. मात्र चिंता करण्याची गरज नाही. पाठवलेला ईमेल परत मिळवून देण्याचा पर्याय जीमेलमध्ये उपलब्ध आहे.

चुकीच्या पत्त्यावर ईमेल गेलाय? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून परत मिळेल ईमेल

अनेकद चुकीच्या ईमेल आयडीवर ईमेल गेल्याच्या घटना घडतात. मात्र चिंता करण्याची गरज नाही. पाठवलेला ईमेल परत मिळवून देण्याचा पर्याय जीमेलमध्ये उपलब्ध आहे.

चुकीच्या पत्त्यावर ईमेल गेलाय? ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करून परत मिळेल ईमेल

रिझ्यूम, महत्वाची माहिती, कागदपत्रे पाठवण्यासाठी ईमेलचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. मात्र अनेकद चुकीच्या ईमेल आयडीवर ईमेल गेल्याच्या घटना घडतात. ईमेल अ‍ॅड्रेस टाकताना गडबड झाल्यास असे होते. मात्र चिंता करण्याची गरज नाही. पाठवलेला ईमेल परत मिळवून देण्याचा पर्याय जीमेलमध्ये उपलब्ध आहे.

अंडू फंक्शनचा वापर करून तुम्ही पाठवलेला ईमेल रद्द करू शकता. मात्र यासाठी केवळ ३० सेकंदांचा वेळ मिळतो. तुम्हाला ईमेलमध्ये काही बदल करायचे असल्यास हे फीचर फायदेशीर ठरते. पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही पाठवलेला ईमेल परत मिळवू शकता.

ईमेल पाठवल्यानंतर लगेच अंडू आणि मेसेज सेंट असे दोन पर्याय येतात. इमेल परत मिळवण्यासाठी तुम्ही अंडू बटनवर क्लिक करा.

अंडू बटनवर क्लिक केल्यानंतर पाठवलेला ईमेल तुम्हाला परत कंपोज मोडमध्ये दिसेल.

ईमेल ड्राफ्टमध्ये देखील जमा होतो. येथून हा ईमेल उघडून तुम्ही तो एडिट करू शकता किंवा योग्य ईमेल आयडीवर पाठवू शकता.

वेळ मर्यादा बदलण्यासाठी हे करा.

संगणकावर जीमेल उघडा.

वरच्या भागात उजवीकडे सेटिंग्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सी ऑल सेटिंग्सवर क्लिक करा.

अंडू सेंडच्या बाजूला सेंड कॅन्सलेशन पीरियडमध्ये ५, १०, २० किंवा ३० सेकंद हे पर्याय निडवू शकता.

पर्याय निवडल्यानंतर सर्वात खाली क्लिक सेव चेंजेसवर क्लिक करा.

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

दत्तू बांदेकर Dattu Bandekar

दत्तू बांदेकर


जन्म : कारवार, २२ सप्टेंबर, १९०९
दत्तू तुकाराम बांदेकर उर्फ सख्याहरी Dattu Bandekar

हे कानडी भाषेत जेमेतेम सातवी शिकून मराठी भाषेवर प्रभुत्व मिळविणारे एक आगळ्या प्रतिभेचे आणि वेगळ्याच प्रकृतीचे मराठी लेखक होते. त्यांचे सारे जीवन कष्टात गेले, पण त्यांच्या स्वभावात त्याचा कडवटपणा कधी उतरला नाही . मोठ्या विद्वानांपासून ते सामान्य वाचकापर्यंत सगळ्यांनाच त्यांच्या लिखाणाने भरपूर आनंद दिला. आचार्य अत्र्यांचे ते उजवे हात होते. १९३४साली आचार्य अत्रे, दत्तू बांदेकर, सुंदर मानकर आणि कॅप्टन मा.कृ.शिंदे यांनी ’साहित्य झब्बूशाही विध्वंसक मंडळ’ नावाचे साहित्यावर चर्चा करणारे मंडळ काढले होते. मंडळाच्या पहिलीच सभा विभावरी शिरूरकर यांच्या वाङ्‍मयावर मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये झाली होती. तेव्हापासून अत्रे आणि बांदेकरांची मैत्री सुरू झाली.

बांदेकर जुलै १९४० पासून आचार्य अत्र्यांच्या साप्ताहिक नवयुगमध्ये ’रविवारचा मोरावळा’ नावाचे सदर लिहीत.
चित्रपट विषयाला वाहिलेल्या ’चित्रा’ मासिकातील ’सख्या हरी’ या टोपणनावाखाली प्रकाशित होणाऱ्या बांदेकरांच्या सदरामुळे ते महाराष्ट्राचे लाडके लेखक झाले.
दत्तू बांदेकर स्वत: प्रसिद्धिपराङ्‍मुख होते. ते इतके लाजरे होते की कधी जनतेसमोर ते आले नाहीत. त्यांनी कुणालाही आपली मुलाखत घेऊ दिली नाही अथवा फोटो काढू दिला. पां.वा. गाडगीळ यांनी एका लेखात लिहिले आहे की, "दत्तू बांदेकर इतके लाजाळू आणि एकान्तिक होते की आचार्य अत्र्यांनी मुद्दाम बोलावून आणि एकोणीस वर्षे ’नवयुग’मध्ये त्यांची लहर सांभाळून त्यांना ठेवले नसते तर, लेखक म्हणून दत्तू बांदेकर कधीच संपले असते. आचार्य अत्र्यांसारख्या व्यक्तीने दुसऱ्याची लहर सांभाळणे हे देखील अघटित होते ,यात बांदेकरांचे मोठेपण कळून येते.
त्यांचे मित्र मा.कृ.शिंदे यांना दत्तू बांदेकरांच्या नृत्याभिनयाच्या गुणाची चांगली कल्पना होती. पण शिंदे यांनी कितीही आटापीटा केला तरी दत्तूला ते रंगमंचावर आणू शकले नाहीत. दत्तू बांदेकर यांनी लिहिलेले ’विचित्र चोर’ हे नाटक रंगमंचावर आले खरे, पण पहिल्याच प्रयोगात आपटले. त्या नाटकाच्या सर्व उपलब्ध प्रती बांदेकरांनी जाळून टाकल्या.
दत्तू बांदेकरांच्या ’जावई शोध’ या दुसऱ्या नाटकाचा मात्र प्रयोग झाला. या नाटकाची भाषा कोकणी मिश्रित मराठी असून त्यात बांदेकरांनी कारवारमधील काळू नदीचे आणि निसर्गसौंदर्याचे वर्णन केले आहे.१९५१ साली कारवारला अ.का. प्रियोळकर यांच्या अध्यक्षतेखाली मराठी साहित्य संमेलन झाले होते, त्यात या नाटकाचा प्रयोग झाला.

दत्तू बांदेकर यांचा मित्रपरिवार
आचार्य अत्रे
कॅ. मा.कृ.शिंदे - हे पत्रकार, लेखक, कवी, नाटककार, संपादक आणि अभिनेते होते.
सुंदर मानकर
’आवाज’चे संस्थापक-संपादक मधुकर पाटकर
अर्जुन सी. केळुस्कर - ’धनुर्धारी’ साप्ताहिकाचे संपादक
द.म. सुतार - हेही धनुर्धारीचे एक संपादक होते.
वसंतराव मराठे
रमेश नाडकर्णी
जुवेकर गुरुजी
प्रभाकर गुप्ते
माधव रेडकर
रघुवीर रेळे
अप्पा पेंडसे -पुरोगामी वृत्तीचे एक झुंझार पत्रकार आणि शिक्षणतज्ञ
नंदन कालेलकर (लंडनला जाऊन केस कापण्याचे आधुनिक तंत्र शिकून आधी मुंबईत आणि मग पुण्यात सलून काढणारा पहिला ’कारागीर’)
बाळासाहेब ठाकरे
’अलका’ मासिकाचे संपादक श्रीकृष्ण पोवळे
’सुगंध’ मासिकाचे संपादक श्री. एकबोटे
शाहीर अमर शेख

दत्तू बांदेकर यांचे प्रकाशित वाङ्‌मय
अतिप्रसंग,अनिलअमृतवाणी,आडपडदाआपकी सेवामे (हिंदी चित्रपटाची पटकथा)
आर्य चाणक्य,आवळ्या भोपळ्याची मोट,कबुली जबाब,कारुण्याचा विनोदी शाहीर,गट्टी फू,गुंडाच्या तावडीतील सुंदरी, चिरीमिरी, चुकामूक, चोरपावले, जावईशोध (नाटक) तू आणि मी, तो आणि ती, नजरबंदी, नवी आघाडी, पंचगव्य (विडंबन काव्यसंग्रह, १९५७. या पुस्तकात बांदेकरांच्या ३६ कविता आहेत, बाकीच्या अत्र्यांच्या), पेचप्रसंग, प्यारी, प्रेमपत्रे,प्रेमाचा गुलकंद ,बहुरूपी,विचित्र चोर,वितंडवाद,वेताळ प्रसन्‍न, सख्याहरी,हिरवी माडी.

राजकीय विडंबन सादर करताना त्यांची प्रतिभा अत्युच्च पातळीवर पोचत असे. प्रासंगिक विडंबनानी तत्कालीन राजकारण्यांना त्यांनी चिमटे काढले.काही विडंबने मात्र चिरकाल टिकतात. 
नमुन्यादाखल दोन खाली देतो.

"अश्शी दिल्ली सुरेख बाई

चोरांना राखिते

अश्शी मुंबई द्वाड बाई

चोरांना हाकिते"

अथवा

"म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान

मंत्री अजुनी लहान!"

दत्तू बांदेकरांच्या जीवनावर ’दर्पण’चा दत्तू बांदेकर जन्मशताब्दी विशेषांक (२००९) निघाला होता.

अवलिया व्यक्तिमत्वाच्या दत्तू बांदेकरांना अभिवादन 🌹

संकलित माहिती

मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी Atal Bihari Vajpayee


भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी
(भारताचे ११ वे पंतप्रधान)
जन्म : २५ डिसेंबर १९२४ (ग्वाल्हेर, ब्रिटिश भारत)
मृत्यू : १६ ऑगस्ट २०१८ (एम्स हॉस्पिटल, दिल्ली, भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय
राजकीय पक्ष : भारतीय जनता पक्ष
व्यवसाय : राजकारणी, कवी
धर्म : हिंदू
अटलबिहारी वाजपेयी हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते. ते १९९१ ते २००९ दरम्यान भारतीय जनता पक्षाचे लखनौ येथील खासदार होते. केवळ १३ दिवस टिकलेल्या ११ व्या लोकसभेत तसेच त्यानंतरच्या १२ व्या लोकसभेत (१९ मार्च १९९८ ते १९ मे २००४) ते पंतप्रधान होते. यासोबतच त्यांनी जनसंघाचे संस्थापक सदस्य, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते तसेच २४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९ दरम्यान भारतीय परराष्ट्रमंत्री ही पदे भूषविली होती. 
🔆 📜📚शिक्षण
अटलबिहारी वाजपेयी यांनी व्हिक्टोरिया कॉलेजमधून राज्यशास्त्रात मास्टर्स पदवी संपादन केली होती. तसेच त्यांनी पत्रकारितेचेही काम केले होते. ते अविवाहित होते.
🎍 🎙️राजकीय प्रवासाची सुरूवात
राजकारणाशी वाजपेयी यांचा पहिला संबंध १९४२ मध्ये भारत छोडो चळवळीच्या निमित्ताने आला. तेव्हा त्यांना अटक झाली होती. नंतर ते थोड्याच दिवसांनी श्यामाप्रसाद मुखर्जी व पर्यायाने भारतीय जनसंघ यांच्या संपर्कात आले. भारतीय जनसंघाचे नेते म्हणूनच त्यांची कारकीर्द सुरू झाली. वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर बलारामपूरमधून निवडून आले. तरूणपणातच आपल्या अमोघ वाणीने त्यांनी विरोधी पक्षात असूनही सर्व स्तरावर वाहवा तसेच आदरही मिळवला. त्याची भाषणे अतिशय उत्तम व दर्जेदार म्हणून गणली जात. खुद्द जवाहरलाल नेहरूंनी वाजपेयी एकदिवस नक्कीच भारताचे पंतप्रधान असतील अशा शब्दात त्यांचा गौरव केला होता.
🔶जनसंघ
भारतीय जनसंघ विपक्षातला प्रबळ घटक असूनही तो राष्ट्रीय काँग्रेसला सत्तेवरून दूर सारू शकला नाही. दरम्यान नव्याने स्थापन झालेला काँग्रेस (आय) (Congress(I)) पक्ष सत्तेवर आला. तदनंतर १९७५ साली इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी जाहीर केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या विविध पक्ष आणि घटकांसोबत हातमिळवणी केली. याच दरम्यान त्यांना विरोधाबद्दल तुरुंगवास भोगावा लागला. १९७७ मधे इंदिरा गांधी यानी राजीनामा दिला. यानंतर होणाऱ्या निवडणुकांसाठी भारतीय जनसंघाने अनेक सामाजिक आणि प्रादेशिक पक्षांसोबत जनता पार्टीची निर्मिती केली. जनता पार्टीला निवडणुकांत बहुमत प्राप्त होऊन मोरारजी देसाई याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले. वाजपेयी हे नवी दिल्ली येथून निवडून आले आणि परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी त्यानी स्वीकारली.
या दोन वर्षाच्या कारकिर्दीत वाजपेयी १९७९मध्ये चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानला सुद्धा भेट दिली. १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता. वाजपेयी यानी Conference on Disarmament (निःशस्त्रीकरण परिषदे)मध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणु-कार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत त्यांनी हिंदीतून भाषण केले. अखेर १९७९मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सरकारने केलेल्या कारवाईमुळे त्यांनी राजीनामा दिला.
🌷 🔆भारतीय जनता पक्ष (भाजप) ची स्थापना
जनता पक्षाचे सरकार जास्त दिवस टिकले नाही. मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिला. तसेच अंतर्गत विरोधामुळे अखेर जनता पक्षाची शकले झाली. वाजपेयी यांनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनसंघ यांतील मित्र, खासकरून लालकृष्ण अडवाणी आणि भैरोसिंग शेखावत यांच्यासोबत मिळून भारतीय जनता पक्षाची स्थापना १९८० साली केली. वाजपेयी हे भाजपाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजप हा काँग्रेसचा प्रबळ विरोधक होता. ऑपरेशन ब्ल्यू-स्टारला भाजपाचा पाठिंबा असला तरी अंगरक्षकाकडून झालेल्या इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये ज्या शीखविरोधी दंगली उसळल्या त्याचाही भाजपाने विरोध केला. यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या वाट्याला केवळ २ जागा आल्या. तरीही भाजपा देशाच्या राजकारणात मुख्य प्रवाहात राहिला आणि वाजपेयी हेच पक्षाच्या केंद्रस्थानी राहिले. तरी भाजपावरील हिंदुत्वाचा प्रभाव वाढत होता, त्यामुळेच रामजन्मभूमीच्या विश्व हिंदू परिषदेच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रश्नाला भाजपाने राजकीय स्तरावर आवाज दिला. यात अयोध्येत राममंदिर बांधण्याचा मुद्दा समाविष्ट होता. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत बाबरी मशीद नावाची वास्तु पाडण्याच्या घटनेमुळे देशात जातीय हिंसाचार उसळला.
तरीही देशाच्या राजकारणातला भाजपाचा विस्तार होतच राहिला. १९९५च्या मार्चमध्ये गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकांत भाजपाला विजय मिळाला. भाजपाच्या मुंबई येथील नोव्हेंबर १९९५च्या अधिवेशनात अडवाणी यानी वाजपेयी याचे नाव १९९६च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान पंतप्रधान पदासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.
⚜️ पंतप्रधान पद
पहिली खेप (मे १९९६)
१९९६ च्या निवडणुकात भाजप १६२ जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. अनेक प्रादेशिक पक्ष तसेच छोट्या पक्षामुळे १९९६ ची लोकसभा त्रिशंकु राहिली. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपाला सत्तास्थापनेसाठी निमंत्रण मिळाले. वाजपेयी यानी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. पण लोकसभेत विश्वासमत प्रस्तावाच्या चर्चेवेळी इतर पक्षांकडून पाठिंबा मिळविणे भाजपाला शक्य झाले नाही. त्यामुळे बहुमत चाचणी न घेताच वाजपेयींनी १३ दिवसांत राजीनामा दिला आणि वाजपेयी सरकार कोसळले.
🔆 दुसरी खेप (मार्च १९९८)
१९९६ ते ९८ दरम्यान तिसऱ्या आघाडीला सरकार स्थापनेच्या दोन संधी मिळाल्या. दैवेगोडा आणि इंद्रकुमार गुजराल भारताचे पंतप्रधान झाले. ही दोन्ही सरकारे लवकरच कोसळली. १९९८च्या निवडणुकांत भाजप पुन्हा प्रबळ दावेदार झाला आणि वाजपेयी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. यावेळी भाजपाने इतर पक्षांसोबत मिळून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रा.लो.आ.) ( NDA - National Democratic Alliance), ची स्थापना केली. अखेर १९९८च्या अखेरीस अण्णाद्रमुकच्या नेत्या जयललिता यांनी रालोआचा पाठिंबा काढला. यावेळी विश्वासमत प्रस्तावावेळी वाजपेयी सरकार अवघ्या एका मताने पडले. विरोधी पक्षसुद्धा सरकार स्थापन करू शकला नाही व अखेर भारत पुन्हा लोकसभा निवडणुकांना सामोरा गेला. त्यावेळी वाजपेयी हे काळजीवाहू पंतप्रधान बनले. या दुसऱ्या खेपेस वाजपेयींनी स्वतःच्या राजकारणाची आणि कणखरतेची छाप सोडली होती. त्याचे काही महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे होते.
💥 अणुचाचणी पोखरण २
मे १९९८मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या केल्या. सत्ता प्राप्त केल्यावर केवळ एका महिन्यात करण्यात आलेल्या या चाचण्या जगाला, खास करून अमेरिकेला हादरवणाऱ्या ठरल्या, कारण भारताने अमेरिकेच्या हेरगिरी उपग्रहाला चुकवून त्या पार पाडल्या होत्या. पुढील २ आठवड्यांत पाकिस्ताननेही अणुचाचण्या केल्या. रशिया आणि फ्रान्स यांनी भारताच्या स्वसंरक्षणासाठी आणि शांततापूर्ण उपयोगासाठी अण्वस्त्रक्षमतेचे समर्थन केले. तरी अमेरिका, कॅनडा, जपान, इंग्लंड, युरोपीय महासंघ यांनी भारतावर अनेक क्षेत्रांत निर्बंध लादले, तरी वाजपेयींच्या आर्थिक धोरणांमुळे भारताला त्यांची झळ लागली नाही. अखेर भाजप आणि वाजपेयींच्या प्रतिमेच्या दृष्टीने या अणुचाचण्या लाभदायीच ठरल्या.
विशेष म्हणजे अमेरिकेने लादलेल्या आर्थिक प्रतिबंधांनंतरही वाजपेयींच्या काळात भारताच्या विदेशी गंगाजळीत, व्यापारात व विदेशी गुंतवणूकीच्या रूपात शंभर हजार कोटींपर्यंत वाढ होऊन आधीच्या सरकारांच्या काळात देशाला लागलेले 'कर्जबाजारी' हे विशेषण गळून पडले व भारत इतर देशांना कर्ज देऊ लागला.
🤝 लाहोर भेट आणि चर्चा
१९९८ च्या शेवटी वाजपेयींनी पाकिस्तान सोबत शांतता चर्चेसाठी मोठा पुढाकार घेतला. त्यांनी लाहोर-दिल्ली दरम्यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. ते स्वतः पहिल्या बसमधून पाकिस्तानमध्ये चर्चेसाठी गेले. याचे भारतात, पाकिस्तानात आणि जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद उमटले. वाजपेयीं सोबत पाकिस्तानला केवळ राजकारणी आणि मुत्सद्दीच नव्हे तर कला क्षेत्रातूनही अनेक मान्यवर गेले. देव आनंद यांचाही त्यात समावेश होता. कारगील युद्धानंतर पाकिस्तान दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्यांनी " खेल भी जीतो और दिल भी" हा संदेश दिला होता. यानंतर अण्णाद्रमुकने पाठिंबा काढल्यावर त्यांनी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून ऑक्टोबरपर्यंत काम पाहिले.
🇮🇳 कारगील युद्ध
कारगील युद्धादरम्यानची मुत्सद्देगिरी वाजपेयींच्या कणखरतेची साक्ष देणारी आहे. लाहोर भेटीत दोन देशादरम्यानचे संबंध सुधारण्यासाठी वाजपेयी प्रयत्‍न करत असतांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता. हिवाळ्यात काश्मीरच्या नियंत्रण रेषेवरील अतिउंचावर असलेल्या चौक्यांवर उणे ५० अंशापर्यंत तापमान घसरत असल्याने दोन्ही देशांकडून त्या चौक्या खाली केल्या जात. उन्हाळा सुरू होताच दोन्ही देशाचे सैनिक परत चौक्यांवर रुजू होत. पण १९९९ च्या प्रारंभी पाकिस्तानने आपले सैनिक आणि अधिकारी दहशतवाद्यांच्या वेशात भारतीय रिकाम्या चौक्यांवर घुसवले. त्यांतल्या कित्येक सैनिकांकडे व अधिकाऱ्यांजवळ त्यांची पाकिस्तानी ओळखपत्रेही होती. तसेच सोबतीला काही भाडोत्री दहशतवादीही होते.
उन्हाळा सुरू होताच भारतीय सैन्याच्या ध्यानात ही बाब आली. आणि जून १९९९मध्ये ऑपरेशन विजय सुरू केले. भारतीय सैन्याला अतिदुर्गम प्रदेश, अतिउंच शिखरे, बोचरी थंडी यांचा सामना करावा लागला. तरी हवाई दल आणि भूदलाच्या एकत्रित कारवाईने पाकिस्तानच्या सैन्याचा पराभव दिसू लागला. नवाझ शरीफ यानी याही परिस्थितीचे भांडवल करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप द्यायचा प्रयत्‍न केला. चीनला भेट देऊन त्यांनी मदतीची याचना केली. पण भारताने मोठ्या शिताफीने ऑपरेशन विजयची कारवाई नियंत्रण रेषेपर्यंतच मर्यादित ठेवली होती. भारताच्या पवित्र्यापुढे चीनने हस्तक्षेप नाकारला. नवाझ शरीफ यांनी मग अमेरिकेकडे मद्तीची याचना केली. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी मध्यस्थीची तयारी दाखवत.वाजपेयींना चर्चेसाठी वॉशिंग्टनला बोलावले. पण वाजपेयींनी बाणेदारपणे हे निमंत्रण सरळ धुडकावून लावत नकार दिला. यामुळे अमेरिकेला जागतिक पोलीस समजण्याच्या प्रवृत्तीला सणसणीत उत्तर गेलेच पण काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आणि तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप करवून शिमला करार मोडण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही शिताफीने उधळला.
तिसरी खेप (ऑक्टोबर १९९९ - मे २००४)
१९९९ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये (राष्ट्रीय लोकशाही आघाडीला(रालोआला) घवघवीत यश मिळाले आणि अटलबिहारी वाजपेयींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

▶️महत्त्वाच्या नोंदी
✈️ भारतीय प्रवासी विमानाचे अपहरण
सन १९९९ साली तालीबान अतिरेक्यांनी IC - ८१४ या प्रवासी विमानाचे अपहरण केले . हे विमान नेपाळची राजधानी काठमांडूकडून दिल्लीला निघाले होते. अतिरेक्यांच्या या कृतीमुळे वाजपेयी सरकारने ३ अतिरेक्यांच्या बदल्यात प्रवासी विमानाची सुटका केली .
💥 २००१ संसदेवरचा हल्ला
२००१ साली दहशतवादी अफझल गुरू आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला . या हल्ल्यामध्ये ७ भारतीय सुरक्षा रक्षक मारले गेले. मात्र, दहशतवाद्याचा खात्मा पोलिसांनी केला म्हणून मोठा अनर्थ टळला, कारण एका दहशतवाद्याच्या अंगावर पूर्ण संसद उडवू शकेल एवढे RDX होते.
📜 🥇पुरस्कार
२०१४, भारतरत्‍न, हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या भारताची कीर्ती जगभरात वृद्धिंगत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते.
१९९२, पद्मविभूषण पुरस्कार
१९९३, डी. लिट. कानपूर विश्वविद्यालय
१९९४, लोकमान्य टिळक पुरस्कार
१९९४, उत्कृष्ट संसदपटूचा पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार

📰✍️ साहित्यिक प्रवास
वाजपेयी यानी राष्ट्रधर्म (मासिक), पाञ्चजन्य (साप्ताहिक) आणि स्वदेश व वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणून काम पाहिले.
✍️ त्यांची प्रकाशित झालेली पुस्तके खालीलप्रमाणे आहेत.

अमर आग है (कवितासग्रह)

अमर बलिदान

A Constructive Parliamentarian (संपादक - एन.एम. घटाटे)

कुछ लेख कुछ भाषण

कैदी कविराज की कुंडलिया(आणीबाणीच्या काळात तुरुंगात लिहिलेल्या कविता)

जनसंघ और मुसलमान

न दैन्यं न पलायनम्‌ (कविता संग्रह)

नयी चुनौती नया अवसर

New Dimensions of India's Foreign Policy (a collection of speeches delivered as External Affairs Minister during 1977-79)

Four Decades in Parliament (भाषणांचे ३ खंड)

बिन्दु-बिन्दु विचार

मृत्यू या हत्या

मेरी इक्यावन कवितायें (कवितासंग्रह)

मेरी संसदीय यात्रा (चार खंड)

राजनीति की रपटीली राहें

Values, Vision & Verses of Vajpayee : India's Man of Destiny

लोकसभा मे अटलजी (भाषणांचा सग्रह)

शक्ति से शान्ति

संकल्प काल

संसद मे तीन दशक (speeches in Parliament - 1957-1992 - three volumes Selected Poems

🪔 निधन
दीर्घ आजाराने दिल्लीच्या एम्स रूग्णालयात अटलबिहारी वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले.त्यांनी ५:०५ म.उ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता 'एम्स'च्या मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून ५:३५ म.उ जाहीर करण्यात आली.
📒 प्रसिद्ध कविता

अंतरद्वंद्व
अपने ही मन से कुछ बोलें
ऊॅंचाई
एक बरस बीत गया
क़दम मिला कर चलना होगा

कौरव कौन, कौन पांडव

क्षमा याचना

जीवन की ढलने लगी सॉंझ

झुक नहीं सकते

दो अनुभूतियॉं

पुनः चमकेगा दिनकर

मनाली मत जइयो

मैं न चुप हूॅं न गाता हूॅं

मौत से ठन गई

हरी हरी दूब पर

हिरोशिमा की पीड़ा

📜 🎖️सन्मान
२०१२ मध्ये झालेल्या आऊटलुक इंडियाच्या ‘द ग्रेटेस्ट इंडियन’ या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये वाजपेयी नवव्या क्रमांकावर होते.

📚 वाजपेयींवरील पुस्तके
अटलजी : कविहृदयाच्या राष्ट्रनेत्याची चरितकहाणी (सारंग दर्शने)
Atal Bihari Vajpayee : A Man for All Seasons (इंग्रजी, लेखक - किंगशुक नाग)
The Untold Vajpayee : Politician and Paradox (N. P. Ullekh)
काश्मीर : वाजपेयी पर्व (अनुवादित, अनुवादक - चिंतामणी भिडे; मूळ इंग्रजी लेखक - ए.एस. दुलत आणि आदित्य सिन्हा)
भारतरत्न अटलजी (डाॅ. शरद कुंटे)
हार नहीं मानूॅंगा : एक अटल जीवन गाथा (लेखक - विजय त्रिवेदी)
🇮🇳 जयहिंद🇮🇳
🙏🌹 विनम्र अभिवादन🌹🙏
स्त्रोतपर माहिती

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०२२

घरोघरी तिरंगा उपक्रम Har Ghar Tiranga

७५ वा अमृत महोत्सव साजरा करा.
घरोघरी तिरंगा उपक्रम आपला सहभाग नोंदवा.
Har Ghar Tiranga : घरोघरी तिरंगा | नोंदणी करा व प्रमाणपत्र मिळवा | Registration & Download the Certificate for 'Har Ghar Tiranga'

सर्वप्रथम 'हर घर तिरंगा' च्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website) जा. येथे क्लिक करूनही तुम्ही 👉'हर घरोघरी तिरंगा अधिकृत संकेतस्थळावर'👈 प्रवेश करू शकता. संकेतस्थळावर प्रवेश केल्यानंतर पुढील चार स्टेप्सचा (Four Steps) वापर करून तुम्ही प्रमाणपत्र डाऊनलोड करू शकता.


आपल्यासमोर दिसणाऱ्या PIN A FLAG या बटनावर क्लिक करा व आपला फोटो 'Profile Picture' वर अपलोड करा.
आपले नाव व मोबाईल क्रमांक किंवा आपल्या ई-मेल आयडी (Name, Mobile Number or E-mail ID) चा वापर करून Next या बटनावर क्लिक करा.

आपले लोकेशन वापरण्याची (Allow Permission for Location) परवानगी द्या. नंतर आपल्यासमोर आलेल्या PIN A FLAG हे बटन येईल.



असा मॅसेज येईल. Download Certificate वर क्लिक करून आपले प्रमाणपत्र डाऊनलोड करा.






मंगळवार, १२ जुलै, २०२२

नरवीर शिवाजी काशीद Narvir Shivaji Kashid

          ⚜️🚩🏇🚩👳‍♀️

         नरवीर शिवाजी काशीद Narvir Shivaji Kashid 

वीरगती : १२-१३ जुलै १६६० ची रात्र

पन्हाळ्यावर म्हणे बरसवु कहर.. मोगलांचा सरदार सिद्दी जौहर..

घेरती सैतान पन्हाळ्याचा पायथा.. चक्रव्युव्हात स्वराज्याचा कर्ताकरीविता..

गडाचा झोंबती अंगाला वारा.. आठवे तो विशालगडाचा आसरा..

निघाला राज्या भेदन्या चक्रव्यु.. डोळ्यात रुते फसलेला अभिमन्यू..

एक विर ऐसा.. परी छत्रपति जैसा.. छत्रपतिसाठी सांडु म्हणे रगद..

नाव तयाचे शिव काशिद.. शिवबांना लपवावे.. त्या दाखवावे..

हुबेहुब ऐसा कोणी न ओळखावे.. राजापरी प्रेम जणु विर थोपटी मांडी..

क्षणभर राजा म्हणविन्या शिर देई तोफे तोंडी.. सुखरुप पोचावा स्वराज्याचा भ्रमर..

पिळ देऊन मिशीला होईल तया मि अमर.. बेत ठरला.. प्रति शिवा मोगलानी हेरला..

मावळा राजा म्हणुनी कैद होई.. लाभली जन्मो जन्मीची पुण्याई..

खदखदुन हसे ऐसा सिद्दी.. म्हणे मि आहेच जिद्दी..

काळ भासवि स्वताःला.. पेश करा आमच्या समोर कैद्याला..

शिवा काशिद चाले तोऱ्यात.. आग लाविली जणु तुफाणी वाऱ्यात..

उभा राहीला सिद्दी समोर.. पाहुन मर्दाला सिद्दी करे घुर घुरं..

दिवठ्याच्या पेटल्या मशाली,. अंधाराचीही उजळे सावली..

नजर रोखुन सिद्दी पाही.. शंकेचा धुर करी तया लाही लाही..

आग गेली तळपायाची मस्तकात.. ओरडुन म्हणे झाला घात..

ऐकुन काशिद हसला.. मोगलांचा तर आवाज बसला..

दिसतो खरा राजा शिवछत्रपति.. ओळखले त्यास तो तर प्रति छत्रपति..

पाहुन विरा तो बोले जौहर.. मरणे का डर नही क्या काफर..

तो असे मावळा निडर.. बोलतो कसा बेफिकिर..

आलोया ईथे मृत्युला न जुमानुन भाग्य उजळन्या.. राजा म्हणुन मरण्या..

आम्हा मावळ्या असे माज.. स्वराज्यासाठी मरण्या उभीआमची फौज..

तु फक्त मारीशी देहाला,. पण हा आत्मा तृप्त होई अमरतेला..

सुटला तोल सिद्दीचा.. वेध घेई मर्दाच्या मानेचा..

त्यागीतो देहा काशिद तो स्वराज्यविर.. लाख मरती पोशिंद्यासाठी धडा वेगळे होती शिर..

ऐसा शिवछत्रपति राजा.. लाभली तया जिव्हाळ्याची प्रजा..

ऐसे जन्मले कैक विर.. झेलती स्वराज्याचे वार ..

असे त्यांना या मातिचा लळा.. शुल छातित रोवुनी सोसती शिवबासाठी कळा..

झुरती नसे मावळे सत्तेच्या गर्दित.. शिवछत्रपति होई धन्य धन्य तो शिवा काशिद शिवा काशिदला मानाचा त्रिवार मुजरा ।। एक आवाज एकच पर्याय ।। 

।।जय जिजाऊ जय शिवराय।। 

शिवा काशीद हे शिवाजी राज्यांच्या सैन्यात न्हावी होते. त्यांनी शिवाजी महाराजांवर आणि पर्यायाने मराठी राज्यावर आलेल्या संकटाचे निवारण करतेवेळी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, म्हणून शिवाजीराजे सिद्दी जोहरने पन्हाळगडाला दिलेल्या वेढ्यातून सुखरूप निघाले व विशाळगडावर पोहचले. हे शिवा काशीद हुबेहूब शिवाजी राजांसारखे दिसत असत. त्यांना पोशाखही शिवाजी महाराजांचा दिला होता. त्यामुळे सिद्दी जोहरच्या सैनिकांनी पालखीत बसलेल्या आणि पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवा काशीदांना, शिवाजी राजे समजून पकडले आणि सिद्दीकडे नेले. 

🚩 *शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा*

             फ़ाजलखान म्हणाला "अगर आपको जान चाहिए तो सच बताओ", तरीदेखील शिवाजी काशिद म्हणाले,"हॉं... मै ही शिवाजी महाराज हूं". पण वर्मीच्या घावाचा व्रण दिसला पाहिजे अशी अफ़जलखानाच्या मुलाची तथा फ़ाजलखानाची पक्की खात्री होती. तो वर्मी घाव त्यांना दिसला नाही. कारण ते छ्त्रपती शिवाजी महाराज नव्हते.तर प्रतिशिवराय नरवीर शिवाजी काशिद होते. यामुळे सिद्धी जौहरला कळून चुकले की आपणास छत्रपती शिवाजी महाराजांनी चकवा दिला आहे.यावर शिवाजी महाराज म्हणजेच शिवाजी काशिद यांच्या जवळ संशयाच्या नजरेने न्याहाळत विचारले, तू छत्रपती शिवाजी महाराज नाहिस तर कोण आहेस ? यावर शिवाजी काशिद हसत म्हणाले, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक चाकर आहे,यावर सिद्धी म्हणाला हं.. कसलं स्वराज्य ? कसाला शिवाजी राजा ? जौहर संतापलेला होता.तो छद्मी स्वरात म्हणाला, मला दगाबाजी करून तुझा शिवाजी राजा माझ्या हातातून निसटला आहे.पण जाणार कुठे ? गाठ जौहरशी आहे ! पाताळातून शोधून काढीन’ शिवाजी काशिद जौहरकडे पाहून हसू लागले आणि म्हणाले, ’आमचे राजे धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे तुमच्या वेढ्यातून निसटले आहेत. आता हाती लागणे शक्य नाही. छातीचा कोट करून आमच्या राजाला जपणारे कितीएक तरी त्यांच्या सोबत आहेत. जीव देतील स्वत:च्या राजासाठी पण राजाला तुमच्यापासून राखून ठेवतील हाती लागू देणार नाहीत.

            सिद्धी जौहर मोठमोठ्याने हसू लागला आणि शिवाजी काशिद यांच्याकडे पाहत म्हणाला, तुझा राजा नक्की सापडेल आणी सापडल्यावर मी त्याला काय शिक्षा देईन ठाऊक आहे काय ? जौहरने स्वत:चा हात गळ्याभोवती फ़िरवला आणि बोलला , समजलं ? शिरच्छेद करील त्याचा,आणि तू..... त्याच्यानंतर तुझं देखील मुंडकं उडवीन मी ! म्हणजे आता जे बोलत होतास त्याबद्दल तुला पश्चाताप वाटेल. यावर शिवाजी काशिद यांना जौहरचे बोलणे आवडले नाही. त्यांचे डोळे रागाने लालेलाल झाले आणि जौहरच्या नजरेला नजर भिडवित शिवाजी काशिद ओरडले,खामोश! माझ्या राजाबद्दल एक शब्द जरी वावगा बोललास तर याद राख! वटवागूळ देखील रात्रीच घुत्कारतं, म्हणून ते कोणी कान देऊन ऐकत नाही, तुझं बोलणं तसलंच आहे.ते कशापायी ऐकायचं ? 

               माझा शिवाजी राजा... त्यांची सर तुझ्यासारख्याला यायची नाही. तू पोटार्थी हबशी... तुला शिवरायांचं मोठंपण काय समजणार ? आमचा राजा लाखमोलाचा आहे, पोशिंदा आहे.लाख मरोत पण माझा राजा जगो,असंच मी म्हणणार! हे सारं ऐकून सिद्धी जौहर गांगरला. थोड्याच वेळात स्वत:स सावरून म्हणाला, वैसाही होगा...... मरने को हो तैयार.. तेरे राजा के वास्ते तू मरेगा ? अब यहॉं इसी वक्त ? शिवाजी काशिद हसत म्हणाले, मरणाचे भय मला घालतोस ? मरणाचे भय तुझ्यासारख्यांना वाटावं, आम्हाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा स्वराज्याचा भगवा हाती घॆतला, त्याच वेळी या मर्द मराठा मावळ्याने छातीवर मरण गोंदवून घेतलं. स्वराज्यासाठी मरण कुठेही येवो, कसंही येवो... मरणाला भिऊन पळणारा हा शिवाजी काशिद नाही.मेला तरी स्वराज्यासाठी मरण:..! स्वराज्यासाठी जगणं आणि स्वराज्यासाठी मरणं..स्वराज्याचा चंग बांधला आहे आम्ही.तेंव्हा मरणाचं भय या गड्याला गालू नकोस समजलं ? जौहर पिसाळला शिवाजी काशिद यांचे बोलने त्याच्या जिव्हारी झोंबलं, छत्रपती शिवाजी महाराज हातून निसटल्याने तो बिथरला होता,शिवाजी काशिद हे देखील वस्तादों के वस्ताद होते. त्यांना ना मरणाचे भय, ना खेद, ना खंत यांचे बोलणे आणि विचार म्हणजे फ़क्त छत्रपती शिवाजी महाराज रयतेच्या स्वराज्याचे.

               शिवाजी काशिद यांची स्वराज्यनिष्ठा पाहून सिद्धी जौहरने शिवाजी काशिद यांना ठार मारण्याचा आदेश दिला. तरी देखील शिवाजी काशिद हे ठाम होते.जौहरच्या सैनिकांनी शिवाजी काशिद यांच्या छातीत दोन भाले खुपसले.शिवाजी काशिद खाली कोसळले; शिवाजी काशिद यांच्या छातीतून भाले खुपसल्याने रक्त उडाले. खाली पडत असताना प्राण सोडण्यापुर्वी शिवाजी काशिद म्हणाले.’अरे वेड्यांनो! सोंग घेणार्या शिवाजीची पाठ पाहता आली नाही.खर्या शिवाजीराजांचा विचारच सोडून द्या,गुप्तहेर खात्यातील शिवाजी काशिद यांनी प्राण सोडला.त्यांना शिवाजी राजांचे रुप घेत असताना माहीत होते की, आपल्याला जर दगाफ़टका झाला तर आपल्याला जीव गमवावा लागेल,याची पुरेपूर खात्री असताना देखील आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी; रयतेच्या स्वराज्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिरूप घॆऊन आपले प्राण त्यागले.


या शिवा काशीद नावाच्या मर्द मावळ्याची दुरवस्थेतील समाधी पन्हाळगडाच्या पायथ्याशी, विशाळगडाकडे जाणाऱ्या वाटेतील एका गावापाशी आहे. नेबापूरच्या (चव्हाण) "पाटलांनी" शिवा काशिदांना प्रति शिवाजी महाराज बनण्याची कल्पना दिली होती. ही कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी नेबापूर (चव्हाण) पाटील आणि शिवा काशीद यांनी शिवाजी महाराजांशी थेट बैठक आयोजित केली. कारण पन्हाळा नुकताच स्वराज्यात सामील झाला होता. त्या काळात शिवाजी महाराज नवीन पन्हाळ्याचे व्यवस्थापन करण्याची योजना करीत होते. मानवी संसाधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी नेबापूर (चव्हाण) पाटील यांची होती. असेही सांगितले जाते की सिद्दी जौहरला दिशाभूल करण्याचे धोरण आखण्यात नेबापूर (चव्हाण)पाटील हे मुख्य सूत्रधार होते. नेबापूर (चव्हाण) पाटील हा सर्वात विश्वासू वैयक्तिक हेर होता. हे देखील सांगण्यात आले आहे की बाजी प्रभू आणि नेबापूर पाटील यांनी एकत्रितपणे योजना आखली आणि अंमलात आणली. सर्व माहितींपैकी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे ती म्हणजे शिवाजी महाराजांनी पन्हाळा ताब्यात घेतला तेव्हा शिवाजीराजे सारखे दिसण्याबद्दल शिवा काशिदचे प्रथम नेबापूर पाटलांनी कौतुक केले. पण लवकरच शिवा काशिदांनी शिवाजी महाराजांचा आणि स्वराज्याचा जीव वाचविला. नेबापूर (चव्हाण) पाटील यांच्या कल्पनेचा सन्मान म्हणून शिवाजी महाराजांनी "मानाची पायरी" भेट दिली."मानाची पायरी" हा एक मोठा आयताकृती कोरीव दगड आहे. तो अजूनही नेबापुरात आहे.

स्वराज्यासाठी अनेक हेरांनी काम केले होते, पण त्यांच्या कामाच्या गुप्ततेमुळे आणि कामाच्या व्याप्तीमुळे त्याची इतिहासात नोंद झाली नाही.   

 🚩 हर हर महादेव.... 🚩

         🇮🇳 *जयहिंद* 🇮🇳

🙏 *विनम्र अभिवादन* 🙏

       स्त्रोतपर माहिती 

सोमवार, ४ जुलै, २०२२

पिंगाली वेंकय्या Pingali Venkayya


🚂
तिरंग्याचे आद्य रचनाकार
पिंगाली वेंकय्या Pingali Venkayya 
जन्म : 2 ऑगस्ट 1876 भटलापेनुमारू , मछलीपट्टनम जवळ , मद्रास प्रेसीडेंसी , ब्रिटीश भारत (सध्याचे आंध्र प्रदेश , भारत)
मृत्यू : 4 जुलै 1963 (वय 86) ( भारत )

राष्ट्रीयत्व : भारतीय प्रसिध्दी : भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना

भारताचा ध्वज कोणत्या रंगाचा असावा, त्यात किती आणि कोणते रंग असावेत, त्याचा आकार कसा असावा याचा सखोल अभ्यास करून त्यांनी तिरंगा साकारला. ते केवळ तिरंग्याचे निर्माते नव्हते तर जपानी भाषेचे शिक्षक, सिद्धहस्त लेखक आणि जिओफिजिसिस्टही होते.
कृष्णा जिल्ह्यातील दिवी तालुक्यातील भटलापेन्नुमारू येथील हनुमंतरायुडू आणि वेंकटरत्नम्मा या दांपत्याच्या पोटी 2 ऑगस्ट 1876 रोजी पिंगाली यांचा जन्म झाला. देशभक्तीने भारावलेल्या पिंगाली यांनी वयाच्या १९ व्या वर्षी बोअर युद्धासाठी आपले नाव नोंदवले आणि ते सैन्यात भरती झाले. त्यानंतर आफ्रिकेत असताना त्यांची महात्मा गांधीजींशी भेट झाली आणि त्यांचे ऋणानुबंध जुळले. ते पुढे ५० वर्षे टिकून होते. भारतात परतल्यावर बंगलोर आणि मद्रास येथे त्यांनी रेल्वे गार्ड म्हणून काम केले आणि मग बेल्लारी येथील शासकीय सेवेत प्लेग अधिकारी म्हणून ते रुजू झाले. पण त्यांची देशभक्तीची आस त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षणाच्या ओढीने त्यांनी थेट लोहरमधील अँग्लोवेदिक महाविद्यालय गाठले आणि प्राध्यापक गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जपानी भाषा आणि इतिहासाचे शिक्षण घेतले.
पिंगाली यांनी स्वत:ला नॅशनल स्कूलच्या विकासासाठी वाहून घेतले. या ठिकाणी प्राथमिक सैन्यप्रशिक्षण, घोडेस्वारी, इतिहास आणि शेतीविषयी प्रशिक्षण देण्यात येत असे. ते केवळ पुस्तकी ज्ञानाने समाधानी होणारे नव्हते. त्यांच्या दैनंदिन आचरणातून त्यांचा उदारमतवादीपणा दिसत असे. १९१४ मध्ये आपल्या शेतावर ‘स्वेच्छापुरम’ ही संस्था स्थापन केली.
१९१६-१९२१ या कालावधीत पिंगाली यांनी सुमारे ३० ध्वजांचा अभ्यास करून पिंगाली यांनी भारतीय ध्वजाची कल्पना मांडली. आपल्या तिरंग्याच्या सध्याच्या रूपाचे डिझाईन तयार करण्याचे श्रेय पिंगाली यांना दिले जात असले तरी भारतीय ध्वजाची पाळेपुळे ‘वंदे मातरम्’ चळवळी पर्यंत जातात. १ ऑगस्ट १९०६ रोजी कलकत्त्यातील पारसी बगान स्क्वेअर (ग्रीन पार्क) येथे पहिले ध्वजारोहण झाले. हा ध्वजही तीन रंगांत होता. वरील भागात लाल, मध्ये पिवळा आणि खालच्या बाजूला हिरवा, अशी या झेंडय़ाची रंगसंगती होती. लाल भागात पांढऱ्या रंगाची आठ कमळाची फुले कोरलेली होती. पिवळ्या भागात निळ्या रंगाने देवनागरी लिपीत ‘बंदे मातरम्’ असे लिहिले होते. मदाम कामा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी १९०७ मध्ये पॅरिसमध्ये ध्वजारोहण केले होते. या झेंडय़ाची रंगसंगतीही पहिल्या ध्वजाप्रमाणेच होती. फरक एवढाच की, पहिल्या पट्टीमध्ये केवळ एकच कमळ होते आणि सप्तर्षी दर्शविणारे सात तारे होते. बर्लिनच्या समाजवादी बैठकीत हा ध्वज फडकविण्यात आला. १९१७ मध्ये जेव्हा राजकीय चळवळीने वेग घेतला, त्यावेळी अॕनी बेझंट आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ध्वजारोहण केले होते. या ध्वजाच्या डाव्या बाजूच्या कोपऱ्यात युनियन जॅकचा शिक्का होता. त्याचप्रमाणे पांढऱ्या आकाराचे अर्धवर्तुळ आणि ताऱ्याचे चिन्ह होते. त्यावेळच्या जनतेचे उद्दिष्ट दाखविणे हा त्यामागचा संकेत होता आणि सत्ता मिळविण्याची इच्छा प्रदर्शित करण्यासाठी युनियन जॅकचा शिक्का होता. पण त्या ध्वजावरील युनियन जॅकचे अस्तित्त्व ही राजकीय तडजोड असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे या ध्वजाचा स्वीकार करण्यात आला नाही. १९२१ मध्ये स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे आले आणि त्याचवेळी तिरंग्याचे पहिले रूप जनतेसमोर आले.
१९२१ ते १९३१ ही दहा वर्षे पिंगाली यांच्यादृष्टीनेच नव्हे तर आंध्र प्रदेशमधील स्वातंत्र्य चळवळीचा महत्त्वाचा कालावधी ठरला. ३१ मार्च आणि १ एप्रिल १९२१ या दोन दिवशी बेझवाडा येथे एआयसीसीच्या (ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने) ऐतिहासिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी पिंगाली वेंकय्या ध्वज घेऊन गांधीजींकडे गेले. भारतातील दोन प्रमुख धर्म दर्शविणारे लाल आणि हिरवा असे दोन रंग यात होते. अशाप्रकारे राष्ट्रध्वज अस्तित्वात आला, पण ऑल इंडिया कॉँग्रेस कमिटीने तो अधिकृतपणे स्वीकारला नव्हता. गांधीजींनी तो स्वीकारल्यानंतर पुढील प्रत्येक कॉँग्रेस बैठकीमध्ये हा ध्वज फडकविण्यात येत असे. सामान्य माणसाच्या प्रगतीचे प्रतीक असलेल्या चरख्याचा या ध्वजामध्ये अंतर्भाव करण्यात यावा, अशी सूचना जालंधरचे हंसराज यांनी केली. त्यानंतर गांधीजींनी इतर अल्पसंख्यांकांचे अस्तित्व दर्शविणारी पांढरी पट्टी या ध्वजात समाविष्ट केली. १९३१ पर्यंत त्याला लोकमान्यता मिळाली नव्हती. ध्वजामधील रंगांचा अर्थ समजण्यावरूनही त्यावेळी जातीय तणाव निर्माण झाला होता. १९३१ मध्ये कराची येथे भरलेल्या कॉँग्रेसमध्ये यावरील अंतिम तोडगा काढण्यात आला. शौर्य दर्शविणारा भगवा, सत्य आणि शांती दर्शविणारा पांढरा आणि समृद्धी व विश्वास दर्शविणारा हिरवा असा या तीन रंगी ध्वजाचा अर्थ लावण्यात आला. चरखा आणि सूत यांच्याऐवजी ध्वजाच्या मध्यभागी अशोकचक्राचा समावेश करण्यात आला.
राष्ट्रध्वजातील तीन रंगांचा अर्थ समजावताना सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांनी व्यावहारीक सुखांचा त्याग करणे हे भगवा रंग दर्शवतो, सत्याची वाट दाखवणे हे पांढरा रंग सांगतो तर हिरवा रंग आपले जमिनीशी असलेले नाते दर्शवितो आणि अशोकचक्र हे धर्माचे प्रतीक आहे.
राष्ट्रध्वजाची प्राथमिक कल्पना मांडणारे पिंगाली वेंकय्या यांचे ४ जुलै १९६३ रोजी निधन झाले.

जाणून तिंरग्याचे रचनाकार पिंगली वेंकैया यांच्याबद्दलच्या १० खास गोष्टी- 
♦वयाच्या १९व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात भरती झाले. ते दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले.
🔸याच काळात त्यांची आणि महात्मा गांधींची दक्षिण आफ्रिके मध्ये भेट झाली. त्यानंतर पुढील पन्नास वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात होते.
🔹पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड वेंकैया हे टोपणनाव देण्यात आले होते.त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे.
🔸त्यांना उर्दू तसेच जपानी भाषेबरोबरच इतरही अनेक भाषा अवगत होत्या.
♦३१ मार्च १९२१ मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला. मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चरखा असावा असे सांगत चरख्यासहीत हा झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला. आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला.
🔸१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले.
🔹पिंगली यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. भारताचा तिरंगा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
♦१९६३ साली पिंगली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी २००९ साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते.
🔹२०११ साली भारतरत्न पुरस्कारासाठी (मरणोत्तर) पिंगली यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
🔸मागील काही वर्षांपासून त्यांच्या मुलीला सरकारकडून पेन्शन देण्यात येत आहे.
🇮🇳 जयहिंद 🇮🇳
🌹🙏 *विनम्र अभिवादन* 🙏🌷

स्त्रोतपर माहिती 

स्वामी विवेकानंद Swami Vivekanand ४ जुलै


स्वामी विवेकानंद  Swami Vivekanand (नरेंद्रनाथ दत्त)

(भारतीय हिंदू गुरु)

जन्म : १२ जानेवारी १८६३ (कोलकाता, बंगाल प्रेसिडेन्सी, तत्कालीन ब्रिटीश भारत)

मृत्यू : ४ जुलै १९०२ (बेलूर मठ, बंगाल प्रेसिडेन्सी, तत्कालीन ब्रिटीश भारत)

राष्ट्रीयत्व : भारतीय

नागरिकत्व : ब्रिटीश भारत

शिक्षण : कला शाखेत पदवीधर

प्रशिक्षणसंस्था : कलकत्ता विद्यापीठ

धर्म हिंदू

वडील : विश्वनाथ दत्त

आई : भुवनेश्वरीदेवी दत्त

                     स्वामी विवेकानंद हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते. तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत. भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिन म्हणून साजरा केला जातो. 

 💁🏻‍♂️ बालपण 

उत्तर कोलकत्ता सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३2 वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला. त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवतगीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली. त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळ आदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई. जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोन यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता. विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरू नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठियुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.

📖 शिक्षण संपादन

नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

नरेंद्रनाथांनी डेविड ह्युम, इम्यानुल कँट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बट स्पेंसर,जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता. काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, "नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे. मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही." त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते.

🤝 गुरु रामकृष्ण यांची भेट

कोलकात्यात शिमला नामक मोह्ल्यात् सुरेंद्रनाथ मित्र यांनी रामकृष्ण परमहंस यांना आपल्या घरी एका समारंभासाठी बोलविले होते. त्यावेळी कुणी चांगला गायक न मिळू शकल्याने त्यांना आपल्या शेजारी राहणा-या नरेन्द्रला बोलावून आणले. इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात श्री रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्याचे गायन ऐकून संतुष्ट झाले. त्यांनी त्याला दक्षिणेश्वर येथे येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योगदृष्टीच्या साहाय्याने श्रीरामकृष्ण नरेंद्रनाथांचा महिमामय अति उज्ज्वल भावी काल पाहू शकले होते म्हणूनच ते नरेंद्राकडे आकृष्ट झाले, असे दिसते.

⚜️ नरेंद्राची साधना

              अनन्यचित्त होऊन गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्र उन्नती साधत होता. रामकृष्णांच्या पवित्र सहवासात नरेंद्रात आमूलाग्र बदल झाले. त्यांच्यासह असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. रामकृष्णांच्या सेवेत हे सर्व तरूण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व आध्यात्मिक प्रेमसंबंध जोपासले गेले. येथे या ठिकाणीच भावी 'रामकृष्ण संघाची' पायाभरणी झाली.


🤝 *गुरुभेट व संन्यासदीक्षा*

याच ठिकाणी एका शुभ दिवशी रामकृष्ण यांनी आपल्या यास सर्व शिष्यांना भगवी वस्त्रे देऊन संन्यासदीक्षा दिली. संन्यासग्रहणानंतर गतकालीन युगप्रवर्तक संन्यासी मंडळींचे जीवन आणि उपदेश यांचे अनुशीलन करणे हेच नरेंद्राचे लक्ष्य बनले. नरेंद्राच्या घरी लहानाचे मोठे झालेले त्यांचे नातेवाईक डॉ. रामचंद्र दत्त हे रामकृष्णांचे भक्‍त होते. धर्मभावनेने प्रेरित होऊन नरेंद्राच्या मनात लहानपणीच तीव्र वैराग्य उत्पन्न झालेले पाहून डॉ. दत्त एकदा त्यांना म्हणाले, "भाई, धर्मलाभ हेच जर तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट असेल, तर तू ब्राह्मोसमाज वगैरेंच्या भानगडीत पडू नकोस. तू दक्षिणेश्‍वरीला श्रीरामकृष्णांकडे जा." एके दिवशी त्यांचे शेजारी सुरेंद्रनाथ यांच्याकडेच रामकृष्ण परमहंसांचे त्यांना दर्शन झाले. सुरुवातीचे काही दिवस रामकृष्ण नरेंद्रनाथांना आपल्यापासून क्षणभरही दूर ठेवू इच्छित नसत. त्यांना जवळ बसवून अनेक उपदेश करत. ते दोघेच असतांना त्यांची आपापसांत खूप चर्चा होत असे. रामकृष्ण त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा भार नरेंद्रनाथांवर सोपवणार होते. एके दिवशी रामकृष्णांनी एका कागदाच्या कपट्यावर लिहिले, `नरेंद्र लोकशिक्षणाचे कार्य करील.’ काहीसे आढेवेढे घेत नरेंद्रनाथ त्यांना म्हणाले, "हे सारे माझ्याने होणार नाही." रामकृष्ण त्यांना लगेच दृढपणे म्हणाले, होणार नाही? अरे तुझी हाडं हे काम करतील.” पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यासदीक्षा देऊन त्यांचे नामकरण `स्वामी विवेकानंद’ असे केले.

🚩 धर्मप्रसाराच्या कार्याला सुरुवात

रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात एक पडक्या इमारतीत मठाची स्थापना केली. तत्पूर्वी त्या जागेत भुतांचा वावर आहे, असा लोकप्रवाद होता. विवेकानंदांनी रामकृष्णांनी वापरलेल्या वस्तू आणि त्यांच्या भस्मास्थींचा कलश त्या ठिकाणी नेऊन ठेवला आणि त्यांचे भक्‍त तेथे राहू लागले.

🛡️ ‘विवेकानंद’ नामकरण

राजा अजितसिंग खेत्री यांनी १० मे १८९३ रोजी स्वामीजींना 'विवेकानंद' असे नाव दिले.

🛕 कन्याकुमारी

रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद भारत भ्रमण करण्यास बाहेर पडले. अखेरीस ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन पोहोचले. तेव्हा त्यांनी समुद्रात उडी मारली आणि शिलाखंडावर जाऊन ध्यानात बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी, येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे आणि त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे असा दृढ संकल्प स्वामीजींनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोचविणे आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करणे यासाठी त्यांनी भारताच्या सीमा ओलांडून पाश्चिमात्य जगात जाण्याचेही ठरविले.

🏮 शिकागोतील सर्वधर्मपरिषद

             सप्टेंबर ११, १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले. तेथे त्यांनी "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सुमारे सात हजार लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला, जो दोन मिनिटे अखंड चालू होता. "जिने जगाला सहिष्णुता आणि वैश्विकतेचा स्वीकार करण्याची शिकवण दिली आहे, अशा सर्वात प्राचीन असणाऱ्या संन्याशांच्या वैदिक परंपरेच्या वतीने, मी जगातील नवनिर्मित राष्ट्रांचे स्वागत करतो" या शब्दात त्यांनी आपले व्याख्यान पुढे चालू केले. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. त्यांनी फारच सुंदर वक्तृत्व करून अमेरिकन नागरिकांची मने जिंकली. आपल्या अल्पशा व्याख्यानात जणू त्यांनी विश्वधर्म परिषदेचे प्राणतत्त्वच विशद केले. काही दिवसांतच आपल्या विचारांनी त्यांनी अमेरिकेतील वृत्तपत्रांचे लक्ष वेधून घेतले. या वृत्तपत्रांनी स्वामींचे वर्णन 'भारतातून आलेला एक वादळी व्यक्तिमत्त्वाचा संन्यासी' असे केले. 'न्यूयॉर्क क्रिटिक'ने त्यांच्याबद्दल लिहिले आहे की "ते दैवी वक्तृत्वाचे धनी तर आहेतच परंतु त्यांचे धीरगंभीर उद्‌गार देखील त्यांच्या काषाय वस्त्रात शोभून दिसणाऱ्या तेजस्वी मुखमंडलाहून काही कमी आकर्षक नाहीत." वेदान्त आणि योग या विषयावर त्यांनी अमेरिका, इंग्लंड आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर तसेच खाजगी व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापली.

🏯 समाधी

शुक्रवार, जुलै ४, १९०२ ह्या दिवशी त्यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. समाधी घेण्याच्या दिवशी त्यांनी पहाटे बेलूर मठात परिव्राजकांना शुक्ल यजुर्वेदाचा पाठ शिकवला. आणि स्वामी प्रेमानंद या गुरुबंधूंसमवेत काही काळ फिरत असता त्यांना रामकृष्ण मठाच्या भविष्यासंबंधात काही सूचना केल्या. ध्यान करत असतांना रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी त्यांनी समाधी घेतली आणि चाळीस वर्षापर्यंत जगणार नाही ही स्वतःची भविष्यवाणी खरी केली. कन्याकुमारी येथे समुद्रात काही अंतरावर त्यांचे विवेकानंद स्मारक विवेकानंद केंद्र या संस्थेच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आहे.

💎 तत्त्वविचार आणि शिकवण

 स्वामी हे हिंदू तत्त्वज्ञानाच्या 'वेदान्त' शाखेचे पुरस्कर्ते होते. आद्य शंकराचार्य यांच्या विचारांना पुढे नेत त्यांनी हे तत्त्वज्ञान प्रतिपादित केले.

त्यांच्या मते सर्व प्राणिमात्र शिवाचे अंश आहेत, त्यामुळेच 'शिवभावे जीवसेवा' हे रामकृष्ण यांचे वचन त्यांनी शिरोधार्य मानले.

प्रत्येक जीव हा मूळ रूपातच ईश्वरी/दैवी आहे.

अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हे आपले ध्येय आहे.

कर्म किंवा पूजा किंवा मानसिक नियंत्रण किंवा तत्त्वज्ञान यापैकी एक किंवा अनेक मार्गांचा उपयोग करून मुक्ति मिळवली पाहिजे.

उठा, जागे व्हा, आणि आपले ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका.

'दरिद्री नारायण' हा शब्द विवेकानंदानी जगाला दिला.

त्यांचे बंगालीतील সখার প্রতি (लिप्यंतरण: 'सखार प्रति') (या मथळ्याचा अर्थ : मराठी -"मित्रास"; ,इंग्लिश - "To a Friend") नावाच्या कवितेतील एक अंश:

देवनागरी लिप्यंतरण:

बहुरुपे सम्मुखे तोमार छाडि

कोथाय खूंजिछो ईश्वर

जीवे प्रेम करे जेई जन

सेई जन सेविछे ईश्वर

अर्थ: ईश्वर अनेक रूपाने तुझ्या समोर उभा आहे. ते सोडून तू कुठे ईश्वराला शोधतोस? जे कोणी प्राणिमात्रांवर प्रेम करतात, तेच ईश्वराची (खरी) सेवा करतात. 

♻️ आत्मसाक्षात्काराचे ध्येय व ते गाठण्याच्या पद्धती

ज्याप्रमाणे प्रत्येक शास्राच्या स्वतःच्या पद्धती असतात त्याप्रमाणे धर्माच्याही विशिष्ट पद्धती असतात. धर्माचे ध्येय गाठण्याच्या पद्धतींना आम्ही 'योग' म्हणतो, आणि आम्ही जे योग शिकवतो ते वेगवेगळ्या स्वभावांना व मनोधर्मांना जुळणारे असतात, यांचे वर्गीकरण असे—

१.कर्मयोग— या पद्धतीनुसार कर्म व कर्तव्य यांच्या द्वारे मनुष्य र दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.

२.भक्तियोग— यानुसार सगुण ईश्वरावर प्रेम करून व त्याची भक्ती करून मनुष्य आपल्या दिव्य स्वरूपाचा साक्षात्कार करून घेतो.

३.राजयोग— यानुसार मनःसंयमाच्या द्वारे मनुष्य आपल्या दिव्य जीवनाचा साक्षात्कार करून घेतो.

४.ज्ञानयोग—ज्ञानाच्या द्वारे मनुष्य साक्षात्कार करून घेतो.

त्या एकमेव केंद्रस्थानाकडे म्हणजे ईश्वराकडे जाण्याचे हे भिन्न भिन्न मार्ग होत.( ग्रंथावली खं.८,पृ.३८६)

🎯 कर्मयोग

अखिल मानवजातीचे चरम वा अंतिम लक्ष्य ज्ञान हे होय. संसारामध्ये आम्हाला भोगाव्या लागणाऱ्या एकूणेक दु:ख-क्लेशांचे कारण हेच की आम्ही मोहग्रस्त होऊन सुखालाच आपल्या जीवनाचे अंतिम लक्ष्य ठरवून त्यासाठी सारखी धडपड करीत असतो. माणसाला आयुष्यात जेवढ्या म्हणून शक्तींना हाताळावे लागते, त्यापैकी मानवी चारित्र्य घडविणारी कर्म शक्ती हीच सर्वांपेक्षा अधिक प्रबल होय. आपल्याला कर्म हे करावेच लागेल पण त्याचबरोबर त्या कर्माच्या पाठीशी लपलेला कोणता हेतू आपल्याला कार्यास प्रवृत्त करीत आहे हेही आपण हुडकून काढले पाहिजे, आणि मग सुरुवातीला आपले बहुतेक सारेच्या सारे हेतू स्वार्थाने लडबडलेले असल्याचे आपल्याला आढळून येईल. परंतु चिकाटी धरल्यास ती स्वार्थमलिनता कमी होत जाऊन अखेरीस समय येईल ज्यावेळी आपण अधून मधून नि:स्वार्थ कर्म करण्यास समर्थ होऊ. ज्या मंगल क्षणी आपण संपूर्ण नि:स्वार्थ होऊ, त्याच क्षणी आपली समस्त शक्ती एके जागी केंद्रीभूत होईल आणि आपल्यातील अंतरस्थ ज्ञान प्रकाशित होईल.

🎯 ब्रह्म संंकल्पना

अद्वैत तत्त्वज्ञानानुसार ह्या विश्वात एकच गोष्ट सत्य आहे. आणि तिलाच तत्त्वज्ञानात ‘ब्रह्म’ म्हटले आहे; बाकी सर्वकाही असत्य असून ते मायेच्या शक्तीने ब्रह्मातून व्यक्त व तयार झाले आहे. परत त्या ब्रह्माप्रत जाऊन पोहोचणे हेच आपले लक्ष्य आहे.

🎯 भक्तियोग

भक्तियोग म्हणजे खऱ्या, अकृत्रिम भावाने भगवंताचे अनुसंधान. ह्या अनुसंधानाची उत्पती प्रेमातून, प्रेमानेच त्याचा परिपोष आणि त्याची परिसमाप्तीही प्रेमातच. अत्युत्कट भगवत प्रेमाचा क्षणभराचा दिव्योन्मादही आपल्याला कायमचे मुक्त करू शकतो.

🎯 शिक्षण संदर्भातील विचार

शिक्षण म्हणजे एखाद्याच्या अंगी अगोदरपासून असलेल्या पूर्णत्वाचा आविष्कार होय. विधार्थी जर शाळेत येत नसेल तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे गेले पाहिजे.

📚 प्रकाशित चरित्रे आणि अन्य पुस्तके

विवेकानंदांचे चरित्र सर्वप्रथम इ.स. १८९८ साली, विवेकानंदांच्या हयातीत प्रकाशित झाले. ते चरित्र मराठीत होते. त्याशिवायची चरित्रे :-

अमृतपुत्र विवेकानंद (बालसाहित्य, दत्ता टोळ)

मानवतेचा महापुजारी (सुनील चिंचोलकर)

राष्टद्रष्टे विवेकानंंद : (वि.वि. पेंंडसे, ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन)

शोध स्वामी विवेकानंदांचा (दत्तप्रसाद दाभोळकर)

संन्याशाची सावली (विवेकानंदांच्या जीवनावरील कादंबरी, लेखक - चंद्रकांत खोत))

स्वामी विवेकानंद (संदीप जावळे) (२०१५)

स्वामी विवेकानंद आणि २१वे शतक (श्रीपाद कोठे)

स्वामी विवेकानंद : भारतातील गुरु-शिष्य परंपरेची मशाल (सरश्री)

📜 नृत्यनाटिका/नाटक/चरित्रकथन/पुरस्कार

पुण्याच्या सुवर्णा कुलकर्णी या स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर ’परिव्राजक स्वामी विवेकानंद’ नावाची नृत्यनाटिका सादर करतात. (इ.स. २०१३)

पुण्यातीलच ज्ञानप्रबोधिनीचा युवक विभाग ’परिव्राजक नरेंद्र’ नावाचे दोन अंकी नाटक रंगमंचावर सादर करतो. (इ.स. २०१३)

शंकर अभ्यंकर हे ’स्वामी विवेकानंद’ या नावाचा चरित्र कथाकथनाचा कार्यक्रम करतात. (इ.स. २०१३)

पुण्याची स्व-रूपवर्धिनी नावाची संस्था ’स्वामी विवेकानंद मातृभूमी पुरस्कार’ या नावाचा पुरस्कार देते. पुरस्कारार्थी : निनाद बेडेकर (२०१३)

विवेकानंदांच्या १५०व्या जयंतीनिमित्त सोलापूर येथे ९-१० नोव्हेंबर २०१३ या तारखांना विवेकानंद साहित्य संमेलन भरले होते.

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरचे एक दोन अंकी हिंदी नाटक राधिका क्रिएशन्स ही संस्था सादर करते. संस्थेच्या प्रमुख राधिका देशपांडे, लेखिका शुभांगी भडभडे आणि दिग्दर्शिका सारिका पेंडसे यांनी अनेक राज्यांत फिरून नाटकाचे प्रयोग केले आहेत.१७-७-२०१६ रोजी पुण्यात या नाटकाचा १३९वा प्रयोग झाला. या नाटकात ३४ व्यक्तिरेखा असून एकूण ५० कलावंत काम करतात.

विवेकानंदांच्या जन्म दिवशी महाराष्ट्रातील अनेक संस्था वक्तृत्व स्पर्धा, गीता पठण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आदी आयोजित करतात. काही ठिकाणी सामुदायिक सूर्यनमस्कारांचा, योगासनांचा कार्यक्रम असतो. विविध शहरात जुलूस निघतात. काही संस्था स्वच्छता अभियान, छायाचित्र प्रदर्शन किंवा प्रश्नोत्तर स्पर्धा यांतला एखादा कार्यक्रम करतात.

🔮 भारतावर व जगावर विवेकानंदांचा प्रभाव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहरूंचे पीए एम.ओ. मथाई यांना म्हणाले होते की, "अलिकडच्या शतकात भारताने निर्माण केलेला सर्वात मोठा माणूस म्हणजे विवेकानंद आहेत, गांधी नव्हे."

सुभाषचंद्र बोस म्हणाले होते, "जोपर्यंत बंगालचा संबंध आहे, आम्ही विवेकानंदांना आधुनिक राष्ट्रीय चळवळीचे 'आध्यात्मिक पिता' म्हणू शकतो."

स्वामी विवेकानंदांच्या कार्याचा प्रभाव तत्कालीन समाजावर व स्वामीजींच्या अनुयायांवर दोन वेगवेगळ्या प्रकारे पडला. काही विषय, व्यक्ती आणि प्रसंग यांवर त्यांनी कडाडून तोफ डागली. तर काही बाबतीत वाऱ्याच्या मंद झुळकीने फुलाची पाकळी ज्या हळुवारपणे उमलते तसा त्यांचा प्रभाव होता.

मानवी जीवनावर स्वामीजींच्या एकूण झालेल्या प्रभावाची खालीलप्रमाणे वर्गवारी करता येईल -

त्यांनी वेदान्ताकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली .

निस्वार्थी मानवसेवा हाच खरा धर्म होय, असे त्यांनी आग्रहपूर्वक प्रतिपादन केले .

भारतातील राष्ट्रीय चळवळी, आध्यात्मिक चळवळी व इतर सामाजिक सेवाकार्ये या सगळ्यांच्या मागे प्रत्यक्ष - अप्रत्यक्षरीत्या स्वामीजींची प्रेरणा होती व आहे.

पाश्चिमात्य जगात त्यांनी भारताचे आध्यात्मिक व सांस्कृतिक क्षेत्रातील दूत म्हणून भूमिका बजावली.

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏🌹 विनम्र अभिवादन 🌹🙏

           स्त्रोतपर माहिती 



रविवार, ३ जुलै, २०२२

विठ्ठल महादेव तारकुंडे Vitthal Mahadev Tarkunde



विठ्ठल महादेव तारकुंडे Vitthal Mahadev Tarkunde
(स्वातंत्र्य सेनानी, समाज प्रबोधनाचे थोर शिल्पकार व मराठी कायदेतज्ज्ञ)
जन्म : ३ जुलै १९०९
मृत्यू : २२ मार्च २००४
बॕरिस्टर भाऊसाहेब तारकुंडे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले कार्यकर्ते व मराठी कायदेतज्ज्ञ होते. १९५७ ते १९६९ या कालखंडात ते मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश होते. ते रॉयवादी होते. बॅ. विठ्ठल महादेव उर्फ भाऊसाहेब तारकुंडे यांना असामान्य बुद्धिमत्तेचे देणं मिळालं होतं. १९२५ साली झालेल्या मुंबई इलाख्यातील मॅट्रिक परीक्षेत त्यावेळी ते पहिले आले होते. याशिवाय, त्या काळात अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप त्यांनी पटकावली होती. बॅ. तारकुंडे यांना मिळालेल्या या जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिपचे एक वैशिट्य असे की त्यांचे वर्गमित्र न्या. पी. डी. शिखरे व बॅ. तारकुंडे यां दोघांमध्ये ही स्कॉलरशिप विभागली होती.
भाऊसाहेब तारकुंडे यांचं आणखी एक ठळक वैशिष्ट्य असं की सर्व मुंबई इलाख्यात उत्तीर्ण होउन देखील त्यांनी पुणे येथील कृषि महाविद्यालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामागे मोठा ध्येयवाद होता. शेती हाच आमच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. देशातील ७० टक्के लोक हे शेतीवर अवलंबून असतात. खरा भारत हा खेड्यापाड्यातून राहत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची सुधारणा करणं हेच भारतासमोरील मुख्य आव्हान आहे, या दृष्टीने त्यांनी कृषि महाविद्यालयाच्या ९६ वर्षांच्या इतिहासात मॅट्रिक परीक्षेला पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन कृषि महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेले तारकुंडे हे पहिलेच व एकमेव विद्यार्थी होते. कृषि महाविद्यालयामध्ये शेवटच्या परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले व त्यांनी त्या वेळी गुणांचा इतका उच्चांक प्रस्थापित केला की २००४ सालापर्यंत त्यांचा हा उच्चांक कोणीही मोडू शकलेला नव्हता. असे अलौकिक बुद्धिमत्तेचे भाऊसाहेब नंतर १९२९ साली इंग्लंडला गेले. त्यांनी आय. सी. एस. व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती परंतु त्यांना सरकारी नोकरीत कसलाही रस नव्हता. त्यामुळे ते १९३२ साली बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. भाऊसाहेब तारकुंडे हे कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते, यात कसलीच शंका नाही. परंतु त्यांच्या या बुद्धिमत्तेला उदात्त ध्येयवादाचं अधिष्ठान मिळालं होतं. त्यामुळे ते आपलं व्यक्तिगत जीवन अर्थपूर्ण करू शकले. त्याचबरोबर राष्ट्र उभारणीच्या कार्यात त्यांनी यथाशक्ती वाटा उचलला. १९३२ साली ते भारतात परत आले, त्यावेळी ते इंग्लंडमधील समाजवादी विचारांची दिशा घेऊनच आले होते.
१९३१ ते १९३५ या काळात सर्व जगभर ध्येयवादी तरुणांना समाजवादाचं, मार्क्सवादाचं आकर्षण निर्माण झालं होतं. याची बीजे त्या काळातील परिस्थितीमध्येच होती असं मला वाटतं. १९३० साली सर्व जगभर आर्थिक मंदीची लाट मोठ्या प्रमाणावर आली होती. त्यामुळे जगातील सर्वच राष्ट्रांची अर्थव्यवस्था एकां मोठ्या अरिष्टामध्ये सापडली होती. या मोठ्या आर्थिक मंदीच्या लाटेची बीजं भांडवलशाही आर्थिक व्यवस्थेत होती. त्याचप्रमाणे, या काळात जर्मनी, इटलीमध्ये हिटलर, मुसोलिनी यांच्या रूपाने एका भयानक हुकूमशाहीचा उदय होऊ लागला होता. या हुकूमशाहीची बीजंदेखील आमच्या संसदीय लोकशाहीमधील मूलभूत दोषांमध्ये आहेत. आमची लोकशाही ही भांडवलशाहीच्या प्रभावाखाली वावरत आहे. भांडवलदार, कारखानदार यांच्या हातांतील ते एक हत्यार बनले होते. उलट याच काळात सोव्हियेत रशियातील कम्युनिझमचा लाल तारा निश्चितपणे प्रगती करत होता. त्यामुळे जगाला समाजवाद, मार्क्सवाद याशिवाय पर्याय नाही, अशी अनेकांची धारणा होती. या काळात भाऊसाहेब तारकुंडे यांच्या विचारावर समाजवाद, मार्क्सवादाच्या विचारांचा प्रभाव पडणं स्वाभाविकच होतं.
शिवाय त्यांच्या संस्कारक्षम वयात प्रा. आगरकर यांच्या बुद्धिप्रामाण्यवादाचा व निरीश्वरवादाचा प्रभाव पडलेला होता. प्रा. आगरकर यांच्या जीवनातील जळजळीत ध्येयवादाचा त्यांच्या मनावर प्रभाव पडणं स्वाभाविकच होतं. देशातील सारं वातावरणच ध्येयवादाने झपाटलेलं होतं. याचा प्रभाव भाऊसाहेब तारकुंडे यांच्या मनावर पडला असावा, असा माझा कयास आहे. याच काळात नानासाहेब गोरे, र. के. खाडिलकर, एस. एम. जोशी, गोपीनाथ तळवलकर, मधु लिमये, मधु दंडवते, ह. रा. महाजनी यांच्यासारख्या तरुणांवरया ध्येयवादाचा प्रभाव पडला होता. नंतरच्या काळात एस. एम, जोशी, नानासाहेब गोरे व त्यांचे सहकारी समाजवादाकडे आकृष्ट झाले. तरी त्यांच्या मनातील गांधीवादाचा प्रभाव जाणवत होता. भाऊसाहेब तारकुंडे गान्धीयुगाच्या प्रभावाच्या काळात वाढलेले असूनही त्यांच्या मनावर गांधीवादी विचारांचा प्रभाव पडलेला नव्हता असं दिसून येतं. उलट ते गांधीवादापासून दूरच होते. नंतर ते गांधीवादाचे टीकाकार बनले. १९३२ नंतरच्या काळात त्यांच्या मनावर समाजवादाचा व मार्क्सवादाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. १९३४ साली स्थापन झालेल्या काँग्रेस समाजवादी पक्षाचे ते सभासद होते. नंतर १९३६ साली भाऊसाहेब हे एम एन रॉय यांच्या संपर्कात आले. एम एन रॉय यांच्या विचारांमुळे व असामान्य बुद्धिमत्तेमुळे भाऊसाहेब प्रभावित झाले आणि नंतर ते आयुष्यभर एम एन रॉय यांचे निष्ठावंत सहकारीच बनले. मार्क्सवादाचं त्यांना या काळात विलक्षण आकर्षण वाटत होतं, याचे कारण मार्क्सवादाच्या मागे प्रभावी अशी एक नैतिक प्रेरणा होती. मार्क्सचा कॅपिटल हा ग्रंथ अर्थशास्त्रावरचा नसून तो ख-या अर्थाने नीतिशास्त्रावरचा ग्रंथ आहे, असं त्यांचं प्रामाणिक मत होतं. परंतु त्यांना मार्क्सच्या आर्थिक सिद्धांताचं आकर्षण होतं. दुस-या महायुद्धानंतर विशेषतः १९४७ ते ४८ साली ते एम. एन. रॉय यांच्याबरोबर मार्क्सवादाच्या तत्त्वज्ञानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. मार्क्सवाद हा ठोकळेबाज सिद्धांताचा एक सांगाडा नाही तर मार्क्सवाद ही एक शास्त्रीय पद्धतीने विचार करण्याची पद्धती आहे, अशी त्यांची प्रांजळ धारणा झाली. त्यामुळेच ते मार्क्सवादाच्या पलीकडे जाउन त्यांनी एम. एन. रॉय यांच्या विज्ञाननिष्ठ मानवतावादाचा पुरस्कार केला. माणूस हा सर्व समाजव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे व माणसाची प्रगती हाच कोणत्याही सामाजिक संस्थेचा मानदंड आहे, हे त्यांनी मान्य केलं.
भाऊसाहेब तारकुंडे हे १९५७ ते १९६९ या काळात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करीत होते. या काळात कायद्यातील बारीक सारीक कलमांपेक्षा न्यायाकडे अधिक लक्ष दिलं. या दृष्टीने त्यांच्या काळातील अनेक निकाल पुढील काळातील न्यायाधीशांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. तारकुंडे यांना निवृत्तीसाठी काही वर्षं शिल्लक होती व कदाचित दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून जाण्याची शक्यता होती. परंतु समाज प्रबोधनाच्या कामासाठी त्यांनी आपल्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला.
नंतर ते दिल्लीला समाजप्रबोधनाच्या कामासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिससाठी गेले. भाऊसाहेब तारकुंडे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा निष्ठेने जोपासला. आपली मतं इतरांना आवडत किंवा न आवडण्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. निर्भयपणे ते आपले विचार मांडत असत. वैचारिक प्रांजळपणाने चालतंबोलतं रूप म्हणजे भाऊसाहेब तारकुंडे यांचं सारं जीवन होतं.
सत्ता व संपत्ती यांचं त्यांना कसलंही आकर्षण नव्हतं. १९७७ साली त्यांना केंद्र सरकारने राज्यपालपद देऊ केलं होतं, त्यांनी ते नम्रपणे नाकारलं. राजभवनापेक्षा सामान्य माणसामध्ये विचारप्रबोधनाचं काम महत्त्वाचं आहे अशी त्यांची धारणा होती. शिवाय सर्वोच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतांना मिळवलेले लाखो रुपये त्यांनी देशभर विचारप्रबोधनाच्या कार्यासाठी खर्च केले. मोहन धारिया हे वनराईमार्फत ग्रामीण विकासाची कामं करीत आहेत, असं कळल्यावर त्यांनी स्वेच्छेने, मोहन धारिया यांना कसलीही कल्पना नसतांना, एक लाख रुपयांचा चेक देणगीदाखल पाठवला. त्याचप्रमाणे ‘साधना’ साप्ताहिकाचे संपादक नरेंद्र दाभोलकर हे अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम निष्ठेने करीत आहेत, हे लक्षात आल्यावर आपल्या मृत्यूपूर्वी काही दिवस त्यांनी नरेंद्र दाभोलकरांकडे एक लाख रुपयांची देणगी पाठवली. अशा अनेक देणग्या त्यांनी समाजप्रबोधन व ग्रामीण विकासाच्या कामासाठी दिलेल्या आहेत.
भाऊसाहेब तारकुंडे यांनी आयुष्यभर काही उदात्त मूल्ये निष्ठेने जोपासली. मानवी स्वातंत्र्य, समता व मानवी हक्कांसाठी देशभर त्यांनी प्रचार केला. वयाच्या ९४ व्या वर्षी देखील त्यांची राष्ट्रासाठी कार्य करण्याची प्रेरणा प्रबळ होती. मला आणखी १० वर्षं आयुष्य मिळालं पाहिजे, असं ते खाजगीत नेहमी म्हणत. भाऊसाहेब तारकुंडे म्हणजे जीवनातील उदात्त मूल्यांना समर्पित केलेलं असं श्रेष्ठ दर्जाचं जीवन होतं. त्यांच्या जीवनातील उदात्त ध्येयवादाची व जीवनमूल्यांची आजच्या काळात भारताला नितांत गरज आहे. भारतातील या अत्यंत थोर अशा सुपुत्राला व समाजप्रबोधनाच्या शिल्पकाराला मी विनम्र भावाने अभिवादन करतो.

🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 विनम्र अभिवादन🙏

गुरुवार, २३ जून, २०२२

पंडिता रमाबाई डोंगरे Pandita Ramabai Dongare

पंडिता रमाबाई Pandita Ramabai Dongare
२३ जून - जागतिक विधवा दिन निमित्त

पंडिता रमाबाई डोंगरे यांच्या कार्याचा आढावा

रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी कर्नाटक येथील गंगामूळ येथे झाला अंबाबाई व अनंतशास्त्री डोंगरे यांचे शेवटचे अपत्य. लहानपणापासून त्या बुध्दिमान होत्या. त्यांचे मराठी , संस्कृत , बंगाली , कन्नड , इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. 1877 साली त्यांच्या आई वडील यांचे निधन झाले. त्यांनी भारतभर फिरत असता त्यांचे संस्कृत भाषेवर असलेले प्रभुत्व बघून बंगाल येथील संस्थांनी त्यांना 1878 साली "पंडिता " आणी " सरस्वती " हया बिरुदावलीने गौरवण्यात आले.1880 साली भावाचे निधन झाले. त्यांना एकटेपणा जाणवू लागला. 1880 साली त्यांनी बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी विवाह केला. त्यांना मुलगी झाली तीचे नांव मनोरमा ठेवण्यात आले. 4 फेब्रुवारी 1882 रोजी त्यांच्या पतीचे निधन झाले. त्यावेळेस रमाबाई अवघ्या चोवीस वर्षांच्या होत्या जेमतेम एक वर्षांच्या मुलीला सांभाळून त्यांनी पुढील आयुष्य अनाथ , विधवा , विकलांग स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी खर्ची करायचे ठरवले.
29 सप्टेंबर 1883 रोजी त्यांनी ख्रिस्ती धर्म स्विकारला परंतु शेवटपर्यंत शाकाहारी होत्या तसेच खादीची साडी नेसत असत. त्यांनी ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला नाही. 11 मार्च 1889 ला त्यांनी शारदा सदनची स्थापना केली. स्त्रीशिक्षण , विधवाविवाह , स्वावलंबन या त्रिसूत्रीवर भर देणारी समाजसुधारक म्हणून त्यांचा लौकिक झाला.त्यांच्यावर टीका तर होत होतीच परंतु त्यांच्या कार्याचा गौरवसुध्दा होत होता.शासनातर्फे त्यांना "कैसर -ए-हिंद " पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

रमाबाईंनी सलग बारा वर्ष मेहनत घेऊन बायबलचे मराठीत भाषांतर केले. त्यांनी मराठी , इंग्रजी भाषेत अनेक पुस्तकं प्रकाशित केली. त्या देशात , प्रदेशात फिरत होत्या परंतु महाराष्ट त्यांची कर्मभूमी होती. त्यांची मुलगी मनोरमा हीचे 24 - 7 - 1921 रोजी निधन झाले.त्याचा त्यांना खुप धक्का बसला व अवघ्या नऊ महिन्यांत 5 एप्रिल 1922 रोजी रमाबाई यांचे निधन झाले.त्यावेळेस त्या 63 वर्षांच्या होत्या.
5 एप्रिल 2022 रोजी पंडिता रमाबाई यांचे निधन होऊन शंभर वर्ष पूर्ण झाली परंतु त्या कार्यरूपाने अजरामर झाल्या आहेत म्हणूनच करोना काळात ज्या महिला विधवा झाल्या त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंडिता रमाबाई यांच्या नावाने स्वयंरोजगारासाठी विशेष कर्ज योजना सुरू केली आहे. विधवा महिलांसाठी अनेक सामाजिक कार्यकर्ते , सामाजिक संस्था , शासन यांनी कितीही काम केले तरी त्यांच्या कुटुंबीय आणी समाज यांनी त्यांना समजून घेतले तर विधवा महिलांना कोणत्याही समस्या येणार नाही व त्यांच्या आयुष्यात सुख समाधान प्राप्त होईल.
त्यांनी लिहिलेली इतर काही पुस्तके खालीलप्रमाणे आहेत : इबरी (भाषेचे) व्याकरण (१९०८); नवा करार (१९१२); मूळ ग्रीक व हिब्रू भाषांतून असलेल्या बायबलचे मराठी भाषांतर, प्रभू येशू चरित्र (१९१३); भविष्यकथा (२ री आवृ. १९१७), अ टेस्टिमनी, मुक्त्ति प्रेअर बेल अँड न्यूज लेटर्स, फॅमिन – एक्स्‌पिरिअन्स इन इंडिया इत्यादी.
पुरस्कार
1878 – कलकत्ता विद्यापीठातून बंगालमध्ये “पंडित” आणि “सरस्वती” पदवी.
1919 – ब्रिटीश सरकारने समुदाय सेवेसाठी कैसर-ए-हिंद पदक प्रदान केले.
यूएसए मधील एपिस्कोपल चर्चच्या लीटर्जिकल कॅलेंडरवर 5 एप्रिल रोजी तिला मेजवानीच्या दिवशी सन्मानित केले जाते.
26 ऑक्टोबर 1989 रोजी, भारत सरकारने भारतीय महिलांच्या प्रगतीसाठी त्यांच्या योगदानाची ओळख म्हणून एक स्मारक तिकीट जारी केले. 

एका अहवालानुसार जगात विधवा महिलांची संख्या 25 84 81058 आहे. फक्त भारतातच ४६ दशलक्ष विधवा आहेत. जागतिक पातळीवर विधवांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या "लुम्बाफौंडेशन " तर्फे २००५ पासून २३ जून हा दिवस विधवादिन म्हणून पाळला जात होता. संयुक्तराष्ट्र संघाच्या वतीने २०१० पासून हा दिवस " जागतिक विधवा दिन " म्हणून पाळण्यास सुरुवात झाली.


शुक्रवार, १३ मे, २०२२

सात्विक प्रतिष्ठान आयोजित - मदर्स डे निबंध लेखन स्पर्धा

जागतिक मदर्स डे दिवस  - ८ मे २०२२

सात्विक प्रतिष्ठान आयोजित - मदर्स डे निबंध लेखन स्पर्धा २०२२

68 responses

निकाल 
क्रितिका चंदू नवसूपे
साक्षी राकेश दिवेकर
पुर्वा राकेश दिवेकर
पुष्पक जयेंद्र यादव
आराध्या पांचाळ
Arnav Rakesh Gaddi
संचित शेट्ये
दर्शील प्रशांत घोसाळकर
कोमल दिलीप भोईर.
ATHARVA KHODADE
नेहल दिलीप भोईर.
Atharv sanjay jadhav
विनायक बसवाणि कोळी
तन्वी राकेश दिवेकर
हर्षील घाग
अथर्व हणमंत कुंभार
अनुष्का हणमंत कुंभार
तन्वी हणमंत कुंभार
प्रांजल लवू चव्हाण
नाव- मंदार प्रकाश शिवणे.
ईश्वरी संदिप लांडे
आदित्य संदिप लांडे
तन्मय अनिल कटके.
चिन्मय अनिल कटके.
SAEE MANGESH NARVEKAR
आर्या लवु बागवे
Saurabh Sunil Ghanekar
वेदिका दिलीप माने
Yash Eknath Gurav
कुमारी अनन्या बाजीराव शिंदे
सोनल विजय रहाटे
देवेश शंकर ठाकूर
श्रेया युवराज भालेराव
अनन्या अभिजित कर्णिक
गजानन संदीप हावळ
संस्कृती अतुल कुमार चांगंन
रुद्र राहुल सपकाळ
सिध्दी रामनकट्टी
अभिक सोमनाथ बोऱ्हाडे
Saumya Shailesh Padyal
Soham Santosh Bhuwad
आरुष प्रेमचंद ससाणे
स्वरांजली जगदीश खोराटे
तेजस संजय मांडवकर
यश बिंदुसार जाधव
समिक्षा रामनकट्टी
सिद्धि अनाप
अर्जुन पाटील
Aayush Dilip Gaikwad
Ayush dilip Gaikwad
Snehal dilipkumar gaikwad
अनिश राजेंद्र चव्हाण
आर्यन राजेंद्र चव्हाण
चेतन लोटन सुर्यवंशी
Srushti Sachin Gurav
आराध्या अविनाश पाटील
कु. आरुष प्रदिप एकावडे
प्रांजली जीवन सावंत
निल निलेश पाटणकर
अथर्व निलेश पाटणकर
वैष्णवी अमरेश पटनायक

बुधवार, ११ मे, २०२२

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस National Technology Day

राष्ट्रीय_तंत्रज्ञान_दिवस

#(National Technology Day)

११ मे हा दिवस भारतासाठी अतिशय खास आहे. 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन' ११ मे रोजी साजरा केला जातो. या दिवशी देशात तंत्रज्ञानची क्रांती झाली. हा दिवस इतिहासात १९९८ ची 'पोखरण अणु चाचणी' आणि अंतराळातील भारतातील मोठी प्रगती म्हणून ओळखला जातो. हा दिवस भारताने पोखरणमध्ये केलेल्या पाच अणुबॉम्ब चाचणीचा पहिला टप्पा होता. तर याच दिवशी भारताने ऑपरेशन शक्ती या क्षेपणास्त्राची यशस्वीरीत्या चाचणी केली होती.
११ मे १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली.
या प्रगतीचे प्रतीक म्हणून ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडवणा-या घटकांत शासनव्यवस्था, समाजरचना, कर्म, तत्त्वज्ञान यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानले जाते.
११ मे १९९८ रोजी सकाळी वाळवंटातील पोखरणमधील खेतोलाई गावाजवळ भारताने अणुचाचणी घेतली. व्हाइट हाऊस नावाच्या शाफ्टचा स्फोट झाला. ५८ किलोग्राम टन अणुबॉम्बची चाचणी घेऊन भारताने सर्वांना चकित केले. हा अमेरिकेनेने जपानच्या हिरोशिमा येथे दुसर्‍या महायुद्धात टाकलेल्या लिटल बॉय या अणुबॉम्ब पेक्षा चारपट अधिक शक्तिशाली होता. भारताने हे काम कसे केले हे पाहून जगाला धक्का बसला.
भारताने ही अणूचाचणी गुप्तपणे केली होती. १९९५ मध्ये भारताच्या प्रयत्नांना अमेरिकन हेरांनी शोधून काढले आणि दबावाखाली भारताने त्याची चाचणी पुढे ढकलली. त्यानंतर भारताने कोणतीही कसर सोडली नाही. कलाम आणि त्यांची टीम यांनी अनेक वेळा चाचणी स्थळाला भेट दिली. लष्करी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक महिने त्या भागात वास्तव्य केले. परंतु कोणालाही याबद्दल माहिती मिळाली नाही आणि त्यानंतर यशस्वी अणुचाचणी झाली.
तसेच ११ मे १९९८ रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) कडून ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली. जे नंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेत समाविष्ट करण्यात आले. कमी पल्ल्याचे, जलद-प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे (SAM) क्षेपणास्त्र ‘त्रिशूल’ हा भारतातील एकात्मिक गाइडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग होता.
देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून घोषित केला. भारतात १९९९ सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो.
भारताचे तंत्रसामर्थ्य आजपर्यंत वेळोवेळी दिसून आलेले आहे.
तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडवणा-या घटकांत शासनव्यवस्था, समाजरचना, कर्म, तत्त्वज्ञान यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानले जाते. भारताचे तंत्रसामर्थ्य आजपर्यंत वेळोवेळी दिसून आलेले आहे.
सर्वसाधारणपणे मनुष्याने लावलेल्या आयुधे, साधने, तंत्रे, क्रिया अशा विविध प्रकारच्या, मनुष्याला जगून राहण्यासाठी आणि विकासासाठी उपयोगी अशा शोधांचा (इन्व्हेन्शन्स) तंत्रज्ञानात समावेश होतो. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक आहे. आपल्या या सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आणि शारीरिक क्षमतेच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचे एकामागोमाग एक टप्पे गाठले आहेत आणि एका बाजूने सूक्ष्मतम अणूतील ऊर्जा आपल्या कामी आणली आहे आणि दुस-या बाजूला अनंत अवकाशात भरारी घेतली आहे.
सोप्या शब्दात विज्ञान ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधते, तर तंत्रज्ञान ‘कसे’ याचे. इतिहासामध्ये ‘कसे’ साध्य झाल्यानंतर ‘का’ हा प्रश्न उपस्थित केला गेला याचे अनेक दाखले आहेत. उदा. वाफेचे, डिझेलचे अशी इंजिने वापरात आल्यानंतर कालांतराने त्यांच्या कार्यामागची तत्त्वे सांगणारे उष्मागतिशास्त्र विकसित झाले. आता मात्र, विज्ञानाचा पद्धतशीर उपयोग करून नवनवीन उत्पादने, तंत्रे, प्रक्रिया विकसित करण्यासाठी प्रचंड प्रयोगशाळा उभारल्या गेल्या आहेत. आधुनिक औषधनिर्मितिशास्त्र हे याचे बोलके उदाहरण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आधुनिक जगात एक मोठा, सुसंघटित मानवी व्यवहार झाला आहे. सुदैवाने भारताला विसाव्या शतकात असे नेतृत्व लाभले की, ज्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले. देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या, शिक्षणाच्या, संशोधनाच्या संस्था उभारल्या पाहिजेत, उद्योग उभारले पाहिजेत, हे लक्षात घेऊन त्यांनी पावले उचलली.
२००८ साली चंद्रावर पोहोचलेले ‘चांद्रयान’, आपण उभारलेल्या अणुभट्टय़ा, १९९८ सालची अणुचाचणी, आपल्या संशोधनसंस्था, माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील आपली लक्षणीय प्रगती, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला स्वावलंबी बनवणारी ‘हरितक्रांती’ इत्यादी सर्व अभिमानाच्या बाबी आहेत.
राष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या दिवशी त्या आठवून आपल्या स्वसामर्थ्यांची जाणीव करून घ्यायला हवी. त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला हवे, अनेक वेळा तंत्रज्ञान ज्यांच्याकडे ते विकत घेण्याची, वापरण्याची क्षमता आहे, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी ते उपयोगी पडते, परिणामी समाजातील विषमता वाढते. या विषमतेची दरी कमी कशी करता येईल, तंत्रज्ञान सर्वोपयोगी कसे ठरेल या दृष्टीने विचार आणि कृती करण्यासाठी तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आपण संकल्पबद्ध व्हावयास हवे.


आधुनिक_सणवार : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस
११ मेला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि ३० ऑक्टोबरला राष्ट्रीय शास्त्रज्ञ दिवस, असे तीन, विज्ञानाशी संबंध असलेले दिवस भारतात पाळले जातात.
११ मे १९९८ रोजी पोखरण-०२ या यशस्वी अण्वस्त्र चाचण्या केल्या, २८ फेब्रवारी १९२८ रोजी चंद्रशेखर रामन यांनी नोबेल पारितोषिक विजेता शोध लावला, तर ३० ऑक्टोबर १९०९ हा, भारताचे आण्विक शिल्पकार डॉ. होमी भाभा यांचा जन्मदिवस आहे. ११ मे १९९८ हा पहिला राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस साजरा झाला.
११ मे १९९८ रोजी भारताने, अणुगर्भीय चाचण्या साखळ्यांतील, पोखरण-२ प्रकल्पातील शक्ती-१, शक्ती-२ आणि शक्ती-३ या अणुस्फोट चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या. दोनच दिवसांनंतर म्हणजे १३ मे रोजी शक्ती-४ आणि शक्ती-५ आणखी दोन अणुचाचण्या घेतल्या. शक्ती-१ ही प्रभंजन प्रकारची, ४ ते ६ किलोटन क्षमतेची, शक्ती-२ अणुसंमिलन प्रकारची, १२ ते २५ किलो टन क्षमतेची, शक्ती-३ ही १ किलो टनपेक्षा कमी क्षमतेची होती. १३ मेच्या अणुचाचण्या कमी क्षमतेच्या होत्या. शक्ती-१ आणि शक्ती-२ या चाचण्यांची क्षमता अपेक्षेपेक्षा बरीच कमी होती. त्यामुळे, भारताच्या या चाचण्या अयशस्वी झाल्या अशी ओरड काही विदेशी संस्थांनी केली, परंतु आमचे तंत्रज्ञान कमी पडले असा खुलासा भारत सरकारने केला.
११ मेला आणखीही एक, भारताच्या इतिहासात महत्त्वाची घटना घडली आहे. दिल्लीच्या राष्ट्रीय जनगणना आयोगाच्या, लोकसंख्या घडय़ाळानुसार, ११ मे २००० रोजी, १ अब्ज हा आकडा आला तेव्हा, बरोबर १२ वाजून ३२ मिनिटांनी दिल्लीत कुमारी आस्था अशोककुमार अरोरा या ‘अब्जाव्या’ भारतीय नागरिकाचा जन्म झाला आणि ती कन्या होती हे विशेष, भारताची लोकसंख्या अधिकृतपणे एक अब्ज झाली.
वाढती कारखानदारी, त्यासाठी नैसर्गिक संपत्तीचा अनिर्बंध वापर, उपयोगात आणलेल्या, वापरून झालेल्या वस्तूंची आणि पदार्थाची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यामुळे पर्यावरणातील वाढते प्रदूषण, वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणा-या समस्या, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, दैनंदिन गरजा आणि चैनी भागविण्यासाठी लागणारा पैसा मिळविण्यासाठी दिवसेंदिवस वाढतच जाणारी जीवघेणी स्पर्धा इत्यादी विज्ञानीय प्रगतीच्या दुष्ट परिणामांवर उपाययोजना करण्यासाठी, त्याबाबत जनजागृती करण्यासाठी, समाजातील विचारवंतांनी निरनिराळे दिवस किंवा ‘दिन’ पाळण्याची प्रथा किंवा प्रघात रूढ केला.
त्या निमित्ताने एखादी विशिष्ट समस्या प्रकर्षाने चर्चिली जावी, त्या समस्येचे वास्तवरूप जनमानसाला समजावे, त्यावर योग्य ती उपाययोजना व्हावी, सर्वाकडून वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न व्हावेत, असा या निरनिराळे ‘दिन’ पाळण्याचा किंवा साजरे करण्याचा मुख्यत्वेकरून उद्देश असतो.
थोडक्यात म्हणजे हे निरनिराळे ‘दिन’ पाळणे म्हणजे आधुनिक सणवार पाळण्यासारखेच आहे. ज्या दृष्टिकोनातून पूर्वी सणवार आणि व्रतकैवल्ये रूढ झालीत, त्याच जनहिताचा आणि समाजहिताचा विचार आजही कायम आहे, सक्रिय आहे असाच अर्थ हे ‘दिन’ साजरे करण्यामागे आहे, असे वाटते.

स्त्रोतपर माहिती

गुरुवार, ७ एप्रिल, २०२२

जागतिक आरोग्य दिन World Health Day




सात एप्रिल हा दिवस सर्वत्र जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा करण्यात येतो. त्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे, ते म्हणजे याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली होती. जागतिक आरोग्य संघटना अर्थात (WHO) ची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली.मात्र जागतिक आरोग्य संघटनेचा स्थापना दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा हा विचार सर्व प्रथम 7 एप्रिल 1950 रोजी मांडण्यात आला. तेव्हापासून सात एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात येतो. एकोणिसाव्या शतकात आरोग्याचा प्रश्न अंत्यत गंभीर असा होता. जगभरात विविध साथीच्या आजारांचे (Illness) थैमान सुरू असे. या आजारात अनेकांना आपला जीव गमवावा लागे. ही समस्या दूर करण्यासाठी एखादी संस्था असावी, असा विचार सर्वप्रथम 1948 रोजी आला आणी त्यातूनच पुढे सात एप्रिल 1950 रोजी डब्लूएचओची स्थापना झाली.
World Health Day आरोग्यामध्ये केवळ शारीरिकरित्याच नाही तर मानसिकरित्याही तंदुरूस्त असणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती जर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट असेल तर त्या व्यक्तीला निरोगी म्हटलं जातं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार आरोग्य हे मानवी आनंद आणि कल्याणासाठी मूलभूत आहे. हे आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वपूर्ण योगदान देते, कारण निरोगी व्यक्ती अधिक काळ आयुष्य आनंदी जगू शकते असे म्हटलं आहे. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन (World Health Day) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी, जगभरातील लोकांच्या सामान्य आरोग्य आणि कल्याणाविषयी जागरूकता वाढवण्यासाठी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
एखादी आरोग्यसमस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी काय करता येईल, त्याबाबत विविध मुद्यांवर अवलोकन करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी, जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी काही उपक्रम राबवते आणि त्यासाठी एक घोषवाक्य जाहीर करते. गेल्या वर्षीप्रमाणेच याहीवर्षीचे घोषवाक्य कोरोनाशी संलग्न आहे. यावर्षीचे WHO चे घोषवाक्य आहे, Our Planet, Our Health म्हणजेच आपली पृथ्वी, आपले आरोग्य.


World Health Day Purpose जागतिक आरोग्य दिनाचा उद्देश--
जागतिक आरोग्य दिनाचा उद्देश लोकांना त्यांच्या आरोग्याबद्दल आणि भारत सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या आरोग्य कार्यक्रमाबद्दल जागरुक करणे हा आहे. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश जगभरात एकसमान आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि लोकांना आरोग्याच्या अफवांपासून दूर ठेवणे हा आहे. जागतिक आरोग्याशी संबंधित समस्यांवर विचार करणे आणि त्यावर कार्य करणे.

रविवार, २७ फेब्रुवारी, २०२२

आगामी झालेले